सध्या आप्पाचा लय थाट आहे, आप्पाकडे क्रेडिट कार्ड आहे या गाण्याने सर्वत्र धुमाकूळ घातलेला आहे गाणे लोकांना आवडलेला आहे या गाण्याबद्दल मला काही म्हणायचं नाही गाणे चांगले आहे , संगीत पण सुंदर आहे परंतु गाण्यातले जे बोल आहे ते आपल्याला काहीतरी सांगून जातात . आपल्या दैनंदिन जीवनात आपण सुद्धा कृत्रिम व दिखाऊ तर जगत नाही ना ही आपल्याला दाखवून जाते .आज जर आपण पाहिलं तर आपली नवीन पिढी , विशेषता तरुण वर्ग व त्याबरोबर वयस्क सुद्धा बॅनरबाजी व दिखाऊपणा याकडे कल वाढलेला आहे. आपण पाहतो की नवीन पिढीचे वाढदिवसाचे बॅनर लावले जातात या वाढदिवसाच्या बॅनर मध्ये भावी सरपंच , भावी नगरसेवक, भावी आमदार, भावी खासदार, भावी नेते अशा उपाधी दिल्या जातात व खाली सगळ्यांना आप्पा, दादा, अण्णा, तात्या, भाऊ , नेते, आधारस्तंभ, आशावादी नेतृत्व अशा उपाधी दिल्या जातात . या बॅनर बाजीवर आपण किती मोठे आहोत व आपल्यावर किती लोकं प्रेम करतात हे नवीन पिढी दाखवण्याचा प्रयत्न करते . आपल्या पाठीमागे केवढा मोठा जनसमुदाय आहेत हे सर्वजण दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि वास्तविक जीवनापासून लांब जात आहे, सत्य व वास्तविक जीवन नाकारून नवीन कल्पना विश्वात जगण्यात अरमान झालेली आहे मित्राचे बॅनर लागले म्हणून माझे बॅनर लागायला पाहिजे माझे वाढदिवसानिमित्त कॉलनीतल्या गावाच्या लोकांना माझा बर्थडे कळायला पाहिजे ही प्रत्येकाची इच्छा असते व त्यासाठी ते खर्च सुद्धा करत असतात भावी सरपंच भावी नेते या उपाधी लागल्यानंतर ती मुलं सत्यापासून लांब जातात व कल्पना विश्वात आपण असेच काहीतरी आहोत , फार मोठे आहोत , फार प्रसिद्ध आहोत, जीवनात सेटल झालेलो आहोत आता मला काही कमी नाही असे समजतात, याचा परिणाम त्यांच्या जीवनावर होतो, शिक्षणावर होतो व त्यापासून ते लांब जातात. कष्ट करण्याची मानसिकता या गोष्टीमुळे तरुणांची राहत नाही, जीवनात अभ्यास कष्ट व व्यवसायावर लक्ष देण्याऐवजी हे तरुण फक्त आपण किती प्रसिद्ध आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात व त्यात आनंद मानतात. बॅनर वर आपला फोटो आला म्हणजे आपण काहीतरी फार मोठे आहोत असे ते मानायला लागतात या सगळ्या उपाधी व बॅनरवर लागलेले फोटो आपल्याला काही फायदा देतात का ,? आपल्याला आर्थिक फायदा होतो का? आपले जीवन याने सेटल होईल का? आपल्या भविष्यकाळात याचा फायदा होईल का ? याचा विचार निश्चितच तरुणांनी करायला हवा. आपल्या आई वडिलांच्या आपल्याकडंन ज्या अपेक्षा आहेत , आपल्यासाठी ते दिवस-रात्र कष्ट करत आहेत व आपण फार मोठे होऊ असे आपल्या आई वडिलांना वाटते परंतु आपण आपल्या आई वडिलांच्या आशा आकांक्षा आपल्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करत आहोत का ? त्यासाठी प्रयत्न करत आहोत का ? आपले ध्यैय व आपले भविष्य स्थिर करण्यासाठी आपण कोणता प्रयत्न करत आहोत व किती कष्ट घेत आहोत याचा विचार तरुणांनी करायला पाहिजे. आपल्या कडे आर्थिक स्थिरता यावी यासाठी प्रयत्न करायला हवा . आपल्याकडं ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आपण पूर्ण करू का याचा विचार तरुणांनी करायला हवा फक्त कल्पना विश्वात न जगता तरुणांनी वास्तव जीवनात जगले पाहिजे आज जर आपण पाहिलं तर आपला आयुष्य तरुण पिढी सोशल मीडियावरती जास्त व्यस्त असते व आपले भविष्य आपला आनंद तिथेच शोधत असते व शोधत आहे. माझे स्टेटस किती लोकांनी पाहिले , मला किती लाईक आले , किती कॉमेंट्स आले यावर मी किती लोकप्रिय झालो, किती मोठा झालो हे ते लोकांना सांगत असतात परंतु त्याबरोबर या सगळ्या गोष्टींचा आपल्या जीवनात काही उपयोग आहे का ? याचा विचार करायला हवा . सोशल मीडिया वरती आपल्याला किती मित्र आहेत यापेक्षा आपल्यावरती संकट आल्यावर , दुःख आल्यावर किंवा आपला अपघात झाल्यावर किंवा आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्यावर आपल्याला आपल्यासाठी मदतीला किती मित्र धावून येतील याचा वास्तविक विचार करायला हवा . सोशल मीडिया , समाज माध्यमात हे आज जरी जीवनाचा एक भाग असले तरी मर्यादेच्या पलीकडे त्यांचा उपयोग व्हायला नको मर्यादा सांभाळून त्यांचा उपयोग करायला पाहिजे व त्यावरच आपले सर्व विश्व पाहायला नको सत्य जीवनात , वास्तव जीवनात काय परिस्थिती आहे याची जाणीव सगळ्यांनी करून घ्यायला पाहिजे . ही जाणीव वास्तविकता खरी परिस्थिती जीवनाला जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी जर सगळ्यांनी समजून घेतल्या तर आपल्याला वास्तव जीवनात जगण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहे ते लक्षात येईल . आपल्याला मिळालेले लाईक , व्ह्यूज , कॉमेंट्स आपले पालन पोषण व भरण करू शकत नाही आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत नाही त्यामुळे या गोष्टींवर ती लक्ष देण्यापेक्षा आपण आपल्या कुटुंबाचा व आपला उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने करू कसा करू शकू याचा विचार जरूर तरुणांनी करावा. समाज माध्यम व सोशल मीडिया यांचा उपयोग मर्यादेच्या पलीकडे करू नये . स्टेटस ने आज लोक आपल्या भावना व्यक्त करत असतात की माझे स्टेटस म्हणजे माझ्या भावना व्यक्त करण्याचे साधन आहे असे त्यांना वाटत असते पण त्याबरोबर सत्य जीवनामध्ये आपल्याबरोबर जे लोक राहतात ते आपले स्टेटस काय समजतात व आपल्याला काय ओळखतात ते समजणे गरजेचे आहे कारण की फक्त आणि फक्त समाज माध्यमात आपल्या भावना व्यक्त करण्याची साधन नाही आपण एकमेकांशी संपर्क केला पाहिजे आपले नातेवाईक, मित्रपरिवार , कुटुंब यांच्याशी आपण बातचीत केली पाहिजे, यांना भेटलो पाहिजे, यांच्यासोबत वेळ व्यक्त करायला पाहिजे तेव्हा आपल्याला त्यांच्या भावना समजतात व त्यांना आपल्या भावना कळतात. आज आपण पाहतो की पालक घरी आल्यानंतर मोबाईल वरती जास्तीत जास्त वेळ राहतात मोबाईल वरती इतका वेळ राहतात की त्यांना आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो तेव्हा आपल्या मुलांसोबत पालकांनी सुद्धा वेळ व्यतीत करायला पाहिजे. त्यांच्यासोबत बोलायला पाहिजे , त्यांच्या भावना समजून घ्यायला पाहिजे , त्यांचे मित्र बनून राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे जर सगळ्या पालकांनी केले व आपल्या मुलांना जर समजून घेतलं तर निश्चितच आपल्या मुलं वाम मार्गाला किंवा वाईट मार्गाला जाणार नाहीत हे खरं आहे .जेवढा वेळ आपण ऑनलाईन असतो त्याबरोबर जर आपण ऑफलाइन इतरांबरोबर जर वेळ व्यतीत केला तर निश्चितच परिवारामध्ये सामंजस्य व प्रेमाच्या भावना निर्माण होतील . पती-पत्नीमध्ये जर पाहिलं तर फक्त फेसबुक, इंस्टाग्राम , व्हाट्सअप यावरती शुभेच्छा देऊन थांबतात त्यावरती न थांबता आपल्या मनात काय चाललेला आहे आपल्या परिवाराच्या आपल्या पत्नीचे , आपल्या पतीच्या मनात काय चालू आहे , त्यांना काही त्रास नाही ना ? ते परेशान नाही ना ? त्यांना कुठल्याही प्रकारचे आर्थिक परेशानी नाही ना ? शारीरिक वेदना नाही ना ? कुठल्या प्रकारचे मानसिक टेन्शन नाही ना? हे आपण समजून घेतले पाहिजे पती-पत्नींनी एकमेकांसोबत जास्तीत जास्त बोलून वेळ घालवायला पाहिजे असे केल्यास निश्चितच फारकत / तलाख घेण्याचे प्रमाण कमी होईल व लोकांमध्ये , पती-पत्नीमध्ये व कुटुंबामध्ये प्रेमाची भावना निर्माण होईल. आपण आपल्या कुटुंबाचे स्टेटस फोटो फेसबुक इंस्टावर तर टाकाच ती आजची गरज आहे परंतु त्याबरोबर आपल्या कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जा, आपल्या मुलांसोबत, पत्नीसोबत , आपल्या पतीसोबत, आपल्या आई वडिलांसोबत, मित्रपरिवार व नातेवाईकांसोबत कुठेतरी बाहेर फिरायला जा . फिरायला गेल्यानंतर त्यांचे काय चालले हे समजून घ्या त्यांच्याबरोबर गप्पा करा, गप्पा केल्यानंतर तुम्हाला कळेल की त्यांच्या मनात काय चाललेले आहे त्यांच्या भावना तुम्हाला समजतील त्याबरोबर आपली जे म्हातारे आई-वडील आहेत किंवा आपल्या घराचे जे वयस्कर व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा निदान तुम्हाला ज्या वेळेस सुट्टी असेल किंवा ज्या वेळेस तुम्हाला वेळ असेल त्यांच्यासोबत बोला त्यांच्या त्यांच्या अनुभव त्यांच्या जीवनातील व्यथा आणि वेदना त्यांनी केलेले कष्ट त्यांच्या जीवनातील कथा ऐका त्यातून तुम्हाला निश्चितच जीवन चांगल्या जगण्याचा मार्ग मिळेल व त्या समोरच्या वयस्क व्यक्तींना सुद्धा तुम्ही त्यांच्यासोबत राहिलात त्यांच्यासोबत वेळ घालवला म्हणून आनंद होईल . आजचे जग ऑनलाईन चे असले समाज माध्यम हे आपला अविभाज्य भाग असले समाज माध्यम जरी वाईट नसले किंवा सोशल मीडियाचे असंख्य उपयोग असले तरी सोशल मीडियाचा मर्यादित वापर केला तर निश्चितच आनंदी जीवन जगता येईल सोशल मीडियामुळे आपण सगळेजण एकमेकाला सहजासहजी जरी भेटत असलो तरी प्रत्यक्ष भेटून सुद्धा आनंद व्यक्त करता येईल. एकंदरीत सर्वच विश्व ऑनलाईन न पाहता आपण ऑफलाईन आपल्या जीवनात जगले पाहिजे व ऑफलाईन जर जीवनात जगलो तर सगळ्यांना आनंद व आनंददायी जीवन जगता येईल त्याबरोबर आजकालचे जीवन जर आपण पाहिलं तर त्या गाण्यात सुद्धा म्हटलेलं आहे की आप्पाकडे क्रेडिट कार्ड आहे म्हणजे आजकाल लोक दिखाऊ गोष्टींकडे जास्तीत जास्त लक्ष देतात . माझ्याकडे गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, क्रेडिट कार्ड पाहिजे, मी श्रीमंत दिसलो पाहिजे, माझ्याकडे चांगले कपडे पाहिजे, लोकांनी मला चांगले म्हटले पाहिजे याच गोष्टीकडे लक्ष देतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा. गाडी घोडी त्याबरोबर आपले कपडे यात दिखाऊ गोष्टी काही क्षणार्धासाठी असतात परंतु लोक आपल्याकडे काही क्षणासाठी तात्पुरत्या वेळेसाठी आकर्षित होतात लोक किंवा समाज आपल्या विचाराने आपल्या ज्ञानाने व आपल्याकडे असलेल्या ज्ञान भंडाराने म्हणजेच आपल्याकडे असलेल्या ज्ञानामुळे आपल्याकडे कायमस्वरूपी आकर्षित होतात व आपल्याला समाजात मान मिळतो. त्याच्यामुळे आपले ज्ञान भंडार कसे जास्तीत जास्त वाढवता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे यासाठी वाचन केले पाहिजे यासाठी ज्ञान मिळविले पाहिजे जेवढे तुमच्याकडे ज्ञान अधिक असेल तेवढा तुम्हाला जास्तीत जास्त मान अधिक मिळेल ही गोष्ट तरुणांनी विसरता कामा नये. त्यामुळे आपण ऑनलाईन बरोबर ऑफलाईन सुद्धा रहा . आपल्या कुटुंबाला मित्राला आपल्या आई-वडिलांना सर्वांना वेळ द्या व आपल्या मुलांना सुद्धा वेळ द्या आपण असे केल्यास निश्चितच आपण चांगले आयुष्य जगू शकू हे मात्र नक्की.
=================================
-----------------------------------------------
व्याख्याते,लेखक, समुपदेशक
डॉक्टर संतोष पाटील गोराडखेडेकर - ✍️✅🇮🇳...
पाचोरा - ९३०७६३२६३६
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================