राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, October 31, 2023

*स्व.प्रा.डॉ. ज्ञानेश्वर घोटेकर यांचे 'गंगथडी' आत्मचरित्र कृतज्ञतेचे अमृतमंथन =डॉ. राजीव शिंदे*


श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
आत्मचरित्र म्हणजे जीवनानुभावनांचे व्यक्ती व प्रसंगदर्शन असते.स्व.प्रा.डॉ.  ज्ञानेश्वर बाजीराव घोटेकर यांचे ' गंगथडी 'हॆ आत्मचरित्र म्हणजे त्यांना जीवनात भेटलेल्या आदर्श व्यक्ती आणि पुण्यभूमीबद्दलचे कृतज्ञतेचे सकारात्मक,आनंदमय जीवनाचे अमृतमंथन होय,असे मत रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ.राजीव रावसाहेब शिंदे यांनी व्यक्त केले. 
   श्रीरामपूर येथील अग्रवाल मंगलकार्यालयात आयोजित स्व.प्रा.डॉ.ज्ञानेश्वर घोटेकर लिखित ' गंग्थडी' आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्यात अध्यक्ष म्हणून डॉ. राजीव शिंदे बोलत होते. प्रारंभी स्व. डॉ. ज्ञानेश्वर घोटेकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.संदीप ज्ञानेश्वर घोटेकर यांनी स्वागत केले.प्रस्तावनाकार डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला.प्रमुख पाहुणे म्हणून ऍड.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके,मोखाडा येथील प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव भोर, गणेश अशोकराव बनकर पाटील, आनंदराव बाजीराव घोटेकर हे उपस्थित होते.प्रा.डॉ. बबनराव आदिक, प्रा. डॉ. बबनराव सहाणे, महादेव भिलारे, साई संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, कवी सागर, सौ. भाग्यश्री निलेश घोटेकर, दत्तात्रय बोरुडे, येळवंडे अण्णा आदिंनी मनोगत व्यक्त केले.



प्राचार्य शेळके यांनी एक संस्कारशील आणि ज्ञानशील प्राध्यापक म्हणून डॉ. ज्ञानेश्वर घोटेकर विद्यार्थीप्रिय होते.ऍड. रावसाहेब शिंदे यांच्याशी त्यांचा विशेष घनिष्ट संबंध होता.आई, वडील, सासरे आणि ऍड. रावसाहेब शिंदे यांना हे पुस्तक अर्पण केले, यावरून हॆ संबंध कळतात. प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव भोर म्हणाले, डॉ. ज्ञानेश्वर घोटेकर यांना सर्वजण माऊली म्हणत, इतके त्यांचे मन आणि वागणे मृदू, आपुलकीचे होते.डॉ. राजीव शिंदे अध्यक्षीय भाषणात पुढे म्हणाले,स्व.डॉ. ज्ञानेश्वर घोटेकर यांचे आत्मचरित्राचे अपुरे स्वप्न घोटेकर परिवाराने पूर्ण केले.त्यांची पत्नी उषाताई घोटेकर,मुले संदीप व सागर घोटेकर, सुना सौ. प्रतिभा आणि सौ. श्वेताताई यांनी विशेष प्रयत्न केले. आयुष्य भरभरून कसे जगावे,एका शेतकरी पुत्राने प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन रयत शिक्षण संस्थेत वाणिज्य शाखेत वरिष्ठ प्राध्यापक  १९८६ ते २०१९ या काळात रयतनिष्ठ म्हणून प्रभाव निर्माण केला,हे पुस्तक म्हणजे नदीच्या ओलव्यासारखा आहे. गावजिव्हाळा आणि ज्ञानतपस्वी व्यक्तिमत्वाचे हॆ श्रीमंत अंतरंग निर्मळपणे उघड करणारे लेखन असल्याचे सांगितले.डॉ. बाबुराव उपाध्ये, डॉ. बबनराव आदिक, सौ. नीलिमा नितीन आंबरे, आसरा प्रकाशनाच्या सौ. मोहिनी काळे,रचनाकार डॉ. शिवाजी काळे अशा अनेकांच्या सहकार्यातून हा आत्मचरित्राचा शब्दप्रवास गुणवत्तापूर्ण झाला आहे, प्रकाशन सोहळ्यास आलेल्या सर्वांना हॆ पुस्तक मिळाल्यामुळे त्याचे वाचन करून त्यातील कुटुंबप्रेम, शिक्षणप्रेम, माणुसकीचा गहिवर समजून घ्यावा असे आवाहन डॉ. राजीव शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन सौ. श्वेता सागर घोटेकर व सौ.कविताताई घोटेकर यांनी केले तर अरुणदादा घोटेकर यांनी आभार मानले.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

*जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शिर्डीत बसलेल्या सात समाजबांधवाचे आमरण उपोषण सुटणार नाही - सचिन चौगुले*


*राजेंद्र बनकर / शिर्डी*
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंतवली सराटी येथे गेल्या सात दिवसापासून आमरण उपोषण सुरु आहे या आमरण उपोषणाला शिर्डीसह राहाता तालुक्यातील सकल समाज बांधवानी पाठिंबा देत शिर्डी प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले व तीन दिवस साखळी उपोषण चालू असताना चौथ्या दिवसापासून सात जणांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. या आमरण उपोषणात
 सचिन चौगुले,अनिल बोठे,रवी गोंदकर,कानिफ गुंजाळ,नितीन अशोक कोते,प्रकाश गोंदकर,प्रशांत राहणे आमरण उपोषणास बसले आहे.
आज या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस असुन जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे

*सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी यांनी जी भूमिका घेतली आहे.त्या भूमिकेच्या समर्थनार्थ आम्ही सात मराठा बांधव आमरण उपोषणास बसलो आहे.शांततेच्या मार्गाने साखळी उपोषण,आमरण उपोषण करावे तोडफोड,जाळपोळ या सारखे हिंसक आंदोलन करू नये.असं आवाहन जरांगे पाटलांनी महाराष्ट्राला केले आहे.त्याच पद्धतीने राहाता तालुक्याच्या वतीने शिर्डीत सुरू असलेल आमरण उपोषण हे शांततेच्या मार्गाने सुरू आहे.कुणीही तोडफोड जाळपोळ किंवा हिंसा होईल अशा प्रकारचे आंदोलन करू नये - सचिन चौगुले*

*राहता तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने २७ तारखेपासून राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे.तरीदेखील मराठ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे हेतूने जाणीवपूर्वक कोणत्याही राजकीय नेत्याने बळाचा वापर करून राजकीय कार्यक्रम व दौरे केल्यास त्या नेत्यांच्या विरोधात जाहीरपणे निदर्शने व निषेध करण्यात येईल - रविंद्र गोंदकर*

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार अजीजभाई शेख - राहाता*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:*✍️✅🇮🇳..
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================



*शिर्डी बिरोबाबन विरभद्र महाराज**मंदिरातील चांदीच्या पादुकांची चोरी**कुलूप तोडून दानपेटी फोडण्याचा प्रयत्न*


*राजेंद्र बनकर / शिर्डी*
शिर्डी नजीकच्या बिरोबाबन येथील विरभद्र महाराज मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मंदिरा समोरील चांदीच्या पादुका चोरुन नेल्याची घटना घडली आहे. या चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला माञ तो असफल ठरल्याचे दिसून येत आहे.या घटनेमुळे शिर्डीसह पंचक्रोशीतील विरभद्र भाविकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत असुन विरभद्र मंदिर हे पंचक्रोशीतील अराध्य दैवत आहे यामुळे ही घटना कोण्या परंप्रातीय चोरट्यांनी केली असल्याचा संशय विरभद्र भाविकांनी व्यक्त केला आहे.
येथील मंदिराचे हरीभाऊ भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार राञी एक ते दिड च्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी येथील वाचमनला चाकुचा धाक दाखवून मंदिरात प्रवेश केला यानंतर त्यांनी मंदिराचे पुढील प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व विरभद्र मंदिरातील मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून नंतर मधील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला आहे.माञ यावेळी मंदिरातील दानपेटीचे कुलूप न तुटल्याने त्यांनी मंदिरासमोरील साधारणतः दिड किलोच्या चांदीच्या


 पादुका चोरुन नेल्या असल्याचे सांगितले आहे. बिरोबाबन येथील भाविकांनी या घटनेची माहिती देताच शिर्डी पोलीसांनी येऊन पाहणी केली असुन दरम्यान या घटनेमुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. तर अशा विकृत मानसिकतेचा पोलीसांनी तपास करुन कारवाई करावी अशी मागणी नानासाहेब काटकर , संपत जाधव , रमेश बनकर , प्रवीण बनकर , संदिप बनकर , संदिप काटकर , विकास धुळसैंदर , बाळासाहेब काटकर , चेतन बनकर, तसेच विरभद्र भगत हरी बनकर आदीसह शिर्डीसह पंचक्रोशीतील विरभद्र भाविकांनी केली आहे.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार अजीजभाई शेख - राहाता*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

*रात्री दुकाने बंद करण्याची वेळ वाढवून मिळावी* *व्यापारी असोसिएशनचे पोलिसांना निवेदन*


संगमनेर - प्रतिनिधि -/ वार्ता -
सध्या सणासुदीचे दिवस असल्याने त्यावर नुकताच सिझनेबल व्यावसायांची सिझन्स चालु होत असताना मार्केटमध्ये ग्राहकांची लगबग सुरु झाल्याचे बघावयास मिळत असल्याने शहरातील दुकाने बंद करण्याची वेळ ही रात्री १० वाजेऐवजी रात्री ११:३० पर्यंत वाढवून मिळावी अशा अशयाचे निवेदन संगमनेर व्यापारी असोसिएशनच्यावतीने संगमनेर शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्री.मथूरे यांना देण्यात आले.
सदरील निवेदन देतेवेळी संगमनेर व्यापारी असोसिएशन अध्यक्ष योगेश कासट,उपाध्यक्ष सुमेध संत,सहसेक्रेटरी जुगलकिशोर बाहेती,माजी अध्यक्ष शिरिष मुळे, ओमप्रकाश आसावा, प्रकाश कलंत्री,संचालक मा.नगरसेवक राजेंद्र वाकचौरे, प्रकाश राठी, ज्ञानेश्वर कर्पे,सोमनाथ कानकाटे,ओंकार शहरकर, तारा पान चे आबासाहेब शिंदे, येवले चहा चे मनिष गोरे, विशाल शिंदे, धनंजय फटांगरे,अंबिका स्विटस् चे श्रीपालसिंह राजपूत, भरकादेवी चे छगनसिंह राजपूत, ग्रेप्स रेस्टाॅरंन्ट चे कैलास ढोले, व्यवस्थापक अविनाश पुलाटे आदी व्यापारी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

===================================
---------------------------------------------------
*ज्येष्ठ पत्रकार राजेश जेधे - संगमनेर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================


*हातभट्टी गावठी दारू निर्मिती. विक्री ठिकाणावर राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर विभागाची धडक कारवाई*


श्रीरामपूर/प्रतिनिधी - वार्ता
डॉ.विजय सूर्यवंशी, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी राज्यातील हातभटटी दारु विरुद्ध सुरु केलेली हातभट्टीमुक्त गाव मोहिम अधिक परिणामकारक करण्यांबाबत दिलेल्या सूचनान्वये तसेच सुनिल चव्हाण, संचालक, (अ व द), राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई गोहन वर्दे विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग, पुणे तसेच प्रमोद सु. सोनोने, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर व उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील सर्वच तालुक्यात दिनांक २८/१०/२०२३ ते दि. २९/१०/२०२३ या दोन दिवसांचे कालावधीत हातभटटी गावठी दारू निर्मिती व विक्री विरोधात प्रभावीपणे कारवाई करण्यांबाबत विशेष मोहिम राबविण्यांत आलेली आहे.
       सदर दोन दिवसांचे विशेष मोहिम कालावधीत एकूण २२ गावठी दारू निर्मिती दारुअडडे उध्वस्त करण्यांत आले असून एकूण १३ हातभटटी दारु विक्री करणान्या ठिकाणावर तसेच हॉटेल व ढाबे इतर ५ ठिकाणी सुध्दा प्रभावी कारवाई करण्यांत आलेली आहे. सदरील कारवाईत एकूण ४० गुन्हे नोंद करण्यांत आलेले असून ४१ आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत नियमान्वये कारवाई करण्यांत आलेली आहे. सदरच्या कारवाईत नष्ट केलेल्या मुद्देमालात हातभट्टी गावठी दारु बनविण्याचे तयार रसायन व तयार हातभट्टी दारुचा समावेश आहे.सदर कारवाईत २१३०० लीटर हातभाट्टी निर्मीतीचे तयार रसायन व १३४१ लीटर तयार हातभट्टी गावठी दारु नष्ट करण्यात आली आहे. सदरील कारवाईत एकूण ६,४६,६१३ /- रुपयांचा मुददेमाल नष्ट करण्याची कारवाई विभागाने केलेली आहे.
       तसेच अवैध मद्यविक्री करणारे ढाबे /हॉटेल्स यावर देखील कारवाई करण्यांत आलेली असून सदरील ठिकाणी मद्यसेवन करणा-या व्यक्तिवरही कारवाई करुन महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ कलम ६८ व ८४ अन्वये कारवाई करण्यांत आलेली आहे. सदरील कारवाई मुळे अवैध मद्यविक्री करणा-या ढाबे व हॉटेल्स इ. ठिकाणी मद्यसेवन करणा-या व्यक्तिचे तसेच हातभटटी दारू निर्मिती करणा-यांचे धाबे दणालले आहेत.
      सदरील दोन दिवसांचे विशेष मोहिम कालावधीत जिल्हयातील सर्व कार्यकारी / अकार्यकारी अधिकारी / भरारी पथकांचे अधिकारी तसेच अकार्यकारी घटकाचे प्रशिक्षणार्थी उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क तसेच जवान कर्मचारी कारवाईत सहभागी होते.
      अवैध मद्यविक्री करणारे ढाबे / हॉटेल्स, तसेच हातभटटी दारू निर्मिती / विक्री ठिकाणावर यापुढेही सातत्याने उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती विभागाचे प्रमोद सु. सोनोने, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. 
        सदर कारवाईत अहमदनगरचे उपधीक्षक सुजीत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली प्रशिक्षनार्थी उपअधीक्षक सागर शेलार, जी.व्ही. कसरे यांचे सह अ.विभागाचे निरीक्षक.एम.एम. राख , ब.विभागाचे निरीक्षक जी.टी.खोडे ,संगमनेर विभागाचे निरीक्षक एस.वाय. श्रीवास्तव, कोपरगाव विभागाचे निरीक्षक एस.एस.हांडे, श्रीरामपुर विभागाचे निरीक्षक बी.बी.हुलगे भरारी पथक क्र १ अहमदनगरचे निरीक्षक ए.बी.बनकर भरारी पथक क्र २ श्रीरामपुरचे गोपाल चांदेकर यांचे सह विभागातील दुय्यम निरीक्षक सहाय्यक दुय्यम निरीक्षक व जवान सहभागी झाले होते.

*जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी अवैध दारू विक्री होत असल्यास खालील नंबरवर संपर्क साधा - प्रमोद सोनोने, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर*
       *आपल्या परिसरात तसेच गावात अवैध मद्यविक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास उत्पादन शुल्क विभागाचे नियंत्रण कक्षातील १) टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ २) व्हॉटसअॅप क्रमांक ८४२२००११३३ क्रमांकावर तक्रार करावी. जेणे करुन अवैध मद्यविक्री / निर्मिती व वाहतुक इ. परिणामकारक कारवाई होऊन त्याचे समूळ उच्चाटन होण्यास जनतेद्वारे मदत होईल*

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

*मा.अफजल मेमन**संपादक: मेमन रिपोर्टर*यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या मनःपूर्वक लाख लाख हार्दिक शुभेच्छा 💐✅🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

🎂 *वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* 💐
-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-
---------------------------------------------------
*आप मुस्कुराऐं इसितरह जींदगी मे*
*हर घडी हर लमहा नयी खुशियां पाऐं !*

*अल्लाह करे यह दिन आपके जींदगी मे*
*बार बार और कई हजारबार आऐ !!*
---------------------------------------------------
===================================

आमचे मित्र आणि स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे सहयोगी तथा साप्ताहिक मेमन रिपोर्टर आणी मेमन रिपोर्टर न्यूज पोर्टल चे प्रमुख संपादक *श्री. अफजलभाई मेमन* यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख हार्दिक शुभेच्छा, येणाऱ्या भावी आयुष्यात त्यांना सुख समृद्धी,भरभराटी सोबत उत्तम आरोग्यदायी जीवन लाभो ही सदिच्छा!
*शुभेच्छूक:*
{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-
---------------------------------------------------
===================================
🌹🥀🌺🌷🌸 ❤️ ✅ 🇮🇳
*शौकतभाई मित्र मंडळ, श्रीरामपूर*
समता फाऊंडेशन, परिवार, श्रीरामपूर 
स्वाभिमानी संपादक सेवा संघ (महाराष्ट्र प्रदेश)
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर
महाराष्ट्र साप्ताहिक संपादक संघ (महा.)
सर्व पदाधिकारी आणि सदस्य मंडळ 
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
---------------------------------------------------
===================================
{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-


Monday, October 30, 2023

*प्रत्येकाने आपल्यातला प्रामाणिकपणा व सत्यनिष्ठपणा जिवंत ठेवावा-जीवन बोरसे*

बेलापूर - प्रतिनिधि - / वार्ता -
प्रत्येकाने आपल्यातला प्रामाणिकपणा व सत्यनिष्ठपणा जिवंत ठेवावा आणि आपले काम नि:स्वार्थीपणे व निरपेक्षपणे करीत राहावे असे प्रतिपादन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे एपीआय जीवन बोरसे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र शासन आदेशान्वये "भ्रष्टाचार दक्षता जनजागृती सप्ताह"अंतर्गत बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.ते पुढे असेही म्हणाले की, भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचरण.लाच घेणे, लाच देणे हा गुन्हा आहे.वाहतुकीचे नियम न पाळणे हा गुन्हा आहे.१९८८ मधे हा कायदा अस्तित्वात येऊन त्यात काही नवीन सुधारणा झाल्या. भ्रष्टाचार जर सिद्ध झाला तर दंडासहित सात वर्षांची शिक्षा होऊ शकते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य प्रो.डॉ.गुंफा कोकाटे म्हणाल्या की, भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड आहे. भ्रष्टाचाराचा अंध:कार सगळीकडे पसरलेला असताना आपण छोटीशी पणती व्हावे. त्रास होईल पण सत्य उजळून निघेल. प्रामाणिकपणाने, नि:स्वार्थीपणाने सेवा करणे हेच महत्त्वाचे आहे असे त्या म्हणाल्या.सदर कार्यक्रमात भ्रष्टाचार निर्मूलन सत्यनिष्ठतेची शपथ उपस्थितांना देण्यात आली.यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती म्हणून बेलापूर पोलिस औट पोस्टचे लोखंडे मामा व ढोकणेज्ञमामा उपस्थित होते.
 डॉ.बाबासाहेब पवार यांनी प्रास्ताविक केले व अतिथींचा परिचय करुन दिला.प्रा.रुपाली उंडे यांनी सुत्रसंचालन केले तर प्रा.प्रकाश देशपांडे यांनी आभार मानले.सदर कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रा.चंद्रकांत कोतकर,प्रा.रुपाली उंडे, विद्यार्थी विकास मंडळाचे डॉ.संजय नवाळे,प्रा.प्रकाश देशपांडे,प्रा.किशोर गटकळ , डॉ.बाळासाहेब बाचकर, प्रा. ओंकार मुळे,प्रा.अशोक थोरात यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार अमन सय्यद - बेलापूर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================