राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, March 14, 2025

शेवराई संस्थेचा स्तूत्य उपक्रम,परिवर्तनाची पाठशाळा प्रत्येक जिल्ह्यात घेणे काळाची गरज - पोलिस अधीक्षक राकेश ओला

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक नामदेवराव भोसले संचलित शेवराई सामाजीक संस्थेच्या सामाजाभिमुख विविध उपक्रमांमुळे हजारो गरीबांना न्याय मिळाला

- अहील्यानगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा साहित्यिक नामदेवराव भोसले संचलित शेवराई सामाजिक संस्थेच्या वतीने परीवर्तनाची पाठशाळा पहाट या २०२५ व्या कॅमेर्‍याचे ओपनिंग कार्यक्रमाचे नुकताच आयोजन करण्यात आले होते.
अहील्यानगर,पाथर्डी व अहील्यानगर (ग्रामीण) येथील आदिवासी कष्ट करुन आपली उपजिवीका भागवणारे परंतू कलंकित जिवनातून जिवन गुजारन करणारे गरीब आदिवासी पारधी कुटुंबातील श्रम करणारे श्रमीक रहिवासी नागरीक हे अहील्यानगर पोलीस स्टेशन अतंर्गत रहिवासी असुन सदर या दोन घरी "एक कॅमेरा पोलीसांच्या मदतीसाठी व एक कॅमेरा स्वरंक्षणासाठी" या संकल्पनेतून एक एक गरीब कुटूंब गुन्हेगारीच्या कलंकित जिवनातून मुक्त करण्याच्या उद्दिष्टेने. त्यांचे मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात एक पाऊल पुढे मदतीचा या अनुषंगाने शेवराई सामाजीक संस्थेच्या वतीने समाजसेवक व साहित्यिक, नामदेव भोसले यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यांमध्ये काम चालू आहे. त्यांच्या या कार्यक्रमाळे हजारो गरीब कुटुंबांना न्याय मिळत आहे, त्यामुळे नामदेव भोसले यांच्या कामांचेच नव्हेतर कार्यांचे राज्यातून कौतुक केले जात आहे,

 त्यांच्या या सामाजाभिमुख उपक्रमात सर्वजण सहभागी होत आहेत हे कौतुकास्पद आहे असेअहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राजेश ओला यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले.
कोपरगांव, सुपा, कर्जत, पाथर्डी या तालुक्यातील आदिवासी पारधी वस्तीवर कॅमेर्‍याचे ओपनिंग कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक राकेश ओला व लोकमतचे संपादक सुधीर लंके यांच्या उपस्थितीत व शुभहस्ते करण्यात येवून ओपनिंग कार्यक्रम पार पडला, सदर कार्यक्रम कामंरगाव (पारधी वस्ती) भोसले वस्ती येथे आयोजित केला होता,सदर कार्यक्रमामध्ये पोलीस अधीक्षक राकेश ओला, लोकमतचे संपादक सुधीर लंके, ज्येष्ट आदिवासी समाजसेवक व साहित्यिक. नामदेव भोसले, सामाजिक कार्यकर्ते पाठक सर, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीती,पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे,कामरगांव चे सरपंच संदिप ढवळे, सामाजिक कार्यकर्ते.बाबा भोसले, कामरगावचे माजी सरपंच, रवींद्र भोसले, लताबाई भोसले, किशोर चव्हाण आणी आदिवासी पारधी बांधव,ग्रामस्त मोठ्या संख्येत उपस्थित होते.

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

*निरपराध लोकांवर शंकेच्या मनोवृत्तीत गुन्हा दाखल करु नये,आत्ता त्यांच्या मदतीसाठी सी.सी.टीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली आहे, त्यामुळे श्रमिक, कष्टकरी कुटूंब सुखाची झोप घेत आहेत - आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले*

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

=================================
-----------------------------------------------

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111

-----------------------------------------------
=================================

Thursday, March 13, 2025

रमजान मुबारक 2025, रोजा नं. 13 वा, शुक्रवार दिनांक 14-03-2025

रमजान मुबारक 2025, 
रोजा नं. 13 वा, शुक्रवार दिनांक 14-03-2025,

" रोजा :- इस्लाम :-हलाल - हराम -झटका -शास्त्र..
!! " हलाल पद्धतीने खाणे शरीरासाठी सर्वोत्तम च,"!"
(1),हें श्रद्धांवांतांनो! आम्ही तुमच्यासाठी ज्या पवित्र वस्तूंचे तुम्हाला पुरवठा -(बहाल )केलेल्या आहेत, त्याचे सेवन ( खावे ) करावे, आणि अल्लाह ( ईश्वर ) चे आभार माना. ( पवित्र कुरआन पारा नं. 01, सुरह नं. 2, अल - बकराह, आ. नं. 172 वी )
(2), आणि, अल्लाह ज्या आरोग्यदायी चांगल्या वास्तू दिलेल्या(काही वैध व विशुदध अन्न अल्लाह नें दिलेले )आहेत ते सर्व खा, आणि अल्लाह चे भय बाळगा, ज्याच्यावर तुम्हीं विश्वास ठेवता.( सुरह अल- माईदा आ. नं. 88 वी ).
पुन्हा अल्लाह म्हणतात कीं," हें पैगंबरांनो! स्वच्छ व शुद्ध ( आरोग्यदायी ) वास्तूपैकी खा, आणि चांगले कामे करा, आणि हें लक्षात असू दया कीं तुम्ही जे काही करता त्याची मला पूर्ण जाणीव आहेत..". पवित्र कुरआन सुरह नं 23 अल - मोमीनन आ. नं. 51वी ).
  इस्लाम मध्ये प्रत्येक घटनेला फार काळजीपुर्वक घेतलं व केलं जातं, मग ती खाणे पिन का असेना, त्यात" हलाल "व "हराम "या गोष्टीला फार महत्व, हलाल म्हणजे कष्ट, घाम गाळून, प्रामाणिक पने केलेल्या व्यवहार, व्यवसाय करून आणलेल्या कमाईतुन खाणे, व्यवसाय केला तर सत्य बोलून, आपल्या कोणत्याही गिर्हाईक बरोबर फसवा फस्वी न करता, खरं खरं बोलून, तराजू व्यवस्थित तोलून मापून मिळवलेल्या पैसा तुन आणलेलं अन्न म्हणजे हलाल कमायी..
प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात कीं, जो व्यवसायिक जी तुमच्या दुकानात वास्तू खराब भेसळ युक्त असेल तर ती त्या गिर्हाईकला सांगून तशीच विका परुंतु तुम्हीं ती वास्तू चांगलीच सांगून गिर्हाईकला फसवलं तर तुम्हीं अल्लाह च्या निराशेच्या गरतेत सापडला म्हणून समजा, त्यावर फारिश्तेय त्या व्यक्तीचा धिक्कार करतील ( हदिस इब्न माझा 2247).
     पवित्र कुरआन नुसार समुद्रात अठरा( 18000) हजार पेक्षा ही जास्त जीव राहतात, समुद्रातील जलचर प्राणी उदा. बेडूक, कासव, खेकडे, मगर खाण्यासाठी इस्लाम मनायी( हराम,)निशिद्ध केलेली आहेत.
त्या व्यतिरिक्त मासे व इतर सर्व समुद्री पदार्थ खाण्यासाठी अनुमती दिली आहेत.तसेच ज्या ज्या प्राण्याच्या, पाक्षिणा लांब अंकुचिदार नखें आहेत अशा प्राण्याचे मास खाण्यासाठी मनायी केलेली आहेत . उदा. वाघ, सिंह, कुत्रा, मांजर इत्यादी, व चिल, घार इत्यादी, परुंतु का??.याचं शास्त्रीय कारण...???.
          पवित्र कुरआन म्हणते कीं, " निसंशय अल्लाहकडून तुमच्या वर जर कोणता प्रतिबंध असेल तर, तो म्हणजेच, तुम्हीं मृत प्राण्यांचे मास- रक्त, डुकराचं मास आणि त्या गोष्टी ही ज्यावर अल्लाह व्यतिरिक्त अन्य कुणाचं नांव घेतलेलं असेल त्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी वर्ज्य ( मनाई - मना - हराम ) आहेत. ( सुरह 02, अल - बकराह ).
इस्लाम मध्ये काय खावं व काय खाऊ नयेत म्हणून पवित्र कुरआन मध्ये वारंवार आदेश आलेले आहेत.. इस्लाम मध्ये कोणत्याही गोष्टी कार्य करतांना काही मार्गदर्शन मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत त्या शास्र शुद्ध अशाच आहेत.. बघू.
 स्वच्छता फार म्हहत्वाची असते म्हणून स्वच्छ पाण्याने (वजु ) हातपाय घेऊन ज्या पशु वा प्राण्याची कुर्बानी ( कापणार ) आहेत त्या अगोदर संबंधीत प्राणी व पशुला व्यवस्थित पोटभर खाऊपिऊ घालून त्याला शांत व समाधानी करून नंतरच त्याला कापण्यासाठी आडवं पाडलं जावून, सुऱ्याला व्यवस्थित धार करून घेणं गरजेचे असतं कारण त्या प्राण्याला कापताना जास्त त्रास झाला नाहीं पाहिजे, त्या प्राण्यांसमोर सुरा न आणता 
 एक फार महत्वाची गोस्ट म्हणजेच 👍त्याला तीन विभागात कापणे गरजेचे असतं 👌अल्लाह चं नामस्मरण करून पहिल्या प्रथम मानेच्या शिरा नंतर श्वास नलिका, व तिसऱ्या हिस्सात बाकीचे सर्व मान कापणे यालाच ' हलाल " कापणे संबोध तात.
इस्लाम मध्ये हाल हाल करून मारणं हें क्रूर-निर्दयी समजलं जातं व निषधं समजलं जातं. अर्थातच प्राणी हें मनुष्यासाठी च खाद्य आहेत परुंतु कापताना सन्मान पुर्वक व जास्त निर्दयी न होता हळू हळू कापणे आणि याच सर्व प्रक्रियेला हलाल म्हटले जाते.अगर असं नाहीं कापले तर शेवटी अल्लाहला जाब दयावा लागणार आहेत..
याच हलाल प्रक्रियेत तीन विभागात हळू हळू कापल्या मुळे प्राणी व पशु ची हृदय जवळ जवळ दीड (1-2/2) ते अडीच 2-1/2) मिनिटं हृदयाची पंपिंग सिस्टिम चालू असते व ती पंपिंग सिस्टिम चालू राहिल्यामुळे रक्ताभिसरण सिस्टिम चालू असल्यामुळे शरीरातील रक्त शरीरात व शिरामध्ये सकाळळे ( clot घट्ट - thrombing ) न राहता संपूर्ण पने बाहेर फेकलं जाते. व काही वेळाने शरीरामध्ये विविध अपायकारक अर्थात शरीराला घातक जिवाणू, ( bacteria ) व विषाणू ( virus)चे आक्रमन होते व ते खाण्यासाठी अयोग्य असतं... काही आजार जडण्याची शक्यता असते..हेच शास्त्रीय कारण...
याच्या उलट झटका मटण पद्धती असते.. कापणारे स्वच्छ न राहता जाणवरला घेऊन एका झटक्यात त्या प्राण्याची मान कापली जाते.. यामुळे तो प्राणी एकदम कार्डीयाक अरेरेस्ट म्हणजेच हृदय विकार होउन collapse होतो व मरून जातो हृदयाची रक्ताभिसरण सिस्टिम पूर्ण बंद होतं त्यामुळे शरीरातील रक्त बाहेर न येता शरीरातच गोठलेलं असतं म्हणून त्यावर अपायकारक जीवानु ( bactetia ) विषाणू (virus ) अतिक्रमण करतात व आतच असतात त्यामुळे काही आजार होण्याची शक्यता असते..
झटका पद्धतीने कापणे म्हणजे फार निर्दयी, क्रूर पद्धत इस्लाम मध्ये मानतात, ही पद्धत इस्लाम मध्ये निशिद्ध हराम म्हणून मानली जाते. झटका पद्धतीने कापून खाणे हें शारीरिक दृष्टीने अपाय कारक समजलं जाते, एखाद्या रोगाला आमंत्रण दिल्या सारखं होतं म्हणून इस्लाम नें मान्यता दिली नाहीं.
तसेंच, तिक्षण नखें असणारे प्राणी व पक्षी, उदा. द्यायाचं झालं तर वाघ, सिंह, बिबटया, चित्ता, कुत्रा किंवा हिंसर, हिंसक प्राणी पशु, गिधाड, चिल, इत्यादी, कारण कीं हें सर्व प्राणी जंगलात राहतात भांडखोर वृत्ती चे सतत भांडण करतात म्हणून कायम जखमी अवस्थेत असतात त्यांच्या दातांना व नखानांना कायम काहीतरी चिकटलेलं असतं त्यामध्ये घातक जिवाणू व विषाणू असतात म्हणून ते मानवासाठी जास्त घातक असतात व काही गंभीर स्वरूपाचे आजार उदा. धनुर्वात, रब्बीज Tetanus, Rabbies, इत्यादी आजार होण्याची शक्यता असतं.
तसेच डुक्कर खाणे, पाळणे ही इस्लाम नें निशिद्ध मनाई केली आहेत कारण डुक्कर किंवा तत्सम प्राणी हें खूप केसाळ असतात व त्यांची मानसिकता हें घाणेरड्या, गच्याळ, दूषित पाण्यात बसने व त्यातील खाण्याची असते, म्हणून त्यामध्ये असंख्य प्रकारचे जीव जंतू असतात त्यामुळे काही भयानक आजार होण्याची शक्यता असतं म्हणून इस्लाम नें या सर्व अपाय कारक गोष्टी णा खाणे पाळणे हराम केलं आहेत.
सृष्ठीच्या निर्माण करत्याने नैसर्गिक रित्या ज्यांच पालनपोषण होते त्यांची पैदास ही जास्त प्रमाणात होतं असते म्हणून असेच पदार्थ खाण्यास परवानगी दिली आहेत...

(मित्रांनो लेख आवडला तर आपल्या मित्र व नातेवाईकांना जरूर पाठवा, आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.)

=================================
-----------------------------------------------
लेखक डॉक्टर :- सलीम साईदा सिकंदर शेख 
बैतुशशिफा हॉस्पिटल 🌹मिल्लतनगर.✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर 
मोबाईल :- 9271640014.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
-----------------------------------------------
=================================

रमजान मुबारक 2025रोजा नं. 12-गुरुवार दिनांक 13-03-2025

रमजान मुबारक 2025रोजा नं. 12-गुरुवार दिनांक 13-03-2025

रोजा :- सकारात्मक एनर्जी साठी " अजान "चा मंजुळ ध्वनी...

            संत कबीर दास जी नें पवित्र " अजान "च्या बाबतीत आपल्या कबीर" दोहे " मध्ये म्हटले आहेत 
       " कंकर पत्थर जोर के मस्जिद लिया बनाये!,
तापे मुल्ला बांग दे, क्या बहरा हुवा खुदाय!"
दिवसातुन पाच वेळा 'आझान "अजान " अल्लाह चे (ईश्वरा- परमेश्वर )चे नांव घेऊन लोकांना मस्जिद कडे बोलावले जाते, काही काही परुंतु बऱ्याच लोकांचा समज असा आहेत कीं अजान म्हणजे बादशाह अकबरचे नाव घेऊन बोलावले जाते परुंतु तसे काहीच नाहीं व नव्हतं देखील.. परंतु काही लोकं समाजाचं गैरसमज करून देत असतात. 
 "अजान "चा अर्थ फक्त्त लोकांना नमाज साठी बोलावणं ' प्रत्येक मस्जिद मध्ये"मूअज्जीन " ( अजान देणार्याला म्हणतात ) लाऊड स्पीकर मध्ये मोठयानें आवाज देवून सामूहिक नमाज साठी बंधूना बोलावतो त्याला अजान म्हटले जाते.
जगात प्रत्येक धर्मात श्रद्धांळुनना मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा इत्यादी मध्ये श्रद्धालुंना बोलवण्याची आदी काळापासून एक सांकेतिक व विशिष्ट पद्धतीने बोलावले जाते, 
प्रेषित मुहम्मद स्व. मदिना मध्ये स्थलांतर झाल्या नंतर सर्व सहकारी मित्रानं बोलवून मीटिंग घेतली त्यामध्ये पाच विविध वेळी अल्लाह - (परमेश्वर )च्या बंदगी साठी नमाज अदा करण्यासाठी लोकांना एकत्र करण्यासाठी काय उपाय योजना केली पाहिजेत म्हणून मित्रांचे ( सहाबा ) शी सल्ला मसलत केली, प्रेषित स्व. ची एक लोकशाही वादी अशी पद्धत होती कीं कोणतेही कार्य करायचं थरलं तर सर्व सहकारी मित्रांची बैठक ठेवायची, त्यांच्या कडून काही सूचना, सल्ले मागायचं व त्यांनतर च कोणतीही गोस्ट करायची, असो.
बैठकित जु लोकांमध्ये कंक( बेल ) वाजवून बोलवलं जाते, ख्रिस्तचन लोकांमध्ये चर्च मध्ये मोठी घंटा वाजवली जाते, मंदिर मध्ये ही घंटा तर काही काही ठिकाणी शंख वाजवतात, असे विविध सल्ले मत काहींनी दिले परुंतु रात्री उशीर झाल्यामुळे पैगंबर स्व. नीं दुसऱ्या दिवशी पुन्हा विचार करून आपण सहमतीने निर्णय घेउ असं ठरलं. हजरत उमर बिन खत्ताबा रजि. यांच्या स्वप्नात वारंवार कानात तेंच तेंच आजच्या अजान मध्ये जे शब्द वापरलं जाते अगदी तश्याच पद्धतीचे शब्द वारंवार ऐकू येत होते.. व गुणगुणन्याचे सतत ऐकू येत होते व योगा योग म्हणावं कीं ईश्वर ( अल्लाह ) ची इच्छा म्हणावी अगदीच दुसरे एक मित्र सहाबा हजरत अब्दुल्लाह बिन जैद रजि. जे आजून एक प्रेषित यांचे मित्र होते, त्यांच्या ही स्वप्नात वारंवार अगदी हजरत उमर बिन खात्तब रजि यांच्या बरोबर जे रात्री घेडलं अगदी तसेच वारंवार तोच वाणी त्यांच्या कानावर येत होती," अल्लाह हूं अकबर ".. हजरत अब्दुल्लाह बिन जैद यांनी झोपेतच हा ध्वनी तोंडपाठ केलं.. व गुणगुणात ते प्रेषित मुहम्मद स्व यांच्या कडे आलेत व ते हजरत उमर बिन खात्तब यांनी ऐकलं तर.. त्यांना आश्चर्य झाले कीं तु हें काय म्हणतोय म्हणून अब्दुल्लाह यांना विचारलं तर हा ध्वनी आज रात्री मी सुद्धा ऐकलं..पैगंबर मुहम्मद स्व. यांनी सांगितलं कीं हा ध्वनी अल्लाह (-परमेश्वर ईश्वर )चाच आहेत व अल्लाह परमेश्वर यांचीच मनातील इच्छा असू शकते व अजान ही अल्लाह परमेश्रानेच दिलेले वरदान आहेत.
   शेवटी तेच फायनल झालं,आपण हाच ध्वनी म्हणून आपल्या बंधूना अजान देवून बोलावून घेउ... 
   मित्रांनो अजान ही अल्लाह च्याच नावानं दिले जाते परुंतु अकबर हा अरबीतील शब्द आहेत याचा अर्थ :- मोठा, "सर्व महान -श्रेष्ठ.. " होतो म्हणून "अल्लाह हूं अकबर " अर्थातच अल्लाह सर्व श्रेष्ठ ( महान )आहेत " होतो.. बादशाह अकबरचा याचा काहीच संबंध नाहीत.
प्रेषित मुहम्मद स्व यांनी लगेचच आपले आवडते निग्रो मित्र हजरत बिलाल रजि. यांना बोलावून अजान शब्द त्यांना शिकवून भोर पहाटे ची फर्ज (अनिवार्य )नमाज प्रार्थना त्यांच्याच बोबड्या स्वरात समस्त मदिना वासियांना एकवलं ती हाच परमेश्वर अल्लाह चा ध्वनी आज सर्व जगात एकवून भाविकांना बोलावून घेतलं जातं.
त्या अल्लाह चे ध्वनीचे मंजुळ स्वर, "( अजान चे बोल ).
                (1)🌷🌹 अल्लाह - हुं - अकबर! अल्लाह - हुं,- अकबर!
               👍👍अर्थात:- ईश्वर ( अल्लाह ) महान ( श्रेष्ठ ) आहेत :, अल्लाह ( ईश्वर ) महान आहेत.) :,

                   🌹🌷 अल्लाह - हुं - अकबर..- अल्लाह - हुं..... अकबर..
                    👍👍 अर्थात :- ईश्वर (अल्लाह )महान आहे ---अल्लाह(ईश्वर )महान आहेत...:, (1),
                    (2) 🌷🌹अशह दु -- अल - ला - ई - लाह - ईललल्लाह ! अशहदु -अल -ला - ई - लाह - ईल- लल्लाह...!.
  अर्थात:- मी ग्वाही देतो कीं, अल्लाह (ईश्वर) च्या शिवाय कोणीही पूज्य नाहीं! मी ग्वाही देतो कीं, अल्लाह ( ईश्वर ) च्या शिवाय कोणीही पूज्य नाहीं.!(2).
                🌷🌹 (3), अशहदु - आन -न -मुहम्मदु - र -रसूलुल्लाह !,
                    अशहदु - आन -न - मुहम्मदु -र -रसूलु ल्लाह..!!,
अर्थात:- मी ग्वाही देतो कीं, मुहम्मद स्व. हें अल्लाह ( ईश्वर ) चे पैगंबर ( प्रेषित ) आहेत..
मी ग्वाही देतो कीं, मुहम्मद स्व. अल्लाह ( ईश्वर ) चे पैगंबर, ( प्रेषित,) आहेत. ( 3).
              🌷🌹 (4) हाय -या - अलस -:सलाह ! हाय,- या - अलस - सलाह...!!.
अर्थात :- नमाज ( प्रार्थना,- सलात )साठी कडे या..!
नमाज ( प्रार्थना - सलात -) साठी कडे या....!(4).
          🌷🌹 (5) हाय -:या -अल,- फलहा...! हाय - या - अल - फलहा..!!
अर्थात:- या सफलते -कल्याण कडे...! या सफलते - कल्याणा कडे... ( 5).,

          🌹🌷(6) अल्लाह - हुं - अकबर...! अल्लाह - हुं - अकबर...."!!.
अर्थात:- अल्लाह ( ईश्वर ) महान - श्रेष्ठ आहेत..! अल्लाह (ईश्वर ) महान श्रेष्ठ आहेत.(6)!!.
       🌹🌷(7) ला - ई - ला - इल्ल-ल्लाह...
अर्थात:- अल्लाह ( ईश्वर ) च्या शिवाय कोणीही( प्रार्थना), पूज्य नाहीं.
भोर पहाटे सकाळी 5-30-6-00 वाजता लोकांना जो प्रश्न पडतोय कीं सकाळी सकाळी आमच्या झोप मोड होते त्या वेळा खुप खास फक्त्त सर्व अजान नंतर एकच शब्द उचरला जातोय तो, 
   🌷🌹अससलातु - खैरममि न्नार -! अससालतू - खैरून मिन्नर..🌹🌷
अर्थात:- नमाज ( प्रार्थना - सलात ) झोपेपेक्षा उत्तम आहेत.. नमाज ( प्रार्थना - सलात ) झोपेपेक्षा उत्तम आहेत...!!🌹🌷..
हाच अजानचा मंजुळ ध्वनी आपल्याला आपल्या कानामध्ये वारंवार दिवसातून पाच वेळा एकला जातोय.. हा अल्लाह ईश्वराचा ध्वनी आहेत....
ह्या पाच वेळा जगात मध्ये नेगेटिव्ह एनर्जी च्या च असतात म्हणून हा ईश्वर (अल्लाह ) चा ध्वनी मोठं मोठयानं मंजुळ स्वरात म्हणून आपल्या नेगेटिव्ह एनर्जीला पॉसिटीव्ह एनर्जी मध्ये रूपांतरित केलं जातंय, ते पण फुकटात....
हाच ध्वनी जगात कुठेही दुष्काळी परिस्थिती, आणीबाणी, संकट, महापुरे आली तर जागोजागी, घरोघरी, गल्ली ठीक ठिकाणी एकवलं जातोय.. त्या भयाण परिस्थिती महापुरा चे संकट टाळण्यासाठी...
म्हणून नकारात्मक एनर्जी ला घालवण्यासाठी सकारात्मक अजान किती फायच्या चे राहील...

=================================
-----------------------------------------------
लेखक डॉक्टर :- सलीम साईदा सिकंदर शेख.
बैतुशशिफा हॉस्पिटल, मिल्लत नगर.✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर 
🌷🌹9271640014..🌷🌹
-----------------------------------------------
=================================

डॉ, विश्वासराव आरोटे यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी – नितीन कोते

डॉ. आरोटे यांच्या हस्ते आदिवासी 
विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक गांवकरीचे मुख्य संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या वतीने अकोले तालुक्यातील पाडाळणे येथील आदिवासी कॉलनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असून विद्यार्थ्यांसाठी मोठी मदत ठरणार असल्याचे मत सहशिक्षक नितीन कोते यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कपडे, वह्या, दप्तर व खाऊ वाटप करण्यात आले. मुलांच्या आनंदी चेहऱ्यांनी शाळेचा परिसर दिवाळी साजरी केल्यासारखा उजळून निघाला. यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजीराव नाईकवाडी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष अशोक शेळके तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

डॉ. विश्वासराव आरोटे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत उत्तम संस्कार मिळाले, तर भविष्यात समाजासाठी आदर्श अधिकारी घडतील.

कार्यक्रमाचे स्वागत सहशिक्षक नितीन कोते यांनी केले, तर शिक्षिका मंगल शेळके यांनी आभार मानले. विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

यशस्वी महिलांना पाठिंबा देणाऱ्या घरातील पुरुषांचे आभार- सौ मनीषा महाले

यशस्वी महिलांना पाठिंबा देणाऱ्या घरातील पुरुषांचे आभार- सौ मनीषा महाले

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील बळीराम पाटील विद्यालय येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून शासकीय आय. टी. आय. ( एस.सी.पी.) कॉलेजच्या शिल्प निदेशिका सौ. मनिषा महाले उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. एम.डी. श्रीमंगले होते. व्यासपीठावर शालेय कार्यकारिणी सदस्या श्रीमती माधुरी राठोड, श्रीमती पी. एल. उदावंत, श्रीमती जे.के.फुलेलवाड, श्रीमती सोनवणे, श्रीमती बीडवई यांची उपस्थिती होती.
      दीपप्रज्वलानंतर श्रीमती जे.के.फुलेलवाड यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. श्रीमती माधुरी राठोड यांनी महिला दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले.
          प्रमुख अतिथी सौ. मनीषा महाले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या मुलींसोबतच मुलांवर वयानुरूप योग्य संस्कार होणे गरजेचे आहे. यशस्वी महिलांच्या मागे नक्कीच घरातील पुरुषांचा पाठिंबा असतो. महिलांना पाठिंबा देणाऱ्या पुरुषांचे त्यांनी आभार मानले. आपल्या आईला, ताईला महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या का, इत्यादी प्रश्न विचारत त्यांनी मुलांना बोलते केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेची विद्यार्थिनी कु. जानवी सरकटे हिने जर आभार प्रदर्शन कु.तन्वी पाटील हिने केले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

जागतिक महिला दिनी तीन चाकी सायकल वाटप आणि कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा

एक स्त्री अस्तित्व जिथे आहे तेथे कोणतीही गोष्ट मांगल्यपूर्ण आणि विधायक असते - डॉ नयना कडू 

- उद्धव - फंगाळमेहकर -/ वार्ता -
महिला सशक्तीकरण होत असताना नारीशक्तीची वैयक्तिक शक्ती हि समूह शक्ती होते तेंव्हा राष्ट्र उभारणी करते. तर महिलां स्वतःमध्ये अपूर्व शक्ती आहे, महिलांना सक्षम स्त्री व्हावं हि सांगण्याची गरज नसून स्वतःमधील शक्तीची जाणीव व्हावी या सामर्थ्याचा समाजातील विधायकते कसा उपयोग करता येईलचे कामासाठी कसा वापर करता येईल याकरिता प्रयत्नशील असावे. एक स्त्री अस्तित्व जिथे आहे तेथे कोणतीही गोष्ट मांगल्यपूर्ण आणि विधायक असते. प्रत्येक कुटुंबात स्त्री सन्मान झाला पाहिजे तसेच अपंगांना आधार देण्याकरीतसा तीन चाकी सायकल वाटप आणि प्रतिभावंत महिलांचा सन्मान हा स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन डॉ. नयना कडू यांनी वरुड (जि.अमरावती) येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि वरुड नगर परिषदच्या वतीने आयोजित महिला दिनानिमित्त केले.
यावेळी कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय संघटक मयूर देशमुख तर उद्घाटक मुख्याधिकारी प्रवीण मानकर तर प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. नयना कडू उपस्थित होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार अर्जुन ठोसरे , माजी सभापती गिरीश कराळे , जिल्हाध्यक्ष हर्षा ढोक , शिला पाटील , मनाली तायडे , दैनिक वरुड केसरीच्या संपादिका निलम सावरकर , वरुड नगर परिषदेच्या सहायक प्रकल्प अधिकारी वंदना सुरकार, मोर्शी तालुकाध्यक्ष संध्या अमदरे,वरुड तालुकाध्यक्ष डॉ. कविता देशमुख, डॉ . श्वेता कुबडे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय खासबागे, ज्येष्ठ पत्रकार प्रा.त्रिलोचन कानुंगो, तालुकाध्यक्ष योगेश ठाकरे व्यासपीठावर उपस्थित होते . जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी सात दिव्यांग महिला पुरुषांना तीनचाकी सायकलचे वाटप करण्यात आले. तर समाजातील कर्तृत्ववान प्रतिभावंत महिलांचा शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 
तर टाकाऊ पासून तयार केलेल्या विकाऊ वस्तूची स्पर्धा घेण्यात येऊन उत्कृष्ट स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली.यावेळी तालुक्यातील शेकडो महिलांनी हजेरी लावली होती.
कार्यक्रमचे प्रास्ताविक डॉ. कविता देशमुख यांनी तर संचालन योगिता नागमोते, रजनी काळमेघ तर आभार प्राची ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाकरिता प्रा नंदिनी ठाकरे ,अनुराधा देशमुख , प्रणाली देशमुख , डॉ शरयू झोटिंग , वंदना सुरकार, माधुरी ठाकरे ,प्रिया लोखंडे , अर्चना सोलव, प्रतिभा देशमुख , प्रणिता चव्हाण , निशा पानसे , जयश्री फुटाणे , मंजुश्री भड शुभांगी उपासे , शैलजा वानखडे , दीपाली भुयार , संध्या वांदे , कोमल पांडव तसेच पत्रकार संघाचे प्रवीण सावरकर , तुषार अकर्ते , प्रकाश गडवे, निलेश लोणकर तुषार खासबागे निखिल बावणे सह आदींनी परिश्रम घेतले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार प्रविण सावरकर - वरुड
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर 9561174111
-----------------------------------------------
=================================

Wednesday, March 12, 2025

रमजान मुबारक 2025रोजा नं. 12-गुरुवार दिनांक 13-03-2025

रोजा :- सकारात्मक एनर्जी साठी " अजान "चा मंजुळ ध्वनी...

            संत कबीर दास जी नें पवित्र " अजान "च्या बाबतीत आपल्या कबीर" दोहे " मध्ये म्हटले आहेत 
       " कंकर पत्थर जोर के मस्जिद लिया बनाये!,
तापे मुल्ला बांग दे, क्या बहरा हुवा खुदाय!"
दिवसातुन पाच वेळा 'आझान "अजान " अल्लाह चे (ईश्वरा- परमेश्वर )चे नांव घेऊन लोकांना मस्जिद कडे बोलावले जाते, काही काही परुंतु बऱ्याच लोकांचा समज असा आहेत कीं अजान म्हणजे बादशाह अकबरचे नाव घेऊन बोलावले जाते परुंतु तसे काहीच नाहीं व नव्हतं देखील.. परंतु काही लोकं समाजाचं गैरसमज करून देत असतात. 
 "अजान "चा अर्थ फक्त्त लोकांना नमाज साठी बोलावणं ' प्रत्येक मस्जिद मध्ये"मूअज्जीन " ( अजान देणार्याला म्हणतात ) लाऊड स्पीकर मध्ये मोठयानें आवाज देवून सामूहिक नमाज साठी बंधूना बोलावतो त्याला अजान म्हटले जाते.
जगात प्रत्येक धर्मात श्रद्धांळुनना मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा इत्यादी मध्ये श्रद्धालुंना बोलवण्याची आदी काळापासून एक सांकेतिक व विशिष्ट पद्धतीने बोलावले जाते, 
प्रेषित मुहम्मद स्व. मदिना मध्ये स्थलांतर झाल्या नंतर सर्व सहकारी मित्रानं बोलवून मीटिंग घेतली त्यामध्ये पाच विविध वेळी अल्लाह - (परमेश्वर )च्या बंदगी साठी नमाज अदा करण्यासाठी लोकांना एकत्र करण्यासाठी काय उपाय योजना केली पाहिजेत म्हणून मित्रांचे ( सहाबा ) शी सल्ला मसलत केली, प्रेषित स्व. ची एक लोकशाही वादी अशी पद्धत होती कीं कोणतेही कार्य करायचं थरलं तर सर्व सहकारी मित्रांची बैठक ठेवायची, त्यांच्या कडून काही सूचना, सल्ले मागायचं व त्यांनतर च कोणतीही गोस्ट करायची, असो.
बैठकित जु लोकांमध्ये कंक( बेल ) वाजवून बोलवलं जाते, ख्रिस्तचन लोकांमध्ये चर्च मध्ये मोठी घंटा वाजवली जाते, मंदिर मध्ये ही घंटा तर काही काही ठिकाणी शंख वाजवतात, असे विविध सल्ले मत काहींनी दिले परुंतु रात्री उशीर झाल्यामुळे पैगंबर स्व. नीं दुसऱ्या दिवशी पुन्हा विचार करून आपण सहमतीने निर्णय घेउ असं ठरलं. हजरत उमर बिन खत्ताबा रजि. यांच्या स्वप्नात वारंवार कानात तेंच तेंच आजच्या अजान मध्ये जे शब्द वापरलं जाते अगदी तश्याच पद्धतीचे शब्द वारंवार ऐकू येत होते.. व गुणगुणन्याचे सतत ऐकू येत होते व योगा योग म्हणावं कीं ईश्वर ( अल्लाह ) ची इच्छा म्हणावी अगदीच दुसरे एक मित्र सहाबा हजरत अब्दुल्लाह बिन जैद रजि. जे आजून एक प्रेषित यांचे मित्र होते, त्यांच्या ही स्वप्नात वारंवार अगदी हजरत उमर बिन खात्तब रजि यांच्या बरोबर जे रात्री घेडलं अगदी तसेच वारंवार तोच वाणी त्यांच्या कानावर येत होती," अल्लाह हूं अकबर ".. हजरत अब्दुल्लाह बिन जैद यांनी झोपेतच हा ध्वनी तोंडपाठ केलं.. व गुणगुणात ते प्रेषित मुहम्मद स्व यांच्या कडे आलेत व ते हजरत उमर बिन खात्तब यांनी ऐकलं तर.. त्यांना आश्चर्य झाले कीं तु हें काय म्हणतोय म्हणून अब्दुल्लाह यांना विचारलं तर हा ध्वनी आज रात्री मी सुद्धा ऐकलं..पैगंबर मुहम्मद स्व. यांनी सांगितलं कीं हा ध्वनी अल्लाह (-परमेश्वर ईश्वर )चाच आहेत व अल्लाह परमेश्वर यांचीच मनातील इच्छा असू शकते व अजान ही अल्लाह परमेश्रानेच दिलेले वरदान आहेत.
   शेवटी तेच फायनल झालं,आपण हाच ध्वनी म्हणून आपल्या बंधूना अजान देवून बोलावून घेउ... 
   मित्रांनो अजान ही अल्लाह च्याच नावानं दिले जाते परुंतु अकबर हा अरबीतील शब्द आहेत याचा अर्थ :- मोठा, "सर्व महान -श्रेष्ठ.. " होतो म्हणून "अल्लाह हूं अकबर " अर्थातच अल्लाह सर्व श्रेष्ठ ( महान )आहेत " होतो.. बादशाह अकबरचा याचा काहीच संबंध नाहीत.
प्रेषित मुहम्मद स्व यांनी लगेचच आपले आवडते निग्रो मित्र हजरत बिलाल रजि. यांना बोलावून अजान शब्द त्यांना शिकवून भोर पहाटे ची फर्ज (अनिवार्य )नमाज प्रार्थना त्यांच्याच बोबड्या स्वरात समस्त मदिना वासियांना एकवलं ती हाच परमेश्वर अल्लाह चा ध्वनी आज सर्व जगात एकवून भाविकांना बोलावून घेतलं जातं.
त्या अल्लाह चे ध्वनीचे मंजुळ स्वर, "( अजान चे बोल ).
                (1)🌷🌹 अल्लाह - हुं - अकबर! अल्लाह - हुं,- अकबर!
               👍👍अर्थात:- ईश्वर ( अल्लाह ) महान ( श्रेष्ठ ) आहेत :, अल्लाह ( ईश्वर ) महान आहेत.) :,

                   🌹🌷 अल्लाह - हुं - अकबर..- अल्लाह - हुं..... अकबर..
                    👍👍 अर्थात :- ईश्वर (अल्लाह )महान आहे ---अल्लाह(ईश्वर )महान आहेत...:, (1),
                    (2) 🌷🌹अशह दु -- अल - ला - ई - लाह - ईललल्लाह ! अशहदु -अल -ला - ई - लाह - ईल- लल्लाह...!.
  अर्थात:- मी ग्वाही देतो कीं, अल्लाह (ईश्वर) च्या शिवाय कोणीही पूज्य नाहीं! मी ग्वाही देतो कीं, अल्लाह ( ईश्वर ) च्या शिवाय कोणीही पूज्य नाहीं.!(2).
                🌷🌹 (3), अशहदु - आन -न -मुहम्मदु - र -रसूलुल्लाह !,
                    अशहदु - आन -न - मुहम्मदु -र -रसूलु ल्लाह..!!,
अर्थात:- मी ग्वाही देतो कीं, मुहम्मद स्व. हें अल्लाह ( ईश्वर ) चे पैगंबर ( प्रेषित ) आहेत..
मी ग्वाही देतो कीं, मुहम्मद स्व. अल्लाह ( ईश्वर ) चे पैगंबर, ( प्रेषित,) आहेत. ( 3).
              🌷🌹 (4) हाय -या - अलस -:सलाह ! हाय,- या - अलस - सलाह...!!.
अर्थात :- नमाज ( प्रार्थना,- सलात )साठी कडे या..!
नमाज ( प्रार्थना - सलात -) साठी कडे या....!(4).
          🌷🌹 (5) हाय -:या -अल,- फलहा...! हाय - या - अल - फलहा..!!
अर्थात:- या सफलते -कल्याण कडे...! या सफलते - कल्याणा कडे... ( 5).,

          🌹🌷(6) अल्लाह - हुं - अकबर...! अल्लाह - हुं - अकबर...."!!.
अर्थात:- अल्लाह ( ईश्वर ) महान - श्रेष्ठ आहेत..! अल्लाह (ईश्वर ) महान श्रेष्ठ आहेत.(6)!!.
       🌹🌷(7) ला - ई - ला - इल्ल-ल्लाह...
अर्थात:- अल्लाह ( ईश्वर ) च्या शिवाय कोणीही( प्रार्थना), पूज्य नाहीं.
भोर पहाटे सकाळी 5-30-6-00 वाजता लोकांना जो प्रश्न पडतोय कीं सकाळी सकाळी आमच्या झोप मोड होते त्या वेळा खुप खास फक्त्त सर्व अजान नंतर एकच शब्द उचरला जातोय तो, 
   🌷🌹अससलातु - खैरममि न्नार -! अससालतू - खैरून मिन्नर..🌹🌷
अर्थात:- नमाज ( प्रार्थना - सलात ) झोपेपेक्षा उत्तम आहेत.. नमाज ( प्रार्थना - सलात ) झोपेपेक्षा उत्तम आहेत...!!🌹🌷..
हाच अजानचा मंजुळ ध्वनी आपल्याला आपल्या कानामध्ये वारंवार दिवसातून पाच वेळा एकला जातोय.. हा अल्लाह ईश्वराचा ध्वनी आहेत....
ह्या पाच वेळा जगात मध्ये नेगेटिव्ह एनर्जी च्या च असतात म्हणून हा ईश्वर (अल्लाह ) चा ध्वनी मोठं मोठयानं मंजुळ स्वरात म्हणून आपल्या नेगेटिव्ह एनर्जीला पॉसिटीव्ह एनर्जी मध्ये रूपांतरित केलं जातंय, ते पण फुकटात....
हाच ध्वनी जगात कुठेही दुष्काळी परिस्थिती, आणीबाणी, संकट, महापुरे आली तर जागोजागी, घरोघरी, गल्ली ठीक ठिकाणी एकवलं जातोय.. त्या भयाण परिस्थिती महापुरा चे संकट टाळण्यासाठी...
म्हणून नकारात्मक एनर्जी ला घालवण्यासाठी सकारात्मक अजान किती फायच्या चे राहील...

=================================
-----------------------------------------------
लेखक डॉक्टर :- सलीम साईदा सिकंदर शेख.
बैतुशशिफा हॉस्पिटल, मिल्लत नगर.
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर 
🌷🌹9271640014..🌷🌹
-----------------------------------------------
================================