राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, June 23, 2023

पुरस्काराने सत्कार्याला गती* *मिळते =डॉ. प्रेरणा शिंदे*

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर प्रतिनिधी:
समाज हा अनेकांच्या योगदानातून नावारूपाला येतो.माझे सासरे स्व.अड, रावसाहेब शिंदे यांनी जीवनभर 'देतो तो देव 'या भावनेतून समाजसेवा केली. तो आदर्श आमच्यासमोर आहे.मला पुरस्कार लाभला तो सेवाकार्यातील सहभागातून,अशा पुरस्कारामुळे सत्कार्याला अधिक गती मिळते, असे विचार प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रेरणा शिंदे यांनी व्यक्त केले. 
  येथील महादेव मळ्यात आयोजित 'सत्कार्याचा सत्कार 'या कार्यक्रमात डॉ. प्रेरणा शिंदे बोलत होत्या.त्यांना नुकताच महाराष्ट्र राज्य स्त्रीरोगतज्ज्ञ संघटना, मुबंई संस्थेचा सन्मान पुरस्कार देण्यात आला, त्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. माजी प्राचार्य टी. ई शेळके, प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे, साहित्यिक डॉ बाबुराव उपाध्ये, प्रा. शिवाजीराव बारगळ, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे,डॉ. राजीव शिंदे आदी उपस्थित होते.त्यांनी शाल,पुस्तके, भेटवस्तू देऊन डॉ. प्रेरणा शिंदे यांचा सर्वांनी सत्कार केला, अभिनंदनपूर्वक मनोगते व्यक्त केली. डॉ. प्रेरणाताई शिंदे ह्या एक अनुभवी, सेवाभावी स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत, त्यांनी समाजात आदर्श वैद्यकीय सेवेने नावलौकिक प्राप्त केला आहे, त्याचबरोबर शिक्षण, समाज,संस्कार अशा विविध उप्रक्रमातून,माध्यमातून योगदान दिले, देत आहेत.विद्यानिकेतन शालेय उपक्रम, ऊसतोडीवाल्या मुलांना मदत, गरीब,गरजू मुलींचे पालकत्व आदी उपक्रम हॆ त्यांच्या कार्याचे मोठेपण उपस्थितांनी मनोगतातून सांगितले.डॉ. प्रेरणा शिंदे यांनी अशा आपुलकीच्या सन्मानामुळे आणखी जीवनऊर्जा मिळते, असे सांगत आभार मानले.
*वृत्तसंकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

Thursday, June 22, 2023

भोकरच्या आश्रमात हाणामार्‍या पोलीसांत गुन्हा दाखल येथील पावित्र्य,धार्मीकता टिकविण्यासाठी विश्वस्त व वरीष्ठानी लक्ष घालण्याची गरज


श्रीरामपूर - भोकर - प्रतिनिधि - वार्ता

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील एका महानुभव आश्रमात नव्याने आलेल्या विवाहीत दाम्पत्याकडून येथील पुजार्‍यास लोखंडाची पट्टी व दगडाने जबरी मारहाण केल्याची घटना घडली असून जखमी पुजारी मोहनदादा अंकुळनेरकर यांचेवर श्रीरामपूर येथील साखर कामगार हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या प्रकरणी तालुका पोलीसांत दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
भोकर गावात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री चक्रधर मंदिर येथे गेल्या अनेक वर्षापासून अंतर्गत वाद सुरू आहेत. येथील महंत साधेराजबाबा अंकुळनेरकर व ग्रामस्थ या ठिकाणच्या नियमीतच्या वादाला कंटाळलेले आहेत. त्यातच अध्यात्मीक ठिकाण म्हणून कुठली कारवाई करायची असा प्रश्न अनेक वर्षापासून आहे. या प्रकरणी अनेकदा ग्रामसभेतही या ठिकाणच्या वादाचा विषय गाजलेला आहे. परंतू येथील महीलाराज मुळे या वादाकडे सर्वांनाच दुर्लक्ष करण्याशिवाय पर्याय दिसत नसल्याने सर्वजण अनेक वर्षापासून हे सहन करत आले आहेत. या वादावर पर्याय काढण्यासाठी येथील महंत सारंगधरबाबा यांनी ही अनेकदा प्रयत्न केले परंतू त्यांनाही अपयश आलेले आहे. परंतू ते वाद गावातच राहीले.
त्यातच येथे आता दुसर्‍या पिढीचे पुजारी म्हणून आलेले मोहनदादा द्वारकाबाई अंकुळनेरकर हे हजर झाले त्यानंतर येथील ऋतुजा नामक युवती बरोबर पती आकाश पिंगळे यांचे आगमण झाले अन् काही काळ थंडावलेले वाद पुन्हा सुरू झाले व त्याचे रूपांतर चक्क हाणामारीत झाले. अध्यात्मीक ठिकाणी टोकाचे पाऊल उचलले गेले. समाज प्रबोधनाचे कार्य सुरू असलेल्या या अध्यात्मीक व धार्मीक ठिकाणी अर्वाच्च शब्द सुरू झाले. समाज नेहमीच बघ्याच्या भुमिकेत राहीला कारण कुणाच्या धार्मीक भावना दुखायला नको. अध्यात्माला गालबोट लागायला नको म्हणून अनेकांना कळवळा असतानाही पुढे जाता येत नव्हते.
त्यातच या पिंगळे दाम्पत्याने येथील दुषीत वातावरणात भर टाकत येथे अर्वाच्य शिवीगाळ व नित्याच्या भांडणात दि.२० जून रोजी या भांडणाचे रूपांतर हाणामार्‍यात झाले. रात्री उशीराने झालेल्या हाणामार्‍यात येथील पुजारी मोहनदादा यांना दगडाने व लोखंडी पट्टीने मारहाण झाली. मध्यस्थासाठी गेलेल्या शेजारच्या काही प्रतिष्ठीतांना व मदतीसाठी आलेल्या पोलीसांनाही या भांडणात अर्वाच्या शब्दांना सामोरे जावे लागल्याची जोरदार चर्चा गावात सुरू आहे.
येथील पुजारी मोहनदादा यांनी मध्यरात्री पोलीसांना पाचारण करत अध्यात्मीक ठिकाणी पोलीसांची मदत घ्यावी लागली. पोलीसांच्या साक्षीने व मदतीने जखमी मोहनदादा यांना साखर कामगार हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथील जखमी पुजारी मोहनदादा अंकुळनेरकर जबाबानुसार तालुका पोलीसांत फिर्याद दाखल करण्यात आली असून त्यात येथील आकाश पिंगळे व ऋतुजा पिंगळे यांनी फिर्यादीकडे त्यांचे पाहुणे आल्याचा राग येवून लोखंडाच्या पट्टीने डोक्यास मारून व पाठीवर दगडाने मारून जखमी केले व लाथा बुक्याने मारहाण करून घाणघाण शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद दाखल केली असून तालुका पोलीसात गु र नं.१३१२/२०२३ भादंविसं कलम ३२४,३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ. मोहन शिंदे हे पुढील तपास करत आहेत.
पावित्र्य, धार्मीकता व शांतता टिकविण्यासाठी विश्वस्त, ग्रामपंचायत व वरीष्ठानी लक्ष घालण्याची गरज*
दरम्यान येथील धार्मीक वातावरण निरंतर राहुन या तिर्थ क्षेत्राचे पावित्र्य टिकविण्यासाठी व गावची शांतता कायम करण्यासाठी येथील विश्वस्त मंडळाने, या पंथातील वरीष्ठ व ग्रामपंचायत यांनी तातडीने लक्ष घालत योग्य पावले उचलण्याची गरज असल्याची अपेक्षा ग्रामस्थ व येथील भाविक भक्ताकडून व्यक्त होताना दिसत आहे.



जॉगिंग ट्रॅक सुशोभीकरण, सोनवणे वस्ती, झिरंगे वस्ती आणि मिल्लत नगर येथे नवीन अंगणवाडी स्थापना तसेच विविध मुद्द्यांसाठी अजहरभाई शेख यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन

 श्रीरामपूर (मोहसीन शेख)

श्रीरामपूर शहरातील लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते अजहरभाई शेख यांच्या वतीने प्रभाग क्रमांक १ मधील जॉगिंग ट्रॅक सुशोभीकरण, नवीन अंगणवाडी स्थापना तसेच विविध मुद्द्यांसाठी श्रीरामपूर नगरपालिकेतील मुख्याधिकार श्री गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
फातेमा हौसिंग सोसायटी व मिल्लतनगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत कॅनाल असून त्यालगत लाखो रुपयांचे खर्च करून स्थानिक रहिवासी यांच्या आरोग्याची काळजी म्हणून श्रीरामपूर नगरपालिकेने सुमारे १ किलोमीटर अंतराचे जॉगिंग ट्रॅक बनवलेले होते आणि त्यानंतर त्याची रखराखाव करण्याची जबाबदारी देखील नगरपालिकेची होती.
  मात्र मागील काही काळात सदर कॅनॉल मधील कचरा, माती, निरुपयोगी वस्तू, तसेच कॅनॉल खोदकामाची माती देखील सादर जॉगिंग ट्रॅक वर टाकण्यात आली आणि लाखो रुपये खर्च करून जनतेचा आरोग्य जपण्यासाठी बनवलेल्या सादर जॉगिंग ट्रॅकला जनतेच्या आरोग्यासाठी धोका बनवण्यात आलं. त्यामुळे नाईलाजास्तव स्थानिक नागरिकांना आपला आरोग्य जपण्यासाठी व जॉगिंग करण्यासाठी लांब लांब अश्या ठिकाणी जावं लागत आहे. 
तसेच फातेमा हौसिंग सोसायटी मध्ये मदरसा व मॅरेज हॉल असल्यामुळे बाहेरील नागरिक लग्न सोहळ्यासाठी येत असतांना व जॉगिंग ट्रॅकची अवस्था पाहून श्रीरामपूर सारख्या स्वच्छ व सुंदर शहराची प्रतिमा मलीन होते.
 तसेच सोनावणे वस्ती, झिरंगे वस्ती आणि मिल्लत नगर येथे अंगणवाडी नसल्यामुळे स्थानिक रहिवासिंना मोठा त्रास सहन करत लहान मुलांना लांब लांब असलेल्या खाजगी आंगणवाड्यांमध्ये पैशे भरून पाठवावं लागत असून सदर बाबी मुळे घरामधील महिला भगिनींना लहान मुलांना घेऊन लांब लांब जावे लागत आहे आणि हि लहान मुलांसाठी खूप धोकादायक आहे तसेच दुसऱ्या प्रभागात असणाऱ्या अंगणवाडीमध्ये सदर भागाच्या रहिवासी यांच्या मुलांना प्रवेश दिला जात नाही त्यामुळे सदर परिसरात नवीन अंगणवाडीची स्थापना करण्यात यावी. अश्या विविध मागण्यांसाठी अजहरभाई शेख यांनी श्रीरामपूर नगरपालिकेतील मुख्याधिकारी श्री गणेश शिंदे यांना निवेदन दिले. या वेळी ऍड. मोहसीन शेख, फैजान तांबोळी, अरबाज शाह, दानिश तांबोळी, फैझान बागवान, मोईज पठाण, मजहर शाह, सागर देहरे, समीर शेख आदी उपस्थित होते.

शासनातर्फे वारकऱ्यांना विमा संरक्षण - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील...

मुंबई - प्रतिनिधि - वार्ता -
शिर्डी, दि.२२ जून  पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांना या निर्णयाचे विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण मिळणार आहे. महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात वारी नियोजनाच्या आढावा बैठकीत वारकरी बांधवांना विमा योजना लागू करण्याबाबत सूतोवाच केले होते.‌
याबाबत त्यांनी व्यक्तीश: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून या योजनेला मूर्त स्वरूप दिले. वारी एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल.
दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे.‌
शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे. असेही महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी सांगितले. वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो.
यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हा निर्णय घेतल्याबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

---------------------------------------------------===================================
कार्य.संपादक भगवंत सिंग प्रितम सिंग बतरा शब्द... ✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
===================================
---------------------------------------------------

सातारा बाजार समिती जागा वाद; शिवेंद्रराजेंसह ८० जणांवर गुन्हा; दोन्ही बाजुंच्या १२५ जणांवर गुन्हा दाखल....

( सातारा ) - समाचार - सातारा
शहराजवळील संभाजीनगरमध्ये बाजार समितीच्या नूतन इमारतीच्या वादातून आमदार शिवेंद्रसिंहराजे गटाने गुन्हा दाखल केल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा ...
सातारा बाजार समिती जागा वाद शिवेंद्रराजेंसह ८० जणांवर गुन्हा दोन्ही बाजुंच्या १२५ जणांवर गुन्हा 
सातारा : सातारा शहराजवळील संभाजीनगरमध्ये बाजार समितीच्या नूतन इमारतीच्या वादातून आमदार शिवेंद्रसिंहराजे गटाने गुन्हा दाखल केल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा खासदार उयनराजेंच्या गटानेही तक्रार दिली. त्यानुसार आता शिवेंद्रसिंहराजेंसह सुमारे ८० जणांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तर याप्रकरणात आता दोन्ही राजेंसह सुमारे १२५ जणांविरोधात गुन्हा नोंद आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी संभाजीनगरमध्ये सातारा बाजार समितीच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ होता.
 त्यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले समोरासमोर आले होते. यामुळे वाद वाढत गेला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वादावर तात्पुरता पडदा पडला. पण, त्यानंतर दोन्ही राजेंचे आरोप प्रत्यारोप सुरु होते. तर याप्रकरणी आमदार गटाचे व सातारा बाजार समितीचे सभापती विक्रम पवार यांनी बुधवारी रात्री नऊच्या सुमारास खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह ४५ जणांच्याविरोधात तक्रार दिली होती. पोलिसांनी त्यानुसार गुन्हा नोंद केला. तर त्यानंतर रात्री उशिरा खासदार गटाने तक्रार दिली.खासदार गटाच्या वतीने संपत महादेव जाधव (रा. संभाजीनगर, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार
 आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, विक्रम पवार,
मधुकर पवार, आनंदराव कणसे, अरुण कापसे,
आमिन कच्छी, विजय पोतेकर, भिकू भोसले, रमेश चव्हाण, राजेंद्र नलवडे, वंदना कणसे, आशागायकवाड, शैलेंद्र आवळे, संजय पवार, अनिल जाधव, धनाजी जाधव, नामदेव सावंत, फिरोज पठाण, रवी ढोणे, कांचन साळुंखे, अविनाश कदम, रवी पवार, शेखर मोरे, सुनील जंवर, नंदकुमार गुरसाळे, उत्तम नावडकर, अमित महिपाल, अमर मोरे, मिलींद कदम, सुजीत पवार, शैलेश देसाई, अरविंद चव्हाण आदींसह एकूण ८० जणांच्या विरोधात तक्रार देण्यात आली. त्यानंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.मारण्याच्या गुन्हा आमदार गटाच्या वतीने धमकी आणि विकास चे काम करु न दिल्याप्रकरणी तक्रार देण्यात आली होती. तसेच खासदार गटाच्या वतीनेही जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह ८० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मला व माझा पुतण्या अॅड. सागर गणपत जाधवला बोलवून आमच्या कामात आड थळा आल्यास धमाकावण्यास आल्याची माहिती दिल्याचे संपत जाधव यांनी तक्रारीत स्पष्ट केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
------------------------------------------------------------------------=====================================
सह, संपादक रंजित बतरा शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
===================================
---------------------------------------------------

आषाढी एकादशीच्या दिवशी येणाऱ्या बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा बेलापूर येथील मुस्लीम बांधवांचा ऐतिहासीक निर्णय...

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -

मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद सण आणि हिंदु धर्मियांची आषाढी एकादशी हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असुन मुस्लिम बांधवांनी हिंदु बांधवांच्या भावनांचा सन्मान करत बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा ऐतिहासीक निर्णय घेतला आहे. तालुक्यातील बेलापुर येथे नुकतीच शांतता कमीटीची बैठक संपन्न झाली. त्यात सर्व मुस्लीम बांधवांनी हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले असुन त्यांच्या निर्णयाचे हिंदु बांधवांनी तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या अध्यक्षतेखाली बेलापुर येथे नुकतीच शांतता कमीटीची बैठक संपन्न झाली. मुस्लीम बांधवाचा सण बकरीईद तसेच हिंदू बांधवांचा पवित्र आषाढी एकादशी हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असुन त्या दिवशी काही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता कमीटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. पोलीस प्रशासनाच्या वतीने काही सुचना करण्याच्या आगोदरच मुस्लीम बांधवांनी जाहीरपणे सांगितले की आम्ही सर्व जण कायमच एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होत आहोत. आषाढी एकादशी हा हिंदु बांधवांचा मोठा व पवित्र सण आहे. या दिवशी सर्व हिंदु बांधव पुजाअर्चा करुन उपवास करतात. याच दिवशी मुस्लीम बांधवांचा कुर्बानी देण्याचा सण बकरीईद येत आहे. त्यामुळे हिंदु बांधवांच्या भावनांचा आदर करुन दोन दिवस कुर्बानी न देण्याचा निर्णय आम्ही सर्व मुस्लीम बांधवांनी सर्वानुमते घेतला असल्याचे हाजी ईस्माईल शेख, मोहसीन सय्यद, बाबुलाल शेख, अयाजअली सय्यद, जाकीर शेख ,अजीज शेख यांनी सांगितले. मुस्लीम बांधवांनी हा ऐतिहासीक निर्णय घेतला असुन या निर्णयांचे हिंदु बांधवाच्या तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. बेलापुर गावाने नेहमीच समाजापुढे आदर्श ठेवण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे. सर्वात प्रथम विना पोलीस बंदोबस्ताशिवाय गणेश विसर्जन मिरवणूक पार पाडण्याचा यशस्वी निर्णय घेतला. त्यानंतर गाव सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्याचा धाडसी निर्णय गावाने घेतला होता. गावाने दिपावली निमित्त आपली खरेदी आपल्या गावातच हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविला तसेच राम मंदिराचे कोषाध्यक्ष बेलापूर गावचे वैभव आचार्य गोविंददेवगीरीजी महाराज यांच्याकडे राम मंदिर उभारणीसाठी ७५ हजार रुपये देण्याचा देशातील पहीला मान बेलापुरच्या मुस्लीम बांधवांनी मिळवीला तसेच संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे मुस्लीम बांधवांनी जागोजागी स्वागत केले आता आषाढी एकादशी व द्वादशी या दोन दिवस कुर्बानी न देण्याचा धाडसी निर्णय बेलापुरच्या मुस्लीम बांधवांनी घेतला आहे. राज्यात नव्हे देशात असा निर्णय घेणारे बेलापुर हे पहीले गाव ठरले आहे. या वेळी जि प सदस्य शरद नवले, उपसरपंच अभिषेक खंडागळे , काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक ,मोहसीन सय्यद, प्रफुल्ल डावरे, हाजी ईस्माईल शेख, पास्टर अलिशा जोगदंड, एकनाथ नागले, देविदास देसाई,शिवसेनेचे अशोक पवार, विष्णूपंत डावरे आदिंनी मनोगत व्यक्त केले. समाजापुढे आदर्श ठेवण्याचे काम नेहमीच या गावाने केले असुन सण उत्सव शांततेत पार पाडा या करीता घेण्यात आलेल्या शांतता समीतीच्या बैठकीत मुस्लीम बांधवांनी एक वेगळाच आदर्श घालुन दिला असल्याचे मत पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी व्यक्त केले. या वेळी बेलापुरात नुकत्याच झालेल्या राजकीय भूकंपावरुन शरद नवले, अरुण पा नाईक,अभिषेक खंडागळे यांनी भाषणात केलेल्या शेरेबाजीमुळे उपस्थितामध्ये हशा पिकला ग्रामपंचायत सदर रविंद्र खटोड, अशोक गवते, मुस्ताक शेख,रमेश आमोलीक ,मिस्टर शेलार ,जिना शेख दादा कुताळ, जाफरभाई आतार, जब्बार आतार, गोपी दाणी रफीक शेख, प्रदीप शेलार, अकीला पटेल, ईस्माईल आतार, सागर ढवळे ,किशोर महापुरे, फतेमोहंमद इनामदार, हाफीज शेख, कासम शेख सहाय्यक फौजदार सुधीर हापसे ,हवालदार सोमनाथ गाडेकर ,हवालदार शफीक शेख पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ,नंदकिशोर लोखंडे आदिसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार देविदास देसाई यांनी केले तर सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे यांनी आभार मानले‌
 आमच्या शेजारीच हिंदु बांधव राहतात आषाढी एकादशीला ते धार्मिक विधी पुजा- अर्चा करुन उपवास करतात.त्याच दिवशी बकरीईद आली असुन त्यांच्या धर्माचा धार्मिक भावनांचा आदर करुन त्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे  शफीक आतार
या गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असुन येथील मंदिर व मस्जिदची एकच भिंत आहे. मुस्लीम बांधवांनी आषाढी एकदशीच्या दिवशीच येणाऱ्या बकरीईदला कुर्बानी न देण्याचा धाडसी निर्णय घेतला असुन दोन समाजात सामंजस्य, प्रेम, सदभावना वाढविण्याच्या दृष्टीने टाकलेले हे महत्वाचे पाऊल आहे, आणखी एक विनंती आहे की, कुर्बानी देताना गाय किंवा गोवं जनावरांची कुर्बानी देवु नये पंडीत महेश व्यास

वृत्तसंकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

Wednesday, June 21, 2023

अंमलबजावणीत वाळू धोरणाच्या अहलगर्जीकरणाऱ्यांवर कारवाई आश्वीत वाळू विक्री केंद्राचा शुभारंभ अधिकाऱ्यांना ना.राधाकृष्ण विखें पाटलांची तंबी....

( अहमदनगर ) - प्रतिनिधि - वार्ता -
सर्वसामान्य नागरीकांसाठी सुरु केलेल्या वाळू धोरणाच्या अंमलबजावणीत कोणी कितीही अडथळे आणले तरी, हे धोरण यशस्वी करण्यासाठी शासन समर्थ आहे. मात्र, ज्या कार्यक्षेत्रात आता वाळू विक्री केंद्र यशस्वीपणे सुरु करण्यास आधिकारी हलगर्जीपणा दाखवित असतील तर त्यांनाच जबाबदार धरुन कारवाई करण्याचा इशारा महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रूक येथे वाळू विक्री केंद्राचा शुभारंभ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, शाळीग्राम होडगर, मच्छिंद्र थेटे, रोहीणी निघुते, कैलास तांबे, सतिष कानवडे, प्रांताधिकारी शैलेंश हिंगे, तहसिलदार धिरज मांढरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले,वाळूच्या पैशातून सुरु असलेले राजकारण आणि गुन्हगारीकरण थांबविण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. आत्तापर्यंत जेवढे वाळू विक्री केंद्र सुरु झाले आहे त्यामधून 20 हजार ब्रास वाळू उपलब्ध केली आहे. यामधून राज्य सरकारच्या तिजोरीत 600 रुपये दराने थेट रक्कम जमा झाली आहे. तरीही अद्याप या व्यवसायातील माफीयाराज संपत नाही. ‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही’ असा उल्लेख करुन त्यांनी सांगितले की, सरकारी यंत्रणाच जर या वाळू धोरणात आता अडथळा आणत असेल तर गांभिर्याने पाऊल उचालावी लागतील, असे त्यांनी स्पष्ट केली.जलसंपदा विभागाने वाळू उचलण्यास कॅनॉलचे कारण सांगून परवानगी दिली नव्हती. मग यापुर्वी वाळू उपसा होताना कॅनॉलची आठवण झाली नाही का? असा थेट सवाल करुन, आमच्याही विभागातील काही आधिकारी डेपो सुरु करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतू आता हलगर्जीपणा करणार्‍यांना माफी नाही, असा गर्भित इशारा देवून ना. विखे पाटील म्हणाले की, राज्य सरकार हे सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेत आहे. यापुर्वी महाविकास आघाडी सरकारकडून फक्त सामान्य माणसाची लुट आणि फसवणूक झाली. राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका सरकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
निळवंडे कालव्यांचे श्रेय कोणाला द्यायचे त्यांनी जरुर घ्यावे, परंतू, निमगावजाळी येथून जाणार्‍या कालव्याचे काम जाणीवपुर्वक कोणी रखडविले, उंबरीच्या पुलाचे काम बंद का ठेवले, संबधित ठेकेदारावर कारवाई करा आणि काळ्या यादीत टाका, अशा स्पष्ट सुचना ना. विखे पाटील यांनी आधिकार्‍यांना दिल्या. राज्यातील दुध उत्पादक शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी आपण गुरुवारी पुण्यामध्ये खासगी आणि सहकारी दूध संघ चालकांची महत्वपूर्ण बैठक बोलावली असून पशुखाद्य कंपन्यांनाही या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. दूध उत्पादकांवरील अन्याय सहन करणार नाही, ही भूमिका घेवून सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली. याप्रसंगी शाळीग्राम होडगर यांचेही भाषण झाले.
------------------------------------------------=================================
कार्य,संपादक भगवंत सिंग प्रितम सिंग बतरा शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
=================================------------------------------------------------