राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, October 5, 2024

विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांनी समन्वयाने जबाबदारी पार पाडावी - जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ


- अहमदनगर -  प्रतिनिधी -/ वार्ता -
 आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय राखत आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.  

  जिल्हाधिकारी कार्यालयात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व समन्वय अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहुल पाटील आदी उपस्थित होते.

    जिल्हाधिकारी श्री. सालीमठ म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. विधानसभा निवडणुकीतही नियमांचे पालन करून अशीच कामगिरी अपेक्षित आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणुकीशी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निवडणूक विषयक प्रशिक्षण सत्र आयोजित करावेत. त्यामध्ये प्रत्येक बाबींचे सूक्ष्म नियोजन करुन प्रशिक्षण देण्यात यावे. निवडणूक प्रक्रिया सुलभतेने पार पाडण्याच्यादृष्टीने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा आणि नियमांचा अभ्यास करत त्याचे तंतोतंत पालन करावे.  

 जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये तयार करण्यात आलेल्या स्ट्राँगरुमची निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या पाहणी करावी. स्ट्राँगरुमच्या ठिकाणी त्रीस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात यावी. मतदान यंत्र वाटप व स्वीकृतीच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याबरोबरच आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. सालीमठ यांनी यावेळी दिले. 

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

श्रीरामपूर तालुक्यातील रस्त्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर- माजी आ.भाऊसाहेब कांबळे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत २०२४-२५ या वर्षासाठी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण व इतर विविध कामांसाठी सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी दिली.
       श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची अनेक दिवसांपासून झालेली दैनीय अवस्था दूर करून नागरिकांच्या सोईसाठी रस्ते दुरुस्तीचे काम प्रलंबित होते या पार्श्वभूमीवर माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला राज्याचे मुखमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजितदादा पवार व जिल्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण व इतर विविध कामांसाठी सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यापैकी १० टक्के इतका निधी वितरीत देखील करण्यात आला आहे त्या बाबतचा शासन निर्णय दि.४ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आला.या कामांमुळे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. 
        भैरवनाथ नगर येथील रस्ता काँक्रिटीकरण करणे,मातुलठाण येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे १० लाख, मौजे लाख येथील येथील रस्ता काँक्रिटीकरण करणे १० लाख,कारेगाव येथील रस्ता काँक्रिटीकरण करणे १८ लाख,टाकळीभान येथील कांबळे वस्तीकडे जाणारा रस्ता डांबरी करणे ३० लाख,टाकळीभान येथील अनिल अंकुश पासून उमेश त्रिभुवन वस्तीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे १ कोटी,गोवर्धनपूर येथील रस्ता डांबरीकरण करणे २५ लाख,भोकर येथील रस्ता काँक्रिटीकरण करणे २५ लाख,शिरसगाव येथील येथील रस्ता काँक्रिटीकरण करणे २० लाख ,डावखर मळा येथील रस्ता काँक्रिटीकरण करणे २० लाख ,बेलापूर येथील गोत्राचे यांचे घरापासून दायमा यांचे दुकानापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे २० लाख,देवळाली येथील आदिनाथ वसाहत येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे ५ लाख,देवळाली येथील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे ४१ लाख, दत्तनगर येथील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे १० लाख,खिर्डी येथील रस्ते डांबरीकरण करणे २० लाख,हरेगाव येथील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे १० लाख,मुठेवडगाव येथील रस्ता डांबरीकरण करणे १० लाख, दिघी धनगरवाडी शिवरस्ता डांबरीकरण करणे २० लाख,गळनिंब येथील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे २० लाख तसेच श्रीरामपूर शहरातील प्रभाग क्र.१,२,४, या ठिकाणच्या अनेक कामांचा समावेश करण्यात आलेला आहे.सुमारे ५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी आ.भाऊसाहेब कांबळे व जनतेने महायुती सरकारला धन्यवाद दिले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Friday, October 4, 2024

मराठी ग्रामीण कथा शोध आणि बोधग्रामीण साहित्यातील अमूल्य ठेवा डॉ.शिवाजी काळे गौरव ग्रंथाचे प्रकाशन...


कथा हा वाचकांच्या सर्वात आवडीचा साहित्यप्रकार. मौखिकेकडून लिखित साहित्याकडे प्रवास करणाऱ्या कथेने आपले स्वतःचे विश्व निर्माण केले आहे. १८९० साली ह. ना. आपटे यांनी लिहिलेल्या कथा 'करमणूक' मधून प्रसिद्ध होत. कथा साहित्याचा हा पहिलाच लेखनप्रपंच माणसाच्या विकासाच्या टप्प्यात बदलत गेला आहे. मानवी संस्कृती बरोबर ग्रामीण कथा जन्माला आल्या. शेती, पशु-पक्षी, प्राणी यांचे जीवन हे मानवी जीवनाशी निगडित आहे. या ग्रामीणत्वाचा लेखाजोखा ग्रामीण साहित्यातून उमटवू लागला. पौराणिक कथेपासून अर्वाचीन कथा ते आधुनिक कथा साहित्यापर्यंतचा कथेचा प्रवास रोमांचक आणि वैविध्यपूर्णतेने नटलेला आहे. रामायण, महाभारत, लीळाचरित्र, दृष्टांतकथा हे ग्रंथ समाजसंस्कारांच्या पाऊलखुणा आहेत. ग्रामीण कथेला अनेक ग्रामीण साहित्यिकांनी वळण दिले. १९६० नंतर ग्रामीण कथेला खरी प्रतिष्ठा लाभली. याच पाऊलवाटेवरील डॉ. शिवाजी काळे यांनी आपल्या ग्रामीण लेखन साहित्याचा प्रपंच साकारला. डॉ. काळे यांचे जीवन नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव सारख्या खेड्यात आकाराला आलेले आहे. त्यामुळे ग्रामीणत्वाचा स्पर्श त्यांच्या जीवनाला स्पर्शून गेला आहे. 
ग्रामीण संस्कृतीची नाळ जोडल्या गेलेल्या डॉ. काळे यांचे जीवन आदर्शवत आणि प्रेरणादायी आहे. रयत शिक्षण संस्थेसारख्या बहुजन समाजासाठी ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या संस्थेतून त्यांची शिक्षक म्हणून झालेली जडणघडण नव्या पिढीला प्रेरणा देणारी आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या साहित्यगुणांचा गौरव व्हावा म्हणून 'मराठी ग्रामीण कथा : शोध आणि बोध' हा संशोधनात्मक गौरव ग्रंथ आकाराला आला आहे. आजवर अगणित नोकरदारांनी आपल्या सेवेला विराम देताना बहुप्रचलित पद्धतीला आपलेसे केले आहे; परंतु डॉ. काळे यांचा हा आगळावेगळा अभिनव प्रयोग भविष्यातील सेवानिवृत्त होणाऱ्या सर्वांनाच प्रेरणादायी ठरणारा आहे. 
डॉ. काळे यांचा शैक्षणिक प्रवास हा खूपच कष्टाचा आहे. शेवगाव, श्रीरामपूर, अहमदनगर येथून शिक्षण घेऊन त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगची पदवी संपादन केली. श्रीरामपूरच्या मुळा प्रवरा इलेक्ट्रिक को-ऑप. सोसायटीच्या माध्यमातून एक अभ्यासू अभियंता म्हणून त्यांचा प्रवास सुखकर ठरला; परंतु त्याचे सौख्य काही वर्षांचे सीमित होते. मुळा प्रवरा सोसायटीने अखेर शेकडो जणांच्या समवेत डॉ. काळे यांचीही साथ सोडली. इथून पुढचा काळ मात्र त्यांच्यासाठी खूपच खडतर होता. नोकरी गेली म्हणजे तोंडातला घास गेला; परंतु विधीज्ञ स्व. रावसाहेब शिंदे यांच्या माध्यमातून कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेत २०११ सालापासून उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाकडे इलेक्ट्रॉनिक्स हा विषय घेऊन अध्यापन करण्याची त्यांना संधी मिळाली. मुख्य विषय इलेक्ट्रॉनिक्स; परंतु मराठीवर प्रचंड प्रभुत्व. मराठी विषयात एम. ए., एम. फील., पीएच.डी., नेट, सेट, डी.एस.एम. यासारख्या उच्च पदव्यांचे संपादन केलेल्या डॉ. काळे यांचे सामाजिक, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रातील कार्य आदर्शवत आहे. स्वतः उच्च विद्याविभूषित आहेतच. मुलांनाही उच्च शिक्षण दिले आहे. शिवाय पत्नीलाही उच्च शिक्षणाची प्रेरणा देऊन त्याही सध्या पीएच. डी. चा संशोधनात्मक अभ्यास करत आहेत. नव्याने सुरू केलेले आसरा प्रकाशन त्यांच्या यशोकीर्तीमध्ये भर घालत आहे. 
डॉ. शिवाजी काळे यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या 'मराठी ग्रामीण कथा: शोध आणि बोध' या ग्रंथाचे संपादन साहित्यिक, गुरुवर्य डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले आहे. आसरा प्रकाशन श्रीरामपूर यांच्यामार्फत या ग्रंथाचे ६ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रकाशन होत आहे. डॉ. बाबुराव उपाध्ये यांचे या ग्रंथाला लाभलेले संपादकीय साहित्यमूल्यरुपी विचारधन आहे. डॉ. शिवाजी काळे यांनी आपल्या जीवनाच्या वाटचालीचा मागोवा घेताना ग्रामीण जीवनातल्या आठवणी उद्ध्रृत केल्या आहेत. खडतर कौटुंबिक जीवन प्रवासात पत्नीची मिळालेली अनमोल साथ, प्राप्त परिस्थितीत मुलांनी केलेले समायोजन, कौटुंबिक सुसंस्कार हीच त्यांच्या जीवनाची अनमोल शिदोरी आहे. जीवनातील खडतर परिस्थितीला पायदळी तुडवत प्रत्येक वळणावर स्वतः आणि कुटुंबाचा तोल सांभाळत त्यांनी केलेला जीवनप्रवास नव्या पिढीला खूपच प्रेरणादायी आहे. 
या गौरव ग्रंथाच्या विभाग एक मध्ये डॉ. स्नेहल तावरे, डॉ. प्रकाश कुंभार, डॉ. कीर्ती मुळीक, डॉ. वंदना मुरकुटे, डॉ. दादासाहेब कोळी, डॉ. शितल सुसरे, डॉ. रामकृष्ण जगताप यांचे 'मराठी ग्रामीण कथा : शोध आणि बोध' या विषयाच्या अनुषंगाने संशोधनपर लेख प्रसिद्ध झाली आहेत. विभाग दोन मध्ये 'डॉ. शिवाजी काळे : व्यक्तित्व आणि साहित्य' यामध्ये पल्लवी सौंदोरे, मोहिनी काळे, माजी प्राचार्य टी. ई. शेळके, संगीता फासाटे, सुखदेव सुकळे, क्षितिज लेंभे, सुप्रिया ताके, कमलजीतकौर बतरा, किरण खानवेलकर, सुनील काळे, बापूसाहेब सदाफळ, प्रा. प्रशांत खाडे, माजी प्राचार्य शंकरराव अनारसे, प्रा. दिलीप सोनवणे, डॉ. दादासाहेब गलांडे, सुभाष सोनवणे, संतोष लेंभे, ज्योती चव्हाण, लेविन भोसले, सुकन्या काळे यांचे विचाररुपी धन डॉ. काळे यांच्याविषयी लेखातून प्रकटले आहे. डॉ. काळे यांच्या प्रती या सर्वांची आत्मीयतेची भावना वाखाणण्याजोगी आहे. शेवटच्या भागात डॉ. काळे यांच्या वैयक्तिक माहिती बरोबर नोकरीतील सेवाकाळ, विविध संस्थात्मक कार्य, संशोधन कार्य, प्रकाशित ग्रंथ, संशोधन, नियतकालिकातील लेखन, विविध पुस्तकांना दिलेल्या प्रस्तावना, विविध पुरस्कारांची यादी, काळे घराण्याची वंशावळ यांची ओळख करून दिलेली आहे. 
डॉ. शिवाजी काळे यांच्या 'गावकुसातल्या कथा' ग्रामीण जीवनातील अनुभवसंपन्न कथा आहेत. या कथातून ग्रामीण ग्रामीणत्वाचा आणि गोष्टीवेल्हाळपणाचा निर्देश होतो. ज्या घटना अनुभवल्या आहेत, त्या अत्यंत प्रांजळपणे आणि तरलतेने अवतरल्या आहेत. त्यांच्या लेखनात सहजता, नाट्यमयता, मनोरंजनातून उपदेश करण्याची हातोटी आणि ग्रामीण वास्तवाचे चित्रण आढळते. या कथा वाचकांच्या मनाचा वेध घेत ग्रामीणत्वाचे महत्त्व विशद करतात. 'मराठी ग्रामीण कथा : शोध आणि बोध' या गौरवग्रंथाचा ग्रामीण साहित्याचा अभ्यास करणा-या संशोधकांना खूपच उपयुक्त ठरणार आहे. हा गौरव ग्रंथ म्हणजे साहित्य मूल्यरूपी विचारधन आहे. या गौरव ग्रंथाचे संपादन डॉ. उपाध्ये, प्रकाशन आसरा प्रकाशनच्या मोहिनी काळे यांनी केले आहे. गीताई प्रेस, सावेडी, अहमदनगर यांनी मुद्रण केले आहे. या ग्रंथाचे मुखपृष्ठ चैत्राली काळे यांनी खूपच बोलके आणि अर्थपूर्ण असे केले आहे. या गौरव ग्रंथाची पृष्ठसंख्या २०८ असून गौरवग्रंथ वाचताना डॉ. काळे यांच्याविषयी विविध क्षेत्रातील लेखांच्या रूपाने आलेल्या आठवणी त्यांच्याविषयीच्या आत्मीयता, जिव्हाळा आणि ऋणानुबंधाच्या भावनेने ओतप्रोत व्यक्त झालेल्या आहेत. हा गौरव ग्रंथ मांडणी, रचना, कल्पकता, बांधणी, मुखपृष्ठ, मलपृष्ठ आदींच्या बाबतीत खूपच प्रेरक आहे. एका बाजूला 'मराठी ग्रामीण कथा: शोध आणि बोध' तर दुसऱ्या बाजूला डॉ. काळे यांचे ग्रामीण जीवनाशी निगडित अनुभवसंपन्न जीवन व्यक्तिमत्त्वाच्या विविध गुणांनी उद्धृत झालेली आहे. या गौरव ग्रंथाच्या रूपाने मराठी ग्रामीण साहित्यात ही मोलाची भर ठरणार आहे. डॉ. काळे यांना या गौरव ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा !

=================================
-----------------------------------------------



 *डॉ. शरद दुधाट*✍️✅🇮🇳...
जिल्हाध्यक्ष, मराठी विषय महासंघ,अहमदनगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================



Thursday, October 3, 2024

नेहरुनगर रहिवाशांची गत झाली मोठी केवीलवाणी !अन् नळांद्वारे येवू लागले चक्क गटारीचे पाणी !!


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
शहरातील गोंधवणीरोड नेहरुनगर मधील नगरपालिका नळांना चक्क गटारीचे पाणी मिश्रीत दुर्गंधीयुक्त घाण पाणी येत असल्याने रहिवाशांना मोठ्या मनस्तापाचा सामना करणे भाग पडत आहे.
सदरील प्रकार हा केवळ आजचा नसुन नेहरूनगर वासियांना वर्षानुवर्ष या त्रासाला सामोरे जाणे भाग पडत आहे, गोंधवणीरोड रस्त्यालगत वॉर्ड क्रमांक १, पंजाबी कॉलनीच्या बाजुने असलेली ही नळ पाण्याची पाईपलाईन चक्क गटारालगत असल्याने शिवाय खुपच जुनी असल्याने ठिकठिकाणी लिकेज झालेली आहे,
वेळोवेळी गटारी चॉकअप होवून सदरील पाईपलाईन मध्ये जाऊन सदरील नळाद्वारे रहिवाशांना चक्क गटारीचे पाणी पिणे भाग पडत आहे.याविषयी नगर पालिका प्रशासनाकडे 
अनेक तक्रारी दिल्यानंतर थातूर - मातूर पद्धतीने सदरील लिकेज काढले जाते, मात्र महिना - दोन महिन्याने पुन्हा ये रे माझ्या मागल्या याप्रमाणे परिस्थितीत काही बदल होत नाही.
शेवटी कुठवर गटारीचे पाणी मिश्रीत दुर्गंधीयुक्त घाण पाणी प्यायचे? असा प्रश्न वेळोवेळी निर्माण होत असल्याने नेहरुनगर वासियांची गत मोठी केवीलवाणी झाली असल्याचे बघावयास मिळते आहे.
सध्या शहरातील नेहरुनगर परिसरात थंडी. ताप, खोकला अशा विविध अजारांनी लोकं खुपच त्रासले आहेत,पुढे भयंकर साथीच्या आजारांचा फैलाव होवू नये याकरीता नगर पालिका प्रशासक तथा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, नुतन मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप आणी संबंधित नगर पालिका प्रशासनाने वेळीच योग्य पावले उचलत सदरील नळाद्वारे येत असलेल्या गटारीच्या घाण पाण्याचा त्वरित कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शौकतभाई शेख यांच्यासह परिसरातील नागरीकांकडून केली जात
 आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

*नगर पालिका प्रशासनाकडून तात्काळ दखल*
तक्रारीनंतर तात्काळ नगर पालिकेतून श्री.साळवे साहेबांचा मला कॉल आला,आणी ते स्वतः ही क्षणात उपस्थितही झाले, सदरील प्रकरणी संबंधित ठिकाणी गटारीवरच मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाले असल्याने लिकेज शोधणे मोठे जिकरीचे ठरणार असल्याने शक्यतो प्रयत्न करुन लिकेज काढले जाईल असे ते म्हणाले. मात्र सदरील पाईपलाईन फारच जुणी असल्याने महिना, दोन महिन्यांत नवीन कामांमध्ये ती बदलण्याचे काम होईल असेही ते म्हणाले.
करीता श्रीरामपूर आरोग्य सेवा ग्रुप ऐडमिन आणी नगर पालिका प्रशासनाचे मनःपूर्वक आभार तथा धन्यवाद.- शौकतभाई शेख 
-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

Wednesday, October 2, 2024

श्रीरामपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन'कडुन सफाई कर्मचाऱ्यांना स्वच्छता साहित्त्याचे वाटप


 श्रीरामपूर ता श्रीरामपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन'च्या वतीने जागतिक फार्मासिस्ट सप्ताहानिमित्त लोकमान्य टिळक वाचनालय येथे आज (दि.२) महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्ताने फोटोला अभिवादन करून श्रीरामपूर नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक तसेच हॅन्ड ग्लोज, गम बूट, मास्क व इतर स्वच्छता साहित्त्याचे १५० साहित्य किट वाटप करण्यात आले.
अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन दिल्लीचे जनसंपर्क अधिकारी श्री अजित पारख, सेंट्रल झोनचे उपाध्यक्ष शशांक रासकर, अहमदनगर जिल्हा असोसिएशनचे सदस्य माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी, बाळासाहेब ढेरंगे, श्रीरामपूर असोसिएशनचे अध्यक्ष सुजित राऊत, कोविल खेमनर, आनंद कोठारी, उदय बधे, जालिंदर भवर, लोकमान्य टिळक वाचनालय ग्रंथप्रमुख स्वाती पुरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

श्रीरामपूर शहराला स्वच्छ ठेवून शहरवासीयांना चांगले आरोग्य सेवा देत सर्वसामान्य नागरिकांची आरोग्याची काळजी घेणारे सर्व स्वच्छता कर्मचारी यांच्याकडे स्वतःची काळजी घेण्यासाठी कुठलेही साहित्य नाही. हाताने गटारी स्वच्छ करत असताना निर्देशनास आल्यानंतर असोसिएशनचे अध्यक्ष सुजित राऊत यांनी असोसिएशनच्या वतीने वरील साहित्य देण्याचे ठरविले.

आपण सर्व शहर स्वच्छ करून शहराला स्वच्छता व आरोग्य सेवा देता व आम्ही रुग्णांना औषधे देऊन रुग्णांची सेवा करतो, म्हणजे दोघेही सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे समाज घटक असल्याचे प्रतिपादन अजित पारख यांनी केले.

हा कार्यक्रम जरी फार्मासिस्टदिन व सप्तानिमित्त होत असला तरी वर्षभर या संघटनेचे सर्वसामान्यांना उपयोगी येतील, असे विविध उपक्रम, वृद्धाश्रमात, शाळांमध्ये लागणाऱ्या वह्या, पुस्तकांपासून जे काही साहित्य या दैनंदिन जीवनामध्ये परिस्थिती नसलेल्या पालकांना, विद्यार्थ्यांना, समाजाला त्या वस्तू पुरवून आमची ही संघटना 'समाजसेवा हीच ईश्वर सेवा' हे ब्रीदवाक्य घेऊन नेहमी कामामध्ये सज्ज असते, असे सांगून सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी चांगले काम करा, मास्क वापरा, गटारी स्वच्छ करताना हॅन्ड ग्लोज वापरा, चेंबर स्वच्छ करताना पायात बूट घाला, स्वतःची व स्वतःच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या, एकजुटीने रहा, असे आवाहन माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी यांनी केले.

लवकरच कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य कॅम्पचे आयोजन करण्यात येणार असून आम्ही कायम आपल्या सोबत असून कुठल्याही प्रकारची आरोग्याविषयी अडीअडचणी असल्यास आमच्याशी संपर्क करा, असे आवाहन शशांक रासकर यांनी यावेळी केले.

याप्रसंगी जालिंदर भवार, रवींद्र चौधरी, संदीप टूपके, प्रशांत उचित, प्रशांत कोठारी, माधव आसणे, प्रदीप डावखर, दीपक उघडे, शशिकांत गौड, अशपाक शेख, रियाज पोपटिया, महावीर कोठारी, विनीत होले, राहुल कुरे, पंकज हिरण, कमल मीलानी, संदीप कांबळे, सचिन चुडीवाल, प्रशांत रसाळ, हुसेन कुरेशी, संजय नारंग, ऋषी साळुंखे, नंदलाल मोटवानी आदीसह केमिस्ट बांधव उपस्थित होते. सुजित राऊत यांनी स्वागत तर कोविल खेमनार यांनी आभार मानले.

प्रशासनाचे दुर्लक्ष...

आरोग्य कर्मचारी शहर स्वच्छ ठेवत असताना त्यांना लागणारे हॅन्ड ग्लोज, गम बूट, मास्क, गटारीतील घाण वाहण्यासाठी हातगाड्या व आरोग्य विमा इतर वेगवेगळे साहित्य पुरवणे हे नगरपालिकेचे व ठेकेदाराचे कर्तव्य आणि काम आहे. कामगारांना सर्व साहित्य पुरवणे तर सोडाच परंतु एखादी संस्था साहित्य देत असेल तर ते स्वीकारण्यासाठी निरोप देऊन सुद्धा आरोग्य अधिकारी श्री आरणे व इतर कोणीही अधिकारी उपस्थित राहिले नाहीत, याच्यापेक्षा काय शोकांतिका आहे. आरोग्य अधिकाऱ्याच्या मुजोरी, व मनमानी कारभारामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे नगरपालिका प्रशासनाकडून पूर्णपणे दुर्लक्षित होत आहे.

-- रवींद्र गुलाटी, माजी उपनगराध्यक्ष, श्रीरामपूर


अशोक बँकेला अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने सन २०२३-२४ मध्ये दोन पुरस्कार


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
अशोक उद्योग समूहाचे सूत्रधार माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे अधिपत्याखालील अशोक सहकारी बँकेला सन २०२३-२४ या वर्षासाठी अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने उत्कृष्ट कामकाज करुन एन.पी.ए. चे प्रमाण कमी केल्याबद्दल बी.आय.एन.जी.एस. पुरस्कार, तर बँकेच्या कार्यक्षम प्रशासनाबद्दल दुसरा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचे वितरण शिर्डी येथे असोसिएशनचे अध्यक्ष सत्येनजी मुंदडा तसेच मालपाणी उद्योग समुहाचे प्रमुख राजेश मालपाणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
           सदर पुरस्काराचे वितरण शिर्डी येथे साई थिम पार्क या ठिकाणी झाले. पुरस्कार स्विकारणेसाठी बँकेचे व्हा. चेअरमन भाऊसाहेब हळनोर, संचालक अ‍ॅड.उमेश लटमाळे, व्यवस्थापक प्रदिप थोरात, उपव्यवस्थापक विजय राठोड आदी उपस्थित होते. याप्रसंगी बँकेच्या कामकाजाबद्दल असोसिएशनने कौतुक केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

अशोक सहकारी बँकेची वाटचाल आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रगतीपथाकडे; माजी आ.भानदास मुरकुट


- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
अशोक सहकारी बँकेची वाटचाल आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रगतीपथाकडे सुरू आहे. बँकेने नुकतीच क्युआर कोड सुविधा सुरु केलेली असून या सुविधेमुळे बँकेच्या खातेदारांना बँकेत थेट पैसे भरणे सोयीस्कर झालेले असून त्यांना बँकेत समक्ष जाण्याची आवश्यकता नाही. सध्या या सुविधेचा लाभ बँकेच्या खातेदारांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. याबरोबरच अशोक बँक थोड्याच दिवसांत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन इंटरनेट बँकींग तसेच फोन बँकींगमध्ये फोन पे, गुगल पे अशा आधुनिक सुविधा खातेदारांना उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे बँकेच्या खातेदारांना त्यांचे खात्यातून पैसे काढणे अथवा अन्य ठिकाणी पैसे पाठविणे सोयीस्कर होणार असून या सुविधांमुळे बँकेच्या खातेदारांना बँकेत समक्ष जाण्याची आवश्यकता पडणार नाही, अशी माहिती अशोक बँकेचे संस्थापक तथा चार्टर्ड अकौंटंट माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी दिली.
          अशोक सहकारी बँकेची सन २०२३-२४ ची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी (३० सप्टेंबर) रोजी बँकेचे चेअरमन अ‍ॅड.सुभाष चौधरी यांचे अध्यक्षतेखाली अहमदनगर येथे संपन्न झाली त्याप्रसंगी श्री. मुरकुटे बोलत होते.
 बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप थोरात यांनी बँकेला सन २०२३-२४ या वर्षामध्ये एकूण ढोबळ नफा ७ कोटी ७२ लाख झाला असून आयकर २ कोटी ७४ लाख भरला आहे. घसारा ७१ लाख, थकीत कर्ज तरतूद ५० लाख, ठेव विमा हप्ता ५८ लाख अशा सर्व तरतूदी वजा जाता ताळेबंदाला निव्वळ नफा रुपये ३ कोटी १९ लाख झाला आहे, असे ते म्हणाले.
            दि.३१ मार्च २०२४ अखेर बँकेच्या एकूण ठेवी रुपये ४९५ कोटी असून कर्ज वाटप ३४० कोटी तर खेळते भांडवल ५६३ कोटी आहे. तसेच रिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे सर्व निकष पूर्ण केल्यामुळे बँकेला ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे. बँकेच्या सध्या १३ शाखा कार्यान्वित असून दोन स्वमालकीचे ए.टी.एम. आहेत. बँकेच्या संचालक मंडळात चार्टर्ड अकौंटंट, वकील, व्यापारी तसेच व्यावसयिकांचा समावेश आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बँकेने नेट एन.पी.ए.चे प्रमाण ५% चे आत राखले आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन अ‍ॅड.सुभाष चौधरी यांनी दिली. सदर सभेसाठी बँकेचे व्हा. चेअरमन भाऊसाहेब हळनोर, सभासद, संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी उपस्थित होते. सदर सभेचे कामकाज खेळीमेळीत पार पडले.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================