राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, June 11, 2023

मजहब नहीं सिखाता आपस मैं बैर रखनां हिंदी है हम वतन है हिंदुस्थां हमारा 🕉️☪️🕎✝️ सारें जहाँ सें अच्छा हिंदुस्थां हमारा ?

(डॉक्टर सलीम साहेब )
सालाबादप्रमाणे यंदाही पंढरपूर येथे आषाढी एकादशीला जाणारी संत निवृत्तीनाथांची दिंडी श्रीरामपूर शहरात दाखल झाल्यानंतर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळील सर्व धर्मांच्या मित्रमंडळींनी सरबत ,थंड पाणी व काही मित्रांनी खाऊचे पाकीटं वाटली .. त्यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेलो असताना... 
सालाबादप्रमाणे माझ्या परीवारातील परंपरे प्रमाणे काही तरी अल्प सेवा देण्यासाठी प्रयत्न करीत असतो..

काँग्रेसचे ग्रामस्थांसह आंदोलन रस्त्या...........चे केलेले......कामही निकृष्ट सार्वजनिक बांधकाम.......अधिकाऱ्यांना घेरावरस्त्याच्या कामाबाबत ?

अहमदनगर - वृत्तसेवा - वार्ता -

तालुक्यातील तामसवाडी ते वाटापूर या रस्त्याच्या निकृष्ट कामाची राज्य गुणवत्ता व नियंत्रण विभागाकडून चौकशी करण्यात यावी. त्याचे अपूर्ण काम तातडीने सुरू करण्यात यावे यासाठी नेवासा तालुका काँग्रेस कमिटी, तसेच तामसवाडी व वाटापूर ग्रामस्थांनी सार्वजानिक बांधकाम उप विभाग नेवासा श्री दुबाळे उप अभियंत्यांना घेराव आंदोलन केले.तामसवाडी (जगताप वस्ती) ते वाटापूर या रस्त्याच्या कामास सुरुवात होऊन चार ते पाच वर्षाचा कालावधी उलटूनही काम अपूर्णच आहे. सत्याच्या कामाचा पूर्णत्वाचा कालावधी उलटून गेला आहे. ठेकेदाराने केलेले कामही निकृष्ट दर्जाचे आहे. यामध्ये मुरूम, खडी, तारकोल, डांबर अशा निकृष्ट मालाचा वापर केला असून, रस्त्याची लांबी, रुंदी, खोली त्याची अनियमित मापे, साईडपट्ट्यांचा अभाव, तसेच रस्त्यामध्ये केलेल्या पुलाचेकामही निकृष्ट दर्जाचे झाले आहे.
याशिवाय अपूर्ण अवस्थेतील नुसतेच खोदून ठेवलेल्या कामामुळे पसरलेल्या खडीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अपघात वाढले आहेत.अनेकांना जीव गमावावा लागला आहे ठेकेदाराकडून नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत, तामसवाडी व रस्तापूर येथील ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल मेत काँग्रेस कमिटी अध्यक्ष व
पदाधिकायांनी स्वत रस्ता कामाची पाहनी  केली.
 तसेच महिनाभरात सार्वजनिक बांधकाम विभाग नेवासा श्री दुबाळे उप अभियंता यांची अनेकदा भेट घेवून तातडीने रस्ता कामास सुरुवात करावी काम पूर्ण करण्यात यावे तसेज निकृष्ट कामाची राज्य गुणवत्ता व नियंत्रण विभागाकडून चौकशी करण्यात बावी, अशा मागण्या करण्यात आल्या.मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग नेवासा श्री दुबाळे उप अभियंता यांच्या कडे मागणी केली अस्थांना तेही डोळेझाक करीत ठेकेदारासअभय दिले. दोन आठवडे उलटूनही
ठेकेदारावर कारवाई न झाल्याने व
रस्ता कामास सुरुवात न केल्याने आक्रमकभूमिकाघे 
शुक्रवारी नेवासा तालुका कॉंग्रेस
कार्यकर्ते व तामसवाडी व वाटापूर ग्रामस्थानी सार्वजानिक बांधकाम उप विभाग नेवासा श्री दुबाळे उप अभियंता यांना घेराव घालू आंदोलन केले.यावेळी काँग्रेस कमिटी अध्यक्ष संभाजी माळवंदे तामस वाडीचे सरपंच चंद्रकांत जगताप यांनी लवकर काम सुरू न झाल्यास ग्रामस्थांसह आत्मदहन करण्याचा इशारा दिला. यावेळी जिल्हाचेराजेंद्र वाघ अल्फसंख्यकविभागाचे आलम पिंजारी, विद्यार्थी काँग्रेसचे इलियास शेख, शहर काँग्रेसचे अंजुम पटेल, मुसा बागवान, रंजन जाधव, सोशल संदीप मोटे, संजय होडगर, गोरक्षनाथ का, किरण साठे, द्वारक जाधव, दत्तात्रय फोफ ज्ञानेश्वर कर्मुले, संदीप जगताप, उपसरपंच अशोक आयनार, हरिभाऊ कर्जुले लहान जगताप, शोभा पाठारे, ज्योती भोसले आदी उपस्थित होते.
----------------------------------------------------===================================
सह.संपादक.रंजित बतरा शब्द...✍️✅️🇮🇳...रचना .संकलन.वार्ता...
===================================
----------------------------------------------------


तरुणाच्या खून प्रकरणी गोंधवणी परिसर श्रीरामपूर येथिल पसार झाल्याले दोघां आरोपीना 24 तासात अटक ?

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -

शहरातील तन्वीर शहा या तरुणाचा खून करणारा आरोपी व त्याचा  साथीदार या दोघांना अखेर 24 तासाच्या दक्ष जलद तपासा नंतर पोलिसांनी अटक केली.अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
प्रभाग एक मधील तन्वीर शहा याने सुनिल देवकर याचे निराळ्या करणावरून अप शब्द वापरल्याचा राग मनात धरुन देवकर व त्याच्या साथीदाराने तन्वीर याच्यावर चॉपरसारख्या धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले.
याप्रकरणी साजीद छोटु शहा (वय 26, रा. गोंधवणी रोड, दत्त मंदीराजवळ, वॉर्ड नं. 1, ता. श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुना रजिस्टर नंबर553/2023 भादंवि कलम 302, 34 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन पसार आरोपींचा शोध घेवून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, सहाय्यक फौजदार भाऊसाहेब काळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, बाळासाहेब गुंजाळ, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, पोलीस कॉन्स्टेबल रणजीत जाधव, किशोर शिरसाठ, गणेश भिंगारदे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व चालक बबन बेरड व अंमलदार यांची दोन पथके नेमुन कारवाईच्या सूचना दिल्या.
पोलीस पथक आरोपीची माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक आहेर यांना सूत्रनुसार मार्फत माहिती मिळाली की, खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सुनिल देवकर त्याचे साथीदारासह राहुरी रेल्वे स्टेशन परिसरात असुन कोठेतरी पळुन जाण्याच्या तयारीत आहेत. माहिती मिळताच श्री. आहेर यांनी पथकास राहुरी रेल्वे स्टेशन परिसरात जावुन कारवाईचे आदेश दिले. पथकाने प्रवासी म्हणून वेशांतर करुन, शिताफिने सापळा लावुन थांबलेले असताना एक इसम साथीदारासोबत राहुरी रेल्वे स्टेशन परिसरात बसलेला
दिसला. पथकाने त्यास जागीच पकडुन ओळख सांगुन त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने सुनिल सिताराम देवकर (वय 22, रा. महादेवनगर, गोंधवणी, वॉर्ड नं.1. ता.श्रीरामपूर) व सोबत साथीदार एक विधीसंघर्षीत बालक मिळुन आला. त्यांचेकडे सदरच्या गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्या दोघांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. पथकाने त्यांना ताब्यात घेवुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे करीत पत्रकात नमूद केले आहे. 

Saturday, June 10, 2023

सिनेस्टाईल रोखली गुटखा तस्करी धुळे पोलिसां ने ?

धुळे - प्रतिनिधि - वार्ता -
शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने साक्रीरोडवरील सुरेंद्र दुध डेअरी जवळ सापळा रचला. मात्र पथकाची चाहुल लागताच चालकाने कार सुसाट वेगाने पळविली. या कारचा सिनेस्टाईल पाठलाग करून पकडण्यात शहर पोलिसांच्या पथकाला यश आले. या कारवाईत 79 हजार 200 रूपये किंमतीचा गुटख्यासह एक लाख 40 हजार रूपये किंमतीची कार असा दोन लाख 19 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक आनंद कोकरे यांना सुरत बायपासकडून शहरात ऑरेंज रंगाच्या स्वीफ्ट कार क्र.एम.एच.18/टी.1253 मधून बेकायदेशिर गुटख्याची वाहतुक होत असल्याची  माहिती मिळाली. या माहितीवरून पथकाने साक्रीरोडवरील सुरेंद्र दुध डेअरी जवळ दबा धरला. त्यावेळी सकाळी साडेसात वाजता वरील क्रमांकाचे संशयित वाहन हे त्या ठिकाणी आले. चालकाला पोलिसांची चाहुल लागताच त्याने कार सुसाट वेगाने सिंचन भवनाकडे नेली. या कारचा पथकाने सिंचन भवनपर्यत सिनेस्टाईल पाठलाग करून वाहन अडविले. चालक नितेश प्रकाशलाल आहुजा रा. कुमारनगर, साक्री रोड, धुळे यास ताब्यात घेण्यात आले. तसेच 79 हजार 200 रूपये किंमतीचा गुटख्यासह एक लाख 40 हजार रूपये किंमतीची कार मिळून दोन लाख 19 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.







मान्सून गोव्याच्या किनार पट्टी वर येत्या ४८ तासांत महाराष्ट्रात दाखलहोण्याची शक्यता ?

मुंबई - प्रतिनिधि - समाचार -
महाराष्ट्रात उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. प्राणी पक्षी, बळीराजा आणि सगळे लोक मान्सूनची डोळ्यात तेल घालून वाट पाहात आहेत. या सगळ्यांसाठी खुशखबर आहे. केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनच्या प्रवासाला सुरुवात झाली असून आज कर्नाटकाचा काही भाग व्यापला आहे.
पुढील ४८ तासात केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे काही भागात पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी कोकणात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. अनुकूल वातावरण असल्यामुळे पुढील ४८ तासात मान्सून गोव्याच्या किनारपट्टीसह महाराष्ट्रातही धडकण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पूर्वमध्य अरबी समुद्रावरील अत्यंत तीव्र चक्रीवादळ 'बिपरजॉय' गेल्या ६ तासांत प्रतितास ९ किमी वेगाने उत्तरेकडे सरकले आहे. आज १० जून रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ५.३० वाजता ते अरबी समुद्रातील उत्तरेला घोंघावत
होते. हे चक्रीवादळ गोव्याच्या पश्चिमेस सुमारे ७०० किमी, मुंबईच्या पश्चिम-नैऋत्येस ६३० किमी, पोरबंदरच्या दक्षिण-नैऋत्येस ६२० किमी आणि कराचीच्या दक्षिणेस ९३० किमी अंतरावर असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

------------------------------------------------=================================
भारत सरकार
पृथ्वी विज्ञान मंत्रालय
भारत हवामान शास्त्र विभाग
प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र
कुलाबा, मुंबई - ४०० ००५
भारत सकार
पृथ्वी विज्ञान मंत्रालय
भारत मौसम विज्ञान विभाग
प्रादेशिक मौसम विज्ञान केन्द्र
कोलाबा, मुंबई - ४०००.०५
GOVERNMENT OF INDIA
MINISTRY OF EARTH SCIENCE
INDIA METEOROLOGICAL DEPARTMENT REGIONAL METEOROLOGICAL CENTRE
COLABA, MUMBAI-400 05
=================================
------------------------------------------------





श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामी स्थळांना श्रीरामपूर तहसीलदार वाकचौरे यांची भेट ?

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -

श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज पालखी तालुक्यातील बेलापुर गावी मुक्कामी येत असुन वारकऱ्यांची गैरसोय होवु नये या करीता माननीय जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या सुचनेनुसार श्रीरामपूर विभागाचे प्रांताधिकारी किरण सावंत - पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांनी पालखी तसेच वारकरी मुक्कामी रहात असलेल्या ठिकाणाला भेटी देवुन तसेच पदाधिकारी, अधिकारी,वैद्यकीय अधिकारी, पोलीस, ग्रामस्थ यांची बेलापूरात संयुक्तीक बैठक घेवुन योग्य त्या सुचना दिल्या.
बेलापूरात पालखी मुक्कामी असणाऱ्या विठ्ठल मंदीरास त्यांनी भेट दिली या वेळी मंदीरांचे प्रमुख ह.भ.प. सोपान महाराज हिरवे यांनी सर्वांचे स्वागत करुन पालखीचा महीमा परंपरा, मंदिराची स्थापना असा सर्व इतिहास अधिकारी पदाधिकारी यांना सांगीतला, पूर्वीच्याकाळी या पालखी सोहळ्याचा मार्ग एका घोड्याने दाखवीला असुन अजुनही त्याच मार्गाने हा पालखी सोहळा मार्गस्थ होत असल्याचे हिरवे यांनी सांगून त्या घोड्याची मंदिराशेजारीच समाधी असल्याचेही सांगीतले. 
यावेळी गावातील पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पोलीस यांना महसुल विभागाच्या वतीने योग्य त्या सुचना देण्यात आल्या असुन आरोग्य, पिण्याचे पाणी स्वच्छतागृह याबाबत वारकऱ्यांना कसलीही उणीव भासु नये याची खबरदारी घेण्याच्या सुचना तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांनी दिल्या. यावेळी माजी जि. प. सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, बाजार समितीचे उपसभापती व बेलापुरचे उपसरपंच अभिषेक खंडागळे, मंडलाधिकारी भिमराज मंडलीक, कामगार तलाठी प्रविण सुर्यवंशी, विकास शिंदे, बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डॉक्टर देविदास चोखर,बेलापुर खूर्दचे ग्रामविकास अधिकारी तुकाराम जाधव, एकनाथ नागले, दादा कुताळ, पत्रकार देविदास देसाई, बाजार समितीचे सचिव साहेबराव वाबळे, बेलापुर पोलीस स्टेशनचे हरिष पानसंबळ, बाजार समितीचे सर्व व्यापारी उपस्थित होते.

(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))

रासपा च्या कोपरगांव अध्यक्षपदी...आशितोष जाधव युवक......अध्यक्षपदी...महेश जानराव यांची निवड ?

राजेंद्र - बनकर - शिर्डी -

 शिर्डी येथे राष्ट्रीय समाज पक्ष उत्तर अहमदनगर जिल्ह्याची बैठक पार पडली यावेळी या बैठकीत कोपरगांव तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची नव्याने कार्यकारिणी निवड करण्यात आली आहे. रासपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सय्यद बाबा शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरगांव तालुका अध्यक्षपदी आशितोष जाधव , युवक तालुका अध्यक्षपदी महेश जानराव यांची निवड करण्यात आली असुन या बैठकीस रासपाचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब काटकर , राहाता तालुका अध्यक्ष रमेश बनकर, अशोक जानराव , शिर्डी शहर अध्यक्ष वैभव सोनवणे , गणेश बनकर , प्रवीण बनकर , रविंद्र काटकर , लखन वाघ , ॲड अविनाश शेजवळ आदींसह राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्येकर्ते उपस्थित होते.प्रसंगी सय्यद शेख यांनी कोणतेही पद मोठे नसून आपण त्या पदाला योग्य न्याय दिला त्यासाठी समाजातील समस्या जाणून त्यावर काम केले तर तो कार्यकर्ता हा जनसामान्यात आपली ओळख निर्माण करुन यशस्वी होतोच असे सांगत रासपाचे जननायक महादेव जानकर यांच्या विचारधारेतुन तळागळातील वंचित घटकांसाठी कार्य करा असे स्पष्ट केले तर रासपाचे उत्तर अहमदनगर जिल्हा अध्यक्ष नानासाहेब काटकर यांनी नुतन अध्यक्षांना शुभेच्छा देत श्री साईबाबांच्या पवित्र भूमीत उत्साहात बैठक पार पडली आहे, नुतन पदाधिकाऱ्यांनी सामाजिक दायित्व जपून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावे आणि कोपरगांव तालुक्यात चांगले संघटन करुन पक्ष बळकट करुन आगामी ध्यैयाकडे व समाजकारणाकडे वाटचाल करावी असे सांगत शुभेच्छा दिल्या.

(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))