राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, January 18, 2025

विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांची डेंगळे कृषी फार्मला क्षेत्रभेट


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता 
येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सेंद्रिय शेती- व्यवस्थापन व उत्पादन या विषयाच्या अध्ययन- अध्यापनाच्या दृष्टीने डेंगळे कृषी फार्म हाऊस,खंडाळा येथे नुकतीच क्षेत्रभेट दिली. क्षेत्रभेटी दरम्यान इ.पहिली ते तिसरीतील विद्यार्थ्यांचा समावेश होता.
         विद्यार्थ्यांना शालेय ज्ञान, मैदानी खेळ, व्यवहारीक ज्ञान या दैनंदिन घटकांबरोबरच आधुनिक कृषी विषयक ज्ञान होणे तितकेच महत्त्वाचे आहे. कृषी क्षेत्राशी निगडित तत्सम उद्योग-व्यवसाय तसेच आले,हळद,ऊस, शेवगा, गहू,हरभरा,मका अशी विविध पिके,अवजारे, पाळीव प्राणी पालन व्यवसाय व पिकांवर केलेल्या वैज्ञानिक संशोधनांची माहिती व्हावी,या हेतूने क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते.दरम्यान विद्यार्थ्यांनी तालुक्यातील खंडाळा येथील जागृत देवस्थान श्री गणपती मंदिर येथे भेट देऊन वनभोजन केले. तसेच डेंगळे फार्म हाऊसचे सर्वेसर्वा सुजित पाटील डेंगळे यांना कृषी विषयक प्रश्न विचारात सेंद्रिय व आधुनिक शेती विषयक महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांसमवेत सहशिक्षिका योगिता गवारे, साक्षी भनगे,ज्योती खंडागळे,कोमल पारखे, राजश्री व्हटकर, सोनाली म्हसे,ज्योती गाढे,कावेरी लोखंडे,शंकर बाहुले,मयूर जाधव उपस्थित होते. 
         प्रसंगी क्षेत्रभेटीस विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई.शेळके,व्हा. चेअरमन डॉ.प्रेरणाताई शिंदे, खजिनदार डॉ.राजीव शिंदे, प्राचार्य विनोद रोहमारे, समन्वयक मंगेश साळुंके, मनिषा उंडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी शुभेच्छा दिल्या.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


मानव सुरक्षा सेवा संघाचा वर्धापन दिन आणी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न


बशीरभाई भुरे यांची सलग पाचव्यांदा मानव सुरक्षा सेवा संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

- संगमनेर - प्रतिनिधी -/ वार्ता -
संगमनेर येथील व्यापारी असोसिएशनचे च्या प्रशस्त हॉल मध्ये मानव सुरक्षा सेवा संघाचा वर्धापन दिन आणी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी मानव सुरक्षा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल राखपसरे, प्रदेशाध्यक्ष बशीरभाई भुरे, पोलिस मित्र दक्षता समीती प्रदेशाध्यक्ष अजीत गाढे, पत्रकार सुरक्षा न्याय समीती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत कराळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संघटनेच्या वतीने बशीरभाई भुरे व चंद्रकांत कराळे, यांना समाज भुषण पुरस्कार, तर राजेश सातपुते यांना आदर्श उद्योजक तसेच भास्कर शिंदे यांना आदर्श अकॅडमी तर सुभान शेख यांना उत्कृष्ट हाड वैद्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा देखील गुणगौरव करुन त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष अमोल राखपसरे म्हणाले की, मानव सुरक्षा सेवा संघ या संघटनेमध्ये देशभरातील जवळपास तीनशे पन्नास हुन अधीक विधी क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत, यामध्ये विधीज्ञ (वकील) तर सेवानिवृत्त मा.न्यायधिश महोदयांचे देखील महत्वाचे योगदान आहेत यासोबतच पोलिस आणी महसूल तथा इतर अशा सर्वच प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी,कर्मचारी यांचे मोठे मोलाचे योगदान आहे.
करीता मानव सुरक्षा सेवा संघ ही संघटना केवळ राज्य पातळीवर नव्हेतर राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असुन या संघटनेच्या माध्यमातून सामाजातील रांजले - गांजले, अन्यायग्रस्तांना उचित न्याय मिळवून देण्याचे कार्य संघटनेमार्फत केली जात असल्याचे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की,
मानव सुरक्षा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष बशीरभाई भुरे यांचे कार्य सामाजासाठी खुपच पोषक ठरलेले असुन राज्यभरात कोणत्याही ठिकाणाहून अन्यायग्रस्तांच्या साधा कॉल जरी आला तरी त्यास योग्य मार्गदर्शन करत त्याच्या समस्या सोडविण्याचा ते सातत्याने प्रयत्न करुन त्या सोडविण्यासाठी वेळ प्रसंगी क्षणाचा विलंब न करता प्रत्यक्ष त्या अन्यायग्रस्तांच्या गावी त्या स्पॉटवर पोहोचून कितीही जटील समस्या असल्यातरी त्या सोडविण्यासाठी कसोसिने प्रयत्न करत अशा अनेकांना उचित न्याय मिळवून देण्याकामी श्री.भुरे यांनी सातत्याने मोठे योगदान दिले असल्याने त्यांची सलग पाचव्यांदा प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करताना मोठा आनंद होत असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी जेष्ठ पत्रकार संजय नवले पत्रकार अमोल वैद्य जेष्ठ साहित्यिक व्यगचित्रकार अरविंद गाडेकर आठवले गट तालुका अध्यक्ष आशिष शेळके संगमनेर शहर अध्यक्ष कैलास कासार समाजभूषण परशराम पवार सर माजी सरपंच मधुकर मुंतोडे राष्ट्रीय सचिव भारत म्हसे राष्ट्रीय सदस्य भास्कर चकोर जेष्ठ सदस्य नरसाय्या पगडाल आदी मान्यवर उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Friday, January 17, 2025

पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातेमा शेख जयंती निमित्त मोफत सर्वरोग तपासणी व निदान आरोग्य शिबीर संपन्न


समाजात मोठ्या प्रमाणात मोफत आरोग्य शिबीरांची गरज - डॉ.अशपाक पटेल

- नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
देशात रुग्णांची व आजारांची संख्या मोठी आहे. त्या प्रमाणात आरोग्य सेवांची कमतरता आहे. लोकांचा राहणीमान खानपान मध्ये अनियमित्तामुळे आजारांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे.महागडया औषधोपचारांमुळे मध्यमवर्गीयांना ते अवाक्याचे बाहेर जात आहे. त्यामुळे आज समाजात मोफत आरोग्य शिबिरांची मोठी गरज निर्माण झाली आहे. असे प्रतिपादन पटेल स्पेशालिटी क्लिनिकचे डॉ.अशपाक पटेल यांनी केले. 
किंग्जगेटरोड येथील पटेल स्पेशालिटी क्लिनिक व अलकरम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातेमा शेख यांच्या जयंतीनिमित्त मोफत सर्वरोग निदान, रक्तातील साखर व एच बी ए वन सी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.अशपाक पटेल, डॉ.जहीर मुजावर, शेरअली शेख, तौफिक तांबोळी, समीर सय्यद, वसीम शेख आदी उपस्थित होते. या शिबिराचा मोठ्या प्रमाणात गरजूंनी लाभ घेतला. याप्रसंगी डॉ. अशपाक पटेल यांनी प्रत्येक रुग्णांना त्यांचे आजारा संदर्भात चांगल्या प्रमाणे मार्गदर्शन केले. 
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ.जहीर मुजावर म्हणाले की, आपल्याकडे रोज काही ना काही दिवस साजरे केले जातात. अशावेळी समाजाच्या गरजा ओळखून त्या दिवसांना ते गरजूंना गरज असलेले उपक्रम राबविले पाहिजेत. 
प्रस्ताविक करताना अलकरम सोसायटी चे तौफिक तांबोली म्हणाले की अलकरम हॉस्पिटलच्या माध्यमातून वर्षभर नियमित ५० टक्के दरामध्ये रुग्णांना रक्त तपासण्या करून देतो. व कमीत कमी खर्चात लोकांना रुग्णसेवा ही पूर्वीत असतो. भविष्यात पण असेच अनेक उपक्रम राबविण्याचे आमचे माणस आहेत असे सांगितले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेरअली शेख यांनी केले. तर आभार समीर सैय्यद यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयेशा सय्यद, शिफा शेख, सादिया शेख व अलकरम सोसायटीच्या सर्व सदस्यांनी भरपूर परिश्रम घेतले. 

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


Thursday, January 16, 2025

बेलापूर महाविद्यालयात निर्भय कन्या कार्यशाळा संपन्न


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे कला व वाणिज्य महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे या होत्या. यावेळी प्रथम सत्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनल दराडे यांनी "स्त्रियांचे शारीरिक मानसिक स्वास्थ्य याबाबत बोलताना  त्या म्हणाल्या की, स्त्रियांचे मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी आहार , व्यायाम व दिनचर्याला महत्त्व दिल्यास कुठल्याही समस्या शक्यतो उद्भवत नाही. यानंतर प्रा. डॉ. मनोज तेलोरे यांनी द्वितीय सत्रात "स्त्रियांची प्रेरणास्थाने"या विषयावर व्याख्यान झाले, त्यांनी त्यात महात्मा फुले , सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती रानडे ,रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे, डॉ . बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पद्मश्री रहीबाई पोपेरे अशा आदर्श स्त्री पुरुषांची प्रेरणास्थाने विशद केली.
तर तृतीय सत्रात अकबर शेख, ब्लॅक बेल्ट प्रशिक्षक यांनी" स्त्रियांचे स्वसंरक्षण आणि प्रशिक्षण" यावर कराटेचे प्रात्यक्षिके घेतली त्यात विशेषता लाठीकाठी , तलवारबाजी, आत्मसंरक्षण, तायक्वांदो, बॉक्सिंग , स्वसंरक्षणार्थ मार्शल आर्ट यांचा समावेश होता. 
यावेळी कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना प्रा.रूपाली उंडे यांनी मांडली प्रा. चंद्रकांत कोतकर यांनी अनुमोदन दिले प्रमुख पाहुण्यांचा परिचय व निर्भय कन्या कार्यशाळेचे प्रास्ताविक विकास अधिकारी डॉ. संजय नवाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किशोर गटकळ आणि डॉ. बाबासाहेब पवार यांनी केले तर आभार अमृता गायकवाड यांनी मांडले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमास प्रा. प्रकाश देशपांडे डॉ.विनायक काळे प्रा. विलास गायकवाड, डॉ. अशोक माने, प्रा. सतीश पावसे, डॉ. बाळासाहेब बाचकर डॉ. विठ्ठल सदाफुले, प्रा.सुनील विधाते, डॉ. विठ्ठल लंगोटे प्रा.स्वाती कोळेकर प्रा.ओंकार मुळे, प्रा. सुनिता पठारे प्रा.गोरखनाथ साळवे त्याचबरोबर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदेश शाहीर, आनिता चिंचकर, कृष्णा महाडिक, संदीप चौधरी, नानासाहेब तुवर, अनिल पवार,रामेश्वर पवार, अण्णा ओहोळ आदींनी परिश्रम घेतले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


राज्यभरातील होमगार्ड बांधवांचे कार्य कौतुकास्पद ; होमगार्ड सैनिकांप्रती सकारात्मक भूमिका घेणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 - अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
राज्यभरातील होमगार्ड बांधवांचे कार्य कौतुकास्पद असून लवकरच होमगार्ड सैनिक यांच्या हिताचे निर्णय घेऊन सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शिर्डी या ठिकाणी भाजपा चे राज्यस्तरीय अधिवेशनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपाचे राज्यभरातील आमदार व पदाधिकारी आदी उपस्थित होते.
होमगार्ड सैनिकांना ३६५ दिवस काम मिळावे तसेच मानधन भत्ता वेळेत मिळावे, ड्रेस कोड मध्ये सुधारणा करण्यात यावी, पुनर्नियुक्ती पद्धत रद्द करण्यात यावी, जिल्हा समादेशक पद सैनिकामधूनच भरण्यात यावे,निवृत्तीनंतर सैनिकांना किमान १० हजार रुपये 
पेन्शन स्वरूपात मिळावी , अशा अनेक मागण्यांचे निवेदन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय राज्य नागरी विमान वाहतूक आणि सहकार मंत्री श्री मुरलीधर (अण्णा ) मोहोळ यांना सुपूर्त करण्यात आले. प्रसंगी श्रीरामपूर येथील पत्रकार राजेंद्र देसाई यांनी १८० दिवसांचा आदेश त्वरित पारित करावा तसेच पदोन्नतीबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी करत, राहाता तालुका समादेशक संदीप शिंदे यांनी मानधन वेळेवर मिळावे.२०१६ पासुनची फरकाची रक्कम त्वरीत वितरीत करावी, अशी विनंती केली. तर अनंत गोडसे यांनी शासन निर्णयाची अंमलबजावणी करून होमगार्ड बंधू - भगीनींच्या हिताचे निर्णय घ्यावे यासाठी आपण प्रयत्न करावे अशी मागणी केली.
 प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भालेराव,प्रसाद तुरकणे आदी.उपस्थित होते. यावेळी भाजपा चे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या विशेष प्रयत्नातून शिर्डीत भाजपाचे भव्य राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बंडू शिंदे तसेच सर्व सहकारी कार्यकर्ते प्रयत्नशील होते.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र देसाई 
(वडाळा महादेव) 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Wednesday, January 15, 2025

साहित्यिक प्रा.शुक्राचार्य गायकवाड यांच्या हस्ते मानवतेचा प्रकाश काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न


साहित्यिक प्रा.शुक्राचार्य गायकवाड यांच्या हस्ते मानवतेचा प्रकाश काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न 

- कळवा ठाणे - प्रतिनिधी -/ वार्ता -
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बौध्द साहित्य प्रसार संस्था केंद्रीय कार्यकारणी संचलित महाराष्ट्र समितीव्दारा आयोजित मानवतेचा प्रकाश या काव्य संग्रहाचे कळवा येथील नालंदा बुध्दविहारात मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा.शुक्राचार्य गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. 
यावेळी त्यांनी "मानवतेचा प्रकाश हा काव्य संग्रह हा आशावादी व मानवाच्या हितासाठी असून समाजाला प्रकाशमान करील. हा काव्यसंग्रह प्रकाशीत करताना मला जो आनंद झाला आहे तो मी शब्दात व्यक्त करू शकत नाही ." असे असे प्रतिपादन केले.
     यावेळी प्रमुख पाहुणे राजरत्न अडसुळ यांनी , "नवोदीत कविंना मिळालेला एक प्लॅटफॉर्म प्रा. शुक्राचार्य गायकवाड सरांनी बौध्द साहित्य प्रसार संस्थेच्या माध्यमातून निर्माण केल्याने त्याची एक प्रचिती म्हणजेच मानवतेचा प्रकाश हा काव्यसंग्रह होय". असे आपले मत यावेळी व्यक्त केले. या पुस्तकावर बोलण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून अॅड. धम्मकिरण चन्ने व भीमराव रायभोळे यांनी आपले मोलाचे विचार मांडून पुस्तकावर प्रकाश टाकला. मानवतेचा प्रकाश या काव्यसंग्रहाची प्रकाशक म्हणून प्रकाशकीय भुमीका मांडताना भटू जगदेव यांनी, "पैसे अभावी जे पुस्तक रूपाने साहित्य काढू शकत नाहीत त्यांच्यासाठी अनित्य प्रकाशन मार्फत वाजवी दरात ना नफा न तोटा, सबबवर पुस्तक छापण्याचे ठरविले आहे " असे यावेळी सांगितले तर संपादकीय भुमीका नवनाथ आनंदा रणखांबे यांनी मांडताना, " लिहित्या हाताला प्रेरणा, प्रोत्साहन आणि बळ देण्यासाठी साहित्यिक नवी पिढी घडवण्याचे आणि मराठी साहित्य विश्व समृद्ध करण्यासाठी मानवतेचा प्रकाश या पुस्तकाची निर्मिती आम्ही केली आहे. जास्तीत जास्त नवोदित आणि ज्येष्ठांच्या साहित्याला विनामूल्य "मानवतेचा प्रकाश" या काव्यसंग्रह ग्रंथाच्या रूपाने संधी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे " असे मत व्यक्त केले. या प्रसंगी मान्यवरांचा सन्मानपत्र, शाल , पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
      ४५ मान्यवर कवींनी तसेच समाजातील सर्व स्तरावरील मान्यवरांसहित बौध्द साहित्य प्रसार संस्था पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी नालंदा बुध्द विहार खच्चुन भरला होता. या सोहळ्याचे सूत्रसंचलन आशा नवनाथ रणखांबे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाम बैसाणे यांनी मानले . 
      दुसऱ्या सत्रात संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात ४७ मान्यवर कवींनी सहभाग घेतला घेतला. 
या प्रसंगी मारुती कांबळे , शाम बैसाणे, वृषालीताई करलाद, मनिषा मेश्राम, अतुल शेलार, शैलेश कर्डक, शाहिर बाळासाहेब जोंधळे, चंद्रकांत शिंदे, कामीनी धनगर, विवेक मोरे, डॉ. सुरेंद्र शिंदे, के. पुरुषोत्तम, ऍड. श्रीकृष्ण टोबरे, विजय ढोकळे , ऍड. नेताजी कांबळे, कांतीलाल भडांगे, वसंत हिरे, सुनिल मोरे, रूपाली शिंगे, सुभाष आढाव, वृशाली माने, प्रा. अरूण अहिरराव, सुरेखा गायकवाड, अकबर इसमाईल म्हमदुल, सदा भांबुळकर, धनंजय सरोदे, साहेबराव कांबळे, बबनदादा सरवदे, गजानन गावंडे, मास्टर राजरत्न राजगुरू, नवनाथ रणखांबे, भटू जगदेव, ऍड. धम्मकिरण चन्ने, व रविकिरण मस्के व प्रा. शुक्राचार्य गायकवाड इत्यादी कवींनी संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयानुरूप आंबेडकरी मूल्ये जपणाऱ्या कविता, गझल सादर केल्या. सर्व कवींना सन्मानपत्र, ग्रंथ आणि गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आले. कविसंमेलनाच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रविकिरण मस्के यांनी केले तर आभार मनिषा मेश्राम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौध्द साहित्य प्रसार संस्था व बौध्द विकास मंडळांनी अथक परिश्रम घेतले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Friday, January 10, 2025

चेक बाउन्सची केस टाळण्यासाठी दाखल केलेला मनाई हुकूमाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला


चेक बाउन्सची केस टाळण्यासाठी दाखल केलेला मनाई हुकूमाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

- नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
चेक बाउन्सची केस टाळण्यासाठी दाखल केलेला मनाई हुकूमाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. नगर न्यायालयातील विशेष दिवाणी दावा १२ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या तडजोडीप्रमाणे ताहेर सिराजोद्दीन पटेल यांनी फारूक हबीब शेख आणि अल्ताफ ताजोद्दिन इनामदार यांना रक्कम ८० लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. या रकमेपोटी धनादेश वटला नसताना चेक बाउन्सची केस टाळण्यासाठी पटेल यांनी चेकचा गैरवापर होवू नये, यासाठी दाखल केलेला मनाई हुकूमाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
ताहीर पटेल यांनी फारूक हबीब शेख आणि अल्ताफ ताजोद्दिन इनामदार यांना समजूत करारनामा लिहून दिलेला होता. समजूती करारनाम्याप्रमाणे शेख आणि इनामदार यांना प्रतिवादी करिता रक्कम २० लाख मिळाले होते. उर्वरित राहिलेली ६० लाख रक्कम हे ताहीर पटेल यांनी धनादेश प्रत्येकी २० लाख चे न्यायालयात दाखल केलेल्या प्रोसेस प्रमाणे दिली होती. परंतु ताहेर पटेल यांनी शेख आणि इनामदार यांच्यासोबत परत ३ जुलै २०२४ रोजी पुरवणी समजूत करारनामा करून ५ लाख रुपये दिले. उर्वरित राहिलेले ५५ लाख १३ ऑगस्ट पर्यंत देण्याचे मान्य व कबूल केले होते. त्याबाबत धनादेश दिलेले होते. सदरचे धनादेश प्रतिवादी यांनी वटवण्यासाठी टाकला असता, तो न वटता परत आला व ठरल्याप्रमाणे रक्कम अदा झाली नव्हती.
म्हणून ताहेर सिराजोद्दीन पटेल यांनी सदर चेक न वाटल्यामुळे स्वतःवर चेक बाउन्स व फसवणुक सारखी केस होऊ नये, म्हणून नगर येथील १२ वे सहदिवानी न्यायाधीश यांच्या न्यायालयात विशेष दिवाणी दावा दाखल केला. सदर दाव्यामध्ये वादी म्हणजे ताहेर पटेल यांनी त्यांनी दिलेल्या चेकचा गैरवापर होऊ नये, म्हणून अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून प्रतिवादी शेख आणि इनामदार यांच्या वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन निशाणी पाच वर केलेला मनाई हुकूमाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. शेख व इनामदार यांच्या वतीने ॲड. हाजी रफिक बेग, ॲड. रियाज बेग व ॲड. अयाज बेग यांनी काम पाहिले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार जी.एन.शेख अहमदनगर 
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================