राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, November 26, 2025

शिर्डी नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने विविध प्रभागांमध्ये जाऊन मतदारांच्या भेटी पालकमंत्री राधाकृष्ण विखे


शिर्डी नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने विविध प्रभागांमध्ये जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. याच अनुषंगाने मुस्लिम बांधवांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांच्या अपेक्षा, सूचना आणि स्थानिक पातळीवरील काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा आढावा घेतला.

शिर्डी शहराचा विकास हा सर्व समाजघटकांच्या सहभागानेच शक्य आहे. त्यामुळे प्रत्येक समाज, प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक नागरिकाला बरोबर घेऊन पुढे जाण्याचा आमचा ठाम मानस आहे.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================


Tuesday, November 25, 2025

विखेंचा नवा मास्टरस्ट्रोक ! बँकेत घुलेंना अध्यक्ष करून समीकरणं पालटले


- अहिल्यानगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या रिक्त झालेल्या चेअरमन पदासाठी आज सोमवारी (दि.24) घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत माजी आमदार आ. चंद्रशेखर घुले पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. सकाळी ११ वाजता जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची अधिकृत बैठक पार पडली.

यापूर्वी सकाळी ९ वाजता नगरमधील राज पॅलेस येथे संचालकांची अनौपचारिक चहापान बैठक झाल्याचे समजते. या बैठकीत अध्यक्षपदासाठी घुले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले, त् अधिकृत बैठकीत त्यांची निवड बिनविरोध पार पडली.

या निवडीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पडद्यामागील भूमिका निर्णायक ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. घुले हे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचे सासरे असल्याने, काळे-विखे यांच्यातील सध्याचे राजकीय समन्वयदेखील या निवडीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा घटक ठरल्याचे मानले जात आहे.

चेअरमन निवडीसाठी मतदानाधिकार असलेल्या संचालकांमध्ये मोनिका राजळे,, आण्णासाहेब म्हस्के, अंबादास पिसाळ, अमोल राळेभात, आशा तापकीर, भानुदास 

मुरकुटे, सीताराम गायकर, अरुण तनपुरे, चंद्रशेखर घुले, राहुल जगताप, आशुतोष काळे, प्रशांत गायकवाड, अनुराधा नागवडे, अमित भांगरे, गीतांजली शेळके, माधवराव कानवडे, करण ससाणे, गणपतराव सांगळे व शंकरराव गडाख या सदस्यांचा समावेश आहे.

निवड प्रक्रियेपूर्वी अनेक संचालकांनी पुढील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने विखे पाटील यांना सहकार्य राखणे आवश्यक असल्याने, घुले यांच्या समर्थनाचा कल स्पष्ट दिसत होता.

बिनविरोध निवड झाल्यानंतर आ. चंद्रशेखर घुले पाटील यांनी विश्वास व्यक्त केल्याबद्दल संचालक मंडळाचे आभार मानले, तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================




Monday, November 24, 2025

शिर्डी नगरपरिषद निवडणुकीच्या तयारीबाबत बैठक संपन्न !

शिर्डी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सर्वांशी संवाद साधला. शिर्डी शहराच्या विकास प्रक्रियेला आणखी गती देण्यासाठी आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा नागरिकांनी पाठबळ द्यावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

महायुती सरकारच्या माध्यमातून शिर्डी शहरातील प्रलंबित विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही देत, सर्व कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------


राहुरी नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या उमेदवारांची नावे जाहीर करून सर्व उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्य मंत्री,ा राधाकृष्ण विखे पाटील

-राहुरी - प्रतिनिधी -/ वार्ता -
राहुरी नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या उमेदवारांची नावे जाहीर करून सर्व उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आगामी निवडणुकीत मजबूत संघटनेच्या बळावर, विकासाभिमुख दृष्टिकोनावर आणि नागरिकांच्या विश्वासावर महायुती चांगली कामगिरी करेल, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त केला.

तसेच, पक्ष संघटनेची एकजूट आणि विजयाच्या उद्दिष्टाला प्राधान्य देत निवडणुकीत माघार घेऊन सहकार्य केलेल्या सर्व उमेदवारांचे मनापासून आभार मानले. त्यांच्या या निर्णयामुळे महायुतीचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला असून, आगामी काळात राहुरी शहराच्या विकासासाठी सर्व घटक एकत्र येऊन काम करू, अशी भावना व्यक्त केली.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Friday, November 21, 2025

जल व्यवस्थापनात महाराष्ट्र पुन्हा देशात नंबर १!


- मुंबई - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्राने मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जलव्यवस्थापन क्षेत्रात पुन्हा एकदा देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या ६व्या राष्ट्रीय जल पुरस्कारात राज्य श्रेणीत महाराष्ट्राला बहाल झालेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार महामहीम राष्ट्रपती मा. द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्विकारण्यात आला. यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री मा.श्री. सी. आर. पाटील तसेच जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री. दिपक कपूर उपस्थित होते.

मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यातील जलसंपदा विभागाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने घेतली आहे. राज्यात जलसंवर्धन, धरण सुरक्षा, सिंचन प्रकल्प आणि पाणी पुनर्वापर यांसारख्या महत्वाच्या उपक्रमांना मोठी गती मिळाली आहे.

आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या 'जलसमृद्ध भारत' या संकल्पनेला महाराष्ट्राने प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरवले आहे. या यशाचे श्रेय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रभावी नेतृत्वाला आणि महायुती सरकारच्या सामूहिक प्रयत्नांना जाते. हा पुरस्कार दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेला मिळालेला बळकटीकारक टप्पा आहे.

धन्यवाद, महायुती सरकार !

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

टिपू सुलतान फाऊंडेशन तर्फे नंदुरबार शहरात ह.टिपू सुल्तान जयंती साजरी


- नंदुरबार -  प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील शहिद टिपू सुलतान फाऊंडेशन तर्फे नंदुरबार शहरात हजरत शहिद टिपू सुल्तान यांची २७५ वी जयंती विविध सामाजाभिमुख उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

येथील पंच मंडळ पीर महंमद नाथानी वाचनालय याठिकाणी शहिद टिपू सुलतान फाऊंडेशन च्यावतीने थोर स्वतंत्र सेनानी, महायोद्धा,शेर ए म्हैसूर ह.फतेहअली उर्फ हजरत शहीद टिपू सुलतान यांच्या २७५ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहीद टिपू सुलतान फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाजभाई बागवान हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून धर्मगुरु हाफीज आबीद बागवान, प्रा.फारुख खाटीक, सामाजिक कार्यकर्ते बाबु ठेकेदार, रहेमान मोमीन, सत्यनारायण शर्मा, हिरालाल चौधरी, रामकृष्ण मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ह. शहीद टिपू सुलतान यांच्या तैलचित्राला अभिवादनाने करण्यात आली. यावेळी मदरसा मधील सर्व विद्यार्थ्यांनी पवित्र कुराण पठण करुन ह.शहीद टिपू सुलतान यांच्यासाठी फातेहा खॉनी करुन दुआ केली. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊंचे वाटप करण्यात आले तसेच पंच मंडळ पीर महंमद नाथानी वाचनालयास ह.शहीद टिपू सुलतान यांच्या कार्याविषयी माहिती असलेली माहिती पुस्तिका वाचण्यासाठी देण्यात आली.
यावेळी धर्मगुरु हाफीज आबीद बागवान म्हणाले की, फतेहअली उर्फ ह.शहीद टिपू सुलतान यांनी १५६ मंदिरांना जमीन व सोने - चांदी दान दिले होते. १० हजार सोन्यांची नाणी मंदिराला दान दिले होते. अशा दानशूर व्यक्तीमत्व असलेल्या ह.टिपु सुलतान यांच्या कार्याचा आदर्श घेत त्यांच्या सामाजहितैशी मार्गावर सर्वांनी चालले पाहीजे. 
सर्व थोर महापुरुषांची आठवण ठेवून सर्वांनी त्यांच्या कार्यांचा आदर्श घेतला पाहिजे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रंथपाल फिरोज काजी यांनी केले. तर आभार सद्दाम मोमीन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लाला बागवान, असलम कुरेशी, सलीम बागवान, आरीफ मोमीन, जाकीर शाह आदींनी विशेष परिश्रम घेतले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳
हाजी एजाजभाई बागवान - नंदुरबार 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

राष्ट्रीय जल पुरस्कार मा. देवेंद्रजींच्या कार्याला समर्पित !


- मुंबई - प्रतिनिधी -/ वार्ता -
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचा राष्ट्रीय जल पुरस्कार महामहीम राष्ट्रपती मा. द्रौपदी मुर्मू जी यांच्या हस्ते स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली आणि हा सन्मान त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला समर्पित केला.



मा. देवेंद्रजींची दूरदृष्टी, कर्तव्यनिष्ठा आणि परिणामकारक निर्णयक्षमतेमुळे २०२४ साली जलसंपदा विभागात मोठे बदल झाल्यामुळे मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्राने जलव्यवस्थापन क्षेत्रात देशात अव्वल स्थानी झेप घेतली.

जलसंपदामंत्री या नात्याने प्रत्यक्षात हा पुरस्कार जरी माझ्या हातात असला तरी त्याचे खरे मानकरी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीसच आहेत. पुढेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदा विभाग अधिक वेगाने आणि अधिक जबाबदारीने काम करेल, महाराष्ट्र जलव्यवस्थापनात कायम अव्वल राहील, याची मला पूर्ण खात्री आहे.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================