राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, January 15, 2024

*चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या* *माध्यमातून विविध उपक्रम संपन्न*

अजीज शेख / राहाता
आज मकरसंक्रांती चे औचित्य साधून अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात चांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.पुंड सर यांनी सांगितले की आयुष्यमान गोल्डन कार्ड चे उद्दिष्ट एकुण २८५०७ आहे आणि आतापर्यंत १६ गावांच्या माध्यमातून १४४१४ गोल्डन कार्ड देण्यात आले आहेत. आज प्रत्येक गावात याबाबतीत कॅम्प आयोजित करुन माहिती दिली जात आहे. आयुष्यमान गोल्डन कार्ड बरोबरच राष्ट्रीय कर्करोग तसेच हिवताप व कुष्ठरोग कार्यक्रम आयोजित करुन १००% यशस्वी केला आहे. त्याच बरोबर मातृवदंन योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि या विविध उपक्रमास चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व कर्मचारीवर्ग व ग्रामस्थांचे योग्य ते सहकार्य मिळत आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने कालच आरोग्य केंद्रात तिळगूळ वाटप हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पुंड तसेच डॉ. आर. एस. एस पुंड, औषध निर्माण अधिकारी व्ही.पी. खंडागळे, आरोग्य सहाय्यिका के. व्ही शिंदे, आरोग्य सहाय्यक डी.अ.पोळ, व्ही. व्ही सयभोग तसेच संतोष जावळे, थोरात, दहातोंडे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेवकांनी अथक परिश्रम घेतले.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार अजिजभाई शेख - राहाता*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


२१ हजारांची उत्पन्न मर्यादा वाढवा*मिलिंदकुमार साळवे यांची मागणी ; शिरसगावात महिला मेळावा


श्रीरामपूर प्रतिनिधि वार्ता
संजय गांधी निराधार अर्थसहाय्य योजना व इतर सामाजिक अर्थसहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांसाठी सध्या असलेली २१ हजार रूपये वार्षिक उत्पन्नाची अट अत्यंतु जटिल व अन्यायकारक आहे. त्यामुळे ही मर्यादा वाढवून १ लाख रूपये करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य व भाजपचे श्रीरामपूर शहर उपाध्यक्ष मिलिंदकुमार साळवे यांनी केले.
शिरसगाव (ता. श्रीरामपूर ) येथे आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीरामपूरच्या संजय गांधी निराधार योजनेचे नवनियुक्त अध्यक्ष गणेश मुदगुले होते. याप्रसंगी सरपंच राणी वाघमारे, उपसरपंच संजय यादव, सदस्य नितीन गवारे, सुरेश मुदगुले, अण्णासाहेब ताके, सोपान गवारे, जायदा पठाण, इंदूबाई बढे, प्रयागा जाधव व इतर सदस्यांसह मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य बाळासाहेब जपे, मुकुंद टंकसाळे आदी उपस्थित होते.
संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल क्रांती महिला ग्रामसंघातील बचत गटांच्या वतीने तसेच साऊ एकल महिला पुनर्वसन समिती व मिशन वात्सल्य शासकीय समितीच्या वतीने गणेश मुदगुले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी पंचायत समितीचे प्रभाग समन्वयक अशोक रासकटला, क्रांती महिला ग्रामसंघाच्या प्रशिक्षण सल्लागार शालिनी ससाणे, सदस्या ज्योती सबनीस, सुनीता बनसोडे, समूह संसाधन व्यक्ती सलमा शेख, बँक सखी समिना शेख यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करताना साळवे म्हणाले, शासकीय अर्थसहाय्य योजनांसाठी पात्र असूनही २१ हजार रूपये वार्षिक उत्पन्नाचा दाखला मिळत नसल्याने गरजूंना योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. यासाठी निराधार योजना समितीचे नूतन अध्यक्ष मुदगुले यांनी सरकार दरबारी पाठपुरावा करावा. मुदगुले यांनी आपण समितीच्या माध्यमातून गरजूंना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच बचत गटांनी कर्ज घेऊन
 घरगुती कारणांसाठी त्याचा वापर न करता मोठे उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.
मुकुंद टंकसाळे यांनी बालसंगोपन योजनेबाबत, तर बाळासाहेब जपे यांनी विविध सामाजिक अर्थसहाय्य योजनांबाबत उपस्थित महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले.
बचत गटासाठी स्वतंत्र कक्ष देणारी शिरसगांव ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत असून महिलांची संख्या वाढल्याने सभागृह बांधून देण्याची सूचना सबनीस यांनी केली.
श्रीरामपूरच्या संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल गणेश मुदगुले यांचा शिरसगाव येथील महिला मेळाव्यात सत्कार करताना मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब जपे, मुकुंद टंकसाळे. यावेळी बचत गटाच्या महिलांनीही मुदगुले यांचा सत्कार केला.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

अहमदनगर जिल्ह्यातील ३० ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवकांवर कारवाई होणार


अहमदनगर प्रतिनिधि वार्ता
 विकासकामांसाठी अहमदनगर जिल्हा परिषदेकडून घेतलेले कर्ज मुदत उलटून गेल्यानंतरही न भरल्याने ग्रामपंचायत विभागाने अशा थकीत ३० ग्रामपंचायतींवर कारवाईचा इशारा दिला आहे. येत्या दहा दिवसांत हे कर्ज भरले नाही, तर सरपंच व ग्रामसेवकावरकारवाई करू, असे ठणकावल्याने या ग्रामपंचायती धास्तावल्या
 आहेत.
ग्रामपंचायतींना विविध विकासकामे करण्यासाठी अल्प दरात कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी शासनामार्फत जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा ग्राम विकास निधीची स्थापना करण्यात येते. यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यांच्या उत्पन्नाच्या ०.२५ टक्के अंशदान रक्कम जमा करणे बंधनकारक असते. जमा रकमेतून ज्या ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी कर्ज आवश्यक आहे अशा ग्रामपंचायतींना त्यांच्या उत्पन्न व शिल्लक निधीचा ताळमेळ घेऊन जिल्हा परिषद कर्ज मंजूर करते. कर्ज घेतल्यानंतर ५ टक्के दराने त्याची दहा समान हफ्त्यांत परतफेड करणे बंधनकारक आहे.
जि. प. चे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी नुकताच या संबंधी आढावा घेतला असता ही बाब लक्षात आली. त्यांच्या सूचनेनुसार थकित ग्रामपंचायतींची बैठक ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांनी मागील आठवड्यात घेतली. यासाठी संबंधित कर्जदार ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. बैठकीत दहा वर्षांपूर्वीचे प्रलंबित कर्ज व नियमित कर्ज परतफेड न करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या समस्या व अडचणी जाणून चर्चा करण्यात आली. याबाबत दादाभाऊ गुंजाळ म्हणाले, काही ग्रामपंचायतींकडे अद्यापही कर्जाचा मोठा भरणा थकीत असल्याचे दिसून येते.
दरवर्षी अंदाजपत्रकात तरतूद केली जाते. त्यानंतर कर्ज भरणे अपेक्षित असताना तसे केल्याचे दिसून येत नाही. याबाबत विचारणा केली असता सरपंच, ग्रामसेवक यांनी काही दिवसांची मुदत मागितली. त्यांच्या अडचणी विचारात घेता त्यांना पुढील दहा दिवसांची मुदत देऊन परतफेडीसाठी केलेले नियोजन कार्यालयात सादर करण्याच्या सूचना दिल्या. कर्ज भरण्याचे हप्ते ठरवून देण्यात आले. यामध्ये जर ग्रामपंचायतींनी कसूर केला तर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाधिकाऱ्यांवर ३९/१ नुसार कारवाई प्रास्तावित करण्यात येईल व संबंधित ग्रामसेवक यांच्यावर शिस्तभंगविषयक कारवाई प्रस्तावित करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

=================================
-----------------------------------------------
: - सह,संपादक - जितेश बतरा - संकलन.................✍️✅🇮🇳...वार्ता...+919890720961...
-----------------------------------------------
=================================






Friday, January 12, 2024

राजमाता जिजाऊंची शिकवण आणि स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या पिढीला प्रेरणादायी; सिद्धार्थ मुरकुटे


- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
 राजमाता जिजाऊ यांची शिकवण आणि स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या पिढीला प्रेरणादायी ठरणारे आहेत. छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस आणि सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता जिजाऊ होत्या. तर स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृती आणि हिंदुत्त्वाचा प्रसार संपूर्ण जगभर पसरविण्याचे काम केले. त्यांचे विचार आजही तरुणांना प्रोत्साहन देणारे असल्याचे प्रतिपादन मुळा प्रवरा वीज संस्थेचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे यांनी केले.
 लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे जयंती निमित्त श्री.मुरकुटे यांनी प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले. याप्रसंगी लोकसेवा विकास आघाडीचे शहर अध्यक्ष नाना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अशोक बँकेचे चेअरमन अ‍ॅड्. सुभाष चौधरी, अ‍ॅड्.पृथ्वीराज चव्हाण, विशाल धनवटे, प्रमोद करंडे, पत्रकार सुरेश कांगुणे, कैलास भागवत, जयेश परमार, संजय वेताळ आदी उपस्थित होते.
 तसेच अशोक साखर कारखाना कार्यस्थळावर राजमाता जिजाऊ भोसले व स्वामी विवेकानंद यांचे जयंती निमित्त व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कार्यकारी संचालक संतोष देवकर, कार्यालय अधिक्षक विक्रांत भागवत, मॅनेजर ऍग्री नारायण चौधरी, चीफ अकाऊंटंट मिलिंद कुलकर्णी, लेबर ऑफिसर अण्णासाहेब वाकडे, बाबासाहेब तांबे, विलास लबडे, बाळासाहेब मेकडे आदी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार इम्रान एस.शेख*
==============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

अटल सेतू’ मुळे साधला जाणार मुंबई महानगर क्षेत्राचा सर्वांगीण विकास...


अटल सेतू लोकार्पणानिमित्त विशेष लेख
मुंबईला भारताच्या मुख्य भूभागाशी जोडणारे अंतर कमी करणारा आणि प्रवासाच्या वेळेत बचत करणारा ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी - न्हावाशेवा अटल सेतू’ लोकार्पणासाठी सज्ज झाला आहे. मुंबईसह परिसराची सर्वांगीण उन्नती साधणारा, प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेणारा आणि मुंबई शहराच्या चौफेर विस्तारासाठी साहाय्यभूत ठरणारा हा सेतू ‘गेमचेंजर’ ठरणारा असेल हे निश्चित… लोकार्पणानिमित्त अटल सेतूबाबतची थोडक्यात माहिती देणारा हा लेख..

मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. बेटांचे शहर असलेल्या मुंबईच्या रहिवाश्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी शासनाने विविध प्रकल्प राबविले आहेत. याचाच पुढचा टप्पा म्हणून मुंबईला भारताच्या मुख्य भूभागाशी जोडणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) अर्थात ‘अटल सेतू’ अस्तित्वात आला असून यामाध्यमातून मुंबईकरांचे एक स्वप्न आता साकार होत आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक जाळे विस्तारणारा हा देशातील सर्वात मोठा सागरी पूल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) उभारण्यात आला असून तो आता वाहतुकीसाठी खुला होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेला आणि त्यांच्याच हस्ते लोकार्पण होत असलेला हा प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अभियांत्रिकी आविष्कार मानला जात आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

सागर, जमीन आणि दलदल अशा तीनही भागांमध्ये उभारलेला सुमारे २१ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी तीन स्थापत्य कंत्राटदार, एक इंटेलिजन्ट ट्रान्सपोर्ट सिस्टिम कंत्राटदार, विविध १० देशांतील विषयतज्ज्ञांनी आपले योगदान दिले असून १५०० हून अधिक अभियंते, तर सुमारे १६५०० कुशल मजुरांनी तीन पाळ्यांमध्ये अहोरात्र काम केले आहे. या प्रकल्पामध्ये सुमारे १.२ लाख टन स्टील वापरण्यात आले आहे. इतक्याच स्टीलमध्ये चार हावडा ब्रिज उभारले जाऊ शकतात. प्रकल्पासाठी आठ लाख 30 हजार क्युबिक मीटर काँक्रीटचा वापर झाला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यासाठी लागलेल्या काँक्रीट पेक्षा हे सहापट अधिक आहे. तर, या प्रकल्पात वापरण्यात आलेले स्टील आयफेल टॉवरमध्ये वापरले गेलेल्या स्टीलच्या १७ पट अधिक आहे. सुमारे एक हजार खांबांवर उभारल्या गेलेल्या या मार्गावर १०० किमी प्रती तास वेगाने प्रवास करता येणार असून दररोज सुमारे ७० हजार वाहने वाहून नेण्याची याची क्षमता आहे.

अटल सेतूसाठी अत्याधुनिक जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याची एकूण लांबी २२ किलोमीटर असून यापैकी १६.५ किलोमीटरचा भाग समुद्रात आणि सुमारे ५.५ किलामीटरचा भाग जमिनीवर उन्नत स्वरूपात आहे. यावर दोन्ही बाजूंना प्रत्येकी तीन मार्गिका असणार आहेत. पूर्व द्रुतगती मुक्तमार्ग हा जोडला गेला आहे आणि पूर्व-पश्चिम असणारा वरळी-शिवडी उन्नतमार्ग हा भविष्यात अटल सेतू प्रकल्पास जोडला जाणार आहे. यामुळे मुंबई सागरी किनारा रस्त्याद्वारे दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरातून येणाऱ्या प्रवाशांना अटल सेतूद्वारे विनाथांबा मुख्य भूमीकडे जाणे शक्य होणार आहे. साहजिकच प्रवासाचे अंतर कमी झाल्याने आणि एक तासाहून अधिक प्रवास वेळेची बचत होणार असल्याने हरितगृह वायू उत्सर्जन सुद्धा कमी होणार आहे.

पुलाच्या दुसऱ्या बाजूला, नवी मुंबईतील उलवे येथील शिवाजीनगर, उरण-पनवेल राज्य महामार्ग आणि मल्टीमॉडेल कॉरिडॉरवर चिर्ले येथे आंतरबदल (इंटरचेंज) करण्यात आले आहेत. याद्वारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण, पुणे किंवा गोवा येथून प्रवासी जड वाहने सहजतेने मुंबईत प्रवेश करू शकतील. हा सेतू मार्ग विविध जोडरस्त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, वसई-विरार, नवी मुंबई, रायगड जिल्ह्याला जोडला जाणार असल्याने यामधील अंतर कमी होणार आहे. या प्रकल्पामध्ये भारतातील पहिल्या ओपन रोड टोलिंग प्रणालीचा देखील वापर करण्यात आला आहे.

अटल सेतू उभारताना पर्यावरणाचा समतोल विचार करण्यात आला आहे. या क्षेत्रात स्थलांतरीत पक्ष्यांचा विशेषत: फ्लेमिंगोंचा नैसर्गिक अधिवास असल्याने प्रकल्पाच्या समुद्रातील भागात खारफुटी व दलदल इत्यादी पर्यावरणीय वैशिष्ट्यांना कमीत कमी नुकसान होईल याची दक्षता एमएमआरडीएने घेतली आहे. सुरक्षेची बाब लक्षात घेऊन बंद पडलेली वाहने नेण्यासाठी स्वतंत्र आपत्कालीन मार्गिका, ॲण्टी-क्रॅश बॅरियर्स असलेली कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टिम, तसेच पक्ष्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये ध्वनी अडथळे (साऊंड बॅरिअर्स) लावण्यात आली आहेत. भूकंप, चक्रीवादळ, वाऱ्याचा दाब आणि भरती-ओहोटीच्या प्रभावामध्ये टिकून राहण्यासाठी या प्रकल्पास सक्षम बनविण्यात आले असून सागरी सेतूचे घटक पुढील 100 वर्षांपर्यंत टिकून राहण्यासाठी गंजरोधक सामग्रीपासून बनवलेले आहेत.

प्रकल्पासमोरील आव्हाने

अटल सेतू बनविणे अतिशय आव्हानात्मक काम होते. यासाठी अत्याधुनिक जपानी तंत्रज्ञानाचा वापर करून हा अद्वितीय पूल बांधण्यात आला. एका बाजूला मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि दुसऱ्या बाजूला जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण असलेल्या मुंबई खाडीमध्ये हा पूल उभारण्यात आला आहे. कंटेनर वाहून नेणारी मोठी जहाजे तसेच मासेमारीच्या बोटी येथून सतत ये-जा करीत असतात. त्यांची वाहतूक सुरळीत व्हावी याबरोबरच कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या समुद्राखालील वाहिन्या, भाभा अणुसंशोधन केंद्र आणि बीपीसीएलच्या तेल टर्मिनल्सची सुरक्षितता आदी बाबी लक्षात घेऊन या व्ह्यू बॅरिअर्सचे नियोजन करण्यात आले आहे.

*चौफेर विस्तारासाठी सहाय्यभूत*

मुंबई बेटाच्या भौगोलिक मर्यादांमुळे शहरातील जमिनीच्या टंचाईची समस्या संपुष्टात येऊन अद्याप उपनगरी रेल्वेवर अवलंबून असल्यामुळे प्रामुख्याने उत्तर-दक्षिण विस्तारलेल्या मुंबई शहराच्या चौफेर विस्तारासाठी हा प्रकल्प सहाय्यभूत ठरणार आहे. या परिसरात दहा विकास केंद्र उभारण्यात येणार आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षात प्रवेश करणारे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई परिसरातील नागरिकांना विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देत असून अटल सेतूच्या रूपाने प्राधिकरणाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

वेळेची आणि इंधनाची बचत होणार असल्याने या प्रकल्पामुळे तिसरी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात मोठे उद्योग, विकासात्मक प्रकल्प येऊन आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक असा सर्वांगीण आणि शाश्वत विकास होण्यास मदत होणार आहे. यामुळे या भागातील पर्यटनाला देखील अधिक चालना मिळेल. अर्थव्यवस्थेला मिळणाऱ्या अपेक्षित चालनेमुळे तसेच नव्याने होणाऱ्या रोजगार निर्मितीमुळे हा प्रकल्प ‘गेम चेंजर’ ठरणार आहे, यात शंका नाही.

=================================
-----------------------------------------------
*– ब्रिजकिशोर झंवर*
*विभागीय संपर्क अधिकारी*
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांनी मानवतेची शिकवण दिली - करण ससाणे


- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व संपूर्ण जगाला भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख करून देणारे स्वामी विवेकानंद यांनी जगाला मानवतेची शिकवण दिल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले आहे. श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती प्रसंगी ससाणे बोलत होते. ससाणे पुढे म्हणाले की राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात कर्तुत्वाची ठिणगी टाकून आदर्श राजकारण व देश प्रेमाचे धडे दिले. राजमाता जिजाऊ त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जातात. त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी जगभर प्रवास केला. स्वामी विवेकानंदांचे विचार संपूर्ण मानव जातीला प्रेरक आहेत. तरुणांना मार्गदर्शन, देशसेवा, धर्म जागृती अशी अनेक कार्य त्यांनी स्वीकारली. निस्वार्थी मानव सेवा हाच खरा धर्म असल्याची शिकवण स्वामीजींनी दिली. पाश्चात्य जगात त्यांनी भारताचे
 आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दूत म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली . यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर,मा. नगरसेवक के. सी. शेळके, मुन्नाभाई पठाण, रितेश रोटे, दिलीप नागरे, आशिष धनवटे, प्रविण नवले, काँग्रेस सेवा दल चे अहमदनगर जिल्हा मुख्य समन्वयक मास्टर सरवरअली सय्यद, सुरेश ठुबे, अशोक जगधने, डॉ. राजेंद्र लोंढे, सुनील साबळे, युवराज फंड, रियाज खान पठाण, भगवान जाधव, युनुस पटेल, सनी मंडलिक, रितेश चव्हाणके, लक्ष्मण शिंदे, योगेश गायकवाड, दिपक संगवी, संजय गोसावी, राजेश जोंधळे, सुरेश बनसोडे, विशाल साळवे, गोपाल भोसले, आकाश जावळे, जियान पठाण, श्रेयस रोटे, तीर्थराज नवले, कल्पेश पाटणी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजु मिर्जा*
(ब्यूरो चिफ: नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

Thursday, January 11, 2024

*प्धानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ओझर विमानतळावर आगमनP🙏✅🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

नाशिक जिमाका वृत्तसेवा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नवी दिल्ली येथून वायू दलाच्या खास विमानाने ओझर विमानतळावर आगमन झाले.
यावेळी राज्याचे प्रधान सचिव नितीन करीर, पोलिस
 महासंचालक रश्मी शुक्ला, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी प्रधानमंत्री यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे 27 व्या राष्ट्रीय युवा
 महोत्सवाच्या उद्घाटनासाठी हेलिकॉप्टरने निलीगिरी
 बाग हेलिपॅडकडे रवाना झाले.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================