राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, February 24, 2023

लुटारूंनी पिस्तुलातून गोळ्या घालून एका व्यक्तीला ठार मारले ?

(अहमदनगर) - विशेष - वार्ता - केडगाव बायपास येथील हाॅटेल के 9 समोरील एका बंद ढाब्याजवळ एका ४० वर्षीय व्यक्तीची डोक्यात गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री घडली आहे. शिवाजी किसन ऊर्फ देवा होले (रा. कल्याण रोड, नगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अरुण नाथा शिंदे (वय -४५) यांनी फिर्याद दिली असून फिर्यादीत म्हंटले आहे की, दि.२३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास केडगाव शिवारातील केडगाव बायपास रोडवर हॉटेल के ९ जवळ एक बंद ढाब्याजवळ मी व शिवाजी होले असे अंधारात दारु पित बसलेलो असताना केडगाव बायपास रोडकडुन दोन अनोळखी इसम हे आमच्या जवळ पायी चालत आले व आम्हाला म्हणाले की, आम्ही येथे दारु पिवु का? त्यानंतर आम्ही त्यांना म्हणालो आम्ही नेप्तीचे आहोत तुम्ही बिनधास्त बसुन दारु प्या.
त्यानंतर ते दोघे आम्हाला काही एक न बोलता केडगाव बायपास रस्त्याकडे जावुन पुन्हा त्याच रस्त्याच्या बाजुने त्या दोन अनोळखी इसमांसोबात आणखी एक इसम आला. त्यातील एका इसमाच्या हातात चाकु व दुसऱ्या इसमाच्या हातात पिस्तूल होती. त्यातील एका इसमाने
माझ्या गळयाला चाकु लावुन तुमचे खिशातील पैसे काढा असे म्हणाला. त्याचवेळी माझ्या सोबत असलेला शिवाजी होले हा त्यांना म्हणाला की, तुम्ही आम्हाला नडता का असे म्हणुन तो रस्त्याकडे पळला. त्यानंतर त्या तिघांपैकी एकाने त्यांच्या हातात असलेले पिस्तूलने
शिवाजी होले याचे दिशेने गोळी फायर केली. यात शिवाजी होले यांचा मृत्यू झाला. तसेच मला खाली पाडुन मानेला चाकु लावुन बळजबरीने तीन हजार रुपये रोख रक्कम, मोबाईल काढून डोळयात मिर्ची पावडर फेकुन ते अनोळखी तीन इसम केडगाव बायपास रस्त्याचे दिशेने पळुन गे
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास यंत्रणा तात्काळ शोध करत आहे.

























व्यापाऱ्यास 27 लाख घेऊन जातांना लुटले दौलताबाद पोलिस ठाण्यात( FIR ) घटनेची फिर्याद नोंद ?

( औरंगाबाद ) - प्रतिनिधि - वार्ता - समाचार - प्रतिनिधी लासूर स्टेशन येथील कापसाच्या व्यापाऱ्यास हवालाचे २७ लाख ५० हजार रुपये घेऊन जात असताना करोडी शिवारातील टोलनाक्याजवळ धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लुटल्याची घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजता घडली. याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
साईनाथ मनोहर तायडे (रा. लासूर स्टेशन) असे लुटलेल्या कापसाच्या व्यापाऱ्याचे नाव आहे. दौलताबाद पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद सलगरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनाथ तायडे हे औरंगाबाद शहरातून चालक ज्ञानेश्वर भुसारे ( रा. देवळी, ता. गंगापूर) सह लासूर स्टेशनकडे चारचाकी (एमएच २० सीएस ३९१५) वाहनातून रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास जात
होते. करोड शिवारातील
टोलनाक्याच्या अगोदर असलेल्या उड्डाणपुलावरून लासूर स्टेशनकडे जाण्यासाठी कार वळवली असता समोरून अचानक दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने दुचाकी कारसमोर उभी करून अडवली.
तायडे यांना आपल्या वाहनाकडून दुचाकीस्वारांना काही कट बसला की काय, असे वाटले म्हणून त्यांनी दुचाकीस्वारांची माफी मागितली. तोपर्यंत पाठीमागून आलेल्या दुसऱ्या
चोरट्याने तायडे यांच्या कारची समोरील काच लाकडी दांड्याने फोडून टाकली. तसेच हातावर दांड्याने मारहाण करीत गाडीत असलेली बॅग काढून द्या, असे धमकावले. घाबरलेल्या तायडे यांनी गाडीतील ररक्कम असलेली २७ लाख ५० हजार रुपयांची बॅग चोरट्याच्या हातात दिली. तेव्हा ही बॅग घेऊन चोरटे उड्डाणपुलाच्या खालून पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची धाव

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त दीपक गिन्हे, वाळूज एमआयडीसीचे निरीक्षक तथा प्रभारी सहायक आयुक्त संदीप गुरमे, दौलताबादचे निरीक्षक विनोद सलगरकर, सहायक निरीक्षक संजय गीते, उपनिरीक्षक सचिन वायाळ, चेतन ओगले यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली
हवालाचे पैसे असल्याचा दावा

कापसाचे व्यापारी तायडे यांनी शहरातील गोमटेश मार्केट परिसरातून हवालाचे २७ लाख ५० हजार रुपये घेऊन जात असल्याची चर्चा घटनास्थळी सुरु होती. त्यामुळे हे पैसे कोणाला देण्यासाठी घेऊन जात होते याविषयीची माहिती पोलिस चौकशीत समोर येणार अ सल्याचे समजते आहे.



















































Wednesday, February 22, 2023

वळदगाव सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने शिव जयंती मोठ्या दिमाखात साजरी श्रीरामपूर (इम्रान शेख प्रतिनिधी) येथील वळदगाव गावात ???

श्रीरामपूर (इम्रान शेख प्रतिनिधी) येथील वळदगाव गावात दरवर्षीप्रमाणे यंदा मोठ्या उत्साहात व  प्रथमच महिलाची प्रामुख्याने उपस्थिती असल्याने फटाकेची आतिशबाजी करून शिव जयंती मोठ्या उत्साह ने साजरी करण्यात आली.
 सर्व ग्रामस्थांनी एकोप्याने सकाळी शिवपूजन व आरती तसेच वळदगाव ते श्रीरामपूर मोटरसायकलची भव्य रॅली आयोजित करण्यात आली होती. दुपारच्या वेळी हरीष भोसले यांनी सर्व ग्रामस्थांना स्नेहभोजनाची व्यवस्था केली होती. 
सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर सर्व महिला मिरवणुकीस सहभागी झाल्या होत्या. सर्व उपस्थित ग्रामस्थांना फेटे बांधून, जय भवानी जय शिवाजी घोषणा देत परिसर दणदणून गेला होता. 
याप्रसंगी अशोक कारखान्याचे संचालक हिम्मतराव धुमाळ, संचालिका मंजुश्रीताई मुरकुटे, माजी सरपंच प्रमोद भोसले, पोलीस पाटील शिवाजीराजे भोसले, सोसायटीचे चेअरमन रामराव शेटे, सरपंच अशोक नाना भोसले, उपसरपंच प्रकाश भोसले, गणेश कारखान्याचे सेक्रेटरी नितीन दादा भोसले, मार्केट कमिटी माजी संचालक अरुण खंडागळे, ऋतू दादा धुमाळ, ॲड. मधुकर भोसले, ॲड बाळासाहेब भोसले, किरण नाना गायधने ,सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील भाऊ गोटे, संतोष साळवे, सोमनाथ शिंदे, ज्ञानेश्वर माऊली भोसले, अमोल भोसले, अजय भोसले, संजू आप्पा भोसले, रमेश निकम, दत्तू भुईगड, मधुकर म्हस्के, दत्तात्रय तांबे, रावसाहेब पा. भोसले, संदीप लोखंडे, नईम शेख, आयुब भाई शेख, नसीर शेख, विकास भैया गाडेकर, अजय भोसले, संजय भोसले, सचिन भोसले, सुनील भोसले, रामा भोसले, गुलाब भोसले, भरत भोसले, बाबासाहेब गोपाळे, डॉ. बाबासाहेब शिंदे, जालिंदर गायधने, विजू काका भोसले, प्रवीण भोसले, रवी तात्या भोसले, मंगेश भोसले, सुनील गायधने, प्रवीण गोपाळे, संदीप गाडेकर, लक्ष्मण भोसले, विजू काका भोसले, सतीश भोसले, ज्ञानेश्वर बाबासाहेब भोसले, आदित्य लहारे सुनील साळवे, बाळासाहेब कोबरणे, बिस्मिल्ला शेख, बाबू मामा गाडेकर ,गणेश बर्डे, संदीप साळवे, अशोक जाधव, गौतम खरात, इतर अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने  उपस्थित होते.
सह्याद्री फाउंडेशनचे सर्व मित्र मंडळाने तरुण कार्यकर्ते यांनी शिवजयंती निमित्त विशेष परिश्रम घेतले सर्वांनी देणगी स्वरूपात अनमोल मदत केली.



खंडाळा येथे दोन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कारकरणाऱ्याविरोधात समाजवादी पार्टीकडून फास्ट ट्रॅककोर्टात खटला चालविण्याची मागणी ?

(श्रीरामपूर) खंडाळा येथे दोन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार निचकृति करणाऱ्याविरोधात समाजवादी पार्टीकडून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्याची मागणी
श्रीरामपूर (इम्रान शेख प्रतिनिधी) येथील खंडाळा गावातील एका दोन वर्षाच्या चिमुकलीवर ६५ वर्षाच्या भास्कर मोरेने बलात्कार केल्याची घटना नुकतीच उघड आली आहे. या संदर्भात समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांच्या वतीने देण्यात आलेल्या लेखी निवेदनात म्हंटले आहे की,  खंडाळा येथे दोन वर्षाच्या छोट्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्ती विरोधात तत्परतेने फास्ट ट्रैक कोर्टात दाखल होऊन त्या नराधमाला लवकरात लवकर कठोरातील कठोर शिक्षा व्हावी तसेच सदर बाब ही अत्यंत निंदनीय असून मानवाला काळीमा फासणारी असून तीव्र शब्दात निषेध करीत त्याविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. सदरच्या प्रकरणात प्रशासनाने लक्ष घालावे याकरिता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस महासंचालक मुंबई, पोलीस उपमहानिरीक्षक नाशिक
 परिक्षेत्र नाशिक, पोलीस अधीक्षक अहमदनगर,
उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर तहसीलदार तथा दंडाधिकारी, पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर व तालुका पोलीस स्टेशनला यांना निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.
यावेळी तौफिक शेख, आसिफ तांबोळी, कलीम शेख, इम्रान मन्सूरी, संजय वाघ आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.





मुंबई + नाशिक + इंग्लंडच्या + केंटमध्ये + आंतरराष्ट्रीय +फिल्ड + असोसिएशनद्वारे + आयोजित +'जागतिक इनडोअर तिरंदाजी चॅम्पियनशिप २०२३ मध्ये देविशा व तनिष्का पंकज भुजबळ यांनी सुवर्णपदकाची सन्मानित केली. माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या देविशा व तनिष्का कन्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक मिळवल्याबद्दल भुजबळ भगिनींचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे ?

( नाशिक ) - वार्ता - समाचार -
 मुंबई नाशिक इंग्लंडच्या + केंटमध्ये आंतरराष्ट्रीय फिल्ड असोसिएशनद्वारे आयोजित 'जागतिक इनडोअर तिरंदाजी चॅम्पियनशिप २०२३ मध्ये देविशा व तनिष्का पंकज भुजबळ यांनी सुवर्णपदकाची प्रगती यश प्राप्त केले . माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या देविशा व तनिष्का कन्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक मिळवल्याबद्दल भुजबळ भगिनींचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.देविशा व तनिष्का या दोघीही भुजबळ नॉलेज सिटी एमईटी (मुंबई) या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत. इंग्लंडच्या मेडवे पार्क स्पोट्स सेंटर, गिलिंगहॅम, केंट येथे १३ ते १८ फेब्रुवारीमध्ये आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत ३८ देशांतील ५६८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
 भारताचे १२ तिरंदाज विविध वयोगटात

वेगवेगळ्या प्रकारात स्पर्धेत सहभागी झाले होते. देविशाने १९ वर्षांखालील कम्पाऊंड बो गटात सुवर्णपदक आणि तनिष्काने १७ वर्षांखालील कम्पाऊंड बोगटात सुवर्णपदकाचा वेध घेतला. भारतीय संघ स्पर्धेत फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियाच्या बॅनरखाली खेळला होता.
*** स्पर्धेचे उद्घाटन मिडवे केंटच्या ***
महापौर जेन अल्डोस आणि टॉनी अल्डोस तसेच आंतरराष्ट्रीय फील्ड आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष मार्टिन कोइनी, उपाध्यक्ष स्टिफन केंड्रीक, उपाध्यक्ष मेरियेट फ्रायर, सचिव लेन एलिंगवर्थ आणि इंग्लंड फील्ड आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष डेव्ह मुरे यांच्या हस्ते हर्षुव उल्लासात पार पडले.








Tuesday, February 21, 2023

वडगाव पान - झगडे फाटा रस्त्याची झाली दैनं अवस्था दुरुस्त न झाल्यास वाहन चालकांसह, साईभक्तांकडून आंदोलन उपोषण धरणे प्रदर्शने करण्यात न्यात येइल ?

( संगमनेर ) - वार्ता - समाचार -
सर्वाधिक रहदारीचा वडगाव पान फाटा ते झगडे फाटा या मार्गावर ठिक- ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यात रस्ता की, रस्त्यात खड्डा, अशी दुरावस्था झाल्याने वाहन चालकांसह साईभक्त प्रवाशी संतप्त झाले आहेत. रस्ता तत्काळ दुरुस्त न झाल्याने आंदोलन छेडण्याचा इशार देण्यात आला आहे.रस्त्यावरील खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्ता अनेक महिन्यांपासून मंजूर झाला आहे. वर्क ऑर्डर सुद्धा निघाल्याचे सा. बां. च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. गैर प्रकार असल्याने मात्र या रस्त्याचे काम करण्यात नेमकं घोडं अडलं कुठं ? असा संतप्त सवाल वाहन चालकांमधून उपस्थित होत आहे.
कोपरगाव, मनमाड, मालेगाव, धुळे, नंदुरबार या मोठ्या शहरांसह गुजर, मध्यप्रदेश या
राज्यांकडे जाणारा हा महत्त्वपूर्ण मार्ग आहे. वडगाव पान फाटा ते कोपरगाव या मार्गाचा अवजड वाहतूक करणारे वाहन चालक वापर करतात. संगमनेर व कोपरगाव तालुक्याचे शेतकरी शेतमाल संगमनेरला आणण्यासाठी या मार्गाचा वापर करतात, मात्र गेली अनेक वर्षांपासून गैर वेव्हार होत असुन या मार्गाची दुरुस्ती न केल्यामुळे वडगावपान फाट्यापासून निळवंडे गाव हद्दीपर्यंत ठिक-ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. अनेक वर्षांपासून खड्डे ठेकेदार थातुर मातुर काम करून बुजवून वाहन चालकांची बोळवण करीत असल्याचे दिसते.
वडगाव पानफाट्यापासून एक की, मी अंतरापर्यंत डांबरीकरण झालेले आहे. मात्र तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना साठवण तलावापासून निळवंडे गावाच्या सरहद्दीपर्यंत मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच करुले ते तळेगावची भागवतवाडीपर्यंत रस्ता चांगला असून पुढे कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख,
जवळके, पोहेगाव, झगडे फाटा चांदेकासारे ते पुणतांबा फाटा या मार्गावरती ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमधून उंच सखल मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या खड्ड्यांमुळे अनेक वाहन चालकांच्या वाहनांचे पाठे तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तर चारचाकी आणि दुचाकी वाहने अक्षरशः खिळखिळी झाली आहेत. या खड्ड्यांतून मार्ग काढताना अनेक
 या रस्त्याबाबत राजकीय नेत्यांची अनास्था
                 <\\\\\\\\++++++///////////>
वडगावपान फाटा ते झगडे फाटा या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यातून सर्वच गावांचे राजकीय नेते सुद्धा मार्ग काढताना तारेवरची कसरत करीत आहे. मात्र आपले राजकीय वर्चस्व अबाधित राहण्यासाठी या मार्गावर असणाऱ्या कुठल्याच गावातील राजकीय पक्षाचे नेते आवाज उठविण्यास पुढाकार घेत नाहीत. पुढाकार घेतला तर आपल राजकीय भवितव्य धोक्यात येईल, म्हणूनच कोणीही हा रस्ता दुरुस्तीच्या संदर्भात आवाज उठविताना दिसत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे चांगलेच फुलो फलो फावले जात आहे.
दुचाकी स्वरांचे मणके ढिल्ले झाले आहे. तर एखाद्या आजारी व्यक्तीला या मार्गाने दवाखान्यापर्यंत नेईपर्यंत त्याचा आजार आपोआप बरा होतो. नाहीतर त्याला देवा घरी जावे लागते. एवढी दुरावस्था या मार्गाची झालेली आहे.वडगावपान फाटा, निळवंडे, कवठे कमळेश्वर, काकडी विमानतळ मार्गे शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला जाण्यासाठीचा हा जवळचा मार्ग म्हणून पुणे, मुंबई, सातारा, सांगली, सदरील वरिष्टानी गैर कारभार चौकशी करावी 
कोल्हापूरसह कोकणातून येणारे साईभक्त यामार्गाचा वाहतुकीसाठी वापर करत आहे. मात्र निळवंडे शिव- रातील एका पेट्रोलपंपाजवळ पडलेलेखड्डे चुकविण्याच्या नादात वाहनचालकांकडून अनेकवेळा अपघात सुद्धा झालेले आहेत. या अपघातामध्ये अनेकजण मृत्यूमुखी पडले आहेत. आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार आहे. की नाही.असा संतप्त सवाल प्रवासी वर्गामधून उपस्थित होत आहे. तसेज हे सर्व रस्त्याचे कामात अफरा तफरी होत असून शासनाचा निधि बहुतेक अधिकाऱ्यांच्या खिसा भरत आहे. असें संभ्रम निर्माण होते.

























श्रीरामपूर-अहमदनगर या एस टी बस मध्ये तरुणीचा विनयभंग करणाऱ्या तरुणास विषय : तक्रार पोलिसांनी अटक करून केली कारवाई ?

( श्रीरामपूर ) - वार्ता - समाचार - याबाबत अधिक समजल्याली माहिती संदर्भ : असा आहे.श्रीरामपूर बस स्थानक आगारात श्रीरामपूर- अहमदनगर या बसमध्ये फिर्यादी तरुणी देवळाली गावी जाण्यासाठी ड्रायव्हर शीटच्या मागील सिटवर बसली होती. तिच्या मागच्या सीटवर खिडकीजवळ बसलेल्या संदीप सर्जेराव माळी (रा. देवळाली ता. राहुरी) याने पाठीमागून शीटच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेतून हात घालून फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलस ठाण्यात  संदीप सर्जेराव माळी याचेविरुध्द भादंवि कलम 354, 354 (अ), 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झाला होता. सदर गुन्ह्यातील आरोपीस ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यानंतर गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने आरोपीचा शोध घेतला व त्यास अटक केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे करीत आहेत.तसेज आरोपी विरुद्ध फिर्याद दाखल करुन घेतली आहे.