राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, September 24, 2024

अशोक आयडियल स्कूल च्या विद्यार्थ्यांचे आंतर शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये मोठे यश


अशोक आयडियल स्कूल च्या विद्यार्थ्यांचे आंतर शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये मोठे यश

लोकनेते मा आ भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले अशोक स.सा. कारखाना संचलित अशोक आयडियल स्कूल,प्रगतीनगर च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारत नुकत्याच पार पडलेल्या आंतरशालेय तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत चौदा वर्षे मुलांच्या वयोगटातील अंतिम सामन्यात विजय मिळविला. या संघाची पुढील स्पर्धेसाठी जिल्हा पातळीवर निवड करण्यात आली आहे. या प्रकारात तालुकास्तरीय अंतिम सामन्यात सलग तिसऱ्यांदा विजेता ठरण्याचा बहुमान अशोक आयडियल स्कूल ला मिळाला आहे, अशी माहिती अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांनी दिली.

तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत चौदा वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने देखील तिसरा क्रमांक पटकावला.त्याचप्रमाणे चौदा वर्षे वयोगटातील क्रिकेट संघाने लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत अटीतटीच्या अंतिम सामन्यात दुसरा क्रमांक पटकावण्याचा बहुमान मिळवला.अलीकडेच झालेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये कु अवंतिका गोंडे आणि कु सेजल काळे विजयी होत त्यांची जिल्हा पातळीवर निवड करण्यात आली.क्रीडा क्षेत्रामध्ये अशोक आयडियल स्कूल चे विद्यार्थी माननीय भानुदास मुरकुटे यांच्याकडून खेळाची तसेच व्यायामाची प्रेरणा घेऊन विविध खेळांमध्ये व स्पर्धांमध्ये यशस्वी होत आहेत.
अशोक आयडियल स्कूलचे प्राचार्य रईस शेख क्रीडा शिक्षक राजू दुधाने व विजयी खेळाडूंचे श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार तसेच अशोक उद्योग समूहाचे प्रमुख लोकनेते भानुदास मुरकुटे, अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका तसेच अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ मंजुश्रीताई मुरकुटे,मुळा प्रवरा वीज संस्थेचे संचालक सिध्दार्थ मुरकुटे, अशोक स.सा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन हिम्मतराव धुमाळ,ऍग्रो इंडस्ट्रीज एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष सोपानराव राऊत,उपाध्यक्ष बाबासाहेब आदिक,सचिव विरेश गलांडे आणी संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११

अशोक कामगार पतसंस्थेची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
तालुक्यातील अशोक सहकारी साखर कामगार पतसंस्थेची सन २०२३-२४ या वर्षाची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे अध्यक्षतेखाली संस्थेचे निवृत्तीभाऊ बनकर पाटील सांस्कृतिक भवनमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात संस्थेच्या कामकाजाचा अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रके उपस्थित सभासदांसमोर मांडण्यात आली.
अध्यक्षपदावरुन बोलतांना माजी आ.मुरकुटे म्हणाले की, संस्थेचे संचालक मंडळ सदस्य व सभासद यांचा संस्थेबद्दलचा विश्वास व सहकार्य यामुळे आज अशोक कामगार पतसंस्थेचा नावलौकिक वाढलेला असून ही अभिमानास्पद बाब आहे. कामगारांना स्वावलंबी बनण्यासाठी व त्यांच्या प्रगतीसाठी आर्थिक अडचणीच्या काळात अशोक कामगार पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज रुपाने आर्थिक सहाय्य केले जाते. कामगारांनी आपल्या अपत्यांचे विवाह कार्यात कोणताही अनाठायी खर्च न करता साध्या पद्धतीने विवाह करुन बचत केलेली रक्कम मुलीच्या वा मुलाचे नावावर बँकेत ठेवी स्वरुपात गुंतवणूक करावी जेणेकरुन भविष्यात त्याचा फायदा कुटुंबाला होईल. त्याचबरेबर कामगारांनी आपल्या मुला-मुलींना उच्च शिक्षण दिले पाहिजे, त्यासाठी अशोक शैक्षणिक संकुलामार्फत सर्व सुविधांयुक्त शिक्षणाची सोय उपलब्ध करुन दिलेली आहे. कामगारांनी आपल्या उत्पन्नातील काही भाग बँकेत व संस्थेत गुंतवणूक करुन आयुष्यात स्थैर्य व यश मिळविण्यासाठी आर्थिक बचत करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
प्रास्तविकात संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब दोंड म्हणाले की, अहवाल सालात सभासदांना रु.१ कोटी ४३ लाख कर्ज वाटप केलेले असून संस्थेस रु.३४ लाख ७९ हजार नफा झाला आहे. त्यानुसार सभासदांना ९ टक्के डिव्हीडंड व कर्मचारी बोनसची होणारी रक्कम दीपावलीपूर्वी सभासदांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. यावेळी विषयपत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेस व्यासपीठावर कारखान्याचे व्हा.चेअरमन हिम्मतराव धुमाळ, संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, कार्यकारी संचालक संतोष देवकर, कार्यलक्षी संचालक अशोक पारखे, गिताराम खरात, सामाजिक कार्यकर्ते गणेश छल्लारे, कार्यालय अधिक्षक विक्रांत भागवत, पतपेढीचे चेअरमन भाऊसाहेब दोंड, व्हा.चेअरमन संतोष जाधव, संचालक लव शिंदे, डॉ.मंगेश उंडे, अण्णासाहेब वाकडे, हरिभाऊ गायके, दत्तात्रय झुराळे, संदीप डोळस, भाऊसाहेब आसने, प्रदीप शिंदे, ज्ञानेश्वर मुठे, विकास दांगट, सौ.लिलाबाई बागडे, सौ.नंदा ढुस, सचिव दिपक बडजाते आदी उपस्थित होते.
सभेस कारखाना अधिकारी कृष्णकांत सोनटक्के, सुनिल चोळके, विजयकुमार धुमाळ, रमेश आढाव, ज्ञानेश्वर सांगळे, सुनिल बार्से आदींसह संस्थेचे सभासद व हितचिंतक उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. सभेचे अध्यक्षीय सूचना हरिभाऊ गायके यांनी मांडली, त्यास अशोक पारखे यांनी अनुमोदन दिले. डॉ.मंगेश उंडे यांनी श्रद्धांजली ठरावाचे वाचन केले. विषयपत्रिकेचे वाचन संचालक दत्तात्रय झुराळे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार लव शिंदे यांनी मानले.

*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११

कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानने आयोजित केलेले सेवाभावी उपक्रम कौतुकास्पद- माजी तहसिलदार गुलाबराव पादीर


- श्रीरामपूर - प्रतिनिधी - वार्ता -
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानने आयोजित केलेले सेवाभावी पुरस्कार आणि इतर उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत माजी तहसिलदार गुलाबराव पादीर यांनी व्यक्त केले.
शहरालगत शिरसगाव येथील बोरावकेनगर मधील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे स्व. नामदेवराव विश्वनाथ सुकळे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ सामाजिक सेवा पुरस्कार रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त प्रा. शिवाजीराव बारगळ यांना स्व. नामदेवराव विश्वनाथ सुकळे स्मृतीप्रीत्यर्थ सामाजिक सेवा पुरस्कार, रयत शिक्षण संस्थेचे डी.डी. काचोळे माध्यमिक विद्यालयास महाराष्ट्र शासनाचा तीन लाखाचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धा पुरस्कारनिमित्त मुख्याध्यापक सुनील साळवे, गुरुकुल प्रमुख कांतिलाल शिंदे यांचा सन्मान, भोकरच्या सर्वसामान्य शेतकरी परिवारातील व बोरावके महाविद्यालयाच्या कु.अश्विनी पोपटराव काळे या विद्यार्थिनीची अलिबाग येथे एमबीबीएस वैद्यकीय परीक्षेसाठी निवड झाली, तिने नीट परीक्षेत६४७ गुण मिळविले या सर्वांना प्रतिष्ठानतर्फे सन्मानपत्र, गौरवचिन्ह, शाल, बुके, पुस्तके , भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक गौरविण्यात आले. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून गुलाबराव पादीर बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. यावेळी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. राजीव शिंदे,सौ.अरुणा बारगळ, सौ मिराताई पादीर, कस्तुरबाई सुकळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. प्रतिष्ठान संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून मान्यवरांचे सत्कार केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष, समन्वयक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी करून दिला. मानपत्राचे वाचन कवयित्री संगीता फासाटे, कटारे यांनी केले. यावेळी डॉ. राजीव शिंदे, प्राचार्य डॉ. गोरख बारहाते, डॉ. वसंतराव जमधडे, मुख्याध्यापक सुनील साळवे यांनी मनोगत व्यक्त केले गुलाबराव पादीर यांनी श्रीरामपूर शहराची पार्श्वभूमी सांगून विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान, वाचन संस्कृती प्रतिष्ठान, ज्येष्ठ आनंद मेळावा, साहित्य प्रबोधन मंच, विचार जागर मंच आणि मान्यवर सेवाभावी संस्था व्यक्ती हे शहराचे भूषण आहेत. सुकळे हे कुणाची देणगी न घेता आपल्या अल्पस्वल्प पेन्शनमधील रक्कम वापरून असे सेवाभावी उपक्रम राबवितात हे विशेष उल्लेखनीय आहेत. प्राचार्य टी. ई. शेळके यांनी अध्यक्षीय भाषणातून कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. अण्णासाहेब शिंदे,अड, रावसाहेब शिंदे आदिंचे शैक्षणिक योगदान सांगून सुकळे यांनी सेवानिवृत्ती नंतरही कर्मवीरांनी सांगितलेला सेवाभाव जपला आहे. प्रा.बारगळ , मुख्याध्यापक सुनील साळवे, कु. अश्विनी काळे यांचा उचित, प्रेरणादायी सत्मान झाला असल्याचे सांगितले.प्राचार्य डॉ. बाळासाहेब बावके, प्रा. रमेश चौधरी, डॉ. प्रकाश मेहकरकर, मुख्याध्यापक भागवत मुठे, लिंगायत समाज अध्यक्ष निकडे, सुरेश गड्डेगुरुजी, राजेंद्र बारगळ, योगेश माकोणे, आनंदकुमार आरोटे, लहानू रहाणे, सदाशिव गोसावी, गणेश सुकळे, सार्थक सुकळे, सौ. सुरेखा बुरकुले संकेत बुरकुले, सुयोग बुरकुले, सौ.मोहिनी काळे, प्रा.कु. हर्षला बारगळ, आशालता कल्याणकर, श्री बोरकर, बाळासाहेब बुरकुले, सतिश गवळी, पुंडलिक खैरनार, आबा साळुंखे, देवराम शिंदे, लक्ष्मण भंडारी, प्रसन्न धुमाळ, विष्णू भगत, रावसाहेब भिंगारदिवे, पोपटराव काळे, बाबासाहेब चेडे आदी उपस्थित होते. अनेक व्यक्ती, संस्था, संघटनेतर्फे प्रा. शिवाजीराव बारगळ, सौ.अरुणा बारगळ यांचे सत्कार झाले. प्रा. बारगळ यांनी माझा झालेला हा सत्कार लाखमोलाचा असून आता अधिक कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. शिवाजी काळे, संगीता फासाटे यांनी करून आभार मानले. 


*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
 ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव

*संकलन*💐✍️✅
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४११२

आ.बच्चू कडू यांच्याशी प्रहार संघटनेच्या वतीने तालुक्यातील विविध समस्यावर चर्चा


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर येथील न्यायालयात मुठेवाडगांव येथील शेती व पाणी प्रश्नी शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षातर्फे १८ एप्रिल २०१७ रोजी झालेल्या आसूड आंदोलनावेळी पाटबंधारे कार्यालयात अधिकाऱ्यांना काळे फासल्याच्या प्रकरणात शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील व आ. बच्चू कडू यांच्यासह १९ जणाविरुद्ध दावा दाखल करण्यात आला होता, त्यासाठी श्रीरामपूर न्यायालयात आ.बच्चू कडू आले असता त्यांची प्रहार संघटनेच्या वतीने जामखेड तालुकाध्यक्ष नय्युम सुभेदार, शीतल गोरे,रामपूर सरपंच नितीन शिंदे यांच्या वतीने आ.बच्चू कडू यांचा सत्कार करण्यात आला,
यावेळी एका महिला पतसंस्थेकडून अनेक खातेदार,सभासद यांना योग्य माहिती न देणे,अशा अनेक तक्रारीचे निवेदन, अनेक कर्जदार, सभासद यांनी प्रहार जनशक्तीच्या वतीने आ.बच्चू कडू यांना देण्यात येवून आपल्या समस्या त्यांचे समोर मांडण्यात आल्या.
त्याचप्रमाणे संबंधित महिला पतसंस्थेची पदाधिकारी असलेल्या एका महिलेने, खातेदार असलेल्या एका महिलेस अनेकवेळा फार त्रास दिला व चक्क आत्महत्यास करण्यास प्रवृत्त करीत असल्याबाबत त्रस्त खातेदार महिलेने अनेक वेळा पोलिसांना निवेदने दिली. परंतु पोलिसांकडून गांभीर्याने दखल घेतली गेली नाही तथा संबंधित पतसंस्थेच्या महिला पदाधिकारी यांचेवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे आ.कडू यांच्या निदर्शनास आणून दिले,यावर आ.कडू यांनी तातडीने दखल घेऊन शहर पोलीस स्टेशनला योग्य ती कारवाई करणेबाबत सूचना दिल्या.
यावेळी चंदन मुथा,भारती वाणी,उषा साळुंके,नितीन शिंदे,तन्वीर शेख,अमोल गहिरे,अनिल गांगुर्डे,शिवा गहिरे,साईनाथ त्रिभुवन आदी उपस्थित होते.


*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 

*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर -९५६११७४१११

Sunday, September 22, 2024

वडाळा महादेव मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी


स्वसंरक्षण ही काळाची गरज - ज्येष्ठ विचारवंत सुधीर कसार 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढली होती, जुनी ग्रामपंचायत चौकात येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सुधीर पाटील कसार यांनी शालेय विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करत स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिके सादर केले तसेच आपले रक्षण आपणच करावयाचे आहे असेही श्री. कसार पाटील यांनी यावेळी सांगितले, वयाच्या ८० व्या वर्षी लाठीकाठी फिरवून तसेच तलवारबाजी व इतर साहित्याच्या साधनाने आपण संरक्षण कसे करू शकतो याची प्रचिती श्री. कसार यांनी विद्यार्थ्यांना करून दाखवीली,
 याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. सुधीर पा कसार यांच्या समवेत श्री श्री रविशंकर विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थी चि. आदर्श ढाकले याने देखील प्रात्यक्षिक सादर करताना सुधीर कसार यांची मदत केली त्याबद्दल दोघांचेही वडाळा महादेव ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले व छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. माळी सर यांनी याप्रसंगी सर्वांचेच आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
=================================
-----------------------------------------------




अहमदनगर चे आफताब शेख यांची डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्य कार्यकारणीवर नियुक्ती


विश्‍वस्त एस.एम. देशमुख व अहमदनगर शाखेच्या वतीने सत्कार

- अहमदनगर - प्रतिनिधी - वार्ता -
 मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्य कार्यकारणीत अहमदनगरचे आफताब मन्सूर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम. देशमुख यांनी पिंपरी चिंचवड येथे झालेल्या कार्यक्रमात शेख यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांचा सत्कार केला.
आफताब शेख यांची राज्य कार्यकारणीत नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा मराठी पत्रकार परिषद जिल्हा शाखेच्या वतीने पत्रकारांच्या अधिस्विकृती समिती नाशिक विभागाचे सदस्य विजयसिंह होलम यांनी सत्कार केला. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख, राज्य प्रसिध्दी प्रमुख संदीप कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष सुर्यकांत नेटके, लहू दळवी आदी उपस्थित होते.
डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांची डिजिटल मीडिया परिषद या नावाने स्वतंत्र शाखा मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. डिजिटल मीडियाची स्वतंत्र कार्यकारिणी करण्याचा निर्णयही परिषदेने घेतला आहे. त्यानुसार काही पदांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्य अध्यक्ष म्हणून बीडचे जिल्ह्यातील पत्रकार अनिल वाघमारे यांची तर कार्याध्यक्ष म्हणून सातारा येथील पत्रकार संतोष उर्फ सनी शिंदे यांची व उपाध्यक्षपदी शेगांव येथील पत्रकार अनिल उंबरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यकारिणी सदस्य म्हणून अहमदनगर येथील न्यूज टू डे २४ चे संपादक आफताब मन्सूर शेख, माथेरानमधील महाराष्ट्र न्यूज २४ तासचे संपादक मल्हार संतोष पवार, बीड येथील वास्तव अपडेटचे संपादक जितेंद्र शिरसाट, डिबीसी न्यूज चंदगडचे संपादक अनिल नयनसुख धुपदाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ११ जणांची ही कार्यकारिणी असेल. उर्वरित सदस्यांची लवकरच नियुक्ती करण्यात येईल, असे एस.एम. देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
डिजिटल मीडिया परिषद ही पूर्णपणे मराठी पत्रकार परिषदेच्या अखत्यारित असेल. ही कार्यकारिणी मराठी पत्रकार परिषदेला उत्तरदायी असेल असेही एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे एस.एम. देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, राज्य सरचिटणीस मन्सूर शेख, राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार जी.एम.शेख अहमदनगर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर  +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================




श्रीरामपुरात काचोळे विद्यालयाने काढली कर्मवीर अण्णांची अभूतपूर्व मिरवणुक


मिरवणुकीतील सांस्कृतिक विविधतेने 
घडले आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंती निमित्त डी डी काचोळे माध्य. विद्यालयाच्यावतीने काढण्यात आलेली कर्मवीर अण्णांची सवाद्य मिरवणूक अभूतपूर्व ठरली. मिरवणूकीचे उदघाटन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजींग कौन्सील सदस्या मीनाताई जगधने, जनरल बॉडी सदस्य प्रकाश निकम पाटील यांच्या शुभ हस्ते झाले. जवळपास चार किमी लांबीच्या मिरवणुकीने शहरात विक्रम केला आहे. 
       मिरवणुकीमध्ये जवळपास १४३० पेक्षा अधिक विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर वर्ग, पालक व नागरिक होते . सवाद्य मिरवणुकीमध्ये भव्य रथ, बँड पथक, झांज पथक, लेझिम पथक, दांडिया नृत्य ,पथनाट्य आदी मिरवणुकीचे आकर्षण ठरले. शहरांमधील चौका चौकात संबंधित नृत्य व विविध पथकांचे सादरीकरण आकर्षक रित्या करण्यात आले. 
   राष्ट्रीय एकात्मतेचे प्रदर्शन दर्शविणारे राजस्थान, कोळी, शेतकरी, पंजाबी,आदिवासी, दक्षिणात्य संस्कृती, वारकरी आदी नृत्यांचा अविष्कार सादर करण्यात आला.  
शहरात ठिकठिकाणी महिलांनी अण्णांच्या पुतळ्याचं औक्षण केले. श्रीरामपूर येथील नागरिकांनी कर्मवीर जयंतीच्या मिरवणुकीचे विशेष कौतुक केले. तसेच माझी पर्यवेक्षक शशिकांत दहिफळे, कामगार हॉस्पिटल वैद्य अधिकारी डॉ. रवींद्र जगधने , प्राचार्य पी व्ही बडधे, प्राचार्य डॉ. एस.ए. निंबाळकर, प्राचार्य डॉ.एम.एस.पोंधे, मुख्याध्यापक सुनिल साळवे, मुखाध्यापिका सोनाली पैठणे, शिवसेना शहर प्रमुख सचिन बडधे, गणेश थोरात, सुनिल डहाळे, आदींनी मिरवणूकीत व कॉलेज रोडवरील कर्मवीर अण्णांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. यावेळी डी डी काचोळे विद्यालयाच्या वतीने सादर करण्यात आलेला संस्कृतिक कार्यक्रमासह लेझिम व झांज पथकाचे सादरीकरण लक्षनीय ठरले.
मिरवणुकीमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्म समभाव, संस्कृती व संस्कृतिक वारसा, महापुरुषांचा आदर्श , महाराष्ट्राची लोकधारा, पर्यावरण रक्षण, विविध राज्यांची संस्कृती, दर्शवणारी मिरवणूक होती. तसेच एस.के.सोमैय्या प्राथ.विद्यामंदिर विद्यालयाची कर्मवीर अण्णांची सवाद्य मिरवणूक, रा.ब.ना.बोरावके कॉलेज, सी.डी. जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, स्वामी सहजानंद भारती शिक्षणशास्त्र महाविद्यालय व डी डी काचोळे विद्यालय आदिंच्या मिरवणुकीचा समारोप कर्मवीर चौकातील कर्मवीर पुतळ्या जवळ समारोप झाला. यावेळी श्रीरामपूर रयत संकुलाच्या वतीने व मान्यवरांच्या वतीने कर्मवीर अण्णांना अभिवादन करण्यात आले.
       कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी डी डी काचोळे माध्य. विद्यालय स्टाफ, एनसीसी विद्यार्थी, विद्यार्थी वस्तीगृह, व पालक आदींनी विशेष परिश्रम घेतले. श्रीरामपूर पोलीस स्टेशनाचे अधिकारी व कर्मचारी तसेच ट्राफिक पोलीस आदींनी मिरवणुकीचा चोख बंदोबस्त ठेवला.
     कर्मवीर जयंतीचे औचित्य साधून विद्यालयाने सर्व विद्यार्थ्यांना स्वादिष्ट भोजन दिले. मिरवणूक कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================