राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, February 18, 2023

'मिशन भागिरथी'उपक्रम जिल्हा परिषद कडून जलसंधारणाची कामे होणार ?

जिल्हा नियोजन समितीकडून जलसंधारण विभागाला दरवर्षी साधारणपणे 15 कोटींचा निधी येतो. त्यातून पुरेशी कामे होत नाहीत. मात्र यंदा जिल्हा परिषदेच्या या अभिनव योजनेमुळे रोजगार हमी योजनेतून दरवर्षी जवळपास 100 कोटींची जलसंधारणाची कामे होऊन सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरगाणा तालुक्यातील काही गावांच्या सरपंचांनी विकास होत नसल्यामुळे गुजरात राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधींची धावपळ उडाली होती. पालकमंत्री दादा भुसे यांनी सुरगाणा तालुक्यातील गावांचे सरपंच व प्रशासन यांची बैठक घेऊन सुरगाणा तालुक्याच्या विकासासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सुरगाणा तालुक्याचा दौरा करून तेथील माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी शिक्षण, आरोग्य, कृषी, रस्ते, पायाभूत सुविधा यांचा आढावा घेतला. यामुळे सुरगाणा तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी त्यांनी एक आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांना दिल्या असून तो आराखडा अंतिम टप्प्यात आहे.
त्यात सुरगाणा, पेठ, बागलाण, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, येवला, चांदवड, देवळा, नांदगाव व मालेगाव या तालुक्यांमधील 150 गावे निश्चित करण्यात आली आहेत. या गावांमध्ये पाच ते सहा बंधारे बांधण्यात येणार आहेत. यात पाच ते 30 लाख रुपयांच्या मर्यादेत गरजेनुसार बंधार्‍यांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामांचा ग्रामपंचायत विभागाकडून रोजगार हमी योजनेच्या आराखड्यात समावेश करण्यात आला असून पुढील आठवड्यात या कामांना ग्रामपंचायत विभागाकडून प्रशासकीय मान्यता दिल्या जातील व मार्चपासून या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.





(शेतकरी संघटना,) बिड जिल्हा यांच्या वतीने मा.रघुनाथदादा पाटील यांना स्वागत समारंभ कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले ?

( बिड) - समाचार - शेतकरी संघटना बीड जिल्हा यांच्या वतीने आयोजित मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह अंबाजोगाई जि.बीड या ठिकाणी मा.रघुनाथदादा पाटील यांचा सन्मान सोहळा परिसंवाद
यावेळी उपस्थित मा. अमर हबीब प्रणेते किसन पुत्र आंदोलन, मा. कालिदास आपेट कार्याध्यक्ष शेतकरी संघटना, मा.डॉ.प्रशांत शिनगारे, मा.राहुल पाठक, मा.बंडू सोळंके मराठवाडा विभाग अध्यक्ष, मा.अमृतराव शिंदे परभणी
जिल्हाध्यक्ष, मा.राजकुमार सस्तापुरे लातूर जिल्हा अध्यक्ष, मा. आनंदराव भालेराव शेतकरी संघटना ऊस तोडणी कामगार संघटना अध्यक्ष, मा.आजमुद्दीन शेख पश्चिम बीड जिल्हाध्यक्ष, मा.अनुरथ काशीद पूर्व बीड जिल्हाध्यक्ष, बीड जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी व शेतकरी बंधू-भगिनी उपस्थित होते.

Thursday, February 16, 2023

2024 ला स्वराज्य निवडणूक लढणार छत्रपती संभाजीराजे नि नाशिकमध्ये केली मोठी घोषणा ?

स्वराज्य संघटनेचे संस्थापक माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी 2024 च्या निवडणुका लढणारअसल्याची घोषणा नाशिक मध्ये केली आहे.
----------------------------------------------------
( नाशिक  ) - वार्ता -
नाशिक, 11 फेब्रुवारी : "मी चळवळीत काम करुन थकलोय, आता निर्णय घ्यावा लागेल", असे म्हणत माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी 2024 च्या निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. आज संभाजीराजे छत्रपती यांनी नाशिकमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं.
[ रायतेत ले सर्व घटक सोबत घेऊन संविधानिक व प्रामाणिक तत्वाने राज्ये चालूवु,]___________________
====================================
वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये संभाजीराजे यांचा होणार भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आलं होतं. नागरी सत्कारापूर्वी समर्थकांकडून संभाजीराजेंचा महाराष्ट्राच्या हृदयातील मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करत फलकबाजी करण्यात आली. पन्नास वर्षांनंतर पहिल्यांदा संभाजीराजे यांचा अभिष्टचिंतन सोहळा कोल्हापूर बाहेर होत आहे. यावेळी संभाजीराजे यांनी संघटनेची पुढील भूमिका स्पष्ट केली.2024 निश्चित स्वराज्य लढणार : संभाजीराजे छत्रपतीमला मिळालेलं प्रेम कोणत्याही नेत्याला मिळणार नाही. स्वराज्य संघटना स्थापन केली. मात्र, किती दिवस चळवळीत काम करायचं? कार्यकर्त्यांवर अनेक खटले आहेत ते कोण सोडवणार? 2013 साली सगळे एकत्र आले. मागण्या मान्य झाल्या. 2000 विद्यार्थ्यांची चूक नसताना त्यांना बाद केलं. त्यासाठी मी आमरण उपोषण केलं. किती दिवस स्वराज्य संघटना चालवायची. ज्याच्याकडे पैसे तोच आमदार खासदार होणार का? लोक म्हणतात की तुम्ही सत्तेत या. स्वराज्य 101 टक्के राजकारणात आल्याशिवाय राहणार नाही, अशी घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे. 2024 हे निश्चित ध्येय असणार आहे.
संस्कृतीक परी भाषा काव्ये.
श्री अतुल चव्हाण मुख्ये अभियंता सा बा (प्रादेशिक ) विभाग पुणे 
----------------------------------------------------
====================================
आमचा तुम्हाला विरोध नाही, पण स्वराज्य सुद्धा असणार हे निश्चित. शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी कामाला लागू. माझ्यासाठी नाही पण गरिबांना ताकद देण्यासाठी आता स्वराज्य येणार आहे.वाचा - मनसेनंही आपला मोर्चा ठाण्याकडे वळवला; राज यांच्या खेळीने मुख्यमंत्र्यांना बळ मिळणार?'मी चळवळीत काम करुन थकलोय, आता निर्णय घ्यावा लागेल. चळवळीत काम करणारे फक्त काम करतात. त्यांनी जनसेवेसाठी सत्तेत यायचे कि नाही स्वराज्य किती दिवस सामाजिक राहणार, मी आज वाढदिवसानिमित्त मुद्दाम सांगायचंय स्वराज्य संघटना घेऊन आम्ही महाराष्ट्र पिंजून काढायला गालो पन खुप प्रश्न दिसले व ते सोडविण्यासाठी स्वराज्य हे 101% राजकारणात येणार बऱ्याच दिवसानंतर आम्ही तिघे एकत्र आलो आहे. ज्यांनी मला सांगितलं की आम्ही घर सांभाळतो तुम्ही समाजाची सेवा करा, अशा माझ्या पत्नी यांचे देखील आभार. अनेकदा भाषण करण्याची संधी मिळते. पण 52 वर्षात पहिल्यांदा माझा वाढदिवस कोल्हापूर सोडून नाशिकमध्ये साजरा करतोय. शिवाजी महाराज महाराष्ट्रात सुरतेची लूट करून येत असताना आधी नाशिकला आले. म्हणून आज नाशिकला वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. मी 4 कोटीच्या गाडीतुन फिरत नाही. हेलिकॉप्टरमधून प्रवास करत नाही. दिवसाला 15 तास प्रवास करतो. पण आता रात्री प्रवास करत नाही. माझ्यात कुठून शक्ती आली मला माहिती नाही. मनापासून बोलावलं की मी कार्यक्रमाला पोहोचतोच. काही लोक कॅमेरा घेऊन बांधावर जातात. फोटो काढले की निघातात. मात्र, संभाजी छत्रपती तुमच्यासारखाच राहतो, असेही संभाजीराजे म्हणाले.  (शायR मिर्जा.)

महाराष्ट्राचे भाग्यविधाते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष, मराठी हृदयसम्राट, सन्माननिय #श्री_राज_साहेब_ठाकरे यांच्या कडून पद अधिकारी नेमणूक पत्र ?

( मुंबई ) - वार्ता - समाचार महाराष्ट्राचे भाग्यविधाते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष, मराठी हृदयसम्राट, हिंदुजननायक सन्माननिय #श्री_राज_साहेब_ठाकरे यांच्या आदेशाने, आणि आशीर्वादाने , मनसे नेते #मा_श्री_शिरीष_सावंत_साहबे आणि
मनसे सरचिटणीस #मा_सौ_रिटा_ताई_गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चांदिवली विधानसभा विभाग अध्यक्ष #मा_श्री_महेंद्रभाई_भानुशाली_साहेब आणि महिला विभाग अध्यक्षा
#सौ_संगीता_ताई_लांडे यांच्या प्रयत्नाने आज #सौ_संजना_संतोष_कासले वाहिनी यांची चांदिवली विधानसभा #प्रभाग_क्रमांक_१५६ च्या, #महिला_शाखा_अध्यक्षा पदी नियुक्ती करण्यात आली. वहिनींचे विभागातील समाज कार्य आणि पक्ष कार्य पाहून स्वतः #मा_श्री_राज_साहेबांनी  हि जबाबदारी सोपवली आहे...

सर्व नवनियुक्त महिलापदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन शुभेच्छा...💐

-------------------------------------------------
==================================
( विशेष ) वूर्त प्रसारित,

       ( महाराष्ट्र नव निर्माण सेना ) मार्च महिन्यात सुरू होणाऱ्या दहावी परीक्षेत योग्य आकलनाकरिता दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका मिळण्याची सवलत बोर्डाने रद्द केली होती..
रोनानंतर मुलांच्या अभ्यासावर लिखाणावर परिणाम झाल्याकारणाने मुलांच्या बाजूने विचार करता हा निर्णय बदलावा अशी सर्व पालकांची इच्छा होती. दहा मिनिटे आधी पेपर मिळाल्याने प्रश्नांचा योग्य विचार करून आणि व्यवस्थित आयोजन करून पेपर लिहिण्यामध्ये मदत होते पण ही वेळच हिरावल्यामुळे मुलांवर सहाजिकच ताण येणार होता. अशावेळी सर्व पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्याकडे हा निर्णय रद्द करून, दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका मिळण्याची सवलत पुन्हा सुरू करून द्यावी अशी विनंती केली. कालच मिळालेल्या याचिकेवर तातडीने विचार करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेत याविषयी निवेदन केले.. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन, पेपर संपताना वाढीव दहा मिनिटे मुलांना देण्यात येतील असे आश्वासन दिले. या निर्णयामुळे महाराष्ट्रातून दहावीला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.. पालकांची विनंती योग्य वेळेत मान्य करत तातडीने महाराष्ट्र बोर्डाला हा निर्णय घेण्यासाठी माननीय राजसाहेबजी ठाकरे यांनी योग्य पावले उचलली म्हणूनच हे शक्य झाले.. आणि सामान्य माणसाचं आपल्या नेत्याविषयी प्रेम आणि विश्वास अधिकच वाढला!

- सुप्रिया दरेकर -


Wednesday, February 15, 2023

आनंदाची बातमी (Good News) सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी ?

(नाशिक) - वार्ता - समाचार.
--------------------------                           सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या  संघटनांकडून अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येण्याशक्व्य.
सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना सध्या असलेली ३० लाख रुपयांच्या कामांसाठी टेंडरमध्ये (tender) सहभागी होण्याची मर्यादा आता ७५ लाखापर्यंत वाढवण्यासाठी या प्रयत्नांना यश मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. याबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी लवकरच जिल्हा परिषदेच्या कामांसाठी सुशिक्षित बेरोजगारांना टेंडरमध्ये सहभागी होण्याची मर्यादा वाढवून ७५ लाख रुपये करणार असल्याचे आश्‍वासन दिले आहे. असे झाल्यास सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना मोठ्या कामांच्या टेंडरमध्ये सहभाग घेता येणार आहे.प्रत्येक सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यास नोकरी (job) देऊ शकत नाही, म्हणून सरकारने त्यांना सरकारी बांधकाम क्षेत्रातील कंत्राटे घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी दहा लाख रुपयांच्या आतील कामांमध्ये सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना ३३ टक्के कामे दिली जातात. त्याचप्रमाणे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना जिल्हा परिषद (zilha parishad) व सार्वजनिक बांधकाम विभागातील (Department of Public Works) बांधकामाची कंत्राटे घेण्यासाठी ३० लाख रुपयांपर्यंत टेंडरमध्ये सहभागी होता येते. मात्र, ही मर्यादा ठरवण्याला अनेक वर्षे झाली आहेत. त्यामुळे ३० लाख रुपयांची मर्यादा आता अपुरी पडत असल्यामुळे ती वाढवण्यात यावी, अशी मागणी या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची गेल्या पाच वर्षांपासून आहे.
राज्य अभियंता संघटनेने तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानंतर वेळोवेळी सचिवांच्या तीन बैठका मुंबईला (mumbai) पार पडल्या. त्यांनी याबाबत सकारात्मक अहवाल सादर केला होता. मधल्या काळात हे प्रकरण मागे पडले असले तरी आता विद्यमान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Rural Development Minister Girish Mahajan) यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल व जिल्हा परिषदेत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना ७५ लाख रुपयांच्या कामांच्या टेंडर प्रक्रियेत सहभागी होता येईल, असे सांगितले आहे.सुशिक्षित बेरोजगा अभियंत्यांना दहा लाख रुपयांच्या आतील कामे काम वाटप समितीच्या माध्यमातून दिली जातात. तसेच त्यांना वर्षाला ५० लाख रुपयांपर्यंतची कामे घेता येतात. त्याचप्रमाणे खुल्या टेंडर प्रक्रियेत ३० लाख रुपयांपर्यंत सहभागी होता येते व एका वर्षभरात दीड कोटी रुपयांपर्यंतची कामे करता येतात. ही मर्यादा ७५ लाख रुपयांपर्यंत गेल्यास सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचा खुल्या टेंडर प्रक्रियेतील सहभागी वाढू शकेल, असे राज्य अभियंता संघटनेचे म्हणणे आहे.





पंतप्रधानांकडे जाऊ या ! मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी ?


उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांच्या शि चर्चाकरताना महाराष्ट्रसाहित्य साहित्य परिषद,पुणे चे कार्याध्यक्षप्रा. मिलिंद जोशी.
उपमुख्यमंत्र्यांकडे कार्याध्येक्षाची म.सा.प.मागणी          -----------------------------------------------------------------
( पुणे )- वार्ता - वर्धा : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी साहित्य संस्थांच्या प्रतिनिधीचे व साहित्यिकांचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी नेण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली. वर्धा येथे 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या दिवशीच्या सत्राचा प्रारंभ करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी वर्ध्या येथे उपस्तित  होते. यावेळी प्रा. मिलिंद जोशी यांनी त्यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन त्यांना सादर केले.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने लोकचळवळ उभी केली. पंतप्रधान कार्यालयाला एकलाख पत्रे पाठविली. साहित्यिकांच्या बैठका, त्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन, राजकीय इच्छाशक्तीला आवाहन करण्यासाठी त्यांच्या भेटीगाठी, अशा अनेक गोष्टी केल्या. एवढेच नव्हे तर राजधानी दिल्लीतही आवाज उठविला. आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता होऊनही अद्याप मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. तो
मिळणे ही मराठी माणसांसाठी अभिमानास्पद गोष्ट असणार आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री या नात्याने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी साहित्य संस्थांच्या प्रतिनिधीचे व साहित्यिकांचे शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीसाठी घेऊन जावे, अशी विनंती जोशी यांनी फडणवीस यांच्याकडे केली.





Monday, February 13, 2023

सराईत वाहनचोराच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, शिताफिने पोलिसांच्या ताब्यात 6 गुन्हे उघडकीस ?

( पुणे ) - वार्ता -   Pune Crime News | पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात वाहन चोरी (Vehicle Theft) करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखा युनिट चारने (Crime Branch Unit 4) अटक केली आहे. आरोपीकडून सहा गुन्हे उघडकीस आणून 2 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई (Pune Crime News) 3 फेब्रुवारी रोजी पर्णकुटी चौकात करण्यात आली.
गोविंदराज उर्फ गोविंद माधवराव वाघमारे (रा. सनसवाडी, मुळ रा. मु पो जांभळीगाव, ता. मुखेड, जि. नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे शहरात वाहन चोरीचे गुन्हे वाढत असल्याने गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस अधिकारी व कर्मचारी आरोपींचा शोध घेत होते.
त्यावेळी पोलीस अंमलदार हरीश मोरे (Harish More) व नागेशसिंग कुंवर (Nagesh Singh Kunwar) यांना माहिती मिळाली, की सराईत वाहन चोर पर्णकुटी चौकात उभा असून त्याच्याकडे असलेली दुचाकी चोरीची आहे. पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. (Pune Crime News)
आरोपीकडे चौकशी केली असता त्याने येरवडा (Yerwada Police Station), कोरेगाव पार्क (Koregaon Park Police Station), दिघी (Dighi Police Station), निगडी पोलीस ठाण्याच्या (Nigdi Police Station) हद्दीतून वाहन चोरी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडून सहा गुन्ह्यातील 2 लाख 80 हजार रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करुन सहा वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. पुढील तपासासाठी

आरोपीला येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर
(ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने
(Police Inspector Ganesh Mane), सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव (API Vikas Jadhav),
पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील (PSI Jaideep Patil), पोलीस अंमलदार महेंद्र पवार, हरिष मोरे,
नागेशसिंग कुंवर, हरिष मोरे, विनोद महाजन, रमेश राठोड, मनोज सांगळे, शितल शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.