राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, October 15, 2024

विद्यानिकेतन स्टेट बोर्डमध्येवाचन प्रेरणा दिन उत्साहात


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, स्टेट बोर्डमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 
        प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य विनोद रोहमारे यांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून 'वाचाल तर वाचाल' या उक्तीची यथार्थता पटवून दिली. यावेळी ते म्हणाले, की मनुष्य वाचनाच्या मदतीने सर्वच क्षेत्रांची माहिती घेऊन ज्ञानी होऊ शकतो. तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याने किमान रोज एक तरी पुस्तक वाचलेच पाहिजे, त्यानेच आपल्याला नवीन आशा नवीन दिशा व प्रेरणा मिळू शकते.
दरम्यान विद्यार्थ्यांनी
वाचनाचे महत्त्व लक्षात घेऊन सार्वभाषिक अवांतर पुस्तके वाचण्याचा व जन्मदिन प्रसंगी इतरांना भेट म्हणून पुस्तके देण्याचा संकल्प केला.
             यावेळी विद्यालयाचे चेअरमन मा. प्राचार्य टी.ई.शेळके, व्हा. चेअरमन डॉ. प्रेरणाताई शिंदे, खजिनदार डॉ. राजीव शिंदे, सहसचिव डॉ. अर्चना शेळके, प्राचार्य विनोद रोहमारे, उपप्राचार्या भारती कुदळे, समन्वयक मंगेश साळुंके, मनिषा उंडे, राजश्री तासकर, सुनंदा थोरात, शंकर बाहुले तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
शंकर बाहूले (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

अशोक महाविद्यालयात भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
आयुष्यभर ज्ञानग्रहण करून आपल्या यशस्वी जीवनाचा पाया रचणारे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो. डॉ.कलाम यांचा भारताच्या नागरी अंतराळ कार्यक्रमात आणि लष्करी क्षेपणास्त्र विकासाच्या प्रयत्नांमध्ये खूप मोठा सहभाग होता. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाच्या विकासावर केलेल्या कामामुळे ते भारताचे मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले. १९९८ मध्ये भारताच्या पोखरण-अणुचाचण्यांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण संघटनात्मक, तांत्रिक आणि राजकीय भूमिका बजावली, असे मत प्राचार्या डॉ.सुनीता गायकवाड यांनी व्यक्त केले.
           अशोक उद्योग समूहाचे सूत्रधार माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
यावेळी महाविद्यालयाचे ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ.संदीप सांगळे यांनी पुस्तक प्रदर्शन आयोजित केले होते. प्रारंभी प्राचार्या डॉ.सुनीता गायकवाड यांनी डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 
        कार्यक्रमासाठी वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.दिलीप खंडागळे, ग्रंथपाल डॉ.संदीप सांगळे, परीक्षा अधिकारी प्रा.शरद आवारी, प्रा.भिमा शिंदे, डॉ.विवेक साळवे, प्रा.सुनील म्हकांळे, प्रा.सुधीर शेरकर, प्रा.स्वप्नील लांडगे, प्रा. ज्ञानेश्वर खिलारी, प्रा.राणी पटारे, प्रा.संगीता खंडिझोड, प्रा.मंदा तांबे, प्रा.हिना शेख, कार्यालयीन अधिक्षक बाबासाहेब पटारे आदींसह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Monday, October 14, 2024

अकोले शहरात फटाके वाजून महायुती सरकारचे राज्य पत्रकार संघाकडुन अभिनंदन



अकोले शहरात फटाक्यांची आतषबाजी, महायुती सरकारच्या निर्णयाचे पत्रकार संघाकडून उत्साहात अभिनंदन!

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय: पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना

- अकोले - प्रतिनिधी -/ वार्ता - महायुती सरकार ने ऐतिहासिक निर्णय घेत पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या महामंडळाच्या स्थापनेमुळे पत्रकारांना त्यांच्या रोजच्या कामकाजात आर्थिक मदत मिळणार आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांनाही याचा फायदा होणार असून त्यांच्या व्यवसायाला एक नवीन दिशा मिळेल.
पत्रकारांना अधिकृत कर्ज सुविधा, विमा योजनांचा लाभ, तसेच विविध सरकारी योजनांचा आधार मिळवून देण्यासाठी या महामंडळाची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. या महामंडळामुळे पत्रकारांना त्यांचे हक्क मिळवण्यासाठी आता शासनाकडे मदत मागावी लागणार नाही. पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना आर्थिक पाठबळ मिळाल्याने त्यांच्या कामात सुसूत्रता आणि स्थैर्य येईल. असा विश्वास महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी व्यक्त केला.

पत्रकारांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना महायुती सरकारने केल्याचा आनंद पत्रकारांच्या वतीने फटाके फोडून व पेढे भरवून अकोले बसस्थानका समोर साजरा करण्यात आला. 
   महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, हेमंत आवारी, विद्याचंद्र सातपुते, गणेश आवारी, भाऊसाहेब साळवे, संदीप दाताखीले, सचिन खरात, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, तालुका उपाध्यक्ष हरिभाऊ फापाळे, दत्ता जाधव, आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांचे हक्क आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने आयोजित केलेली पत्रकार संवाद यात्रा अखेर यशस्वी ठरली. या यात्रेची सांगता नुकतीच मुंबई येथील मंत्रालयात झाली, ज्यामध्ये पत्रकारांच्या हितासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य सरकारने पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली, ज्यामुळे या क्षेत्रातील लोकांना आर्थिक स्थैर्य लाभेल.

संवाद यात्रेची पार्श्वभूमी:
ही पत्रकार संवाद यात्रा नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी येथून सुरू झाली. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली, संपूर्ण महाराष्ट्रभर पत्रकार बांधवांनी ही यात्रा केली. विविध जिल्ह्यांमधून प्रवास करताना, त्यांनी पत्रकारांच्या समस्या आणि मागण्या मांडण्यासाठी सर्व आमदार, खासदार आणि विरोधी पक्ष नेत्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी सुरक्षा, आर्थिक मदत, आणि सामाजिक प्रतिष्ठा यांसारख्या मुद्द्यांवर या यात्रेदरम्यान ठोस चर्चा झाली.
या संवाद यात्रेत, पत्रकार बांधवांनी प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना निवेदने सादर केली. त्यांनी पत्रकारांवरील हल्ले, कामाच्या कठीण परिस्थितीतील अडचणी आणि आर्थिक समस्यांबद्दल शासनाला सविस्तर माहिती दिली. यासोबतच, पत्रकार संवाद यात्रेच्या विविध पोस्टर्सचे अनावरण देखील करण्यात आले, ज्यात या मुद्द्यांवर अधिक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
नेत्यांची भूमिका आणि स्वागत:
या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे आणि कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी मोठे योगदान दिले. चंद्रकांतदादा पाटील, मंगल प्रभात लोढा आणि पंकजा मुंडे यांसारख्या नेत्यांनी या संवाद यात्रेच्या समारोपाला उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शविला.

पत्रकार संघाच्या या महत्वपूर्ण यशस्वी संवाद यात्रेमुळे राज्यातील पत्रकार वर्गात आनंदाची लहर पसरली आहे. महायुती सरकारच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. हा निर्णय पत्रकारांच्या हक्कांसाठी उभे राहण्यासाठी एक नवीन आदर्श निर्माण करणारा ठरला आहे.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने सर्व आमदार, खासदार, सर्वपक्षीय नेते, विरोधी पक्ष नेते तसेच सरकारमधील सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे. महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे पत्रकार वर्गात उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. यशस्वी संवाद आणि समन्वयाच्या दृष्टीने हे पाऊल स्वागतार्ह आहे, ज्यामुळे पत्रकारिता क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पत्रकार संवाद यात्रेने पत्रकारांचे हक्क आणि समस्या सोडवण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेमुळे पत्रकारांना आता अधिक सुरक्षित आणि आर्थिक स्थिर जीवन मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. पत्रकार संघाच्या या यशस्वी प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील पत्रकारिता क्षेत्राच्या भविष्याला नवीन दिशा मिळाली आहे, ज्यामुळे पत्रकारांच्या हक्कांच्या लढ्यात हा एक मोठा विजय मानला जात आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
डॉ.विश्वासराव आरोटे
राज्य सरचिटणीस:
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


पर्यावरण हा जगण्याचा भाग - प्रमोद मोरेसभेत पर्यावरण विषयक स्पर्धा आणि कार्यालय सुरू करण्याचा ठराव संमत


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन पर्यावरणाच्या समतोलासाठी आवश्यक असून पर्यावरण हा सर्वांच्या जीवनाचा आणि जगण्याचा भाग आहे, असे प्रतिपादन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी व्यक्त केले. 
अहिल्यानगर (अहमदनगर) सावेडी येथील सिद्धिविनायक मंदिरात नुकतीच निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाची सभा कार्याध्यक्ष छायाताई राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर, अध्यक्ष प्रमोद मोरे, सचिव वनश्री मोरे-गुणवरे,  सचिव डॉ. अनिल लोखंडे, सरपंच बाळासाहेब ढोले यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्वप्रथम  सिद्धिविनायकास पुष्प वाहून वंदन करण्यात आले. सभेचे प्रास्ताविक व स्वागत राज्य संघटक डॉ. शरद दुधाट यांनी केले. याप्रसंगी मंडळातील पदाधिकारी यांची वेगवेगळ्या निवडीबद्दल व विशेष प्राविण्याबद्दल डॉ. अनिल लोखंडे, डॉ. शरद दुधाट, संतोष परदेशी, चंद्रकांत भोजने, वर्षाताई घुले, उत्तम पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी आंबीखालसाचे सरपंच बाळासाहेब ढोले, कार्याध्यक्ष संतोष परदेशी, जिल्हाध्यक्ष लतिका पवार, सचिव डॉ. अनिल लोखंडे, जिल्हाध्यक्ष तुकाराम आडसूळ, अर्जुन राऊत, महादेव लांडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी  सजीवांच्या अस्तित्वासाठी प्राणवायू खूप मोलाचा असून पर्यावरण आणि वृक्षांचे संवर्धन ही काळाची गरज आहे. तसेच प्रमोद मोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मंडळाच्या यशस्वी वाटचालीबद्दल त्यांनी कौतुक केले. प्रमोद मोरे यांनी सभेतील विविध विषयांचे सविस्तर विवेचन केले तर अध्यक्षा छायाताई राजपूत यांनी मंडळाच्या तालुक्यानुसार शाखा सुरू कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रसंगी डॉ. प्रवीण गुणवरे, बाळासाहेब गाडेकर, अशोक भोसले, प्रकाश केदारी, राजेश परदेशी, मोहन खवळे, आशा कांबळे, मदन राजपूत, पद्मा राजपूत, राजेंद्र आहेर, राजश्री आहेर, चंद्रकांत भोजने, बाळासाहेब बोडखे यांच्यासह पर्यावरण मंडळातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या आयोजनासाठी जिल्हाध्यक्ष लतिका पवार व अवधूत पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार कार्याध्यक्ष संतोष परदेशी यांनी मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
डॉ. शरद दुधाट, श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


साजापूर जि.प.उच्च प्राथमिक शाळेत रंगले एकपात्री सांस्कृतिक कार्यक्रम


साहित्यिक अय्युब पठाण लोहगांवकर यांच्या मधूर आवाजाने विद्यार्थी मंत्रमुग्ध

- पैठण - प्रतिनिधी -/ वार्ता -
प्रसिध्द साहित्यिक तथा शाहू विद्यालय जायकवाडी उत्तर ता. पैठण येथील सहशिक्षक अय्युब पठाण लोहगावकर यांनी नुकतेच छ्त्रपती संभाजीनगरच्या जवळ असेलेल्या साजापूर येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेत " मुले रंगली काव्यात " हा धमाल विनोदी एकपात्री आणि संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. यामध्ये श्री.अय्युब पठाण यांनी मधुर आवाजात देशभक्तीपर गीते, भारूड, पोवाडे, पाळणे, शालेय गीते, बोधात्मक विनोदी नकला सादर केल्या. तर बिडकीन येथील शालीमन शिंदे यांनी अय्युब पठाण यांना ढोलकीवर उत्कृष्ट साथ देऊन कार्यक्रमात रंगत आणली. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक धनंजय नागमवाढ हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात साहित्यिका तथा उपक्रमशिल शिक्षिका श्रीमती अलकनंदा घुगे- आंधळे हे होते.तसेच शेख इलियास, अबूजर पठाण, मुदस्सर पठाण यांची कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यास शिक्षक- अनिल जाधव, भास्कर गोपाल, देविदास काळे तसेच शिक्षिका- ज्योती ढोमणे, अश्विनी मोरे, प्रिती गंगवाल, सोनाली रेसवाल यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

इंटक च्या राज्य कार्याध्यक्षपदी अरुणभाऊ विरकर यांची नियुक्ती


- नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्र इंटक ची नवनिर्वाचीत कार्यकारणीची सभा मुंबई येथे नुकतीच संपन्न झाली. 
यामध्ये राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) च्या महाराष्ट्र इंटक शाखेच्या राज्यस्तरीय कार्यकारणीच्या सदस्यपदी तसेच महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेस (इंटक) च्या राज्य कार्याध्यक्षपदी अरुण विरकर यांची सर्वानुमते नियुक्ति करण्यात आली.
तथा महाराष्ट्र इंटक अध्यक्ष कैलासभाऊ कदम यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेस चे सरचिटणीस दादारावजी डोंगरे उपस्थित होते.

        यावेळी बोलताना महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम म्हणाले की, आपण आपल्या कार्यक्षेत्रात संघटीत व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या न्याय हक्कासाठी व संघटना वाढीसाठी प्रयत्न करून संघटना वाढवाल तसेच महाराष्ट्र इंटकचा नावलौकिक वाढवाल असा इंटकच्या सर्व सदस्यांना विश्वास असल्याचे नमूद करत अरुण विरकर यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳... 
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Sunday, October 13, 2024

मोटारसायकल गोदापात्रात पडून कमालपूर बंधार्‍यात चौघे बुडाले



माळवडगाव :- 
श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीवरील कमालपूर केटीवेअर बंधार्‍यावरून शेतमजुरीची कामे आटोपून मोटारसायकलवरून घराकडे जात असताना एका वृध्द महिलेसह चौघे जण बंधार्‍यावरून पाण्यात पडून बुडाले. एकास वाचविण्यात मासेमारी करणार्‍या तरुणांना यश आले असून वृध्द महिलेचा मृतदेह सापडला आहे. अन्य दोघांचा रात्री उशीरापर्यंत शोध सुरू होता. शनिवारी दसरा सणाच्या दिवशीही पावसाच्या शक्यतेमुळे शेती कामे सुरूच होती. दिवसभर मोलमजुरीची शेतातील कामे आटोपून हे आदिवासी समाजातील मजूर सायंकाळी सुर्यास्तासमयी नदीकाठावरील घराकडे निघालेे होते.

मात्र कमालपूर बंधार्‍यावरून दुचाकी, चारचाकी वाहन चालविणे म्हणजे मोठी कसरत असते. बंधार्‍यालरील काँक्रिट खड्ड्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. सणाचा दिवस असल्याने घराकडे जाण्यासाठी उशीर झाल्याने घाईगडबडीत खड्ड्यांमुळे चालकाचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले. बंधार्‍यास लोखंडी कठडे नसल्याने मोटारसायकलसह चौघेजण बंधार्‍यातील पाण्यात भामाठाणच्या बाजूने पडले. सायंकाळच्या वेळी बंधार्‍यावरून तुरळक वर्दळ सुरू होती. आरडा-ओरड झाल्यावर स्थानिक लोक मदतीला धावले. श्रीरामपूर हद्दीतील बंधार्‍यावर पाटबंधारे कर्मचारी सोमनाथ शिरसाठ जवळच राहतात. ते घटनास्थळी मदतीला धावून आले. स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने सुरू झालेल्या मदतीने या चौघांपैकी मच्छिंद्र गोपीनाथ बर्डे (वय 25) याला वाचविण्यात यश आले. तर वेणुबाई मनोहर बर्डे (वय 70) या वृध्द महिलेचा मृतदेह सापडला. मात्र दिलीप सोमनाथ बर्डे (वय 30) व रवी सोमनाथ मोरे (वय 25) या दोघांचा रात्री 11 वाजेपर्यत शोध सुरु होता. मात्र त्यांचा शोध लागलेले नव्हता.

यावर्षी जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून यातील पाण्याचा फुगवटा कमालपूर बंधार्‍यापर्यंत आलेला आहे. त्यामुळे बंधार्‍यात मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. यामुळे बंधार्‍यात पडलेल्या तरुणांना शोधण्यात मोठी अडचण येत आहे. दरम्यान रात्री उशिरा ही शोध मोहिम थांबविण्यात आली. आज रविवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर येथील आपत्ती निवारण पथक येणार असून त्यानंतर दोघांचा शोध पुन्हा सुरु होणार आहे. बंधार्‍यात बुडालेले हे सर्व आदिवासी समाजाचे व कमालपूर गावातील असल्याने ग्रामस्थांसह आदिवासी बांधवांवर शोककळा पसरली आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================