💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
श्रीरामपूर - प्रतिनिधि - समाचार -
श्रीरामपूर हॆ विवेकशीलता आणि श्रमसाधनेतून आकाराला आलेले आधुनिक शहर आहे, या शहराच्या जडणघडणीत अनेकांचे योगदान आहे, याच जाणिवेतून विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान शिक्षणतपस्वी,समाजसेवक स्व.ॲड.रावसाहेब शिंदे यांची विचारज्योत विविध उपक्रमातून विचारज्योत जागती ठेवत आहे, हॆ भूषणावह असल्याचे मत रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कॉन्सिल सदस्य प्रा. डॉ. सदाशिव कदम यांनी व्यक्त केले.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
तालुक्यातील शिरसगांव येथील महादेव मळ्यात स्व.ॲड, रावसाहेब शिंदे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार वितरणसोहळा आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा डॉ. सदाशिव कदम बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.राजीव रावसाहेब शिंदे होते.प्रारंभी ॲड, रावसाहेब शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्व.डॉ. वा. ग. तथा बाबासाहेब कल्याणकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन दीपप्रज्वलन करण्यात आले.विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव यांनी स्वागत करून २०१८ पासूनच्या कार्याचा अहवाल सादर केला. कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी. ई. शेळके यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.समन्वयक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी पुरस्कार्थींचा परिचय करून दिला.कवयित्री संगीता फासाटे, कटारे यांनी मानपत्रांचे वाचन केले.अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्रा. विठ्ठलराव पाचारणे यांना स्व.ॲड. रावसाहेब शिंदे स्मृती राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार तर हृदयरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप शिरसाठ यांना स्व.डॉ. वा. ग. तथा बाबासाहेब कल्याणकर स्मृती धन्वनतरी राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रा.विठ्ठलराव पाचारणे, सौ. नलिनीताई पाचारणे, डॉ. दिलीप शिरसाठ, डॉ. सौ. वर्षाताई शिरसाठ यांचासह सत्कार करण्यात आला. पुरस्कार्थीनी मनोगत व्यक्त केले.प्रमुख पाहुणे डॉ. सदाशिव कदम आपल्या भाषणात पुढे म्हणाले, महादेव मळा म्हणजे समाजसेवेचे आणि ॲड, रावसाहेब शिंदे यांच्या कार्य, विचारांचे अमृतवैभव आहे. श्रीमती शशिकलाताई यांनी त्यांना खंबीर साथ दिली.शिंदे साहेबांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याला वाहून घेतले. महादेव मळा हे अनुभवी जीवनाची पवित्रभूमी आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मता ही लोकशाही मूल्ये रुजविण्यासाठी ॲड. शिंदे यांनी जीवनभर स्वतः ला वाहून घेतले, ही कार्य, विचारांची ऊर्जाज्योत सुखदेव सुकळे व त्यांचा परिवार करीत आहेत, हे प्रेरणादायी आहे, असे डॉ. कदम यांनी सांगून योग्य व्यक्तींना पुरस्कार दिले त्याबद्दल कौतुक केले.डॉ. राजीव शिंदे यांनी शिक्षण आणि समाज यांच्याविषयी मनोगत व्यक्त करून विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे वेगळेपण सांगितले.सिंगापूर येथून आलेले काकासाहेब हुंबे, सुजाता हुंबे, सुरेश कल्याणकर, माजी प्राचार्य विश्वासराव काळे, प्रकाश पाटील निकम,माजी पो. पा. वसंतराव मुठे, रामराव पडघन,ॲड.भागचंद चुडिवाल, माजी प्राचार्य शंकरराव अनारसे, प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे,सौ. नंदाताई गागरे,माऊली वृद्धाश्रमाच्या प्रमुख सौ कल्पनाताई वाघुंडे,श्रीमती मंगलाताई आढाव,माजी प्राचार्य डॉ. गोरख बारहाते, माजी मुख्याध्यापक भागचंद औताडे, भाऊसाहेब पा.औताडे, संजय गायकवाड, रामराव पा. औताडे, लक्ष्मणराव निकम,माजी तहसीलदार गुलाबराव पादिर, आशिष बोरावके, भीमराज बागुल, सुभाष गायकवाड, रंगनाथ माने,डॉ. प्रकाश मेहकरकर,प्राचार्य डॉ. प्रवीण बडधे, प्राचार्य डॉ. मुकुंद पोंधे, प्राचार्य डॉ.सुहास निंबाळकर,प्रा. डॉ. विठ्ठल लंगोटे,सतिश थोरात, कुंडलिक खैरनार,दत्तात्रय तांबे, दळवी,पवार,बाळासाहेब बुरकुले, सौ.उज्ज्वला बुरकुले,संजय साळवे, संजय बुरकुले, सौ. सुरेखा बुरकुले,संकेत बुरकुले, सुरेश बुरकुले,बाबासाहेब चेडे,बादशाह इनामदार, कल्याणकर परिवार, सुकले परिवार, विद्यानिकेतन शिक्षक, शिक्षकेतर सेवक आदी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी प्रा. पाचारणे व डॉ. शिरसाठ यांचे सत्कार केले. सूत्रसंचालन संगीता फासाटे यांनी केले तर सुदामराव पा. औताडे यांनी आभार मानले.
🌹🥀🌺🌷🌸🙏♥️ 🇮🇳
(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))