राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, January 3, 2024

लोयोला सदन येथे स्नेह मेळाव्याने झाली नाताळ सप्ताहाची.....................सांगता !💐✅🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐


- श्रीरामपूर -  प्रतिनिधि - / वार्ता -
शहरातून बाळ येशुचा जन्म देखावा साकारत भव्य कॅन्डल मिरवणुक, कॅरल सिंगीग, भाविकांसाठी प्रायश्चित्त संस्कार, पवित्र मिसा बलिदान विधी, शहरी व ग्रामीण भागासाठी गव्हाण स्पर्धा, बायबल क्विज (प्रश्नमंजुषा) असे विविध धार्मिक कार्यक्रम घेऊन नाताळ सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.
या नाताळ सप्ताहाची सांगता नुकतीच लोयोला सदन येथे स्नेह मेळाव्याने करण्यात आली. दरवर्षी प्रमाणे याही वेळी धर्मग्राम स्तरावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अबाल वृद्धांपासून सर्वांनीच आपला कलाविष्कार दाखवत सहभाग नोंदवला. कलाकारांच्या अप्रतिम सादरीकरणाने त्या गुलाबी थंडीत ही कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढत गेली. दरम्यान भाविकांसाठी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी रेव्ह.फा.ज्यो गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन सेंट झेवियर्स हायस्कूलचे शिक्षक श्री. रविंद्र त्रिभुवन यांनी आपल्या ओघवत्या व बहारदार शैलीत केले.
हा संपुर्ण सप्ताह लोयोला धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरु रेव्ह.फा.ज्यो गायकवाड, सेंट झेवियर्स हायस्कूलचे प्राचार्य रेव्ह. फा.टायटस थंगराज, दिव्यवाणीचे डायरेक्टर रेव्ह.फा.अनिल चक्रनारायण, सेंट झेवियर्स टेक्निकलचे डायरेक्टर रेव्ह. फा.संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
वरील सर्व कार्यक्रम यस्वीतेसाठी सेवक प्रतिनिधी कमलाकर पंडित, रविंद्र त्रिभुवन, विजय त्रिभुवन, उत्तम गायकवाड, जाॅन धिवर, लाजरस गायकवाड, ललित गायकवाड, राकेश दुशिंग, प्रवीण सात्राळकर, संदिप साळवे , शोभा त्रिभुवन, लत्ता बनसोडे , बेनिग्ना पवार, सौ.निर्मला अमोलिक, पुष्पा साठे, विजया दळवी, सविता वाघमारे, सुवर्णा बोधक, संगीता पंडित, कनोसाच्या सिस्टर लुईजा गोन्सालवीस, सेंट लुकच्या सिस्टर रिटा व सिस्टर फातिमा ,सि जॅकलिन व युथ ग्रुप तसेच महिला मंडळ आदींनी परिश्रम घेतले.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर*
==============
*सहयोगी* - स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

भोकरला क्रांतीज्योती सावित्रीमाई.उत्साहात फुले जयंती साजरी................💐✅🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

- भोकर  - प्रतिनिधि -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर ग्रामपंचायत कार्यालय व सोसायटी कार्यालय येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून 192 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लोकनियुक्त सरपंच सौ. शितलताई पटारे व उपसरपंच सागर आहेर यांचे हस्ते तर विविध कार्यकारी सोसायटी कार्यालय येथे सोसायटीचे नवनिर्वाचीत चेअरमन आण्णासाहेब काळे व नानासाहेब जगदाळे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून स्त्री शिक्षणाची ज्योती क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांना विनम्र अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात प्रताप पटारे, सागर शिंदे, सम्राट माळवदे, पत्रकार चंद्रकांत झुरंगे, सुरेश अमोलीक, राहुल अभंग, मयूर काळे, गीरीष मते, संदिप गांधले, काळू गायकवाड, रावसाहेब लोखंडे, रमेश भालके, शंकर बेरड, पप्पू थोरात, सुनिल साळवे, सोमनाथ पंडीत आदिंसह मान्यवर उपस्थीत होते तर सोसायटी कार्यालय येथे गणेश छल्लारे, महेश पटारे, कारभारी तागड, बाळासाहेब विधाटे, भाऊराव सुडके, पप्पू थोरात, नारायण पटारे, बाबुराव तागड, नवनाथ मते, गोरक्षनाथ आबुज आदिंसह मान्यवर उपस्थीत होते.

*बॉक्स - १*
भोकर ग्रामपंचायत कार्यालय येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना पुष्पहार अर्पण करताना सरपंच सौ.शितलताई पटारे, उपसरपंच सागर आहेर, सागर शिंदे, सम्राट माळवदे, पत्रकार चंद्रकांत झुरंगे, सुरेश अमोलीक, राहुल अभंग, मयूर काळे, गीरीष मते, संदिप गांधले, काळू गायकवाड, रावसाहेब लोखंडे, रमेश भालके, शंकर बेरड, पप्पू थोरात, सुनिल साळवे, सोमनाथ पंडीत आदि दिसत आहेत.(छाया-पप्पू थोरात)

*बॉक्स - २*
भोकर सोसायटी कार्यालय येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना पुष्पहार अर्पण करताना चेअरमन आण्णासाहेब काळे समवेत नानासाहेब जगदाळे, गणेश छल्लारे, महेश पटारे, कारभारी तागड, बाळासाहेब विधाटे, भाऊराव सुडके, पप्पू थोरात, नारायण पटारे, बाबुराव तागड, नवनाथ मते, गोरक्षनाथ आबुज आदि दिसत आहेत.(छाया- चंद्रकांत झुरंगे,भोकर)

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार चंद्रकांत झुरंगे - भोकर*
============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन* ✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


चर्मकार संघर्ष समितीच्यावतीने ७ जानेवारी रोजीसंत गुरु रविदास महाराज प्रेरणा यात्रेचे आयोजन.💐✅🇮🇳...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

- शौकतभाई - शेख -/श्रीरामपूर -
चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रविवार दि. ७ जानेवारी २०२४ रोजी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज प्रेरणा यात्रेचे आयोजन करण्यात आले
 असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या यात्रेचे प्रस्थान श्रीरामपूर येथून होणार असून ती अहमदनगर मार्गे कात्रज, पुणे येथील संत रविदास महाराज तिसरे धाम या ठिकाणी संपन्न होणार आहे.
या यात्रेचे स्वरूप सामाजिक एकात्मता, सलोखा, प्रबोधन, समाजसेवा व समाजोन्नती व्हावी या हेतूने तसेच गुरु रविदास महाराजांचे समतावादी विचार समाजातील व तळागाळातील लोकांपर्यंत रुजले जावेत म्हणून समाजातील लोकांनी एकत्रितपणे प्रवास, सामाजिक स्थळ दर्शन व समूह भोजन करून
 सत्कार्याच्या प्रेरणेची लेन देन करावी अशी आहे. त्यामुळे या यात्रेबद्दल समाजातील लहान - थोरांच्या मनात आनंद व उत्साह असल्याचे दिसून येत आहे.
त्या उत्साहापोटीच या यात्रेतील यात्रेकरूंची श्रीरामपूर ते
पुणे या मार्गामध्ये सावेडी, अहमदनगर, दिल्ली
 गेट,केडगांव, चास, शिरूर,रांजणगांव व भीमा कोरेगांव
 तसेच पुण्यातील अनेक ठिकाणी जंगी स्वागत करण्यात
 येणार आहे.
चर्मकार समाजातील ही प्रथम यात्रा असून या यात्रेची
 सर्वत्र चर्चा तर होत आहेच शिवाय चर्मकार संघर्ष
समितीचे कौतुक देखील होत आहे. आज समाजाला
संतांच्या सदविचार व आचरणाची गरज असून ती
 जोपासली जावी तसेच संत रविदासांनी अंधश्रद्धा व
 रूढीगत अनिष्ट विचारांना थारा न देता समाजाची
 पिळवणूक करणाऱ्या व समाजाला अज्ञानाच्या खाईत लोटणाऱ्या समाजकंटकांचा तीव्र निषेध व विरोध केला व समाज जागृत करण्याचे महत्कार्य केले. हे अविरत समाज मनावर कोरले जावे हाच या यात्रेमागील मुख्य उद्देश असल्याचे चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष मा. शिवाजीराव साळवे यांनी सांगितले आहे.
कात्रज येथील गुरु रविदास यांचे भव्य मंदिर हे भारतातील तिसरे धाम असून चर्मकार समाजातीलच नव्हे तर प्रत्येक समाजातील व्यक्तीसाठी ही अभिमानाची बाब आहे. तसेच हे तिसरे धाम समाजातील अतिशय कमी लोकांना ज्ञात असल्यामुळे तिथे जाणाऱ्या समाज बांधवांची संख्या कमी आहे. या यात्रेमुळे समाजातील लोकांना प्रेरणा मिळून ते चर्मकार संघर्ष समितीचे
 अनुकरण करतील अशी आशा आहे. तसेच भावी काळातील गुरु रविदास महाराजांची जयंती सर्व समाज एकत्रितपणे याच ठिकाणी साजरी करेल तो दिवस एक स्वर्गीय सोहळा असेल यात शंकाच नाही. त्यामुळे मा. शिवाजीराव साळवे यांनी समाजातील सर्वच लोकांनी अशा एकापेक्षा एक यात्रेचे आयोजन करून आपली सामाजिक एकात्मता दर्शवावी असे आव्हान केले आहे. हे तिसरे धाम चर्मकार समाजाचे शक्ती पीठ म्हणून ओळखले जाईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
हे भव्य दिव्य तिसरे धाम निर्माण करण्याकरिता मा. सुखदेवजी वाघमारे महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली असून समाजातील प्रत्येक व्यक्ती त्यांचे आदराने अभिनंदन करून आभार मानत आहे.
तसेच ही यात्रा यशस्वी होण्यासाठी चर्मकार संघर्ष समितीतील सर्व महिला व पुरुष पदाधिकारी अतोनात कष्ट घेत आहेत हे सांगताना त्यांचा ऊर अभिमानाने भरून आले.


शिवाजीराव साळवे : - संस्थापक अध्यक्ष
चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य)

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


*जेटीएसचे ४१ वर्षानंतर* *भेटले जुने शालेय मित्र*


*अमन सय्यद - बेलापूर*
श्रीरामपूर - तालुक्यातील बेलापूर येथील जे.टी.एस. हायस्कूलमधील १९८२ बॅचच्या विद्यार्थ्यांची एकमेकांना भेटण्यास फार उत्सुक होते. त्या अनुसयाने दहावीच्या बॅचचे स्नेहसंमेनात जवळपास ६० ते ७० विद्यार्थ्यांनी ४१ वर्षानंतर आपल्या जुन्या मित्रांची भेट घेत पुन्हा शालेय जीवनाचा आनंद घेतला. येणार्‍या नवीन वर्षात एक नवा जोश सर्वांच्या मनामध्ये भरला व कार्यक्रमाचे जल्लोष हे नाव सार्थ झाले.
सध्या कुठे राहतात काय व्यवसाय कमरतात, असा संक्षिप्त परिचय करून देण्यात आला. सर्वांचे परिचय पूर्ण झाल्यानंतर सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनीनी मिळून ग्रुप फोटो काढण्यात आला. त्यानंतर पुन्हा सभेला सुरुवात होऊन उपस्थितांपैकी एकेकाने आपले मनोगत करून देण्यात आला. सर्वांनी आपल्या भाषणातून अशा पद्धतीने एकत्र येण्याची गरज व्यक्त केली व यापुढे
 वेळोवेळी भेटण्याची इच्छा व्यक्त केली सर्वात अध्यक्षीय भाषण रोहिणी जोशी यांनी केले.नियमाप्रमाणे दुपारी दोन वाजता जेवणाची सुट्टी झाली. सर्वांनी यथेच्छ भोजन करून अतिशय रुचकर भोजन व्यवस्था
 केल्याबद्दल संयोजकांना मनोमन धन्यवाद दिले.
थोडीशी विश्रांती घेऊन त्यानंतर पुन्हा दुपारचे सत्र चालू
 झाले. या सत्रात गप्पा गोष्टी गाणी इत्यादी सादर
करण्यात आले संगीता लखोटिया यांनी सुंदर गझल म्हटली. आलम शेख यांनी कविता सांगितली तर संजय शिरसाठ यांनी गवळण व अभंग सादर केले. कमल किशोर मुंदडा यांनी मित्राची गरज विशद करणारी सुंदर कविता सादर केली. त्यानंतर अंताक्षरीचा खेळ घेण्यात आला व आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना गिफ्ट पॅकेट व सर्वांची जन्म तारीख व पत्ते असलेले कार्ड देण्यात आले. त्याचबरोबर संजय लढढा यांच्या राजस्थानी गृह उद्योगतर्फे चकलीपीठ, अनारसे पीठचे फ्टि हम्पर देण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपात सुनीता थोरात यांनी एखादी ट्रीप काढावी अशी सूचना केली तसेच कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल संयोजकांचे व सर्वांचे आभार प्रदर्शन व्यक्त करून सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेछा दिल्या. त्यानंतर सर्वांनी स्टेज जवळ जमा होऊन गाण्यांच्या तालावर नाचण्याचा आनंद घेतला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इस्माईल शेख यांनी उत्तमरीत्या केले. त्यानंतर बटाटेवडा, चहा असे हाई टी घेऊन सर्व मंडळी आपापल्या घरी रवाना झाली. एकंदरीत या कार्यक्रमामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या अंगात जोश निर्माण झाला व कार्यक्रमाचे जल्लोष ८२ नाव सार्थक झाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कैलास चायल, गजानन डावरे, अनिल शेजुळ, प्रदीप देशमुख, रवींद्र करपे सतीश चायल, रोहिणी जोशी आवटी, गुणवंत मुथा यांनी प्रयत्न केले. सदर कार्यक्रमास पूर्वाश्रमीच्या शारदा चायल, ज्योती मुंदडा, सुनंदा नाईक, माधुरी नारद, विद्या साळुंखे, विद्या वैद्य, माया मुंडलिक, राजेंद्र राठोड, विलास पुंड, गोरख बोल्हे, भगीरथ चिंतामणी,राजेंद्र लखोटिया, नंदलाल लड्डा, बद्रीनाथ शर्मा, शिवाजी माळवदे, संजय शिरसाठ, सतीश माने इत्यादी सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
४१ वर्षानंतर जे.टी.एस. हायस्कूलमधील १९८२ बॅचच्या विद्यार्थ्यांची एकमेकांना भेटण्यास फार उत्सुक होते. आपण शाळेत पाहिलेले मित्र-मैत्रीण आता कसे दिसतात याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. रविवारी सगळ्यांचे आगमन झाले. आल्याबरोबर सगळ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर सर्वजण गेटवर जमा झाले. सर्वांचे बँडच्या मधुर सुरात गुलाबपुष्प व गिफ्ट देऊन स्वागत गावातील विद्यार्थ्यांच्या पत्नीकडून करण्यात आले. सर्वजण आपापल्या जागी स्थानापन्न झाल्यानंतर शाळेची जुनी प्रार्थनाया कुंदेंदू तुषार हार धवला म्हणण्यात आली. त्यानंतर दिवंगत शिक्षक व विद्यार्थी मित्र यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माझी विद्यार्थ्यांपैकीच एक शिरूर येथील शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका रोहिणी जोशी-आवटी यांच्या नावाची सूचना कैलास चायल यांनी मांडली त्याला अ‍ॅड. वाय. के. शेख यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर कार्यक्रमाच्या आयोजना मागची भूमिका, जल्लोषचे महत्व, व प्रस्तावना कमल किशोर मुंदडा यांनी मांडली. त्यानंतर उपस्थित असलेल्या त्या वेळेच्या शिक्षिका गोरे यांचे सर्व शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून प्रतिनिधीक स्वरूपात स्वागत व सन्मान करण्यात आला. त्याला गोरे यांनी मार्गदर्शनपर उत्तर दिले व सगळ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला. निरोप समारोपाच्या कार्यक्रमात वन डे ट्रीपचे छान नियोजन करा अशी आयोजकांवर जबाबदारी टाकण्यात आली. नवीन वर्षाच्या एकमेकांवर शुभेच्छा देऊन कार्यक्रम सोहळा उत्साहात पार पडला.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार गुलामरसुलभाई जहागीरदार अहमदनगर*
======
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

*मानवता आणि जगाच्या कल्याणासाठी येशू का भवन मध्ये प्रार्थना आणि नाताळ व नवीन वर्षाचा शुभ संदेश*


- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
श्रीरामपूर - हरेगाव दरम्यान हरेगाव फाट्यावर असलेले लोकसेवा प्रार्थना भवन "येशू का दरबार" या ठिकाणी सोमवार दिनांक ०१ जानेवारी २०२४ रोजी मानवता आणि जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करुन सर्वांना नवीन वर्षाचा शुभसंदेश देण्यात आला.
संपूर्ण विश्वाला प्रेम,दया, क्षमा व शांतीचा संदेश देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची जयंती व नवीन वर्षाचा संदेश देऊन आनंदी वातावरणात आणि मोठ्या उत्साहात तथा भक्तीभावाने साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम लोकसेवा प्रार्थना भवनचे संस्थापक पास्टर प्रशांत चक्रनारायण व सिस्टर प्राजक्ता चक्रनारायण यांच्या उपस्थितीत पार पडला. प्रभू येशू ख्रिस्ताचे जीवनाचे महत्व आपल्या किती महान आहे.यांचे महत्त्व भाविकांना पटवून सांगितले. याप्रसंगी शामराव जाधव दादा, एलिया जाधव,पुष्पा पठारे, विलास पठारे,सविता पठारे, भाऊसाहेब तोरणे,कानिफनाथ खवले,सारिका खवले, राजू शिंदे ,पूजा शिंदे संगमनेर,दुशिंग परिवार,राज बनसोडे , सृजन कदम,विश्वास थोरात, अमन पठारे,अभय पठारे,साळवे ताई इत्यादी इत्यादी प्रार्थना कार्यक्रमास उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार दीपक कदम - श्रीरामपूर*
==============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

*१ जानेवारी शौर्य दिनानिमित्त अस्तगांवमध्ये शूरवीरांना विनम्र अभिवादन कार्यक्रम संपन्न*


*अजीजभाई शेख / राहाता*
राहाता तालुक्यातील अस्तगांव याठिकाणी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान,एकता ग्रुप व समस्त अस्तगांवकर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने १ जानेवारी रोजी शौर्य दिन या सोहळ्याचे आयोजक एकता ग्रुप व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान अस्तगांव संस्थापक अध्यक्ष जॉन भाऊ त्रिभुवन व युवक कार्यकर्ते गौरव त्रिभुवन यांच्या विशेष पुढाकाराने या कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहाने आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अस्तगांव येथे भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ या प्रमाणेच हुबेहूब आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करून सुंदर असा विजयस्तंभ साकारण्यात आला होता,यासाठी गौरव त्रिभुवन व ग्रुपमधील सर्व पदाधिकारी,सदस्य यांचे मोठ्या प्रमाणात अनमोल सहकार्य लाभले.
यावेळी आर.पी.आयचे युवक जिल्हाध्यक्ष अध्यक्ष पप्पूभाऊ बनसोडे यांच्या हस्ते बौद्धवंदना घेऊन,फुले अर्पण करत शौर्य लढ्यातील शूरवीरांना मानवंदना देण्यात आली व त्यानंतर अस्तगांव बाजारतळ येथे जंगी मिरवणूक काढण्यात आली, यावेळी युवकांनी व महिलांनी मोठ्या जल्लोषात संगीताच्या तालावर ताल धरून नृत्य सादर केले.
यावेळी आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान व एकता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष जॉन भाऊ त्रिभुवन,आरपीआय शहराध्यक्ष महेश त्रिभुवन, गौरव त्रिभुवन,पप्पू खरात,भीमा त्रिभुवन, आर.पी.आय. युवक जिल्हा उपाध्यक्ष दीपक भाऊ शिंदे, सोहेल शेख,आकाश सोन्याबापु त्रिभुवन, प्रमोद त्रिभुवन,अविनाश त्रिभुवन, शमशुद्दीन शेख,जाकीर शेख,पप्पू शेख,समद शेख,अस्तगावचे पोलीस पाटील राजेश त्रिभुवन, माजी सभापती श्रीनिवास त्रिभुवन,आर.पी.आय. युवक तालुकाध्यक्ष जितू दिवे, चालक-मालक संघटना तालुका अध्यक्ष बाळासाहेब खाडे,ललित शेळके,अतुल बनसोडे,अश्फाक शेख, अजय सोनवणे,बापू बनसोडे,मयूर खडिझोड, ऋतिक त्रिभुवन,बबलू खरात,मुबीन शेख, श्रेयश त्रिभुवन,भिकाजी त्रिभुवन, ज्ञानेश्वर त्रिभुवन,सुमित त्रिभुवन, रवी सापते,ऋषिकेश त्रिभुवन,रुद्र त्रिभुवन,रवी त्रिभुवन,सुंदर त्रिभुवन, विजय त्रिभुवन, प्रकल्प त्रिभुवन, सौरभ त्रिभुवन, बाल्या त्रिभुवन,गौतम त्रिभुवन,भीम पारखे,राजू त्रिभुवन,नितीन त्रिभुवन,सागर त्रिभुवन,सागर पेटारे, आयान शेख,प्रशांत त्रिभुवन,सलीम शेख,हुजेफ शेख, विरेश त्रिभुवन,यश त्रिभुवन, सुनील सांगळे,रंजन त्रिभुवन,जितू त्रिभुवन, मिथुन संसारे, अण्णासाहेब त्रिभुवन, किरण त्रिभुवन, विशाल त्रिभुवन,पांडू त्रिभुवन,मोसिन शेख, विशाल शेख,आदिल शेख,प्रतीक खरात,तुषार सरोदे,सतीश मोरे,चाचा पडघलमल,आकाश गायकवाड,साहिल गायकवाड, सचिन खरात,यश गायकवाड, इरफान शेख,साहिल त्रिभुवन, सौरभ पवार, राहील शेख,अमन शेख, अतुल लोंढे, सिद्धांत कोळगे,गौतम खरात,आतिक शेख, शाहिद शहा,आफान शहा, शामवेल त्रिभुवन,अरबाज शेख, फरान खाटीक, मोबीन पठाण, शोएब शेख,उमर शेख,करण त्रिभुवन,संभाजी मेढे,जालिंदर गायकवाड, सत्यम जाधव,अजय सोनवणे,कृष्णा सोनवणे, सचिन सोनवणे,सुनील पवार,अमोल गायकवाड, संतोष गायकवाड, योगेश पारखे आदीसह मोठ्या प्रमाणात महिला भगिनी व अस्तगावकर ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे अध्यक्ष जॉन भाऊ त्रिभुवन यांनी आभार मानले व राहाता तालुका पंचक्रोशी मध्ये पहिल्यांदाच अशा भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्याबद्दल अस्तगावकर ग्रामस्थांच्यावतीने संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्याचे कौतुक देखील करण्यात आले.
=================================
-----------------------------------------------
*शाह मुश्ताकअली (मामु) राहाता*
============
*मार्गदर्शक:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================




पत्रकार - पैगंबरवासी मुख्तारभाई सय्यद यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन


*पत्रकार - पैगंबरवासी मुख्तारभाई सय्यद*
*यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन*

💐🙏 *भावपूर्ण श्रद्धांजली*🙏💐
🌸🌺🌼 *खिराजे अकिदत* 🌸🌺🌼

जो जन्माला आला त्यास परतून जाणे हे अटळ आहे,तथा मरण हे कोणालाच चुकलेले नाही, मनुष्य जरी जगातून जरी निघून जातो मात्र त्याची किर्ती ही अजरामर राहते.
राहुरी येथील आमचे स्नेही,परममित्र,पत्रकार, पैगंबरवासी मुख्तारभाई सय्यद यांचे कार्य देखील असेच आहे, सर्वांना आपल्या निर्पेक्ष मैत्रीच्या सानिध्यात ठेवणाऱ्या अशा दिलदार मित्राच्या अचानक निघून जाण्याने मित्रत्वाच्या जगतातील न भरुन निघणारी पोकळीक निर्माण झाली आहे,मात्र नियतीपुढे कोणालाच जाता येत नाही. दिवसामागुन दिवस जातात या म्हणी प्रमाणे खरोखरच त्यांच्या आपल्यातून जाण्यास ३ वर्ष उलटली असलीतरी आज मुखतारभाई आपल्यात नाहीत हे मानन्यास मन तयार होत नाही, मात्र सत्य हे जरी किती ही कटू असलेतरी त्याचा स्विकार हा करावाच लागतो ते नाकारुन चालत नाही आणी चालणारे ही नसते. आज दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी त्यांचे चौथे पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस (खिराजे अकिदत) विनम्र अभिवादन !

-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
अल्लाहतआला जन्नतूल फिरदौस (स्वर्ग) मध्ये त्यांना
 उत्तमातीउत्तम जागा देवो हीच अल्लाह चरणी प्रार्थना.
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^
=================================
-----------------------------------------------
- *शौकतभाई शेख (पत्रकार)*
समता फाऊंडेशन - श्रीरामपूर
तथा सर्व पत्रकार मित्र मंडळ
-----------------------------------------------
=================================