राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, February 25, 2023

नामांतरावरून एमआयएम संतप्त, घाणेरडे राजकारण जगासमोर आणण्याचा दिला इशारा ?


( ANI ) News Riportings,Ejancy समाचार.

आता औरंगाबादसाठी आमच्या शक्तीप्रदर्शनाची वाट पाहा. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव नामातंर करण्यास केंद्राने मंजुरी दिली. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे या निर्णयाचे राजकीय पदसाद उमटायला सुरूवात झाली आहे. एमआयएमने (Aimim) या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे. जी-२० परिषदेच्या दरम्यानच आंदोलन करून भाजपचे घाणेरडे राजकारण जगासमोर आणण्याचा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
संभाजी महाराजांना आमचा विरोध नाही, पण त्यावरून सुरू असलेल्या राजकारणाला असल्याचे म्हणत मोठ्या शक्तीप्रदर्शनाला तयार राहा, असा इशाराच त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना दिला आहे. नामातंराच्या निर्णयानंतर इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी ट्विट करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
इम्तियाज जलील म्हणाले, या निर्णयाला विरोध करण्यासाठी मोठा लढा उभा करणार असून, रस्त्यावर उतरणार आहे. जी 20 परिषदेच्या औरंगाबादेतील बैठकी दरम्यानच आंदोलन करणार असल्याचे इम्तियाज यांनी स्पष्ट केले. फडणवीस साहेब हा जिल्हा माझा आहे, कोणाच्या बापाचा नाही. कोणीही माझ्या शहरात येईल आणि हे नाव द्या ते नाव द्या अशी मागणी करेल, सध्या हेच धंदे सुरू आहेत का ?
जी 20 परिषदेच्या बैठकीच्या दिवशी मी जर विरोध केला तर काय करणार मी जगासमोर तुमचे घाणेरडे राजकारण उघडे करीन. फडणवीस गृहमंत्री आहेत, त्यांना सांगतो, मी मोठ आंदोलन उभारणार. नामांतराच्या निर्णयामुळे एक औरंगाबादकर म्हणून मला दुःख झाले आहे. ज्या लोकांना या निर्णयामुळे आनंद होत आहे, त्यांना सांगू इच्छितो सरकार तुमचे आहे म्हणून तुम्ही निर्णय घेतला आहे.
यापुढेही तुम्ही असे निर्णय घेत राहाल, पण ज्यांचे नाव शहराला दिले, त्यांच्या नावाच्या दर्जाप्रमाणे शहर सुधारणार आहात का? आठ दिवसांनी मिळणारे पाणी उद्यापासून दोन वेळा पाणी मिळणार आहे का? असा सवाल देखील इम्तियाज यांनी उपस्थितीत केला. औरंगाबाद आमचे शहर आहे, होते आणि राहील.
आता औरंगाबादसाठी आमच्या शक्तीप्रदर्शनाची वाट पाहा. आपल्या लाडक्या शहरासाठी भव्य मोर्चा... आमच्या शहराच्या नावावर राजकारण करणाऱ्या भाजपच्या शक्तींचा पराभव करण्यासाठी औरंगाबादवासियांनो सज्ज व्हा, आम्ही निषेध करतो आणि आम्ही लढू, असे ट्विट देखील इम्तियाज यांनी करत नामांतराचा विरोध दर्शवला आहे.















मुंबई :उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना आणि धनुष्यबाण निसटल्यानंतर त्यांना धीर देण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढविण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी ठाकरे यांची भेट घेतली. ?



(मुंबई) - समाचार - एजन्सी - उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं नाव, चिन्ह मेरिट कायाद्यानुसार निवडणूक अधिकारी यांनी निर्णय दिल्या नुसार गेलंय. पण सुप्रीम कोर्टाकडून उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल, अशी आशा केजरीवाल यांनी व्यक्त केली. त्याचवेळी दंगली-भांडणं आणि धार्मिक विद्वेषाचं राजकारण काही लोक सातत्याने करत असल्याचं सांगत केजरीवालांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. देशातील भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येऊन मोट बांधली पाहिजे, अशी अपेक्षा या भेटीत केजरीवाल यांनी ठाकरेंजवळ व्यक्त केली, त्यामुळे येणाऱ्या काळात या भेटीचे रिझल्ट देशपातळीवर दिसतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेलं
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर ठाकरेंना मोठा धक्का बसला. देशातील विविध पक्षाचे नेते ठाकरेंना फोन करुन धीर देतायत. तसेच नव्याने लढण्यासाठी आम्ही सोबत असल्याचा संदेश देतायत. अशातच आज मुंबई दौऱ्यावर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, खासदार संजय सिंग, खासदार राघव चढ्ढा यांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली तसेच ठाकरेंचा पाहुणचार घेतला. या भेटीत केजरीवाल यांनी ठाकरेंचं 
तोंड भरून कौतुक केले अस्थांना पुढे केझरीवाल म्हणाले बाळासाहेब वाघ च्या भुमिकेत शोभेल अश्या प्रकारे त्याचे स्वभाव होते, तुम्ही त्यांचे सुपुत्र, लढा-महाराष्ट्र तुमच्या सोबतीला.
सुप्रीम कोर्टही त्यांना न्याय देईल. तोपर्यंत महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक विजयी होतील, अशा शुभेच्छा केजरीवाल यांनी दिल्या. दरम्यान येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही ठाकरेंशी युती करणार का या प्रश्नावर केजरीवाल म्हणाले, 'निवडणुका लागल्या की तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील !!!
दिल्लीने कोरोना काळात मुंबई मॉडेल स्वीकारलं, ठाकरेंनी लै भारी काम केलं !!!

उद्धव ठाकरे यांच्याशी भेटण्याची मला खूप दिवसांपासूनची इच्छा होती. कोरोना ज्यावेळी पीकवर होता त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने उल्लेखनीय काम केलं. दिल्लीने कोरोना काळात मुंबई मॉडेल स्वीकारलं, हे सांगायला मला कोणताच संकोच वाटत नाही, असं खुलेपणाने केजरीवाल यांनी सांगितलं.



          शब्द:रचना,संकलन.
( भगवंत सिंघ प्रितम सिंघ बत्रा )



















Friday, February 24, 2023

लुटारूंनी पिस्तुलातून गोळ्या घालून एका व्यक्तीला ठार मारले ?

(अहमदनगर) - विशेष - वार्ता - केडगाव बायपास येथील हाॅटेल के 9 समोरील एका बंद ढाब्याजवळ एका ४० वर्षीय व्यक्तीची डोक्यात गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री घडली आहे. शिवाजी किसन ऊर्फ देवा होले (रा. कल्याण रोड, नगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अरुण नाथा शिंदे (वय -४५) यांनी फिर्याद दिली असून फिर्यादीत म्हंटले आहे की, दि.२३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास केडगाव शिवारातील केडगाव बायपास रोडवर हॉटेल के ९ जवळ एक बंद ढाब्याजवळ मी व शिवाजी होले असे अंधारात दारु पित बसलेलो असताना केडगाव बायपास रोडकडुन दोन अनोळखी इसम हे आमच्या जवळ पायी चालत आले व आम्हाला म्हणाले की, आम्ही येथे दारु पिवु का? त्यानंतर आम्ही त्यांना म्हणालो आम्ही नेप्तीचे आहोत तुम्ही बिनधास्त बसुन दारु प्या.
त्यानंतर ते दोघे आम्हाला काही एक न बोलता केडगाव बायपास रस्त्याकडे जावुन पुन्हा त्याच रस्त्याच्या बाजुने त्या दोन अनोळखी इसमांसोबात आणखी एक इसम आला. त्यातील एका इसमाच्या हातात चाकु व दुसऱ्या इसमाच्या हातात पिस्तूल होती. त्यातील एका इसमाने
माझ्या गळयाला चाकु लावुन तुमचे खिशातील पैसे काढा असे म्हणाला. त्याचवेळी माझ्या सोबत असलेला शिवाजी होले हा त्यांना म्हणाला की, तुम्ही आम्हाला नडता का असे म्हणुन तो रस्त्याकडे पळला. त्यानंतर त्या तिघांपैकी एकाने त्यांच्या हातात असलेले पिस्तूलने
शिवाजी होले याचे दिशेने गोळी फायर केली. यात शिवाजी होले यांचा मृत्यू झाला. तसेच मला खाली पाडुन मानेला चाकु लावुन बळजबरीने तीन हजार रुपये रोख रक्कम, मोबाईल काढून डोळयात मिर्ची पावडर फेकुन ते अनोळखी तीन इसम केडगाव बायपास रस्त्याचे दिशेने पळुन गे
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास यंत्रणा तात्काळ शोध करत आहे.

























व्यापाऱ्यास 27 लाख घेऊन जातांना लुटले दौलताबाद पोलिस ठाण्यात( FIR ) घटनेची फिर्याद नोंद ?

( औरंगाबाद ) - प्रतिनिधि - वार्ता - समाचार - प्रतिनिधी लासूर स्टेशन येथील कापसाच्या व्यापाऱ्यास हवालाचे २७ लाख ५० हजार रुपये घेऊन जात असताना करोडी शिवारातील टोलनाक्याजवळ धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लुटल्याची घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजता घडली. याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
साईनाथ मनोहर तायडे (रा. लासूर स्टेशन) असे लुटलेल्या कापसाच्या व्यापाऱ्याचे नाव आहे. दौलताबाद पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद सलगरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनाथ तायडे हे औरंगाबाद शहरातून चालक ज्ञानेश्वर भुसारे ( रा. देवळी, ता. गंगापूर) सह लासूर स्टेशनकडे चारचाकी (एमएच २० सीएस ३९१५) वाहनातून रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास जात
होते. करोड शिवारातील
टोलनाक्याच्या अगोदर असलेल्या उड्डाणपुलावरून लासूर स्टेशनकडे जाण्यासाठी कार वळवली असता समोरून अचानक दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने दुचाकी कारसमोर उभी करून अडवली.
तायडे यांना आपल्या वाहनाकडून दुचाकीस्वारांना काही कट बसला की काय, असे वाटले म्हणून त्यांनी दुचाकीस्वारांची माफी मागितली. तोपर्यंत पाठीमागून आलेल्या दुसऱ्या
चोरट्याने तायडे यांच्या कारची समोरील काच लाकडी दांड्याने फोडून टाकली. तसेच हातावर दांड्याने मारहाण करीत गाडीत असलेली बॅग काढून द्या, असे धमकावले. घाबरलेल्या तायडे यांनी गाडीतील ररक्कम असलेली २७ लाख ५० हजार रुपयांची बॅग चोरट्याच्या हातात दिली. तेव्हा ही बॅग घेऊन चोरटे उड्डाणपुलाच्या खालून पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची धाव

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त दीपक गिन्हे, वाळूज एमआयडीसीचे निरीक्षक तथा प्रभारी सहायक आयुक्त संदीप गुरमे, दौलताबादचे निरीक्षक विनोद सलगरकर, सहायक निरीक्षक संजय गीते, उपनिरीक्षक सचिन वायाळ, चेतन ओगले यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली
हवालाचे पैसे असल्याचा दावा

कापसाचे व्यापारी तायडे यांनी शहरातील गोमटेश मार्केट परिसरातून हवालाचे २७ लाख ५० हजार रुपये घेऊन जात असल्याची चर्चा घटनास्थळी सुरु होती. त्यामुळे हे पैसे कोणाला देण्यासाठी घेऊन जात होते याविषयीची माहिती पोलिस चौकशीत समोर येणार अ सल्याचे समजते आहे.



















































Wednesday, February 22, 2023

वळदगाव सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने शिव जयंती मोठ्या दिमाखात साजरी श्रीरामपूर (इम्रान शेख प्रतिनिधी) येथील वळदगाव गावात ???

श्रीरामपूर (इम्रान शेख प्रतिनिधी) येथील वळदगाव गावात दरवर्षीप्रमाणे यंदा मोठ्या उत्साहात व  प्रथमच महिलाची प्रामुख्याने उपस्थिती असल्याने फटाकेची आतिशबाजी करून शिव जयंती मोठ्या उत्साह ने साजरी करण्यात आली.
 सर्व ग्रामस्थांनी एकोप्याने सकाळी शिवपूजन व आरती तसेच वळदगाव ते श्रीरामपूर मोटरसायकलची भव्य रॅली आयोजित करण्यात आली होती. दुपारच्या वेळी हरीष भोसले यांनी सर्व ग्रामस्थांना स्नेहभोजनाची व्यवस्था केली होती. 
सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर सर्व महिला मिरवणुकीस सहभागी झाल्या होत्या. सर्व उपस्थित ग्रामस्थांना फेटे बांधून, जय भवानी जय शिवाजी घोषणा देत परिसर दणदणून गेला होता. 
याप्रसंगी अशोक कारखान्याचे संचालक हिम्मतराव धुमाळ, संचालिका मंजुश्रीताई मुरकुटे, माजी सरपंच प्रमोद भोसले, पोलीस पाटील शिवाजीराजे भोसले, सोसायटीचे चेअरमन रामराव शेटे, सरपंच अशोक नाना भोसले, उपसरपंच प्रकाश भोसले, गणेश कारखान्याचे सेक्रेटरी नितीन दादा भोसले, मार्केट कमिटी माजी संचालक अरुण खंडागळे, ऋतू दादा धुमाळ, ॲड. मधुकर भोसले, ॲड बाळासाहेब भोसले, किरण नाना गायधने ,सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील भाऊ गोटे, संतोष साळवे, सोमनाथ शिंदे, ज्ञानेश्वर माऊली भोसले, अमोल भोसले, अजय भोसले, संजू आप्पा भोसले, रमेश निकम, दत्तू भुईगड, मधुकर म्हस्के, दत्तात्रय तांबे, रावसाहेब पा. भोसले, संदीप लोखंडे, नईम शेख, आयुब भाई शेख, नसीर शेख, विकास भैया गाडेकर, अजय भोसले, संजय भोसले, सचिन भोसले, सुनील भोसले, रामा भोसले, गुलाब भोसले, भरत भोसले, बाबासाहेब गोपाळे, डॉ. बाबासाहेब शिंदे, जालिंदर गायधने, विजू काका भोसले, प्रवीण भोसले, रवी तात्या भोसले, मंगेश भोसले, सुनील गायधने, प्रवीण गोपाळे, संदीप गाडेकर, लक्ष्मण भोसले, विजू काका भोसले, सतीश भोसले, ज्ञानेश्वर बाबासाहेब भोसले, आदित्य लहारे सुनील साळवे, बाळासाहेब कोबरणे, बिस्मिल्ला शेख, बाबू मामा गाडेकर ,गणेश बर्डे, संदीप साळवे, अशोक जाधव, गौतम खरात, इतर अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने  उपस्थित होते.
सह्याद्री फाउंडेशनचे सर्व मित्र मंडळाने तरुण कार्यकर्ते यांनी शिवजयंती निमित्त विशेष परिश्रम घेतले सर्वांनी देणगी स्वरूपात अनमोल मदत केली.



खंडाळा येथे दोन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कारकरणाऱ्याविरोधात समाजवादी पार्टीकडून फास्ट ट्रॅककोर्टात खटला चालविण्याची मागणी ?

(श्रीरामपूर) खंडाळा येथे दोन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार निचकृति करणाऱ्याविरोधात समाजवादी पार्टीकडून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्याची मागणी
श्रीरामपूर (इम्रान शेख प्रतिनिधी) येथील खंडाळा गावातील एका दोन वर्षाच्या चिमुकलीवर ६५ वर्षाच्या भास्कर मोरेने बलात्कार केल्याची घटना नुकतीच उघड आली आहे. या संदर्भात समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांच्या वतीने देण्यात आलेल्या लेखी निवेदनात म्हंटले आहे की,  खंडाळा येथे दोन वर्षाच्या छोट्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्ती विरोधात तत्परतेने फास्ट ट्रैक कोर्टात दाखल होऊन त्या नराधमाला लवकरात लवकर कठोरातील कठोर शिक्षा व्हावी तसेच सदर बाब ही अत्यंत निंदनीय असून मानवाला काळीमा फासणारी असून तीव्र शब्दात निषेध करीत त्याविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. सदरच्या प्रकरणात प्रशासनाने लक्ष घालावे याकरिता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस महासंचालक मुंबई, पोलीस उपमहानिरीक्षक नाशिक
 परिक्षेत्र नाशिक, पोलीस अधीक्षक अहमदनगर,
उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर तहसीलदार तथा दंडाधिकारी, पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर व तालुका पोलीस स्टेशनला यांना निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.
यावेळी तौफिक शेख, आसिफ तांबोळी, कलीम शेख, इम्रान मन्सूरी, संजय वाघ आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.





मुंबई + नाशिक + इंग्लंडच्या + केंटमध्ये + आंतरराष्ट्रीय +फिल्ड + असोसिएशनद्वारे + आयोजित +'जागतिक इनडोअर तिरंदाजी चॅम्पियनशिप २०२३ मध्ये देविशा व तनिष्का पंकज भुजबळ यांनी सुवर्णपदकाची सन्मानित केली. माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या देविशा व तनिष्का कन्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक मिळवल्याबद्दल भुजबळ भगिनींचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे ?

( नाशिक ) - वार्ता - समाचार -
 मुंबई नाशिक इंग्लंडच्या + केंटमध्ये आंतरराष्ट्रीय फिल्ड असोसिएशनद्वारे आयोजित 'जागतिक इनडोअर तिरंदाजी चॅम्पियनशिप २०२३ मध्ये देविशा व तनिष्का पंकज भुजबळ यांनी सुवर्णपदकाची प्रगती यश प्राप्त केले . माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या देविशा व तनिष्का कन्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक मिळवल्याबद्दल भुजबळ भगिनींचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.देविशा व तनिष्का या दोघीही भुजबळ नॉलेज सिटी एमईटी (मुंबई) या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत. इंग्लंडच्या मेडवे पार्क स्पोट्स सेंटर, गिलिंगहॅम, केंट येथे १३ ते १८ फेब्रुवारीमध्ये आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत ३८ देशांतील ५६८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
 भारताचे १२ तिरंदाज विविध वयोगटात

वेगवेगळ्या प्रकारात स्पर्धेत सहभागी झाले होते. देविशाने १९ वर्षांखालील कम्पाऊंड बो गटात सुवर्णपदक आणि तनिष्काने १७ वर्षांखालील कम्पाऊंड बोगटात सुवर्णपदकाचा वेध घेतला. भारतीय संघ स्पर्धेत फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियाच्या बॅनरखाली खेळला होता.
*** स्पर्धेचे उद्घाटन मिडवे केंटच्या ***
महापौर जेन अल्डोस आणि टॉनी अल्डोस तसेच आंतरराष्ट्रीय फील्ड आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष मार्टिन कोइनी, उपाध्यक्ष स्टिफन केंड्रीक, उपाध्यक्ष मेरियेट फ्रायर, सचिव लेन एलिंगवर्थ आणि इंग्लंड फील्ड आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष डेव्ह मुरे यांच्या हस्ते हर्षुव उल्लासात पार पडले.