राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, August 11, 2024

रिपब्लिकन युवा सेनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी इम्रान पटेल


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

- श्रीरामपूर -  प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर शहरातील उच्चशिक्षित आणी धडाडीचे युवा कार्यकर्ते इम्रान मुसा पटेल यांची आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
श्री.पटेल त्यांची पत्रकारिता क्षेत्रासह राजकीय जाण व जनसंपर्क ही जमेची बाजू लक्ष्यात घेऊन सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशान्वये रिपब्लिकन सेने चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या स्वाक्षरी ने सदर नियुक्ती पत्र त्यांना प्रदान करण्यात आले. सदर नियुक्तीसाठी रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य शशिकांत कांबळे यांनी शिफारस केली. सदर नियुक्ती पत्र पुणे येथे आयोजित जाहीर प्रवेश व नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रमात इम्रान पटेल यांना देण्यात आले. 
उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष पद स्वीकारतांना इम्रान पटेल यांनी वरिष्ठांचे आभार मानत भविष्यात रिपब्लिकन सेनेसाठी भरीव काम करून सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांचे हात बळकट करण्याची हमी दिली.
त्यांच्या या निवडीबद्दल सामाजिक, शैक्षणिक, राजकिय, पत्रकारिता साहित्य आदि क्षेत्रातील अनेकांनी अभिनंदन केले आहे.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================






साहित्यिक अय्युब पठाण लोहगावकर यांना"महाराष्ट्र भूषण जीवन गौरव" पुरस्कार


- प्रतिनिधी - हारुन शेख - / पैठण -
बालभारतीच्या पाठयपुस्तकातील प्रसिद्ध कवी तथा "पाणपोईकार " अय्युब पठाण लोहगांवकर यांना नांदेड येथील "महात्मा कबीर समता परिषद, या संस्थेच्यावतीने २०२४ चा महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार नुकताच जाहीर झाला असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मुकुंदराज पाटील यांनी अय्युब पठाण यांना एका पत्राद्वारे कळविले आहे. बँन्डमास्टर ते शाळामास्तर व्हाया मराठी साहित्यिक असा जीवन प्रवास असलेले अय्युब पठाण यांनी मराठी साहित्य क्षेत्रात ३२ वर्षापासून साहित्य लेखनात भरीव योगदान दिलेले असून आजपर्यंत त्यांची बारा पुस्तके प्रकाशित झालेली आहे. तसेच २२ वर्षे लग्न-कार्यात बँन्डबाजा वाजवून समाजाचे मनोरंजन केले आहे. शैक्षणिक क्षेत्रात ३३ वर्ष सहशिक्षक म्हणून पवित्र अध्यापनाचे कार्य केले. तसेच " मुले रंगली काव्यात " या एकपात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे विविध शाळा- महाविद्यालयात १०५ प्रयोग सादर करून मुला-मुलींचे प्रबोधन केले आहे. अय्युब पठाण लोहगांवकर यांच्या अशा अजोड कार्याची दखल घेऊन नांदेड येथील," महात्मा कबीर समता परिषदने श्री. पठाण यांना " महाराष्ट्र भूषण जीवन गौरव " पुरस्कार जाहीर केला आहे. 
या पुरस्कार निवड समितीमध्ये महाराष्ट्र राज्यभरातील विविध क्षेत्रातील तज्ञांनी मान्यवरांकडून श्री. पठाण यांची यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या पुरस्काराचे स्वरूप ताम्रपत्र, स्मृतिचिन्ह, मानाचा फेटा, सन्मानपत्र,आणि शाल- श्रीफळ व रोख रक्कम असे असून लवकरच मान्यवरांच्या हस्ते अय्युब पठाण यांना,          " महाराष्ट्र भूषण जीवन गौरव " पुस्काराने गौरविण्यात येणार असल्याने साहित्यिक,
शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================






अहमदनगर मध्ये ईपीएसपेन्शनर मेळावा संपन्न



केंद्र सरकारने निवडणूकीपूर्वी
 निर्णय घ्यावा - पोखरकर 

- श्रीरामपूर  - प्रतिनिधी - / वार्ता -
रविवार दि.११/८/२०२४ रोजी सकाळी ११:३० वा. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, टिळक रोड,अहमदनगर येथे जिल्ह्यातील ईपीएस पेन्शनर मेळावा संपन्न झाला.सर्व तालुक्यातील पदाधिकारी व पेन्शनर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
     अध्यक्षस्थानी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देविसिंग अण्णा जाधव होते, अजितकुमार घाडगे (समन्वयक, पुणे जिल्हा), .ईंद्रसिंग आप्पा राजपूत (अध्यक्ष, पिंपरी चिंचवड). सुभाषराव पोखरकर (संघटक पश्चिम भारत) यांची विशेष उपस्थिती होती.
राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांचे नेतृत्वाखाली दिल्ली येथे दि.३१ जुलै रोजी झालेल्या ध्यानाकर्षण आंदोलनाबाबत व संघटनेचे चालू असलेल्या प्रयत्नाबाबत सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली. केंद्र सरकारने पेन्शन प्रश्नी ३१ ऑगस्टपूर्वी निर्णय न घेतल्यास पेन्शन धारकांचा असंतोष सरकारला निश्चित महागात पडेल.शहराध्यक्ष संजय मुनोत यांचे सुचनेनुसार. दिल्ली आंदोलनात सहभागी झालेल्या पेन्शन धारकांचा सत्कार करण्यात आला. खासदार निलेश लंके व खासदार भाऊसाहेब वाकचौरे अचानक बाहेर गावी गेल्यामुळे फोनवर शुभेच्छा देवून आपल्या मागण्या बाबत पाठपुरावा करण्याचे त्यांनी आश्वासित केले. जिल्हाध्यक्ष संपतराव समिंदर, शहराध्यक्ष संजय मुनोत, महिला आघाडी अध्यक्षा श्रीमती आशाताई शिंदे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष वाळके अप्पा, नेवासा तालुकाध्यक्ष बापूराव बहिरट, पाथर्डी तालुका प्रमुख साहेबराव वाघ, संगमनेर तालुकाध्यक्ष अशोक देशमुख, राहाता प्रमुख दशरथ पवार ,पारनेर तालुकाध्यक्ष यशवंत औटी, जामखेड प्रमुख शिवाजी थोरात राजुस्कर, अकोले प्रमुख बबनराव शेटे, नगर तालुका प्रमुख भिमराज भिसे, प्रकाश गायके, सखाहरी भोसले, बबनराव बारहाते,रामभाऊ तुपे, बशीर भाई शेख यांचेसह विविध तालुक्यातील पेन्शनर हजर होते. अहमदनगर शहर व पाथर्डी तालुक्यातील महिलाही हजर होत्या.
कार्यक्रमाचे उत्तम नियोजन त्र्यंबकराव देशमुख व त्यांच्या टीमने यांनी अतिशय परिश्रम घेवून यशस्वी केले. जिल्हाध्यक्ष समिंदर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.अशी माहिती जिल्हा अध्यक्ष संपतराव समिंदर यांनी दिली. 


=================================
-----------------------------------------------
वृत्त विशेष सहयोग
 ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - ✍️✅🇮🇳...शिरसगांव
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================


निपाणी वडगाव येथे आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा


- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील शिवशंभो मंडळाच्या तसेच आदिवासी भिल्ल समाज बांधव एकलव्य संघटना यांच्या वतीने बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष अशोक गांगुर्डे, उपाध्यक्ष संजय बर्डे, जालिंदर मोरे,वसंत बर्डे, मनोज बर्डे, अर्जुन बर्डे, बाळासाहेब बर्डे, भाऊसाहेब बर्डे तसेच महिला आघाडी सौ. मीना बर्डे, सौ. संगीता बर्डे,सौ. छाया बर्डे, सौ. सुशीला बर्डे, सौ. सुनीता मोरे तसेच एकलव्य समाज बांधव मोठ्या संख्येन उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे अशोक गांगुर्डे, संजू बर्डे यांनी आभार मानले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. -

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार राजेंद्र देसाई - ✍️✅🇮🇳... वडाळा महादेव

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

युनिर्व्हसल डेंटल क्लिनिकच्यावतीने चांद सुलताना हायस्कूलमधील ८०० विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी

फास्टफूड,चॉकलेट सारख्या बाबींमुळे मुलांना दातांच्या समस्या - डॉ साॅलेहा बागवान 

- अहमदनगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 आज फास्टफूट, चॉकलेट, व्यायाम, मैदानी खेळांचा अभाव यामुळे लहान मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या जाणवत आहे. याकडे पालकांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शाळेतील शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत नेहमीच चांगल्या सूचना देत असतात. परंतु त्या अंमलात आणण्याचे काम पालकांनी केले पाहिजे. दातांची समस्या ही अनेक मुलांना जाणवत असते. त्याबाबत जागृत होणे गरजेचे आहे. आज चांद सुलताना हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची दंत तपासणी करुन मार्गदर्शन केले. यामुळे विद्यार्थी दातांची काळजी घेतील. युनिर्व्हसल ट्रस्टच्या माध्यमातून शालेय स्तरावर विविध जागृतीपर उपक्रम घेतले जातात, त्याचप्रमाणे गरजूंना मदतीचाही हात दिला जातो, असे प्रतिपादन डॉ. साॅलेहा बागवान यांनी केले.
युनिर्व्हसल एज्युकेशन ट्रस्टच्या युनिर्व्हसल डेंटल मल्टीस्पेशालिटी क्लिनिक, अहमदनगर च्यावतीने चांद सुलताना हायस्कूल मधील ८०० विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी करण्यात आली. याप्रसंगी ट्रस्टचे व्हाईस चेअरमन शेख महेबुब सर, चांद सुलताना हायस्कुल चे अध्यक्ष सय्यद मतीन, उपाध्यक्ष समद खान,असगर अली, सदस्य मन्सूर भाई, गुलाम दस्तगीर, जुबेर भाई, पप्पू भाई जहागीरदार, मौलाना शफी, 
राजमोहम्मद शेख , 
मुख्याध्यापक अतिक सर, 
पर्यवेक्षक जफर सर आदी मान्यवर उपस्थित होते. मुलांची तपासणी डॉ.सॉलेहा बागवान, डॉ. वैष्णवी गोरे ,डॉ सायली शिंदे,डॉ सावन पालवे, प्रेरना केरूळकर, दिपा शिंदे, मास्टर मुस्तफा, आशा आदिंनी केली.
याप्रसंगी मतीन सैय्यद म्हणाले, शैक्षणिक कार्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विषय जागृती व्हावी, लहानपणापासून त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे, यासाठी शाळेच्यावतीने विविध उपक्रम राबवत असते. विद्यार्थीना सामाजिक जाणिवेतून स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, पर्यावरण रक्षण, याबरोबर कला-क्रिडा, स्पर्धा परिक्षांसाठी प्रोत्साहन दिले जाते. आज युनिर्व्हल ट्रस्टचे चांद सुलताना हायस्कुल मध्ये दंत तपासणीचा चांगला उपक्रम राबविला. याद्वारे विद्यार्थ्यांना दाताचे महत्व आणि त्याची काळजी कशी घ्यावी, या विषयीचे ज्ञान मिळाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगली जागृती झाल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक अतीक सर यांनी केले. तर आभार जफर सर यांनी मानले. यावेळी सुमारे ८०० मुलांची दंत तपासणी करण्यात आली. या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले. -


=================================
-----------------------------------------------
 वृत्त विशेष सहयोग,
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, ✍️✅🇮🇳...अहमदनगर  
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================




ज्युनियर रेड क्रॉस सोसायटीने दिल्यासीमेवरील सैनिकांना राख्या


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
रक्षाबंधन सणानिमित्त श्रीरामपूर येथील भि. रा. खटोड कन्या विद्यालय व शा. ज.पाटणी विद्यालय मधील ज्युनियर रेड क्रॉस नी राख्या बनविणे कार्यशाळा घेवून आकर्षक राख्या बनविल्या. विविध आकार व रंगात असलेल्या राख्या पठाणकोट व लडाख येथे सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या सैन्यासाठी पाठविलेल्या आहेत.
           दोन्हीही विद्यालयातील मुलींच्या ज्युनियर रेड क्रॉस युनिट ने तयार केलेल्या १५० राख्या रेड क्रॉस अध्यक्ष तथा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांचेकडे सुपूर्त केलेल्या आहेत.
            ज्युनियर रेड क्रॉस युनिट चे विद्यार्थिनींना प्राचार्य विद्या कुलकर्णी, मुख्याध्यापक व्ही. बी. भांगरे, खटोड कन्या चे युनिट प्रमुख अवधूत कुलकर्णी, निर्मला लांडगे,पाटणी विद्यालयाचे युनिट प्रमुख अनूप्रिती पवार,रश्मी कासार, नितीन यशवंत आदींनी बहुमोल मार्गदर्शन केले
             ज्युनियर रेड क्रॉस चे अभिनव उपक्रमाचे अध्यक्ष किरण सावंत पाटील, उपाध्यक्ष मिलिंद वाघ,सचिव सुनील साळवे,खटोड कन्या चेअरमन दत्तू साबळे,पाटणी विद्यालय चेअरमन भरत कुंकुळोल , प्रवीण साळवे, पोपटराव शेळके,सुरेश वाघुले, श्रावण भोसले,गणेश थोरात,सचिन चंदन,केशव धायगुडे,पुष्पा शिंदे,शोभा शेंडगे,सविता साळुंके, साहेबराव रक्ते,ज्ञानदेव माळी, गोरक्षनाथ बनकर, प्रो.सुप्रिया साळवे,आदींनी विद्यार्थिनींनी केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================



विद्यमान लोकप्रतिनिधींच्या निष्क्रीयतेमुळे स्थानिक तरूणांवर बेरोजगारीची वेळ - हेमंत ओगले


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 शहरात एमआयडीसी असुन त्यातील पन्नास टक्के कंपन्या बंद आहेत. उर्वरीत चालु कंपन्यात परप्रांतीय काम करतात. तालुक्यातील तरुणांना नोकरीसाठी वणवण करावी लागत असल्याने ते नोकरी- धंद्यांसाठी मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी धाव घेताना दिसत आहेत. श्रीरामपूर तालुक्यात कुठल्याही नोकरीच्या संधी उपलब्ध नसल्याने तसेच त्यांना पर्याय उपलब्ध होत नसल्याने हा निर्णय घ्यावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. शहरात सुसज्ज समजल्या जाणार्‍या एमआयडीसीत केवळ बोटावर मोजण्याइतक्या कंपन्या चालु असल्याने आणि नोकरीच्या हव्या तशा संधी उपलब्ध नसल्याने तरुणांवर बेरोजगारीचा शिक्कामोर्तब केला जात आहे. तरुणांना नोकरी मिळालीही तरी ती या महागाईच्या दुनियेत साथ देणारी नसल्याची खंत हेमंत ओगले यांनी व्यक्त केली.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन तेथील शेतकरी, युवक आणि जनतेसोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणिस हेमंत ओगले यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य बाबासाहेब दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष दिपाली ससाणे यांच्या उपस्थितीत शेतकरी युवक संवाद यात्रा काढण्यात आली. 
यात्रेच्या अकराव्या दिवशी हेमंत ओगले यांनी सकाळच्या सत्रात ग्रामस्थांसमवेत संवाद साधला. येथील कॉर्नर सभेत मनोगत व्यक्त करताना हेमंत ओगले म्हणाले की, आज श्रीरामपूर आणि राहूरी अशा दोन एमआयडीसी असूनही त्यात स्थानीक तरुणांना नोकरीच्या संधी नाही. यासाठी येथील तरुण मुंबई, पुण्याची वाट धरत आहेत. तर काही आपला छोटासा व्यवसाय थाटत आपला जीवन चरितार्थ चालवताना दिसत आहे. आजकालची तरुणाई ही स्मार्ट असून त्यांना जास्त सांगण्याची गरज पडत नसल्याची स्थिती आहे. अनेक तरुण हे आपले शिक्षण संपल्यावर जेथे पैसा जास्त आहे, त्या गावाला जाणे पसंत करतात. चांगली नोकरी आणि हुद्दा त्यांना या ठिकाणी मिळत नसल्याने त्यांचा बाहेर जाण्यासाठीचा कल वाढत आहे. पण याचा लोकप्रतिनिधींनी विचार करून या तरुणांचे ज्ञान जर तालुक्याच्या विकासासाठी वापरले असते तर तालुक्याचा विकास झपाट्याने झाला असता.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले की, सध्याची युवा पिढी शिकलेली असून त्यांच्या कडे चांगल स्किल आहे. त्यांना सर्व गोष्टीची जाणीव आहे. एमआयडीसी भागात बेरोजगारीचे सावट काढून या युवकांना आपल्या हक्काच्या ठिकाणी काम द्यायला काहीच हरकत नाही. जेणेकरून तरुणांना आपले घर न सोडता नोकरी मिळून हव्या त्या पगारावर काम करून आनंद उपभोगता येईल. आतापर्यंत या गावांमध्ये मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी स्व. जयंतराव ससाणे यांनी भरघोस निधी दिला. मतदारसंघात त्यांचा एक वेगळा ऋणानुबंध होता. आपल्या आशिर्वादाची आम्हाला गरज आहे असेही यावेळी ते म्हणाले
 यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य बाबासाहेब दिघे म्हणाले की, किमान ७० टक्के स्थानिकांना रोजगार मिळाला पाहीजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
दरम्यान भविष्यात विकासकामांना आणखी गती देण्यासाठी हेमंत ओगले हेच चांगला पर्याय आहे. श्रीरामपूर विधानसभा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने तसेच येथील मतदारांना हेमंत ओगले यांना असलेली समस्यांची जाण असलेला पर्याय उपलब्ध झाला आहे. दरम्यान यावेळी स्व. जयंतराव ससाणे यांच्यावर प्रेम करणारे मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


=================================-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------