राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, May 2, 2023

शासकीय वाळू डेपोचा राज्यातील पहिला डेपोचा शुभारंभ; 600 रुपयांत मिळणार एक ब्रास वाळू, कशी...सर्वसामान्यांना 600 रुपयांत वाळू ब्रास देण्याचा शासनाचा अग्रेसर निर्णय महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील ?

(श्रीरामपूर) - प्रतिनिधि - वार्ता -
सर्वसामान्य जनतेला 600 रुपयात एक ब्रास वाळू  मिळणा‍र आहे. राज्यातील या निर्णयाची सुरुवात पहिल्या प्रथम अहमदनगर जिल्ह्यातून 01/05/2023 महाराष्ट्र दिना पासून होत आहे. सर्वसामान्यांचे हितासाठी शासनाने घेतलेला हा मंत्री मंडळाचा निर्णय आहे.असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र राज्यातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन व वाळू विक्री ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण श्रीरामपूर तालुक्यातील नायगांव येथे महसूलमंत्र्यांच्या हस्ते आज झाले. यावेळी श्री. विखे-पाटील बोलत होते. यावेळी श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, नायगांवचे सरपंच राजाराम राशीनकर, दीपक पठारे आदी उपस्थित होते.
महसूलमंत्री विखे-पाटील म्हणाले की, “बेकायदेशीर वाळू उत्खनातून महाराष्ट्रात वाळू माफियांचे साम्राज्य निर्माण झाले होते. अवैध वाळू विक्री वाढली होती. पर्यावरणाची हानी होत होती. यातून शासनाचा ही कोट्यवधीचा महसूल बुडत होता. यामुळे शासनाने सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात वाळू उपलब्ध करुन देण्याकरीता वाळूचे उत्खनन, साठवणूक व विक्री ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय घेतला.
कोवीड संकटानंतर अवकाळी पावसाच्या संकटाने शेतकरी, कष्टकरी मेटाकुटीला आला होता. सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी शासनाने अनेक निर्णय घेतले. शासनाने अतिवृष्टीच्या पावसाच्या निकषात बदल केला. एक रूपयात शेतकऱ्यांचा पीक विमा काढण्यात येत आहे. जून अखेर अहमदनगर जिल्ह्यातील जमिनीची शंभर टक्के मोजणी करून घरपोच नकाशे दिले जाणार आहेत. यासाठी जिल्ह्यासाठी प्रत्येकी वीस लाख रूपये किंमतीचे 24 रोव्हर खरेदी करण्यात आले आहेत." असेही महसूलमंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.
महसूलमंत्री म्हणाले की, 01 जुलै पासून जमीन मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्यांना 15 दिवसांत जमीन मोजणी करून नकाशे दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना एकाच अर्जाद्वारे नऊ प्रकारचे दाखले दिले जाणार आहेत. जिल्ह्यातील कृषी आराखड्यानुसार शेती पद्धतीत गांभीर्यपूर्वक मुलभूत बदल करण्याची गरज असल्याचे" मतही श्री. विखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.           Ahअहमदनगर जिल्हा गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने निर्भयपणे काम करावे. असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री श्री.विखे पाटील यांच्याहस्ते यावेळी ६०० रूपये वाळू ब्रासच्या राज्यातील पहिल्या लाभार्थी मंगल व्यवहारे (रा.मातुलठाण) व नंदा गायकवाड (रा. नायगांव) यांना लाभार्थी प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी राधाकिसन दडे व बाळासाहेब वाघचौरे यांनाही वाळू लाभ प्रमाणपत्र देण्यात आले.असा असणार आहे वाळू डेपो नायगाव वाळू डेपोसाठी गोदावरी नदीपात्रातून मातुलठाण येथील ३ तर नायगाव येथील २ वाळुसाठे उपलब्ध करण्यात आले आहेत. या उत्खन्नाचा व वाळू डेपोचा ठेका श्रीरामपूर येथील 'देवा इंटरप्राईजेस' या संस्थेला देण्यात आला आहे. ग्राहकांना 'महाखनिज' या ऑनलाईन अॅपवर मागणी नोंदवल्यानंतर
600 रुपये ब्रास व वाहनाच्या प्रकारानुसार प्रति किलोमीटर दर ठरवून घरपोच वाळू दिली जाणार आहे. एका कुटुंबाला एका महिन्यात जास्तीत जास्त 10 ब्रास वाळू उपलब्ध केली जाणार आहे. नायगावचा डेपो प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे. ग्राहकांचा प्रतिसाद पाहून विविध ठिकाणी डेपो सुरू केला जाणार आहेत. या डेपोतून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये जीपीएस सिस्टीम असल्याने भष्ट्राचार, अनियमितेला शून्य वाव आहे. या वाळू डेपोंचे काम www.mahakhanij.maharashtra.gov.in या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून चालणार आहे. या संकेतस्थळावर जिल्हानिहाय वाळू साठे व शिल्लक ब्रास यांची आकडेवारी दैंनदिन प्रसिध्द होईल. नागरिक घरबसल्या आवश्यक वाळू ब्रास मागणी ऑनलाईन नोंदवू शकणार आहेत.
-----------------------------------------------------============================================================================================================सा,:राज प्रसारित...कार्यकारी...संपादक...भगवंत सिंघ प्रितम सिंघ बत्रा... शब्द...✍️✅️🇮🇳...रचना... संकलन...वार्ता...
============================================================================================================------------------------------------------------------

























Monday, May 1, 2023

*एलान* *हज तर्बियती (ट्रेनिंग) कैंप* (अहमदनगर जिले का हज ट्रेनिंग कॅम्प) हर साल की तरा इस साल बी श्रीरामपूर ?

*एलान* 

 *हज तर्बियती (ट्रेनिंग) कैंप* 

(अहमदनगर जिले का हज ट्रेनिंग कॅम्प)
हर साल की तरा इस साल बी श्रीरामपूर अहमदनगर मे..

 🕋**हज* 🕋
हज को जाने वाले तमाम आजमीन ए हज का हज तर्बियती (ट्रेनिंग) कैंप**
(श्रीरामपूर) - सोहेल भाई - दारुवाला - *तारीख  ०३ मई 2023 बरोज बुधवार को मआ मस्तुरात  रखा गया है।* इस ट्रेनिंग कैंप में सभी हाजी खुद भी पहुंचे और  इसकी दावत चलाकर अपने अपने इलाके में जो हाजी इस साल हज को जानेवाले है उनको इस कैंप मे पहुंचाने की फिक्र करे।
नोट:
(वेटिंग लिस्ट में जिन के वेटिंग नो ४००० तक हैं वह भी इस में शामिल हो जाये )
( हुज्जा कमिटी मुंबई हाज कमिटी ट्रेनर के मौजदगी और उनके गायडन्स मे नशीश होगी)
( आपके सवालात और डाऊट्स के लिये हज कमिटी के ट्रेनर खास हज ट्रेनिंग को आ रहे है)

  पता:* 
इनामूल हसन महजीत काझी बाबा रोड सुभेदार वस्ती वॉर्ड नंबर 2 श्रीरामपूर 
*सोहेल भाई दरूवाला*
8698989894
*जाकिर कुरेशी*
9923651786
*फैज भाई शाह*
7020375130
*मौलाना दानिश*
7348193161
 *वक्त :* सुबह 9 बजे से शाम 5 बजे तक।

नोट: ट्रेनिंग कैंप वक्त पर शुरू हो जायेगा। वक्त की पाबंदी करे।
💐💐💐💐💐💐💐


राहात्यात महसूल मंत्री विखेंचाच सत्ता डंका श्रीरामपूर विखे-मुरकुटे-ससाणेंची सत्ताकोपरगावात काळे-कोल्हेंची सहमती एक्सप्रेस, नेवाशात गडाखच, अकोलेत महाविकास आघाडीचा विजय; शेवगावात घुलेंनी गड राखला, जामखेड फिप्टी फिप्टी ?


(अहमदनगर) - प्रतिनिधि - वार्ता -                       श्रीरामपुरात मंत्री विखे-मुरकुटे-ससाणेंची सत्ता 
  भाग्ये उजळा श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विखे- मुरकुटे - ससाणे युतीने एकहाती निर्विवाद वर्चस्व मिळविले. या गटाने १८ पैकी १७ जागांवर विजय मिळवून सत्ता ताब्यात ठेवली. निवडणुकीत आ. लहू कानडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, शेतकरी संघटनेचे ऍंड अजित काळे आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) सचिन बडधे यांच्या नेतृत्वाखालील मंडळाचा पराभव झाला. व्यापारी मतदार संघातून किशोर एकनाथ कालंगडे हे अपक्ष
उमेदवार विजयी झाले. राहाता बाजार समितीच्या निवडणुकीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सर्वच उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. राहाता बाजार समितीत ना.विखे पाटील यांच्या गटाची सत्ता होती. पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत जनसेवा मंडळाने मोठा फरकाने विजय प्राप्त केला आहे. माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोर यांनी विखेंच्या बालेकिल्ल्यात विधानसभा वगळता पहिल्यांदाच तालुका पातळीवरील निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला. विरोधी महाविकास आघाडीचा ४०० ते ४५० मतांच्या फरकाने पराभव झाला.
कोपरगावात काळे-कोल्हेंची सहमती एक्सप्रेस
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गत निवडणुकीत 'सहमती एक्सप्रेस' धावली होती. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली होती. याही वेळी 'सहमती एक्सप्रेस' धावली होती. पण शिवसेनेच्या ठाकरे गट आणि काँग्रेसने यावर्षी पॅनेल निवडणुकीत उतरविला. पण मतदारांनी 'सहमती एक्सप्रेस' ला पसंती दिली. या निवडणुकीत आ. काळे गट ७, कोल्हे ७, २ औताडे, २ परजणे गट 9 अशा १८ उमेदवारांनी विजय मिळवत झेंडा फडकावला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ पैकी ३ उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत.
जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये राहात्यात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाने दणदणीत विजय संपादित केला. कोपरगावात मागील प्रमाणेच आ. काळे आणि कोल्हे गटाच्या सहमती एक्सप्रेसला मतदारांनी यंदा पसंती दिली. श्रीरामपुरात ना. विखे, माजी आमदार भानुदास मुरकुटे - जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या गटाने एकहाती सत्ता हस्तगत केली. नेवाशात विरोधकांचा सुफडासाफ करत माजी मंत्री आ. शंकरराव गडाख गटाने गड राखला. अकोलेत महाविकास आघाडीने सत्ता हस्तगत केली आहे.
-----------------------------------------------------============================================================================================================
सा : राज प्रसारित... कार्यकारी.... संपादक... भगवंत सिंघ प्रितम सिंघ बत्रा... शब्द ✍️✅️🇮🇳...रचना...संकलन...वार्ता...
============================================================================================================------------------------------------------------------









Saturday, April 29, 2023

बृज भूषण यांच्या विरोधात कुस्ती पट्टू आंदोलन कायम करणार दिल्ली पोलीस FIR दाखल करण्याचे तयारीत ?

(नवी दिल्ली) - न्यूज- एजन्सी भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलेले बृजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. सर्वोच्च न्यायालयात दिल्ली पोलिसांकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड व न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे याबाबतची माहिती सादर केली. पोलिसांनी उचललेल्या पावलांबावचे मोठे पोस्टर्स कुस्तीपटूंनी आंदोलन स्थळावर ठळकपणे दिसेल, असे उभारले आहे. मात्र तरीही कुस्तीपटू
आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. सात महिला कुस्तीपटूंनी आपल्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपावरून नुकतीच सर्वोच्च न्यायालयात याचिक दाखल केली आहे. न्या. चंद्रचूड व न्या. नरसिंहा यांच्या खंडपीठाने गत सुनावणीत दिल्ली सरकारसोबत पोलिसांना नोटीस पाठवली होती. प्रकरण गंभीर असूनही सिंग यांच्याविरोधात एफआयआर का दाखल करण्यात आला नाही, असा सवाल खंडपीठाने त्यावेळी उपस्थित केला होता. त्यानुसार दिल्ली पोलिसांकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी शुक्रवारी एफआयआर दाखल करण्यासाठी पाऊल टाकल्याची माहिती खंडपीठास दिली गेली. खंडपीठाने अल्पवयीन असलेल्या
याचिकाकर्तीला सुरक्षा पुरवण्याचे निर्देश दिले. सॉलिसिटर जनरल यांनी खंडपीठाला सांगितले की,आरोप दखलपात्र गुन्हा दर्शवत असल्याने पोलिसांनी एफआयआर नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल कुस्तीपटूच्या बाजूने हजर झाले आणि त्यांनी सीलबंद लिफाफ्यात प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर ठेवले. यामध्ये अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेचा विचार करण्यात आला आहे. दिल्ली पोलीस आयुक्तांना धमकीचे आकलन करण्याचे आणि अल्पवयीनला पुरेशी सुरक्षा प्रदान करण्याचे निर्देश देतो. ५ मे रोजीच्या पुढील सुनावणीला प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे निर्देश खंडपीठाने दिले.
भाजपचे खासदार असलेल्या सिंग यांना सर्व प्रकारच्या पदावरून हटवण्यात येईपर्यंत आपण आंदोलन कायम ठेवणार असल्याचा निर्धार कुस्तीपटूंनी केला आहे. विजयाच्या दिशेने पहिली वाटचाल सुरू आहे. मात्र तरीही विरोध कायम राहणार, असे साक्षी मलिक म्हणाली. पोलिसानी
दाखल केलेल्या तक्रारीवर विश्वास नाही. निरीक्षण करणार आणि त्यानंत आंदोलन मागे घेण्याबाबत निर्णय घेणार. त्यांना तुरुंगात पाहायचे आहे. तसेच त्यांना सर्व पदावरून हटवण्याची गरज आहे, अन्यथा तपास प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, असे विनेश फोगाट म्हणते.
-----------------------------------------------------========================================================================
सा : राज प्रसारित...कार्यकारी...संपादक भगवंत सिंघ प्रितम सिंघ बत्रा...शब्द...✍️✅️🇮🇳...रचना...संकलन... वार्ता...
-----------------------------------------------------========================================================================
























उच्च न्यायालया मार्फत राज ठाकरे विरोधातील समन्स दिल्ली कडून रद्द ?

(नवी दिल्ली) - न्यूज - एजन्सी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या कथित प्रक्षोभक भाषणाबद्दल बोकारो न्यायालयाने बजावलेले समन्स दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केले. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. आपल्या देशात श्रद्धा आणि धर्माचे पालन करणे अधिक लवचिक आहे.एखाद्या व्यक्तीच्या विचारांमुळे धार्मिक भावनांना ठेच पोहचत नाही. धार्मिक भावना इतक्या
नाजूक असू शकत नाहीत. त्यामुळे ठाकरेंच्या भाषणाला चिथावणी मानता येणार नाही, असे निरीक्षण न्या. जसमीत सिंग यांनी नोंदवले. भारताची एकता ही विविध धर्म
श्रद्धा आणि भाषेच्या सहअस्तित्त्वात दडलेली आहे.
शतकानुशतके टिकून राहतील, असे धर्म व श्रद्धा मानवासारख्या नाजूक नाहीत, असे सांगत न्यायाधीशांनी ठाकरे यांच्या विरोधातील समन्सला केराची टोपली दाखवली. याचवेळी = भादंविच्या विविध कलमान्वे खून, दंगल आणि द्वेषपूर्ण भाषणाबद्दल ठाकरे यांना धनबाद न्यायालयाने बजावलेले समन्ससुद्धा न्या. जसमीत सिंग यांनी रद्द केले.
-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-==========================================================================कार्यकारी,संपादक...✍️✅️🇮🇳...भगवंत सिंघ प्रितम सिंग बत्रा...
==========================================================================-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-






























Friday, April 28, 2023

नगर पालिकेने कच्चा रस्ता दुरुस्त केला ! अन् अवकाळी पावसाने तो वाहून नेला !!रस्त्यासोबत खालच्या पाटाच्या पुलावरील कठडे लावण्याचा तात्काळ बंदोबस्त करा- अजहर शेख ABS

श्रीरामपूर प्रतिनिधी:(अजहर शेख )
येथील गोंधवणी रोडवरील मॅरेज हॉल समोरील दुभागून इदगाहकडे जाणाऱ्या खालच्या रस्त्यात्याची गत अनेक वर्षांपासून दैना झाली होती, या रस्त्यावर येणाऱ्या - जाणाऱ्या पादचारी आणि वाहन चालकांसमवेत परिसरात राहणाऱ्या नागरीकांना देखील मोठा त्रास सहन करणे भाग पडत होते, नगर पालिकेचे लक्ष वेधण्याकरीता सामाजिक कार्यकर्ते अजहर शेख (ABS)
यांनी वेळोवेळी पाठपुरावा करत आंदोलने केली कारण हा रस्ता संजयनगर,इदगाह परिसर, रामनगर,मिल्लतनगर, फातेमा हौसिंग सोसायटी जि.प.कर्मचारी सोसायटी आदि ठिकाणी जाण्या- येण्याकरीता हा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावर नेहमी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र हा रस्ता जणू नगर पालिकेने कायमचाच दुर्लक्षत केल्याने सदरील परिसरातील नागरिकांनी कमालीचा त्रास सहन करणे भाग पडत आहे,श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील गोंधवणी रोड पुलाजवळील प्रभाग १ व १२ कडे जाणारा सुमारे १०० मीटर पर्यंतच्या मुख्य रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावेत अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संरक्षण अँड अँटी करप्शन ब्युरोचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अजहर शेख (ABS) यांनी श्रीरामपूर नगर पालिका मुख्याधिकारी यांना दिनांक ०८/०२/२०२२ रोजी दिलेल्या निवेदनात केली होती.तथा नगर पालिकेचे लक्ष वेधण्याकरीता
दि.२६ ऑगस्ट २०२२ रोजी सदरील रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण आंदोलनही छेडण्यात आले होते.सोबत सदरील निवेदनाच्या प्रति राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनाही पाठवून लक्ष घालण्याची विनंती केली होती.त्याची दखल घेत नगर पालिकेने खडी,मुरुम टाकून कच्चा रस्ता बनविला मात्र यावर डांबरीकरण किंवा कॉंक्रीटीकरणास नगर पालिकेला मुहूर्त काही सापडेनासे झाले आहे, तोपर्यंत हा रस्ता आवकाळी पावसाने पुर्णतः वाहुन न गेल्यास मिळवली असेच म्हणावे तथा समजावे लागेल, कारण आज (दि.२८/०४/२०२३ रोजी दुपारी) झालेल्या थोडक्याशा आवकाळी पावसात हा रस्ता वाहुन गेल्याने रस्त्यावर पुन्हा जैसे थे खड्डे पडले असल्याचे दिसून येत आहे (मग या रस्त्याची क्वालिटी काय असणार हा संशोधनाचा भागच ठरत आहे.) यामुळे समस्त नागरीकांना पुन्हा मोठा मनस्ताप सहन करणे भाग पडू लागले आहे.
शिवाय जयभोले चौकात सदरील रस्त्यामुळे उंचवटा निर्माण झाल्याने पावसाचे पाणी नेहरुनगरमधील रहिवासियांच्या घरात शिरणार आहे,याकरीता याठिकाणी निर्माण झालेल्या लवनाचा वेळीच योग्य बंदोबस्त करण्यात यावा तसेच सदरील रस्ता बनविल्याने पाटाच्या खालच्या पुलावरील कठडे नाहिसे झाल्याने संभव्य अपघातांची दाट शक्यता निर्माण झाली आहे, याठिकाणी तात्काळ कठडे बसविण्यात यावेत पुन्हा पुर्वीसारखे उग्र आंदोलन छेडण्याची वेळ येवू देवू नये.
किंवा नसेल जमत तर यामुळे घडणाऱ्या संभाव्य अपघाताची जबाबदारी तरी नगर पालिकेने घ्यावी असेही अजहर शेख (ABS) यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

*अजहर शेख यांची संतप्त प्रतिक्रिया*

शासकीय,निमशासकीय अधिकारी,कर्मचारी हे जनतेचे सेवक आहेत की मालक हेच समजून येत नाही, नुसते आश्वासनावर आश्वासने देणे हेच यांचे काम होऊन बसले आहे. जसे यांनी विकासकामे केली तर जनतेवर मोठे उपकार होणार आहे,संबधित ठेकेदार देखील नेहमी कॉलवर आश्वासनच देत आहे, आठ दिवस, दहा दिवस थांबावेत म्हणून, यामुळे जनतेचे प्रश्न पूर्णपणे सुटत नाही, या रस्त्याप्रकरणी अजहर शेख यांची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी स्वतः दखल घेवून आयएएस अधिकारी डॉ. सोनिया सेटी यांच्या विभागात सदरील प्रकरण पुढे फॉरवर्ड केलेले आहे, तरीही संबंधित मुख्याधिकारी व नगरपालिकेचे कर्मचारी आणि ठेकेदार दिवसागणिक नुसते आश्वासनच देत आहे याला काय म्हणावे ? हजारो लोकांसाठी एक युवा सामाजिक कार्यकर्त्याला छोट्याश्या रस्त्यासाठी कित्येक महिने संघर्ष करावा लागतोय तरीही नगर पालिका प्रशासक, मुख्याधिकारी आणि संबंधित ठेकेदार सदरील कामांसाठी टाळाटाळ करत आहे, वर्क ऑर्डर निघून पडली आहे तरीही कामे मात्र पूर्णपणे होत नाही ही मोठी शोकांतिका असल्याची संतप्त प्रतिक्रिया देखील अजहर शेख यांनी आमच्या प्रतिनिधीसोबत बोलताना व्यक्त केली.

*वृत्तसंकलन: समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर*








Wednesday, April 26, 2023

राज्यपालांचा नाशिक, अहमदनगर दौरा रद्द होण्याचे नेमके कारण समजू शकले नाही ?

 (मुंबई) - प्रतिनिधि - वार्ता महाराष्ट्रात सध्या  राजकीय उलाढालींच्या चर्चा असतानाच राज्यपाल रमेश बैस यांचा २६ व २७ रोजीचा नाशिक आणि अहमदनगर दौरा रद्द करण्यात आला आहे. राज्यातील सत्तांतराच्या नाट्यात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या राज्यपालांचा दौरा असा अचानक रद्द झाल्याने राजकीस तर्कविर्तकांना उधाण असेही लावण्यात येते काल राहुरी परिसरात हवामान चे वारे वादाळाने भराड ल्याने अनेक ठिकाणावर पाऊस व सुसाट वाऱ्यामुळे निरनिराळ्या ठिकाणवार झाडें पडली अस्थांना निदर्शनास घेतले  प्रशासकीय सूत्रकडनं राज्यपालच्या यंत्रनेला कळवले असून बहुतेक दौरा रद्द करण्याचे कारण असु शकतात असा ही अंदाज व्यक्त करण्यात येते आहे.
नाशिकसह अहमदनगरमध्ये राज्यपालांच्या उपस्थितीतअनेक
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, हा दौरा का रद्द झाला? याबाबत अधिकृत माहिती समजू शकली नाही. राज्यपाल पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच राज्यपाल बैस नाशिकला येत असल्याने प्रशासनाने दौऱ्यासाठी जय्यत तयारी केली होती. त्यात त्र्यंबकेश्वर येथे पहिने गावाला भेट देत राज्यपालांकडून हे गाव दत्तक घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्याशिवाय कालिदास कलामंदिर येथे नाशिक
एज्युकेशन सोसायटीच्या शतक महोत्सव सांगता समारंभास ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. तसेच अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी, नेवासा तालुक्यातील देवगड आणि राहुरीच्या महात्मा फुले विद्यापिठाला भेट देणार होते. मात्र, त्यांचा नाशिक आणि अहमदनगर दौरा अचानक रद्द झाला असून, ते राजभवन मुंबईत उपलब्ध राहणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, त्यानंतर राजकीय वर्तुळांत चर्चांना उधाण आले असून, राजभवनाकडे येणाऱ्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींकडे माध्यमांचे लक्ष लागलेआहे.
------------------------------------------------------------------------=====================================
राजप्रसारित...संपादक...✍️✅️🇮🇳...
=====================================------------------------------------------------------------------------