Friday, September 19, 2025
इनफॅश्रॅक्चर नोंदणी कृत मक्तेदारी करणारे ठेकेदार विरोध मागील अहिल्या नगर गिल्ह्यात काम काज संदर्भ अनेक एजंस्या काळ्या यादीत जाणार
पुढील राजप्रसारित ब्लॉग मध्ये सविस्तसर खुलासे वार लेख वाचा संपादक.
श्रीरामपूरच्या बुद्धिबळ स्पर्धेत २०० पेक्षा जास्त स्पर्धकांचा सहभाग
तन्मय सर चेस अकॅडेमी व श्रीरामपूर तालुका बुद्धिबळ संघटनेचा स्तुत्य उपक्रम
- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
तन्मय सर चेस अकॅडमी व श्रीरामपूर तालुका बुद्धिबळ संघटनेच्या संयुक्त विद्यामाने खुल्या बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच पार पडल्या, स्पर्धेत मोठा प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे हे पहिले वर्ष आहे. डी.डी. काचोळे शाळेचे मुख्याध्यापक सुनील साळवे यांच्या हस्ते व माजी उपसरपंच बाबासाहेब ढोकचौळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच श्रीरामपूर तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष भरत कुंकुलोळ, नगरसेवक दीपक चरण चव्हाण, माजी केंद्रप्रमुख किशोर निळे, केंद्रप्रमुख चंदा निळे , पीएसआय रंजन शिंदे , आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजूनाना गायकवाड , अहमदनगर येथील उद्योजक विनित छाजेड, उद्योजक प्रितेश कुंकुलोळ ,श्रीमती रुपल तन्मय निळे, मुख्यपंच गुरुजीतसिंग व आयोजक तन्मय किशोर निळे यांच्या उपस्थिती स्पर्धेचे उद्घाटन पार पडले.
खुल्या गटात प्रथम क्रमांक निशान शिंदे , द्वितीय क्रमांक नितीन सोळके, तृतीय क्रमांक वैभव लोखंडे यांना देण्यात आला.
१५ वर्षाखालील प्रथम क्रमांक राजवीर महाले , द्वितीय क्रमांक वरद कदम , तृतीय क्रमांक साईराज जाधव ,
१२ वर्षाखालील प्रथम क्रमांक राजवर्धन पवार, द्वितीय क्रमांक आरव सोमन, तृतीय क्रमांक संतोष स्तवन.
१० वर्षाखालील प्रथम क्रमांक आद्विक शिरसागर , द्वितीय क्रमांक अनय जोशी तृतीय क्रमांक अनवित ओहोळ,
८ वर्षाखाली प्रज्ञेश सोले, द्वितीय क्रमांक श्रेया शेळके, तृतीय क्रमांक श्रेयांक सुमित त्रिभुवन यास मिळाले.
या प्रसंगी आमदार हेमंत ओगले म्हणाले की, बुद्धिबळ हा साहसी खेळ असून खेळाडूंची बुद्धिमत्ता व निर्णय क्षमता याची खरी कसोटी पाहणारा हा खेळ केवळ भारतातच नव्हे तर आज जगभरात लोकप्रिय झाला आहे. आशियाई खेळापासून ते ऑलिंपिक पर्यंत या खेळाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले वेगळे स्थाने निर्माण केले आहे. आज या स्पर्धेच्या निमित्ताने श्रीरामपूरमधील उद्योन्मुख खेळाडूंना एक चांगले व्यासपीठ तन्मय किशोर निळे सरांनी निर्माण करून दिले याचा फायदा निश्चितच या खेळाडूंना होणार असून आगामी काळात आपल्या मातीतले तरुण या खेळाच्या माध्यमातून आपल्या बुद्धीकौशल्याच्या बळावर आपल्या तालुक्याचे नाव सात समुद्रापार नेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच स्पर्धेत यशस्वी झालेल्या विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
तसेच उत्कृष्ट तालुका श्रीरामपूर- प्रथम क्रमांक प्रेम गिरणारे, द्वितीय क्रमांक धनश्री पाटील, तृतीय क्रमांक आदिती जाधव.
कोपरगाव तालुका - प्रथम क्रमांक वरद साळवे, द्वितीय क्रमांक चैतन्य बनसाळी, तृतीय क्रमांक आराध्या मेंढे.
राहाता तालुका- प्रथम क्रमांक यशराज पवार, द्वितीय क्रमांक हर्षा पिपाडा.
संगमनेर तालुका - प्रथम क्रमांक नील गायकवाड, द्वितीय क्रमांक अर्थव पवार , तृतीय क्रमांक आद्वियत हासे. वैजापूर तालुका- प्रथम क्रमांक राजवीर भांड,
तसेच ज्येष्ठ नागरीकांमध्ये प्रथम क्रमांक भगवान पाटील, द्वितीय क्रमांक राजेंद्र बोरुडे यास मिळाले.
तसेच दिव्यांगमध्ये प्रथम क्रमांक अनिल साबळे यास मिळाले तसे खुल्या गटात उत्कृष्ट तालुका श्रीरामपूर तालुका प्रथम क्रमांक अरुण बोरुडे ,द्वितीय क्रमांक शरद कुर्हे.
कोपरगाव तालुका प्रथम क्रमांक दादासाहेब सदाफळ , द्वितीय क्रमांक सागर गांधी,राहता तालुका पियुष शिंदे, द्वितीय क्रमांक सुदर्शन रोकडे. नेवासा तालुका प्रथम क्रमांक रोहित शेंडगे, द्वितीय क्रमांक किरण सरोदे.
वैजापूर तालुका प्रथम क्रमांक सार्थक चैन्ये, द्वितीय क्रमांक ज्ञानेश्वर दागहाळे. राहुरी तालुका प्रथम क्रमांक सुसमित बागुल, संगमनेर तालुका आशुतोष गायकवाड यांना मिळाले. तसेच उत्कृष्ट अकॅडमीचे प्रथम क्रमांक कोपरगाव चेस क्लब ,द्वितीय क्रमांक तन्मय चेस अकॅडमी , तृतीय क्रमांक अविनाश चेस अकॅडमी, व चतुर्थ क्रमांक जिनियस चेस अकॅडमीला देण्यात आले. स्पर्धेत एकूण १२५ बक्षीसे ठेवण्यात आली होती व २०० पेक्षा जास्त स्पर्धाकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
बक्षीस वितरण आमदार हेमंत ओगले,काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस करण ससाणे ,सरपंच प्रेमचंद कुंकुलोळ, चांगदेव ढोकचोळे, भरत कुंकुलोळ , बाबा दिघे , सुभाष गायकवाड, माजी केंद्रप्रमुख किशोर निळे, माजी नगरसेवक दीपक चरण चव्हाण, विनित भरत कुकलोळ, आदी मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम पार पाडला.
स्पर्धेसाठी तन्मय किशोर निळे, शुभम गोळेसर, प्रसाद हजारे , सुहास धनेधर, सुमित अग्रवाल, नितीन सोळंके, सागर गांधी ,किरण सरोदे, सागर खैरनार ,अरुण बोरुडे , संदीप कदम , आशुतोष गायकवाड, शाकीर शेख, बाबासाहेब भोसले, तुलसीदास हतागळे, संदीप गिरनारे, सचिन फाजगे , कल्याणी निळे आदित्य सहकार्य लाभले. कार्यक्रमात स्वागत विनीत कुंकूलोळ यांनी केले तर आभार गुरुजीत सिंग गुड्डू यांनी मानले.
(=)=()=()=()=()=()=()=()=()=()=()=()=()=()=()
श्रीरामपूर- तन्मय सर चेस अकॅडमी व श्रीरामपूर तालुका बुद्धिबळ संघटनेच्या संयुक्त विद्यामानाने खुल्या बुद्धिबळ स्पर्धाचे बक्षीस वितरण प्रसंगी आमदार हेमंत ओगले, काँग्रेस पक्षाचे
महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस करण ससाणे ,सरपंच प्रेमचंद कुंकुलोळ, चांगदेव ढोकचोळे, भरत कुंकुलोळ , बाबा दिघे ,सुभाष गायकवाड, माजी केंद्रप्रमुख किशोर निळे, तन्मय किशोर निळे , माजी नगरसेवक दिपक चरण चव्हाण आदी.
(=)=()=()=()=()=()=()=()=()=()=()=()=()=()=()
==================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
Thursday, September 18, 2025
आशापुरा माता देवस्थानस्थळी २६ वर्षांपासून सुरू असलेले अन्नछत्र : ठक्कर परिवाराचा अभिमान
- कच्छभुज - प्रतिनिधी -/ वार्ता -
गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील भाविक भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या आशापुरा मातास्थळी नवरात्रोत्सवानिमित्त दरवर्षी लाखो भाविक पायी पायी दर्शनासाठी हजेरी लावतात. या भाविक भक्तांसाठी धनलक्ष्मीबेन नानजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या वतीने मागील २६ वर्षांपासून अन्नछत्र सुरू असून, यंदाही या परंपरेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात झाला.
या अन्नछत्राच्या प्रारंभ प्रसंगी लोकसभा खासदार विनोद चावडा, जिल्हाधिकारी महेंद्रभाई पटेल, त्रिकामदासजी महाराज, नामवंत उद्योजक नानजीभाई ठक्कर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे, माळशेज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. चंद्रकांत महाराज डुंबरे, एन.के.टी. ट्रस्ट संस्थेचे सचिव नटवरलाल ठक्कर (ठाणे), अंजार बाजार समितीचे उपाध्यक्ष महेशभाई ठक्कर, भरतभाई ठक्कर, प्रभुभाई ठक्कर, मनोहरसिंह जाडीयाबचाव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी नानजीभाई ठक्कर यांनी सांगितले की, “आशापुरा माता ही केवळ कच्छ भागातील नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाची आराध्य दैवत आहे. लाखो भक्त पायी प्रवास करत या ठिकाणी येतात. अशा भाविकांसाठी २६ वर्षांपासून आम्ही अन्नछत्राची सेवा करीत आहोत. ही सेवा करताना कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, मात्र या मातीचा आशीर्वाद आणि भक्तांचा प्रेम मिळणे हाच आमचा खरा अभिमान आहे.”
ते पुढे म्हणाले की, “आमच्या परिवाराबरोबरच मित्रपरिवारानेही या सेवेला हातभार लावला असून, हे कार्य पुढेही अखंड सुरू राहील. आज नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या रूपाने हिंदुस्थानाला एक सामाजिक रत्न मिळाले आहे, याचा अभिमान सर्व गुजरातवासीयांना वाटतो.”
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन कच्छ येथील पत्रकार कौशिक छाया यांनी केले. सर्व पत्रकार व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करताना ठक्कर कुटुंबीयांनी विशेषत: धनलक्ष्मीबेन ठक्कर यांचे योगदान अधोरेखित केले.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
गेल्या १५ दिवसांपासून बेपत्ता असलेले पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ फापाळे यांच्या शोधासाठी लिंगदेव ग्रामस्थांचा नवी मुंबईत मोर्चा!
गेल्या पंधरा दिवसांपासून ऑन ड्यूटी असताना बेपत्ता झालेल्या पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ काशिनाथ फापाळे यांच्या शोधासाठी आज नवी मुंबई येथील सीपी ऑफिसवर लिंगदेव ग्रामस्थ व सकल मराठा समाजाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान नवी मुंबईचे पोलीस आयुक्त कांबळे साहेब यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच सोमनाथचा शोध घेतला जाईल, असे आश्वासन पोलीस प्रशासनाने ग्रामस्थांना दिले.
मोर्चामध्ये सुमारे हजार ते बाराशे नागरिक सहभागी झाले होते. या वेळी पोलीस दलात कार्यरत असूनही सोमनाथ गेल्या १५ दिवसांपासून बेपत्ता आहेत, याकडे दुर्लक्ष होत असल्याचा सणसणीत आरोप नातेवाईकांनी केला. पोलीसांकडे अनेक धागेदोरे उपलब्ध असूनही शोध लावण्यात विलंब का होत आहे, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला.
सोमनाथ फापाळे यांचे आई-वडील, पत्नी वैशालीताई, चुलते तसेच नातेवाईकांनी संतप्त स्वरात सांगितले की –
> "चार दिवसांत सोमनाथचा शोध लागला नाही, तर आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही."
यामुळे ग्रामस्थांचा आक्रोश अधिकच तीव्र झाला. ‘जर पोलीस दलातील जवान सुरक्षित नसतील, तर सामान्य जनतेचे रक्षण कोण करणार?’ असा सवाल यावेळी संतप्त मराठा समाजाने केला.
मोर्चामध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रभाकर फापाळे, लिंगेश्वर देवस्थानचे अध्यक्ष डी. बी. फापाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाऊसाहेब हाडवळे, संदीप शेणकर, हरिभाऊ फापाळे, मराठी क्रांती मोर्चाचे नवी मुंबई नेते विनोद पोखरकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मारुती खुटवड, युवक नेते जीवन पाडेकर, रामनाथ दवंगे, नितीन भांगरे, गोरख मिंडे, युवक नेते सौरभ पानसरे, लिंगदेव सरपंच अमोल फापाळे, अमित घोमल, अरुण फापाळे, जानकीराम हाडवळे, ऋषी कानवडे, शिवसेना युवा नेते पोपट नाईकवाडी, अशोक फापाळे, जालिंदर कानवडे, लहानु फापाळे, खंडू काळभोर, यमाजी कानवडे, राजेंद्र फापाळे, अशोक कानवडे, चित्रा काळभोर, सुदाम हांडे, बाळासाहेब कानवडे, सोमनाथ कानवडे, सोमनाथ हांडे, रोहिदास कानवडे यांसह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
कुटुंबीय व ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला की –
> "जर आमच्या मुलाला सापडून दिले नाही, तर आम्ही राज्य सरकारकडे थेट जाऊ. दोषींना सोडले जाणार नाही. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलीसांचे ब्रीदवाक्य असताना पोलीसच जर पोलीसांचे संरक्षण करीत नसतील, तर सर्वसामान्यांचे रक्षण कसे होणार?"
या मोर्चामुळे पोलीस दलासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून सोमनाथ फापाळे यांचा शोध लावण्यासाठी आता प्रशासनावर जबरदस्त दबाव निर्माण झाला आहे.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
आहो कोणी तरी ग्राम महसुल**(तलाठी) अधिकाऱ्यांना कळवा !!**म्हणावा किमान मुरुमाचा तरी**एखाद्या ढंपर इकडेही वळवा !!*
- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र चिखलमय परिसर झाल्याचे दृष्टीपथास येत आहे,त्यात एखाद्या शासकीय कार्यालयासमोर जर अशी परिस्थिती निर्माण झाल्यास कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या - जाणाऱ्या नागरीकांना किती त्रास सहन करणे भाग पडू शकते याचे ताजे उदाहरण जर कोणास बघावयाचे असल्यास त्यांनी श्रीरामपूर येथील कर्मवीर चौक याठिकाणी असलेले ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) कार्यालयात समक्ष येवून बघावे.
याठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या - जाणाऱ्यांना चिखलालुनच आपला मार्ग क्रमण करावा लागत आहे,
यामध्ये महिला,वयोवृद्ध ते शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी तथा समस्त नागरीक नेहमीच आपल्या कामानिमित्त याठिकाणी येतात आणी चिखल तुडवत ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) कार्यालय अक्षरशः जीव मुठीत घेवून कसे बसे गाठवतात, कित्येक पादचारी आणी दुचाकी स्वार तर नेहमीच या चिखलात घसरुन पडत असल्याचे देखील अनंत उदाहरणे आहेत.
या कार्यालयाचे आणखी एक विशेष महत्त्व असेही आहे ते असे की, या ठिकाणी वाहने देखील चिखरातच पार्क करावी लागते हे विशेष.
या कार्यालया इतकी इतर कोणत्याही शासकीय कार्यालयास प्रशस्त जागा नाही,परंतु प्रचंड चिखलाच्या साम्रज्यात आडकलेल्या या कार्यालयाची कधी चिखली दुर होवून नागरीकांचा त्रास देखील नाहीसा होईल ? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे.
महसुल खात्याकडून एरव्ही बहूदा किती तरी वेळा अवैध मुरुम वाहतूक करणारी वाहने पकडली जातात, त्यातील मुरुम (गौण खणीज) जप्तही केले जाते, मग नेमके त्याचे पुढे काय होते ? हे जरी आजवर कुणास कळले नसावे परंतु त्यातील एखादा तरी मुरुमाचा ढंपर याठिकाणी उतरविल्यास सध्याची ही परिस्थिती कायमची बदलु शकते परंतु त्यासाठी तशी मानसिकता देखील हवी असल्याचे नागरीकांतुन बोलले जात आहे. करीता
*"आहो कोणी तरी ग्राम महसुल (तलाठी) अधिकाऱ्यांना कळवा,* *म्हणावा किमान मुरुमाचा तरी*
*एखाद्या ढंपर इकडेही वळवा"*
असे म्हणणे तरी कुठे वावगे ठरु शकणार ?.
कु.वैष्णवी वाघ हिने (NSQF) मध्ये तृतीय क्रमांक पटकविल्याबद्दल जाहीर सत्कार !
- अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
शिर्डी येथील श्रीसाईबाबा संस्थान औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची विद्यार्थीनी कु. वैष्णवी राजेंद्र वाघ या विद्यार्थिनी ने इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनेस(NSQF) यामध्ये ८०.४६ टक्के गुण मिळून तृतीय क्रमांक पटकावला त्याबद्दल श्री साई बाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी चे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर साहेब यांचे हस्ते तीचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी श्रीसाईबाबा संस्थान औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिर्डी चे प्राचार्य. दुनाके सर,मार्गदर्शक पाटील सर, जांभुळकर सर, परदेशी सर तसेच अनेक शिक्षक वर्ग कर्मचारी वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कु.वैष्णवी हीस प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य.दुनाके सर, पाटील सर, जांभुळकर सर, परदेशी सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तीच्या या यशाबद्दल विविध स्तरातून शुभेच्छा आणी अभिनंदन केले जात आहे
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳
ज्येष्ठ पत्रकार भगवान थोरात - शिर्डी
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
,समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यास सिनेट व विद्यापीठ बांधिल आहे- विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ .रमेश गायकवाड
- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यास सिनेट व विद्यापीठ बांधील आहे असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आधी सभा सदस्य रमेश गायकवाड यांनी केले. बुधवार दि.१७ सप्टेंबर २०२५ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील अधिसभा सदस्य डॉ.रमेश गायकवाड व तसेच अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.बिबवे, न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर चे श्री. मगर यांनी तालुक्यातील बेलापूर येथील महाविद्यालयात भेट दिली याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे असेही म्हणाले की, सिनेटमध्ये विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी, अभ्यासक्रम व अभ्यास मंडळे यांच्या प्रश्नांची दखल घेऊन प्रश्न सोडविले जातात. त्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरु, परीक्षा विभाग व सर्व प्रशासनाची मदत होते असेही ते म्हणाले.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी नवीन शैक्षणिक धोरण व अंमलबजावणी यावर भाष्य केले. प्राध्यापक भरती झाली तर नवीन शैक्षणिक धोरणातील बरेच प्रश्न सुटतील असेही त्या म्हणाल्या.
डॉ. कोकाटे यांनी डॉ. गायकवाड यांचा सत्कार. केला तसेच अभ्यास मंडळाचे डॉ. बिबवे यांचा सत्कार डॉ. विनायक काळे यांनी केला तर डॉ. शरद मगर यांचा सत्कार प्रा. प्रकाश देशपांडे सर यांनी केला.
या भेटीदरम्यान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. बाबासाहेब पवार डॉ. संजय नवाळे , प्रा. गायकवाड व्ही. एम. व डॉ. सदाफुले व्ही. बी. उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाबासाहेब पवार यांनी केले तर आभार प्रा. देशपांडे सर यांनी मानले.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग* ✍️✅🇮🇳
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर -
9561174111
-----------------------------------------------
=================================
Subscribe to:
Comments (Atom)