राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, June 17, 2023

चार नवीन एसटीआगारांची होणार निर्मिती जळगाव जिल्ह्यात

जळगाव - प्रतिनिधि - वार्ता - पारोळा, बोदवड आणि भडगाव येथे चार नवीन बस आगारांची निर्मिती करण्याचे प्रयत्न सुरू असून या संदर्भात राज्य परिवहन खात्याने प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिल्या. ते राज्य परिवहन मंडख व परिवहन खात्यांच्या संयुक्त आढावा बैठकीत बोलत होते.
ना. गुलाबराव पाटील यांनी आरटीओ विभागाला जिल्ह्यातील अपघातप्रवण 70 ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत. तर यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून सर्वतोपरी निधी देण्यात येणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. पालकमंत्र्यांनी या दोन्ही आढावा बैठकांमध्ये दोन्ही खात्यांची माहिती जाणून घेत, संबंधीत अधिकाऱ्यांना विविध निर्देश दिलेत.
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकी घेण्यात आल्या. यातील पहिली बैठक ही राज्य परिवहन मंडळ अर्थात एस.टी. खात्याची झाली. यावेळी उपप्रादेशीक परिवहन अधिकारी शाम लोही, शाम लोही, विभागीय नियंत्रक भगवान जगनोर, विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, विभागीय अभियंता निलेश पाटील, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत सोनवणे, मोटार वाहतूक निरिक्षक सुनील गुरव, सौरव पाटील, हेमंत सोनवणे आदींचा समावेश होता. या बैठकीत ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील राज्य परिवहन खात्याची माहिती जाणून घेतली. यानंतर त्यांनी काही महत्वाचे निर्देश दिलेत. यात प्रामुख्याने प्रत्येक तालुक्यात एस.टी.चे एक आगार अपेक्षित असतांना जिल्ह्यात फक्त 11 आगार असून धरणगाव, भडगाव, बोदवड आणि पारोळा येथे एस. टी. डेपो नसल्याने असुविधा होत असल्याबाबत चर्चा झाली.
यावर पालकमंत्र्यांनी चारही ठिकाणी आगारांची निर्मिती करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असून यासाठी स्थानिक पातळीवरून प्रस्ताव तयार करण्यात यावेत, असे निर्देश दिले. यासोबत आषाढी एकादशीसाठी जिल्ह्यातील विविध आगारांमधून पंढरपूरसाठी विशेष बसेस सोडण्यात याव्यात असे निर्देश देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पासेससाठी अडचणी होऊ नयेत म्हणून याचे कार्यालय हे सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेपर्यंत उघडे रहावे असे ते म्हणाले. तर मोठ्या गावांमध्ये पासेस मिळण्याची व्यवस्था करण्यात यावी, असेही पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले
---------------------------------------------------
===================================
सह,संपादक रंजित बतरा शब्द...✍️✅️🇮🇳...रचना  संकलन वार्ता...
===================================
---------------------------------------------------

Friday, June 16, 2023

पत्रकारास मारहाण करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी पत्रकार संघाची मागणी श्रीरामपूर

श्रीरामपूर - प्रतिनीधि - वार्ता -
पत्रकार संघात हळहळ व खळबळ पत्रकार म्हणून गल्लीत वावरतो याचा रोष मनात बाळगून तसेच रस्त्याच्या मधोमध उभे केलेले चार चाकी वाहन बाजूला लावण्याचे सांगितल्याने स्मशान भूमी जवळ राहणाऱ्या तिघांनी पत्रकारास लोखंडी रॉड व दांडक्याने मारहाण केली,या घटनेचा महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला असून आरोपींवर आर्म ॲक्ट व पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कठोर शासन व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपूर येथील डावखर रोड परिसरात वास्तव्यास असलेले पत्रकार सलीम बाबुभाई पठाण हे अग्नि भ्रष्टाचार टाइम्स या वर्तमानपत्राचे संपादक आहेत तथा विविध वर्तमानपत्रात मुक्त पत्रकार म्हणून ते बातम्या देण्याचे काम करीत असून ते आपल्या भागात पत्रकार म्हणून वावरत  असल्याने याचा रोष मनात बाळगून तसेच रस्त्याच्या मधोमध लावलेले चारचाकी वाहन बाजूल करावे असे म्हटल्याच्या कारणावरून काही जणांनी डावखर रोडवर वास्तव्यास असणारे पत्रकार सलिम बाबुभाई पठाण यांना मारहाण केली. या घटनेचा महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्यावतीने निषेध नोंदविण्यात आलेला आहे. संबंधीत आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत  कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.
श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना पत्रकार संघाच्यावतीने संस्थापक अध्यक्ष बरकत अली शेख यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, सलिम पठाण हे डावखर रोड परिसर कॅनालच्या कडेला वस्तव्यास आहे. त्यांच्या घराकडे जाण्यासाठी व इतर नागरिकांसाठी कॅनॉलच्या कडेने रस्ता आहे. दि. ७ जूनच्या सायंकाळी पत्रकार श्री.पठाण आपल्या मुलासवेत कॉम्प्युटर टेबल घेऊन रिक्षाने आपल्या घरी जात होते. यावेळी सलिम अब्दुल शेख,बानो अब्दुल शेख, सुलताना मुस्ताक शेख यांच्या मालकीची गाडी ही रस्त्याच्या मध्येच लावण्यात आलेली होती. त्यामुळे पठाण यांनी भाडोत्री आणलेले (रिक्षा) वाहन पुढे जाणे शक्य नव्हते.
यावर सलिम पठाण यांनी सदरचे वाहन रस्त्याच्या बाजूस घेण्याची या तिघांनाही विनंती केली. परंतु या तिघांनीही वाहन तर बाजूला घेतलेच नाही, परंतु पठाण यांना शिवीगाळ करू लागले. तसेच" तू फार मोठा पत्रकार आहेस का ? आम्ही आत्ताच तुझी पत्रकारिता कायमची संपवितो" असे सांगून सलीम पठाण यास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू लागले असता पठाण यांनी शिवीगाळ करू नका, असे म्हटल्याचा राग आल्याने या तिघांनीही त्यांना लोखंडी रॉड तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करून सलीम पठाण यांचे वर चाकूने देखील वार केला असता, पठाण यांनी हा वार हूकविला या मारहाणीत सलिम पठाण जखमी झाले असून त्यांच्यावर साखर कामगार रूग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारा दरम्यान शहर पोलिस ठाण्याच्या अंमलदारांनी जबाबही नोंदवून घेतला. परंतु यास दहा दिवस उलटूनही अद्यापही संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे पोलिसांनी संबंधितावर  मारहाणीचा व आर्म ॲक्ट तसेच पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी पत्रकार संघाकडून मागणी करण्यात आली आहे.
संबंधित निवेदनाच्या प्रती पोलिस महानिरीक्षक (नाशिक), पोलिस अधिक्षक, अहमदनगर, अप्पर पोलिस अधिक्षक श्रीरामपूर, पोलिस उपअधिक्षक श्रीरामपूर यांना पाठविण्यात आलेल्या आहेत. निवेदनावर संघटनेच्या सर्व पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

*समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर*

'बिपरजॉय'चे थैमान,गुजरात राजस्थानमध्येहायअलर्ट ?

मुंबई - प्रतिनिधि - समाचार -
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासोबत गुजरात (Gujrat) राज्यात चिंतेचा विषय ठरलेले बिपरजॉय वादळ (Biparjoy cyclone) हे गुजरातच्या किनारपट्टी भागावर धडकले आहे. या वादळाची लँडफॉलची प्रक्रिया पूर्ण झाली असून किनारपट्टीपासून काही अंतरावर राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या चक्रिवादळाने गुजरात राज्यात हाहाकार माजवला असून आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या चक्रिवादळाने कच्छ आणि सौराष्ट्रात हजारो झाडे उन्मळून पडली आहेत. तर काही ठिकाणी मोबाईल टॉवर, विजेचे खांब आणि ट्रान्समिशनचे खांबही कोसळले आहे. हे तीव्र वादळ सौराष्ट्र- कच्छ प्रदेशावर घोंघावत असून शुक्रवारी ते ईशान्येकडे सरकण्याची शक्यता असून यामुळे राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यामुळे मानवी जिवीतहानी झाली नसली तरी आत्तापर्यंत २३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर २२ लोक यामुळे जखमी झाले असून चक्रीवादळ धडकण्याआधीच दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हे वादळ गुजरात किनारपट्टी भागात ताशी १४५ किलोमीटर वेगाने धडकल्याने या राज्यात मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळ बिपरजॉयने गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर विनाश केला आहे. चक्रीवादळामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस अजूनही सुरूच आहे. वादळामुळे सुमारे १००० गावे अंधारात बुडाली आहेत.
कच्छ, पोरबंदर, द्वारका, जामनगर, मोरबी, राजकोट, जुनागढ, वलसाड या गुजरातच्या भागांसह शेजारील दमण दीवलाही या वादळाचा जोरदार फटका बसला आहे. रात्री नऊ वाजेच्या सुमारास जखाऊ बंदरानजीक हे वादळ धडकले आणि त्याचा जमिनीवरचा प्रवास सुरु झाला. १२५ किमी प्रती तासाच्या वेगाने वारे वाहू लागल्याने या वादळाने विनाशकारी स्थिती निर्माण केली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हे चक्रीवादळ पूर्णपणे किनारपट्टी ओलांडून पुढे सरकले. दरम्यान वादळाच्या परिस्थितीवर केंद्र सरकारही लक्ष ठेऊन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: प्रत्येक घटनेचे अपडेट घेत असून उपाययोजनाच्या सूचना देत आहेत.
गुजरातमधून पुढे गेल्यावर ते राजस्थानमध्ये प्रवेश करेल.
यादरम्यान अनेक भागात १० ते २० सेमी पाऊस अपेक्षित आहे. हवामान खात्यानुसार, गुजरातसह दक्षिण-पश्चिम राजस्थानच्या अनेक भागात शुक्रवारी मुसळधार पाऊस पडेल. आज आणि उद्या काही भागात वादळाचा परिणाम राहणार आहे. या दरम्यान वेगाने वारे वाहतील आणि मुसळधार पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. रविवारी पूर्व राजस्थान, लगतच्या हरियाणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात पाऊस पडू शकतो.

---------------------------------------------------===================================
सह.संपादक रंजित बतरा...शब्द ✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...+919970331313
---------------------------------------------------




Thursday, June 15, 2023

जिल्हाधिकारी कार्यालय निर्णय अप्पर अधिक्षक जिल्हा अधिकारी कार्यालय हलविण्यास मुळेसंताप सर्वपक्षीय श्रीरामपूर बंदचीआवाज ?

श्रीरामपूर -  प्रतिनिधि - समाचार -
अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्यादृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा व्हावा अशी गेल्या अनेक दशकांपासून श्रीरामपूरकरांची मागणी असताना शिंदे-फडवणीस सरकारने शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो श्रीरामपूरकरांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे शनिवार दि. 17 जून रोजी श्रीरामपूर बंद पुकारण्यात हाक सर्वपक्षांच्यावतीने व श्रीरामपूरकरांच्यावतीने देण्यात आली आहे.
श्रीरामपुरात अप्पर पोलीस अधीक्षक, जिल्हा रुग्णालय, आर.टी.ओ. ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालयासोबतच प्रांताधिकारी कार्यालयाची भव्य प्रशासकीय इमारत अशा मोठ्य सुविधा उपलब्ध आहेत. श्रीरामपूरला मुबलक पाणी व मोठ्या प्रमाणावर शेती महामंडळाची जमीनही उपलब्ध आहे. पूर्वी शासकीय यंत्रणेने केलेल्या सर्व्हेनुसार श्रीरामपूर हे जिल्हाचे ठिकाण योग्य असल्याचे त्यांच्या अहवालात म्हटले आहे. त्याचप्रमाणे श्रीरामपूर जिल्हा व्हावा अशी अनेक वर्षापासून श्रीरामपूरकरांचीही मागणी आहे.
श्रीरामपूर हे सर्व तालुक्यांना सोईस्कर व मध्यवर्ती ठिकाण असूनही शिंदे-फडवणीस सरकारने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीला देऊन श्रीरामपूरकरांवर मोठा अन्याय केलेल आहे. त्यामुळे सर्व पक्ष गट-तट विसरून आम्ही 'श्रीरामपूरकर' म्हणून एकत्र येऊन श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी शिंदे- फडवणीस सरकारचा निषेध करणार आहेत.अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीला देऊन शिंदे-फडवणीस सरकारने श्रीरामपूरकरांच्या तोंडाला पाने पुसली असून सरकारच्या या निर्णयाचा तमाम श्रीरामपूरकरांनी बंदमध्ये सहभागी होऊन निषेध करणार आहे. दि. 17 जून रोजी सर्व श्रीरामपूरकरांनी कडकडीत बंद पाळावा, असे आवाहन श्रीरामपूर मर्चंट असोशिएशन तसेच सर्वपक्षियाच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------------------------------------------
===================================
: - राजु मिर्जा...शब्द🖊️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...+919730595775
===================================
---------------------------------------------------

अप्पर जिल्हाधिकारीकार्यालयाला हलवीणत्यास राजकीय- वर्तुळात घमासान विरोध / मंत्री विखे पाटील थोरात यांचे नाव न घेता टोला ?

अहमदनगर - प्रतिनिधि वार्ता -

शिर्डीतील नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय हे त्या भागातील लोकांच्या सोयीसाठी निर्माण केले आहे. त्याला विरोध होत असल्याचे आश्चर्य वाटते. जिल्हा विभाजन व अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय यांचा काहीही संबंध नाही. यापूर्वी जे महसूल मंत्री होते त्यांचे दायित्व काय होते. केवळ राजकीय रंग व हवा देण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न सुरू असल्याचा टोला महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावला.
मंत्री विखे पाटील गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले उपस्थित होते. मंत्री विखे पाटील म्हणाले, अधिकृत व अनधिकृत शाळांची यादी वृत्तपत्रांतून तसेच सरकारी पोर्टलवर प्रसिध्द करण्याबाबत शिक्षण खात्याला सूचना करणार आहे. अनधिकृत शाळांबाबत पालकांमध्ये जनजागृती करणे शिक्षणाधिकाऱ्यांचे काम आहे. सरकारने ठरवून दिलेली फी पालकांनी भरलीच पाहिजे. मात्र, जास्त फी घेणाऱ्या व अनधिकृत शाळांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
जिल्हा विभाजन व शिर्डीतील नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय यांचा काहीही संबंध नाही. जिल्हा निर्मितीचा हा निर्णय नाही, मात्र तो तसा चर्चेत आहे. पण उत्तर नगर जिल्ह्यातील पाच- सात तालुक्यांना विविध शासकीय कामांसाठी सोयीचे व्हावे, म्हणून शिर्डीत या कार्यालयाची निर्मिती केली आहे. श्रीरामपूरला या कार्यालयाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात मला राजकारण दिसते. ज्यांच्याकडे सात-आठ वर्षे महसूल मंत्री पदे होती, त्यांनी या सुविधेसाठी पावले उचलली नाही, शिर्डीच्या कार्यालयाच्या निर्णावर आंदोलनाची भाषा करणाऱ्यांनी कधीच भूमिका घेतली नाही, त्यामुळे श्रीरामपूरच्या आंदोलनात मला राजकारण दिसते, असे भाष्य माजी मंत्री थोरात यांचे नाव न घेता मंत्री विखे पाटील केले.
सरकारने जाहीर केलेल्या वाळू वाटप धोरणावर ते म्हणाले, या धोरणाचे जनतेने स्वागत केले आहे. 600 रूपये ब्रास दराने ज्यांना वाळू मिळाली ते समाधानी आहेत. मात्र, मागणी जास्त आणि पुरवठा यात मोठी तफावत झाली आहे. काळ्या बाजारात मिळणारी वाळू मुबलक होती. आता मात्र सरकारच्या डेपोला वाळू मिळणे अवघड झाले आहे. हे गणित अजूनही समजू शकले नाही. त्याबाबतची कारणे शोधण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. वाळू व्यवसायात अजूनही माफियांचा प्रभाव आहे. या किडलेल्या व्यवस्थेला सुधारण्यास थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल. असे असले तरी वाळू धोरणाची 100 टक्के अंमलबजावणी केली जाईल.बीआरएसचा महाराष्ट्र फरक पडणार नाही
काँग्रेसच्या जागा वाटपाच्या मुद्दयावरून ते म्हणाले, काँग्रेसचे अस्तित्व राहिले नाही. केवळ पुढाऱ्यांचे अस्तित्व या पक्षात राहिले आहे. राज्य सरकारमध्ये सर्वकाही आलबेल आहे. समान नागरी कायद्यासंदर्भात जी भूमिका पक्षाची आहे तीच माझी राहील. पक्षापेक्षा वेगळी भूमिका मांडण्याचे कारणच नाही. बीआरएस पक्ष महाराष्ट्रात येऊ पाहतो आहे. राजकीय ध्रुवीकरण चालूच राहणार आहे. या पक्षामुळे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर काहीही फरक पडणार नाही, असेही मंत्री विखे पाटील म्हणाले.'त्या' आमदारांना बरेच शिकायचे
आळंदीत वारकऱ्यांवर झालेला लाठीहल्ला गृहमंत्र्यांच्या आदेशावरून झाला होता, असा आरोप पारनेरचे राष्ट्रवादीचे आ. निलेश लंके यांनी केला होता. त्याबाबत ना. विखे म्हणाले, पारनेरच्या आमदारांना बरेच काही शिकण्याची गरज आहे. ते बालिश हरकती करत राहतात. ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांना दुसऱ्यांदा निवडून येण्याची इच्छा दिसत नाही. त्यांनी अशी बेताल वक्तव्ये थांबवली पाहिजेत, या शब्दांत पालकमंत्री विखे पाटील यांनी एका प्रकारे दमच भरला.









संशय येवू नये म्हणून वाहनात शेतीमालाचा दिखावा गुटख्याचे पिकअप वाहनाला अडवून एकाला बदडलेस ?

नाशिक - प्रतिनिधि - वार्ता -
चाळीसगांव शहराकडे गुटखा घेऊन येणाऱ्या पिकअपला अडवून पिकअपमधील एकाला मारहाण करीत, पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना काल रात्री खरजई रोड परिसरात घडली आहे. मारहाणीतील जखमीला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर गुटख्याने भरलेली पिकअप शहर पोलिसांनी ताब्यात घेत पुढील कारवाई अन्न व औषध प्रशासन करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
काल खरजई रस्त्याने चाळीसगांवकडे येणारा पिकअप एमएज १९ सीएक्स ००८ ही गुटखा घेऊन येत असल्याच्या संशयावरून खरजई रस्त्यावर या पिकअपला अडविण्यात आले. तिच्यात गुटखा असल्याने उपस्थित जमावाने गाडीच्या काचा फोडत गाडीतील कोतकर नामक व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. या गाडीवरील चालक मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. जख्मी कोतकर यासरुग्णालयात
 दाखल करण्यात आले, पोलिसांनी पिकअप ताब्यात घेतला असून पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे सोपविण्यात येणार आहे. आज दुपारी उशिरा पर्यंत अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी किंवा पथक चाळीसगांव येथे दाखल झालेले नसल्याने कार्यवाही करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे अधिक माहिती प्राप्त होऊ शकली नाही. गुटखा तस्कराने पिकअप मध्ये गुटखा असल्याचा संशय येऊ नये तो शेतीमालाची वाहतूक करणाराचा दिखावा, यासाठी केबिन वर शेतीमालाच्या जाळया ठेवल्या असल्याचे दिसून येते आहे.

---------------------------------------------------===================================सह.संपादक... रंजित बतरा...शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन  वार्ता...
===================================
---------------------------------------------------













एआरटीओ श्री.गणेश डगळे साहेब वयांचा वाढदिवस उत्साहात साजरा ?

💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -

येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.गणेश डगळे साहेब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी समता कॉमन सर्व्हिस सेंटर चे संचालक सरताज शौकत शेख यांनी श्री.डगळे साहेब यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि वाहन चालक, मालक संघटनेचे पदाधिकारी, यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी देखील वाढदिवसाप्रित्यर्थ यावेळी त्यांना शुभेच्छाही दिल्या,
श्री.डगळे साहेब यांनी श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी या आपल्या पदाचा कार्यभार संभाळल्यापासून कार्यालयात मोठ्या शिस्तीचे वातावरण निर्माण झाले असून कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या जनसामान्यांच्या विविध अडचणी क्षणात दूर होताना दिसून येत आहे,या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व्यतिरिक्त वरिष्ठ अधिकारी देखील कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या नागरीकांच्या समस्या जाणून घेत त्यावर योग्य सल्ला आणि निर्णय देत असल्याचे नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरणासह मोठी विश्वासहर्ता निर्माण झालेली आहे,
या कार्यालयाच्या प्रभारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती उर्मिला पवार यांच्याकडे अहमदनगर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा मुख्य कार्यभार असल्याने श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार देखील त्या अनेक महिन्यांपासून सुयोग्यरित्या संभाळत आहेत, तसेच श्री.डगळे साहेब देखील सुयोग्यरित्या आपला कार्यभार सांभाळत असल्याने श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात इतर कार्यालयाप्रमाणे कोणाचीच आडवणूक होत नसल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयास असेच शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी, कर्मचारी लाभल्यास जनसामान्यांच्या विविध आडचणी आणि समस्या दुर होण्यास जराही विलंब लागणार नाही हेच यानिमित्ताने अघोरेखित होते.