राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, June 28, 2025

श्रीरामपूर येथील वार्ड नंबर दोन मध्ये कुठल्यातरी भागात येथे डीपी फिट करण्याचे कामावर गैरप्रकार

- राजु मिर्जा - श्रीरामपूर -/ वार्ता - 
श्रीरामपूर येथे वार्ड नंबर दोन मध्ये काहीच कारण नसताना लाईटीचा गैरप्रकार होत आहे डीपी बसण्याच्या प्रकारांमध्ये हा प्रकार चालू असून सदरील एम एस ई बी चे कामगारांना माहिती विचारली असताना ते सरळपणे उत्तर देतात की निरनिराळे भागामध्ये काम चालू असून काम पूर्ण होऊन गेल्यास वीज पुरवठा  चालू व सुरळीत करण्यात येईल तसेच नागरिकाकडून असाही अंदाज लावण्यात येत आहे की कार्यकारी अभियंता उप अभियंता व शाखा अभियंता यांच्या सांगण्यावरून एम एस सी बी चा कर्मचारी सुभाष हा लाईट फिरवण्याचे कामात एक्सपर्ट असून यालाही विचारणी केली असताना याच्याकडून असे स्पष्ट सांगण्यात येत आहे की काही टेक्निकल दोष कामांमध्ये झाला असून सुधारण्या कामे आम्ही व्यस्त आहोत ते पूर्ण करण्यात येत आहे तसेच सप्ताह शेवटचा दिवस असून हा पूर्ण कामकाज म्हणजेच वर्क डे असून काही बोलण्याचे नागरिकांना अधिकार ठेवले नसून मुद्दामून त्रास चालवलेला आहे तरी वीज मुख्य केंद्र मुख्य अभियंता प्रादेशिक विभाग नाशिक यांच्या आदेशानुसार दक्षता व गुण नियंत्रण मंडळ चे समिती नेमून सदर चालू असलेले गैरप्रकाराची सखोल चौकशी होऊन संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी दायित्व दोष  आढळतात अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी व यांच्या जागेवर प्रामाणिक होतकरू कामगारांची नेमणूक करण्यात यावी  अशीच अपेक्षा बाळगण्यात येते नागरिकांनी दूरध्वनीद्वारे लाईटी संदर्भ विचारणा केली असताना असे सांगण्यात येते की इथे आम्ही डीपी बसवत आहे त्याचा अनुषंगाने आता लाईट  सकाळ ते संध्याकाळपर्यंत येऊ शकत नाही अशी स्पष्ट प्रश्नाचे उत्तर देतात तरी सकाळपासून  संध्याकाळपर्यंत वीज पुरवठा ठप्प  गैरसोय करून  नागरिक ह्या संदर्भ संताप व्यक्त करत आहे अशाच  गैरप्रकार होत असून लाईट बंद करण्याचे काहीच कारण नसून वीज पुरवठा खंडित करून हा वीज पुरवठा बहुतेक  एमआयडीसी तील कारखान्या ना औद्योगिक  विभाग कॉर्पोरेशन भागामध्ये वर्ग करण्यात येत असावेत त्यामागील असे कारण असू शकतात की धोरणात्मक सप्ताहाचे शेवटच्या दिवशी एमआयडीसी कारखानदारी व औद्योगिक कार्यक्षेत्र नियमित विज पुरवठा  शासकीय धोरण व नियमानुसार पूर्वीला जात नसून काहीतरी भ्रष्टाचाराच्या मार्गानेच मोठी रक्कम वरील कंपन्याकडून घेऊन लाईटचा प्रश्न उद्भवत आहे अशी दाट शक्यता वाटते  असा नागरिकांना संभ्रम असून ह्या संदर्भ सखोल चौकशी होऊन संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी ही नागरिका करून मागणी होत आहे 

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

श्रीरामपूर येथील वार्ड नंबर दोन मध्ये कुठल्यातरी भागात येथे डीपी फिट करण्याचे कामावर गैरप्रकार

- राजु मिर्जा - श्रीरामपूर -/ वार्ता - 
श्रीरामपूर येथे वार्ड नंबर दोन मध्ये काहीच कारण नसताना लाईटीचा गैरप्रकार होत आहे डीपी बसण्याच्या प्रकारांमध्ये हा प्रकार चालू असून सदरील एम एस ई बी चे कामगारांना माहिती विचारली असताना ते सरळपणे उत्तर देतात की निरनिराळे भागामध्ये काम चालू असून काम पूर्ण होऊन गेल्यास वीज पुरवठा  चालू व सुरळीत करण्यात येईल तसेच नागरिकाकडून असाही अंदाज लावण्यात येत आहे की कार्यकारी अभियंता उप अभियंता व शाखा अभियंता यांच्या सांगण्यावरून एम एस सी बी चा कर्मचारी सुभाष हा लाईट फिरवण्याचे कामात एक्सपर्ट असून यालाही विचारणी केली असताना याच्याकडून असे स्पष्ट सांगण्यात येत आहे की काही टेक्निकल दोष कामांमध्ये झाला असून सुधारण्या कामे आम्ही व्यस्त आहोत ते पूर्ण करण्यात येत आहे तसेच सप्ताह शेवटचा दिवस असून हा पूर्ण कामकाज म्हणजेच वर्क डे असून काही बोलण्याचे नागरिकांना अधिकार ठेवले नसून मुद्दामून त्रास चालवलेला आहे तरी वीज मुख्य केंद्र मुख्य अभियंता प्रादेशिक विभाग नाशिक यांच्या आदेशानुसार दक्षता व गुण नियंत्रण मंडळ चे समिती नेमून सदर चालू असलेले गैरप्रकाराची सखोल चौकशी होऊन संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी दायित्व दोष  आढळतात अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी व यांच्या जागेवर प्रामाणिक होतकरू कामगारांची नेमणूक करण्यात यावी  अशीच अपेक्षा बाळगण्यात येते नागरिकांनी दूरध्वनीद्वारे लाईटी संदर्भ विचारणा केली असताना असे सांगण्यात येते की इथे आम्ही डीपी बसवत आहे त्याचा अनुषंगाने आता लाईट  सकाळ ते संध्याकाळपर्यंत येऊ शकत नाही अशी स्पष्ट प्रश्नाचे उत्तर देतात तरी सकाळपासून  संध्याकाळपर्यंत वीज पुरवठा ठप्प  गैरसोय करून  नागरिक ह्या संदर्भ संताप व्यक्त करत आहे अशाच  गैरप्रकार होत असून लाईट बंद करण्याचे काहीच कारण नसून वीज पुरवठा खंडित करून हा वीज पुरवठा बहुतेक  एमआयडीसी तील कारखान्या ना औद्योगिक  विभाग कॉर्पोरेशन भागामध्ये वर्ग करण्यात येत असावेत त्यामागील असे कारण असू शकतात की धोरणात्मक सप्ताहाचे शेवटच्या दिवशी एमआयडीसी कारखानदारी व औद्योगिक कार्यक्षेत्र नियमित विज पुरवठा  शासकीय धोरण व नियमानुसार पूर्वीला जात नसून काहीतरी भ्रष्टाचाराच्या मार्गानेच मोठी रक्कम वरील कंपन्याकडून घेऊन लाईटचा प्रश्न उद्भवत आहे अशी दाट शक्यता वाटते  असा नागरिकांना संभ्रम असून ह्या संदर्भ सखोल चौकशी होऊन संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी ही नागरिका करून मागणी होत आहे 

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Friday, June 27, 2025

शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्तविद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप


कर्तव्य समजून गरजूंना मदत
करायला हवी- फिरोज तांबोली 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 समाजामध्ये गरजूंना मदत करणाऱ्यांची संख्या वाढली आहे परंतु मदत करणे म्हणजे लोकं उपकार समजून करायला लागले आह, ही मानसिकता बदलून कोणतेही मदत कार्य हे कर्तव्य समजून करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्राईम कन्स्ट्रक्शनचे संचालक फिरोज तांबोली यांनी केले.
नगर येथील मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी आणी रहेमत सुलतान फाऊंडेशन च्यावतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील कुष्ठधामरोड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैदुवाडी मधील सर्व विद्यार्थ्यांना शफी हज उमरा टुर्स, राजकुमार गुरनानी, मुस्कान वेल्फेअर असोसिएशन, ऍड.अमीन धाराणी, निशांत दातीर, किरण उजागरे, सुनील वाघमारे, दिनेश मंजरतकर, प्रा. महबूब सय्यद, नंदकिशोर आढाव आदी दानशूरांच्या विशेष सहकार्याने फिरोज तांबोली यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, शाळेच्या शिक्षिका मिनाक्षी धामणे, जाधव आदि उपस्थित होते.

 पुढे बोलतांना फिरोज तांबोली म्हणाले की, समाजामध्ये स्वार्थीपणा फार वाढत चाललेला आहे. कोणतेही समाजकार्य करतांना बहुतांश संघटनांचा त्यामागे काही ना काही हेतू असतो,असे समाजकार्य किंवा पुण्यकार्य परमेश्‍वरालाही नकोय. नि:स्वार्थीपणाने आज कार्य करण्याची खरी गरज असून, त्यासाठी बौद्धीक प्रबोधन होण्याचीही आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबीद खान यांनी केले. तर आभार मिनाक्षी जाधव यांनी मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

महुवा की जी.एच.भक्त हाईस्कूल में कन्या शिक्षा और स्कूल प्रवेशोत्सव का आयोजन


चंद्रकांत सी पूजारी 
महुवा सुरत (गुजरात) 

गुजरात राज्य के सुरत जिला स्थित महुवा के जी.एच. भक्त सार्वजनिक हाईस्कूल में दिनांक 26-06-2025 को मालिबा सांस्कृतिक भवन में कन्या शिक्षा महोत्सव एवं स्कूल प्रवेशोत्सव का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में तालुका के पदाधिकारियों, महुवा विभाग केळवणी मंडल के पदाधिकारियों, आमंत्रित अतिथियों, अभिभावकों और विद्यालय परिवार की उपस्थिति रही।
   महुवा १७० विधानसभा चुनाव क्षेत्र के विधायक श्री मोहनभाई ढोडिया ने ड्रॉपआउट दर में आई कमी और कन्या शिक्षा एवं प्रवेशोत्सव के माध्यम से समाज के उत्थान की बातें कहीं।
  सूरत जिला पंचायत के सदस्य श्री जिनेशभाई भावसार, महुवा विभाग केळवणी मंडल के उपाध्यक्ष श्री गमनभाई ढीमर और महुवा भाजपा अध्यक्ष श्री भाविनभाई ने बच्चों को आगे बढ़ने और कठोर परिश्रम के बिना सफलता संभव नहीं है—इस विषय में प्रेरणादायक बातें साझा कीं।
  विधायक महोदय, महुवा सामाजिक न्याय समिति के सदस्य और मंचासीन अतिथियों के कर-कमलों से विद्यालय का नाम विभिन्न क्षेत्रों में रोशन करने वाले विद्यार्थियों का सम्मान किया गया।
   सभी उपस्थितजनों ने रोड सेफ्टी और पर्यावरण जागरूकता की शपथ ली। साथ ही, मुख्य अतिथियों के द्वारा विद्यालय परिसर में वृक्षारोपण भी किया गया।

=================================
-----------------------------------------------
*न्यूज प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर (महाराष्ट्र स्टेट)
-----------------------------------------------
=================================

महात्मा गांधी शैक्षणिक संकुलातविद्यार्थिनींना गणवेशाचे वाटप


- अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. 
महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य विनायक मेथवडे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, उपप्राचार्य अलका आहेर, पर्यवेक्षिका संगीता सांगळे यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे यांनी केले. कन्या विभागातील सर्व शिक्षकांनी व प्रवरानगर येथील सचदेव क्लॉथ सेंटरचे मालक प्रवीणशेठ सचदेव यांच्यामार्फत विद्यालयातील शिक्षणात प्राविण्य आणि गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप प्राचार्य विनायक मेथवडे, मुख्याध्यापक नलिनी जाधव, दिलीप डहाळे, संगीता सांगळे, अलका आहेर आदींच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी निखिल मांजरे नैतिक सोनवणे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्राचार्य मेथवडे यांनी सामाजिक न्याय दिन व शाहू महाराजांच्या चरित्रावर आधारित आपले मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा वर्गशिक्षिका अश्विनी सोहोनी यांनी आपल्या मनोगतातून शाहू महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी संजय ठाकरे, डॉ. शरद दुधाट, बाबासाहेब अंत्रे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
हा उपक्रम राबविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठी माधुरी वडघुले, संगीता उगले, प्रफुल्ल नव्हाळे, विजयश्री कदम, सुजाता ठाकरे, नंदादेवी बैसाने, कमल थिटे, मीनाक्षी गांगुर्डे, दिपाली आंबेकर, शैलजा सातपुते, विलास गभाले यांनी विशेष परिश्रम घेतले व योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय भालेराव यांने केले तर करण टाचतोडे याने आभार मानले. 

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
डॉ.शरद दुधाट- श्रीरामपूर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
 *वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करावे : पो. निरीक्षक अरविंद देशमुख


मेडिकल, एलएलबी, दहावी आणि बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करावे, उच्च शिक्षणाची वाट ही अवघड जरी वाटत असली तरी मात्र ती अशक्यही अजिबात नाही हेच या यशस्वी विद्यार्थ्यांनी सिध्द केले आहे तसेच अल्पसंख्यांक समाजाने शिक्षणावर अधिक लक्ष देण्याची नितांत गरज भासत असल्याने त्यात उर्दू भाषा ही अत्यंत मधुर भाषा असून चित्रपटातील अनेक गाणी व डायलॉग हे उर्दू भाषेत लिहिली जातात जे नेहमी आठवणीत राहतात व उर्दूत शिक्षण घेऊन देखील उच्चशिक्षित होऊ शकतात हेच या यशस्वी विद्यार्थ्यांनी सिद्ध देखील केले असल्याचे प्रतिपादन संगमनेर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अरविंद देशमुख यांनी केले.

अंजुमने इस्लाम ट्रस्ट तर्फे संगमनेर येथील अँग्लो उर्दू कनिष्ठ महाविद्यालय याठिकाणी आयोजित उच्चशिक्षित विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील सुप्रसिद्ध वकील ॲड. हैदर बॅग हे होते.

यावेळी मेडिकल, एलएलबी, दहावी आणि बारावी मधील यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांना गौरव चिन्ह,शाल व बुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन शेख गनी हाजी यांच्याहस्ते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पोलिस निरीक्षक अरविंद देशमुख यांचा शाल व बुके देवुन सत्कार करण्यात आला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना एडवोकेट हैदर बेग यांनी न्यायिक प्रक्रियेमधील येणाऱ्या अडचणी व बदलती विस्तारीत समाज व्यवस्थेवर सखोल माहिती विषद केली. 
संस्थेच्या व उर्दूत शिक्षण घेऊन सुद्धा मेडिकल मध्ये एम.डी.ही डिग्री यशस्वी होवू शकते हे डॉ.रूही शेख यांनी सिद्ध केले असल्याचे प्रतिपादन चीफ ट्रस्टी अब्दुल्ला चौधरी यांनी केले. प्रस्ताविक शमशोद्दीन इनामदार यांनी केले.
 या प्रसंगी ट्रस्टी शेख नज़ीर ताजमोहमद, शेख एजाज शमशोद्दीन, मुख्याध्यापिका शेख रिज़वाना सलिम, शिक्षकवृंद पालक वर्ग, जे.यु. सी. उपाध्यक्ष सय्यद असिफ अली,शेख इरफान,शेख दस्तगीर,रि. प्राचार्य दिलशाद शेख, गफ्फार शेख, जवाहरलाल नेहरू ऊर्दू सेंटरचे अध्यक्ष शेख ईदरीस, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सूत्रसंचालन मुन्नवर खलील यांनी केले तर संस्थेचे सचिव पठाण शौकत खान यांनी आभार मानले. 


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
 पत्रकार शेख आदिल ✍️✅🇮🇳...
 रियाजभाई - अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Thursday, June 26, 2025

सर्व भाषांची जननी संस्कृत भाषा आहे - भागवताचार्य सचिन जोशी


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील हिंद सेवा मंडळाच्या क. जे. सोमैया हायस्कूल मध्ये महाकवी कालिदास दिन व राजर्षी शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भागवताचार्य सचिन जोशी, प्रमुख पाहुणे वैशाली जोशी, विद्यालयाचे चेअरमन रणजीत श्रीगोड, शालेय समिती सदस्य किशोर फुणगे, कारभारी कान्हे, विद्यालयाचे मुख्याध्यापक भूषण गोपाळे, पर्यवेक्षक कल्याण लकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

 प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महाकवी कालिदास, राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. 
चि. वल्लभ भुजाडी, वेदांत जोशी, श्रीकृष्ण वाघमोडे, सुमीत आमले, असद शेख, जिवेश जोगदंड यांनी कालिदास दिन, राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती आपल्या भाषणातून सादर केली. विद्यालयातील संस्कृत विषय शिक्षिका मंजिरी काटकर यांनी महर्षी कालिदास रचित सुभाषितं, श्लोक, संस्कृत प्रार्थना विद्यार्थ्यांकडून पठण करून घेतले.
विद्यालयाचे चेअरमन रणजित श्रीगोड यांनी आपले मनोगतात शाहू महाराज यांनी आधुनिक शिक्षण पद्धतीला महत्वाचे स्थान दिले होते, तसेच कालिदास दिनाचे महत्व विशद केले. 

अध्यक्षीय भाषणात सचिन जोशी यांनी संस्कृत एक प्राचीन भाषा असुन समृद्ध अभिजित शास्त्रीय भाषा आहे. सर्व भाषांची जननी संस्कृत भाषा आहे. संस्कृत भाषा सर्वांनी शिकली पाहिजे . या भाषेचा प्रचार विकास झाला पाहिजे . संस्कृत भाषेचे सर्वांनी ज्ञान अवगत करावे. संस्कृत भाषा विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळतात. संस्कृत हि गुण देणारी भाषा असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंजिरी काटकर, सुत्रसंचालन दिनेश मुळे, आभार ज्योती फुलवर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाबा वाघ, रमेश धोंडलकर, अनिल चोभे, विनायक चितळकर, संकेत गंधे यांसह सर्व अध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नशिल होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते- प्रा.चंद्रकांत कोतकर


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
राजश्री शाहू महाराज सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांनी दीनदलितांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केले असे उद्गार तालुक्यातील बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा.चंद्रकांत कोतकर यांनी काढले. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने ते बोलत होते. 
पुढे ते असेही म्हणाले की, राजर्षी शाहु महाराज यांनी दीनदलित समाजाला संस्थानामध्ये ५०% टक्के जागा दिल्या. त्यांनी शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्था निर्माण केल्या. शेतकऱ्यांना कर्ज काढून दिले आणि शेतीचा विकास केला असल्याचे ते म्हणाले.
प्राचार्य डॉ .गुंफा कोकाटे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य कर्तुत्व विशद केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, कानपूरच्या क्षत्रिय समाजाने त्यांना "राजर्षी" ही उपाधी दिली. त्यांनी स्त्रियांच्या पुनर्विवाहाचा कायदा केला. प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. "मूकनायक" या अंकाला त्यांनी आर्थिक मदत केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी मदत केली. बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली केली. संगीत, कला, क्रीडा, सामाजिक न्याय, कृषी उद्योग, वेदोक्त अभ्यास , समता, बंधुता या अनुषंगाने राजर्षी शाहू महाराजांनी आयुष्यभर काम केले असल्याचे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे आयोजन जयंती विभागाचे प्रमुख प्रा.सतिश पावसे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. बाबासाहेब पवार यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

लेकर हम दिवाना दिल ’ चे आयोजन....ऋणानुबंध ची शनिवारी एस.डी.बर्मनआर.डी. बर्मन लाईव्ह संगीत संध्या


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
नगर शहरातील सामाजिक आणि सांगीत क्षेत्रातील नावाजलेली संस्था ऋणानुबंध बहुउद्देशिय सामाजिक संस्थेने शनिवार दि. २८ जून वाद्यवृंदासह "लेकर हम दिवाना दिल" या लाइव्ह म्युझिक संध्येचे नगर शहरातील सावेडी येथील माऊली सभागृह याठिकाणी सायंकाळी ५ : ३० वाजता आयोजन केले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
'ऋणानुबंध' ही संस्था नेहमी अनेक सामाजिक आणि सांगितीक उपक्रम राबवत असते, यावेळी नामवंत संगीतकार एस.डी. बर्मन आणि आर.डी. बर्मन यांच्या गीतांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रासह मैफिलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या म्यूझिक संध्येत बर्मन पितापुत्रांनी संगीतबध्द केलेल्या अनेक अजरामर गीतांची मेजवानी 'ऋणानुबंध' चे कलाकार सादर करणार आहेत. तेरे मेरे मिलन की ये रैना, हम दोनो दो प्रेमी, कांची रे कांची रे, भीगी भीगी रातो मे, जय जय शिव शंकर, जानु मेरी जान, यम्मा यम्मा, कोरा कागज था ये मन मेरा इत्यादी गाजलेली गाणी या कार्यक्रमात सादर होणार आहेत.
या कार्यक्रमात अजित रोकडे, डॉ. दमन काशिद, प्रशांत बंडगर, महेश घावटे, डॉ. शैलेंद्र खंडागळे, डॉ. विवेकानंद कंगे, सारंग पंधाडे, अजय आदमाने, भानुदास महानुर, चारुदत्त ससाणे, संजय भिगारदिवे, सारिका रघुवंशी, प्रतिभा साबळे, सीमा रघुवंशी, मोनाली बोरुडे, डॉ. गायत्री कुलकर्णी इत्यादी कलाकार गीते सादर करणार आहेत.
या कार्यक्रमाचे प्रायोजक शिंगवी ज्वेलर्स, माधवबाग साईमाऊली हॉस्पिटल, डॉ. दमन काशीद हॉस्पिटल, स्नेहदीप हॉस्पिटल, साताळकर लोटस, झेंडे हॉस्पिटल हे आहेत.
हा कार्यक्रम प्रेक्षकांना विनामुल्य पाहता येणार असुन उपस्थित प्रेक्षकांना माधवबाग कडून विविध चाचण्यांवर डिस्काउंट कुपन दिले जाणार आहे. काही भाग्यवान प्रेक्षकांना लकी ड्रॉ मधुन पैठण्या दिल्या जाणार आहेत. या कार्यक्रमाच्या पासेस साठी कृपया - 9420635096 / 9823811119 / 7350881515 / या क्रमांकावर फोन करावा असे आवाहन ऋणानुबंध चे सदस्य सचिव सचिन परदेशी यांनी केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

महिलाओं के लिए गठित आंतरिक शिकायत समिति (आईसीसी) कितनी सफल और कितनी असफल


*महिलाओं के लिए गठित आंतरिक शिकायत समिति (आईसीसी) कितनी सफल और कितनी असफल*

आज के युग में महिलाएं पुरुषों के साथ कंधे से कंधा मिलाकर हर क्षेत्र में काम कर रही हैं। चाहे वह कॉर्पोरेट जगत हो, शिक्षा, चिकित्सा, या कोई अन्य पेशा, महिलाएं अपनी योग्यता और मेहनत से अपनी पहचान बना रही हैं। लेकिन कार्यस्थल पर उनकी सुरक्षा और सम्मान सुनिश्चित करना अभी भी एक चुनौती बना हुआ है। महिलाएं न केवल घर की जिम्मेदारियों को निभाती हैं, बल्कि कार्यस्थल पर भी कई तरह के शोषण और असुरक्षा का सामना करती हैं। एक रिपोर्ट के अनुसार, भारत में महिलाओं के खिलाफ हिंसा का सबसे बड़ा हिस्सा घरेलू हिंसा का है, लेकिन कार्यस्थल पर यौन उत्पीड़न भी एक गंभीर समस्या है। इसे ध्यान में रखते हुए भारत सरकार ने "कार्यस्थल पर महिलाओं के यौन उत्पीड़न (रोकथाम, निषेध और प्रतितोष) अधिनियम, 2013" (POSH Act) के तहत आंतरिक शिकायत समिति (Internal Complaints Committee - ICC) का गठन अनिवार्य किया है। यह समिति कार्यस्थल पर महिलाओं के यौन उत्पीड़न को रोकने, शिकायतों की जांच करने और पीड़ित को न्याय दिलाने के लिए बनाई गई है। लेकिन सवाल यह है कि क्या यह समिति अपने उद्देश्यों में पूरी तरह सफल हो पाई है, या इसमें कुछ कमियां अभी भी बाकी हैं?
आईसीसी का उद्देश्य और महत्व
आंतरिक शिकायत समिति का गठन कार्यस्थल पर महिलाओं को एक सुरक्षित और सम्मानजनक माहौल प्रदान करने के लिए किया गया है। यह समिति न केवल यौन उत्पीड़न की शिकायतों की जांच करती है, बल्कि यह भी सुनिश्चित करती है कि कार्यस्थल पर महिलाएं बिना डर के अपनी जिम्मेदारियां निभा सकें। 10 या उससे अधिक कर्मचारियों वाले प्रत्येक संगठन में आईसीसी का गठन अनिवार्य है। यह समिति स्वतंत्र और निष्पक्ष रूप से कार्य करती है, ताकि शिकायतकर्ता को न्याय मिले और कार्यस्थल पर एक ऐसा वातावरण बने जहां महिलाएं बराबरी और सम्मान के साथ काम कर सकें। इसके अलावा, आईसीसी की मौजूदगी से कर्मचारियों में यौन उत्पीड़न के प्रति जागरूकता बढ़ती है, जिससे ऐसी घटनाओं में कमी आने की संभावना रहती है।
आईसीसी की सफलता: कुछ वास्तविक उदाहरण
आईसीसी की सफलता के कई उदाहरण हैं, जो यह दर्शाते हैं कि यह समिति महिलाओं के लिए एक महत्वपूर्ण सहारा बन सकती है। 
*उदाहरण 1: कॉर्पोरेट कार्यस्थल में यौन उत्पीड़न का मामला*
2018 में, मुंबई की एक प्रमुख आईटी कंपनी में एक महिला कर्मचारी ने अपने वरिष्ठ सहकर्मी पर यौन उत्पीड़न का आरोप लगाया। उसने कंपनी की आईसीसी में शिकायत दर्ज की। समिति ने त्वरित और निष्पक्ष जांच की, जिसमें साक्ष्य एकत्र किए गए और दोनों पक्षों की बात सुनी गई। जांच के बाद, आरोपी को दोषी पाया गया और उसे नौकरी से निकाल दिया गया। साथ ही, पीड़िता को गोपनीयता और सहायता प्रदान की गई। इस मामले ने कंपनी में अन्य कर्मचारियों को भी यह विश्वास दिलाया कि उनकी शिकायतों को गंभीरता से लिया जाएगा।
उदाहरण 2: शैक्षणिक संस्थान में कार्रवाई
2020 में, दिल्ली के एक विश्वविद्यालय में एक छात्रा ने अपने प्रोफेसर पर अनुचित व्यवहार का आरोप लगाया। विश्वविद्यालय की आईसीसी ने मामले की गहन जांच की और प्रोफेसर को निलंबित कर दिया गया। इस घटना ने अन्य छात्राओं को भी अपनी आवाज उठाने के लिए प्रेरित किया और संस्थान में यौन उत्पीड़न के खिलाफ जागरूकता अभियान शुरू किया गया।
इन उदाहरणों से स्पष्ट है कि जब आईसीसी निष्पक्ष और सक्रिय रूप से काम करती है, तो यह महिलाओं को न्याय दिलाने और कार्यस्थल पर सुरक्षित माहौल बनाने में महत्वपूर्ण भूमिका निभा सकती है।
आईसीसी की असफलताएं: चुनौतियां और कमियां
हालांकि, आईसीसी की राह में कई बाधाएं भी हैं, जो इसे पूरी तरह प्रभावी होने से रोकती हैं। कई बार यह समिति अपेक्षित परिणाम देने में असफल रहती है। इसके पीछे कई कारण हैं:
जागरूकता की कमी: कई कर्मचारियों को आईसीसी की मौजूदगी, इसके अधिकारों और शिकायत दर्ज करने की प्रक्रिया की जानकारी नहीं होती। इससे पीड़ित महिलाएं अपनी शिकायत दर्ज करने से हिचकिचाती हैं।
निष्पक्षता की कमी: कई बार समिति के सदस्य निष्पक्ष रूप से कार्य नहीं करते। विशेष रूप से, जब आरोपी उच्च पद पर होता है, तो समिति पर दबाव बनाया जाता है, जिससे जांच प्रभावित होती है।
संस्थान की छवि बचाने का दबाव: कुछ संगठन अपनी छवि बचाने के लिए शिकायतों को दबाने की कोशिश करते हैं, जिससे पीड़िता को न्याय नहीं मिल पाता।
शिकायतकर्ता की गोपनीयता का उल्लंघन: कई मामलों में शिकायतकर्ता की पहचान उजागर हो जाती है, जिससे उसे सामाजिक बदनामी और प्रताड़ना का डर सताता है।
प्रशिक्षण की कमी: समिति के सदस्यों को यौन उत्पीड़न की सही परिभाषा, कानूनी प्रक्रिया, साक्ष्य एकत्र करने और निष्पक्ष जांच करने का प्रशिक्षण नहीं दिया जाता। इससे जांच प्रक्रिया कमजोर हो जाती है।
देरी से कार्रवाई: शिकायतों पर कार्रवाई में देरी होने से पीड़िता का भरोसा टूटता है और आरोपी को बच निकलने का मौका मिलता है।
सामाजिक डर और चरित्र पर सवाल: कई महिलाएं शिकायत करने से इसलिए डरती हैं, क्योंकि उन्हें समाज में "चरित्र पर सवाल" उठने का डर होता है।
कई संगठनों में आईसीसी सिर्फ कागजी औपचारिकता बनकर रह जाती है। नियमित बैठकें नहीं होतीं, जागरूकता अभियान नहीं चलाए जाते, और समिति सक्रिय रूप से काम नहीं करती। इससे महिलाओं का विश्वास इस व्यवस्था पर कम होता है।
आंतरिक शिकायत समिति (आईसीसी) महिलाओं के लिए कार्यस्थल पर एक सुरक्षित और सम्मानजनक वातावरण बनाने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम है। जब यह समिति निष्पक्ष, सक्रिय और प्रशिक्षित होती है, तो यह यौन उत्पीड़न के खिलाफ प्रभावी ढंग से काम कर सकती है, जैसा कि उपरोक्त उदाहरणों में देखा गया। हालांकि, जागरूकता की कमी, निष्पक्षता का अभाव, प्रशिक्षण की कमी और सामाजिक दबाव जैसी चुनौतियां इसकी सफलता में बाधा बनती हैं। 
आईसीसी को और प्रभावी बनाने के लिए कुछ कदम उठाए जा सकते हैं। सबसे पहले, संगठनों को कर्मचारियों के बीच जागरूकता अभियान चलाने चाहिए, ताकि उन्हें समिति की प्रक्रिया और अधिकारों की जानकारी हो। दूसरा, समिति के सदस्यों को नियमित प्रशिक्षण दिया जाना चाहिए, ताकि वे निष्पक्ष और प्रभावी ढंग से जांच कर सकें। तीसरा, शिकायतकर्ता की गोपनीयता सुनिश्चित करने के लिए सख्त नियम लागू किए जाने चाहिए। अंत में, समाज में यौन उत्पीड़न के प्रति मानसिकता बदलने की जरूरत है, ताकि पीड़ित महिलाएं बिना डर के अपनी आवाज उठा सकें। 
आईसीसी की सफलता और असफलता का दारोमदार इस बात पर निर्भर करता है कि इसे कितनी गंभीरता और निष्पक्षता के साथ लागू किया जाता है। यदि इन कमियों को दूर किया जाए, तो यह समिति निश्चित रूप से कार्यस्थल पर महिलाओं के लिए एक सुरक्षित और सशक्त वातावरण बना सकती है।
श्री आदिशक्ति मां परम परमेश्वरी मां भगवती दुर्गा दैव्यै नमो नमः

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
*लेखक* ✍️✅🇮🇳...
चंद्रकांत सी.पूजारी (गुजरात)
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±


=================================
-----------------------------------------------
*आलेख प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Wednesday, June 25, 2025

कोल्हापूर येथूने नव्याने पदार्पण झालेले श्रीरामपूर तालुका पोलीस कार्यालयात कर्तबगार पोलीस अधिकारी अरुण क. धनवडे


श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशनला नव्याने प्रशासकीय सेवेत रुजू झाल्याले अधिकारी पोलिस निरक्षक  अरुण क. धनवडे यांना फूल पुष्प गुच्छा देऊन हार्दिक अभिनंदन करताना रिपाईचे सुभाष दादा त्रिभोन संपादक राजु मिर्जा व शारुख बागवान दिसत आहे

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Monday, June 23, 2025

मां जिजाऊ पुण्यतिथी निमित्त अहिल्यादेवी होळकर शाळेत मोफत वहया व पाटी वाटप


राजमाता जिजाऊ मां साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान योद्धा आणि राष्ट्रनायक घडवला - शफकत सय्यद 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
जिजाऊ माँसाहेब म्हणजे प्रेरणा, शिक्षण आणि संस्कारांची मूर्ती त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान योद्धा आणि राष्ट्रनायक घडवला. त्यांच्या स्मृतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे ही खरोखरच स्तुत्य गोष्ट असल्याचे प्रतिपादन मुस्कान वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष शफकत सय्यद यांनी केले. 
नगर शहरातील सर्जेपुरा येथील मनपाची अहिल्यादेवी होळकर प्राथमिक शाळा क्रमांक ११ व शहीद अब्दुल हमीद उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक १३ मध्ये राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त विद्यार्थ्यांना मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी व रहमत सुलतान फाउंडेशनच्या वतीने मोफत वहया व पाटी वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुस्कान वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष शफकत सय्यद, जीवन फाऊंडेशनचे अध्यक्ष आरिफ सय्यद, राजाभैय्या, अन्नुभाई, शाळेचे जबीन इनामदार, समीना खान, भाऊसाहेब चिकने, शाईस्ता शेख आदी उपस्थित होते.
मुलांना वहया व पाटी मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता.
या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी शफी हज उमरा टुर्स, राजकुमार गुरनानी, सुनील भंडारी, जीएसएम मोबाईल, मुबीन खान, डॉ. रेश्मा चेडे, युनूसभाई तांबटकर, सुनील तेलतुंबडे (रोझमॅन) आदी मंडळी पुढे सरसावले, त्यांचे मनापासून आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.
आपल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आज जी आनंदाची आणि समाधानाची झलक दिसते आहे, ती पाहून आपल्या सर्वांच्या कष्टाचे चीज झाले असे वाटते. शिक्षण हा समाज परिवर्तनाचा महत्त्वाचा पाया आहे आणि त्या दृष्टीने हे वह्या-पाटी वाटप म्हणजे फक्त वस्तूंचं वाटप नाही, तर उज्ज्वल भविष्यासाठी दिलेला आधार असल्याचे आरिफ सय्यद म्हणाले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबीद दुलेखान यांनी केले. तर आभार जबीन इनामदार यांनी मानले. 

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Saturday, June 21, 2025

योग ही एक प्रभावशाली साधना आहे प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
योग हा व्यायामाचा एक असा प्रभावशाली प्रकार आहे की, ज्याच्या माध्यमातून केवळ शरीराच्या विविध अवयवांमधील नाही तर मनाचेही संतुलन राखले जाते म्हणून योग ही एक प्रभावशाली साधना आहे. योगाचाअंगीकार प्रत्येकाने केला पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी केले .
    तालुक्यातील बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित योग दिनाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर क्रीडा संचालक प्रा. डॉ. विनायक काळे ,योग प्रशिक्षिका प्रा. रुपाली उंडे हे होते.
 प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे पुढे म्हणाल्या की, योगाभ्यासामुळे शारीरिक व्याधी बरोबरच मानसिक विकारांवर सुद्धा विजय मिळवता येऊ शकतो . आजच्या धकाधकीच्या काळात स्वस्थ, निरोगी, शांततापूर्ण आयुष्य जगण्यासाठी तसेच जीवनशैलीमध्ये मनशांती टिकून ठेवण्याचा सुरक्षित आणि सोपा मार्ग म्हणजे योग होय . त्यामुळे प्रत्येकाने नियमित योगा करणे गरजेचे आहे. यावेळी प्रा. डॉ. विनायक काळे, प्रा. रुपाली उंडे यांनी योग विषयक मार्गदर्शन करून योगासनांची प्रात्यक्षिके उपस्थितांकडून करुन घेतली. यावेळी प्रा. डॉ. बाबासाहेब पवार ,प्रा. विलास गायकवाड, प्रा. डॉ. अशोक माने ,प्रा.सतीश पावसे ,प्रा. सुनील विधाटे, प्रा. चंद्रकांत कोतकर, प्रा. डॉ. बाळासाहेब बाचकर, प्रा.डॉ. संजय नवाळे, प्रा. अशोक थोरात, प्रा. डॉ. विठ्ठल सदाफुले, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रा. डॉ. संजय नवाळे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. प्रकाश देशपांडे यांनी योग दिनासाठी उपस्थित असणाऱ्यांचे आभार मानले .

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Friday, June 20, 2025

जमात ए इस्लामी तर्फे सर्वधर्मीयांसाठी 'बकरीद उर्फ ईदुल अज्हा' मिलन कार्यक्रम संपन्न


जमात ए इस्लामी तर्फे सर्वधर्मीयांसाठी 'बकरीद उर्फ ईदुल अज्हा' मिलन कार्यक्रम संपन्न

बकरीदचा वैश्विक संदेश 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता - 
जमाअते इस्लामी हिंद,नगर तर्फे नगर शहरातील कासमखानी मशीद याठिकाणी सर्वधर्मीय बांधवांसाठी 'बकरीद उर्फ ईदुल अज्हा' मिलन कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी आपल्या प्रास्ताविक करताना डॉ. इक्राम खान यांनी सर्वधर्मीयांना बकरीदची पार्श्वभूमी व संदेश समजाऊन सांगितले व गैरसमज दूर करणे हा उद्देश असल्याचे स्पष्ट केले.
मनोगत व्यक्त करताना डॉ. सय्यद रफीक यांनी बकरीद ही प्रेषित इब्राहीम (अ.) माता हाजरा (अ.) व पुत्र इस्माईल (अ.) यांच्या महान त्याग व बलिदाना प्रित्यर्थ साजरी केली जाते हे विषद केले. इब्राहीम (अ.) यांनी तत्कालीन अंधश्रध्दा, अनीष्ठ रूढी-परंपरा व देवा-धर्माच्या नावावर होणा-या जनसामान्यांच्या शोषणा विरूध्द सर्वस्वाने संघर्ष केल्याचे विषद केले. नियतीने त्यांना देवाधर्माच्या नावावर प्रचंड शोषणाचे केंद्र असणा-या श्रीमंत देवस्थानाचे सर्वेसर्वा असणा-या पिता आजर यांच्याच पोटी जन्माला घातले.
इब्राहीम (अ.) यांचा संघर्ष घरातूनच सुरू झाला. त्यांचे उभे जीवन त्यागाचे, कुर्बानीचे प्रतीक आहे. या संघर्षात त्यांना पत्नी सारा (अ.) हाजरा (अ.) पुतण्या लूत (अ.) व मुले अनुक्रमे इस्माईल (अ.) व इसहाक (अ.) यांनी संपूर्ण सहकार्य केल्याचे स्पष्ट केले. इसहाक (अ.) यांच्या वंशातच याकूब (इस्राइल) (अ.), यूसूफ (अ.), मूसा (अ.), मरियम (अ.) व इसा (येशू) (अ.) इ. अनेक प्रेषित जन्मले आणि इस्माईल (अ.) यांच्या वंशात २५०० वर्षांनंतर मक्का येथेच शेवटचे पैगंबर मुहम्मद (स.) यांचा जन्म झाला असे नमूद केले.
प्रमुख पाहुणे इंजिनिअर वाजीद अलीखान यांनी आपल्या प्रमुख भाषणात बकरीदचा ४००० वर्षांपूर्वीचा इतिहास विषद केला. प्रेषित इब्राहीम (अ.) व इतर तमाम प्रेषितांचाच वारसा शेवटचे प्रेषित पैगंबर मुहम्मद (स.) यांनी विशूध्दपणे पून्हा जोमाने चालविला व एक आदर्श नागरिक, आदर्श कुटूंब, आदर्श समाज व आदर्श राज्य निर्मितीची मुहूर्तमेढ रोवल्याचे त्यांनी सप्रमाण दाखले देऊन उपस्थितांचे मार्गदर्शन केले. मक्का मशीद ही प्रेषित इब्राहीम (अ.) व इस्माईल (अ.) यांनी ४००० वर्षांपूर्वी मक्का येथे बांधली. जे आजही एकेश्वरवादाचे, समतेचे, विश्वबंधुत्वाचे व शांतीचे केंद्र आहे हे स्पष्ट करून हज्ज यात्रेसाठी त्यांच्याच स्मरणार्थ दरवर्षी जगाच्या कानाकोप-यातून मुस्लिम बांधव एकत्र येऊन समता व बंधूत्वाचे प्रत्यक्ष दर्शन घडवितात इ. अनमोल माहिती दिली.
कार्यक्रमासाठी सावित्री फातेमा स‌द्भावना मंचाचे अध्यक्ष ॲड. संभाजी बोरुडे, मराठा सेवा संघाचे विठ्ठलराव गुंजाळ, अशोक सब्बन, नवेद बिजापुरे, मुश्ताक सर, मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान, फिरोज शेख व इतर सर्वधर्मीय मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुबीन खान यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. याप्रसंगी प्रश्नोत्तरासाठी ही संधी दिल्याने अनेक शंका-कुशंकांचे निरसन झाले. शेवटी जमाअतचे स्थानिक अध्यक्ष सय्यद नईम यांनी सर्वांचे आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष म्हणजे* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ आबीद खान,अ.नगर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Thursday, June 19, 2025

सेवानिवृत्त शिक्षक व अधिकारी यांचे प्रलंबित विविध प्रश्नाबाबत जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
सेवा निवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी यांच्या प्रश्नांची सोडवणुक पेन्शन अदालतमध्ये करण्यात यावी.
सेवानिवृत्त पात्र निवडश्रेणी व वरिष्ठ श्रेणी यांची यादी पंचायत समिती स्थरावर प्रसिध्द करण्यात येऊन हरकती नोंदवुन, फरक अदा करावा. तसेच संघटनेस प्रत्येक तालुका स्तरावरील यादी मिळावी.१ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२५ अखेर सेवानिवृत्त झालेल्या, परंतु गटविमा अद्याप पर्यंत अदा न केलेल्या शिक्षकांची नावे त्रुटीसह संघटनेस द्यावीत, तसेच ज्यांचे गटविमा अदा केला आहे त्यांची यादी व रक्कम जमा केल्याचा दिनांक व नमूना नं. ११ संबंधित सेवानिवृत्त शिक्षकास मिळावा, 
सेवा निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी यांचा ७ व्या वेतन आयोगातील हप्ते त्वरीत अदा करण्यात यावेत,प्रा.फंड, पेन्शन विक्री व ग्रॅज्युईटीच्या रकमा सेवा निवृत्तीनंतर त्वरीत अदा कराव्यात,संगणकाची कपात केलेली रक्कम शासनाकडे मागणी करण्यात यावी व तसे मागणीचे पत्र संघटनेस द्यावे, 
सेवानिवृत्त शिक्षकांना ओळखपत्र देण्यात यावेत, सेवानिवृत्त शिक्षकांची पेन्शन दरमहा १ ते ५ तारखेच्या दरम्यान करण्यात यावी, 
सेवानिवृत्त शिक्षकांसाठी पेन्शन अदालत दरमहा तालुका व जिल्हा स्तरावर नियमितपणे घेतली जात नाही. तसेच मागील अदालतीचे इतिवृत्तानुसार प्रश्नांची सोडवणुक झालेली दिसून येत नाही. तरी अदालतीमध्ये झालेल्या सर्व विषयांची सोडवणुक करण्याची मागणी नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना शाखा-अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष दिलीप दहिफळे, कार्याध्यक्ष शरफुद्दीन शेख, सरचिटणीस सुनील जाधव, नेवासाचे अध्यक्ष योसेफ मकासारे, उपाध्यक्ष अशोक बडे, संचालक आदिनाथ सहकारी साखर कारखाना जवळी जामखेडचे दशरथ हजारे, संचालक ज्योती क्रांतीचे विष्णू दादा हजारे, पाराजी झावरे, तुकाराम ठाणगे, मधुकर शिंदे, पांडुरंग घोडके, जगन्नाथ खामकर, ज्ञानदेव ढाकणे आदी उपस्थित होते. यावेळी सर्व विषयावर मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी चर्चाही करण्यात आली.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर व माणगाव बायपास रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणे आवश्यक आहे


- मुंबई - प्रतिनिधी - / वार्ता 
मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर व माणगाव बायपास रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणे आवश्यक आहे. त्यासाठी मोरबा रोड ते मुंबई-गोवा हायवे रस्ता, साईनगर कालवा ब्रिज ते उत्तेखोल कालवा गावापर्यंतचा रस्ता आणि निजामपूर रोड कालवा ते भादाव रस्ता हे माणगाव नगरपंचायत हद्दीतील तीन रस्ते आणि मुंबई - गोवा महामार्गावरील इंदापूर कॅनल रस्ता ते विगवली फाटा रस्ता, अशा पर्यायी चारही रस्त्यांच्या कामांना १५ कोटींचा निधी तातडीने देण्यात येईल. ही कामे पूर्णत्वास नेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीला सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव राजेश देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) संजय दशपुते, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग विभाग, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

*सैनिक सन्मान पंधरवाडा* *नियोजन बैठक संपन्न !*


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
शासनाच्या वतीने १६ जुन ते ३० जुन सैनिक पंधरवाडा कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याने श्रीरामपूर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय श्रीरामपूर याठिकाणी बैठक संपन्न झाली.
बैठकीत माजी सैनिकांनी रस्ता केस,तसेच एका आजी सैनिकाच्या घरी २१ तोळे सोन्याची धाडशी चोरी होऊन चार महिने उलटले तरी देखील त्याचा अद्यापही तपास लागलेला नाही, त्या चोरीचा योग्य तपास होऊन सेवारत सैनिकास न्याय मिळावा, फेर रद्द करणेबाबत लेखी तक्रार, सैनिक कॉलनी मधील प्लॉट शासनाच्या वतीने माजी सैनिकांना सन १९८० या काळात दिले आहेत परंतु ज्या माजी सैनिकांनी अटी शर्तीचा भंग करून परस्पर ९९ वर्षाच्या करारावर काही प्लॉट सिव्हिल लोकांना विक्री केले  आहेत आणि तेच लोक तेथे असलेल्या माजी सैनिकांना नाहक त्रास देत आहेत, त्याची शासन स्तरावरून योग्य प्रकारे चौकशी करून गरजु माजी सैनिकांना फेर वाटप करण्यात यावे, विविध प्रकारचे प्रश्न लेखी तक्रार अर्जाच्या स्वरूपात नवनियुक्त नायब तहसीलदार श्री राजेश पाऊंड यांच्याकडे दाखल केले. शासन निर्णयानुसार घरपट्टी मधील संकलीत कर माफ असुनही गेले दोन,तीन वर्षांपासून संकलीत कर हा घरपट्टी मध्ये लागुन येतो आणि विचारणा केली असता वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे असे सांगून वेळ मारुन नेली जाते, संकलीत कर व शास्ती भरु नका फक्त बाकी रक्कम भरा असे वसुली अधिकारी सांगतात व पुन्हा शास्ती लावून पट्टी आकारली जाते, सुरवातीला माजी सैनिक असल्याचा सैनिक कल्याण कार्यालयाचा दाखला सर्व माजी सैनिकांनी दिलेला असतांना दरवर्षी पुन्हा पुन्हा मागणी केली जात आहे, एकीकडे संपूर्ण देशभर सैनिकांच्या कर्तव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते व दुसरीकडे सैनिकांना नाहक त्रास दिला जातो, त्यामुळे याबाबत नगर परिषद प्रशासक तथा उपविभागीय (प्रांत) अधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी यावर निर्णय घेऊन माजी सैनिकांची हेळसांड थांबवावी तसेच ज्या आजी - माजी सैनिकांची कुठल्याही प्रकारच्या तक्रारी असतील त्यांनी या सैनिक सन्मान पंधरवाडा कार्यक्रमांतर्गत मा.तहसीलदार श्रीरामपूर यांचे नावे तक्रार अर्ज दाखल करावेत व आपल्या तक्रारीचे निरसन करून घ्यावेत असे माजी सैनिक समितीच्या वतीने मेजर कृष्णा सरदार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या बैठकीस मेजर कृष्णा सरदार, राजेंद्र कांदे,श्रीमती छाया मोटे, बाळासाहेब बनकर, बाळासाहेब उंडे, वीर पिता विष्णू बडाख, वीरमाता सौ,इंदूबाई बडाख, मिनानाथ गुलदगड,संजय बनकर,शरद तांबे, मच्छिंद्र शेळके इत्यादी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन

२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन

दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. या दिवशी योगाचे फायदे जगाला सांगितले जातात. योगाने केवळ शारीरिक आणि मानसिकच नाही तर आध्यात्मिक लाभही मिळतात. योग केवळ आपल्याला स्वतःशी जोडत नाही, तर निसर्गाशी आणि संपूर्ण मानवतेशीही जोडण्याचा मार्ग दाखवतो. आंतरराष्ट्रीय योग दिनामुळे जगभरातील लोक योगाला ओळखू लागले आहेत आणि त्याचा फायदा घेत आहेत.
यावर्षी योग दिन २०२५ ची थीम 'एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' आहे. ही थीम पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी योगास प्रोत्साहन देण्यावर आधारित आहे. या थीमचा उद्देश वैयक्तिक आणि जागतिक आरोग्यामधील संबंध अधोरेखित करणे आहे. यासोबतच, पर्यावरण संतुलन आणि शाश्वत विकासात योगाची भूमिका देखील अधोरेखित करायची आहे.
योगाला वैयक्तिक आरोग्यासोबतच पृथ्वीच्या आरोग्यासाठीही आवश्यक मानले जावे. ही थीम पर्यावरण आणि वैयक्तिक जीवनातील संतुलनाला प्रोत्साहन देते.

=================================
-----------------------------------------------
*लेख विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
योग संस्था,कोपरगांव
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*लेख प्रसिद्ध सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Wednesday, June 18, 2025

*छत्रपती शिवाजी विद्यालयात* *नवगतांचे प्रवेशोत्सव उत्साहात*


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
तालुक्यातील वडाळा महादेव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात नवीन वर्षाची सुरुवात नवागतांचे स्वागत, मोफत पाठ्यपुस्तक वाटप व गुणवंत विद्यार्थी सत्कार अशा त्रिवेणी संगमाने करण्यात आली. सर्वप्रथम कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य सुधीर पाटील कसार हे होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानदेव माळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत करून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
 या कार्यक्रमासाठी थोर देणगीदार उद्धवराव पवार तथा आबा हे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवागतांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच इयत्ता पाचवी ते आठवीतील सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांना मिष्ठान्न देऊन करण्यात आली.
विद्यालयात एस.एस.सी. बोर्ड परीक्षा २०२५ मध्ये प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी स्मिता अशोक शिंगटे, रूपाली अशोक भोंडगे व तृष्णा सोमनाथ सोनवणे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय मनोगतातून सुधीर कसार यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिस्तीचे महत्त्व पटवून दिले. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक संतोष नेहुल यांची बदली झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब कसार, शितल निंभोरे, स्वेजल रसाळ, संतोष नेहूल, उषा नाईक, दिपाली बच्छाव, अविनाश लाटे, सुहास पांडे, प्रशांत बांडे, संदीप जाधव व भास्कर शिंगटे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा कसार यांनी केले तर भास्कर सदगिर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Tuesday, June 17, 2025

डॉ. श्रीकांत पाटील व वासुदेव सुरजुसे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,वरुड तालुकातर्फे अभिष्टचिंतन


डॉ. श्रीकांत पाटील व वासुदेव सुरजुसे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,वरुड तालुकातर्फे अभिष्टचिंतन

वरुड (जि.अमरावती) प्रतिनिधी :-
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार केंद्राचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील आणि नळ दयंमती मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा सहकार भारती मत्स्य सहकारी संस्था प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश प्रमुख वासुदेव सुरजुसे यांचा वाढदिवस महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, वरुड तालुका यांच्या वतीने साजरा करण्यात आला.

या अभिष्टचिंतन सोहळ्यास पत्रकार संघाचे तालुकास्तरीय पदाधिकारी व विविध माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही मान्यवरांचे अभिष्टचिंतन करण्यात आले 
डॉ. श्रीकांत पाटील यांचे शैक्षणिक व शासकीय कार्य क्षेत्रातील योगदान आणि वासुदेव सुरजुसे यांचे सहकारी व सामाजिक क्षेत्रातील कार्य हे प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. वाढदिवसानिमित्त दोघांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत, त्यांच्या कार्यात यश व आरोग्यसंपन्न आयुष्याची प्रार्थना करण्यात आली.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार प्रविण सावरकर ✍️✅🇮🇳...
 (वरुड जि.अमरावती)
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

विधी परिक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन केल्याबद्दल कर्मयोगी प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांचा सन्मान व वृक्षारोपण


विधी परिक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन केल्याबद्दल कर्मयोगी प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांचा सन्मान व वृक्षारोपण 

- नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
नुकत्याच पार पडलेल्या विधी विभागाच्या परिक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन यश संपादन केल्याबद्दल कर्मयोगी प्रतिष्ठानतर्फे सदर उत्तीर्ण यशवंत विद्यार्थी - विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कर्मयोगी प्रतिष्ठान चे अध्यक्ष शफि जहागीरदार यांनी हजरत मिरावली पहाड येथे स्नेह भोजन आयोजित केले होते. शिक्षण आणि कामासोबत सामाजिक कार्याची आवड निर्माण व्हावी या हेतूने सदर विद्यार्थ्यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. ऍड.सानिया नफिस चुडीवाला (एल एल बी) ऍड. अरीबा फ़ारुक शेख (एल एल बी) ऍड.नोमान अज़िम जहागीरदार ( एल एल बी) त्याचबरोबर १२ वी वाणिज्य विभागात, अहमदनगर महाविद्यालयात विशेष प्राविण्यासह प्रथम आलेली कु.निदा इकबाल चुडीवाला हिचा देखील सत्कार करण्यात आला तथा वृक्ष रोपे भेट देण्यात आली. 
याप्रसंगी शरद पवार होमिओपॅथिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रिज़वान अहमद, मिनर्व्हा इन्फ्राचे इंजि. अनिस शेख, नगरसेवक असिफ सुलतान, ज्येष्ठ विधीज्ञ फ़ारुक बिलाल, समाजसेवक नफ़िस चुडीवाला, जी.ए. एजन्सी चे अज़िम जहागीरदार, डॉ.रेश्मा रिज़वान, ऍड. साजिया सय्यद विशेष उपस्थितीत जोधपूर येथून आलेले हैदर अली आदी मान्यवर उपस्थित होते.
कर्मयोगी प्रतिष्ठानचे मार्गदर्शन सदस्य ज्येष्ठ त्वचारोग तज्ज्ञ डॉ. एम् के शेख यांनी सर्व यशवंताना पारितोषिक देऊन प्रोत्साहन दिले.
यावेळी विद्यार्थ्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्मयोगी प्रतिष्ठानचे माजी जिल्हा समाजकल्याण अधिकारी रफ़िक मुन्शी, पत्रकार मोहसीन बारुदवाले, डॉ.इमरान शेख, समिरखान यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

=================================
-----------------------------------------------
*वृत विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳....
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ. नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

सामाजिक चळवळ टिकली पाहिजे करीता सामाज कार्यास जरासा वेळ देणे आवश्यक - बालाजी सोनटक्के💐💐💐


<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान 💐💐💐
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
सामाजिक चळवळ टिकली पाहिजे करीता सामाजकार्यास जरासा वेळ देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे सामाजाची प्रगती ही केवळ सरकार किंवा काही नेत्यांच्या कार्यावर अवलंबून नसून, ती सर्वसामान्य नागरिकांच्या सक्रिय सहभागावर आधारित असते. सामाजिक चळवळी हे परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असते. या चळवळी समाजात अन्याय, विषमता, भ्रष्टाचार, अज्ञान आणि रूढी परंपरांविरुद्ध आवाज उठवतात. पण या चळवळींचा प्रभाव टिकवायचा असेल, तर प्रत्येक समाजघटकाने आपली जबाबदारी ओळखून समाजासाठी थोडा वेळ द्यायला हवा.आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकजण "माझं काय जातंय?" या मानसिकतेत जगत आहेत. ही उदासीनता सामाजिक एकात्मतेला बाधा पोहोचवते. जर प्रत्येक व्यक्ती थोडा वेळ समाजहितासाठी खर्च करेल, तर अनेक समस्या निर्माण होण्याआधीच थांबवता येतील. युवकांनी समाजप्रश्न समजून घेतले पाहिजेत, महिलांनी हक्क आणि समानतेसाठी जागरूक राहिलं पाहिजे, आणि ज्येष्ठांनी आपला अनुभव नव्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे. सामाजिक चळवळ ही टिकवण्यासाठी वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून सामूहिक हितासाठी काम करणे आवश्यक आहे. अन्यथा समाज दिशाहीन होईल आणि त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील. म्हणूनच, "समाजासाठी वेळ द्यावा, यातुन समाज घडवावा" ही आपली सामूहिक जबाबदारी आहे याकरीता शिव, शाहू,फुले, आंबेडकर प्रबोधन समितीद्वारे वैचारिक परिवर्तन चळवळ उभारली गेली असून राज्यभरातील विविध गांव शहरात याद्वारे सामाजहिताचे कार्य हाती घेण्यात आले आहे,त्याचाच एक भाग म्हणून शिव, शाहू, फुले, आंबेडकर प्रबोधन समितीच्यावतीने सामाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे श्रीरामपूर येथील बेलापूर रोडवरील यशोधन कार्यालयात शनिवार दि.१४ जुन २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिर्डी लोकसभा मतदारसंघ कार्याध्यक्ष अशोक (नाना) कानडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास मा.बालाजी सोनटक्के साहेब (मा.सहा.आयुक्त,तपास अधिकारी विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर) व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा.भास्कर लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती,

       शिव,शाहू,फुले आंबेडकर विचार प्रबोधिनी प्रबोधन व गौरव सोहळ्यात सर्वश्री शिवाजी गांगुर्डे, चांगदेव देवराय,समता फाऊंडेशन चे शौकतभाई शेख, कार्लस साठे,मेजर कृष्णा सरदार यांचा शाल फेटा, पुष्पगुच्छ आणी सन्मान चिन्ह (ट्रॉफी) देवून सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी मा.बालाजी सोनटक्के साहेब यांनी सामाजातील उणीवा आणी सामाज्याच्या आशा अपेक्षा आणी उपेक्षा यावर प्रकाश झोत टाकत संघटित राहण्याचे फायदे आणी विखुरले जाण्याचे नुकसान यावर आपले मनोगत व्यक्त केले. तसेच आदिवासी संघटनेचे नेते- शिवाजीराव गांगुर्डे,कार्लस साठे सर, मेजर कृष्णा सरदार, ऍड.मोहसीन शेख,अमोल शिरसाठ यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तर अशोक (नाना) कानडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सामाजिक चळवळ याविषयी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.

     यावेळी अदिवासी समाजाची पहिली महिला वकील ऍड.प्रियंका शिवाजीराव गांगुर्डे व ऍड.संदेश दिलीप गांगुर्डे यांचा सत्कार करणेत आला.

         या भरगच्च कार्यक्रमास सर्वश्री नितीन शिंदे सरपंच, दादासाहेब कांबळे, सौ. मोहिनी खैरे, सौ.सोनाली देवराय,निलेश भालेराव, दिपक कदम, दिलीप शेंडे सर, सौ. सुनंदाताई शेंडे, अमोल शिरसाठ, राजेंद्र कोकणे, भाऊसाहेब गव्हाणे, बाळासाहेब सावंत, बंडोपत बोडखे, अर्जुन राऊत, मगर सर, बाळासाहेब गोळेकर, सुदाम मोरे, संजय दळवी, नामदेव कानडे, लक्ष्मण अभंग, नानासाहेब रेवाळे, सतीश बोर्डे, हरिभाऊ बनसोडे, राजेंद्र औताडे, अशिष शिंदे, कल्पेश माने, प्रतीक कांबळे, सम्राट माळवदे, रवि राजुळे, संतोष देवराय, राजू थोरात, संजय केदार, किशोर गाढे, सुभाष पोटे, अशोक खैरे, दिलीप अभंग,समता फाऊंडेशन चे ऍड.मोहसीन शेख, मुश्ताकभाई शेख,नदीम गुलाम, इब्राहीम बागवान सर,शेख फरजाना बाजी, सरताज शेख, ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे,राजू मोरे, प्रियंका गांगुर्डे, कलीम शेख, हारुन बागवान, छगन क्षिरसागर, किशोर सातपुते, भारत कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक दिनेश देवरे यांनी तर सूञ संचलन-दिलीप शेंडे सर यांनी केले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग* ✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस, 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Monday, June 16, 2025

महावितरणच्या लेखी पत्रामुळे तोंडाला काळे फासणे आंदोलन स्थगित

- श्रीरामपूर -प्रतिनिधी -वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील व शहरातील सतत पंधरा ते वीस तास तसेच अधून मधून दोन दोन तास वीज पुरवठा खंडित होत होता त्यामुळे श्रीरामपूरातील वीज ग्राहकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत त्यामुळे रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी सर्व पक्षांच्या वतीने गंभीर इशारा तिला होता की 16जुन दुपारी तीन वाजता लोकमान्य टिळक वाचनालय आझाद मैदान या ठिकाणी आमदारांच्या उपस्थितीत होणाऱ्या महावितरणच्या आढावा बैठकीसाठी महावितरणच्या कार्यकारी अभियंता अजय भंगाळे तसेच उपकार्यकारी अभियंता प्रमोद केदारे तसेच त्यांचे अन्य अधिकारी त्या महावितरण च्या आढाव्या बैठकीसाठी येणार होते त्यामुळे श्रीरामपूरातील सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते हे महावितरणच्या अधिकाऱ्यांना सततचा होणारा वीजपुरवठा खंडित का होतो याचा जाब विचारून निषेध म्हणून अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार होते परंतु उपकार्यकारी अभियंता प्रमोद केदारे यांनी आंदोलन करताना येथून पुढे वीजपुरवठा खंडित न होता सुरळीत वीजपुरवठा चालू राहील त्याचबरोबर यदा कदाचित वीजपुरवठा खंडित झाला तर त्याची माहिती ज्या त्या भागातील वायरमन तसेचअधिकारी ग्राहकांना देतील तसे त्यांना आदेश दिले आहे म्हणून आपले होणारे आंदोलन स्थगित करावे असे त्यांनी लेखी पत्र रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन मर्चंड असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड अझर पठाण अरबाज पठाण यांना लेखी पत्र दिलत्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचे आंदोलन तुर्तस्तगीत करण्यात आले आहे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी पूल कोसळला. त्यात अनेक जणं वाहून गेलेत आणि काही जणं मृत्युमुखी पडलेत.


वरील धक्कादायक घटनेत नक्की हानी किती झाली आहे याचा अंदाज आला नाहीये. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.



हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली हा प्रश्न आहेच. जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का नाही झाला ? प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की, 'बचावकार्य वेगाने सुरु आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं आहे...'
पण मुळात हा प्रसंग का येतो ? सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? त्यांनी दर काही महिन्यांनी किंवा या घटनेपुरतं बोलायचं झालं तर पावसाळयाच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत, त्याची तपासणी, त्याची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणे असं काही नियोजन करता येत नाही ? बरं प्रशासन करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचं नियोजन करून प्रशासनाकडून कामं करून का घेता येत नाहीत ? आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग पण राज्याला काय उपयोग ?

पण लोकांनी देखील उत्साहाला थोडा आवर घालायला हवा. अशा धोकादायक ठिकाणी जाताना, आपल्या कुटुंबाला घेऊन जाताना थोडं भान ठेवायला हवं. अर्थात म्हणून सरकारची जबाबदारी कमी होते असं नाही. पण सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क रहायला हवं. 

आत्ता कुठे मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे तर राज्यातल्या बऱ्याच शहरांत पाणी साठणं, रस्त्यांची चाळण होणं, पूल पाडणं अशा घटना सुरु झाल्यात. या सगळ्यात सरकारने आतातरी युद्धपातळीवर काम करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल हे पहावं.

राज ठाकरे 

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

महात्मा गांधी शैक्षणिकसंकुलात नवागतांचे स्वागत


अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात विद्यालय व कन्या विद्यालयाच्या वतीने इयत्ता पाचवी वर्गात प्रवेश घेणाऱ्या नवगतांचे स्वागत नुकतेच करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य विनायक मेथवडे, मुख्याध्यापिका नालिनी जाधव, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, पर्यवेक्षिका संगीता सांगळे हे उपस्थित होते. यावेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे यांनी केले. याप्रसंगी इयत्ता पाचवी वर्गामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५- २६ मध्ये प्रवेश घेणाऱ्या तसेच इतर वर्गात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प आणि पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी भागवत थोरात, भाऊपाटील धावणे, अनिता लवांडे, मारिया गायकवाड, नरेंद्र ठाकरे, डॉ. शरद दुधाट, संजय ठाकरे, माधुरी वडघुले यांच्यासह पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य मेथवडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थी दशेतील आठवणी सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी सोहोनी यांनी केले तर शेवटी संगीता उगले यांनी आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Wednesday, June 11, 2025

अहमदनगर मुस्लिम फाऊंडेशनकडून गरजु विधवा महिलांना आर्थिक मदत मुस्लीम फाऊंडेशनचे वंचित व दुर्बलांसाठी केलेले कार्य अनुकरणीय - शांताराम राऊत


- अ,नगर - प्रतिनिधी -वार्ता -
समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या "अहमदनगर मुस्लिम वेल्फेअर फाउंडेशन" ने एक अनुकरणीय पाऊल उचलले आहे. संस्थेच्या वतीने शहरातील अनेक गरजू विधवा महिलांना आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे गरजूंना नवा आत्मविश्वास मिळाल्याचे चित्र आहे. या सामाजिक उपक्रमाचे अनेकांनी खुलेपणाने स्वागत केले असून इतर संस्थांसाठीही ही एक प्रेरणादायक कृती ठरली असल्याचे प्रतिपादन निसर्ग लाॅन औरंगाबादचे संचालक व नाभिक संघटना महाराष्ट्र चे अध्यक्ष शांताराम राऊत यांनी केले. 
           अहमदनगर डिस्ट्रिक्ट मुस्लिम वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने विधवा महिलांना मदतीचे धनादेश निसर्ग लाॅन औरंगाबादचे संचालक व नाभिक संघटनेचे अध्यक्ष शांताराम राऊत यांच्या हस्ते मुस्लिम फाऊंडेशनच्या कोटला येथील कार्यालयात वाटप करण्यात आले. यावेळी अहमदनगर मुस्लिम वेल्फेअर फाऊंडेशनचे संस्थापक व्यवस्थापक व माजी उपनगराध्यक्ष हाजी नजीरभाई,अध्यक्ष डॉ. सईद शेख, सेक्रेटरी मुबीन तांबटकर, ट्रस्टी हाजी मिर्झा, इंजि. इकबाल सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते. 
या विशेष कार्यक्रमात प्रत्येक गरजू लाभार्थी महिलेला मदतीचे धनादेश सुपूर्त करण्यात आले. मदतीसोबत महिलांना आत्मनिर्भरतेच्या दिशा दाखविणारे मार्गदर्शनही देण्यात आले.
पुढे बोलताना शांताराम राऊत म्हणाले की, या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे की मुस्लिम फाऊंडेशनने गरजू विधवा महिलांना प्राधान्य दिले आहे. 
महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सशक्तीकरणाचे ध्येय मुस्लिम फाऊंडेशनचे असुन "विधवा महिलांसाठी ही मदत फक्त रक्कम नसून त्यांना जगण्याची नवी उमेद देणारी प्रेरणा आहे असे सांगितले.
समाजातील प्रत्येक घटक सुरक्षित आणि सन्मानाने जगावा हेच आमचे ध्यैय आहे. असे मुस्लिम फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सईद शेख यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुबीन तांबटकर यांनी केले. तर हाजी मिर्झा यांनी आभार मानले. वृत्त विशेष सहयोग, ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Tuesday, June 10, 2025

माजी आ.भानुदास मुरकुटे व माजी नगर सेवक संजय छल्लारे यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
मुंबईत काल शनिवार दि. ७ जुन २०२५ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीरामपूर येथील माजी आमदार भानुदास मुरकुटे व माजी नगरसेवक संजय छल्लारे, निरज मुरकुटे, गणेश छल्लारे, प्रवीण फरगडे, सिद्धांत छल्लारे, लक्ष्मण कुमावत,भगवान उपाध्ये, शेखर दुब्बैया, तेजस बोरावके, रोहित नाईक, संजय साळवे, संजय परदेशी, महेंद्र टाटिया यांच्यासह इतर अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेनेचे राज्य सचिव राम रेपाळे, सचिव संजय मोरे, प्रवक्ते राहुल लोंढे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       या पक्षप्रवेशामुळे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक बळावणार आहे, त्यामुळे श्रीरामपूर चे अनेक गणिते बिघडणार असल्याचे दिसून येत आहे.हा पक्ष प्रवेश प्रामुख्याने विकासाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. ग्रामीण व शहरी भागातील अनेक माजी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच, व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्याचा या सोहळ्यात लक्षणीय सहभाग होता. त्यामुळे येत्या काळात स्थानिक राजकारणात मोठे बदल घडण्याची चिन्हे देखील दिसून येत आहेत. याप्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत, मुख्यमंत्री असताना राज्यातील सर्वसामान्यांसाठी अनेक लोककल्याणकारी योजना आम्ही आणल्या.सध्या महायुतीची दुसरे पर्व सुरू आहे. देवेंद्र फडणवीस आणि माझ्या नेतृत्वाखाली सरकारने महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेताना 'सर्वसामान्य माणूस' केंद्रस्थानी ठेवला आहे. महाराष्ट्राची प्रगती, औद्योगिक वाढ आणि सामाजिक समरसता हेच आमचे ध्येय

*प्रगती आणि समृद्धीचे सरकार*

एखाद्याला शब्द दिला तर तो पूर्ण करतो हे मुख्यमंत्री असताना मागील अडीच वर्षांत महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आणि अनुभवले आहे.महायुतीच्या नेतृत्वाखाली सरकार हे स्थगिती नव्हे तर प्रगती व समृद्धीचे सरकार असल्याचा पुनरुच्चार ना. शिंदे यांनी यावेळी केला.
 मुरकुटे यांच्या प्रवेशाने या सोहळ्यात विशेष लक्ष वेधून घेतले,निरज मुरकुटे (माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नातू ) यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतल्यानंतर थेट शिवसेनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.याबद्दल शिंदे म्हणाले, "समाजहितासाठी उच्चशिक्षित पिढीने राजकारणात सक्रीय भाग घेणे ही काळाची गरज आहे. निरज मुरकुटे यांच्यासारखे तरुण हे पक्षाला बळकटी देणारे आहेत असेही ना. शिंदे म्हणाले.याच कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेचे युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अलीकडील परदेश दौऱ्याचा विशेष उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.श्रीकांत शिंदे यांनी चार देशांच्या दौऱ्यात ऑपरेशन सिंदूर' संदर्भात भारताची भूमिका प्रभावीपणे मांडली आणि पाकिस्तानचा खरा चेहरा उघड केला. त्या चारही देशांनी भारताला पाठिंबा देत पाकिस्तानला विरोध दर्शवला असेही त्यांनी स्पष्ट केले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

पहिली वर्गाच्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण सुरू

- अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
महाराष्ट्र शासन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अहिल्यानगर आणि पंचायत समिती राहाता यांच्या संयुक्त विद्यमाने राहाता येथे इयत्ता पहिली वर्गाच्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण आज (०९/०६/२०२५) पासून सुरू झाले आहे. 
शैक्षणिक वर्ष २०२५- २६ पासून महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि केंद्रीय बोर्डाचा अभ्यासक्रम स्वीकारल्यामुळे पहिलीचा अभ्यासक्रम बदलणे क्रम प्राप्त होते. पहिलीचा अभ्यासक्रम बदलल्यानंतर हे प्रशिक्षण सुरू झाले आहे. यंदा इयत्ता पहिलीपासून नवीन शैक्षणिक धोरणाची सुरुवात टप्प्याटप्प्याने होत आहे. त्यामुळे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून दि. २८ ते ३० मे २०२५ या कालावधीत कोकमठाण येथे पहिल्या इयत्तेचे अभ्यासक्रमाचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता जिल्ह्यातील तालुकास्तरावरचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. राहाता येथील पहिली वर्गास शिकवणारे १७० शिक्षकांचे प्रशिक्षण गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे व समन्वयक दिलीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली रयत शिक्षण संस्थेच्या शारदा विद्या मंदिर येथे हे प्रशिक्षण दि. ९ ते ११ जून २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनुसार टप्प्याटप्प्याने आयोजित केलेल्या या प्रशिक्षणामध्ये राहाता तालुका अधिनस्त सर्व जिल्हा परिषद खाजगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळांमधील इयत्ता पहिली वर्गात शिकवणाऱ्या सर्व शिक्षकास हे प्रशिक्षण सक्तीचे करण्यात आलेले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

राष्ट्रवादी (A.P.) सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष पदी चांगदेव देवराय तर शहराध्यक्ष पदी दीपक कदम


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
राष्ट्रवादी पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या तालुक्याच्या अध्यक्षपदी कान्हेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते चांगदेव देवराय यांची तर श्रीरामपूर शहरातील पत्रकार दीपक कदम यांची शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली तालुक्याचे माजी आमदार तथा पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष लहुजी कानडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले, पक्ष बळकटी साठी देवराय व कदम यांनी काम करणार असल्याचे यावेळी सांगितले त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष अरुण पा.नाईक, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष निलेश भालेराव, जिल्हा कार्याध्यक्ष अशोक (नाना) कानडे, पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, शहराध्यक्ष अभिजित लिपटे तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ते आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Sunday, June 8, 2025

वेळ लागणार नाही दुर्घटना घडायला ?कारण जुणे बांधकाम आले पडायला !! देवळाली प्रवरा आरटीओ शिबीर कॅम्पचीजागा बदलावी - नागरीकांची मागणी


- जावेद शेख - राहूरी -/ वार्ता -
गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील पाटबंधारे खात्याच्या विश्रामगृहात उपप्रादेशिक परिवहन (आर.टी.ओ.) उपविभाग श्रीरामपूर या कार्यालयांतर्गत नागरिकांच्या विविध कामांसाठी आरटीओ शिबीर कॅम्प चे आयोजन करण्यात येत असते,परंतू या विश्रामगृहाच्या इमारतीची मोठी दुरावस्था झाल्याने सदरची इमारत कधी कोसळेल याचा भरोसा राहिलेला नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदरील ठिकाणच्या आरटीओ शिबीर (कॅम्प ची) जागा बदलावी अशी मागणी नागरिकांद्वारे करण्यात येत आहे. 
श्रीरामपूर प्रादेशिक परिवहन (आर टी ओ) कार्यालयांतर्गत राहूरी तालुक्यातील नागरीकांसाठी वाहन चालविण्याचा परवाना,वाहन नोंदणी (रजिस्ट्रेशन) तसेच आर टी ओ अंतर्गत येणाऱ्या विविध कामांसाठी महिन्यातून दोनदा पंधरवाडा शिबीर (आर टी ओ) कॅम्प चे आयोजन देवळाली प्रवरा पाटबंधारे खात्याच्या विश्रामगृहात गेली अनेक वर्षांपासून केले जाते, तालुक्यातून नागरिक या साठी येतं असतात, पाटबंधारे खात्याच्या या विश्रामगृहाचे बांधकाम तब्बल एकशे तेवीस वर्षांपूर्वीचे (सन १९०२) आहे, ब्रिटीश कालीन या बांधकामाची सध्या मोठी दुरावस्था झाली आहे,संपूर्ण बांधकाम पडण्याच्या परिस्थिती मध्ये असून काही भागांचे पत्रेही गळूनही पडलेले आहेत, या ठिकाणी दर पंधरा दिवसांनी आरटीओ कॅम्पद्वारे शिबीराचे आयोजन करण्यात येत असल्याने वाहनं चालविण्याचा परवाना काढण्यासाठी महिला, तरुण, तरुणी,मुले यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो, तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी, नागरिक आपल्या विविध प्रकारच्या वाहनांचे नोंदणी (रजिस्ट्रेशन) करण्यासाठी याठिकाणी गर्दी करत असतात,राहुरी फॅक्टरी ते देवळाली प्रवरा या दोन्हीं गावाच्या मध्ये हे शिबीर होत असल्याने नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाही,त्यावर सदरचे इमारत बांधकाम पडण्याच्या मार्गावर असल्याने कधी काहीही अनर्थ घडण्याची भिती व्यक्त होत असून सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अधिकच नागरिकांना खबरदारी घ्यावी लागत असल्याने श्रीरामपूर प्रादेशिक परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे, राहुरी ते राहुरी फॅक्टरी दरम्यानं एखाद्या शासकीय किंवा निमशासकीय जागेवर शिबीराचे आयोजन केल्यास नागरिकांना यांचा फायदा होईल तरी परिवहन विभागाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. - 

-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-
वृत्त विशेष सहयोग,
ज्येष्ठ पत्रकार रमेश बोरुडे,राहूरी, ✍️✅🇮🇳...
-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-

=================================
-----------------------------------------------
वृत्त प्रसिद्धी सहयोग 💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर -9561174111
-----------------------------------------------
=================================

आनंदवन हे समाजसेवेचे विद्यापीठ आहे - कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के आनंदवन येथे विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान तर्फे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
आनंदवनात कामाचे बोलायचे नाही तर त्यांचे काम हेच बोलणे आहे. आनंदवनात गेलो की एक ऊर्जा प्राप्त होते. ही ऊर्जा वर्षभर टिकून राहते. बाबांनी निर्माण केलेले आनंदवन हे समाजसेवेचे स्फुल्लिंग चेतवणारे विद्यापीठ असल्याचे मत सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानच्यावतीने रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन स्वर्गीय ॲड. रावसाहेब शिंदे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा यावर्षीचा राष्ट्रीय पातळीवरील समाजसेवा पुरस्कार आनंदवन येथील महारोगी सेवा समितीला जडणघडणचे संस्थापक संपादक डॉ. सागर देशपांडे यांच्या हस्ते महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. भारती आमटे यांना प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र व धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे सचिव सुखदेव सुकळे यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सातारा येथील रयत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के हे उपस्थित होते. या कार्यक्रमात श्रद्धेय बाबा आमटे व ऍड. रावसाहेब शिंदे यांच्यातील सत्कारापेक्षा सतकार्य या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, डॉ. ज्ञानदेव म्हस्के, सुखदेव सुकळे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील जडणघडण मासिकाचे संपादक डॉ. सागर देशपांडे हे होते. त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, ज्या कुष्ठरोगांसाठी काम करायचे तीच माणसे सोबत घेऊन बाबांनी काम उभे केले व जगाला दाखवून दिले. केलेले कार्य चिरकाल टिकून राहते हे आनंदवनाने दाखवून दिले आहे. बाबानंतर आज त्यांची तिसरी पिढी अव्याहतपणे आनंदवनाचे कार्य जोमाने करीत आहे. यामुळे पुढच्या पिढीला त्याचा फायदा मिळतो. आनंदवन हे विचारांचे एक ऊर्जा केंद्र असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. विकास आमटे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की समाजाला काहीतरी नवीन द्यायचे असते या दृष्टीने विचार करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करून विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. याप्रसंगी ह.भ.प. सखाराम कर्डिले महाराज, विश्वस्त सुधाकर कडू गुरुजी, कवीश्वर काका, सदाशिव ताजणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविवर्य दीपक शिव यांनी केले. तर विद्या निकेतनचे अधीक्षक रवींद्र नलगंटीवर यांनी सन्मानपत्राचे वाचन व आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅💐...
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================