राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, June 12, 2023

आंतरविद्याशाखीय विचार प्रवाह"हे पुस्तक संशोधन संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त ठरेल - ॲड.शरद सोमाणी

(बेलापूर) - प्रतिनिधि - वार्ता -

आंतरविद्याशाखीय विचार प्रवाह" हे पुस्तक संशोधन संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त ठरेल असे उद्गार बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव ॲड. शरद सोमाणी यांनी काढले. ते "आंतरविद्याशाखीय विचार प्रवाह"या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. ते पुढे असेही म्हणाले की,हे पुस्तक पुणे येथिल ज्ञानसूर्य प्रकाशनच्या संचालिका डॉ.उमा काळे यांनी प्रकाशित केले असून या पुस्तकांमध्ये एकूण ५५ शोधनिबंध लेखकांनी शोधनिबंध लिहिलेले आहेत. लेखक, संपादक ,सहसंपादक,प्रकाशक यांचे मी अभिनंदन करतो .या पुस्तकात अनेक वेगवेगळ्या विषयांवर लेखन झालेले आहे ते संशोधनाला अतिशय उपयोगी पडेल याची खात्री आहे " बेलापूर महाविद्यालयाचे "भाषा सामाजिक शास्त्रे आणि वाणिज्य विद्या व्यवस्थापन"या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्र नुकतेच संपन्न झाले होते. या चर्चासत्रात एकूण ५५ शोधनिबंध लेखकांनी सहभाग नोंदविला होता.याच शोधनिबंधाचे पुस्तकरुपात संपादन प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी केले, कार्यकारी संपादक म्हणून डॉ. मनोज तेलोरे यांनी काम पाहिले तर सहसंपादक म्हणून विभाग प्रमुखांनी कामकाज पाहिले आहे. या पुस्तकात अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर शोधनिबंध समाविष्ट आहेत.४६२ पृष्ठांच्या या पुस्तकातून अनेक संदर्भ अभ्यासक व संशोधकांना मिळू शकतील.या पुस्तकाचे प्रकाशन बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणपतलाल मुथ्था, सचिव ॲड. शरद सोमाणी, बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त श्रीवल्लभ राठी ,जेटीएस शिक्षण संकुलाचे प्रमुख बापूसाहेब पुजारी,प्राचार्य डॉ गुंफा कोकाटे,परीक्षा अधिकारी प्रा. प्रकाश देशपांडे ,प्रा.चंद्रकांत कोतकर प्रा.बाबासाहेब पवार, कार्यालयीन अधीक्षक संदेश शाहिर, भेर्डापूर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तांबे सर आदिंच्या शुभहस्ते हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))

ज्याचं घर गळतं, हे तर*** त्यालाच कळतं ! आश्वासने देत लोकप्रतिनिधी पुढं पळतं !!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*!! सचिव चे षटकारे अन् शब्दांचे फटकारे !!*

मित्रहो मागे कोरोना संकट काळात आपण चांगलं पाहिलं आणि अनुभवलं देखील असेल की,कोण कोणाच्या कामी येतो अन् कोण कोणाला साथ देतो ?, अशा अटीतटीच्या संकट समयी जेव्हा मदतीची नितांत आवश्यकता असते त्यावेळी कोणीच पुढे येत नाही,आणि कोणीच साथ देत नाही,अशावेळी कामी येतो तो केवळ शेजार धर्म, मग तो कोणत्याही जाती- धर्माचा का असेना तोच वेळप्रसंगी पुढाकार घेऊन वेळ प्रसंगी साथ देतो. मात्र ज्यांनी निवडणूक काळात मोठमोठी आश्वासने देवून मतं पदरात पाडून घेतली ते कधी ढुंकूनही पहायला तयार नसतात, परंतू निवडणूक लागली रे लागली की झोपी गेलेले हे संधी साधू भस्मासुर क्षणात जागे होतात, लगेच भेटीगाठी आणी आश्वासनांच्या खैरातींचा यांच्याकरवी अक्षरशः पाऊसच पडायला सुरुवात होते, मात्र ज्या पावसात ज्यांची घरं गळतात हे त्यांनाच माहीत असते की पावसाळा म्हणजे नेमका काय असतो ?, अशा भरपावसात जेव्हा एखाद्या झोपडपट्टीतील ग्रहस्थाचे घर गळते तो पानगागद/पुष्ठे/ प्लास्टिक लावून घरात येणाऱ्या पावसाच्या पाण्यास थांबविण्याचा प्रयत्न करत पावसाच्या पाण्यापासून आपला आणि परिवाराचा बचाव कसा करता येईल या प्रयत्नात असतो,पावसाळ्यातील रात्र ही त्यास अक्षरशः जागुनच काढावी लागते ही सत्य परिस्थिती आणि व्याथा आजही झोपडपट्टीतील अनेक घर/ कुटुंबांची आहे, आर्थिक परिस्थिती अभावी त्यांना पुरेसा आडोसा देखील उपलब्ध होवू शकत नाही ही वास्तविकता आहे,त्यावर आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडे कोणतीही नागरी समस्यां घेऊन गेल्यास त्या समस्यांचे निराकरण करणे तर सोडाच त्याऐवजी तो समस्या ऐकून घेण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करत पुढे पुढे पळतो आणि एकदा निवडून गेलेले काही लोकप्रतिनिधी हे पुन्हा पाच वर्षांपर्यंत आपल्या कार्यक्षेत्रात आपले मुखदर्शन देखील देत नाही की फिरकून /ढुंकूनही बघत नाहीत,अशा लोकप्रतिनिधींना निवडून देण्यापेक्षा मतदान न करता मत नाकारण्याचा (नोटा) अधिकार वापरला गेला पाहिजे तरच हे संधीसाधू लोकप्रतिनिधी ध्यानावर येतील आणि आपल्या कार्यक्षेत्रातील नागरी समस्यांकडे लक्ष देतील. क्रमशः
- सचिन भालेराव - श्रीरामपूर

*समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर*

Sunday, June 11, 2023

पोलिस अधिक्षक ओला यांची माहिती 83 सराईत गुन्हेगार होणार हद्द पार प्रस्ताव तयार ?

अहमदनगर - प्रतिनिधि - विशेष - समाचार -

गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या जिल्ह्यातील सुमारे 83 सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात येणार आहे. तसेच चौघांवर ‘एमपीडीए' कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अधीक्षक ओला यांच्या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
अलिकडच्या काळात जिल्ह्यात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या घटना सातत्याने घडत आहेत. याशिवाय खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, लुटमार, जबरी चोरीच्या घटना होत आहे. सराईत गुन्हेगार शस्त्राच्या धाकाने आपआपल्या परिसरात दहशत निर्माण करून सामाजिक शांतता भंग करत आहे. त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अधिक्षक ओला यांनी संबंधित पोलीस ठाणे प्रमुखांना दिले होते. पोलिसांनी अशा सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन अधिक्षक ओला यांच्याकडे प्रस्ताव सादर केले आहेत. सुमारे 83 गुन्हेगारांना हद्दपार केले जाणार आहे.
अधिक्षक ओला यांनी पडताळणी करून प्रस्ताव त्या त्या प्रांतधिकाऱ्यांकडे पाठविले आहेत. प्रांतधिकारी यावर निर्णय घेणार आहे. चार जणांवर महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले अधिनियम 1981 (एमपीडीए) नुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे. जिल्हाधिकारी यावर निर्णय घेणार आहे.
दरम्यान, सराईत गुन्हेगारांवर यापुढे देखील अशाच पध्दतीने कारवाई करण्यात येणार आहे. आणखी 50 हद्दपार प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून त्यावरही लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही अधिक्षक ओला यांनी सांगितले.





वाचन संस्कृतीसाठी 'ग्रन्थघर 'ही संकल्पना रुजावी प्रा.डॉ.सदाशिव कदम...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -

आजचे युग हॆ संगणकीय,भ्रमणभाषियआणि तंत्रप्रधान झाले आहे,अशा तंत्रात अडकून आजची मुले मूळ पुस्तकापासून दुरावत आहेत, त्यामुळे अनेक शारीरिक, मानसिक, बौद्धिक प्रश्न निर्माण झाले आहेत,त्यासाठी घरोघरी 'ग्रन्थघर 'ही संकल्पना रुजावी अशी अपेक्षा रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्रा. डॉ. सदाशिव कदम यांनी व्यक्त केली. 
   श्रीरामपूरजवळील शिरसगाव खेड्यातील इंदिरानगर भागातील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी २००६ पासून सुरु केलेल्या वाचन चळवळीला संशोधकीय, प्रबोधनात्म्क आणि उगवत्या पिढीला वाचन, लेखन,चिंतनाची जोड मिळावी म्हणून सुंदर, शिस्तीशीर आणि खुले वाचनालय सुरु केले,अशा उपक्रमाचे कौतुक करताना डॉ. सदाशिव कदम बोलत होते.यावेळी स्वाध्याय परिवाराचे सदस्य, परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांचे अभ्यासक, साहित्यिक माजी प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव, साहित्यिक सुखदेव सुकळे,महिला बचत गटाच्या सौ. मंदाकिनी उपाध्ये,मराठी ग्रामीण गेय कवितेच्या अभ्यासक, कवयित्री संगीता फासाटे, निर्मिक उपाध्ये, कु. आराध्या सैंदोरे व उपाध्ये परिवार उपस्थित होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक केले.डॉ. सदाशिव कदम यांची नुकतीच रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा अनेक पुस्तके, शाल, बुके देऊन उपस्थितांनी सत्कार केले.डॉ. सदाशिव कदम म्हणाले, श्रीरामपूरच्या बोरावके कॉलेजमध्ये हिंदी विभाग प्रमुख असताना कॉलेजकट्टा आणि अभ्यासिका माध्यमातून विद्यार्थी चोखंदळ वाचक होण्यासाठी उपक्रम घेतले. २००१ मध्ये ॲड, रावसाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्राचार्य टी. ई. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवशीय ग्रामीण कविसंमेलन घेतले,त्याला जिल्ह्यातून खूप प्रतिसाद मिळाला,संस्थेत असे साहित्यिक, वाचन संस्कृती जोपासणारे उपक्रम झाले तर मुले मोबाईल सोडून पुस्तक हाती घेतील. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी खेड्यात संशोधन आणि संस्कृती विकासाला पूरक ठरणारे सुंदर वाचनालय सुरु केले,हॆ भूषणावह आहे, असे डॉ. कदम यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. गागरे, सुखदेव सुकळे यांनी मनोगत व्यक्त केले. संगीता फासाटे यांनी सूत्रचालन केले. सौ. मंदाकिनी उपाध्ये यांनी आभार मानले.

(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))

स्टेट बँक आपल्या दारी या......शिबीर...उपक्रमाचा...अधिकाऱ्यांनी केला गौरव ?

शिरसगांव - प्रतिनिधि - समाचार -

अग्निपंख फाऊडेशन व सुमित फोटो जानकी एजन्सी यांच्या सौजन्याने तिसरा स्टेट बँक आपल्या दारी उपक्रम लोकाग्रहात्सव उंदीरगाव आऊटसाईड व हरेगाव या ठिकाणी राबवण्यात आला, शिबिरात ग्राहक सेवा संचालक नवनाथ शेलार यांनी नागरिकांमध्ये सरकारी योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा, अटल पेन्शन योजना,प्रधानमंत्री जनधन खाते यांचे महत्त्व नागरिक व तरुणांमध्ये सांगुन जनजागृती करण्यात आली.
या शिबिरामध्ये हरेगांव, उंदीरगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घेतला आणि अग्निपंख फाउंडेशन तर्फे आज ओपन केलेल्या खातेधारक लोकांना मोफत दोन लाखाचा अपघाती विमा काढून देण्यात आला. यावेळी शिबीरास भेट देण्यासाठी व्यवस्थापक एस.बी.आय‌.क्षेत्रीय व्यवस्थापन कार्यालय अहमदनगर महेश लगडे, जिल्हा समन्वयक संजीवनी विकास फाऊंडेशन,जिल्हा समन्वयक संजीवनी विकास फाउंडेशन अहमदनगर अमोल जवणे, जिल्हा प्रतिनिधी संजीवनी विकास फाऊंडेशन अहमदनगर साक्षी जवणे यांनी भेट दिली व उपक्रमाचे कौतुक केले.
हे खाते बचत गटातील महिला व पुरुष यांचेसाठी गरजेचे आहे.१० वर्षावरील मुले, मुली, विद्यार्थी ज्यांचेकडे आधारकार्ड आहे. ते सुद्धा या बँकेत नवीन खाते उघडण्यास पात्र असल्याचे बँक अधिकारी महेश लगडे यांनी सांगितले.यावेळी अग्निपंख फाऊंडेशनचे संस्थापक स्वप्निल पंडित,कार्याध्यक्ष महेश निकम यांनी मोलाचे सहकार्य केले.

(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे सख्ये भाऊ एलसीबी पोलिसांनी जकेले जे्रबंद ता.कर्जत येथील घटना ?

अहमदनगर - प्रतिनिधि - वार्ता -
राजु समशुद्दीन शेख (वय 31 ) व अजीज समशुद्दीन शेख (वय 28 दोघे रा. थोटेवाडी, दुरगाव, ता. कर्जत) अशी त्यांची नावे आहेत. अल्पवयीन मुलगी स्वयंपाक घरात काम करत असताना राजु शेख व अजीज शेख यांनी पाणी पिण्याचा बहाणा करून घरात प्रवेश केला. तिचे दोन्ही हात बांधून तोंडात रूमाल कोंबुन अत्याचार 
केला होता. यासंदर्भात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यापासून शेख बंधू पसार झाले होते. ते केडगाव चौफुला (ता. दौंड, जि. पुणे) येथे
असल्याची माहिती एलसीबीला (LCB) मिळाली होती.
पोलीस अधीक्षक ओला, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, अंमलदार बबन मखरे, सुनील चव्हाण, अतुल लोटके, रवींद्र कर्डिले, भिमराज खर्से, फुरकान शेख, रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, जालिंदर माने, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, उमाकांत गावठे यांच्या पथकाने सदर ठिकाणी शेख बंधूंचा शोध घेऊन वेशांतर करून त्यांना ताब्यात घेत अटक केली आहे.

5 - एस फाउंडेशन महाराष्ट्र की ओर से* * *महाराष्ट्र के बाल्मिक मेहतर समाज के हित चिंतक ?


 महाराष्ट्र के बाल्मिक मेहतर समाज के हित चिंतक एडवोकेट से विनंती है कि*कृपया आप महाराष्ट्र के कोई भी विभाग में/जिल्हे में कार्यरत होगे फिर भी समाज की औरंगाबाद हायकोर्ट में शासन के साथ जो लड़ाई चल रही है उसमें आप लोग पीछे रहना ठीक नहीं है।आप खुद ही लीड लेकर औरंगाबाद हाईकोर्ट के संबंध में मालूमात लेकर शासन के जी.आर.के संबंधी लाड+ पागे संबंध में समाज को फायदा मिलेगा ऐसी राह बता ये, अभी आपके मार्गदर्शन की‌ समाजको जरूरत है। कृपया आप खुद ही समझदार है आपकी संघटना निर्माण करे या स्वयं/ और समाज को सहकार्य करें । ऐसी हम प्रार्थना करते हैं। जो एडवोकेट समाज, युनियन, पंचायत, तरुण मंडल आदि के साथ है हम
उनके आभारी रहेंगे।

 आपका 
नरोत्तम चव्हाण
(अध्यक्ष 5-एस् फाउंडेशन)
महाराष्ट्र