राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, August 26, 2023

*छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये* *बहिणाबाई चौधरी जयंती साजरी*

*ज्येष्ठ कवी शशिकांत पार्टेसह*
 *विद्यार्थ्यांनी केले काव्यवाचन*

सातारा-प्रतिनिधि-वार्ता -

येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मराठी विभागाने २४ ऑगस्ट २०२३ रोजी थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती विविध कार्यक्रमाने साजरी केली. बहिणाबाई यांची गाण्याचे गेय सादरीकरण ,गीतांचे वाचन मराठी विभागातील विद्यार्थी व प्राध्यापक यांनी केले. या जयंती कार्यक्रमासाठी काव्यवाचन कार्यक्रमास अमृतवाडी येथील  ज्येष्ठ कवी शशिकांत पार्टे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाने जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
 शशिकांत पार्टे यांनी बहिणाबाई यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत त्यांच्या वृद्धामृत कविता संग्रहातील विविध कवितांचे वाचन करून विद्यार्थ्यांना शब्दांची सृष्टी कवी कसा तयार करतो हे स्वानुभवातून सांगितले. 
  कवी शशिकांत पार्टे म्हणाले की ‘ बरचसं वाचलं म्हणूनच सुचलं,अन सुचलं म्हणूनच रचलं’ खेड्यातले जीवन मी पाहिले,दगड विटा माती चुली धूर स्वयंपाक, गाय म्हशी दुध ताक, या शेती या जगण्यातून माझी कविता तयार झाली. जवानीच्या काळात धबाधबीच्या ओढ्यात मासे खेकडे पकडत जे जीवन गेले, दुष्काळ ,गरिबी  त्याच्या आठवणी माझ्या कवितेत आल्या. ग्रामीण जीवनातला रस माझ्या कवितेतून वाहतो आहे असे ते म्हणाले. बहिणाबाई चौधरी यांना निसर्गाने ,धरित्रीने चांगले मन दिले त्यामुळे त्यांची कविता सात्विक विचाराची झाली असेही त्यांनी सांगितले. 
अध्यक्षीय भाषणात मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे म्हणाले की ‘ बहिणाबाई  या विचारी कवयित्री आहेत.  त्यांनी जीवनाचे तत्वज्ञान अतिशय सोप्या भाषेत सांगितले. जीवनात सुख ,दुःख येतच असते तरी देखील संसार हा आपल्या गळ्यातील हार आहे असे त्या सांगतात. माणुसकी त्यांच्या प्रत्येक कवितेत आहे. त्या ईश्वर मानत असल्यातरी दैववाद, भविष्य हे त्यांना मान्य नाही. निसर्गातूनच चांगले जीवन जगण्याची प्रेरणा मिळते असे त्यांचे मत होते. माणसाची नियत बेकार आहे, गोठ्यातले जनावर इमानदार आहे. स्वार्थापुरते लोक गोड बोलतात. वास्तविक नितीमत्ता चांगली हवी,व्यसन नको, कामातून देव प्राप्त होतो , म्हणून कष्ट करावे ,आळसी राहू नये , जन्माला आलो म्हणून आपण निर्मात्याविषयी कृतज्ञ राहिले पाहिजे ही भावना बहिणाबाई व्यक्त करतात. प्रेम ,आपुलकी ,सदाचार , दान करण्याची वृत्ती ,आपल्यात असली पाहिजे ,काळ कोणताही असला तरी निर्मळ जीवन जगण्याचा दृष्टीकोन बहिणाबाई यांना संत विचारातून मिळाला आहे. बहिणाबाई यांची गाणी म्हणजे निर्मळ असा झरा आहे. त्यांची कविता मनापासून जो समजून घेईल तो एक चांगला माणूस होईल असे ते म्हणाले 
           प्रारंभी बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. प्रारंभी प्रास्ताविक करताना मराठी विभागातील डॉ.कांचन नलवडे यांनी बहिणाबाई चौधरी यांची  चरित्रात्मक माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यांचे जीवन आणि त्यांच्या कवितेची निर्मिती याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. राही सोनावले , रोहन बोभाटे ,रचना बोराटे ,शुभांगी पवार ,सिद्धिका भोसले ,पलक जाधव ,पूजा बरकडे, इत्यादी विद्यार्थ्यांनी बहिणाबाई यांची गाणी सादर केली. प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी आपले मी भारतीय व संविधानाच्या स्वप्नातलं गाव  हे आपले कविता कवितासंग्रह   सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना भेट दिले. बहिणाबाई यांची गाणी गाऊन दाखवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजयकुमार सरगडे यांनी केले ,आभार प्रा.श्रीकांत भोकरे यांनी मानले.

===================================
---------------------------------------------------
*विशेष सहयोग*
प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये (सर)
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
===================================
---------------------------------------------------

Sunday, August 20, 2023

*माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती श्रीरामपूरात सद्भावना दिवस म्हणून साजरी*

 श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -

येथील कॉंग्रेस पक्षाच्यावतीने देशाचे दिवंगत पंतप्रधान भारतरत्न राजीवजी गांधी यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली.
या प्रसंगी काॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बॅंकेचे संचालक करणदादा ससाणे, माजी जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, कॉंग्रेस सेवादलाचे जिल्हा मुख्य समन्वयक मास्टर सरवरअली सय्यद,सेवादलाचे शहर अध्यक्ष रावसाहेब आल्हाट, अशोक जगधने, अल्पसंख्यांकचे नवाजभाई जहागीरदार, विद्यार्थी कॉंग्रेस चे सनी मंडलिक, कॉंग्रेस शहर चिटणीस नजीरभाई शेख़, सागर मगर,युनूस पटेल,सुरेश ठुबे, बुऱ्हाण जमादार तसेच सेवादलाचे व युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी कॉंग्रेस सेवादलाचे जिल्हा मुख्य समन्वयक मास्टर सरवरअली सय्यद यांच्यावतीने भारतीय संविधानातील तरतुदीनुसार सर्व जाती - धर्मातील एकता,समानता अबाधित रहावी अशी उपस्थितांना सद्भावनेची शपथ देण्यात आली.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

भोंदूबाबागिरी करून ठगाव नारे साधु च्या व्हेष्यात राहणारा धुळे पोलिसांनी केले गजाआड

धुळे - प्रतिनिधि - वार्ता -

शहरातील देवपूर भागातील नेहरू हाऊसिंग सोसायटीत राहणार्‍या सौ.किरण शेखर जडे (वय 42) यांच्याकडे अनोळखी भोंदू बाबा साधूच्या रुपात भिक्षा मागण्यासाठी व भविष्य सांगण्याच्या निमत् आला. तेव्हा त्यांनी भविष्य बघण्यासाठी त्याला घरात बोलवले. तेव्हा त्याने महिलेसह तिचे पतीला तुमचे सगळे चांगले करतो, असे सांगून हात चलाकी करून हातात कुंकू व तांदूळ घेऊन त्याची विभूती राख करून दाखविली. त्यानंतर मंत्र उच्चार करून महादेवाची छोटी पिंड प्रकट करून दाखवली व तुमच्याकडून मला काहीच नको, मी सोन्याची पूजा करून मंत्र जाप करून तुमचे परीक्षा घ्यायला आलो आहे, असे सांगून तुमच्या अंगावरील सोने द्या, सोबत नेणार नाहीत व संध्याकाळी जेवणासाठी तुमच्या घरी येतो. तुमच्या सोन्याची पूजा करून मंत्र तंत्र करून परत देतो व तुम्ही ते सोनं परिधान केल्यानंतर तुमचे सगळे कल्याण होईल व सुखी राहाल, असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर सौ.जडे यांनी भोंदू बाबाच्या सांगण्याप्रमाणे त्याच्याकडे सोन्याचे तीन ग्राम वजनाचे कानातील टाप्स व सहा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र असा एकूण 18 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने दिले व नंतर तो पळ काढलाय संध्याकाळी जेवणासाठी वाट बघितली परंतु तो आलाच नाही. याप्रकरणी सौ. जडे यांच्या तक्रारीनुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होता. पोलिसांनी सीसीटीव्ही वरून भोंदू बाबाचे फोटो मिळवून, त्याची माहिती काढली. तसेच मिळालेल्या तांत्रिक पद्धतीच्या माहिती प्रमाणे त्यास शोधून  देवपुरातील एकता नगरातून ताब्यात घेतले. भोंदू बाबाने त्याचे नाव नारायण किसन चव्हाण ( वय 35 रा.ओझर खुर्द, ता. जामनेर, जि. जळगाव) असे सांगितले. चौकशी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्हातील 18 हजारांचे सोन्याचे दागिने व दुचाकी असा एकूण 68 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे,सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर व त्यांचे डीबी पथकाचे अंमलदार पोलीस हवालदार पंकज चव्हाण, पोना. विश्वनाथ शिरसाट, पोलीस कॉन्स्टेबल किरण सावळे, सागर थाटसिंगारे, सौरभ कुटे यांच्या पथकाने केली.

===================================
---------------------------------------------------
: - उप,संपादक - आर डी बाविस्कर - शब्द...✍️✅️ 🇮🇳...रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------
===================================

मंदिरात चोरी करणारे पुणे-नगर जिल्ह्यातील चोर अटकेत

घारगाव - प्रतिनिधि - वार्ता -

पुणे जिल्ह्यातील नळावणे खंडोबा मंदिर व अहमदनगर जिल्ह्यातील अकलापूर येथील दत्त मंदिरात चोरी करणारे सराईत चोरट्यांना आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचेकडून 10 लाख रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे."

सचिन गंगाधर जाधव (रा. औरंगाबाद), किरण सुनिल दुधवडे (रा.अकलापूर, ता. संगमनेर जि. अहमदनगर), सुरेश पंढरीनाथ पथवे व सुनिल उमा पथवे (दोघेही रा. धामणगाव आवारी, ता. अकोले जि. अहमदनगर) व नवनाथ विजय पवार (रा. मांडवे, साकुर, ता. संगमनेर) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांच्यावर आळेफाटा, जुन्नर व घारगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये 9 गुन्हे दाखल आहेत.

जुन्नर तालुक्यातील नळावणे येथील खंडोबा मंदिर, रामेश्वर व जेजुरी लिंग मंदिरांत 19 जुलै रात्री साडे आठ ते 20 जुलै सकाळी साडे बारा वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दानपेटीसह अन्य साहित्य चोरून नेले होते. याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्या पथकाने तांत्रिकदृष्ट्या तपास करत औरंगाबाद येथील सचिन जाधव यास ताब्यात घेतले
त्यास विचारपूस केली असता वरील चार साथीदारांच्या सहाय्याने नळावणे व अकलापूर मंदिरांत चोरी केल्याचे कबुली त्यांनी दिली. त्यांचेकडून मंदिर चोरीतील घंटा, स्पिकर सेट, समई, आरतीचे ताट, पिंपळवंडी येथील अंगणवाडी चोरीतील टिव्ही युनिट, गॅस टाकी, शेगडी, गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी, एक चारचाकी असा एकूण 10 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अधिक तपास आळेफाटा पोलीस करतआहे

=================================
------------------------------------------------
: - संकलन - गझनफर पठाण - ✍️✅️🇮🇳...
------------------------------------------------
=================================




Saturday, August 19, 2023

जनतेचा रोष मतपेटीतून दिसला तरच रस्त्यांवरील खड्डे संपतील...... राज ठाकरे यांचे परखड मत कायदा नावाची काही गोष्टच राहिली नसल्याचे स्पष्टीकरण

पुणे - प्रतिनिधि - वार्ता -

लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देता ते तुमच्यासमोर खड्डे आणि इतर सगळे प्रश्न निर्माण करतात. तुम्ही प्रत्येकवेळी त्याच त्याच लोकांना निवडून देता. जातीच्या नावावर, कधी धर्माच्या नावावर कधी अजून काही. त्यामुळे हे प्रश्न खरपड पडले आहेत, सुटणारच नाहीत. जोपर्यंत लोकांमधील रोष मतपेटीत उतरत नाही, तोपर्यंत रस्त्यावरचे खड्डे बुजणार नाहीत, असे परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ठाकरे म्हणाले, पुणे शहर वाढले; परंतु शहराचे टाऊन

प्लॅनिंगच झालेले नाही. यामुळे पुणे शहरात १५ ते २० मिनिटांच्या प्रवासासाठी तासभर लागतो. टाऊन प्लॅनिंग मुंबईत इंग्रजांनी केलेले आहे. त्यानंतर आपल्या राज्यकर्त्यांनी शहरांचा आराखडाच केला नाही. यामुळे हे प्रश्न निर्माण झाले आहेत. आज पुणे कुठून कुठे पसरत आहे, निवडणुका कधी होणार?

राज्यातील अनेक महापालिकांमध्ये प्रशासक राज्य आहे. याबाबत राज ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, आपल्याकडे कायदा नावाची काहीच गोष्ट राहिलेली नाही. निवडणुका कधी होणार तर आम्हाला वाटेल तेव्हा होणार, असे सध्या राज्यात चित्र आहे. इतकी वर्षे काय बाकीचे कारण नव्हते का, असा प्रश्न यावेळी राज ठाकरे यांनी केला.
कोणालाच माहीत नाही. सध्या मतदार चाढवा, मतदान करून घ्या, बाकीचे गेले
खड्ड्यात, असे चित्र आहे. आजपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेक विषयांवर अनेकदा आंदोलने केली. पदरी काय पडले? जे महाराष्ट्राचे नुकसान करतात अशा लोकांना तुम्ही निवडून देता? मला याचेच जास्त आश्चर्य वाटते, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.
मनसेच्या वतीने सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीत आंदोलन सुरू आहे. कार्यकत्यांना सांगितले आहे की, सगळ्या ठिकाणी तोडफोड करण्याची गरज नसते. लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. मात्र, आक्रमकपणे महाराष्ट्र सैनिक उतरणार हे स्वाभाविक आहे, असे स्पष्ट मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

=================================
------------------------------------------------
: - उप,संपादक-अवकाश म्हेत्रे-शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
------------------------------------------------
=================================








कॉंग्रेस सेवादलाचे जिल्हा समन्वयक**मा.सरवर अली सय्यद यांचा सत्कार


श्रीरामपूर- प्रतिनिधि - वार्ता

कॉंग्रेस सेवा दलाचे मुख्य जिल्हा समन्वयक मास्टर सरवरअली सय्यद यांनी कॉंग्रेस सेवा दलाचे राज्यस्तरीय तथा राष्ट्रीय प्रशिक्षण शिबीर (एस.टी.सी. व एन.टी.सी.) यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल अहमदनगर जिल्हा कॉंग्रेस चे मा.अध्यक्ष तथा एडीसीसी बैंकेचे विद्यमान संचालक करणदादा ससाणे आणी कॉंग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

श्री.सय्यद यांची कॉंग्रेस सेवा दलाच्या प्रती असलेली निष्ठा ही अनेकांना एकनिष्ठतेचे उदाहरण देवून जाते,त्यांनी कॉंग्रेस सेवा दलामध्ये आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले असून कधी कोणत्याच मोह आणी पदाला त्यांनी महत्व दिले नाही, एकनिष्ठतेने सेवादलाचे कामे करणे,जनसामान्यांच्या ज्वलंत प्रश्नांचा निपटारा करणेकामी पुढाकार घेणे ही त्यांची तशी दररोजचीच कामे,अशी समाजसेवा आणी समाजसेवक आजकाल फार क्वचितच बढावयास मिळतात त्यातीलच एक समाजसेवक म्हणजे मास्टर सरवरअली सय्यद होय.
म्हणून अशा आपल्या स्वर्तृत्व आणी परोपकारी पारदर्शी कार्यांच्या बळावर श्री.सय्यद हे केवळ श्रीरामपूर शहर किंवा तालुकाच नव्हेतर जिल्हा आणी राज्यात सर्वांना सुपरिचित आहेत.
त्यांच्या या सत्काराप्रसंगी
कॉंग्रेस सेवा दलाचे नुतन तालुकाध्यक्ष शब्बीरभाई शेख, शहराध्यक्ष रावसाहेब अल्हाट, शहर कार्याध्यक्ष रफिभाई शेख,
सामाजिक कार्यकर्ते जमीलभाई शहा आदि मान्यवरांसह कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================


राष्ट्रीय जनरक्षा महासंघाचा श्रीरामपूर तहसील समोर उपोषण.




श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -

श्रीरामपूर येथील भुमी उप अधीक्षक कार्यालयातील मनमानी भोंगळ तसेच भ्रष्टाचार असा गैरप्रकाराबाबत नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमरण उपोषण आयोजित केलेले असून उपोषणास संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बाळासाहेब आगलावे हे उपोषणास बसलेले आहेत त्यांचे समर्थनार्थ संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री आप्पासाहेब वंजारे ,संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री युनुस पठाण ,केंद्रीय महासचिव श्री संजय हजारे ,संघटनेचे पदाधिकारी केशव आगलावे, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री अनिल कचरे अल्पसंख्याक प्रमुख आशिक सय्यद ,मुमताज शेख, असलम शेख, दलित पॅंथरचे प्रमुख तसेच एम आय एम चे जिल्हाध्यक्ष आदिल मुकद्दमी एडवोकेट मोहन सर इत्यादी मान्यवरांनी तसेच असंख्य नागरिकांनी जाहीर पाठिंबा केला आहे उपोषण काळादरम्यान पन्नास टक्के मागणी प्रमाणे अजून कार्यवाही करणे बाकी असून पन्नास टक्के पूर्ण होण्यासाठी आमरण उपोषण सुरू आहे.