राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, November 18, 2023

*नागरिकांनी त्यांच्याकडील कुणबी नोंदीचे १९६७ पूर्वीचे शासकीय पुरावे असणारे अभिलेख जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षात दाखल करावेत - जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ


अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा 
शासनाने दिलेल्या पत्रानुसार मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा विभाग व जिल्हानिहाय दौरा कार्यक्रम जाहीर झाला असून या समितीमार्फत नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचा दि. २ डिसेंबर २०२३ रोजी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे आढावा घेण्यात येणार आहे.
 जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकानी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादि जुने अभिलेखे जिल्हा स्तरावरील स्थापित विशेष कक्षात दिनांक २१ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत जमा करता येतील. जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील १९६७ पूर्वीचे शासकीय पुरावे असणारे अभिलेख जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षात दाखल करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
      शासनाने मराठवाड्यातील मराठा समाजाच्या मराठा- कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे. या समितीस मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक व अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजाम काळ झालेले करार निजामकालीन संस्थानिकांना दिलेली सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणी अंतिम पात्र व्यक्तीना मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. शासनाच्या ३ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार समितीची व्याप्ती संपूर्ण राज्यासाठी वाढविण्यात आलेली आहे.
   मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोहीम राबविण्यात आली होती. त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यावर नाशिक विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात "स्वतंत्र कक्ष" स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात सर्व कार्यालय प्रमुख व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा- कुणबी नोंदी शोधण्यासाठी दिनांक ४ नोव्हेंबर २०२३ पासून विशेष मोहीम हाती घेतली असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष कार्यान्वित करण्यात आला असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
----------------------------------------------------



Thursday, November 16, 2023

जीएसटी आयुक्तपदी आशीष शर्मा पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या


मुंबई -प्रतिनिधि - / वार्ता -
 राज्य सरकारने पाच सनदी अधिकाऱ्यांच्या ऐन दिवाळीत राज्यत बदल्या केल्या आहेत. त्यानुसार उपमुख्यमंत्री कार्यालयाचे (प्रधान सचिव आशिष शर्मा यांच्यावर राज्याच्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागाचे आयुक्त म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर जीएसटी विभागाचे  आयुक्त राजीव मित्तल यांची केंद्रीय प्रतिनियुक्ती जाहीर करण्यात आली आहे...

मंत्रालयातील पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे सहसचिव प्रवीण पुरी यांची पुणे येथे दिव्यांग कल्याण विभागाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे यांची बदली कर्मचारी राज्य विमा योजनेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे.

अहमदनगर (येथील जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष विकास पानसरे यांची कोकण विभागात अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अमन मित्तल यांची मंत्रालयात पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

===================================
---------------------------------------------------
: - आशिष रत्नानाकर, संकलन वार्ता...✍️✅🇮🇳
---------------------------------------------------
===================================



Tuesday, November 14, 2023

*शहीद जवान व पोलीस बांधवांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बेलापुरात एक पणती जवानासाठी उपक्रम संपन्न..!*


बेलापुर - प्रतिनिधि - / वार्ता -
आपले कर्तव्य बजावताना शहीद झालेले जवान व पोलीस बांधवांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फ्रेंडस् फाँर ऐव्हर गृप व समस्त बेलापुर-ऐनतपूर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने बेलापूर येथील विजय स्तंभ चौक येथे एक पणती जवानांसाठी- दीपोत्सव २०२३ हा उपक्रम राबविण्यात आला.
 फ्रेंडस् फाँर ऐव्हर गृप व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने सन २०१४ पासून दिपावली पाडव्याच्या दिवशी हा उपक्रम राबविण्यात येतो. हे या उपक्रमाचे १० वे वर्ष होते.सैन्य दलात कार्यरत असलेले मेजर दिनेश वाघ, मेजर निलेश अमोलिक, मेजर मुकुंद कुटे, माजी सैनिक देविदास देसाई, शरद देशपांडे,सुजित शेलार तसेच बेलापूर पोलीस औट पोस्ट चे रामेश्वर ढोकणे, बडे,हरीश पानसंबळ आदीच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपक्रमासास सुरुवात करण्यात आली. या नंतर उपस्थित मान्यवर व नागरिकांच्या हस्ते पणत्या प्रज्वलीत करण्यात आल्या.भारत भारत माता की जय,वंदे मातरम, शहीद जवान अमर रहे या घोषणानी परिसर दुमदुमून गेला होता.यावेळी शहीद जवान व पोलीस बांधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी फ्रेंड्स फॉर एव्हर ग्रुप चे अभिषेक खंडागळे,अँड. मयुर साळुंके, विष्णुकांत लखोटीया, जयेंद्र खटोड, राजेश सूर्यवंशी,सुभाष शेलार,ऋतुराज नाईक,विजय कोठारी,वेणूगोपाल सोमाणी, निशिकांत लखोटिया,प्रभात कुऱ्हे,साईनाथ शिरसाठ,सुमित सोमाणी,राम कुऱ्हे,सुभाष शेलार,महंत काळे,महेश कुऱ्हे, विशाल आंबेकर, सोमनाथ साळुंके, राहुल माळवदे आदींनी परिश्रम घेतले.

===================================
---------------------------------------------------
*ज्येष्ठ पत्रकार देवीदास देसाई - बेलापूर*
====================
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================



*डी.डी.काचोळे विद्यालयात**शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा*

*देश-विदेशातील माजी विध्यार्थी
*मेळाव्यास उपस्थित राहणार*
श्रीरामपूर प्रतिनिधि वार्ता
श्रीरामपूर शहरातील रयत शिक्षण संस्थेचे सर्वात जुने विद्यालय जनता विद्यामंदिर उर्फ डी.डी. काचोळे माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी मेळावा शनिवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत विद्यालय प्रांगणात आयोजित केलेला आहे या मेळाव्यासाठी स्थानिक तसेच देश - देशातील उच्चपदस्थ माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहे. तरी माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी विद्यार्थी संघ व संयोजन समितीचे अध्यक्ष किशोर गदिया यांनी केले आहे.
          विद्यालय स्थापनेपासून ते २०१५ या कालखंडात शिक्षण घेतलेले सर्व विद्यार्थी व माजी शिक्षक यावेळी उपस्थित राहणार आहेत.महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थी पुन्हा एकदा आपल्या शाळेमध्ये दाखल होणार असून अनेक वर्षानंतर शालेय जीवनाचा आनंद घेणार आहेत.स्थापनेपासून प्रथमच मेळावा होत असल्याने विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात उत्साह व प्रतिसाद आहे.
             मेळाव्याचे उद्घाटन मीनाताई जगधने मॅनेजिंग कौन्सिल सदस्या रयत शिक्षण संस्था सातारा, यांच्या शुभहस्ते तर जनरल बॉडी सदस्य प्रकाश निकम यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
          मेळावा हा पूर्ण एकदिवसीय शाळा नियोजनावर आधारलेला आहे.११ ते ५ शालेय वेळेनुसार कार्यवाही होणार आहे. प्रार्थना, स्वागत,वर्ग अध्ययन, वर्गवार सालानुसार अध्ययन, गटचर्चा,विद्यार्थी परिचय,खेळ, विद्यार्थी मनोगत व अनुभव आदींचा समावेश आहे. मेळाव्याची संपूर्ण तयारी करण्यासाठी विविध समिती काम पाहत आहेत.नियोजनात बाहेरील विद्यार्थीही मदत करत आहेत. ऐतिहासिक मेळाव्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे यासाठी मोठी संपर्क यंत्रणा उभी केली आहे. ज्या शिक्षकांनी या कालखंडात ज्ञानदानाचे पवित्र कार्य केलेत त्यांनाही बोलवण्यात आले आहे.
           मेळावा यशस्वी पार पाडण्यासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष किशोर गदिया,कार्याध्यक्ष समिन बागवान,सचिव पोपटराव शेळके,उपाध्यक्ष योगेश वाकचौरे, संजय छल्लारे,प्रकाश कुलथे, सल्लागार गणेश थोरात, मार्गदर्शक सुनील बोलके,मेजर कृष्णा सरदार,भाऊसाहेब मुळे,सदस्य निलेश भालेराव, राजेंद्र करांकाय,बाबासाहेब खोसरे,योगेश जाधव,सतीश सौदागर, कासिम सय्यद, अजय घोगरे आदीसह डी.डी.काचोळे विद्यालय सर्व स्टाफ,आदी परिश्रम घेत आहेत.
===================================
---------------------------------------------------
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर*
*संकलन:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

*स्वतःच्या विकासासोबत समाजाच दातृत्व करणे गरजेचे.- उद्योजक संतोष बारणे*💐✅🇮🇳...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*बी.आर.चेडे - शिरसगांव*
भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ही सामाजिक संस्था संस्थापक/अध्यक्ष कैलास पवार यांच्या संकल्पनेतून व सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री अलकाताई कुबल यांच्या शुभहस्ते २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिनी लोकसहभागातून जन सर्वांगीण विकास हे ब्रीदवाक्य घेऊन असंख्य सेवाभावी लोकांना सोबत घेऊन राज्यभर राबवित असलेले सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आणि गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन नामांकित सिल्वर गार्डीन्या ग्रुपचे संचालक संतोष भाऊ बारणे यांनी सांगितले.
सिल्वर गार्डीन्या ग्रुपच्या माध्यमातून उद्योजक संतोष बारणे यांचे नाव मोठ्या विश्वासाने स्वतःच्या हिमतीवर अग्रगण्य स्थानी आहेत.उद्योग क्षेत्राबरोबर संतोष बारणे हे समाजाची दातृत्वाची जबाबदारी देखील सातत्याने पार पाडत आहेत.असे प्रतिपादन माध्यमांशी बोलताना भूमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास पवार यांनी केले आहे. यावेळी संतोष बारणे यांनी भूमी फाउंडेशन च्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करीत संस्थापक अध्यक्ष कैलास पवार आणि संपूर्ण पदाधिकारी यांच्या कार्याला शुभेच्छा देत भूमी फाउंडेशनच्या सामाजिक कार्यात पुढे सहभागी होण्यास आनंद वाटेल त्याचबरोबर भूमी फाउंडेशनचे सर्वच उपक्रम कौतुकास्पद असतात आपण आपला विकास करत असताना गरिबांच्या भावनांचा नेहमीच विचार करायला हवा असे उद्योजक संतोष बारणे यांनी सांगितले.यावेळी संतोष बारणे यांनी दिवाळीनिमित्त कैलास पवार यांना फराळ भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी सिल्वर गार्डीन्या ग्रुपच्या उपस्थित सर्व कर्मचारी वर्गाचे कैलास पवार यांनी भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्थेच्या भीमराज बागुल, प्राचार्य टी ई शेळके,डॉ शंकरराव गागरे डॉ बाबुराव उपाध्ये, शिवाजीराव बारगळ, सुकदेव सुकळे, पत्रकार बी आर चेडे आदी सर्व पदाधिकारी यांच्या वतीने आभार मानले.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================



भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏


*पत्रकार अनिल म्हात्रे यांना मातृशोक*
मुंबई - महाराष्ट्र साप्ताहिक संपादक संघ आणि स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे मुख्य सल्लागार अनिल गणपत म्हात्रे यांच्या मातोश्री कै.सरस्वती गणपत म्हात्रे यांचे सोमवार दि.०६ नोंव्हेंबर २०२३ रोजी अल्पशा आजाराने प्रतिक्षानगर सायन मुंबई येथे निधन झाले,त्यांचा दशक्रिया विधी गुरुवार दि.१६ नोंव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ८,०० वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमी दादर (पश्चिम) मुंबई येथे होणार असून दिवसकार्य (बारावे) रविवार दि.१९ नोंव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १०,०० वाजता एल.४ बी.६०९,अश्र्वत्थ सोसायटी / टी - ६, प्रतिक्षानगर, सायन मुंबई - ४०००२२ याठिकाणी पार पडणार आहे.
त्यांच्या पश्चात  
मुलगे- अनिल गणपत म्हात्रे व 
 अजय गणपत म्हात्रे संचालक A M Services Dealers in Cinema All Equipments
सुना - सौ राजश्री अनिल म्हात्रे व सौ. आरती अजय म्हात्रे
मुली - सौ. नंदिनी श्रीकांत पाटील
 व सौ. अनिता प्रकाश म्हात्रे
नातवंडे - प्राची, पूजा, ओम, रश्मी, प्रितेश, विराज, पियुष
भाऊ -श्री. बाळकृष्ण अंबू माळी,
बहीण- सौ.निर्मला राम पाटील असा परिवार आहे.
परमेश्वर त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

-<>-<>-<>-<>-<>-<>-<>-<>-<>-<>-<>-<>-<>-<>-
××××××××××××××××××××××××××××××××××××××
*शोकाकूल: समस्त म्हात्रे कुटुंबीय*
महाराष्ट्र साप्ताहिक संपादक संघ
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
समता फाऊंडेशन,श्रीरामपूर 
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर 
पदाधिकारी सदस्य आणी परीवार
-<>-<>-<>-<>-<>-<>-<>-<>-<>-<>-<>-<>-<>-<>-
××××××××××××××××××××××××××××××××××××××



*सियासत में रंगे सियारों की भरमार !**जनता को करना होगा अब विचार !!*चंद्रकांत सी.पूजारी - सुरत (गुजरात)


हमारे देश में लोकतंत्र है और यहां शासन लोक अर्थात लोगों का है लोगों के द्वारा चुने जनप्रतिनिधियों का है और इन जनप्रतिनिधियों में भागीदार ज्यादातर 'रंगें सियार'है ?
जी हां सादे कपड़ों में लिपटे काले कारनामे करने वाले लोग अधिक है। जिनकी पोल समय समय पर खुलती रहती है परंतु राजनीति ऐसी कि इन सियारों को सियासत से बाहर का रास्ता दिखाने वालों से ज्यादा इन्हें बचाने वाले हमारे देश में अधिक है, और आम जनता गुमराह?
अभी अभी पूरे सोशल मीडिया में बिहार के मुख्यमंत्री जी का विडियो वायरल हो रहा था
बिहार के मुख्यमंत्री जी ने मंगलवार दिनांक -7 - 11- 2023 को बिहार विधानसभा में जनसंख्या नियंत्रण मामले पर बोलते हुए महिलाओं और पुरुषों पर अभद्र टिप्पणी की।
टिप्पणी ऐसी की सुनते ही लोग सोच में पड़ गए की नीतीश कुमार ने ऐसा कहा कैसे?
ये तो पढ़ें लिखे सभ्य नेता जाने जाते हैं फिर ऐसा उन्होंने ने कैसे कहा?
मुख्यमंत्री जी ने जो कहा, उसे शब्दो में नहीं लिखा जा सकता। उनकी कही बातें वायरल हो रही हैं- "पुरुष है वह तो रोज रात में (इशारा) ##, उसके साथ वह रोज (इशारा) ### है न! त उसी में वह ## हो जाता है। लड़की पढ़ लेती है तो उसे पता होता कि वह ### ठीक है, लेकिन अंतिम में ## उसको ## कर दो।" 
मुख्यमंत्री जी शिक्षा के कारण बिहार में जन्म-दर गिनाना चाह रहे थे, लेकिन उनकी जबान फिसल गयी।
जबान इसलिए फिसली क्योंकि उनके अंतश में वैसी बातें हैं और कभी कभी जोश में होश खो बैठते हैं?
क्योंकि मंच पर जब भी कोई नेता भाषण देता है तो रटी रटाते बातों को बोलता है और वह भाषण दूसरों के द्वारा तैयार किया गया रहता है।
हमारे देश में वैसे भी नेता है जो बेहिचक फराटे दार बोलते हैं और उनकी जबान कभी नहीं फिसलते मगर रंगेशियारों की जवान आए दिन फिसलते रहती है और उसकी असलियत भी जनता को पता चलती है परंतु ऐसे रंग सेरो को बचाने वाले लोग भी काम नहीं है जहां महिला आयोग नीतीश कुमार का विरोध किया वहीं बिहार के पूर्व मुख्यमंत्री ने नीतीश कुमार का सपोर्ट किया यह विरोधाभास हलक से नीचे नहीं उतरता,आखिर क्यों गलत को गलत और सही को सही सियासत में क्यों नहीं कहा जाता है शायद इसलिए की सत्ता का लोभ लोगों को अंधा बना देता है। पूरे भारत में नीतीश कुमार का विरोध हुआ परंतु नीतीश कुमार से जिनका फायदा है उन्होंने ही सिर्फ सपोर्ट किया।
जुबां से निकले शब्द कभी वापस नहीं लिए जा सकते। लेकिन सीएम नीतीश कुमार ने मंगलवार को बिहार विधानसभा में दिए विवादित बयान पर माफी मांग ली है, लेकिन उनके बयान पर सियासी भूचाल खड़ा हो चुका है।
पटना से लेकर दिल्ली तक सीएम नीतीश के विवादित बयान की आलोचना हो रही है। ना सिर्फ भाजपा बल्कि विपक्षी नेताओं ने भी सीएम नीतीश के बयान की कड़ी आलोचना की है। और यह स्वाभाविक भी है उन बयानों
का सपोर्ट बिल्कुल भी नहीं होना चाहिए जिसका विश्लेषण बच्चों के सामने नहीं किया जा सके जिसे सुनते ही महिलाएं और पुरुष शर्म महसूस करें।
अब हम जनता को यह सोचना होगा कि, जो व्यक्ति अपनी जबान तक नहीं संभाल सकता वो देश और राज्य संभालने में सक्षम है क्या?
विचार जरूर करें जय हिन्द जय भारत

===================================
---------------------------------------------------
लेखक - *चंद्रकांत सी.पूजारी*
( गुजरात प्रदेश प्रभारी - सुरत)
===============
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================