(नाशिक) - प्रतिनिधि - वार्ता - नवीन उद्योग येण्याला किंवा त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याला मनसेचा विरोध नाही. किंबहुना 'एमआयडीसीतील पडीक भूखंड, बंद कंपन्यांचे भूखंड; तसेच बेळगाव ढगा परिसरातील शेकडो एकर जागांचा पर्याय उपलब्ध असताना ते टाळून पांजरापोळच्या दोन-अडीच लाख वृक्षसंपदेची कत्तल होऊन उद्योग उभारले जाऊ नयेत. पांजरापोळच्या जागेचे औद्योगिकीकरण होऊ देणार नाही. वेळप्रसंगी त्यासाठी मनसे स्टाइल आंदोलन करावे लागले तरी करणार असल्याचा इशारा मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर आणि सरचिटणीस अशोक मुर्तडक यांनी
पत्रकार परिषदेत दिला.
सातपूर, अंबड उद्योग क्षेत्रानजीक येणाऱ्या पांजरापोळच्या हरीत जमिनीवर औद्योगिक आरक्षण आणण्यासंदर्भात भाजपाकडून प्रयत्न सुरू झाले असून, माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनीदेखील त्या भूमिकेचे समर्थन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर
-----------------------------------------------------
-----------------------------------------------------
-----------------------------------------------------
राज ठाकरे यांची नाशिकच्या काही पर्यावरणप्रेमी, नाशिक येथिल तमाम जनता ची मागणी पांजर पोळ हलवण्यात येऊ नये व त्या संदर्भ :हालचाली वर नासिक चे तमाम जनतेचा रक्त खवळा असून मनसे च्या आंदोलनास प्रतिसात सहभागी होऊन देण्याच विचार केला असल्याचे समजते तसेज नाशिक चे जुने जेष्ट वय उर्ध नागरिक यांच्या कडून सुद्धा सांगितलं जात पशु वर्धन पांजर पोळ श्री प्रभु राम चंद्र लक्ष्मण सीता माता वणवास भोगण्यास नाशिक च्या पंचवटी दिर्घ काळातील लाखोच्या संख्यातील नैसर्गिक उक्ष लागवड असलेले खुले थंड हवेचे ठिकाण हिरवट वन परिसरात आले असताना तेव्हाच्या प्राचीन काळा पासून पशु वरदान ठरले मुक्ये प्राण्याचे गाई माता गोरक्ष नंदी चे अनेक युगा पासून शांती पुजा प्रेरणाचे हिंदू संस कृतीचे प्रतीक आहे पांजर पोळ हलवने दुसरी कडे स्थालन करणे चुकीचा निर्णय असून निष्पाप प्राण्यांचे जीवाला त्रास देण्याचा व अत्याचार केलं सारखं उद्देश ठरेलं अशी कडीनिंदा होत असल्याचे समोर आले
-----------------------------------------------------
-----------------------------------------------------
-----------------------------------------------------
वनप्रेमींनी भेट घेऊन पांजरापोळ वाचविण्यासाठी साकडे घातले. त्यामुळे ठाकरे यांनी शुक्रवारी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून वस्तुस्थिती जाणून घेत भूमिका जाहीर केली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी शहराध्यक्ष दातीर यांनी एमआयडीसी'च्या क्षेत्रांमध्येच सुमारे २५० ते ३०० एकर जागा पडून असून, त्या जागेचा प्रथम
वापर करण्यात यावा, ही आमची भूमिका असल्याचे सांगितले. "एमआयडीसी'च्या जागा कंपन्या बंद पडल्या म्हणून बिल्डरांना विकल्या गेल्या आहेत. त्यासाठी सर्वप्रथम समिती गठित करण्याची मागणी करताना पांजरापोळसाठी गरज पडल्यास मनसे स्टाइल आंदोलन करण्याचा इशारा दातीर यांनी दिला. पांजरापोळची झाडे कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेत असल्याने त्यांची कत्तल कोणत्याही परिस्थितीत होऊ नये, अशीच आमची भूमिका असल्याचे सरचिटणीस मुर्तडक यांनी सांगितले, यावेळी सलीम शेख, पराग शिंत्रे, अंकुश पवार, मनोज घोडके, सुजाता डेरे आदी उपस्थित होते.
बेळगाव ढगामध्ये शेकडो एकर जागेचा पर्याय
उद्योगांना नवीन जमीन हवीच असेल तर बेळगाव ढगामध्ये खासगी स्वरूपाची २०० एकरहून अधिक जागा पडीक आहे. त्या जागेचा शेतीसाठीही वापर नसून तिथे झाडेदेखील नाहीत. त्यामुळे उद्योगासाठी जागा अधिग्रहीत करायचीच झाल्यास बेळगाव बरयाची जागा अधिग्रहीत करण्याची सूचना सलीम शेख यांनी केली. तर औद्योगिक हबसाठी नाशिकचा ऑक्सिजन हब उद्ध्वस्त होऊ देणार नसल्याचे पराग शित्रे यांनी नमूद केले.
============================================================================================================
कार्यकारी संपादक.भगवंत सिंघ प्रितम सिंघ बत्रा.शब्द.✍️✅️🇮🇳.रचना.संकलन...वार्ता.
============================================================================================================