राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, September 30, 2024

विचार,परिश्रम आणि ध्यास ही कर्मवीर अण्णांची त्रिसूत्री जीवनात यशस्वी बनवते - अरुण चंद्रे


- कोपरगांव - प्रतिनिधी -/ वार्ता -
कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारातून रयत शिक्षण संस्था उभी राहिली,यासाठी कर्मवीर आण्णांनी खूप मोठा त्याग करुन रयतेसाठी अफाट कष्ट घेतले. कर्मवीरांचा आदर्श घेत विद्यार्थ्यांनी वटवृक्षाची फांदी होऊन आपल्या नवीन विचारांची नवनिर्मिती केली पाहिजे.शिक्षणाचा मूळ गाभा समजून घेतल्यास तसेच शारीरिक व मानसिक क्षमता दृढ केल्यास कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यशस्वी होता येते असे विचार प्रमुख पाहुणे संदीप कोळी पोलीस निरीक्षक कोपरगांव यांनी न्यू इंग्लिश स्कुल धामोरीच्या कर्मवीर जयंती सभे दरम्यान प्रतिपादित केले. 
                न्यू इंग्लिश स्कुल धामोरी विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३७ वी जयंती सभा ३० सप्टेंबर रोजी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी चे अध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी हे होते तर प्रमुख अतिथीपदी संदीप कोळी पोलीस निरीक्षक कोपरगांव, प्रमुख वक्तेपदी अरुण चंद्रे सर जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा हे उपस्थित होते.
याप्रसंगी कर्मवीर भाऊराव पाटील, वहिनी, विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून दीप प्रज्वलन कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी उर्फ आण्णा,प्रमुख अतिथी संदीप कोळी, प्रमुख वक्ते अरुण चंद्रे सर जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या समवेत इतर शिक्षण प्रेमी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.          

कार्यक्रमाची सुरवात स्वागतगीत व रयतगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय विद्यालयाचे मुख्याध्यापक एस टी बागल यांनी केले.
      
या कार्यक्रमा प्रसंगी रांगोळी प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले तद्नंतर अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप व प्रेरणा मिळावी म्हणून मान्यवरांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना थोर देणगीदारा द्वारे ठेवण्यात आलेल्या रकमेच्या माध्यमातून बक्षीस वितरण करण्यात आले. 
            
वहिनीच्या दोन अश्रूनी रयत शिक्षण संस्थेची निर्मिती कर्मवीर आण्णा च्या हातून झाली. संस्थेचा डोलारा उभा करताना अपार कष्ट आण्णांनी घेतेले याची प्रचिती संस्थेचा विस्तार करताना एकदा त्यांच्या पायातून चौऱ्यांशी काटे निघाले होते यातून येते, विचार परिश्रम आणि ध्यास ही कर्मवीर अण्णांची त्रिसूत्री विद्यार्थ्यांनी जीवनात अंगीकारावी ही त्रिसूत्री नक्कीच आयुष्यात यशस्वी बनवते असे प्रतिपादन प्रमुख वक्ते पदावरून बोलताना अरुण चंद्रे सर यांनी केले तर या महाराष्ट्रात समाज सुधारकांनी कुठलाच स्वार्थ मनात न ठेवता मनापासून सेवा केली. म्हणूनच आज शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या दारापर्यंत आली असे प्रतिपादन चंद्रशेखर कुलकर्णी उर्फ आण्णा यांनी अध्यक्षीय मनोगतातून केले.
  
यानंतर सांस्कृतिक विभागामार्फत महिला सक्षमीकरण वर पथनाट्य सादर करण्यात आले. या कार्यक्रमास शिक्षण प्रेमी ग्रामस्थ, स्कुल कमिटी, व्यवस्थापन समिती, व्यवस्थापन व विकास समिती, माता पालक संघ, पालक शिक्षक संघ सदस्य, पत्रकार,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना सुरुची भोजन देण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाच्या सर्व सेवकांनी परिश्रम घेतले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दत्तात्रय घुले - धामोरी 
=================================
-----------------------------------------------

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९२९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

डॉ.परवेज अशरफी यांची अहमदनगर शहर मधून एमआयएम तर्फे उमेदवारीची पक्षाकडे मागणी


- अहमदनगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्र सध्या विधानसभेचे वारे वाहत आहे. सर्व इच्छुक आप आपल्या पक्षाकडे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. याच अनुषंगाने एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी खा. इम्तियाज जलील यांनी इच्छुक उमेदवार यांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून अर्ज भरण्यासाठी औरंगाबाद येथे इच्छुक उमेदवारांची गर्दी होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातून ही इच्छुक उमेदवारांनी आपले नामांकन पक्षाकडे सादर केले. त्यात अहमदनगर शहरातून एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल केला आहे. तसेच नेवासा आणि राहुरी विधानसभा येथून ही पक्षाकडे अर्ज दाखल करण्यात आले आहे. नुकतेच पैगंबर साहेब यांच्याविरोधात अपशब्द वापरणारे आणि भाजपच्या नितेश राणे यांच्यावर कारवाई ची मागणी साठी औरंगाबाद येथून मुंबई रॅली यशस्वी झाल्याने अहमदनगरच्या वतीने इम्तियाज जलील यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी डॉ परवेज अशरफी, ताहर शेख, ऍड सलीम सय्यद, अमीर खान, इम्रान शेख, सफवान कुरेशी, बिलाल शेख, इस्माईल शेख आदी उपस्थित होते.
अर्ज दाखल केल्यावर डॉ परवेज अशरफी यांनी पत्रकारांशी बोलतांना संगितले की, अहमदनगर जिल्ह्यातून सर्वच १२ विधानसभेतील इच्छुक पक्षाकडे दावेदारी अर्ज दाखल करणार आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने महाविकस आघाडीला भरभरून मतदान केले. परंतु मविआ ने लोकसभेत एकही उमेदवार मुस्लिम समाजाचा दिलेला नाही.आणि औरंगाबाद मधून इम्तियाज जलील यांना पराभव करण्यासाठी दोन्ही गटबंधनने पूर्ण शक्ती लावली. तसेच विधान परिषदेतही मुस्लिम समाजाला माविआ ने निराशा केले. एकही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली नाही. याचाच अर्थ माविआला मुस्लिम अल्संख्यांक समाजाचे मत पाहिजे परंतु मुस्लिम समाजाचा नेता नको. महायुती बद्दल बोलतांना डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले की हे तर महाविकास आघाडी पेक्षा एक पाऊल पुढे आहे. यांना मुस्लिम अल्पसंख्यांक समाजच नको मुख्यमंत्री ज्या व्यक्तीने प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल अपशब्द वापरले त्यांचे संरक्षण करतात. तर गृहमंत्री त्यांची सुरक्षेत वाढ करून हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की जो मुस्लिम समजविरोधत बोलेल त्यांना सरकार पूर्ण सुरक्षा देईल. यांचे आमदार मुस्लिम समजला घुसून मारण्याची धमकी देतात आणि गृहमंत्री त्यांची पाठ राखण करतात. यावरून स्पष्ट दिसते की, ना महाविकास आघाडी ना महायुती यांना मुस्लिम समाजाची गरज आहे. जर मुस्लिम समाज आपल्या सोबत इतर समाज घेऊन इतर समाजाचे लोकांना एकत्र घेऊन येणारे विधान सभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत असेल तर चांगलेच आहे. प्रत्येक समाजाचा नेतृत्व विधानसभेत असणे गरजेचे असल्याने उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
सध्या अहमदनगर मध्ये सामान्य नागरिकांत चर्चा आहे की अहमदनगरचा भावी आमदार सामान्य जनतेला पाहिजे. वर्षानुवर्ष जी घराणेशाही चालली आहे त्याला कुठे तरी थांबवणे गरजेचे आहे. अहमदनगर शहराला असा आमदार पाहिजे जो प्रत्येक समाजाला एकत्र घेऊन चालेल. जाती जातीत तेढ निर्माण करून दंगल घडवणारा आणि स्वतःची राजकीय पोळी भाजवणार लोक प्रतिनिधी नको.
यामुळे पक्षाकडे मी उमेदवारी मागितली आहे. मला आशा आहे की पक्ष अहमदनगर मधून उमेदवारी देताना माझा विचार करेल असेही शेवटी त्यांनी सांगितले.

गुरुवारपासून रेणुकादेवी आश्रमात ४७ वा शारदीय नवरात्र महोत्सव


विविध धार्मिक,सांस्कृतिक
कार्यक्रमाचे भव्य आयोजन

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
तालुक्यातील वडाळा महादेव येथील श्री क्षेत्र रेणुकादेवी आश्रमात संस्थापक मौनयोगी रेवणनाथ महाराज यांच्या प्रेरणेने सालाबाद प्रमाणे शारदीय नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आश्रमाच्या मुख्यविश्वस्त श्रीमती नलिनीदेवी जोशी यांनी दिली आहे.यंदा महोत्सवाचे ४७ वे वर्ष आहे.

            गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी पहाटे राजराजेश्वरी रेणुकादेवीची अभिषेक महापूजा होणार असून सकाळी दहा वाजता विधीवत घटस्थापना करून नवरात्र महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे तसेच दुर्गा सप्तशती पाठाची सुरुवात व महाआरती होणार आहे.
सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता ललितापंचमीनिमित्त ललिता सहस्त्रनामावली स्तोत्रपठण तसेच कुंकुमार्चन देवीअष्टक पठण होणार आहे.
बुधवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी षष्ठीनिमित्त पहाटेच्या महाआरतीला आई जगदंबेचा भळंदगोंधळ व जोगवा आणि मंत्र जागर होणार आहे,
गुरुवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी सप्तमीनिमित्त आदिशक्तीचे जाई जुई शेवंती महापूजा केली जाणार असून भाविकांना खिचडी प्रसाद दिला जाणार आहे.
       शुक्रवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी उपवास आणि पहाटेच्या आरतीस भाविकांना खिचडी महाप्रसाद दिला जाणार आहे, याच दिवशी दुपारी महानवमी असल्याने नवचंडी होमहवन होणार आहे, सायंकाळी सहा वाजता पूर्णाहूती होऊन कुमारिका पूजन व महाआरती होणार आहे.
         शनिवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी सकाळी नवरात्र उत्थापन होणार आहे तसेच कुलधर्म कुलाचार व महानैवेद्य आरती होईल, दुपारी दोन वाजेपासून सिमोल्लंघन व शमीपूजन होणार आहे, सायंकाळी आठ वाजता शस्त्रपूजन , शमी अर्पण आपटापान अर्पण व मंगलऔक्षण होऊन नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे.
नवरात्र काळात दररोज पहाटे ५.३० वाजता निमंत्रित जोडी व लवकर येणाऱ्या जोडीसह महाआरती तर सायंकाळी सहा वाजता उपस्थित जोडीच्या शुभ हस्ते महाआरती होणार आहे. दरम्यान दुपारी चार ते सहा स्थानिक व अन्य भजनी मंडळाचे भजन तर रात्री नवरात्र उपासना होणार आहे. तरी भाविकांनी नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री रेणुका देवी भक्त मंडळ परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


Sunday, September 29, 2024

स्क्रीन पासून दूर राहा व जास्तीत जास्त वाचन करा- सौ.पोखरकर मॅडम


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वडाळा महादेव येथे संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंती निमित्त विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. 
या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेच्या अजीव सभासद सौ. पोखरकर मॅडम , स्थानिक स्कूल कमिटी सदस्य उद्धवराव पा. पवार तसेच शेती विभाग प्रमुख प्रा.एकनाथ औटी सर उपस्थित होते. कर्मवीर जयंती निमित्त विद्यालयात निबंध स्पर्धा ,वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा ,चमचा लिंबू, स्लो सायकल संगीत खुर्ची, खो-खो ,कबड्डी अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना ट्रॉफी , पेन व पेन्सिल बक्षीस स्वरूपात उपस्थित मान्यवर व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एन.डी.माळी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सौ.पोखरकर यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर राहण्याची व जास्तीत जास्त वाचन करण्याची गरज व महत्त्व पटवून दिले. भविष्यातील संधी ओळखून विद्यार्थ्यांना ते कौशल्य प्राप्त करण्यासाठी संस्था नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब कसार,स्वेजल रसाळ,संतोष नेहूल, उषा नाईक, प्रज्ञा कसार, अविनाश लाटे , जयश्री जगताप ,जिजाबाई थोरात ,जमदाडे सर ,सुनिता बोरावके ,प्रशांत बांडे , अशोक पवार , संदीप जाधव, भास्कर शिंगटे तसेच बीएड छात्र-अध्यापक यांनी परिश्रम घेतले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शितल निंभोरे व सौ.दिपाली बच्छाव यांनी केले तर श्री. भास्कर सदगीर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

महाराष्ट्रातील शेतकरी व कर्जदार यांच्यावतीने आझाद मैदानावर उपोषण व जन आंदोलन


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/वार्ता -
खातेदारांवर होणारा अन्याय किती सहन करायचा, बँक, फायनान्स, एनबीसी/पतसंस्था यांनी आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आंदोलनात सहभागी होऊन अन्यायविरुद्ध मुल संविधानिक अधिकार बचावाकरिता मुंबई येथे लढा उभारल्याचे व सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी प्रहार जनशक्तीच्या शीतल भाऊसाहेब गोरे यांनी सांगितले.
     
      बँक,फायनान्स कंपन्या/एनबीसी/पतसंस्था यांचेकडून वारंवार होणाऱ्या त्रासामुळे तथा चुकीच्या कारभारामुळे महाराष्ट्रातील शेतकरी,कर्जदार यांच्यावतीने नुकतेच आझाद मैदान मुंबई येथे तीन दिवस उपोषण व जन आंदोलन करण्यात आले. याबाबत संबंधित दोषींवर शासनाच्या वतीने कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्रातील शेतकरी, कर्जदार मोठ्या संख्येने उपोषणास बसले होते.
या उपोषण आंदोलनाचे विविध संघटनानी नेतृत्व केले होते.
कर्ज घेणे हा काही गुन्हा नाही, प्रत्येक माणसाची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने त्याला कर्ज घ्यावे लागते. काही कारणामुळे कर्ज रक्कम भरणे शक्य होत नाही अशांना बँका, पतसंस्था खातेदारांना आत्महत्या करायला लावणारी परिस्थिती निर्माण करतात. त्यासाठी मुख्यमंत्री यांनी याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.मोतीलाल होम फायनान्स उर्फ एस्पायर होम फायनान्स लिमिटेड, यांचे बाबत माहिती दिली. तसेच श्रीरामपूर येथील एका महिला पतसंस्थाकडून मनमानी कारभार होत असून त्याचा त्रास अनेक सभासदांना झाला आहे. सभासदांना वार्षिक सभेला निमंत्रण न देणे,सोने तारण कर्जदारांना माहिती न देता परस्पर लिलावाने विल्हेवाट लावणे,संचालक मंडळाची निवडणूक न घेता थेट मंडळ, चेअरमन नियुक्त करणे,ह्या नियमबाह्य बाबी आहेत.
दि.३० सप्टे.रोजी वार्षिक सर्व साधारण सभा असल्याने यावेळी अनेक सभासद आपल्या विविध समस्या मांडणार असून ही सभा गाजणार आहे.या संदर्भात अनेकांनी तक्रारी आ.बच्चू कडू यांना निवेदनाद्वारे देण्यात आलेल्या आहेत.सदर पतसंस्थेच्या मनमानी कारभार विरोधात महात्मा गांधी पुतळ्यासमोर आमरण उपोषण करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार श्रीरामपूर,सहाय्यक निबंधक, उद्योजक अशोक कानडे यंच्या मध्यस्थीने उपोषण स्थगित करण्यात आले होते.अद्याप सहाय्यक निबंधक श्रीरामपूर यांचेकडून निर्णय, कारवाई न झाल्याने श्रीमती शीतल गोरे यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पा.यांची मुंबईत भेट घेऊन निवेदन दिले.व सहकार मंत्री यांनी सहकार आयुक्त यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले असे गोरे यांनी सांगितले आहे.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️❤️🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Saturday, September 28, 2024

शिक्षकांच्या हुंकार आंदोलनास पाठिंबा म्हणून शिक्षक समन्वय संघ श्रीरामपूर तालुक्याच्या वतीने शाळा बंद आंदोलन


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
मुंबई येथील आझाद मैदानावर गेली ४८ दिवसांपासून अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना प्रचलित नियमानुसार टप्पा वाढ अनुदान मिळावे याकरिता शिक्षक समन्वय संघाकडून शिक्षकांच्या न्याय व रास्त मागणीसाठी हुंकार आंदोलन पुकारण्यात आले असून शुक्रवार दि.२७/०९/२०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांनी सहभाग नोंदवित जाहीर पाठिंबा दिला असून आज श्रीरामपूर तालुका जि.अहमदनगर येथील समस्त अंशतः अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांनी श्रीरामपूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती साईलता सामलेटी यांची भेट घेऊन त्यांना शाळा बंदबाबत लेखी निवेदन दिले.
          यावेळी श्री.पाचपिंड सर,लबडे सर,इनामदार सर, आरिफ सर, इब्राहीम बागवान सर,साबीर शाह सर,आजिज शेख सर, अल्ताफ काकर सर, रूपटक्के सर,भांगरे सर, बडाख सर, त्रिभुवन सर आदि उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
इब्राहिम बागवान (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Friday, September 27, 2024

"येक नंबर' चित्रपटाचा मुंबईत ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंसह अभिनेता, निर्माता आमिर खानसह चित्रपटसृष्टीतील विशेष मान्यवर उपस्थित होते"


- मुबंई - प्रतिनिधी -/ वार्ता -
"'येक नंबर' हा मराठी चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित या चित्रपटामध्ये अभिनेता धैर्य घोलप आणि सायली पाटील हे प्रमुख भूमिकेत असणार आहेत. दरम्यान 'येक नंबर' या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला राज ठाकरे, बॉलिवूड अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर, अविनाश गोवारीकर, साजिद नाडियाडवाला, साजिद खान, अभिजात जोशी हे नामांकित व्यक्ती उपस्थित होते."


"राजेश मापुस्कर दिग्दर्शित 'येक नंबर'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न उपस्थित करण्यासारखा आहे. 'येक नंबर'चं पोस्टर रिलीज झाल्यापासूनच हा चित्रपट राज ठाकरे यांचा बायोपिक असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर ट्रेलर पाहून या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. आपली प्रेमकहाणी पूर्ण करण्यासाठी गावात राज ठाकरे यांना घेऊन येण्यासाठी मुंबईत निघालेल्या एका सामान्य तरुणाची असामान्य कहाणी यात पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये प्रतापचा राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा संघर्षमयी प्रवास दिसत आहे. प्रताप त्याचे ध्येय साध्य करू शकेल का? या प्रश्नाची उकल येत्या 10 ऑक्टोबरला होणार आहे."

"ट्रेलर पाहून प्रेक्षकांना सध्या या चित्रपटाबाबत उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात राज ठाकरे स्वतः अभिनय करणार आहेत का? तर याचे उत्तरही प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे. दरम्यान, 'येक नंबर'मध्ये बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिची झलकही दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटातून मलायकानं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. यापूर्वी चित्रपटातील 'जाहीर झालं जगाला' या प्रेमगीतानं प्रेक्षकांना भुरळ घातली होती. सध्या हे गाणं प्रचंड गाजत आहे. 'येक नंबर'म्हणजे एक कौटुंबिक, रोमँटिक लव्हस्टोरी, सस्पेन्स असे मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज आहे, हे नक्की ! एकंदरच या सगळ्यावरूनच चित्रपटाच्या भव्यतेचा अंदाज येतोय."

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================