राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, September 2, 2024

श्रीरामपूर आरटीओ अधिकाऱ्यांची अपघातग्रस्तांना मिळाली मोठी मदत

लोणी - तळेगांव रोडवरील दोघा जखमींना उपचारासाठी केले हॉस्पिटल मध्ये दाखल 

- श्रीरामपू - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. आनंता जोशी हे श्रीरामपूरहुन आपल्या शासकीय वाहनाने मिटींग साठी नाशिक ला जात असताना लोणी - तळेगांव रोडवरील लोहारे या गावाच्या परिसरात दोन अपघात ग्रस्त दुचाकीस्वार गंभीर जखमी अवस्थेत दिसून आल्याने, सदरील अपघातात त्यांना जबरदस्त मार लागल्याने पाय फॅक्चर झाल्यामुळे त्यांना प्रचंड वेदना होत होत्या व त्या वेदनेने ते प्रचंड व्हिवळत होते,
         
         अशा संकट समयी खरे तर अपघात ग्रस्तांची मदत केली पाहिजे मात्र जे ते वाहन चालक हे दृश्य बघून पुढे निघून जात होते,कोणीही मदतीस पुढे येत नव्हते,
अशा संकट समयी आपल्या मिटींगला वेळ होईल याची कल्पना असताना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.अनंता जोशी व त्यांच्या वाहनाचे वाहन चालक श्री. सावता कातकडे यांनी सदरील अपघातग्रस्त दोघांना तात्काळ आपल्या वाहनात बसवून लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट च्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
             
         सदरील अपघात हा अतिवेगवान चार चाकी वाहनाच्या जबरदस्त धडकेमुळे घडल्याचे तथा सदरील वाहन चालक न थांबताच पुढे त्याच भरधाव वेगवान गतीने आपले वाहन चालवत निघून गेल्याचे जखमी अमजद खान आणी युनुसखान यांनी सांगितले.

=================================
    *अति वेगाने वाहने चालवून अपघातास कारणीभूत ठरु नका, अपघात समयी मदत करा हे आपले कर्तव्य आहे, तसेच शासनाने देखील याबाबत आदेश दिलेले आहेत मात्र तरी काही वाहन चालक बेदारकपणे आपली वाहने चालवून अपघातास कारणीभूत ठरतात हा मोठा गुन्हा आहे,तसेच अपघातसमयी अपघातग्रस्तांना मदत केली पाहिजे असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ( डेप्युटी आरटीओ) श्री.जोशी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर
+919561174111
-----------------------------------------------
=================================







Sunday, September 1, 2024

वाढदिवसाच्या शुभेच्छा बद्दल मन पूर्वक आभार 💐💐💐


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सन्माननीय मित्र बंधू - भगीनींनो,
आपल्या मनाच्या तळमळीतून माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार मानतो. आपल्या शुभेच्छांनी माझा दिवस अधिक सुंदर आणि आनंदमयी केला आहे. तुमच्या या स्नेहाचा आणि आपुलकीचा मला खूप आधार वाटतो, आणि हेच आपले नाते अधिक मजबूत करणारे आहे.

माझ्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या क्षणी तुम्ही मला पाठिंबा दिला आहे, हे मला जाणवते. तुमच्या शुभेच्छांनी मी आणखी एक प्रेरणादायी वर्षाच्या प्रवासासाठी तयार झालो आहे. हे वर्षही तुमच्या प्रेम आणि आशीर्वादाने यशस्वी होईल, याची मला खात्री आहे.

आमचे हे नाते असेच घट्ट राहील आणि आपल्या स्नेहाचा हा प्रवाह निरंतर वाहत राहील, अशी मी मनापासून आशा व्यक्त करतो. तुमच्या शुभेच्छांमुळे मी अधिक उर्जावान आणि उत्साही झालो आहे.

तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो आणि तुमच्या सुख-समृद्धीसाठी शुभेच्छा देतो.


=================================
-----------------------------------------------
आपला :-
शौकतभाई शेख ✍️✅🇮🇳...
प्रमुख: स्वाभिमानी प्रसार माध्यम समुह
-----------------------------------------------
=================================

Friday, August 30, 2024

छ.शिवाजी कॉलेजमध्ये पाली भाषा कार्यशाळेचे उदघाटन कार्यक्रम संपन्न


- सातारा - प्रतिनिधी -/ वार्ता -
सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ भाषा मंडळ तसेच छ. शिवाजी कॉलेजमधील मराठी विभाग व मुंबई येथील पाली भाषा रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने 'पालीभाषा मूलभूत ज्ञान परिचय' या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिलकुमार वावरे यांच्या उद्घाटनपर भाषणाने झाले.
 यावेळी मुंबई येथील पाली भाषा रिसर्च इन्स्टिट्यूटचे पाली भाषेचे अभ्यासक अरविंद भंडारे आणि विलास ढवळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी भूषविले. 
 कार्यक्रमाचा प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. सुभाष वाघमारे यांनी केले.
 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.डॉ. अनिल वावरे म्हणाले की," भगवान बुद्धाने सत्ता, संपत्तीचा त्याग करून समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी स्वतःचे आयुष्य खर्च केले. त्यांचे अनमोल असे ज्ञान पाली भाषेमध्ये उपलब्ध आहे. आजच्या स्पर्धेच्या जगात काही प्राचीन भाषा लुप्त होऊ पाहत आहेत. पालीसारख्या भाषेचे महत्त्व ओळखून ह्या भाषा संवर्धित करून त्यातील ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्याचे आपण सर्वांनी कार्य केले पाहिजे." असे त्यांनी यावेळी मत व्यक्त केले. 
       कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, " छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे. ह्या महाविद्यालयाने घडवलेले काही विद्यार्थी आज महाराष्ट्रात, देशात आणि संपूर्ण जगामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवताना दिसत आहे. पाली भाषेच्या अभ्यासातून भगवान बुद्धाचे मानवी कल्याणाचे ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्यास मदत होईल म्हणून विद्यार्थी, विद्यार्थिनींनी ह्या भाषेचा सखोल अभ्यास करावा."असे त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
       सदर कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात आबासाहेब उमाप यांनी आभार व्यक्त केले तर प्रा.डॉ.विद्या नावाडकर यांनी सूत्रसंचालन केले.
    कार्यक्रमासाठी प्र. प्राचार्य डॉ.बी. एस.चव्हाण, उपप्राचार्या प्रा.डॉ.रोशनआरा शेख, उपप्राचार्य प्रा.डॉ. रामराजे माने-देशमुख,प्रा. डॉ .शिवाजी पाटील,प्रा.डॉ. राज चव्हाण प्रा. डॉ.केशव पवार, प्रा. डॉ. प्रदीप शिंदे विविध अधीविभागातील प्राध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच पाली भाषेचे संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी, विद्यार्थिनी , साहित्यिक, बुद्ध तत्वज्ञान अभ्यासक,आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले काही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विद्यानिकेतन इंग्लिश मे. स्कूलमध्ये दहीहंडी उत्साहात


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल,स्टेट बोर्डमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात इ.पहिली ते पाचवीतील विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य विनोद रोहमारे यांनी श्रीकृष्ण प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जन्माष्टमीचे महत्व विशद केले. 
      दरम्यान इ. दुसरी व तिसरीतील विद्यार्थ्यांनी गवळण सादर केली. तर इ. दुसरीतील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जन्मपर नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच संगीत शिक्षक दिपक वाघ यांनी कृष्णलिलेवर आधारित गीत गायन सादर केले. यावेळी इ.नववी व दहावीतील विद्यार्थ्यांनी थरावर थर चढवत 'गोविंदा आला रे आला' या गीतावर फेर धरत दहीहंडी फोडली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहशिक्षिका ज्योती खंडागळे, सुप्रिया बाबरस, शुभांगी चौधरी, कोमल पारखे, राजश्री तासकर, इम्रान सय्यद, अजय आव्हाड, मयूर जाधव यांनी कठोर परिश्रम घेतले.
      यावेळी विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके, व्हा.चेअरमन डॉ. प्रेरणाताई शिंदे, खजिनदार डॉ. राजीव शिंदे, प्राचार्य विनोद रोहमारे, उपप्राचार्या भारती कुदळे, समन्वयक मंगेश साळुंके, मनिषा उंडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक, सूत्रसंचालन कु.ध्रुवी जोलापरा व कु.स्वरा परदेशी यांनी केले, तर आभार ज्योती खंडागळे यांनी मानले. 


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
 शंकर बाहूले (सर) ✍️✅🇮🇳...
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

गजानन कुंडलवाल यांची पंजाब नॅशनल बँकेत वरिष्ठ अधिकारी पदी नियुक्ती


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील रहिवासी व राज्य परिवहन महामंडळ श्रीरामपूर आगाराचे सेवानिवृत्त वाहतुक नियंत्रक श्री.अरविंद कुंडलवाल व जि.प.सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती मीना कुंडलवाल यांचे चिरंजीव श्री.गजानन कुंडलवाल यांनी मोठ्या जिद्द,चिकाटी आणी मेहनतीच्या बळावर बी,ई, मेकॅनिक,एम बी ए पदवी धारण करुन,बँकेची स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे त्यांची पुणे येथील पंजाब नॅशनल बँकेच्या सर्कल कार्यालयात वरिष्ठ सर्कल अधिकारी या पदावर नियुक्ती झाली असल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

             स्पर्धा परीक्षेत यश संपादन केल्यानंतर त्यांनी हरीयाणा राज्यातील पंचकुला या ठिकाणी पंजाब नॅशनल बँकत आपले बैंकींग ट्रेनिंग पुर्ण केले. या ट्रेनिंग मध्ये देखील त्यांनी चांगल्या प्रकारचे यश संपादन केल्याने त्यांची पुणे येथील पंजाब नॅशनल बँकेंच्या सर्कल ऑफिसमध्ये वरिष्ठ मार्केटिंग ऑफिसर म्हणून नुकतीच निवड झाली आहे.
अतिशय संघर्षमय जीवनातून कुंडलवाल या दांपत्याने आपल्या चार मुली व एक मुलास उच्चशिक्षित व उच्च विद्याविभुषित केले.शिक्षण हे खरोखरच वाघिणीचे दुध आहे हे यानिमित्ताने त्यांच्या पाचही लेकरांनी दाखवून दिले असल्याचे यावेळी त्यांच्या सत्काराप्रसंगी मेजर कृष्णा सरदार व उत्तमराव दाभाडे यांनी त्यांचे मोठे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष उत्तमराव दाभाडे, आजी माजी सैनिक संघर्ष समिती चे मेजर कृष्णा सरदार, यांच्या हस्ते त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करून पुढील भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या,
यासमयी पुढे शुभेच्छा संदेशपर बोलताना मेजर कृष्णा सरदार म्हणाले की, शिक्षण ही अशी धनसंपत्ती आहे की तिला कोणीही चोरून घेऊ शकत नाही, म्हणून आपण उच्च शिक्षण घेतले पाहिजे, सामाजिक दुखण्यावर उच्च शिक्षण हेच एकमेव औषध आहे, जिद्द आणि चिकाटी असेल तर यश दूर नाही असेही ते म्हणाले.
याप्रसंगी मेजर संग्रामजीत यादव,दादासाहेब शेजुळ, श्रीराम ट्रेडर्सचे सर्वेसर्वा रामचंद्र सुगुर, दत्तात्रय शिरसाठ, अशोकराव मंडोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
 सत्काराच्या उत्तराखातर गजानन कुंडलवाल आपल्या मनोगतात म्हणाले की,मला अनेक कंपनीमध्ये कॉल आले, परंतु माझे स्वप्न वरिष्ठ अधिकारी बनवण्याचेच होते आणि हे सर्व काही माझे माता - पिता, गुरुजन सोबत माझी मेहनत आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद पाठीशी असल्यामुळेच शक्य होऊ शकले असल्याचे ते म्हणाले.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Thursday, August 29, 2024

"सामाजिक कार्यकर्ते शौकतभाई शेख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने...💐💐💐


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
श्रीरामपूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते शौकत भाई शेख यांचा आज ५६ वा वाढदिवस आहे यानिमित्ताने त्यांच्या कार्यांविषय हा थोडासा आलेख....!
आज शुक्रवार दि.३० ऑगस्ट २०२४ रोजी श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते "शौकतभाई शेख" यांचा वाढदिवस आहे, त्यांचा जन्म बुधवार दि.३० ऑगस्ट १९६७ रोजी झालेला असून आज ते आपल्या वयाची ५६ वर्ष पुर्ण करुन ५७ व्या वर्षात पदार्पण करत आहे,
त्यांनी १९८४ साली आपल्या वयाच्या १६ व्या वर्षीच पत्रकारीतेत पाऊल टाकले,
१९८५ / ८६ साली एका साप्ताहिकाचे सहसंपादक पद भुषविले,१९८९ साली राहुरी येथील ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद यांच्या साप्ताहिक भडकत्या ज्वाला चे अस्तगांव परिसर प्रतिनिधीत्व केले, १९९२ साली प्रथमच ते दक्ष पोलिस समाचार या साप्ताहिकाचे संपादक झाले, पुढे दैनिक विजयसत्ता,साप्ताहिक प्रशासक, साप्ताहिक पद्मश्री,असे विविध वर्तमानपत्राचे त्यांनी संपादन केले आहे,आणी सन २०१० साली प्रथमच शिर्डी शहरातून त्यांनी दैनिक साईसंध्या नामक सायं दैनिकाची सुरुवात केली.
सध्या दै.साईलिला टाईम्स, दैनिक विदर्भ सत्यजित, दैनिक जलभूमी, दैनिक नगरशाही, साप्ताहिक भवानीमाता, साप्ताहिक समतादूत, मोहसिन ऐ मिल्लत, वृक्ष संवर्धन, वृत्त नगरी, साप्ताहिक शिर्डी एक्सप्रेस, खरे सव्वाशेर,साई गंगा,आदी अनेक वर्तमानपत्रात मार्गदर्शक संपादक म्हणून त्यांना मानाचं स्थान दिले जात आहे ही त्यांच्या ४० वर्षाच्या पत्रकारीतेतील कार्याची पावतीच होय,
असे आजवर त्यांनी विविध प्रसार माध्यमातून सामाजाभिमुख पत्रकारिता केली आहे,तसेच त्यांच्या समता फाऊंडेशन आणि इतरही विविध सामाजिक सेवाभावी संस्था, संघटनेच्या माध्यमातून ते अनेक समाजाभिमुख उपक्रम सातत्याने राबवत असतात, स्वाभिमानी संपादक सेवा संघ या त्यांच्या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून अनेक नवोदित पत्रकार,संपादकांना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व लाभत आहेत,
त्यांचा नेहमीचा शांत आणी हस्तमुख स्वभाव,यासोबतच सातत्याने बोलण्यातून आपलेपण जाणवत असल्याने जो कोणी त्यांच्या संपर्कात आला तो कायमचा त्यांचाच झाला, असे त्यांचे निर्पेक्ष आणी परोपकारी व्यक्तीमत्व असल्याने राज्यभरात त्यांनी शैक्षणिक , साहित्यिक,सांस्कृतिक, पत्रकारीता क्षेत्रासह शासकीय, प्रशासकीय, निमशासकीय क्षेत्रात देखील मोठा मित्र परीवार जोडला आहे. अशा या दिलदार मित्राच्या वाढदिवसा निमित्ताने आमच्या त्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !


<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷



*-डॉ.सलिम शेख*💐💐💐
बैतूश्शिफा हॉस्पिटल
आणि मित्र परीवार,श्रीरामपूर
{<^>}<^>{<^>}<^>{<^>}<^>}<^>{<^>}<^>{<^>}
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

कै.ओमप्रकाश गुलाटी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी शालेय साहित्य वाटप


- जामखेड - प्रतिनिधी -/ वार्ता -
आपल्या सामाजिक कार्यात श्रीरामपूर शहर व तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात अग्रेसर असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. ओमप्रकाशजी गुलाटी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जामखेड येथील उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी जामखेड तालुका केमिस्ट ऍंड ड्रगिस्ट एसोसिएशन व कै. ओमप्रकाश गुलाटी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांना १० खुर्च्या, वह्या,पेन,पेंसिल, बिस्किट, चॉकलेट तथा अन्य शालेयपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले‌. याप्रसंगी जामखेड तालुका केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट एसोसिएशन व ओमप्रकाश गुलाटी ट्रस्ट चे सन्मानिय सदस्य, शिक्षक, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================