राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, February 13, 2024

अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील गैरसोई त्वरीत दूर करा - अशोक सब्बन ?


जिल्हा रुग्णालयातील गैरसोई व अडचणी दूर होण्यासाठी भारतीय जनसंसदेचे नगरमध्ये उपोषण सत्याग्रह आंदोलन

गोर - गरीब रूग्णाची हेळसांड व परवड थांबविण्यासाठी भारतीय जनसंसदचा पुढाकार

- अहमदनगर - प्रतिनिधि -/ वार्ता -
गोर- गरीबांची हेळसांड थांबविण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील गैरसोई व अडचणी दूर कराव्या, या मागणीसाठी भारतीय जनसंसदच्या वतीने जिल्हा रुग्णालयासमोर उपोषण करण्यात आले. या उपोषणात भारतीय जनसंसदेचे संस्थापक अध्यक्ष अशोक सब्बन, बबलू खोसला, वीर बहादूर प्रजापती, रईस शेख, पोपटराव साठे, प्रमोद वाघमारे, अनिल पवार, हबीब पठाण, दत्ता तांबे, भारतीय जनसंसदचे जिल्हा अध्यक्ष सुधीर भद्रे आदी सहभागी झाले होते.
जिल्हा रुग्णालय मध्ये येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषत: रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची योग्य व्यवस्था नाही, एक्सप्रेस फोल्डर चे बिल भरत नसल्यामुळे वारंवार विजेची समस्या निर्माण झाल्याने तातडीच्या आरोग्य सुविधा पुरविण्यात मोठ्या अडचणी येतात. अशा अनेक प्रशासकीय गैरसोयीमुळे योग्य सक्षम अशी आरोग्य सुविधा गोरगरीब नागरिकांना उपलब्ध होत नसल्याचे भारतीय जनसंसदच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

*प्रमुख मागण्या*
रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पडिक असलेली धर्मशाळा दुरुस्त करून रुग्णांचे नातेवाईकांना राहण्यासाठी योग्य ती सोय करावी.

जिल्हा रुग्णालयांमध्ये एक्सप्रेस फिडररचे थकीत बिल भरून जिल्हा रुग्णालय भारनियमन मुक्त करावे.

बाहेर असलेला नेत्र कक्ष विभाग जिल्हा रुग्णालयाच्या आतमध्ये सुरु करावा.

डॉक्टरांच्या ओपीडीमध्ये बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करावे व त्याचे स्क्रीन आर.एम.ओ. यांच्या केबिनमध्ये बसविण्यात यावे.

ओपीडी मध्ये सर्व डॉक्टर सकाळी ८: ३० ते १२:३० वाजेपर्यंत पूर्ण वेळ उपस्थित असावे. 

नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांची पूर्वीप्रमाणे असलेली बसण्याची जागा पुन्हा त्या ठिकाणी करण्यात यावी.

मुख्य प्रवेशद्वारातील खराब झालेला रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी भारतीय जनसंसदच्या वतीने करण्यात आली आहे.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

गोंधवणीरोडवरील पाटाच्या पुलाजवळ दुर्गंधीचे साम्राज्य शहरात रोगराई पसरण्याची शक्यता

*गोंधवणीरोडवरील पाटाच्या*
 *पुलाजवळ दुर्गंधीचे साम्राज्य*
*शहरात रोगराई पसरण्याची शक्यता ?* 

श्रीरामपूर - सध्या पाटाला पाणी आलेले आहे, या पाण्यामध्ये मेलेले पशु/कुत्रे वैगरे वाहुन येत असुन ते गोंधवणीरोड वरील मुश्ताकभाई भंगारवाले यांच्या दुकानाजवळील पाटाच्या जुण्या छोट्या पुलाजवळ अडकून पडत असल्याने परिसरात प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.
याचा परिसरातील नागरीकांना खुपच त्रास सहन करणे भाग पडत असुन संबंधित प्रशासनाने यावर वेळीच तातडीने लक्ष घालुन परिसराती नागरीकांचा त्रास दुर करावा अशी मागणी होत आहे.

Monday, February 12, 2024

संभाव्य टंचाईसदृष्य परिस्थिती निवारणासाठी उपाययोजनांचा सर्वंकष आराखडा तयार करा - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा
 जिल्ह्यातील धरणे तसेच साठवण तलावातील पाण्याची उपलब्धता लक्षात घेता जिल्ह्यातील संभाव्य टंचाईसदृष्य परिस्थितीच्या अनुषंगाने टंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा सर्वंकष आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात टंचाईच्या परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी दूरदृष्य प्रणालीद्वारे अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री विखे पाटील बोलत होते.
यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले,आमदार लहू कानडे, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते हे उपस्थित होते तर सभागृहात आमदार प्रा. राम शिंदे, आमदार प्राजक्त तनपुरे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री विखे पाटील म्हणाले की,संभाव्य टंचाईसदृश्य परिस्थितीमध्ये नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागू नये याची खबरदारी घेत जिल्ह्यातील प्रत्येक वाडी, वस्त्यांमध्ये पाणी मिळेल यादृष्टीने पाणी पुरवठ्याचे काटेकोर नियोजन करण्यात यावे. पाणी पुरवठ्यासाठी पाणी उद्भवाचा सर्व्हे करून ते निश्चित करण्यात यावेत. उदभवातून पाणी उपसा करण्यासाठी आवश्यक त्या सर्व साधनांची उपलब्धता ठेवा. टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठीची निविदा प्रक्रिया गतीने राबवून ती अंतिम करण्यात यावी. टँकरद्वारे पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या ठिकाणी पाच हजार लिटरच्या टाक्यांची व्यवस्था करण्यात यावी. उपलब्ध पाण्याच्या काटकसरीने वापर करत कुठल्याही परिस्थितीत पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. जिल्ह्यातील ज्या पाणी पुरवठा योजनांची कामे रखडलेली असतील ती कामे प्राधान्याने व गतीने पूर्ण करण्यात यावेत. विंधन विहिरींच्या प्रस्तावांवर शासन नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी दिले.
संभाव्य टंचाईसदृश्य परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील जनावरांना मुबलक प्रमाणात चारा मिळेल यादृष्टीने चाऱ्याचेही नियोजन करण्यात यावे. जिल्ह्यात मागेल त्याला काम मिळण्यासाठी रोजगार हमी योजनेमध्ये सेल्फवर मोठ्या प्रमाणात कामे मंजूर करून ठेवण्यात यावीत. संभाव्य टंचाईसदृश्य परिस्थितीत पाणी पुरवठा योजनांची विजजोडणी खंडित करण्यात येऊ नये, अशा सूचनाही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी संभाव्य टंचाईसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने उपयुक्त अशा सूचना केल्या.जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीस सर्व उप विभागीय अधिकारी, तहसिलदार यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

अशोकनगर येथील अशोक स्टेडियमवर आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धा संपन्न


अशोक पाॕलिटेक्नीक महाविद्यालयास विजेतेपद तर परिक्रमा पाॕलिटेक्निक महाविद्यालयास उपविजेता

- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता 
महाराष्ट्र राज्य तंञशिक्षण मंडळाच्या विद्यमाने आयोजित आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धेत अशोक पाॕलिटेक्निक महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले तर परिक्रमा पाॕलिटेक्निक महाविद्यावयास उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. विभागीय विजेतेपद मिळाल्याने अशोक पाॕलिटेक्निकचा संघ कल्याण येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करेल.
    तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक स्टेडीयमवर संपन्न झालेल्या या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे हस्ते व कोंडीराम उंडे यांचे अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, संचालक सोपानराव राऊत, हिंमतराव धुमाळ, संचालिका तथा शिक्षण संस्थेच्या समन्वयक सौ.मंजुश्री मुरकुटे, तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भास्कर खंडागळे आदी उपस्थित होते.    
              याप्रसंगी बोलताना माजी आ. श्री.मुरकुटे म्हणाले की, खेळामुळे आनंद मिळतो तसेच मनही प्रसन्न राहाते. खेळात यश अपयश असतेच. त्यामुळे अपयश आले म्हणून नाउमेद न होता झालेल्या चुका, उणिवा दूर कराव्यात. खेळात भेदभाव नसतो तर सर्व समान असतात. मला खेळाची आवड असून या वयातही मी मैदानात असतो, असे त्यांनी आवर्जून सांगीतले.
               तत्पूर्वी अंतिम सामन्यात अशोक पाॕलिटेक्निकने आठ षटकांत ७६ धावा केल्या. फरदिन पठाण व दिनेश ठोबळे यांनी प्रत्येकी १६ धावांचे योगदान दिले. उत्तरादाखल परिक्रमा संघाचा डाव ६५ धावसंख्येवर गडगडाला. निखिल शेलार याने १६ धावा करीत एकाकी झुंज दिली. अशोक पाॕलिटेक्निकने अंतिम सामाना १२ धावांनी जिंकून विजेतेपद पटकावले. पंच म्हणून सुधा तावडे व राहुल विसपुते यांनी काम पाहिले. प्राचार्य आंजाबापू शिंदे यांनी प्रास्तविक केले तर उपप्राचार्य अरुण कडू यांनी सूञसंचलन केले. 
अशोकच्या संघास सचिन कोळसे, अक्षय मगर व प्रताप राऊत तर परिक्रमा संघास अशोक राहिंज, रविन्द्र काळावे या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी अध्यापक तसेच क्रीडा रसिक उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजु मिर्जा*
(ब्यूरो चिफ: नाशिक विभाग)
===================
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

Sunday, February 11, 2024

चाळीस वर्षांनंतर श्रीरामपुरात जैन भागवती दीक्षा महोत्सव


*२१ वर्षांच्या मोक्षा ने घेतली दीक्षा* 
*महतीश्रीजी असे झाले नामकरण*

चाळीस वर्षांनंतर श्रीरामपुरात*
 *जैन भागवती दीक्षा महोत्सव

- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील जैन समाजातील २१ वर्षांची बी.ए. सायकॉलॉजीचे शिक्षण घेतलेली मोक्षा प्रशांत चोपडा हीचा जैन भागवती दीक्षा महोत्सव ११ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील जैन संत साध्वी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मोक्षा हिला साध्वीचा वस्त्र परिधान करून नामकरण विधी करण्यात आला. मोक्षा आता 'प प पु महतीश्रीजी म सा ' या नावाने ओळखली जाणार आहे.
मोक्षा ही व्यापारी नेमीचंद माणकचंद चोपडा यांची नात व उद्योजक प्रशांत व सौ. प्रिती प्रशांत चोपडा यांची कन्या आहे. मोक्षा हिने तीन चातुर्मास केले असून अनेक वेळा श्रीरामपूर चेन्नई बंगळुरू, बीड, जामखेड, छत्रपती संभाजीनगर असा सुमारे तीन हजार किलोमीटर प्रतिभाकंवरजी यांच्या सोबत पायी प्रवास केला आहे. जैनधर्मियात लहान वयापासूनच धार्मिक शिकवण दिली जाते. दहावीला असताना कुटुंबीयांसोबत जालना येथे गुरू प्रतिभाकंवरजी यांचा पहिल्यांदा सहवास लाभला. तेव्हापासूनच दीक्षा घेण्याचे विचार मोक्षा करत होती. जैन भागवती दीक्षा महोत्सवा निमित्त जैन स्थानकात १ ते ११ फेब्रुवारी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोक्षा चोपडा हि नवकार आराधिका प्रतिभाकंवरजी व आयंबिल तप आराधिका जिनशासन प्रभावीका प्रफुल्लाजी आदि साध्वी मंडळच्या सानिध्यात महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषि यांच्या अरविंदाने दीक्षापाठ अंगीकारुन जैन साध्वी झाली.
दिक्षा महोत्सवासाठी जैनसाधक सौरभमुनि, युवा प्रणेते गौरवमुनि, शालिभद्र, प्रणवमुनि, सार्थकमुनि व सक्षममुनिजी आदि संत महात्म्याच्या समवेत नवकार आराधिका प्रतिभा,आयंबिल आराधिका प्रफुल्ला आदीसह साध्वी मंडळ तसेच महाराष्ट्र चेन्नई बेंगलोर आधी राज्यातील हजारो जैन महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
४० वर्षापूर्वी सुमिता (कोपरगांव) व सुनेता (केडगांव, पुणे) यांची दीक्षा श्रीरामपूर येथे झाली होती. आता श्रीरामपूरची कन्या मोक्षा चोपडा हिची जैन भागवती दीक्षा करण्याचे भाग्य लाभले आहे. तसेच अंजली ही माजलगांव येथे २८ एप्रिल रोजी दीक्षा घेणार आहे.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार दीपक कदम -श्रीरामपूर*
==============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


Saturday, February 10, 2024

राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत प्रणाली पाटीलला विजेतेपद



- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
जामखेड महाविद्यालय आयोजित राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत तालुक्यातील बेलापूरच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थीनी प्रणाली पाटील हिने विजेतेपद पटकाविले.
प्रणाली पाटील हिने आजवर अनेक स्पर्धा गाजविल्या असून विजेतेपद मिळविले आहे. जामखेड येथील राज्यस्तरीय स्पर्धेतही तिने यश मिळवून आपली यशाची वाटचाल कायम राखली आहे.प्रणालीस प्राचार्य डाॕ.गुंफा कोकाटे यांचे सदैव मार्गदर्शन लाभते.
 प्रणालीच्या यशाबद्दल बेलापूर एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष अशोक साळुंके, हरिप्रसाद खाटोड, अॕड.शरद सोमाणी, रविन्द्र खटोड,भारत साळुंके, अॕड.विजय साळुंके, बापुसाहेब पुजारी, राजेन्द्र खटोड, बेलापूर पञकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे आदिंनी अभिनंदन केले आहे.

===============================≠=-----------------------------------------------
*पत्रकार अमन सय्यद - बेलापूर*
===============
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


अय्युब पठाण यांची "दान दे कवितेचे प्रभावी सादरीकरण



- छ्त्रपती - संभाजीनगर. -/ प्रतिनिधी -
 छ्त्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्यावतीने महाराष्ट्रातील पहीले ऐतिहासिक शिक्षक साहित्य संमेलन १० फेब्रुवारी २०२४ ला कांचनवाडी येथील अग्रसेन विद्या मंदिराच्या सभागृहात झालेल्या निमंत्रीत कवि संमेलनात प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक तथा बालभारतीच्या पाठय पुस्तकातील कवी अय्युब पठाण लोहगांवकर यांनी आपल्या मधूर आवाजात 

*" दान दे " पानाफुलांचा शाप*
 *नको, पाकळयांना वरदान दे!*

*माणिकमोती पिकण्यास*
*हे ! नभा भुईला दान दे!* 

या कवितेचे निमंत्रित कवी म्हणून प्रभावीपणे सादरीकरण करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. या कवि संमेलनात एकूण ५४ निमंत्रित कवी/ कवयित्रिंची सहभागी होऊन सर्व कवी/ कवयित्रीनी कवी संमेलनात दर्जेदार कविता सादर केल्या.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================