राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, June 30, 2023

अस्लम इनामदार ची अशोक महाविद्यालयाच्या आशियाई कब्बडी स्पर्धेत चमकदार कामगिरी

श्रीरामपूर- प्रतिनिधि - विशेष - वार्ता

माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी अस्लम इनामदार सहभागी असलेल्या भारतीय कब्बडी संघाने आशियाई कबड्डी स्पर्धेत विजय संपादन केला. या विजया
 मध्ये अस्लम इनामदार याने उत्कृष्ट कामगिरी केली आणि भारतीय संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.अस्लम इनामदार याने मिळविलेल्या यशाबद्दल अशोक कारखान्याचे चेअरमन आणि संस्थेचे संस्थापक माजी आमदार भानुदास मुरकुटे, संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे, उपाध्यक्ष योगेश विटनोर, सहसचिव भास्कर खंडागळे कार्यकारी अधिकारी सौ. मंजुश्रीताई मुरकुटे तसेच संस्थेच सर्व पदाधिकारी यांनी अस्लमचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ सुनीता गायकवाड यांनीही अस्लम इनामदार याचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच महाविद्यालयातील परीक्षा अधिकारी प्रा. दिलीप खंडागळे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका तसेच कार्यालयीन अधीक्षक बाबासाहेब पटारे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांनी अस्लमचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

((( संकलन )))
समता न्यूज नेटवर्क,
श्रीरामपूर - 9561174111

जलसाठा वाढवण्यासाठी ( क्रेडाई ) ची धडपड गंगापूर धरणातील 37 दिवसांत 'इतका'गाळ उपसा...

नाशिक - प्रतिनिधि - वार्ता -
विविध धरणांनी व नद्यांनी संपन्न असलेल्या नाशिक शहर परिसरावर पाऊस लांबल्याने पाणी कपातीचे संकट येण्याची चित्र दिसून येत आहेत. नवीन धरण बांधण्यापेक्षा असलेल्या धरणाची क्षमता वाढवण्याचा संकल्प 'क्रेडाई नाशिक मेट्रो'ने सोडला होता. सामाजिक दायित्वातून हाती घेतलेल्या उपक्रमाद्वारे भविष्यातील पाण्याचा संभाव्य तुटवडा कमी करण्याचा प्रयत्न 'क्रेडाई नाशिक मेट्रो'ने केला आहे.
बांधकाम व्यवसायाला गती देताना त्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नियोजन करणे हे देखील आपलेच कर्तव्य असल्याची भावना क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी मांडली. त्याला सर्वच बांधकाम व्यवसायीकांनी होकार दिल्याने कामाला प्रारंभ करण्यात आला.पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी मनपाची असली तरी त्यांच्या हाताला बळकटी देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतल्याचे कृणाल पाटील यांनी सांगितले. पहिल्या दोन दिवसात 47 हायवा ट्रक, 25 ट्रॅक्टरमधून शेतकऱ्यांनी गाळ शेतात दिला आहे. गाळ काढण्याच्या कामात सातत्य ठेवत त्या कामाची गती वाढवत 20 ते 27 जून दरम्यानच्या काळात 1,100 ट्रक फेऱ्यांतून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात यश मिळाले आहे. जोरदार पाऊस सुरू होई पर्यंत हा उपक्रम सुरू ठेवण्याचा क्रेडाईचा संकल्प आहे. धरणक्षमता जास्तीत जास्त वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
एका सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून दरमाणसी लागणारे पाणी गृहीत धरता 4 जणांच्या कुटुंबाला दिवसाला 200 लिटर पाण्याची गरज पडू शकते. 8 कुटुंबांच्या गृहनिर्माण प्रकल्पात त्या प्रमाणात 1,600 लिटर पाणी लागणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रती प्रकल्प 2 ट्रक गाळ काढणे गरजेचे आहे. शहरात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प साकारले जात असल्याने आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेत 1,100 ट्रक गाळ काढून क्रेडाईने आपल्या प्रकल्पातील नागरिकांची गरज भागवण्याच्या उद्देशाने जलसाठ्यात वाढ करण्याचा प्रयत्न केला आहे
धरणाची मूळ पाणी साठवणक्षमता १ टीएमसी एवढी आहे. मात्र गेल्या काही वर्षात पाण्यासोबत धरणात वाढत गेलेल्या गाळामुळे धरणाची क्षमता 6.5 एवढी राहिली आहे. त्यामुळे 2.5 टीएमसी पाणी गाळामुळे कमी साठवण केले जाते. ते परिपूर्ण करण्यासाठी धरणात साठलेला गाळ काढणे महत्वाचे झाले आहे. शेती उत्पादनासाठी सुपीक असलेला धरणातून निघालेला गाळ नितीन पाटील (32 ट्रक), सचिन पाटील (69 ट्रक), विठ्ठल थेट (259ट्रक), संपत थेटे (182 ट्रक), रघुनाथ फडोळ (335 पीन पाटील (131 तक) संदिप थेटे (90 तक) यांनीधरणसाठ्यात वाढ करण्यासाठी एक टीएमसी पाणी वाढवण्याकरता 13 लाख ट्रक गाळ काढावा लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे 32 लाख ट्रक गाळ काढल्यास धरण पूर्णक्षमतेने भरुन जाईल. त्यावेळी पाणीकपात करण्याची गरज राहणार नाही. यादृष्टीने क्रेडाईने पहिले पाऊल उचलले आहे.क्रेडाईने हा उपक्रम सामाजिक बांधिलकीतून हाती घेतला आहे. नवीन धरण बांधण्यापेक्षा पावसाच्या पाण्याच्या साठवणीतून धरणाची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न आहे. क्रेडाईने आतापर्यंत 1,100 ट्रक गाळ काढला आहे. मुसळधार पाऊस येऊन कामात व्यत्यय येत नाही तोपर्यंत काम सुरू ठेवण्याचा मनोदय आहे. सर्वसामान्यांनी पुढे येऊन खारीचा वाटा उचलावा.


अध्येक्ष
कुणाल पाटील
क्रेडाई नाशिक मेट्रो.


.

Thursday, June 29, 2023

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात 104 उद्योगांना मंजुरी....


मुंबई - प्रतिनिधि - समाचार -
होऊन बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे. युवक-युवतींना या माध्यमातून आत्मनिर्भर करण्यासाठी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आग्रही आहेत.
त्यांच्याच प्रयत्नातून चालू वर्षात 104 उद्योगांना मंजुरी मिळाली असून 700 बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेच्या अंमलबजावणीत अहमदनगर जिल्हा अव्वल असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापकांनी दिली आहे.
अहमदनगर जिल्ह्याचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यात येऊन त्यामध्ये अधिकाधिक रोजगार निर्मितीवर भर देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. विखे-पाटील यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांनी या बाबीकडे विशेष लक्ष देऊन जिल्हयातील सर्व बँकांच्या तसेच सर्व संबंधित विभाग प्रमुखाच्या बैठका घेत बँकांना उद्योगासाठी अधिक प्रमाणात कर्ज मंजूर करण्याच्या सूचना दिल्या.
याबाबत सातत्याने पाठपुरावाही करण्यात आल्याने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या महत्वाकांक्षी योजनेला जिल्ह्यात गती मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील युवक,युवतींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योगांचे प्रस्ताव बँकेकडे पाठविण्यात येऊन बँकेच्या मंजुरीनंतर लाभार्थ्यांना प्रशिक्षण देत कर्ज वितरण करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सन 2023-24 या वर्षात मंजुरी देण्यात आलेल्या 104 उद्योगांना 4.73 कोटी इतके अनुदान मिळणार आहे. त्याचबरोबर जिल्हयात सुमारे 25 कोटी इतकी औद्यो गिक गुंतवणुक होत आहे. जिल्ह्यात हा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवून जिल्हयासाठी असणारे एक हजार उद्योगांचे उद्दिष्ट साध्य होऊन त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे.
राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी असलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातुन जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवती आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी सर्व यंत्रणा व बँकांनी अधिक प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले आहे.

---------------------------------------------------
===================================
सह : - संपादक रंजित बतरा शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
===================================
---------------------------------------------------

गावठी दारू लिटर 250 जप्तराज्य उत्पादन शुल्क 'अ' विभागाच्या पथकाची कामगिरी नाशिक

नाशिक - प्रतिनिधि - वार्ता -

आषाढी एकादशी व बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर ड्राय डे असतांना व बंदी असलेली अवैध हातभट्टी गावठी दारु विक्रीच्या अवैध धंद्याविरोधात राज्य उत्पादन शुल्क, अ विभाग, नाशिक या पथकाने कारवाई करत तब्बल ५२० लिटर हातभट्टी गावठी दारु व इतर साहित्य जप्त केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, राज्य उत्पादन शुल्क अ विभाग, नाशिक या पथकाला मिळालेल्या झिरो पोलीस माहिती नुसार वाल्मिक नगर, पंचवटी, नाशिक याठिकाणी पंचवटी पोलिसांच्या मदतीने छापा टाकून ५२० लिटर हातभट्टी गावठी दारु, ०२ प्लॅस्टीक ड्रम, ०४ प्लॅस्टीक कॅन, १९ रबरी ट्युब आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला यावेळी मात्र सदरहू अवैध धंदा चालवणारा चेतन रवि पाटील हा फरार झाल्याने त्याला फरार घोषित करण्यात आले.
ही कामगिरी राज्य उत्पादन शुल्क, अ विभाग, नाशिक निरीक्षक योगेश सावखेडकर, दुय्यम निरीक्षक यशपाल पाटील, दुय्यम निरीक्षक भावना भिरड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मायकल पंडीत, जवान विरेंद्र वाघ, राहुल जगताप, विजय पवार व गणेश वाघ- यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सदरील कारवाई करिता व विभागाचे निरीक्षक सुनिल देशमुख व त्यांचा स्टाफ, क विभागाचे निरीक्षक जी. पी. साबळे व त्यांचा स्टाफ, नाशिक भरारी पथकाचे निरीक्षक जयराम जाखेरे व त्यांचा स्टाफ, तसेच पंचवटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रोहीत केदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, हवालदार कुलकर्णी, पोलीस नाईक नाईक, पोलीस नाईक शिंदे, पोलीस शिपाई महाले, यांनी मदत केली.

------------------------------------------------------------------------
=====================================
उप : - संपादक एस व्ही वाघ शब्द...✍️✅️🇮🇳... रचना संकलन वार्ता...
=====================================
------------------------------------------------------------------------


'दप्तर 'कथासंग्रहप् स्व.प्रा.रायभान दवंगे यांचा 'दप्यांच्या 'ग्रासत्य आणि प्रबोधनाची संस्कारशिदोरी = राहूल पटारेपाटील

श्रीरामपूर - प्रतिनिधि - समाचार

रयत शिक्षण संस्थेत दीर्घकाळ मराठी विषयातील विद्यार्थीप्रिय प्रा.रायभान दवंगे यांचा 'दप्तर'हा ग्रामीण कथासंग्रह समाजातील सामाजिक,शैक्षणिक जीवनातील सत्य परिस्थितीचे चित्रण करणारा आहे,ह्या कथा समाजप्रबोधनाची संस्कारशिदोरी असल्याचे मत टाकळीभान येथील साहित्यप्रेमी, टाकळीभान विकास सोसायटीचे मा.चेअरमन राहूल अप्पासाहेब पटारे पाटील यांनी व्यक्त केले.
  टाकळीभान येथील साहित्य परिवारातर्फे आषाढी एकादशीनिमित्त प्रा. रायभान दवंगे यांच्या 'दप्तर 'ग्रामीण कथासंग्रहाचे परिसंवादात्मक पुस्तक प्रकाशन साहित्य परिवार दालनात संपन्न झाले, त्याप्रसंगी राहूल पटारे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी श्रीरामपूर येथील ॲड.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. संयोजक व साहित्य परिवाराचे संस्थापक, अध्यक्ष कवी प्रा. पोपटराव पटारे पाटील यांनी स्वागत, प्रास्ताविक करून कमालपूर येथील स्व.प्रा.रायभान दवंगे यांचे साहित्यिक, शैक्षणिक योगदान सांगून एक प्रभावी ग्रामीण साहित्यिक असलेले प्रा. दवंगे यांचे प्रतिभाशाली व्यक्तिमत्व आणि साहित्य दुर्लक्षित राहिले आहे. त्यांच्या कथेवर चित्रपटआणि नाट्यप्रयोग नियोजन करण्यात आले होते.पुणे येथील टिळक सभागृहात महाराष्ट्रातील ज्या बारा प्रतिभासंपन्न साहित्यिकांचा सन्मान सोहळा झाला, त्यात प्रा. दवंगे यांना सर्वात मानाचा पुरस्कार लाभला,
त्यांचे निधन झाले पण त्यांच्या साहित्यकार्याचे महत्व लक्षात घ्यावे अशी अपेक्षा प्रा.पटारे यांनी व्यक्त केली.यावेळी प्रस्तावना लिहिणारे प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी कथासंग्रहाचे सामाजिक व वाड्.मयीन मूल्यमापन केले. प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी कोपरगांव येथील नोकरी करतानाचे प्रा.दवंगेविषयक अनुभव सांगितले.यावेळी सौ. सुनीताताई पटारेपाटील, सौ.अंजली पटारेपाटील, हेमंत पटारेपाटील, पंकज पटारेपाटील, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन लहू कोल्हे पाटील आदी उपस्थित होते.प्रमुख पाहुणे राहूल पटारेपाटील यांनी प्रा. दवंगे यांचे साहित्यिक कार्य व प्रेमळ, संवेदनशील स्वभाव अनुभव सांगितले.टाकळीभान ज्ञानज्योती बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष अर्जुन राऊत यांनी साहित्य परिवाराने आयोजित केलेला साहित्य उपक्रम हा साहित्यनिर्मितीला, ग्रामीण नवोदित साहित्यिकांना प्रेरणादायी, स्तुत्य असा कार्यक्रम असून प्रा. रायभान दवंगे यांच्यासारख्या गुणशील प्रभावी, ग्रामीण साहित्यकांची दखल घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला.प्राचार्य टी. ई. शेळके यांनी अध्यक्ष भाषणातून या उपक्रमाचे कौतुक केले.ते म्हणाले, टाकळीभान नाव उच्चारताच पटारेपाटील परिवार समोर येतो, या परिवाराने कौटुंबिक, सामाजिक,राजकीय, कृषी, व्यवसाय क्षेत्रात आदरणीय अशी प्रतिष्ठा प्राप्त केली आहे. प्रा.रायभान दवंगे यांचे ग्रामीण साहित्यात मोठे योगदान आहे. 'दप्तर 'या नावातच शिक्षणाचे महत्व लक्षात येते.ज्याने दप्तर पाहिले नाही, त्याला शिक्षण मिळतं नाही, दप्तर म्हणजे ज्ञानाची शिदोरी आहे,अशी ज्ञानशिदोरी देण्यासाठी, घेण्यासाठी अनेकांचे कष्ट, योगदान आहे. प्रा.पोपटराव पटारे, प्रा. डॉ बाबुराव उपाध्ये यांनी नगरजिल्ह्यात सतत दुर्लक्षित लेखक, कवींची दखल घेतली.स्वखर्चातून ते असे कार्यक्रम घेतात,ही खरी साहित्यसेवा म्हटली पाहिजे,असे उपक्रम प्रसिद्धसाठी, वृत्तपत्रात नाव येण्यासाठी नाहीत तर नि:स्वार्थ भावाने केलेली ही साहित्यभक्ती आहे. असे उपक्रम घेण्यासाठी तशी विचारधारा असावी लागते.वेळ, पैसा, नियोजन, लोकसंग्रह आणि निरपेक्षदृष्टी असावी लागते, साहित्य ही अमृतवाणी आहे.ती समाजपर्यत पोच करणे ही संवेदनशीलता पाहिजे.सगळेजण साहित्य उपक्रमाला प्रसिद्ध देतात असे नव्हे पण एखाद्या सेतूकार्यातील खारुताईसारखे हॆ कार्य छोटे असले तरी ते प्रामाणिक आहे, हॆ काम साहित्य परिवार, वाचन संस्कृती प्रतिष्ठान करीत आहे, असे सांगून प्राचार्य शेळके यांनी कथासंग्रहाचे महत्व सांगितले.प्रा. डॉ बाबुराव उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले तर हेमंत पटारे पाटील यांनी आभार मानले.

    ((( संकलन )))
 समता न्यूज नेटवर्क,
श्रीरामपूर - 9561174111

विठू माऊली तू माऊली जगाची,माऊली त मुर्ती विठ्ठलाची...

श्रीरामपूर : -
*आषाढी एकादशी निमित्त सर्वांना शुभेच्छा* !!

- *अनुराधा गोविंदराव आदिक*
मा.विश्वस्त - श्री साईबाबा संस्थान,शिर्डी.
मा.लोकनियुक्त नगराध्यक्षा - श्रीरामपूर नगरपरिषद.
अध्यक्षा - महाराष्ट्र कृषक समाज.

आज आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुख्मिनी मंदिर,टाकळीभान यथे अनुराधा ताई आदिक यांनी व इतर त्यांच्या सोबत असल्याले सहकार्याने घेतलं दर्शन...

श्रीरामपूर : -
आज आषाढी एकादशीनिमित्त *विठ्ठल रुख्मिनी मंदिर,टाकळीभान*येथे*विठु माऊलीचे*मनोभावे दर्शन घेतले.याप्रसंगी बापूसाहेब पटारे,शहराध्यक्षा सौ.अर्चनाताई पानसरे,मगर सर,अनिरुद्ध भिंगारवाला व अर्जून आदिक उपस्थित होते.

- *कु.अनुराधा गोविंदराव आदिक*
मा.विश्वस्त - श्री साईबाबा संस्थान,शिर्डी.
मा.लोकनियुक्त नगराध्यक्षा - श्रीरामपूर नगरपरिषद.
अध्यक्षा - महाराष्ट्र कृषक समाज.

Wednesday, June 28, 2023

शहरासह श्रीरामपूर तालुक्यात ईद मोठ्या उत्साहात साजरी...

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -

आज शहरासह तालुक्यामध्ये ईदुल अजहा (बकरी ईद) सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शहरातील जामा मस्जिद,रहेमते आलम मस्जिद,जमादार मस्जिदसह विविध मस्जीदांमधून तसेच तालुकाभरातील ईदगाह मैदान आणि विविध मस्जीदांमधून ईदची नमाज पठण करण्यात आली.
प्रामुख्याने शहर काझी मौ.अकबरअली सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर येथील संजयनगर परिसरातील इदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने ईदची नमाज (पठण) अदा केली.  
यावेळी शुभेच्छा देण्यासाठी श्रीरामपूर तालुक्याचे आमदार लहु कानडे, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे,बाजार समितीची संचालक सचिन गुजर,ज्ञानेश्वर (माऊली) मुरकुटे, सिद्धार्थ मुरकुटे,अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम, पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी साहेब,लकी सेठी,अश्फाक शेख,कमरअली सय्यद, मा. नगरसेवक दिलीप नागरे, सामाजिक कार्यकर्ते दीपक कदम आदि उपस्थित होते.
माजी उपनगराध्यक्ष हाजी मुजफ्फरभाई शेख यांच्या हस्ते इदगाह कमेटीच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
मुस्लिम धर्मीयांची बकरी ईद  आणि हिंदू धर्मीयांची आषाढी एकादशी ही दोन्ही सणे एकाच दिवशी आल्याने बंधूभाव व भाईचाऱ्याचे मोठे औचित्य साधले गेले असल्याचे हाजी मुजफ्फरभाई शेख म्हणाले,तसेच आज पवित्र आषाढी एकादशी असल्याने आज कोणीही मुस्लिम बांधवांनी कुर्बानी करु नये असेही ते म्हणाले.
जगात एकता,शांतता, बंधूभाव निर्माण व्हावा, सर्वांनी एकोप्याने रहावे,सर्वांच्या मनोकामना पुर्ण होवोत अशी प्रार्थना मौ.अकबर अली सय्यद यांनी यावेळी केली.
याप्रसंगी इदगाह कमेटी पदाधिकारी,सदस्य व अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. तथा श्रीरामपूर शहर पोलिसांच्यावतीने योग्य आणी चोख बंदोबस्त असल्याचे देखील यावेळी दिसून आले.

छाया चित्र:'दिपक कदम,
((( वृत्तसंकलन )))
समता न्यूज नेटवर्क,
श्रीरामपूर - 9561174111

वरिष्ठ राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेत तसेच जिल्हा स्तरीय जलतरणातील प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलला यश...

मुंबई - नारायण - सावंत - समाचार -
नुकत्याच बैंगलोर येथे पार पडलेल्या ७६ व्या वरीष्ठ राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेत सहभागी होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलातील एकूण ६ डायव्हिंग खेळाडूंची निवड झाली होती.
सदर स्पर्धा बैंगलोर येथे पार पडल्या. संकुलातील खेळाडू मेधाली रेडकर हीने महिलांच्या १ मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग प्रकारात १६१.५५ गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला तर तुषार गितये याने पुरुषांच्या गटात हायबोर्ड डायव्हिंग प्रकारात २५२.३५ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
तसेच जलतरणातही संकुलातील दोघा बहिण-भावानी आपल्या स्वतःबरोबर संकुलाचे नाव लौकिक केले. गोरेगांव येथील ओझोन जलतरण तलावात झालेल्या जिल्हा स्तरीय जलतरण स्पर्धेत सिया देवरुखकर हिने १०० मीटर ब्रेस्ट्रोक मध्ये तसेच ८०० मीटर फ्रीस्टाइल मध्ये सुवर्णपदक,२०० मीटर ब्रेस्ट्रोक मध्ये रौप्य पदक तर ४०० मीटर फ्रीस्टाइल आणि ४०० मीटर मिडले मध्ये कांस्यपदक पटकावले. तसेच तिचा लहान भाऊ दुर्वेश देवरुखकर याने ५० मीटर बटरफ्लाय मध्ये रौप्य पदक तर ५० मीटर ब्रेस्ट्रो, १०० मीटर  बटरफ्लायमध्ये कांस्यपदक तसेच २०० मीटर फ्रीस्टाइल मध्ये देखील कांस्यपदक पटकावले.
संकुलाचे अध्यक्ष श्री.अरविंद रमेश प्रभू आणि सचिव डॉ. मोहन अनंत राणे सर यांचे नियमित सहकार्य आणि प्रशिक्षक सायली महाडीक आणि तुषार गितये यांचे मार्गदर्शन तसेच जलतरणाचे प्रशिक्षक सहदेव नेवाळकर यांच्या जोरावर खेळाडूंनी इथपर्यंत मजल मारली.

    (((संकलन )))
समता न्यूज नेटवर्क,
श्रीरामपूर - 9561174111

*!! ईदुल-अजहा प्रेम व त्यागाची सत्व परीक्षाच !!**भारतीय कॅलेंडर "बकरी -ईद" म्हणून उल्लेख करतात*

 प्रेषीत हज. इब्राहिम अलै.ना अल्लाह शकडून स्वप्नात आज्ञा झाली की जो तुला सर्वाधिक जास्त प्रिय असेल ते कुरबान कर, हज.इब्राहिमांच्यां डोळ्यांसमोर विज कपकपावीगत झालं. हज. इस्माईल अलै.डोळ्यासमोर दिसत होते. उतारवयात, म्हातारपणी (८०) आंनशीव्या वर्षात जन्म झालेला एकुलता हज. ईस्माईल अलै. मुलगा , अल्लाहाला कित्येकदा दुआ मागुण झालेल्या मुलाला अल्लाहा त्याची कुरबानी मागतात आपल्या अंगावर काटा शहारे आणणारी गोष्टं. अल्लाहा आग्नि परीक्षाच घेऊ पाहत राहिले.क्षणाचाही विचार न येता प्रेषित इब्राहिम अलै.नीं हा संदेश पत्नी हज.सारा अलै. व कोवळ्या मुलाला इस्माईल अलै .नां अल्लाहा (ईश्रवर) ची ईच्छा सांगतात. लागलिचच आज्ञाधारक मुलगा हज.इस्माईल अलै. वडिलांच्या आज्ञेला यत्किंचितही विचार न करता अल्लाहा (ईश्रवरा) चीच ईच्छाच असेल तर , तात्काळ होकार देतात. 
तारीख जिलहिजजा(अरबी) १० दहा असते . मिना (मकका) च्या ७ किलोमीटर दक्षिण- पुर्वेला ) नावाने प्रसिद्ध असलेल्या डोंगर व ओसाड भयंकर वाळवंट मैदानात, पवित्र हाज करण्यासाठी जाणारे हाजी आपला अधिक काळ जिल-हिजजा चे ८.१०.११.१२. तारीखेचे चार दिवस याच ठिकाणी व्यतीत करतात., (आज लाखोंच्या संख्येने वातानुकुलित टेंट ची गिनीज बुक्स मधे नोंद आढळते) वयोवृद्ध वडील उतारवयातील काठी ज्याला म्हणतात अशा आपल्या काळजाच्या तुकड्यांला घेवून कुरबानी साठी सजवून तयार करून नेतात. मन, डोकं स्तब्ध, सुन्न करणारी वेळ..काळीज लट-लट करणारी घटना.हा विचार करून. म्हतारी आई- बाबांची कसोटी पहाणारा प्रसंग. तरीसुद्दा अल्लाहाच्या परीक्षा साठी प्रेषित इब्राहिम पुत्र प्रेमापोटी डोळ्याला पट्टी बांधून कुरबानी साठी मुलांवर धारदार शस्त्र चालवतात तर त्या क्षणार्धात अल्लाहानेच डोळ्यांची पापणीलवण्या आधीच चमत्कारिक घटना घडवून तेथे विशेष ईशदुत जिब्राईल अलै.द्वारे दुमंबा (मेंढा) पाठवून दुमंब्याची कुरबानी (बळी)दिली. प्रेषित इब्राहिमांना वाटले की मी अल्लाहाच्या ईच्छेखातर आपल्या सर्वांत प्रिय अशा पुत्राला कुर्बान केले.परंतु डोळ्याचीपट्टी काढून बघतात तर आश्चर्यचकीत होतात,?? हे काय आश्चर्य??? हे सर्व लिला बघून प्रेषित इब्राहिम अल्लाहची कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतात,अल्लाहाने प्रेषित इब्राहिम अलै.व हज. इस्माईल अलै यांची सत्व परीक्षा बघून .. समस्त मानवजातीसाठी धडाच दिला.
परमेश्वर, ईश्वर, अल्लाहला कोणत्याही प्रकारची नरबळी ची अपेक्षित नव्हते च मुळात.. ज्या ठिकाणी "अल्लाह मानवाला सत्तर आई पेक्षा ही जास्त पट अधिक प्रेम, करुणा, ममता करतात " त्या ठिकाणी थोडे ते मुलाचा बळी घेऊ शकतील.. थोडे विचार करण्या सारखी गोष्ट आहे.
  तदनंतर हाजारोंवर्षांपासून त्याचे प्रतिक म्हणुन जगात अनुयायीं ऐपतीप्रमाणे कुरबानी करतात.धनिक वर्ग ज्यांची पवित्र- हज यात्रा करण्यासाठी ऐपत असणाऱ्या व्यक्ती पवित्र- मक्का येथे हाजला जावून, हाजची एक महत्त्वाचे कार्य (फर्ज) कुर्बानी करण्यात येते. 
ऊर्दू महिन्याचा शेवटीचा १२ वा महिना "जिल-हिजजा " ला हाजी. लोकं ता. ८ जिलहिजला मक्का च्या काबागृहामध्ये अंगावर पांढराशुभ्र- कपड लपेटून पुरुष अडीच- तीन मीटर लांब कापड अंगास गुंडाळून व स्त्रिया पांढराशुभ्र ड्रेस,कपड परिधान करतात त्यांस "ऐहराम " संबोधतात. 
असे ऐहराम पांघरूण लाखोंच्या संख्येने हाजी लोकं मक्का येथील पवित्र पवित्र खान -ए -काबा च्या प्रदक्षिणा करतात त्या दरम्यान व हाजमय वातावरणांत चालता- चालता
 "आल्लाहा मी हजर आहे ", "आल्लाहा मी हजर आहे ", "आल्लाहा मी हजर आहे "...आशा मंजुळ स्वरांचा गजर निनाद दुमदुमत रात्रंदिवस मक्केच्या हाजमय वातावरणात व तेथुनच मीना नावाच्या दक्षिण-पुर्वेस सात किलोमीटर अंतरावर असलेल्या "आराफात " च्या पवित्र ऐतिहासिक मैदानात पोहोचतात .९ नऊ जिलहिज हे हाज चा प्रमुख मुख्य दिवस असतो .आपल्या पापांची क्षमा, करुणा ,मागतात,मुला-बाळांसंबंधी, जवळीलनातेवाईकासंबंधी, आपल्या देशासंबंधी त्या पवित्र ठिकाणी दुआ, याचना करतात .जगात एकमेव पवित्र स्थळ असेल की जगाच्या पाठीवर एकही देश असा नसेल की त्या ठिकाणचा माणुष्य नसेल. जगातील ३५६४ बोलीभाषा बोलल्या जातात , जगाच्या कित्येक ठिकाणाहून आलेले हाजी एकाच आराफात च्या पवित्र मैदानामध्ये एकत्र जमून कोणीही उच्च निच नाही,कोणी काळा - गोरा नाही ,सर्व लेकरे आल्लाहाची सारखीच ५०-६० लाखोंच्या संख्येने लोक एकाच रांगेत- छताखाली बसून अल्लाहच्या आदेशाचे पालन करतात, एकाच अरबी भाषेच्या दिव्य कुरआन मजीदने सांगितलेल्या आदेशाचे पालन करतात. रडून- व्याकुळ होऊन, ऊर बडवून अल्लाहा जवळ स्वत: केलेल्या कळत-नकळत पापांची माफी मागतात,पाप मुक्तीची प्रार्थना करतात. याच पवित्र "आराफात " मैदानावर दिनांक ३ मार्च ६३२ या दिवशी अल्लाहचे प्रेषित मुहम्मद सल्ल.नी मक्का विजयानंतर ," जीवनाच्या अंतिम हाज "-यात्रेला लाखोंच्या अनुयायी ,लाखों लोकां समोर -" जगातील संपूर्ण सृष्टी व मानवी कल्याणासाठीच " जगप्रसिध्द ऐतिहासिक अशी नोंद आहे असे "अतिंम प्रबोधन, प्रवचन, भाषण, खुतबा " - दिले होते. असो. 
येथुनच हाज यात्रेकरू जे प्रेषित इब्राहिम अलै.यांना कुरबानी पासून वारंवार मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्याऱ्या अशा तीनही सैतानाच्या प्रतिकृतीला दगडी, कंकरी फेकून मारतात. परतीत पवित्र खाना -ए- काबाला परिक्रमा करुन कुर्बानी विधी ,डोक्यावरील केसांची टक्कल करुन हज चा विधीपूर्ण करण्यासाठी जातात. फक्त कुरबानी करण्याचा उददे्शच प्रत्येक धर्माच्या दारिद्र्य रेषेखालील वंचित ,गरीबांच्या घरापर्यंत मदत पोहचवली जाईल येवढी काळजी घेण्याचे . ईदच्या निमित्ताने का होईना त्यांची मुलं खातिल व ईदचा आनंद घेतील. सर्व समाजातील गोरगरीब जनतेला ईद व सण हे उत्सव असतात..खरोखरच हेच अंतिम सत्य असतं..यंदाच्या वर्षी पंढरपूरची आषाढी एकादशी व ईदुल अजहा हा योगायोग जुळून अल्लाह परमेश्वर ईश्वराने एकत्र आणून समभाव एकतेचा प्रतिक होवून सर्व जगाला प्रेम अर्पावे....
ईद साजरी करण्याचा उद्देश हाच असतो सर्व जग निरोगी व शांत राहणं,सर्व धर्मांच्या लोकांना समजून घ्यावे,हाच माणुसकीचा धर्म आहे.

*शब्दांकन :* 
डॉ.सलीम सिकंदर शेख
बैतुशशिफा हॉस्पिटल,श्रीरामपूर
मोबा: ९२७१६४०००१४

  *संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,
श्रीरामपूर - 9561174111

Tuesday, June 27, 2023

*++5-एस् फौन्डेशन की महाराष्ट्र की कार्यकारिणी जाहिर करनी है। नरोत्तम चव्हाण...


पुणे - उत्त - समाचार -
5-एस् फौन्डेशन की महाराष्ट्र की कार्यकारिणी जाहिर करनी है।
  *--यह सिर्फ शैक्षणिक कार्य संपूर्ण भारत में करने वाली(रजि.)संस्था है। जिन कार्यकर्ताओं को इस पवित्र कार्य में रुचि है वह अपना नाम महाराष्ट्र अध्यक्ष से वार्तालाप करने के बाद निश्चित करें।* 
*---अभी फिलहाल अॅडहाॅक बॉडी काम को चालना देने के लिए बनाई जा रही है। नीचे दिए हुए कार्यकर्ता को अॅडहाॅक*बॉडी के कार्यकारिणी में नियुक्ति दी जा रही है। कृपया*सहकार्य करें, यह नम्र प्रार्थना है।* *सर्वश्री 1)- नरोत्तम चव्हाण-पुणे अध्यक्ष, 2)नन्हुलाल नहारिया उपाध्यक्ष-आळंदी रोड 3) शाम पवार- संगठन सचिव-ठाणे-उल्हासनगर 4) राजु जेधे-संगठन सह सचिव -सातारा 5) सब*कार्यकारिणी सदस्य 6) कविराज संघेलिया- पुणे*, *7)केशवराव मधु मटके- नागपुर,8)समीर लालबिगे-* *मिरज-सांगली, 9)रमेशजी टूंडलाय- बुलढाणा, 9)होशियार सिंह चव्हाण-संभाजी नगर/ औरंगाबाद,* *10)वीरेंद्र सिंह पारचा- ठाणे, 11)उमेश*के.पंचरवाल - कोल्हापुर, 12)घनश्याम रामचंद्र बारसे-*अंबरनाथ, 13)प्रमोद नकवाल* *भुसावल-14) प्रताप* *निंदाणे जी -खामगांव,15)नरेश चव्हाण-*
*अहिल्यानगर/* *अहमदनगर, 16)* *किशोर पिवाल -अमरावती, 17)रामफल तांबे- नागपुर, 18)राजेन्द्र ( गजुभाई ) वाघेश्वर नेरळ-रायगड,19)अॅडव्होकेट भोला चव्हाण-परतवाडा, 20) धनराज एकनाथ जावा- येरवडा, 21) विजय मोगरे-चन्द्रापुर।* 
      *(--कुछ पद रिक्त रखे हुयें है वह योग्य कार्यकर्ता से सलाह के बाद भरे जाएंगे।)*

        आपका
  *नरोत्तम चव्हाण*   
*महाराष्ट्र अध्यक्ष 5-एस
        फाउंडेशन*

अधिकाऱ्यातील देव माणुस म्हणजे तहसीलदार कव्हळे साहेब - ऍड दिनेश जपे

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

चिखली - प्रतिनिधि - वार्ता -

खरं तर शासकीय अधिकारी तथा कर्मचारीयांचा हक्काचा व सुट्टीचा दिवस म्हणजे रविवार या दिवशी कोणतेही राजपात्रित तथा निमशासकीय अधिकारी शक्यतोवर कुणाचे ही फोन घेत नाही किंवा कुणाच्याच संपर्कात राहत नाही परंतु दि २५ जून रोजी मला माझ्या १७ वर्षाच्या वकिली व्यवसायामध्ये आज प्रथम सुखद धक्का मिळाला की आमच्या एकलारा गावचे समाधान बनकर माझ्याकडे आले असता त्यांनी त्यांच्या वडिलांचे आज संध्याकाळी ७ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात तातडीची शस्त्रक्रिया करायची आहे व त्यासाठी अंदाजे ५ लाखापर्यंत खर्च येणार असून आज सुट्टीचा दिवस असल्या कारणाने महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत जो लाभ मिळू शकतो त्यापासून मी वंचीत राहत आहे, त्यामुळे मला योजनेचा फायदा मिळवून देण्याची विनंती केली, कारण त्यांच्या वडीलांना जवळपास पाच लाख रुपये खर्च डॉक्टरांनी सांगितलेला होता व त्यांच्या जवळ फक्त एक लाख रुपयेच होते, त्यामुळे बनकर हे हाताश होऊन माझ्या निवासस्थानी आले असता त्यांनी आप बिती सांगितली असता आम्ही त्वरित चिखली तहसील कार्यालय गाठले परंतु रविवार असल्यामुळे कार्यालय बंद होते मग आम्ही लगेच रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील व पत्रकार एकनाथ माळेकर यांच्यासोबत संपर्क साधला, त्यांनी तात्काळ चिखली तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार मा. सुरेशजी कव्हळे साहेब यांच्याशी संपर्क केला व त्यांनी सदर रुघ्नांच्या नातेवाईकांना तात्काळ मदत करण्याचे आश्वासन दिले असता तहसीलदार साहेब बाहेरगावी असल्याने त्यांनी सचिन भुतेकर यांना सोबत घेऊन नायब तहसीलदार श्री संजय टाके साहेब यांच्या निवासस्थानी जायला सांगितले आणि आमच्या सोबत सकाळपासून कागदपत्रांच्या प्रतिक्षेत असलेले शे. रशीद शे. हुसेन रा . ब्रम्हपुरी ता.चिखली जि.बुलढाणा यांचे देखील कागदपत्रे घेऊन आम्ही गेलो आणि त्यांच्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया होण्यास रस्ता देखील सुकर झाला, महत्वाचे प्रमाणपत्र सुट्टीच्या दिवशी तहसीलदार सूरेश कव्हळे,नायब तहसीलदार संजय टाके व लिपिक सचिन भूतेकर व पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मळेकर आणि रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील व मी चिखली तालुका वकिल संघाचे मा.अध्यक्ष तथा समाजिक कार्यकर्ता ॲड.दिनेश जपे आम्ही सर्वानी केलेल्या छोट्याश्या प्रयत्नाने दोन्ही रुग्णांच्या महागड्या शस्त्रक्रियेचा मार्ग सुलभ झाला व काही प्रामाणिक अधिकाऱ्यांमध्ये आज देखील देवपण बघायला मिळत असल्याची आज प्रत्यक्ष प्रचीती आली असल्याचे ऍड. दिनेश जपे यांनी म्हटले व तहसीलदार कव्हळे साहेब व रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांच्यासह कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळेवर मदत करणाऱ्या त्या सर्वांचे बनकर व शेख कुटुंबियांनी आभार मानले.

संकलन 
समता न्यूज नेटवर्क,
श्रीरामपूर - 9561174111

राजर्षी शाहू महाराज सामाजिक समतेचे पुरस्कर्ते माजी आ.मुरकुटे

श्रीरामपूर प्रतिनिधि वार्ता

राजर्षी शाहू महाराज हे वारस हक्काने झालेले छञपती नव्हते, ते सामाजिक समतेचे पुरस्कर्ते होते. अस्पृश्यता निवारण, मागासवर्गीयांना आरक्षण आदी त्यांचे निर्णय दूरदर्शी होते, असे प्रतिपादन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
         लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने श्रीरामपूर येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी श्री.मुरकुटे यांनी सदरचे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, शाहू महाराजांनी केलेले कार्य हे ऐतिहासिक असेच होते. विसाव्या शतकात जेव्हा जातीयवादाचा पगडा होता त्याकाळात शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा पुरस्कार केला. मागासवर्गीयांना आरक्षण दिले. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेसह अनेकांना त्यांनी शिक्षणासाठी अर्थसहाय्य केले. जाती व्यवस्थेविरुद्ध ते ठामपणे उभे राहिले. शिक्षणाला त्यांनी प्राथमिकता दिली. जे पालक मुलांना शाळेत घालणार नाहित त्यांना आर्थिक दंड करण्याची तरतूद त्यांनी केली. राजर्षी शाहू महाराज हे ख-या अर्थाने सामाजिक समतेचे पुरस्कर्ते होते, असे श्री.मुरकुटे म्हणाले. याप्रसंगी अशोक बँकेचे चेअरमन अ‍ॅड्.सुभाष चौधरी, अ‍ॅड्.उमेश लटमाळे, दशरथ नांगळ, रोहित मालकर, प्रमोद करंडे, विलास नळे, दिलीप शिंदे, पंकज देवकर आदी उपस्थित होते.
अशोक उद्योग समूहाचे वतीने कारखाना कार्यस्थळावरही राजर्षी शाहू महाराज यांचे जयंती निमित्त कारखान्याचे व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यकारी संचालक संतोष देवकर, शेतकी अधिकारी नारायण चौधरी, कार्यालय अधीक्षक विक्रांत भागवत, चीफ अकाउंटंट मिलिंद कुलकर्णी, ऊस विकास अधिकारी विजय धुमाळ, लेबर ऑफिसर आण्णासाहेब वाकडे, सॅनिटेशन इन्स्पेक्टर विलास लबडे, साळवे, दत्तात्रय तुजारे, बाळासाहेब मेकडे आदी उपस्थित होते.

वृत्तसंकलन
समता न्यूज नेटवर्क,
श्रीरामपूर - 9561174111

मा.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संभाव्य अहमदनगर जिल्हा दौऱ्याच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

अहमदनगर जिल्हा माहिती कार्यालय वृत्तसेवा

 भारताच्‍या मा.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अहमदनगर जिल्ह्याचा जुलै महिन्‍यात शिर्डी येथे संभाव्य दौरा
असून दौ-यादरम्‍यान चोख व्यवस्था ठेवण्याबरोबरच अधिकाऱ्यांनी नेमून दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम
 सालीमठ यांनी दिले.मा.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संभाव्य अहमदनगर जिल्हा दौऱ्याच्या पार्श्‍वभुमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. सालीमठ बोलत होते.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, मा. राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवावी. मा.राष्ट्रपती थांबणार आहेत त्या विश्रामगृह तसेच कार्यक्रमस्थळी पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात यावा. सुरक्षा व्यवस्थेबाबत ब्लू बुक मधील सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. मा.राष्ट्रपती ज्या मार्गाने प्रवास करणार आहेत त्याठिकाणी वाहतुकीचे नियमन करण्यात यावे. आवश्यकतेनुसार रस्त्यांची दुरुस्ती करून घेण्यात यावी. मान्यवर भेट देण्यात येणाऱ्या ठिकाणी स्वच्छता राहील यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री.सालीमठ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
संपूर्ण दौऱ्यादरम्यान वीज पुरवठा सुरळीत ठेवावा. रस्त्यावरील सर्व विद्युत तारांची तपासणी करण्यात यावी. अद्यावत आरोग्य पथक सर्व सुविधांसह सज्ज ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
बैठकीस सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकाऱ्यांसह शिर्डी संस्थांनचे अधिकारी उपस्थित होते.

((( संकलन )))
समता न्यूज नेटवर्क,
श्रीरामपूर - 9561174111

पाटबंधारेच्या दुर्लक्षपणामुळे भोकरला पुन्हा पाणी टंचाई*दिवसाआड पाणी,महिलांचे ठिय्या अंदोलन

अंदोलक महिलांच्या साक्षीने तोडले ५ अनाधिकृत मुख्यवाहीनीचे कनेक्शन

भोकर - प्रतिनिधि - वार्ता - 
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे पाटबंधारेच्या हेकेखोरपणामुळे एक महिन्यात दुसर्‍यांदा पाणी टंचाई सुरू झाली असून आमदार कानडेंच्या आदेशाला डावलत पाटबंधारे विभागाच्या सुरू असलेल्या दुर्लक्षीतपणामुळे गावातील नळपाणी पुरवठा योजना पुन्हा दिवसाआड झाल्याने गावात तीव्र पाणी टंचाई भासु लागली आहे. तर दुसरीकडे मुख्यवाहीनीला असलेल्या अनाधिकृत जोडणीमुळे या पाणी टंचाईत आणखी भर पडल्याने संतप्त महिलांनी अचानक ग्रामपंचायतीवर पुकारलेल्या ठिय्या अंदोलनानंतर ग्रामविकास अधिकारी सक्रीय होत संतप्त महिलांच्या साक्षीने अनाधिकृत नळकनेक्शन तोडण्यास आरंभ करत सक्रीय झाल्याने आता सर्वसामान्यांच्या नळाला पाणी येण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. या महिला मुख्य वाहीनेच अनाधिकृत नळकनेक्शन तोडण्यासाठी दिड कीमी ग्रामविकास अधिकार्‍यांसमवेत होत्या.
भोकर गावास नळपाणी पुरवठा योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. गावालगत असलेल्या गावतळ्याजवळील बारवेतून गावास पाणी पुरवठा केला जातो परंतू येथील बारव अचनक नादुरूस्त झाल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून येथील माजी उपसरपंच महेश पटारे व सोसायटीचे संचालक संजय पटारे या पटारे बंधूच्या विहीरीतून गावास पाणी पुरवठा सुरू आहे व या पटारे बंधुंना पर्यायी पाणी व्यवस्था म्हणून गावच्या चौकोणी बारवेतील बदली पाणी देण्यात आले आहे, अशा पद्धतीने येथील नळपाणी पुरवठा योजना सुरू आहे. हि योजना पुर्णत: गावालगत असलेल्या गावतळ्याच्या पाणी उद्भवावर अवलंबून आहे तर गावतळ्यात पाटबंधारेच्या वितरीकेद्वारे पाणी सोडले जाते.
गेल्या मे महिण्यात पाटबंधारे विभागाच्या वितरीका क्र.15 मधून गावास तीव्र पाणी टंचाई असताना व कालवा नियोजन समीतीचे सल्लागार असलेले आमदार लहु कानडे यांनी समक्ष गावात भेट देवून संबधीत कालवा निरीक्षकास सुचना करून ही सुमारे आठवड्यानंतर गावतळ्यात पाणी सोडले ते ही अपुर्‍या प्रमाणात दिल्याने एक महिण्यात गावतळ्याची पातळी खालवली अन् गेल्या सहा दिवसांपासून गावातील नळपाणी पुरवठा योजनेद्वारे दिवसाआड पाणी सोडले जात आहे.
आमदार लहु कानडे यांनी परीसरात पाऊस लांबल्यामुळे मे महिन्याच्या आवर्तनाला जोडूनच शेवटचे आवर्तन घेण्याचा आग्रह धरला त्यास मान्यता मिळत या परीसरातील कालवे पुन्हा वाहते झाले, त्याप्रमाणे गेल्या सहा दिवसांपासून येथील वितरीका क्र. १५' ही वाहती झाली, ग्रामपंचायतीने तातडीने पाटबंधारे विभागास गावतळ्यात पाण्याची नितांत गरज असल्याचे लेखी कळविले. त्याच बरोबर आमदार कानडे यांनी ही शेती बरोबरच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तातडीने भरून घेण्याच्या सुचना दिलेल्या असतानाही हेकेखोर पाटबंधारे विभागाने यावेळी ही या मागणीकडे व आमदारांच्या सुचनेकडे दुर्लक्ष करत केवळ शेतीला प्राधान्य दिले जात असल्याने ग्रामस्थात नाराजीचा सुरू दिसत आहे.
तर दुसरीकडे याच पाणी टंचाईला सामोरे जात असलेल्या येथील इंंदिरानगर परीसरात टेलटँकहुन येणार्‍या पाण्याच्या मुख्यवाहीनीला अनेकांचे अनाधिकृत कनेक्शन असल्याने येथील माध्यमिक विद्यालय प्रांगणातील पाण्याची टाकीत पुरेसा पाणी साठा होत नसल्याने येथे ही तीव्र टंचाई भासत असल्यामुळे येथील महिलांनी अचानक ग्रामपंचायतीवर मोर्चाने येत ठिय्या अंदोलन पुकारत मुख्या वाहीनीचे अनाधिकृत नळकनेक्शन तोडण्याचा हट्ट धरला. अर्थात या विषयावर अनेकदा ग्रामसभा गाजलेल्या असतानाही संबधीतांच्या दुर्लक्षीतपणामुळे अशा प्रकारे मुख्या वाहीनीला व इतरत्र अनाधिकृत कनेक्शनची संख्या मोठी असताना या विषयाकडे सर्वांचे दुर्लक्षच होते.
परंतू या महिलांचा हट्ट बघता येथील ग्रामविकास अधिकारी प्रदिप ढुमणे यांनी प्रसंगावधान ओळखत तातडीने कारवाई सुरू केली. संवेदनशिल विषय असल्याने या महिलांनी दुपारी उशीरापर्यंत ग्रामविकास अधिकारी यांचा पिच्छा सोडलाच नाही. गावातील काही संघटनांच्या पदाधिकार्‍यांचे कनेक्शन तोडल्यानंतर या महिलांचा मोर्चा व ग्रामपंचायतीचा लवाजमा टेलटँककडे राजेंद्र वाकडे यांचे वस्तीपर्यंतची पाहणी करत अनाधिकृत कनेक्शन तोडणी केली. यात काही माजी पदाधिकारी व काही संघटनांचे पदाधिकार्‍याच्या कनेक्शनचा समावेश असल्याचे समजते.
आता आज उर्वरीत मुख्यवाहीनीचे अनाधिकगत तसेच गावातील इतर अनाधिकृत कनेक्शन तोडणीची कारवाई करत अधिकृत नळकेनक्शन धारकांना पुरेश्या दाबाने पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच ज्यांचे कनेक्शन अनाधिकृत व मुख्य वाहीणीला होते त्यांना सक्त सुचना करत त्यांचेकडून नियमानुसार अनामत भरणा घेवून त्यांना उपवाहीनीला कनेक्शन दिले जाणार आहे. दरम्यानच्या काळात जर पुन्हा अशाच प्रकारे अनाधिकृत कनेक्शन जोडणी झाल्यास प्रसंगी पंचनामा करून संबधीतांविरूद्ध सार्वजनीक मालमत्तेच नुकसान केल्याची तक्रार पोलीसांत करण्यात येवून कायदेशीर कारवाई करणार असल्याचे या वेळी ग्रामविकास अधिकारी प्रदिप ढुमणे यांनी सांगीतले.
दरम्यान या कारवाई दरम्यान अनेकांनी काही पदाधिकार्‍यांना संपर्क करत नळतोडणीस विरोध केला परंतू त्यास ग्रामविकास अधिकार्‍यांनी दाद न देता सर्वांप्रमाणे उपवाहीनीला प्राधान्याने कनेक्शन देण्याचे आश्वासन देत कारवाई सुरूच ठेवली. त्यातच येथे सध्या प्रशासकीय सरपंच राज असल्याने आता कुणाचा वशीला लावायचा हा मोठा प्रश्न काहींना पडलेला दिसला तर दुसरीकडे पाणी टंचाईने त्रस्त नागरीकांनी ग्रामविकास अधिकार्‍यांच्या या कारवाईचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.
या ठिय्या अंदोलनात येथील माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष डूकरे यांच्या पत्नी सौ. ज्योती डूकरे, अलका डूकरे, पुजा डूकरे, सरीता डूकरे, अर्चना डूकरे, कमल डूकरे, हिराबाई डूकरे, सोनाली डूकरे, बेबी डूकरे, सुनिता डूकरे, दिपाली शिंदे, अलका शिंदे आदि महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष भाऊराव सुडके, सतीष पवार, सुनिल साळवे, नामदेव वाकडे, गोरख डूकरे, अशोक डूकरे, किरण डूकरे, सुकदेव गायकवाड, सुदाम शिंदे, संतोष गायकवाड, संजय डूकरे, बाळू डूकरे, बबन डूकरे आदि उपस्थीत होते.

((( वृत्तसंकलन )))
समता न्यूज नेटवर्क,
श्रीरामपूर - 9561174111

सुगम्‍य भारत अभियानाच्‍या माध्‍यमातून विकासाची प्रक्रीया अधिक गतिमान करण्यासाठी केंद्र सरकार कटीबध्‍द - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले....

 अहमदनगर जिमाका वृत्तसेवा

सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक न्‍याय देण्‍याची केंद्र शासनाच्या भूमिका असून सुगम्‍य भारत अभियानाच्‍या माध्‍यमातून विकासाची प्रक्रीया अधिक गतिमान करण्यासाठी केंद्र सरकार कटीबध्‍द असल्‍याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्‍याय व सबलीकरण राज्‍यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
केंद्रीय आधिकारीता मंत्रालय आणि सामाजिक न्‍याय विभागाच्‍या माध्‍यमातून दिव्‍यांग व्‍यक्तिंना साधन साहित्‍याचे मोफत वितरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आले.
यावेळी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, जिल्‍हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर, सहायक आयुक्त राधाकिसन देवडे, डॉ.अभिजित दिवटे, बाळासाहेब गायकवाड, श्रीकांत भालेराव, सुरेंद्र थोरात, प्रकाश लोंढे, पप्‍पू बनसोडे आदी उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्‍हणाले की, सामाजिक न्‍याय विभागाच्‍या माध्‍यमातून सुगम्‍य भारत अभियान सुरु करण्‍यात आले आहे. यामध्‍ये आता 21 श्रेणी निर्माण करण्‍यात आल्‍या असून याद्वारे दिव्‍यांगांना न्‍याय मिळवून देताना देशातील 1 हजार 314 सरकारी भवन हे सुगम्‍य बनविण्‍यासाठी पुढाकार घेण्‍यात आला आहे. 35 आंतरराष्ट्रीय विमानतळ, 709 रेल्वेस्‍टेशन, 614 संकेतस्थळ, 19 समाचार चॅनल तसेच 8 लाख शाळा यासर्व सुविधांनी परिपुर्ण करण्‍यासाठी पुढाकार घेण्‍यात आला आहे.
 राज्‍यातही विभागामार्फत समाज घटकांच्‍या उन्‍नतीसाठी 2 लाख 44 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्‍ध करुन देण्‍यात आला असून आतापर्यंत राज्‍यातील 5 हजार 993 विद्यार्थ्‍यांना शिष्यवृत्‍तीसाठी सहकार्य केले असल्‍याचे राज्यमंत्री श्री आठवले यांनी सांगितले.
राज्‍यातील जिल्‍हा पुर्नवसन केंद्र तसेच कौशल्‍य विकास योजनेकरीताही केंद्र सरकारने निधी उपलब्‍ध करुन दिला असून यु.डी.आय.ए योजनेच्‍या माध्‍यमातून 17 लाख दिव्‍यांग व्‍यक्तिंना कार्डचे वितरण करण्‍यात आले आहे. समाजातील प्रत्‍येक घटकाला न्‍याय मिळावा हीच भूमिका केंद्र सरकारची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्‍यांग व्यक्तींसाठी सातत्‍याने सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्‍यांचे सक्षम नेतृत्‍व देशाला पुढे घेवून जात असून केंद्र सरकारच्‍या माध्‍यमातून सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक न्‍यायाचे काम होत आहे. भविष्‍यात दिव्‍यांगाच्‍या आरक्षणाच्‍या बाबतीतही सरकार संवेदनशिल असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. 
खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, यापुर्वी जेष्‍ठ नागरीकांसाठी वयोश्री आणि आता दिव्‍यांग व्‍यक्तिंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली पालकत्‍वाची भूमिका अत्‍यंत महत्‍वाची आहे. आजपर्यंत समाजातील या घटकांचा कोणीही विचार केला नव्‍हता. जिल्‍ह्यातही या योजनेची अंमलबजावणी प्राधान्‍याने केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या माध्‍यमातून वंचितांना न्‍याय मिळवून देण्‍याचे काम होत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. कार्यक्रमात जिल्‍ह्यातील 720 दिव्‍यांग व्‍यक्‍तींना सहाय्यक उपकरणांचे मोफत वाटप करण्‍यात आले. कार्यक्रमाला लाभार्थी व्‍यक्‍ती, त्‍यांचे कुटुंबिय, परिसरातील नागरीक उपस्थित होते.

((( संकलन )))
समता न्यूज नेटवर्क,
श्रीरामपूर - 9561174111

हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव *मा.संजयजी जोशी* यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी : अनुराधा ताई आदिक श्रीरामपूर...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर :- हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव *मा.संजयजी जोशी* यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी सौ.वैशालीताई जोशी,सौ.सायली जोशी,सौ.शिल्पाताई आव्हाड - भारद्वाज व आदित्य आदिक उपस्थित होते.

*- कु.अनुराधा गोविंदराव आदिक*
मा.विश्वस्त - श्री.साईबाबा संस्थान,शिर्डी.
मा.लोकनियुक्त नगराध्यक्षा - श्रीरामपूर नगरपरिषद.
अध्यक्षा - महाराष्ट्र कृषक समाज.

Monday, June 26, 2023

भोकरला चोरीच्या प्रयत्नातील एकास पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले

भोकर - प्रतिनिधि - वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे वणीकरण म्हणून प्रसिद्ध असलेल्या भोकर-कमालपूर रोडलगत राहत असलेल्या एका कुटूंबाच्या घरी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या एकास पकडून पोलीसांच्या ताब्यात देण्यात आल्याची घटना घडली असून या प्रकरणी तालुका पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.
भोकर- कमालपूर रोडलगत सामाजीक वणीकरणाच्या क्षेत्रात सध्या राहत असलेले रविंद्र नवनाथ बर्डे हे कुटूंबियासमवेत घरात झोपलेले असताना रवीवार दि.२५ जूनच्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास घरात कसलातरी आवाज आला म्हणून जागे झाल्यानंतर घरात चोरी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घराच्या बाहेर एकाच्या पाठीमागे पळून एका खड्ड्यात येथील आकाश दत्तू परदेशी यास पाठलाग करून पकडल्याचे रविंद्र पवार हे सांगत आहेत. त्याच्याकडून माझा व पत्नी मोबाईल मिळाला परंतू रोकड मिळाली नाही. सदरच्या व्यक्ती पकडून पहाटेच पोलीसांच्या ताब्यात दिले, यावेळी त्याच्या बरोबर आणखी दोघे किंवा तीघे होते परंतू ते पळूण जाण्यात यशस्वी झाल्याचे बर्डे यांनी सांगीतले.
या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गु र नं. १३२८/२०२३ भादंवि कलम ३८०,५११ प्रमाणे रविंद्र नवनाथ बर्डे यांचे फिर्यादीनुसार येथील आकाश दत्तू परदेशी यांचे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पो.नि.दशरथ चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ. मोहन शिंदे हे करत आहे. दरम्यान पोलीसांत देण्यात आलेला आकाश परदेशी हा अल्पवयीन असल्याने त्याची जामीणवर मुक्तता करण्यात आली असल्याचे पोलीसांकडून समजले.
((( संकलन )))
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

Sunday, June 25, 2023

टेम्पोसह ७३ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल गुटखा पोलिसांनी पकडला ?

पुणे - प्रतिनिधि - समाचार -
नसरापूर  राजगड पोलिसांच्या हद्दीत गुटखा
पकडण्याची मालिकाच सुरु असून मामा-भाच्यांनी विक्री करणेसाठी आणलेला ५६ लाखाचा गुटखा टेम्पोसह स्थानिक गुन्हे शाखा व राजगड पोलिसांनी संयुक्त कारवाई करून एकूण ७३ लाख ८५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पकडला आहे. आडबाजूला लपवलेला टेम्पो क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. कारवाईतील मुद्देमाल ठेवण्यासाठी जागा नसल्याने राजगड पोलीस मात्र हैराण झाले आहे.
सुधाकर कल्याण पानसरे, दिनेश कल्याण पानसरे दोघेही (रा. शिवरे, ता. भोर) आणि ऋत्विक दशरथ मोरे (वय २४, रा. मोरवाडी, ता. भोर) अशी मामा-भाच्यांची नावे असून मुख्य सूत्रधार नजीम (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋत्विक मोरे याला जागेवरच ताब्यात घेण्यात आले असून इतर फरारी आरोपींचे शोध सुरु आहे.
शनिवारी (दि. २४) मोरवाडी (ता. भोर) वनविभागाच्या हद्दीत गुटख्याने भरलेला टेम्पो (एमएच ०७ एजे २९४३) हा आडजागेत लपवलेल्या ठिकाणी पोलिसांनी धडक कारवाई करीत पकडला आहे. शनिवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मोरवाडी येथील वनविभागाच्या हद्दीत टेम्पोमध्ये गुटखा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता ताडपत्रीने झाकलेला आयशर कंपनीचा टेम्पोजवळ ऋत्विक मोरे हा संशयित हालचाल करत उभा असताना मिळून आला. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता उग्र गुटख्याचा वास आला. गुटख्याचा माल हा सुधाकर पानसरे व दिनेश पानसरे यांचा असून माल हा पुढे नजीम नावाचे व्यक्तीला पुणे येथे विक्री करणेसाठी घेवून जाणार असल्याची कबुली ऋत्विकने दिली. टेम्पो, १२० सुतळी पोती, १५ मोठे बॉक्स, दोन बनावट नंबर प्लेट, मोबाईल असा एकूण ७३ लाख ८५ हजार ४०० मुद्देमाल दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक हनुमंत पासलकर, प्रमोद नवले पोलीस हवालदार महेश बनकर, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, अजय घुले, राजगड ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ, सहायक उपनिरीक्षक कृष्णा कदम, नाईक नाना मदने, मयुर निंबाळकर, गणेश लडकत, योगेश राजीवडे यांनी यशस्वी कारवाई केली. सहायक उपनिरीक्षक हनुमंत पासलकर यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ करीत आहे.

====================================
-----------------------------------------------------
सह,संपादक भगवंत सिंग प्रितम सिंग बतरा शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
-----------------------------------------------------
====================================