राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, March 6, 2025

रमजान मुबारक, 2025 रोजा नं :- 05, गुरुवार दिनांक 06-03-2025 '" रोजा इफ्तार करणं एक अदुतीय आत्मिक समाधान. "'

रमजान मुबारक, 2025
रोजा नं :- 05, गुरुवार दिनांक 06-03-2025
"' रोजा इफ्तार करणं एक अदुतीय आत्मिक समाधान. "'

प्रेषित ( पैगंबर ) मुहम्मद स्व. मांनी सांगितलं कीं, " जेव्हा तुम्ही रोजा इफ्तार कराल तेंव्हा खजूर नें इफ्तार करावे. कारण खजूर मध्ये बरकत आहे :, जर कदाचित तुमच्या कडे खजूर नसेल तर तुम्ही दिवसभराचा रोजा पाण्याने इफ्तार करावा " हदीस तिर्मिझी शरीफ ह. नं. 657).
आपण कालच बघितलं कीं, भोर पहाटे 4-5 वाजता उठून जे काही आपल्या हलाल ( कष्टा) च्या कामायितून आणलेल्या अन्न भोर पहाटे सेहरी ( सूर्योदय पूर्वी ) करून.. दिवस भर अल्लाह च्या मर्जी साठी घाम गाळून कष्टाची कमायी करून दिवसभर मोल मजुरी, नौकरी, व्यवसाय, व्यवहार करून, ते पण अल्लाह नाराज होणार नाहीं याचीच फक्त्त क्षण क्षणी, मिनिट नं मिनिट जाणीवपूर्वक काळजी घेऊन, दिवसभर पवित्र कुर आन शरीफ चे वेळ मिळेल त्यात्या वेळी वाचन करून, अल्लाह ची जपमाळा दिवस भर मोजून, फक्त्त साक्षी अल्लाह च आहेत हें समजून आपल्या हलाल कमायितून संध्याकाळी बाजारातुन आपल्या ऐपती प्रमाणे काही फळे, काही मेवे, गोड धोड आणून संपूर्ण बसून आपल्या दोन भावांनीही एक एक फळं चहो बाजूला -वर्तुळात घेऊन चिरत कुटुंबातील म्हातारी आई वडील, छोटीशी बहीण, भाऊ, लहान लहान चिमुकली मुलं व घरातील महिलांनी बनवलेलं भजीव तळलेलं पदार्थ, हो पुन्हा त्यामध्ये आजूबाजूला असलेल्या शेजाऱ्यांना ही पाठवून.. शेजारी व कोणी दुसराही रोजा धारक असेल तर त्याला सुद्धा काही शिदोरी सह इफ्तारी पाठवतात..
प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात कीं," जो कोणी व्यक्ती रोज दाराचं रोजा इफ्तार करील त्याला खूप जास्त सबाब ( पुण्य ) भेटेल, "
त्यावर काही मित्रांनी प्रश्न उपस्थित केला कीं, हुजूर ( प्रेषित ) मुहम्मद स्व. आमच्या पैकी एकाची ही परिस्थिती अशी नाहीच कीं आम्ही दुसऱ्याला रोजा इफ्तार साठी मदत करील.. ", त्यावर पैगंबर ( प्रेषित ) नी उत्तर दिले कीं, हें पुण्याचं काम गरिबातील गरीब ही करू शकतं," साधं घरातील पाण्याच्या एका घोट का त्याला दया ' फक्त्त तुमची मनापासून मानसिकता पाहिजे.. अल्लाह फक्त्त तुमच्या मानसिकता पाहत असतो".
तुमच्या छोट्या - छोटया शुल्लक गोष्टीची दखल अल्लाह घेऊन तुम्हाला साबब, ( पुण्य ) देत असतात कारण अल्लाह ( परमेश्वर)ला प्रत्येक जीवसृष्टी ची काळजी असते, प्रत्येकाला त्यालाच देणं आहेत.
प्रत्येकाला अल्लाह नाराज होऊ नयेत म्हणून अन्न फळं, पाणी खजूर देऊन. म्हणून जगात विविध सामाजिक संघटना,काही राजकीय पक्ष, किंवा काही श्रीमंत व्यक्ती, किंवा काही सामाजिक भान असलेल्या विद्यार्थी संघटना,, मंडळ, सामाजिक ग्रुप, इत्यादी विविध मस्जिद, रेल्वे स्टेशन, रेल्वे बोगीमध्ये, किंवा गल्ली गल्ली, रोड छोटया छोटया दाना मध्ये ही साबब आहेत म्हणून इफ्तार पार्टी ठेवत असतात.
सामुदायिक रित्या बसून अल्लाह कडे दिवसभारतील झालेल्या कळत नकळत चुकांची माफी मागून अल्लाह कडे दया याचना करुणा मागनी सह संपूर्ण विश्वचे शांती,समृद्धी आरोग्यासाठी,मग तो कोणत्याही धर्माचा का असेना त्या सर्व जगासाठी प्रार्थना दुवा करून सोडलेल्या उपवासाला " इफ्तारी " म्हणतात...
यामध्ये केवळ सामुदायिक एकात मता, सामुदायिक एकोपा, समता, परस्पर काळजी घेण्याची भावना, सहकार्य,ची आपोआप च भावना निर्माण होते. खरं तर अल्लाह व प्रेषित मुहम्मद स्व यांना रोज़े व सेहरी इफ्तारितून हेच अपेक्षित आहेत.. हिच खऱ्या इस्लामची शिक्षा -संस्कार,- संस्कृती आहेत..
म्हणूनच दिवसभर रोजा ठेवून घाम गाळून आणलेल्या रोजी नें इफ्तार करणं किती आत्मिक व शब्दातीत असेल...
एखाद्याला इफ्तार करून बघा, किती आत्मिक शांतता भेटेल.!"

( 🙏मित्रांनो लेख आवडला तर जरूर आपल्या मित्रांना नातेवाईकांना पाठवा..🙏 )

=================================
-----------------------------------------------
लेखक :- डॉ. सलीम साईदा सिकंदर शेख 
बैतुशशिफा हॉस्पिटल, मिल्लतनगर,✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर. जिल्हा :- अहमदनगर 
मोबाईल :- 9271640014
🌹🌹🌷🌷🌹🌹🌷🌷🌹🌹🌷🌷
-----------------------------------------------
=================================

Tuesday, March 4, 2025

रमजान मुबारक 2025रोजा नं. 04, बुधवार दिनांक 05-03-2025


रोजा :-!!" आपल्या कुटुंबा बरोबर सेहरी करणं एक वेगळाच अनुभव..अनुभवा...!!!
"सेहरी ( भोर पहाटे ) खाणं मध्ये तुमlची भलाईच आहेत " प्रेषित मुहम्मद स्व.
हजरत अनस बिन मालिक रजि. प्रेषितांचे मित्र ( सहाबा ) सांगतात की, आम्हाला प्रेषित मुहम्मद स्व. नी सांगितलं की, " तुम्ही सेहरी खात चला, तुम्हाला त्या खाण्याने बरकत आहेत ( सहीह बुखारी ह. नं. 1923)."
सकाळी (ब्राह्म वेळा )भोर पहाटे 4-30 ची वेळ असते, उठून सूर्योदया पूर्वी कष्टाच्या कमाई्तुन( हलाल )आणलेल्या अन्न धान्या तुन सकाळी अन्न ग्रहण करणं.
जैद बिन साबित रजि. हें प्रेषित्यांचे मित्र सांगतात की आम्ही प्रेषितान बरोबर रोजा ची सेहरी करून आम्ही नंतर सकाळची फर्जं (फजर )नमाज अदा केली आहेत. "
आपल्या भारतात एक म्हण फार प्रसिद्ध आहेत कीं, सकाळचा नास्ता राजा ( बादशाह ) सारखा खाणं, दुपारचं नेहारी सामान्य लोकां प्रमाणे करणं व रात्रीच जेवण भिकाऱ्या सारखं खाणं "
परुंतु ही म्हण काही अर्थी सर्वाना योग्य नाहीं होणार. असो.
सकाळी आपल्या सर्व कुटुंबाला बरोबर घेऊन आपल्या आयपतीप्रमाणे खाणं किती अविस्मरणीय अनुभव असेल.
संपूर्ण जगात उपवास ठेवण्याची प्रथा वेगवेगळी आहेत.. जसं हिंदूत चतुर्थी एकादशी, शिवरात्री किंवा काही उपवास दिवस भर काही प्रोटीन युक्त आहार व चहा पाणी घेऊन करतात तर काही निरंकारी करतात.. फक्त पोटभर खात नाहीत नंतर सध्याकाळी चंद्र दर्शन झाल्यावर रात्री पोटभर जेवन करून उपवास सोडतात, तसेच जैन व मारवाड भागातील राजस्थानी समाज उपवास काही दोन, काही तीन तर भरपूर दिवस आपल्या शारीरिक परिस्थिती बघून ठेवून दिवस भर अन्न पाणी काहीच अन्न पाणी न घेता संध्याकाळी 24 तासात फक्त्त एक ग्लास दूध- पाणी घेऊन पुढे उपवास चालू ठेवतात किंवा सोडतात. असो.
परुंतु इस्लाम मध्ये सकाळी सेहरी करून संध्याकाळी सूर्यास्ता नंतर लागलीच च सोडतात... जवळ जवळ 12-ते 14 तासांचा रोजा असतो परुंतु काही देशात रोजे 20-22 तासांचे ही आहेत. कॅनडा देशात 22 तासांचे रोजे आहेत.
रामजानुल मुबारक चे रोजे हे संपूर्ण महिना भराचे अल्लाह नें अनिवार्य ( फर्ज) केलेलं आहेत,
पवित्र कुरआन मध्ये अल्लाह आदेश देतात की, " हें श्रद्धांवनतांनो, आम्ही तुमच्यावर हें रोजे अनिवार्य ( फर्ज) करण्यात आले आहेत कीं, ज्या प्रमाणे तुमच्या अगोदर ( पूर्वज ) च्या प्रेषितांच्या अनुयायीवर अनिवार्य केले गेलेले होते :, यामुळे अशा आहेत की, तुमच्या मध्ये तकवा ( चरित्र मूल्य ) चे गुण उत्पन्न होतील, ( पारा नं. 01, सुरह बकराह अ. नं. 183.)
पवित्र कुर आन मध्ये अल्लाह नें आदेशच दिलेला आहेत त्याला कारण म्हणून जगामध्ये प्रत्येक मनुष्य हा चारित्र्यवाण शिलवान बनवणे, मानवातील सर्व प्रकारचं द्वेष मत्सर वाईट विकृती या नष्ट होव्यात, म्हणूच पवित्र कुर आन मध्ये अल्लाह सांगतात कीं तुमच्या मध्ये "तकवा " हें वाक्य फार महत्वाचं आहेत कीं चारित्र्य वाण शिलवान समाजाची निर्मिती करणं, समाज च्यारित्रवाण बनवणे यासाठी च मग कष्ट सोसण्याची थोडीफार सवय तर लागलीच पाहिजे.
म्हणून सेहरी मध्ये आप -आपल्या कुवतीप्रमाणे अन्न ची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे, व ती घेणं गरजेचं सुद्धा आहेत कीं तीस (30) दिवस तुमचा उत्साह, उत्सपूर्तता, स्टॅमिना हा टिकला गेला पाहिजे म्हणून अन्नाची प्रत्येक प्रक्रियेत लक्ष दिले गेले पाहिजे दिवस भर थकवा जाणवू नये म्हणून संतुलित पोषण युक्त आहार घेणं गरजेचे आहे. शरीर निरोगी राहिले पाहिजे, गर्मी उन्हाळा ची सुरुवात झाली आहेत, आपल्याला अजून त्याची सवय झालेली नाहीत, सवय होईस्तर त्रास हा होणारच असतो. म्हणून संतुलित व पोषण युक्त आहारासाठी कडघान्य, ओट्स, अंडी, मटन, मासे, दुध, दही, व्हिटॅमिन युक्त, प्रोटीन युक्त, कार्बहैद्राड, मिनरल्स आहार घेणं फार गरजेचे आहेत, बँककिंग, शिजवून घेतलेलं पदार्थ जास्त महत्वाचं आहेत, ज्यांनाच जास्त प्राधान्य द्यावा, 
रोजा मध्ये देहायड्रेशन होतं असतं तर त्यामुळे किडनी व इलेक्ट्रॉलाईट पातळी कमी होण्याची कधी कधी शक्यता असतं तर मिठा चं प्रमाण व पाण्याचे प्रमाण योग्य ठेवणं गरजेचं असतं 
सध्याच्या काळातील फास्ट फूड च्या नादी न लागलेलं बरं होईल,, कधी कधी त्या मध्ये चवी साठीच सिनथेठीक पदार्थ जास्त टाकलेलं असतात. म्हणून आपल्याला आपल्या शारीरिक व मानसिक व आर्थिक परिस्थिती नुसार नियोजन करून आपल्या शरीराची व आर्थिक काळजी जरूर घावी.
प्रेषित मुहम्मद स्व. नी सांगितलं कीं, सेहरी खाना बरकत है, अल्लाह नें तुम्हे नवाजा है तो सेहरी खाना कभी मत छोडो : सेहरी जरूर खाया करो. "..
पुन्हा आपण विचार कराल तर, सकाळी आपण आपल्या संपूर्ण कुटंबाबरोबर आपली चटणी भाकरी ची एकत्र सेहरी खाणं किती अविस्मरणीय अनुभव असेल ना??.
फक्त्त एकदा रोजा ठेवून अनुभव नें...
(मित्रांनो लेख आवडला तर आपल्या नातेवाईक व मित्रांना जरूर पाठवा, कृपया आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.)


=================================
-----------------------------------------------
लेखक :- डॉक्टर सलीम सईदा सिकंदर शेख 
बैतुशशिफा दवाखाना, मिल्लतनगर.
श्रीरामपूर ✍️✅🇮🇳...
जिल्हा :-अहमदनगर 
मोबाईल नं. 9271640014
 🌷🌷👍👍👌👍👍🌷🌷
-----------------------------------------------
=================================

नमाज - तारविहच्या एका -एका शब्द- वेळेचं सत्तर पटीने पुण्यांची ऑफर चा फायदा उचला


रमजान मुबारक २०२५ - रोजा नं.३
 कालच आपण अल्लाहच्या अलौकिक अदभूत उत्साहमय वातावरणात ज्या क्षणाची वर्षेभर आतुरतेने वाट बघत असतो अश्या रमजानुल मुबारक रोज्याची आरंभी आपण सर्व जगातील सर्वासाठी प्राणी जगासाठी निरोगी सुखरूप आरोग्य लाभों व जगात सुख शांती लाभों याची अल्लाहकडे दुवा प्रार्थना करून संध्याकाळी लागलीच फक्त रमझान मधील अधिक विशेष पुण्य प्राप्तीचं पर्व समजल्या जाणाऱ्या " तारविह "नमाज च्या तय्यारीला लागलो, दैनंदिनच्या ज्या पांच अनिवार्य (कॉम्पल्सरी ) वेळेच्या नमाज आहेत.
इस्लाम जे पांच महत्वाचं तत्व (फंडामेंतल प्रिन्सिपल) आहेत त्यामध्ये दुसरे महत्वाचं तत्व हें नमाज हें आपल्या हिंदी उर्दूत म्हणतात परंतु पवित्र कुरआन मध्ये त्यालाच 'सलात " म्हणतात आपण त्याला प्रार्थना म्हणू या, प्रत्येक धर्मात उपासनेची भक्ती करण्याची वेगवेगळ्या पद्धती आहेत, तशीच इस्लाम मध्ये नमाझ= नमाज, म्हणतात.आपण इंग्रजीत मेडिटेशन म्हणूया, परंतु हें मेडिटेशन मेंदू पासून सर्व शरीराची हालचाल करायची आहेत, संपूर्ण मन एकाग्रता करून फक्त्त अल्लाह (परमेश्वरा ) ची वंदना - बंदगी -मेडिटेशन सह व्यायाम करायचं आहेत, दिवसातून पांच वेळा. नमाजच्या वेळी आपल्या संपूर्ण शरिराची ठराविक पद्धतीने हालचाल करायची आहेत. नमाज नंतर " दुवा " प्रार्थना फक्त आपण स्वतः व अल्लाह यांचं नातं.. बस..
दैनंदिन म्हणजे रोज :- (1) फजर (भोर पहाटे ) = (सूर्योदया अगोदर 20 मिनटं पर्यंत ) 5-30 - ते 6 - 00 वाजेपर्यंत, (2) दुपारी जोहर 12 - 30 - ते 3 = 00 वाजेपर्यंत, (3) असर ( गोरज मुहूर्त, संध्याकाळी ) 4 - ते 6 - 0 ते - 30 पर्यंत सूर्यास्ता पर्यंत, (4) मगरीब - अर्थात सूर्यास्ता नंतर लगेच (5) रात्री 8 = पासून ते रात्री उशिरा पर्यंत. 
त्यानंतर ही अनेक ऐच्छिक (नफील) नमाजी आहेत. काही बंधू त्या जरूर अदा करतात.असो.
इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मुहम्मद स्व. यांना अल्लाह (परमेश्वरा ) नें आपल्या प्रेषितांच्या स्वर्ग (जन्नत) भेटीच्या दरम्यान "सलात " नमाज" अल्लाह नें बंदगी भक्ती साठीच भेट दिलेली आहेत. परंतु या दिवसभराच्या अशा वेळी ठेवलेल्या आहेत की, या वेळी जगातील बहुतेक लोकं किंवा जग हें आळसलेल्या अवस्थेत किंवा काहीतरी मानसिक - शारीरिक थकवा तरी जाणवलेलं असतं किंवा सध्या च्या काळातील बाजारात फिरण्याच्या वेळा असतात, यालाच आपण निगेटिव्ह एनर्जी ची वेळा म्हणूच या, अल्लाह नें मानवांना या वेळी स्फूर्थी - उत्साह यावं - ताजगी यावी व मनाला - शरीराला शांती लाभावी तसेच स्फूर्ती,चैतन्य वाटावे म्हणून कदाचित अल्लाहनें आपल्या वंदना साठीच या वेळेची अखणी केलेली असावी. असो.
त्या व्यतिरिक्त रमजान महिन्यातील स्पेसिअल खास तारविह नमाज, रात्री ईशा नमाज ला जोडूनच तास दिड तासाची 20 वीस रकाअत, संपूर्ण 30 दिवसात एक ते दोन वेळा पवित्र कुरआन म्हटलं जातं, तसं पहिलं तर प्रत्येक नमाज मध्ये पवित्र कुरआन पठण करणं अनिवार्यच असतं परंतु तारविह नमाज मध्ये रोज दीड ते दोन अध्याय (para) च पठण होतं. 
पवित्र कुरआन हें प्रेषित ( पैगंबर ) मुहम्मद स्व. यांना अल्लाह नें हजरत जिब्राईल ( जिब्रोल्टर ) अलै.या आपल्या विशेष दुता मार्फत २३ वर्षात आपल्या दैनंदिन काळानुरूप व गरजानुसार समस्त जगाला एक मार्गदर्शक पवित्र ग्रंथ पाठवला, त्यामध्ये (6666) सहा हजार सहासे साहशस्त आयती (स्लोक, ओव्या ) ११४ सुरह आहेत, ३० अध्याय (पारा) आहेत. त्यामध्ये मानवाच्या प्रत्येक गरजेनुसार गरजेसाठी मार्गदर्शक केलेलं आहेत. दीव्य कुरआन हें कायम वर्तमान व भविष्यात सुध्या वेळोवेळी मार्गदर्शक करेल, अधुनिक तांत्रिक युगात व भविष्यात घडणाऱ्या घटनांचे सुद्धा काळानुसार नूरूर्पण व मार्गदर्शन करेल. कविनी, साहित्यकानी अभ्यास केलेत की ते कोणत्याही अलंकारात यमक मध्ये फिट बसत, हजारो वेळी वाचलं की कायम काहीतरी नावं नवीनच शिकायला भेटते.
१४५६ वर्षात असंख्य वैज्ञानिकानी प्रयोग संशोधन करून बघितलं परंतु काळाच्या कसोट्यात पवित्र कुरआन कायम सिद्ध झाले आहेत. असो 
हेच पवित्र कुरआणातील प्रत्येक आयतीच -स्लोक- शब्द न शब्द मोठमोठ्यांनी अलंकारिक पद्धतीने म्हटलं जातं त्यावेळी कानाला मनाला एक प्रकारचे सुखद वाटतेय.म्हणूनच काहीतरी वेगळं एकण्याचं आनंद भेटतोय. तेच मनाला स्पर्शसून जातात.
म्हणूनच प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात की, " इतर वेळेपेक्षा रमजान मधील प्रत्येक गोष्टीच पुण्य इतर वेळे पेक्षा सत्तार पटीने जास्त भेटतात "
म्हणूनच या रमजानुल मुबारक क्षणाचा शब्द न शब्दाचा सबाब ( पुण्य ) तुम्हाला जरूर भेटेल.
सध्याच्या भाषेत ऑफर आहेत की एकाला सत्तर ची तर जरूर या पवित्र ऑफर ( संधी ) चा फायदा उचला.
(मित्रांनो लेख आवडल्यास माहिती साठी आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा, आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा)



=================================
-----------------------------------------------
लेखक - डॉक्टर सलीम साईदा सिकंदर शेख ✍️✅🇮🇳...
बैतुशशिफा दवाखाना, श्रीरामपूर जि.अ.नगर
 9271640014
-----------------------------------------------
=================================

आईच्या मायेने शिकविणारे शिक्षक खरे शिल्पकार - डॉ. वंदना मुरकुटे


असबाक ट्रस्ट व समर् फाउंडेशन तर्फे शिक्षक पुरस्कारांचे वितरण; शिष्यवृत्ती व अधुरी तखलीक पुस्तकांचे प्रकाशन

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 मातृभाषा ही आईची भाषा असते आणि आईच्या मायेने शिकविणारे शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार आहेत. आज ज्या शिक्षकांचा गुणवंत शिक्षक पुरस्कार म्हणून गौरव करण्यात आला त्यांचे कार्य ऐकल्यानंतर निश्चितपणे उर्दू शाळा मधून सुद्धा समाज निर्मितीसाठीचे बाळकडू दिले जातात हे आनंदाची बाब आहे. समाज घडविणाऱ्या शिक्षकांचा गौरव होताना मनस्वी आनंद होतो असे प्रतिपादन पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी केले.
असबाक पब्लिकेशन पुणे, समर फाउंडेशन मालेगाव, मावा एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट अहमदाबाद व अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या शिक्षकांना उर्दू सप्ताह निमित्ताने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर मुरकुटे बोलत होत्या.अध्यक्षस्थानी समर्थ फाउंडेशन मालेगाव चे अध्यक्ष शिक्षण तज्ञ डॉ. अशफाक ऊमर हे होते.नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप,उर्दू साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सलीमखान पठाण, सचिव आबीद खान, लेखक अजमत इकबाल, शाहीन शेख आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी सांगितले की उर्दू भाषा मला फार कळत नसली तरी ती ऐकायला मात्र गोड असते आणि उर्दूची नजाकत ही माणसाला वेगळ्या विश्वात घेऊन जाते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अशफाक उमर यांनी समर फाउंडेशन व मावा एज्युकेशन ट्रस्ट यांच्या कार्याचा परिचय यावेळी करून दिला.उर्दू माध्यमातील विद्यार्थी सुद्धा यूपीएससी व एमपीएससी मध्ये आले पाहिजे स्पर्धा परीक्षेमध्ये मुस्लिम समाजाचे विद्यार्थी येण्यासाठी दोन्ही ट्रस्ट कार्यरत असून त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्ह्यातील मोहम्मद उमर बागवान (खासदार गोविंदराव आदिक ऊर्दू हायस्कूल श्रीरामपूर), अनिस मेहमूद शेख (मुख्याध्यापक जि प शाळा ममदापूर),सौ. नसरीन इनामदार (उपशिक्षिका, नगरपालिका शाळा क्रमांक ५,श्रीरामपूर),शेख जमीर अहमद याकूब (तंत्रस्नेही शिक्षक, जि प शाळा बेलापूर), हुसेनाबानो फारुक पटेल (पदवीधर शिक्षिका, जि प शाळा अशोक नगर), लेखिका महेरुन्निसा अब्दुल्लाह खान (उपशिक्षिका जि प शाळा राहाता), रुबीना ख्वाजा खान (उपशिक्षिका,जि प शाळा,शिरसगांव), मोमीन हुसेन बादशाह महमूद (मुख्याध्यापक जि प शाळा खर्डा,जामखेड),शेख आफरीन मोहम्मद (मुख्याध्यापिका, जि प शाळा समनापुर, संगमनेर) व शेख नाजेमाबेगम नवाब (उपशिक्षिका जि प शाळा सोनई,नेवासा) यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.सर्व पुरस्कार तीन सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रास्ताविक उर्दू साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सलीमखान पठाण यांनी केले.परिषदेच्या सदस्या नर्गिस इनामदार, मोहम्मद उमर बागवान, अजमत इकबाल सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी अझमत इकबाल यांच्या अधुरी तखलीक व मेहरून्निसा खान यांनी लिहिलेल्या नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षा गाईड या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहम्मद बदर यांनी केले तर आभार इमाम सय्यद यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एजाज चौधरी,साजिद कुरेशी,राजे खान,हारुण अब्दुल्ला, एजाज शहा, मतीन मणियार, जुनेद शाह, अमरीन पठाण,महेवीश पठाण आदींनी विशेष परिश्रम घेतले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Monday, March 3, 2025

रमजान मुबारक 2025,रोजा नंबर :-:03 मंगळवार -04-03-2025

विषय :- नमाज --तारविहच्या एका -एका शब्द- वेळेचं सत्तर पटीने पुण्यांची ऑफर चा फायदा उचला.
कालचं आपण अल्लाहच्या अलौकिक अधभूत उत्साह मय वातावरणात ज्या क्षनाची वर्षेभर आतुरतेने वाट बघत असतो अश्या रामजानुल मुबारक रोज्याची आरंभी आपण सर्व जगातील सर्वासाठी प्राणी जगासाठी निरोगी सुखरूप आरोग्य लाभों व जगात सुख शांती लाभों याची अल्लाह कडे दुवा प्रार्थना करून संध्याकाळी लागलीच फक्त्त रमझान मधील अधिक विशेष पुण्य प्राप्तीच पर्व समजल्या जाणाऱ्या " तारविह "नमाज च्या तय्यारीला लागलो, दैनंदिनच्या ज्या पांच अनिवार्य( कॉम्पल्सरी ) वेळेच्या नमाज आहेत.
इस्लाम जे पांच महत्वाचं तत्व (फंडामेंतल प्रिन्सिपल) आहेत त्यामध्ये दुसरे महत्वाचं तत्व हें नमाज हें आपल्या हिंदी उर्दूत म्हणतात परुंतु पवित्र कुरआन मध्ये त्यालाच 'सलात " म्हणतात आपण त्याला प्रार्थना म्हणू या, प्रत्येक धर्मात उपासनेची भक्ती करण्याची वेगवेगळ्या पद्धती आहेत, तशीच इस्लाम मध्ये नमाझ= नमाज, म्हणतात . आपण इंग्रजीत मेडिटेशन म्हणूया, परुंतु हें मेडिटेशन मेंदू पासून सर्व शरीराची हालचाल करायची आहेत, संपूर्ण मन एकाग्रता करून फक्त्त अल्लाह ( परमेश्वरा ) ची वंदना -बंदगी -मेडिटेशन सह व्यायाम करायचं आहेत, दिवसातून पांच वेळा..नमाजच्या वेळी आपल्या संपूर्ण शारीराची ठराविक पद्धतीने हालचाल करायची आहेत. नमाज नंतर " दुवा " प्रार्थना फक्त्त आपण स्वतः व अल्लाह यांचं नातं.. बस..
दैनंदिन म्हणजे रोज :- (1) फजर (भोर पहाटे )=( सूर्योदया अगोदर 20 मिनटं पर्यंत ) 5-30-ते 6-00 वाजेपर्यंत,(2) दुपारी जोहर 12-30-ते 3=00 वाजेपर्यंत, (3) असर ( गोरज मुहूर्त, संध्याकाळी ) 4-ते 6-0 ते -30 पर्यंत सूर्यास्ता पर्यंत, (4) मगरीब - अर्थात सूर्यास्ता नंतर लागेच (5) रात्री 8 = पासून ते रात्री उशिरा पर्यंत. 
त्यानंतर ही अनेक ऐच्छिक( नफील )नमाजी आहेत.. काही बंधू त्या जरूर अदा करतात.असो.
प्रेषित मुहम्मद स्व. यांना अल्लाह ( परमेश्वरा ) नें आपल्या प्रेषितांच्या स्वर्ग ( जन्नत ) भेटीच्या दरम्यान "सलात " नमाज" अल्लाह नें बंदगी भक्ती साठीच भेट दिलेली आहेत. परुंतु या दिवस भराच्या अशा वेळी ठेवलेल्या आहेत की, या वेळी जगातील बहुतेक लोकं किंवा जग हें आळसलेल्या अवस्थेत किंवा काहीतरी मानसिक - शारीरिक थकवा तरी जाणवलेलं असतं किंवा सध्या च्या काळातील बाजारात फिरण्याच्या वेळा असतात, यालाच आपण निगेटिव्ह एनर्जी ची वेळा म्हणूच या, अल्लाह नें मानवानांना या वेळी स्पुर्ती - उत्साह यावं -ताजगी यावी व मनाला - शरीराला शांती भेटेल व स्पुर्ती चैतन्य वाटेल म्हणून कदाचित अल्लाहनें आपल्या वंदना साठीच या वेळेची अखनी केलेली असावी . असो.
त्या व्यतिरिक्त रमजान महिन्यातील स्पेसिअल खास तारविह नमाज, रात्री ईशा नमाज ला जोडूनच तास टिड तासाची 20 वीस रकात, संपूर्ण 30 दिवसात एक ते दोन वेळा पवित्र कुराअ ण म्हटलं जातं, तसं पहिले तर प्रत्येक नमाज मध्ये पवित्र कुरआ न पाठन करणं अनिवार्यच असतं परुंतु तारविह नमाज मध्ये रोज दीड ते दोन अध्याय ( para) च पाठन होतं. 
पवित्र कुरआन हें प्रेषित ( पैगंबर ) मुहम्मद स्व. यांना अल्लाह नें हजरत जिब्राईल ( जिब्रोल्टर ) अलै.या आपल्या विशेष दुता मार्फत 23वर्षात आपल्या दैनंदिन काळानुरूप व गरजा नुसार समस्त जगाला एक मार्गदर्शक पवित्र ग्रंथ पाठवला, त्यामध्ये( 6666)सहा हजार सहासे साहशस्त आयती ( स्लोक, ओव्या ) 114 सुरह आहेत, 30 अध्याय ( पारा ) आहेत. त्यामध्ये मानवाच्या प्रत्येक गरजेनुसार गरजेसाठी मार्गदर्शक केलेलं आहेत. दीव्य कुरआन हें कायम वर्तमान व भविष्यात सुध्या वेळोवेळी मार्गदर्शक करेल, आधुनिक तांत्रिक युगात व भविष्यात घडणाऱ्या घटनांचे सुद्धा काळानुसार नूरूर्पण व मार्गदर्शन करेल. कविनी, साहित्यकानी अभ्यास केलेत की ते कोणत्याही अलंकारात यमक मध्ये फिट बसत, हजारो वेळी वाचलं की कायम काहीतरी नावं नवीनच शिकायला भेटते.
1456 वर्षात असंख्य वैद्यज्ञानिकानी प्रयोग संशोधन करून बघितलं परुंतु काळाच्या कसोट्यात पवित्र कुरआन कायम सिद्ध झाले आहेत. असो 
हेच पवित्र कुरआ ण तील प्रत्येक आयतीच -स्लोक- शब्द न शब्द मोठमोठ्यांनी अलंकारिक पद्धतीने म्हटलं जातं त्यावेळी कानाला मानलं एक प्रकारचे सुखद वाटतेय.म्हणूनच काहीतरी वेगळं एकण्याचं आनंद भेटतोय. तेच मनाला स्पर्शसून जातात.
म्हणूनच प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात की, " इतर वेळेपेक्षा रमजान मधील प्रत्येक गोष्टीच पुण्य इतर वेळे पेक्षा सत्तार पटीने जास्त भेटतात "
म्हणूनच या रमजानुल मुबारक क्षनांचा शब्द न शब्दाचा सबाब ( पुण्य ) तुम्हाला जरूर भेटेल.
सध्याच्या भाषेत ऑफर आहेत की एकाला सत्तर ची तर जरूर या पवित्र ऑफर ( संधी ) चा फायदा उचला.
( मित्रांनो लेख आवडल्यास माहिती साठी आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा, आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा ).


================≠================
-----------------------------------------------
लेखक :- डॉक्टर सलीम साईदा सिकंदर शेख ✍️✅🇮🇳...
बैतुशशिफा दवाखाना 
मिल्लत नगर, श्रीरामपूर 
जिल्हा :- अहमदनगर 
  मोबाईल :- 9271640014..
🌷🌷🌷🌷🌷👌👍🙏.
-----------------------------------------------
=================================

शेख नाजेमाबेगम नवाब यांना"असबाक शैक्षणिक पुरस्कार" प्रदान


- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
आपल्या शैक्षणिक कार्यातून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या शिक्षक शिक्षिका यांना असबाक पब्लिकेशन पुणे, समर फाउंडेशन मालेगाव, मावीया एज्युकेशन ट्रस्ट अहमदाबादच्या वतीने दिला जाणारा "असबाक शैक्षणिक पुरस्कार" सोनई जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या शिक्षिका शेख नाजेमाबेगम नवाब यांना समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय कार्य बद्दल जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात हा पुरस्कार समर फाउंडेशनचे अध्यक्ष अश्फाक उमर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी नगरपालिका श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप,माजी सभापती पंचायत समिती वंदनाताई मुरकुटे, अहमदनगर उर्दू साहित्य परिषदेचे अध्यक्ष सलीमखान पठाण, उपाध्यक्ष इमाम सय्यद, सचिव आबीद दुलेखान सदस्य बदर सर, सहेली ग्रुपच्या नर्गीस इनामदार आदी उपस्थित होते.
पुरस्काराला उत्तर देताना शेख नाजेमा म्हणाल्या की कामाचे कौतुक झाल्यावर अजून जोमाने काम करायला बळ मिळते.काम करतानाही असेच समाजामधून सहकार्य मिळाल्यास भविष्यात पण विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमात शिक्षकांवर सध्या वाढलेल्या अनेक कामाचे ताणतणावात पण विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांचा मान्यवरांनी आपल्या भाषणातून गौरव केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहमदबदर शेख यांनी केले.प्रास्ताविक अहमदनगर जिल्हा उद्धव साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सलीमखान पठाण यांनी केले. तर आभार आबिद खान यांनी मानले.


=================================
-----------------------------------------------
 *वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

परीक्षेचा पेपर फुटला का? एक-एक प्रश्न 10 लाखांना विकला गेल्याचा दावा, विषय राज ठाकरेंच्या कोर्टात

- मनोज श्रीवास्तव - प्रतिनिधी -/ वार्ता -
मुंबई महानगरपालिकेच्या गट ए च्या परीक्षेत घोटाळा झाल्याचा दावा करण्यात येतोय. "महानगरपालिकेच्या गट ए च्या ज्या परीक्षा होत्या, त्यात साधारणपणे 1200 लोकं बसली होती. जो पेपर 25 तारखेला होणार होता. तो पेपर आधीच 19 तारखेला फुटला. आमच्या माहितीप्रमाणे या प्रश्नपत्रिकेतील एक एक प्रश्न दहा दहा लाखाला विकला गेला. शेकडो कोटींचा घोटाळा या परीक्षेच्या माध्यमातून झाला. घोटाळेबाज असे इंजिनियर तुम्ही पालिकेला देणार आहात का?" असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.

"एकदा हे पैसे देऊन इंजिनियर झाले, की नंतर हे पैसे खाण्याचेच काम करतील. यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे" असं संदीप देशपांडे म्हणाले. "राज ठाकरे यांना आम्ही पूर्ण प्रकाराची कल्पना दिलेली आहे. लवकरच राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेऊन त्या विषयावरती बोलणार आहेत" अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.

'...तर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू'

"या घटनेत परीक्षा रद्द झाली पाहिजे आणि चौकशी झाली पाहिजे, आणि जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटून रितसर तक्रार देणार आहेत" असं संदीप देशपांडे म्हणाले. "देवेंद्र फडणीस यांच्याकडे आम्ही कारवाईसाठी जाऊ. त्यांनी कारवाई नाही केली तर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू" असं संदीप देशपांडे म्हणाले.

'न्याय मिळवण्यासाठी राज ठाकरेंकडे आलोय'

"माझ्याकडे हे प्रकरण आलं, तेव्हा तक्रार केली. त्यादिवशी एक मोठा गट आम्हाला येऊन भेटला. त्यांची अपेक्षा होती की हा विषय राज ठाकरे यांच्याकडे पोहोचावा. हा विषय त्यांच्याकडे गेला तर त्यांना न्याय मिळेल. काही लोकांनी प्रामाणिकपणे परीक्षा दिलेली आहे. त्यांना न्याय मिळावा म्हणून राज ठाकरे यांच्याकडे आम्ही आलेलो आहोत. संदीप देशपांडे आणि मी
BMC Exam : BMC परीक्षेचा पेपर फुटला का? एक-एक प्रश्न 10 लाखांना विकला गेल्याचा दावा, विषय राज ठाकरेंच्या कोर्टात

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================