राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, January 10, 2024

‘ठेकेदारांनो सावधान,गाव जागा होतोय’ ची भोकरकरांना प्रचीती

घनकचरा निर्मुलन कचरा डेपोच्या टाक्यांचे काम निकृष्ट
मटेरियलमुळे विरोधक व सत्ताधार्‍यांनी बंद पाडले 

- भोकर - प्रतिनिधि - / वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे घनकचरा निर्मुलन यंत्रणा उभारणीचे कामात कचरा साठविण्यासाठीच्या टाक्या बांधकामास निकृष्ट मटेरियल चा वापर दक्ष ग्रामस्थ व सत्ताधार्‍यांनीही थांबवत काम बंद पाडले. येथील दक्ष कार्यकर्ते, सोसायटीचे माजी चेअरमन गणेश छल्लारेंसह काही सदस्यांनी भेट देवून पाहणी केली असता येथे वाळू ऐवजी डस्ट अन् कच्च्या विटात बांधकाम सुरू होतयं हे लक्षात येताच बांधकाम थांबवत निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरू नका, दुसरे चांगले मटेरियल घेवून या मग काम करा असे सांगीतले, लागलीच  सत्ताधारी गट ही दाखल झाला आमच्या काळात असा प्रकार चालणार नाही, कच्च्या विटा उचलुन घ्या, डस्ट नको वाळू आणा मगच काम सुरू करा ते ही उत्कृष्ट प्रतीचे मटेरियल वापरून टिकाऊ काम करा अशा सुचना संबधीत ठेकेदाराला दिल्याने हि चर्चा गावभर पसरली ‘अन् टेकेदारांनो सावधान आता गाव जागा होतोय’ अशा प्रतिक्रीया अनेकाच्या उमटल्या.

गेल्या चार दिवसांपुर्वी आमदार लहु कानडेंच्या हस्ते भोकर येथे घनकचरा निर्मुलन यंत्रणा उभारणीचे भुमीपुजन झाले अन् प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाली परंतू येथे कच्ची विट व वाळू ऐवजी डस्ट वापरात येणार असल्याचे तत्कालीन सत्ताधारी व आजचे राजकीय विरोधक असलेल्या माजी आमदार मुरकूटे गटाचे सोसायटीचे माजी अध्यक्ष गणेश छल्लारे, ग्रामपंचायत सदस्य गीरीष मते, काळू गायकवाड व ऋषी झिने त्या ठिकाणी दाखल झाले. येथे कच्ची विट व डस्टमध्ये बांधकाम सुरू होणार हे लक्षात येताच त्यांनी लागलीच निकृष्ट मटेरियलचा वापर करू नका, दुसरे मटेरियल आणा त्या शिवाय काम सुरू होवू देणार नाही असा पवित्रा घेतला.
हा प्रकार नव्याने सत्तेत आलेले आमदार लहु कानडे गटाचे प्रमुख कार्यकर्ते काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष सुदाम पटारे, मार्गदर्शक मच्छींद्र पटारे व सरपंच पती प्रताप पटारे हे ही काम बंद पाडल्याने तावातावाने बांधकाम स्थळी दाखल झाले. राजकीय विरोधक त्यातच पहीलेच काम बंद पाडण्याच्या प्रयत्नाने काही वेळ चांगलीच शाब्दीक चकमक सुरू झाली. आम्ही कधी तुमच्या कामावर आलो का? तुम्ही काय दिवे लावलेत गावाला माहीती आहे, म्हणूनच आम्हाला संधी मिळाली आदि शब्द प्रयोग सुरू झाले, राजकीय वाद पेटणार तेव्हढ्यात प्रत्यक्ष मटेरियलची पाहणी केली असता येथे कच्ची व निकृष्ट विट असल्याचे सत्ताधार्‍यांचे ही लक्षात आले अन् लागलीच सत्ताधार्‍यांनी ही संबधीत ठेकेदारास ‘आम्हाला असा प्रकार चालणार नाही, लागलीच या विटा उचलुन घ्या चांगल्या प्रतिच्या व चांगल्या भाजलेल्या विटा आणा शिवाय डस्टचा वापर करायचा नाही, वाळू आणा अन् चांगल्या प्रतिचे उत्कृष्ट व टिकाऊ काम करा’ असे सुनावण्यात आले.
आमच्या काळात चांगलेच मटेरियल वापरले जाईल, काम उत्कृष्ट व टिकाऊच होईल, आम्ही नवीन सत्तेत आहोत, तुम्ही अनुभवी आहात असेच वेळेच्या वेळी लक्ष ठेवून सहकार्य करत जा, असे राजकीय विरोधकांना ही सांगत, यामुळे आम्हाला ही शिकायला मिळणार असल्याचा खुलासा मच्छींद्र पटारे, प्रताप पटारे व सुदाम पटारे यांनी या ठिकाणी केला. त्याच बरोबर यापुढे कुठलेही मटेरियल आणल्यानंतर प्रथम आम्हाला दाखविल्याशिवाय वापरायचे नाही अशा सक्त सुचना ही यावेळी सत्ताधार्‍यांनी ठेकेदारास दिल्या.
यावेळी काही काळ दोन ही गटात हातवारे करत चांगलीच शाब्दीक चकमक झाली, त्यात अनेक मागच्या उकाळ्या पाकाळ्या निघाल्याने उपस्थीतांची काही काळ चांगली करमणूक ही झाली. मात्र हे होत असताना कुणाचे काही असो पण प्रबळ व जागरूक विरोधकांमुळे व चांगले काम व कारभार करण्याची मनिषा घेवून नव्याने सत्तेत आलेले सत्ताधारी यांच्यामुळे पुढची कामे ही उत्कृष्ट होणार यात शंकाच राहीली नसल्याने गाव पातळीवर मात्र ‘ठेकेदारांनो सावधान, आता गाव जागा होतोय’ अशा प्रतिक्रीया उमटत होत्या.
यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन गणेश छल्लारे, माजी उपसरपंच महेश पटारे, गंगाराम गायकवाड, गीरीष मते, काळू गायकवाड, ऋषी झिने, अविनाश मते, मच्छींद्र पटारे, सुदाम पटारे, प्रताप पटारे, संदिप गांधले, आप्पासाहेब जाधव, विजय अमोलीक, मारूती शिंदे, वैभव पटारे, माणीक पटारे, संजय डूकरे, काळू डूकरे, दगडू अभंग, आप्पा मोरे व बबन काळे आदिंसह मान्यवर व कार्यकर्ते उपस्थीत होते.
*फोटो ओळ*
भोकर येथे घनकचरा निर्मुलन यंत्रणेतील कचरा साठविण्याच्या टाक्यांच्या बांधकामात निकृष्ट मटेरियल वापरात येत असल्याचे लक्षात येताच बांधकाम बंद पाडण्यात आल्याचे छायाचित्रात सत्ताधारी व विरोधक
 दिसत आहे
. (छाया - चंद्रकांत झुरंगे,भोकर)

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार चंद्रकांत झुरंगे -भोकर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

अन्याय अत्याचार निर्मुलन समिती व रिपब्लिकन पार्टी आँफ इंडीया च्या संयुक्त विद्यमाने पिंपळगाव टोल नाक्यावर निदर्शने

- वजीर शेख - / पाथर्डी -
मुंबई - आग्रा महामार्गावरील पिंपळगांव बसवंत येथील टोलनाक्यावर भारत सरकार अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या अन्याय अत्याचार निर्मुलन समिती व रिपब्लिकन पार्टी आँफ इंडीयाच्या वतीने समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष व रिपाईचे राज्य उपाध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे नेतृत्वाखाली टोलविरोधात निदर्शने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे संयोजक रिपाईचे निफाड तालुकाध्यक्ष महेंद्रभाऊ साळवे यांनी केले होते. निदर्शनात टोलप्रशासन व कर्मचारी यांची प्रवाशी व लोकप्रति निधीबरोबर सुरु असलेली आरेररावी थांबविण्यात यावी. टोल नाक्यावरील व टोल आखत्यारीत येत असलेल्या रोडच्या कडेचे बेदाणे व्यापार, चहाच्या टपऱ्यांवर अतिक्रमण काढण्यात आलेत ते पूर्ववत करावे, टोलनाक्यावरील सुलभ शौचालय व स्नानगृह यांची त्वरीत दुरुस्ती व स्वच्छता करावी इत्यादी मागण्यांबाबत टोल चे व्यवस्थापक आत्माराम यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी टोल गेटपर्यंत रॅलीने घोषणाबाजी करुन पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. टोलनाक्या अखत्यारीत रोडवरील बेदाणा व्यापारी व चहाटपरी धारकांचे काढलेले अतिक्रमण त्वरित पूर्ववत सुरु करावे तसेच लोकप्रतिनिधीं व प्रवाश्यांबरोबर सन्मानपूर्वक वागावे तसेच वरील निवेदनातील आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर टोलनाका बंद पाडण्याकरीता आंदोलन घेण्यात येईल असा इशारा यावेळी रविंद्र जाधव यांनी दिला.
या निदर्शनास रफीक सैयद, प्रदीपनाना गांगुर्डे,

 संजयबाबा गायकवाड, शशीभाऊ जाधव, अशोकभाऊ गांगुर्डे, प्रदीप पगारे, अजय शेजुळ, विनोद शिंदे, नितीनकाका खडताळे,रोहीणी वाघ, राजनंदीनी आहीरे, संगीता पवार, फरजाना शेख, प्रमोद शिंदे, निर्मला गायकवाड, सुदेश गांगुर्डे, राहुल ढेंगळे, रोहीत गायकवाड, वैशाली पवार, वैभव पगारे आदींसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. 
या ठिकाणी ए.पी.आय. निकम, ए.एस.आय.तेलुरे, पो.ह.गांगुर्डे, पो.काॅ. शिंदे, आदींनी चोख बंदोबस्त ठेवला. आभार प्रदीपनाना गांगुर्डे यांनी मानले तर राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता करण्यात आली.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजु मिर्जा*
(ब्यूरो चिफ: नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

Tuesday, January 9, 2024

सकारात्मक पत्रकारिता समाज परिवर्तनाची नांदी - माजी मंत्री आ. संजय कुटे यांचे प्रतिपादन...

*जळगाव (जामोद) येथे अ.भा. ग्रामीण पत्रकार संघाचे एक दिवसीय खुले राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न*

प्रिंट व इले. मीडियाकरीता पत्रकार कल्याण महामंडळ स्थापण करण्याची मागणी

चांदूर - रेल्वे - प्रतिनिधि - / वार्ता
पत्रकारिता हे पवित्र कार्य आहे. पत्रकारांनी कोणाविषयी लिहले तर त्यांनी ते सकारात्मक घ्यावे व त्यातून पुढची दिशा ठरवावी. मात्र पत्रकारांनी आपल्या लिखानामुळे कोणाचे आयुष्य उध्वस्त होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पत्रकारांनी संसाराकडे लक्ष देऊनच पत्रकारिता करावी. मी विधानसभा सभागृहात पश्चिम विदर्भाविषयीच्या समस्या ३ वेळा मांडल्या आहेत. अमरावती विभागातील पत्रकारांनी सुध्दा पश्चिम विदर्भाला प्राधान्य देत या परिसरातील बाबींवर विशेष लिखान करावे. सकारात्मक पत्रकारिता ही समाज परिवर्तनाची नांदी आहे असे प्रतिपादन माजी मंत्री, आमदार डॉ. संजय कुटे यांनी केले.

यासोबतच पत्रकारांच्या पाठीशी नेहमी असल्याचे देखील त्यांनी सांगितले. ते जळगाव (जामोद) येथील बऱ्हाणपूर रोडवर असलेल्या देवाशिष लॉन्स येथे गुरूवारी आयोजित अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या एक दिवसीय खुले राज्यस्तरीय अधिवेशनात उद्घाटनीय भाषणात बोलत होते. या अधिवेशनाचे आयोजक अखिल भारतीय पत्रकार संघ तर संयोजक आम्ही जळगांवकर पत्रकार होतो.
 या अधिवेशनाच्या प्रथम सत्रात सकाळी उद्घाटन समारंभ झाला. याचे उद्घाटन माजी मंत्री, आमदार डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते झाले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा. ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने, प्रमुख पाहुणे म्हणून राज्य पत्रकार अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष तथा दै.लोकमत मुंबई चे सहयोगी संपादक यदु जोशी, आय.एन.एस. समिती, नवी दिल्ली चे कार्यकारी सदस्य तथा दै. हिन्दुस्थानचे प्रबंध संपादक विलास मराठे, अमरावती विभागीय अधिस्विकृती समितीचे सदस्य तथा दै. वृत्तकेसरी अमरावतीचे संपादक जयराम आहुजा, अमरावती विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष रवींद्र लाखोडे, दै. महासागरचे संपादक श्रीकृष्ण चांडक, अमरावती विभागीय अधिस्विकृती समिती सदस्य सुरेंद्रकुमार आकोडे, गोपाल हरणे, अ. भा. ग्रामिण पत्रकार संघाचो केंद्रीय कार्याध्यक्ष युसूफ खान, केंद्रीय महासचिव सुरेश सवळे, केंद्रीय सचिव अशोक पवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख, महिला मंच प्रदेश अध्यक्ष जयश्री पंडागळे, केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, केंद्रीय सदस्य माणिक ठाकरे, प्रदीप जोशी, केंद्रीय संपर्क प्रमुख प्रा.रवींद्र मेंढे, केंद्रीय सदस्य बाळासाहेब सोरगीवकर, मनोहर चरपे, संजय कदम, अभिमन्यू भगत, अंबादास सिनकर, कार्यालय प्रमुख बाबाराव खडसे, राजेंद्र माळवे, मनोज कमटे, अनुप गवळी, प्रताप मोरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

  कार्यक्रमाच्या सुरूवातीला स्वागतगीत संजय तल्हार यांनी सादर केले तर प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख यांनी केले. यानंतर यदु जोशी, विलास मराठे, रवींद्र लाखोडे, मनोहर सुने यांनी मनोगत व्यक्त केले.
तर व्दितीय सत्र दुपारी झाले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी दै. महासागरचे संपादक श्रीकृष्ण
चांडक होते. तर प्रमुख
 उपस्थिती म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉ. स्वाती संदिप वाकेकर, राजर्षी शाहू परिवार तथा संकल्पक वन बुलढाणा मिशनचे अध्यक्ष संदिप शेळके, मिना राहीज, वर्षा घाडगे, भावना सरनाईक आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांसह माधुरी शर्मा, रवींद्र तिराणीक यांसह इतर पत्रकारांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन अनिल अभिमन्यु भगत व कांचन मुरके यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. रवींद्र मेंढे यांनी केले. या अधिवेशनाच्या यशस्वीतेकरिता अ.भा.ग्रा. पत्रकार संघ, जळगाव जामोद तालुका कार्यकारीणी, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, नांदगाव खंडेश्वर, अमरावती व इतर कार्यकारीणीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. या अधिवेशनात राज्यभरातील पत्रकार बांधव सहभागी झाले 
यांनी केले. या अधिवेशनाच्या यशस्वीतेकरिता अ.भा.ग्रा. पत्रकार संघ, जळगाव जामोद तालुका कार्यकारीणी, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, नांदगाव खंडेश्वर, अमरावती व इतर कार्यकारीणीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. या अधिवेशनात राज्यभरातील पत्रकार बांधव सहभागी झाले होते.

*(बॉक्स)*
१)

*पत्रकारांच्या समस्यांचा*
*अहवाल शासनाला देणार*

ग्रामिण भागातील पत्रकारांच्या समस्यांची मला कल्पना
आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्या घेऊन
 यासंबंधीचा अहवाल काही दिवसांतच शासन दरबारी
 देणार आहो. त्यामुळे यातील जास्तीत जास्त विषय
 मार्गी लागावे याकरिता आमदार डॉ. संजय कुटे यांनी सहकार्य करावे अशी विनंती यावेळी राज्य पत्रकार अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांनी केली.

२)

*अधिवेशनात मांडले २३ ठराव*
 प्रिंट मिडीया व इले. मिडीयाकरीता पत्रकार कल्याण महामंडळ स्थापण करण्यात यावे, तालुका स्तरावर पत्रकार भवनाचे बांधकाम करण्यात यावे, पत्रकाराच्या शिबीर व कार्यशाळाकरीता अनुदान देण्यात यावे, ग्रामीण व शहरी पत्रकारांसाठी म्हाडा मार्फत स्वतंत्र घरकुल योजना राबविण्यात यावी, पत्रकारांच्या सुरक्षीततेच्या हमीसह विमा योजना शासनाने लागू करावी, पत्रकारांना (५ वर्ष सेवा पूर्ण झालेले) मानधन लागु करण्यात यावे व ६० वर्षानंतर पेंशन योजना लाभ मिळावा, विना

 परवानगी व्देष भावनेतून ग्रामीण व शहरी पत्रकारांवर न्यायालयीन खटले, अथवा पोलीस कार्यवाही जिल्हाधिऱ्यांच्या परवानगीशिवाय गुन्हा नोंद करण्यात येवू नये, पत्रकारांना वृत्तसंकलनाच्या कामाकरीता एस. टी. व रेल्वेमध्ये विनाअट सवलत मिळावी यांसह विविध २३ ठराव या अधिवेशनात मांडून त्याची प्रत शासनाकडे पाठविण्यात आली.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

सकारात्मक पत्रकारिता समाज परिवर्तनाची नांदी - माजी मंत्री आ. संजय कुटे यांचे प्रतिपादन...

*जळगाव (जामोद) येथे अ.भा. ग्रामीण पत्रकार संघाचे एक दिवसीय खुले राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न*

प्रिंट व इले. मीडियाकरीता पत्रकार कल्याण महामंडळ स्थापण करण्याची मागणी

चांदूर - रेल्वे - प्रतिनिधि - / वार्ता
पत्रकारिता हे पवित्र कार्य आहे. पत्रकारांनी कोणाविषयी लिहले तर त्यांनी ते सकारात्मक घ्यावे व त्यातून पुढची दिशा ठरवावी. मात्र पत्रकारांनी आपल्या लिखानामुळे कोणाचे आयुष्य उध्वस्त होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पत्रकारांनी संसाराकडे लक्ष देऊनच पत्रकारिता करावी. मी विधानसभा सभागृहात पश्चिम विदर्भाविषयीच्या समस्या ३ वेळा मांडल्या आहेत. अमरावती विभागातील पत्रकारांनी सुध्दा पश्चिम विदर्भाला प्राधान्य देत या परिसरातील बाबींवर विशेष लिखान करावे. सकारात्मक पत्रकारिता ही समाज परिवर्तनाची नांदी आहे असे प्रतिपादन माजी मंत्री, आमदार डॉ. संजय कुटे यांनी केले.

यासोबतच पत्रकारांच्या पाठीशी नेहमी असल्याचे देखील त्यांनी सांगितले. ते जळगाव (जामोद) येथील बऱ्हाणपूर रोडवर असलेल्या देवाशिष लॉन्स येथे गुरूवारी आयोजित अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या एक दिवसीय खुले राज्यस्तरीय अधिवेशनात उद्घाटनीय भाषणात बोलत होते. या अधिवेशनाचे आयोजक अखिल भारतीय पत्रकार संघ तर संयोजक आम्ही जळगांवकर पत्रकार होतो.
 या अधिवेशनाच्या प्रथम सत्रात सकाळी उद्घाटन समारंभ झाला. याचे उद्घाटन माजी मंत्री, आमदार डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते झाले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा. ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने, प्रमुख पाहुणे म्हणून राज्य पत्रकार अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष तथा दै.लोकमत मुंबई चे सहयोगी संपादक यदु जोशी, आय.एन.एस. समिती, नवी दिल्ली चे कार्यकारी सदस्य तथा दै. हिन्दुस्थानचे प्रबंध संपादक विलास मराठे, अमरावती विभागीय अधिस्विकृती समितीचे सदस्य तथा दै. वृत्तकेसरी अमरावतीचे संपादक जयराम आहुजा, अमरावती विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष रवींद्र लाखोडे, दै. महासागरचे संपादक श्रीकृष्ण चांडक, अमरावती विभागीय अधिस्विकृती समिती सदस्य सुरेंद्रकुमार आकोडे, गोपाल हरणे, अ. भा. ग्रामिण पत्रकार संघाचो केंद्रीय कार्याध्यक्ष युसूफ खान, केंद्रीय महासचिव सुरेश सवळे, केंद्रीय सचिव अशोक पवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख, महिला मंच प्रदेश अध्यक्ष जयश्री पंडागळे, केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, केंद्रीय सदस्य माणिक ठाकरे, प्रदीप जोशी, केंद्रीय संपर्क प्रमुख प्रा.रवींद्र मेंढे, केंद्रीय सदस्य बाळासाहेब सोरगीवकर, मनोहर चरपे, संजय कदम, अभिमन्यू भगत, अंबादास सिनकर, कार्यालय प्रमुख बाबाराव खडसे, राजेंद्र माळवे, मनोज कमटे, अनुप गवळी, प्रताप मोरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

  कार्यक्रमाच्या सुरूवातीला स्वागतगीत संजय तल्हार यांनी सादर केले तर प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख यांनी केले. यानंतर यदु जोशी, विलास मराठे, रवींद्र लाखोडे, मनोहर सुने यांनी मनोगत व्यक्त केले.
तर व्दितीय सत्र दुपारी झाले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी दै. महासागरचे संपादक श्रीकृष्ण चांडक होते. तर प्रमुख
 उपस्थिती म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉ. स्वाती संदिप वाकेकर, राजर्षी शाहू परिवार तथा संकल्पक वन बुलढाणा मिशनचे अध्यक्ष संदिप शेळके, मिना राहीज, वर्षा घाडगे, भावना सरनाईक आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांसह माधुरी शर्मा, रवींद्र तिराणीक यांसह इतर पत्रकारांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन अनिल अभिमन्यु भगत व कांचन मुरके यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. रवींद्र मेंढे यांनी केले. या अधिवेशनाच्या यशस्वीतेकरिता अ.भा.ग्रा. पत्रकार संघ, जळगाव जामोद तालुका कार्यकारीणी, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, नांदगाव खंडेश्वर, अमरावती व इतर कार्यकारीणीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. या अधिवेशनात राज्यभरातील पत्रकार बांधव सहभागी झाले होते.

*(बॉक्स)*

१)
*पत्रकारांच्या समस्यांचा*
*अहवाल शासनाला देणार*
ग्रामिण भागातील पत्रकारांच्या समस्यांची मला कल्पना
आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्या घेऊन
 यासंबंधीचा अहवाल काही दिवसांतच शासन दरबारी
 देणार आहो. त्यामुळे यातील जास्तीत जास्त विषय
 मार्गी लागावे याकरिता आमदार डॉ. संजय कुटे यांनी सहकार्य करावे अशी विनंती यावेळी राज्य पत्रकार अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांनी केली.

२)

*अधिवेशनात मांडले २३ ठराव* 
 प्रिंट मिडीया व इले. मिडीयाकरीता पत्रकार कल्याण महामंडळ स्थापण करण्यात यावे, तालुका स्तरावर पत्रकार भवनाचे बांधकाम करण्यात यावे, पत्रकाराच्या शिबीर व कार्यशाळाकरीता अनुदान देण्यात यावे, ग्रामीण व शहरी पत्रकारांसाठी म्हाडा मार्फत स्वतंत्र घरकुल योजना राबविण्यात यावी, पत्रकारांच्या सुरक्षीततेच्या हमीसह विमा योजना शासनाने लागू करावी, पत्रकारांना (५ वर्ष सेवा पूर्ण झालेले) मानधन लागु करण्यात यावे व ६० वर्षानंतर पेंशन योजना लाभ मिळावा, विना
 परवानगी व्देष भावनेतून ग्रामीण व शहरी पत्रकारांवर न्यायालयीन खटले, अथवा पोलीस कार्यवाही जिल्हाधिऱ्यांच्या परवानगीशिवाय गुन्हा नोंद करण्यात येवू नये, पत्रकारांना वृत्तसंकलनाच्या कामाकरीता एस. टी. व रेल्वेमध्ये विनाअट सवलत मिळावी यांसह विविध २३ ठराव या अधिवेशनात मांडून त्याची प्रत शासनाकडे पाठविण्यात आली.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

काकर सौदागर समाजाच्या २२ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न.💐✅🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

- शौकतभाई शेख -/श्रीरामपूर -
कोपरगांव तालुक्यातील भोजडे येथे काकर सौदागर समाजाच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये २२ वधू - वर जोडप्यांचे
 सामुदायिक विवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी वधू - वरांना संसारोपयोगी वस्तु भेट देण्यात
 आल्या. राज्यभरातील काकर समाज बांधव या
 शुभप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी कोपरगांव तालुक्याचे आमदार आशुतोषदादा काळे यांनी वधू -:वरांना शुभेछा दिल्या. कोपरगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.देसले यांनी

नवदाम्पत्याला आशिर्वाद देत आपले मनोगत व्यक्त करताना काकर सौदागर समाजाचे विशेष कौतुक केले, तसेच काकर समाज हा मोठ्या प्रमाणात शैक्षणिक आणि व्यावसायिक दृष्टिकोन जोपासत असल्याने या समाजात गुन्हेगारीचे प्रमाण नगण्य तथा अत्यल्प असल्याचे ते म्हणाले.
यावेळी भोजडा (ता.कोपरगांव) येथे काकर समाजाकरीता विवाह समारंभासाठी मंगल कार्यालय (शादी हॉल) उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आ.आशुतोषदादा काळे यांच्याकडे काकर समाजाचे प्रदेशाध्यक्ष बिलाल शेठ यांनी केली .
सौदागर सोसायटी व लब्बैक ग्रुप तसेच भोजडे काकर समाजाने कार्यक्रमाच्या ठिकाणी उत्कृष्टरित्या चांगले नियोजन केले होते याबाबत अहमदनगर जिल्हा काकर समाज संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष इकबाल काकर यांनी स्वागत केले तर महाराष्ट्र काकर समाजच्यावतीने प्रदेशाध्यक्ष माजी नगरसेवक बिलाल काकर यांनी आयोजकांचे सत्कार केले.
यावेळी वैजापूरचे माजी उपनगराध्यक्ष कय्युम शेठ सौदागर, बशीर शेठ सौदागर, वैजापूरचे माजी नगरसेवक व काकर समाजाच्या प्रदेशाध्यक्ष बिलाल शेठ सौदागर, जिल्हाध्यक्ष इकबाल काकर ,वैजापूर सौदागर समाजाच्या अध्यक्ष सईद सौदागर, सौदागर एजुकेशन सोसायटीचे काजीम सौदागर, अल्ताफ सौदागर, कलंदर काकर, शामिम सौदागर सर, आजम सौदागर, श्रीरामपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे तौफिक शेख, वैजापूर चे नगरसेवक कुरेशी, श्रीरामपूरचे ओबीसी ऑर्गनाइजेशनचे प्रदेश सल्लागार डॉ. सलीम सिकंदर शेख, मुस्लिम महासंघाचे जमील पठाण,वैजापूर चे माजी उपनगराध्यक्ष अकीलभाई शेख,चारुदत्त सिनगर तालुकाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे मुकुंद सिनगर, भोजडे गांव चे सरपंच सुधाकर वादे, बाबा काकर, मुख्तार काकर, हाफ़िज़ काकर ,शाहरुख पठाण, शाहनवाज शाह,आदि उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष शेख सलीम बाबुलाल काकर, उपाध्यक्ष बाबा कालु काकर,शेख शेरू दिलावर, शेख बदरु नुरा, शेख सदरू बाबूलाल, शेख बदरु शहाबुद्दीन, शेख सांडू हुसैन, शेख गुलाब शेखनूर, शेख महेबूब जाफर,शेख जावेद सांडु, शेख सिकंदर दादामिया, लब्बैक ग्रुप, सौदागर एकता सोशल सोसायटी व समस्त ग्रामस्थ भोजडे आणि महाराष्ट्र काकर समाज संघटना व काकर समाज अहमदनगर जिल्हा आदींनी विशेष परिश्रम घेतले.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

गणेशराव मुदगुले यांनी सं.गां.नि.अ.यो.तालुकाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला💐✅🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

- शिरसगाव - प्रतिनिधि - / वार्ता -
श्रीरामपूर तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या श्रीरामपूर तालुकाध्य्क्षपदाचा पदभार गणेशराव मुदगुले यांनी सोमवारी तहसील कार्यालय श्रीरामपूर येथे जाऊन स्वीकारला. त्यावेळी तहसील कार्यालयाच्यावतीने निवासी नायब तहसीलदार राजेंद्र वाघचौरे यांनी त्यांचा सत्कार केला. त्यावेळी संजय गांधी योजना नायब तहसीलदार अभया
 राजवाळ,अ.का.श्रीमती निर्मला नाईक,संगणक ऑपरेटर रज्जाक बागवान,नवनाथ मंडलिक,आदी उपस्थित होते.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह विविध योजनेची सविस्तर चर्चा करून माहिती घेतली व आढावा घेतला. नायब तहसीलदार श्रीमती अभया राजवाळ यांनी सविस्तर माहिती देताना संजय गांधी निराधार योजनेसह,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ/विधवा/अपंग निवृत्ती वेतन योजना,राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य निवृत्ती वेतन योजना,व श्रावणबाळराज्य निवृत्ती योजनाची माहिती दिली व त्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय असावीत त्याचे तपशिलासह माहितीपत्रक सादर केले.

यावेळी श्री.मुदगुले म्हणाले की, महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांनी आमच्यावर विश्वास ठेवून शिरसगावसह वरील योजनेच्या तालुकाध्यक्षपदी माझी नियुक्ती केल्याने दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडीन व सामान्य जनतेपर्यंत शासकीय सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न राहील.व यापुढे सर्व प्रकरणाचा निपटारा,प्रलंबित न राहता दर महिन्याला बैठक घेऊन आलेल्या सर्व अर्जांचां विचार करून नागरिक योजना लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात
 येईल असे ते म्हणाले.

=================================
-----------------------------------------------
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

रुग्णवाहिकेसाठी वाट केली मोकळी राज ठाकरेंनी खालापूर टोलनाक्यावर...

- खोपोली - प्रतिनिधि - / वार्ता -
 मनसे अध्यक्ष राज ठाकरे विविध प्रश्नांसह टोलनाक्यावर बोलणारे यांचे रविवार, ७ जानेवारी रोजी वेगळेच रूप पाहायला मिळाले. ते पुण्यावरून कार्यक्रम आटोपून मुंबईला येत असताना खालापूर टोलनाक्यावर रस्त्यावर उतरत त्यांनी तब्बल पाच किलोमीटर अंतर असलेली वाहतूक कोंडी मिनिटात सोडवून रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला.
शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात रविवारी राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत पार पडली. हा मुलाखत कार्यक्रम संपवून पुण्याहून मुंबईला परतत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वाहतूक कोंडीत अडकल्याचे खालापूर टोलनाक्याजवळ दिसून आले. यावेळी राज ठाकरे हे स्वतः रोडवर उतरले. त्यांनी त्यांच्या खास ठाकरे शैलीत संबंधित अधिकाऱ्याला सुनावले. यावेळी
राज ठाकरे स्वतः टोलनाक्यावर उतरले आणि त्यांनी येथील अधिकाऱ्यांना या वाहतूक कोंडीबाबत प्रश्न विचारला. विशेष म्हणजे यलो लाईनच्या बाहेर जर गाड्या असतील तर त्यांना सोडण्याचा नियम असतानाही त्याची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. त्यानंतर त्यांनी टोलनाक्यावर उतरून स्वतः सर्व वाहतूक कोंडी सोडवली. यावेळी वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका रुग्णवाहिकेला त्यांनी रस्ता करून दिला आहे.

राज ठाकरे यांनी वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला रस्ता करून दिला. पुण्यावरून मुंबईला येताना वाहतूक कोंडीमुळे राज ठाकरे टोलनाक्यावर उतरले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना सज्जड दम भरल्याचे दिसून आले.

राज ठाकरे यांनी पिंपरी- चिंचवडमधील नाट्य संमेलनाला हजेरी लावली. नियोजित कार्यक्रम संपवून ते मुंबईच्या दिशेने येत असताना खालापूर टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे त्यांना दिसून आले. यावेळी

राज ठाकरे स्वतः टोलनाक्यावर उतरले आणि त्यांनी येथील अधिकाऱ्यांना या वाहतूक कोंडीबाबत प्रश्न विचारला. विशेष म्हणजे यलो लाईनच्या बाहेर जर गाड्या असतील तर त्यांना सोडण्याचा नियम असतानाही त्याची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. त्यानंतर त्यांनी टोलनाक्यावर उतरून स्वतः सर्व वाहतूक कोंडी यावेळी सोडवली वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका रुग्णवाहिकेला त्यांनी रस्ता करून दिला होता.

=================================
-----------------------------------------------
: - रिषभ पालिकर - संकलन - वार्ता. ✍️✅🇮🇳...
-----------------------------------------------
=================================