राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, March 17, 2023

विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी दूध भेसळ करणाऱ्या ला फाशी देण्याचा कायदा करा ?

( मुंबई ) - प्रतिनिधि - वार्ता -
विधानसभा (Assembly) विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दूध भेसळीच्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधले. राज्यात दूध भेसळीची समस्या अत्यंत गंभीर झाली आहे. दूध भेसळीचे मोठे साम्राज्य पसरले असून, लहानग्या कच्च्या-बच्च्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार राज्यात सुरु आहे.
या प्रश्नावर विधानसभा विरोधी पक्षनेते  आक्रमक झाले असून त्यांनी सभागृहात याकडे लक्ष वेधले आहे. दूध भेसळ (adulterated milk) करुन सामान्य जनतेच्या जिवाशी खेळ करणाऱ्यांना फाशी देण्याची तरतूद कायद्यात करावी, अशी मागणी पवार यांनी केली.
आघाडी सरकारच्या काळात दूध भेसळ करताना सापडल्यास त्याला फाशीची शिक्षा करण्याची तरतूद करण्याचा कायदा प्रस्तावित होता. मात्र राष्ट्रपती महोदयांनी या कायद्याला परवानगी दिली नाही, याकडे पवार यांनी सरकारचे लक्ष
दरम्यान, दुधातील भेसळीचे प्रकार रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येतील. त्यानुसार 'आरे'तील कर्मचारी वर्ग हा अन्न आणि औषध प्रशासनाकडे वळवून दूध भेसळ रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील.
तसेच चालू काळात च तत्पर्त दूध भेसळ रोखण्यासाठी एक हेल्पलाईन तयार करण्यात येईल. जेणेकरुन या हेल्पलाईनवर ग्राहकांना दूध भेसळीबाबत तक्रार करता येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.




























चोरटे २४ तासांत पकडले कंपनीत चोरी करणारे ६ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त ?

(नगर ) - प्रतिनिधी - वार्ता - एमआयडीसीतील कंपनीचे स्टोअररुम फोडून ८१ हजार ७५० रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेणाऱ्या चोरट्यांना एम आय डी सी पोलिसांनी गुन्हा दाखल होताच काही तासांत दक्षता पूर्वक शिथाफिने पकडले असून, त्यांच्याकडून चोरीच्या साहित्यासह ६ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे एम आय डी सी तिल स्पेशालिटी एन्टरप्रायझेस कंपनीच्या स्टोअररुमचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश करत ८१ हजार ७५० रुपये किंमतीच्या प्लॅस्टिक दाण्याच्या गोण्या चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी राजू लक्ष्मण (रा. रेणावीकरनगर, सावेडी) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा सचिन टकाराम भगत (रा. सुपा ता. पारनेर) व पवन शंकर
जगताप (रा. शेंडी बायपास रोड, मोहिणीनगर, नवनागापुर ता. नगर) यांनी केला असल्याची माहिती स.पो. नि. राजेंद्र सानप यांना मिळाली. स.पो. नि. राजेंद्र सानप, स.फौ. रावसाहेब लोखंडे, संदिप खेंगट, मच्छिद्र पांढरकर, चांगदेव आंधळे, किशोर जाधव, सचिन हरदास यांच्या पथकाने दोघा आरोपींना पकडून त्यांच्याकडून चोरीला गेलेले साहित्य व त्यासाठी गुन्हयात वापरलेला टाटा कंपनीचा टॅम्पो जप्त केला असल्याचे समजते 






Thursday, March 16, 2023

धार्मिक कट कारस्थान तेढ सोशल मिडिया वरील निर्माण करणार्‍यांना जेलची हवा खावी लागेल आय.टी.अ‍ॅक्ट कलम.नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल पोलीस अधिक्षक ओला यांचा इशारा ?

(अहमदनगर) - प्रतिनिधि - वार्ता अनेक दिवसांपासून जिल्ह्यात धार्मिक कट कारस्थान तेढ निर्माण करणार्‍या विषयात वाढ झाली आहे. काही समाज कंटकांकडून सोशल  मिडिया व्दारे धार्मिक तेढ निर्माण करणारे व अफवा पसरविणारे आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केले जात आहेत. यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. अशा प्रकारचे संदेश कोणीही खात्री न करता सोशल मिडिया व्दारे प्रसारित करण्यात येऊ नये, अन्यथा सदर व्यक्ती विरूध्द माहिती व तंत्रज्ञान कायदा (I T Act ) अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी दिला.
जिल्ह्यात धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या घटना घडत आहेत. नुकतीच शेवगाव तालुक्यात तशी घटना समोर आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान काही समाजकंटकांकडून जाणिवपूर्वक सोशल मिडियाव्दारे धार्मिक तेढ निर्माण करणारे व अफवा पसरविणारे आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे. नागरिक सदर मजकुराची कोणतीही शहानिशा न करता सदरचे संदेश पुढे पाठवित असतात.
त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा व लोकांन चा गैरसमज पसरून कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक शांतता व सलोखा शिस्थ भंग होण्याची शक्यता निर्माण होत असते. कोणत्याही प्रकारच्या सोशल मिडियावरून (व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर इत्यादी) आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. नागरिकांनी ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा शिस्थ भंग प्रश्न निर्माण होईल अशा प्रकारचे संदेश कोणीही खात्री न करता सोशल मिडियाव्दारे प्रसारित करू नये, अन्यथा सदर व्यक्ती विरूध्द माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असा इशार अधिक्षक यांनी दिला आहे.
-----------------------------------------------------
सायबर क्राईम ब्रँच पोलिसांचा वाचिंग.
===================================

धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश सोशल मिडियावर खात्री न करता पुढे प्रसारित केले जातात. यामुळे तेढ निर्माण होत असल्याचे प्रकार घडत आहे. यावर येथील सायबर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. धार्मिक तेढ निर्माण करणारे अक्षेपार्ह चूकीचा संदेश पसरविणार्‍या सर्व प्रकारच्या सोशल मिडियावर सायबर पोलीस दक्षताने लक्ष  पुर्ण पणे ठेवून आहे. अधीक्षक राकेश ओला, अपर अधिक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक प्रतिक कोळी व त्यांची टिमचा सोशल मिडियायावर दक्षता ने ‘वॉच’ राहणार आहे.























Wednesday, March 15, 2023

डिजिटल व्हाईस रेकॉर्डर घेऊन झाला होता पसार 50 हजाराची लाच मागणी करणारा पोलीस अंमलदार अटकेत ?





(अहमदनगर) - प्रतिनिधी - वार्ता -
50 हजार रुपयांची लाच मागणी करीत असल्याला माप,पडताळणी दरम्यान पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने डिजिटल व्हाईस रेकॉर्डर घेऊन पळालेल्या पोलीस अंमलदाराला अटक करण्यात आली आहे. एकनाथ पंडित निपसे (वय 42) असे अटक केलेल्या अंमलदाराचे नाव आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी दिली
आहे.
गैर मार्गाने बाजारात विक्री केला जाणारा तांदूळ प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी पोलीस अंमलदार निपसे याने दुकानदाराकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याची तक्रार दुकानदाराने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. दरम्यान सदरची लाच मागणी पडताळणी पंचासमक्ष सुरू असताना अंमलदार निपसे हा डिजिटल व्हाईस रेकॉर्डर घेऊन पसार झाला होता.
त्याच्याविरूध्द देहरे (ता. नगर) येथील तक्रारदारांच्या फिर्यादीवरून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, भादंवि 392, 201 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना 16 फेब्रुवारी, 2023 रोजी कोतवाली पोलीस ठाणे परिसरात घडली होती. पसार अंमलदार निपसे याचा लाचलुचपत विभागाकडून शोध सुरू होता. दरम्यानच्या काळात त्याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटळण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा सरकारी वकिलांमार्फत न्यायालयात म्हणणे सादर केले होते. त्याच्या अटकपूर्व जामिनाला विरोध दर्शविला होता.

-----------------------------------------------------
====================================









Tuesday, March 14, 2023

श्रीरामपूर तालुक्यातील वळदगाव रस्ता : नागरिकाचे निवेदन विधान मंडळाचे अध्येक्ष कडे दाखल होणार ठेकेदार ने रस्त्याचे काम रेंगाळत ठेवले दंडात्मक कारवाई प्रस्ताव तुन मागणी ?


(अहमदनगर)-प्रतिनिधि-वार्ता - श्रीरामपूर तालुक्यातील वळदगाव ते नाऊर या रस्त्याचे काम ठेकेदारामुळे रखडले आहे. नागरिकांसह आमदारांनीही संबंधित ठेकेदाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याने ठेकेदाराविरुद्ध दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
टाकळमियों (ता. राहुरी) येथील महेश इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार संस्थेला हे काम मिळालेले आहे. गत ३१ मे रोजी या ठेकेदार नोंदणीकृत एजन्सी नावे कार्यारंभ आदेश देण्यात आला. एक वर्षात हे काम पूर्ण करावयाचे आहे आजमितीलाअडीचकिलोमीटर रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, कामनियमाप्रमाणे सुरू नाही, असाबांधकामविभागाचाचअभिप्राय आहे. या
-------------------------------------------------------
एका शेतकऱ्याचा मृत्यू रस्ता खराब असल्याने 
--------------------------------------------------------
=============================
शेतकयाला हृदयविकाराचा वासहोत असताना लवकरदवाखान्यात पोहोचविता आलेनाही. दुचाकीवरून याशेतकन्याला न्यावे लागले. त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतप्त भावना आहेत.
आमदार लहू कानडे यांनीही या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून संबंधितांची कानउघाडणी केली आहे. दरम्यान, श्रीरामपूर येथील बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी यांनी वरिष्ठांना अह
वाल पाठवून या ठेकेदार संस्था वेळेत काम पूर्ण करतील असे वाटत नाही, असा अभिप्राय दिला आहे. या संस्थेवर प्रतिदिन पाच हजार रुपये दंडाचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. दरम्यान, या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी होत आहे. काम लवकर पूर्ण न झाल्यास नागरिक  धरणे प्रदर्शन लोकशाई मार्गाने  त्रिव स्वरूपात करणार आहे.
-----------------------------------------------------
====================================

















बाल्मीकि मेहतर समाज के लिए कुछ सुझाव नरोत्तम चव्हाण (जेष्ट सामाजिक कार्यकर्ता) की ओर से विषेश विनंती के साथ ?

( पुणे ) - प्रतिनिधि - वार्ता -महाराष्ट्रशासन ने हमारे सफाई कामगारों के  प्रति एक जी. आर.   निकालकर  जो राजनीति खेलनी थी वह कर दी है *अब चिड़िया चुग गई खेत अब पछतावा करने से कोई फायदा नहीं है* कृपया जी.आर.के प्रति उलट-पुलट चर्चा व्हाट्सएप पर *बंद करें, अपना किमती वक्त इस काम में खर्च मत करें  कोई नया विचार हो तो दाल भी सकते हैं अभी आपको इस एक कलमी जी आर. में जो फायदा है वह उठा ले, समाज को जो लाभ पहुंचाना है  वह  पहुंचाने की कोशिश करें और शासन की ओर से अनेकों बातें रह चुकी है वह मा.मुख्यमंत्री जी तथा मा.उपमुख्यमंत्री जी के सामने रखकर उस पर निर्णय ले इसी में अभी हमारी भलाई/ विकास/ प्रगति/ शांति रहेगीॄ समाज के हित के लिए जो नियम (प्रस्ताव) बनाने के लिए सभी पक्ष के कार्यकर्ता,  राजकीय पक्ष में काम करनेवाले युनियन के कामगार नेताओं ने अपना अहम भाव छोड़कर एक *महाराष्ट्र स्तर के सिर्फ इसी विषय को लेकर सामाजिक मीटिंग में एकत्रित आकर अपना अपना एक जी.आर. के प्रती सुझाव रखे* सभी के योग्य प्रस्ताव इकट्ठा करके शासन के सामने रखी जाए तो सरकार भी अपनी बात मान सकेगा पुरे सरकार पर *महाराष्ट्र के सफाई कामगारों का दबाव रहेगा* ऐसा मेरा मत बहुत विचार मंथन के बाद आया है ,आगे आपकी मर्जी ! धन्यवाद......
  
      *नरोत्तम चव्हाण* 
*(माजी  अध्यक्ष भवानी पेठ हरका नगर पंचायत पुणे)*

टिप-- इसकी अगुवाई महाराष्ट्र के पंचायती कार्यकर्ताओं
ने तथा  बावनी पंचायत आदि ने की तो  एक अच्छा संदेश भी शासन की ओर जाएगा और महाराष्ट्र स्तर पर समाज एकत्रित आने के लिए तैयारभी रहेगा यह भी एक ऐतिहासिक काम होगा!








Monday, March 13, 2023

रस्ते कामकाज संदर्भ त्वरीत तांत्रिक मान्यता द्या आ.थोरात संगमेर ?


( संगमनेर  ) - प्रतिधी,- वार्ता - प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत महाराष्ट्रात अनेक रस्त्यांचे कामे सुरू असून संगमनेर तालुक्यातील मालदाड - सोनोशी ते चिंचोली गुरव, गुंजाळवाडी, राजापूर व इतर रस्त्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मात्र तांत्रिक मान्यता न मिळाल्याने काम सुरू होत नाही. तरी पावसाळ्यापूर्वी कामे सुरू होण्यासाठी तातडीने या कामांना तांत्रिक मान्यता द्यावी, अशी मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीद्वारे तांत्रिक मान्यते अभावी रखडलेल्या रस्त्यांच्या कामांना मंजुरीची मागणी करताना आमदार थोरात म्हणाले की, महाराष्ट्रात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा तीन अंतर्गत केंद्र सरकारकडून ४१२ रस्त्यांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यातील मालदाड- सोनोशी- बिरेवाडी- नान्नज दुमाला - चिंचोली गुरव आशा पीर बाबा चौफुली जिल्हा हद्द हा १९.१७ किलोमीटर लांबीच्या रस्त्याला १५ कोटी १६ लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे.
तर राष्ट्रीय महामार्ग ६० घुलेवाडी फाटा ते गुंजाळवाडी राजापूर- चिखली वरपे वस्ती या ११ किलोमीटरच्या रस्त्याला ९ कोटी ६२ -लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे. तसेच तिरंगा चौक संगमनेर नगरपालिका हद्द ते - मालदाड या ६ किलोमीटर रस्त्याकरीता ४ कोटी ३७ लाख रुपये मंजूर
आहेत. आणि दरेवाडी ते कवठे मलकापूर या ६ किलोमीटर रस्त्या करता ४ कोटी ६४ लाख रुपयांचा निधीस प्रशासकीय मान्यता आहे. या कामांच्या निधी मंजुरीस दोन महिने उलटून गेले. तरी या रस्त्यांच्या कामांना तांत्रिक मान्यता दिली नाही. त्यामुळे ह्या रस्त्यांची कामे रखडली आहेत.
पावसाळ्यापूर्वी हे कामे होण्याकरता सरकारच्या ग्रामविकास विभागाने तातडीने या रस्त्यांच्या कामांना तांत्रिक मान्यता द्यावी, अशी मागणी आमदार थोरात यांनी लक्षवेधीद्वारे विधानसभेत केली. यावर उत्तर -देताना ग्रामविकासमंत्री ना. गिरीश महाजन त्यांनी आजच तातडीने या रस्त्यांची रखडलेली तांत्रिक मान्यता देण्यात येईल, असे आमदार थोरात यांना सभागृहात आश्वासित केले.
-----------------------------------------------------
====================================


-----------------------------------------------------====================================
-विनम्र -निवेदन -सा :राज प्रसारित उत्तपत्र मध्ये सर्व  लेखनशी (संपादक )सहमत असेल असे  नाही. न्याय लय वाद नाशिक जिल्हा,न्यायलीन कक्षेत राहील...... 
-----------------------------------------------------
====================================