राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, January 8, 2024

छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील मराठी विभागाची ग्रंथ महोत्सवास भेट


- सातारा - प्रतिनिधि - / वार्ता -
येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील मराठी विभागातील सर्व विद्यार्थी व प्राध्यापक यांनी सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ महोत्सवास भेट दिली. महाविद्यालयातील बीए भाग एकचे विद्यार्थी यामध्ये सहभागी होते. ग्रंथ महोत्सवांमधील विविध प्रकाशन विभागाच्या स्टॉलला विद्यार्थ्यांनी भेट देऊन आवडीची पुस्तके खरेदी केली..प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे व मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. सुभाष वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील डॉ.विद्या नावडकर, डॉ. संजय कुमार सरगडे प्राध्यापिका प्रियांका कुंभार हे यावेळी विद्यार्थ्यांच्या सोबत होते.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


मराठी कवितेत अनिसच्या विचारांचा प्रवाह निर्माण झाला आहे - किशोर बेडकिहाळ

शिवाजी राऊत यांच्या ‘सत्यशोधक विचारधारा", आणि दिलीप महादार यांच्या ‘आसूड’ या ग्रंथांचे प्रकाशन

- सातारा - प्रतिनिधि - / वार्ता -
‘सावित्रीबाई यांनी आपले सारे आयुष्य समाजासाठी समर्पित केले आहे परंतु अजूनही समाजातील अनेक स्तरातल्या लोकानी सावित्रीचे दुःख समजून घेतले नाही. आपल्या समाजातील बहुजन आणि अभिजन
 यांच्यातील अंधश्रद्धा अजूनही निघून गेलेली नाही. दिलीप महादार यांच्या आसूड कवितासंग्रहातील कविता
 या अंधश्रद्धा निर्मुलन जनजागृतीच्या कविता आहेत.
समाजाला डोळस करण्याचे काम त्या करीत आहेत.
 यादृष्टीने तो आपला कवी आहे. काल्पनिक प्रतिमांच्या
 भानगडीत ते पडलेले नाहीत. मला एक गोष्ट जाणवते
अलीकडच्या काळात मराठी कवितेत अनिसच्या विचारांचा प्रवाह निर्माण झाला आहे. अशा कविता मराठीत विपुल प्रमाणात असून त्या सर्व संकलित केल्या पाहिजेत, त्यांचा स्वतंत्र अभ्यास केला पाहिजे’ असे मत ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी व्यक्त केले. ते येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मराठी विभागाने आयोजित केलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुण्यतिथी कार्यक्रम व शिवाजी राऊत यांच्या सत्यशोधक विचारधारा व दिलीप महादार याच्या ‘आसूड’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे होते. यावेळी मानसोपचार तज्ज्ञ डॉ.हमीद दाभोलकर,प्रमोदिनी मंडपे, शिवाजी राऊत,दिलीप महादार प्रकाशक अनिकेत फरांदे,मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे, कुमार मंडपे सर,प्रशांत पोतदार, तुषार बोकेफोडे, इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

 महादार यांच्या कवितेबद्दल बोलत असताना ते म्हणाले ‘’ आज लेकी सुना नोकरीला लागल्या पण शिकूनही सावित्रीबाई यांची जाणीव त्यांच्यात आली नाही .आपले शिक्षण आपले वर्तन याकडे आपले लक्ष नाही. वटवृक्षाला फेऱ्या मारताना आपण विचार करायला पाहिजे .दिलीप महादार यांची कविता प्रश्न विचारणारी कविता आहे, ती वर्णनपर आहे.’
 सत्यशोधक विचारधारा या ग्रंथाबद्दल बोलताना ते म्हणाले ‘ शिवाजी राऊत वाचनाचा नाद आहे. सतत ज्ञानार्जनाच्या मागे असणारा समाजशिक्षक म्हणजे शिवाजी राऊत आहेत. त्यांचा पिंड तत्वचिंतनाचा पिंड आहे. १९ व्या शतकातील महाराष्ट्र त्यांच्या सत्यशोधक विचारधारा पुस्तकात आहे. सत्यशोधक ते गांधीजीपर्यंतचे तत्वचिंतन त्यांचे आहे. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली .

 सत्यशोधकाचे ब्राह्मणेतर कसे झाले याचेही विश्लेषण त्यांनी केले आहे. सत्यशोधक चळवळ आज संपली आज तिचे अवशेष फक्त आपल्याला दिसतात. कर्मवीर
 भाऊराव यांनी जलशातून भाषण करून प्रबोधन केले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांचे राजकीय चरित्र अद्यापि
कोणीही लिहिलेले नाही ही खंत त्यांनी व्यक्त केली. १९१९ नंतर आरक्षणाच्यानंतर सत्यशोधक चळवळ सत्तेकडे गेली. शेतकरी असल्याशिवाय काँग्रेस, पुढे जाणार नाही अशी भूमिका महर्षींची होती असेही ते म्हणाले
 सत्यशोधक विचारधारेच्या संदर्भात बोलताना किशोर बेडकिहाळ म्हणाले’ १८८५ ते १९३८ या काळात कॉंग्रेसमध्ये ब्राह्मणेतर नेतृत्व नव्हते.१९३८ नंतर केशवराव जेधे हे नेतृत्व मिळाले त्यानंतर कॉंग्रेस शेतकरीमय झालेली दिसते. शेतकरी कॉंग्रेसमय झालेली दिसते. महाराष्ट्राचे प्रबोधन हे सामाजिक सुधारणांच्या अंगाने होते ते राजकारणाच्या अंगाने नव्हते.पुढे राजकारणाचे अंग आले.महर्षी शिंदे उपेक्षित महात्मा होते. ‘आमचे समाजसुधारक धर्म विन्मुख आहेत ते धर्म सन्मुख व्हायला हवेत. समाजातील आरोग्य व इतर सुधारणा याकडे समाज सुधारकांनी लक्ष द्यायला पाहिजे असे विठ्ठल रामजी शिंदे म्हणाले होते. आजचा बहुजन म्हणजे बहुजन नव्हे. बहुजन म्हणजे नुसत्या जाती नव्हेत, बहुजन राजकारणाची संकल्पना महर्षी यांची वेगळी होती, सत्ता,संपत्ती,आणि शिक्षण या पासून जे वंचित आहेत ते बहुजन अशी संकल्पना त्यांनी सांगितली होती...महर्षी यांनी जनपद पक्ष असे नाव दिले होते. वंचित घटक म्हणजे बहुजन अशी ती संकल्पना होती. वर्गीय राजकारणाचे एक रूप त्यांनी ठेवले होते. डॉ.आंबेडकर यांच्या अगोदर आणि फुल्यांच्या नंतर महर्षी शिंदे हेच बहुजनाचे पुढारी होते. सुधारणा म्हणजे सामाजिक सुधारणा ,धर्म सुधारणा असे त्यांचे मत होते. आज मोठ्या प्रमाणात जातीच्या अस्मिता राजकारणात आलेल्या आहेत.महाराष्टाला विचाराचा प्रांत म्हणवला जातो,पण आपण अधिक संकुचित होत चालल्याचे चित्र आहे. महाराष्ट्राचे राजकारण खुरटलेले आहे. महापुरुषांना जातीच्या चौकटीत ठेवले जात आहे.जनतेच्या प्रश्नांची जाणीव त्यांना नाही.कोणीतरी फितवत राहते,बहुजन फितत राहतात. त्यामुळे बहुजन समाजाची आज फरफट होत आहे. सत्यशोधक भूमिका आपण पुन्हा अभ्यासली पाहिजे .सत्यशोधक प्रवाहाचे आपण घटक आहोत म्हणून आपण मोकळेपणाने सांगायला पाहिजे असे ते म्हणाले.
डॉ.हमीद दाभोलकर म्हणाले की ‘दिलीप महादार हे कर्ते सुधारक आहेत. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा खून त्यांच्या विचाराला दहशत निर्माण करण्यासाठी करण्यात आलेला होता. पण त्यांचे विचार संपलेले नाहीत हे अशा पुस्तकातून कळते. संत आणि समाज सुधारक यांचा वारसा शिवाजीराव राऊत व दिलीप महादार यांचे लेखनात आहे. आपण सत्यशोधनवादी आहोत .गांधीजीनी सुरवातीस ईश्वर हे सत्य मानत होते पण नंतर सत्य हेच ईश्वर आहे असे मत त्यांनी मानले. सत्यशोधनाचा विचार पुढे नेण्याचा लढा आपण सोडलेला नाही तो पुढे नेऊया ’असे ते म्हणाले.

ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रमोदिनी मंडपे म्हणाल्या‘डॉ.एन.डी.पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे विचार पोहचवले. महर्षी शिंदे अस्पृश्यता दूर व्हावी म्हणून ते महारवाड्यात कुटुंबासहित राहिलेले आहेत. त्यांना महार शिंदे म्हणून टिंगल केली पण त्यांनी अस्पृश्यांचे कल्याण करण्याचे काम केले. ते उपेक्षित राहिलेले दिसतात. अस्तित्वात नसलेल्या सरस्वतीला महत्व दिले जाते ,पण सावित्रीबाई यांनी खरी शिक्षणाची पाटी आपल्या हातात दिली त्यांचे कार्य माहित असूनही आपण त्यांच्या सारखी कृती करत नाही हि खंत त्यांनी व्यक्त केली.

फुलेंच्या लेखनाचे परिशीलन करणारे विचार राऊत व महादार यांच्या लेखनात दिसतात. अंधश्रद्धेवर उगारलेला आसूड म्हणजे महादार यांची कविता आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी केले. तुषार बोकेफोडे ,दिलीप महादार, प्रशांत पोतदार ,शिवाजी राऊत, यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमास डॉ.शिवाजी पाटील ,सुर्यकांत गायकवाड, अमितकुमार शेलार,प्रा.डॉ. संजयकुमार सरगडे, प्रा.प्रियांका कुंभार, प्रा. श्रीकांत भोकरे मराठी विभाग ,विवेक वाहिनी विभागातील विद्यार्थी ,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते,उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार डॉ.विद्या नावडकर यांनी मानले.
*फोटो ओळी*
आसूड कवितासंग्रह व सत्यशोधक विचारधारा या ग्रंथाचे प्रकाशन करताना –
डावीकडून प्रकाशक अनिकेत फरांदे .डॉ.हमीद दाभोलकर , प्रमोदिनी मंडपे .प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे ,किशोर बेडकीहाळ,शिवाजी राऊत ,दिलीप महादार, मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे
==================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
==================================

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून स्व.जयंतराव ससाणे यांच्या........आठवणींना उजाळा💐✅🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

- श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
श्री साईबाबा संस्थान चे माजी अध्यक्ष तथा श्रीरामपूर चे माजी आमदार स्व.जयंतराव ससाणे यांनी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात अनेक विकास कामे करून सर्वसामान्यांची मने जिंकल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. श्रीरामपूर न.पा.चे माजी उपनगराध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या निवासस्थानी दिलेल्या सदिच्छा भेटी प्रसंगी चव्हाण बोलत होते. चव्हाण पुढे म्हणाले की स्व. जयंतराव ससाणे व आमचे मित्रत्वाचे संबंध होते. श्रीरामपुरात स्व. जयंतराव ससाणे यांचे मोठे काम असून आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून ते नावारूपाला आले. स्व. जयंतराव यांची मोठी उणीव या मतदार संघात निर्माण झाली असून, विविध योजनांनतून विकास कामांना निधी कसा मिळवायचा यासाठी ते अतिशय उत्तम उदाहरण होते. यावेळी मा. मुख्यमंत्री चव्हाण यांनी स्व. ससाणे यांच्या अनेक आठवणीना उजाळा दिला. ससाणे यांची संघटना मजबूत असून, काँग्रेसची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत  पोहोचवण्यासाठी सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. स्व जयंतराव ससाणे यांच्या सर्वांना सोबत घेऊन विकास कामांचा वारसा करण ससाणे यांनी जपला असून त्यांचा जनसंपर्क चांगला असल्याचेही चव्हाण म्हणाले. यावेळी करण ससाणे यांच्या कार्याचे चव्हाण यांनी कौतुक केले.

याप्रसंगी तालुक्याचे आ.लहुजी कानडे, माजी नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे, जिल्हा बँकेचे संचालक तथा माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे,जि प चे माजी सभापती बाबासाहेब दिघे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा. नाईक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले, बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, खंडेराव सदाफळ, विकास दाभाडे, श्रीरामपूर पं.स.माजी सभापती वंदनाताई मुरकुटे,माजी नगरसेवक सुनील बोलके, रमण अण्णा मुथा, हाजी मुजफ्फर शेख, दिलीप नागरे, राजेंद्र सोनवणे, के. सी. शेळके, कैलास दुबैया, सुहास परदेशी, ज्ञानेश्वर (माऊली) मुरकुटे,भारत भवार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस दिपालीताई ससाणे, रितेश चव्हाणके, सुरेश ठुबे, मिथुन शेळके, विजय शिंदे,रितेश एडके, सनी मंडलिक,सुनील साबळे, शाहरुख शेख, वैभव कुऱ्हे, जाफर शहा, गोपाल भोसले, विशाल साळवे, आकाश जावळे, संजय खैरे, राजेश जोंधळे, सागर दुपाटी, श्रेयस रोटे, कल्पेश पाटणी, तीर्थराज नवले, प्रशांत आल्हाट आदी काँग्रेसचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजु मिर्जा*
(ब्यूरो चिफ: नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

Sunday, January 7, 2024

अप्पा काका मामा, दादा ही नाती घरीच ठेवा, कलावंताना आदरणीय स्वभिमणी वागमुकीने नावे घ्या व बोलवीन्याचे व्यासपीठावर एकमेकांना मान द्या; राज ठाकरें...


 पुणे - प्रतिनिधी - / वार्ता -
 राज ठाकरेंनी कान उघडी टोचले मराठी कलाकारांचे
100 व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनात मनसे अध्यक्ष
 राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांनी नाटकसह मराठी कलाकारांवर भाष्य केलं
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली.

 यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या नाटकाविषयीच्या प्रेमाबद्दल भाष्य केलं. नाटक पाहिलेला माणूस हा महाराष्ट्रात नाही असं होणारच नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. जसं आमच्या भाषणाला रिटेक नाही, तसं नाटकाला ही रिटेक नसतो. खरं तर हल्ली सकाळी सकाळी बातमी पाहिली की म्हणावं वाटतं की थोडं रिटेक घ्या, असं म्हणत राज ठाकरे यांनी खोचक टोला लगावला. या मुलाखतीदरम्यान राज ठाकरे यांनी मराठी कलाकरांचे कान टोचलेत. मराठी कलाकरांनी व्यासपीठावर,चारचौघात एकमेकांना मान द्यायलाच हवा असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
मराठी माणूस महाराष्ट्राचा इतिहास विसरतोय
============

पुण्यात 100 व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलानाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाट्यसंमेलानादरम्यान दीपक करंजीकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान राज ठाकरे यांनी त्यांच्या नाटकाच्या प्रेमाविषयी भाष्य केलं. तसेच त्यांनी मराठी कलाकरांना देखील सल्ले दिले. खरं तर मला हुरहूर होती, की दुपारच्या जेवणानंतर मंचासमोर कोणी असेल का? की फक्त प्रश्न-उत्तरं होतील असं वाटलं होतं. पण तुम्ही उपस्थित आहात, त्याबद्दल आभार. आता विषय काय आहे, "नाटक आणि मी" त्यापेक्षा "मी आणि माझी नाटकं" असा विषय असता तर तो विषय खूप रंगला असता, मात्र आयोजकांना त्यात रसचं नाही. आता नाटक म्हणून माझी मुलाखत घ्यावी इतकं माझ्यात काही नाही, फक्त नाटक एवढंच माझ्यात आहे, असं राज ठाकरे यांनी
आपला मराठी माणूस हा महाराष्ट्राचा इतिहास विसरला आहे. खरं तर आपण राज्यकर्ते होतो आपण, देशाचा पंतप्रधान मराठा साम्राज्याने बसवला. आपण सगळे जातीपातीत भांडत बसलोय. आता ही जात पात फक्त राजकारणात नाही तर नाटकात, शाळेत ठिकठिकाणी आलेली आहे. हे दुर्दैव आहे.

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
मराठी कलाकरांनी एकमेकांना मान द्यायलाच हवा
=============

मराठी कलाकारांनी एकमेकांना मान द्यायला हवा. पहिली आणि शेवटची गोष्ट तुम्ही कलाकारांनी एकमेकांना मान दिला नाही अन नको त्या नावाने एकमेकांना हाका देत बसलात तर मराठी चित्रपटसृष्टीतून एक ही स्टार निर्माण होणार नाही. इतर राज्यातील कलाकारांकडे बघा. रजनीकांत आणि इलाहीराजा रात्री एकत्र बसून दारू बसत असतील, मात्र मंचावर आले की ते एकमेकांना सर म्हणून आदर देतात. मराठी कलावंतांनी याचं अनुकरण करायला हवं. मानसन्मान द्या. तुम्ही जर नाक्यावर उभं राहिला तर तुम्हाला कोणी पैसे देऊन पाहायला येणार नाही. आज अशोक सराफ हे चौकात उभे राहिल्याचे दिसले नाहीत, म्हणून मी पैसे मोजूनचं त्यांना पाहायला जाईन. आता इथं प्रशांत दामले अध्यक्ष आहेत. आता मी चार भिंतीत त्यांना काहीही म्हणेन, मात्र इथं मी त्यांना सर म्हणेन. आता अशोक सराफांना हे काय म्हणतात मामा, अरे तुझा काय सख्खा मामा आहे का? अरे सर म्हणा ना? आता शरद पवार इथं आले तर मी त्यांना वाकून नमस्कार करेन, कारण ते वरिष्ठ नेते आहेत.  माझ्या भाषणात मी त्यांच्यावर बोलेन मात्र समोर आल्यावर त्यांचा त्यांना मानसन्मान देईनच. त्यामुळं मराठा कलावंतांनी ही गोष्ट पाळायला हवी, असं म्हणत राज ठाकरे यांनी मराठी कलावंतांचे कान टोचलेत. स्पष्ट करत सांगितले

=================================
-----------------------------------------------
: - सह, संपादक -  रंजित बतरा - पुणे - +919936331313... संकलन ✍️✅🇮🇳
-----------------------------------------------
=================================



















Saturday, January 6, 2024

*रेड क्रॉसच्या वतीने आरोग्य साहित्याचे वाटप* *बालिका विद्यालयात बालिका दिन साजरा*


- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
येथील भि.रा खटोड कन्या विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त इंडियन रेड क्रॉस सोसायटी श्रीरामपूर अंतर्गत विद्यार्थिनींना आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी डॉ. सौ. ज्योत्स्ना तांबे यांची निवड करण्यात आली.

प्रमुख अतिथी म्हणून प्रांताधिकारी व रेड क्रॉस सोसायटी अध्यक्ष किरण सावंत पाटील, गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, सचिव सुनील साळवे तसेच पोपटराव शेळके, प्रवीण साळवे, उमेश अग्रवाल, भरत कुंकूलोळ, बन्सी फेरवानी, विनोद हिंगणीकर, गोरक्षनाथ बनकर, संदीप छाजेड, किरण बोरावके, गणेश थोरात, पुष्पा शिंदे, वर्षा दातीर ,अरुण कतारे, सुरंजन साळवे, डॉ. स्वप्नील पुरणाळे, सुरेश वाघुले, राजू केदारी, कल्पेश ढमाले, विश्वास भोसले, विद्यालयाचे चेअरमन दत्तात्रय साबळे, प्राचार्य विद्या कुलकर्णी पर्यवेक्षिका अनिता शिंदे ,सेवक प्रतिनिधी आदिनाथ जोशी, प्रा. सतीश म्हसे आदी उपस्थित होते.
 याप्रसंगी उषा गाडेकर व अवधूत कुलकर्णी यांनी एका सुरेल स्वागत गीताने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.

    प्रांताधिकारी किरण सावंत यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले, जीवन बोरसे यांनी विद्यार्थिनींना पोक्सो कायद्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच रेड क्रॉस सोसायटी चे सचिव सुनील साळवे यांनी रेड क्रॉस सोसायटी विषयी विद्यार्थिनींना माहिती दिली व विद्यालयांमध्ये ज्यूनियर रेड क्रॉस सोसायटीची स्थापना करण्यात येईल असे याप्रसंगी सांगितले. विद्यालयाच्या प्राचार्या विद्या कुलकर्णी मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट थोडक्यात विद्यार्थिनींना उलगडून दाखवला. तसेच गटशिक्षणाधिकारी सामलेटी मॅडम यांनी विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन पुढे वाटचाल करण्याचे मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षाडॉ. सौ तांबे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मला लांडगे यांनी केले तर अध्यक्षीय सूचना कैलास आढाव यांनी मांडली,आभार प्रा. सौ मनीषा आवटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व सेवक वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर*
================
*सहयोगी* - स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

Friday, January 5, 2024

जिल्ह्यात ५ जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू


- अहमदनगर - जिमाका -/ वृत्तसेवा
जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३७ (१) व ३७ (३) अन्वये ५ जानेवारी, २०२४ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार नमूद कालावधीत कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे.
शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, ध्वनीवर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसाच्या तसा ऐकवणारे उपकरण संच वापरणे किंवा वाजवणे, सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे, आवेशपुर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणने अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे. सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य
 कारणास्तव सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास व
 पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई केली आहे.
शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे, तसेच प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धार्मिक मिरवणूका, लग्न समारंभ, लग्नाच्या मिरवणूका हे कार्यक्रम, सभा घेण्यास अथवा मिरवणूका काढण्यास ज्यांनी संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची रितसर परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना हा आदेश लागु राहणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

दुचाकी चालवताना हेल्मेट वापरासंदर्भात जिल्ह्यात प्रबोधनात्मक मोहिम राबविण्यात येणार

दुचाकी चालवताना हेल्मेट वापरासंदर्भात जिल्ह्यात प्रबोधनात्मक मोहिम राबविण्यात येणार

जिल्हाधिकारी कार्यालयात विनाहेल्मेट दुचाकीवर प्रवेश करणा-यांस प्रतिबंध

अहमदनगर जिमाका वृतसेवा
दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. बहुतांशी दुचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असतात असे दिसून
 आले आहे.
हेल्मेट वापरण्यासंबंधी प्रबोधनात्मक व अंमलबजावणीविषयक व्यापक मोहीम अहमदनगर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात विनाहेल्मेट दुचाकीवर प्रवेश करणा-यांस प्रतिबंध करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
  जिल्ह्यात सन २०२२-२०२३ मध्ये घडलेल्या अपघाताचे तुलनात्मक विश्लेषण केले असता या वर्षामध्ये घडलेल्या एकूण रस्ते अपघातांमध्ये दुचाकी व पादचा-यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आलेले आहे. या अपघातांपैकी ७० ते ८० % अपघात हे फक्त दुचाकी व पादचा-यांचे आहेत. मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम १९४ ड मधील तरतुदीनुसार हेल्मेटट वापरासंबंधी तरतुदीचा भंग करणाऱ्या अथवा त्यास संमती देणाऱ्या व्यक्तीस दंडाची तरतूद आहे. विनाहेल्मेट दुचाकी चालविणे किंवा चालविण्यात संमती देणे अशा दोघांवरही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली असून त्यांना दडात्मक कारवाईची तरतूद आहे. त्यामुळे कलम १९४ ड मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात विनाहेल्मेट दुचाकीवर प्रवेश करणा-यांस प्रतिबंध करण्यात आला आहे.
कलम १९४ ड अन्वये विनाहेल्मेट दुचाकी चालविणे
 किंवा चालविण्यात संमती देणे अशा दोघांवरही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली असून त्यांना दडात्मक कारवाईची तरतूद आहे. एखादी व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयात विनाहेल्मेट दुचाकीवर प्रवेश करतांना आढळून आल्यास १९४ ड च्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीकोनातून
 कार्यालयातील अशा विनाहेल्मेट दुचाकीवर येणा-यांची यादी परिवहन कार्यालयास कळविण्यात येऊन संबंधित व्यक्तींवर मोटार वाहन काय‌द्यातील विहीत तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================