राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, December 31, 2023

*जागृत देवस्थान डोमेगाव !*


डोमेगाव हे अहमदनगर
जिल्ह्यातील श्रीरामपूर (बेलापूर) तालुक्यातील सुमारे २१ किलोमीटर दूर गोदावरी नदीकाठी वसलेले १५० घरे आणि १५०० लोकवस्तीचे छोटेसे गाव आहे .
या ठिकाणी गुरु ग्रंथ साहेबजींची गुरुमुखी लिपीमध्ये
 हस्तलिखित पोथी असून तेथे गुरुग्रंथजींची इष्टदेव म्हणून पूजा केली जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ठिकाणी एकही शीख व्यक्ती राहत नाही.मुख्यतः हिंदू परिवार तुरळक मुसलमान किंवा इतर धर्माच्या लोकांचे वास्तव्य आहे. गावात गुरुद्वारा शेजारी
 महानुभाव पंथाचे आश्रम असून समोरच दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे, जवळच कमालशाह चा मकबरा असून ढिगु मेघु मातंग संप्रदायाचे स्थान सुद्धा गावात आहे.
साधारण १८० वर्षांपूर्वी इसवी सन १८८४ च्या
 दरम्यान एक उदासी साधू पंजाब मधून तीर्थ यात्रा
 करीत नाशिकवरून नांदेड येथे जाताना या

नदीकिनारी असलेल्या ‌एकांत स्थान बघून थांबले. उदासी संप्रदाय हा गुरुनानक देवजींचे ज्येष्ठ पुत्र बाबा श्रीचंद जी यांनी स्थापन केला होता. हे साधू संसारापासून अलिप्त वृत्तीने राहतात.
 लोककल्याणाची कामे करतात. तपश्चर्या करतात. येथे चक्रधर स्वामींचे पुरातन मंदिरे असून रम्य, शांत स्थान आहे .उदासी साधूंकडे एक पुरातन ग्रंथ होता. दिवस-रात्र त्या ग्रंथाचे वाचन ते करीत .त्यांनी बारा वर्ष तिथे गोदावरी किनारी तप केले. दिवसातून एकदा गावात भिक्षेसाठी जात, त्यातून एक भाग गाईला, एक भाग गोदाईला आणि एक भाग स्वतः गृहण करीत. भिक्षा न मिळाल्यास कधी कधी ते फक्त गोदामाईचे पाणी पिऊन राहत. एकदा लोकांनी विचारले बाबा तुम्ही रात्री गोदावरी काठी काय करता? ते हसून म्हणाले,"मी गोदाई जवळ बोलत बसतो .गाढि नावाचा कुंभार होता त्याने प्रचिती
बघण्यासाठी अमावस्येच्या रात्री काळे कांबळे
 ओढून बाबांच्या पाठीमागे लपला. रात्री बारा
 वाजता बाबांनी गोदामाई कडून पाणी मागितले पण
 माईने पाणी दिले नाही.वारंवार प्रार्थना केल्यानंतरही माई बोलली नाही तेव्हा बाबाजी
 म्हणाले देवी असे पूर्वी कधी घडले नाही .
 माझ्याकडून काही चूक झाली आहे,पाप झाले आहे का ?, जर तू माझ्याशी बोलली नाही मला पाणी दिले नाही तर मला प्रायश्चित करण्यासाठी जलसमाधी घेणे क्षेयस्कर होईल. गोदावरी आई पळभरात बाहेर आली आणि म्हणाली आज तुझी परीक्षा घेण्यासाठी कोणी तुझ्या मागावर आहे.बाबांना वाईट वाटले. ते म्हणाले अशा व्यक्तीचा वंश नाश होवो, जो माझ्या देवीच्या भेटीसाठी अडथळा आणत आहे. तेव्हा तो कुंभार घाबरला आणि गावात जाऊन सर्वांना घडलेली घटना सांगू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व गावकरी
बाबांकडे आले आणि शाप मुक्त करण्याची विनंती करू लागले. परंतु ते बाबांच्या हाती नव्हते. ते म्हणाले जर तुला मुलं झालीच नाही तर वंशनाशाचे दुःख तुला भोगावे लागणार नाही .तो निपुत्रिक राहिला.त्याचे घर गुरुद्वाराच्या मागेच होते ती जागा कालांतराने गुरुद्वारा साहेब साठी खरेदी केली
 गेली.ग्रामपंचायतेने सुद्धा जागा उपलब्ध करून
 दिली. आज तेथे एक भव्य दिव्य गुरुद्वारा साहेब
सुशोभित आहे.
 एकदा गोदावरी नदीला भयंकर पूर आला आणि गाव पूर्णपणे बुडू लागले तेव्हा साधू बाबांनी आपली पोथी डोक्यावर घेतली आणि ते पुराच्या पाण्यात उतरले तसे तसे पाणी ओसरू लागले. अशा प्रकारे जेव्हा जेव्हा नदीला पूर येई तेव्हा बाबाजी पोथी डोक्यावर घेऊन पाण्यात उतरत आणि पाणी उतरू लागे. गावाचे रक्षण होऊ लागले .बारा वर्ष बाबाजी तेथे तपश्चर्या करीत होते. पोथी वाचत होते. त्यानंतर एक दुसरे वृद्ध बाबा तेथे आले त्यांनी पोथीची सेवा केली ती पोथी एका खोलीत ठेवण्यात आली .एकदा पुराचे पाणी गावात शिरले आणि ग्रंथाच्या दर्शनाने पाणी ओसरले. गावाचे रक्षण या पोथीमुळे होते अशी लोकांची श्रद्धा झाली आणि पोथीला रक्षक देवता म्हणून महत्त्व प्राप्त झाले. दरवर्षी स्थानिक लोक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पोथी डोक्यावर घेऊन गावातून कीर्तन करीत फेरी काढू लागले.यात्रा भरू लागली. अशा एका यात्रेत बेडेकर नावाचा एक शिकलकरी व्यक्ती सामान विक्रीसाठी आला होता. त्याने पोथी चे दर्शन घेतले आणि गुरुमुखी भाषेतील गुरु ग्रंथसाहेब जी बघून आश्चर्यचकित झाला .त्याने श्रीरामपूर येथे जाऊन शिख बांधवांना याची माहिती दिली. त्यावेळी सोमय्या शुगर मिलचे मॅनेजर जे.एस. अहुजा साहेब आणि विना साडी सेंटरचे खेमसिंग बत्रा तसेच इतर शीख बांधव डोमेगाव ला जाऊन गुरु ग्रंथ साहेब जी ची पोथी श्रीरामपूरला आणण्यासाठी विनंती करण्यासाठी गेले.परंतु डोमेगाव चे स्थानिक म्हणाले की हे आमचे इष्टदेव आहेत.आम्ही यांना गावाबाहेर जाऊ देणार नाही. नांदेड चे संत बाबाजींनी मध्यस्थी करून डोमेगाव येथेच गुरुद्वारा बांधण्याचा सल्ला दिला. गुरुद्वारा बीरद बाबा (वृद्ध बाबा) चा शुभारंभ श्रीमान संत बाबा हरिनाम सिंग जी यांच्या शुभहस्ते २५ मे १९६८ साली झाला. येथील स्थानिक लोकांचा या ग्रंथावर अतूट विश्वास आहे,त्यांची श्रद्धा आहे की यामुळेच आपले रक्षण होते ६ ऑगस्ट १९६८ देखील पुराच्या पाण्यापासून गावाचे रक्षण झाले.

या हस्तलिखित ग्रंथाची उंची इतर गुरु ग्रंथ
 साहेबांच्या तुलनेने चौपट आहे. पहिल्याच पानावर ग्रंथांची संपूर्णतेची माहिती दिली आहे. १८४४ मध्ये (,माघ सुधी ५ संमत १९०१) म्हणजे हा ग्रंथ इंग्रजांच्या युद्धाच्या वेळी लिहिला गेला असेल. अक्षरांच्या वळणावरून तीन वेगवेगळ्या लोकांनी हा ग्रंथ लिहिला असावा, तसेच शाई कशी बनवली गेली यासंबंधी विधी सुद्धा लिहिली आहे. १००६ पानांचा हा ग्रंथ आहे .याशिवाय श्लोक तथा गोष्ट मल्हार नाल होई, रतनमाला, हकीकत राजे शिवनाभ की, चरित्र ज्योती ज्योत समावने के, अशी जास्तीची प्रकरणे आहेत. यात गुरुतेघबहादूर जी पर्यंत ज्योती ज्योत संबंधी ची माहिती आहे. एक श्लोक "सबकुछ तुमरे हाथ में" महल्ला १०, गुरुगोविंद सिंग असे लिहिले आहे. परंतु गुरू ग्रंथ साहेब जी मध्ये असे अंकित नाही. या पोथीवरून त्या काळाच्या अनेक गोष्टी समजतात. ऐतिहासिक दस्तावेज आहे .फक्त श्रद्धाच नव्हे तर हा एक ऐतिहासिक ठेवा आहे. याचे जतन करणे आपली जबाबदारी आहे.
 डोमेगाव हे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असून याचा प्रचार होणे गरजेचे आहे. सरदार रणजीत सिंग अहुजा हे सध्या गुरुद्वाराचे अध्यक्ष आहेत. गोरे ताई गावाच्या सरपंच आहेत. दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या रविवारी येथे जोडमेला होतो, म्हणजेच
 गुरुशी एकरूप होणे असा अर्थ आहे. यासाठी कथा
 ,कीर्तन, संत समागम होत असतो. यात सर्व
धर्मीयांचा सहभाग असतो.
धार्मिक समभाव वृद्धीगत व्हावा, लोककल्याणाची कामे व्हावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना करते.

🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*संदर्भ:*
सीसगंज पत्रिका नवंबर २००६
कर्नल डॉ. दलविंदरसिंघ गरेवाल
*वाहेगुरुजी का खालसा वाहेगुरुजी की फतेह
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
=================================
*डॉ.कमलजीतकौर बतरा*
श्रीरामपूर - 9890280267
विशेष सहयोग
*डॉ.बापुराव उपाध्ये*
=================================
*पत्रकार राजु मिर्जा*
(ब्यूरो चिफ - नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
=================================




जागृत देवस्थान डोमेगाव !

🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎
🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

हे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर (बेलापूर) तालुक्यातील सुमारे २१ किलोमीटर दूर गोदावरी नदीकाठी वसलेले १५० घरे आणि १५०० लोकवस्तीचे छोटेसे गाव आहे .
या ठिकाणी गुरु ग्रंथ साहेबजींची गुरुमुखी लिपीमध्ये हस्तलिखित पोथी असून तेथे गुरुग्रंथजींची इष्टदेव म्हणून पूजा केली जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ठिकाणी एकही शीख व्यक्ती राहत नाही.मुख्यतः हिंदू परिवार तुरळक मुसलमान किंवा इतर धर्माच्या लोकांचे वास्तव्य आहे. गावात गुरुद्वारा शेजारी महानुभाव पंथाचे आश्रम असून समोरच दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे, जवळच कमालशाह चा मकबरा असून ढिगु मेघु मातंग संप्रदायाचे स्थान सुद्धा गावात आहे.
साधारण १८० वर्षांपूर्वी इसवी सन १८८४ च्या दरम्यान एक उदासी साधू पंजाब मधून तीर्थ यात्रा करीत नाशिकवरून नांदेड येथे जाताना या नदीकिनारी असलेल्या ‌एकांत स्थान बघून थांबले. उदासी संप्रदाय हा गुरुनानक देवजींचे ज्येष्ठ पुत्र बाबा श्रीचंद जी यांनी स्थापन केला होता. हे साधू संसारापासून अलिप्त वृत्तीने राहतात. लोककल्याणाची कामे करतात. तपश्चर्या करतात. येथे चक्रधर स्वामींचे पुरातन मंदिरे असून रम्य, शांत स्थान आहे .उदासी साधूंकडे एक पुरातन ग्रंथ होता. दिवस-रात्र त्या ग्रंथाचे वाचन ते करीत .त्यांनी बारा वर्ष तिथे गोदावरी किनारी तप केले. दिवसातून एकदा गावात भिक्षेसाठी जात, त्यातून एक भाग गाईला, एक भाग गोदाईला आणि एक भाग स्वतः गृहण करीत. भिक्षा न मिळाल्यास कधी कधी ते फक्त गोदामाईचे पाणी पिऊन राहत. एकदा लोकांनी विचारले बाबा तुम्ही रात्री गोदावरी काठी काय करता? ते हसून म्हणाले,"मी गोदाई जवळ बोलत बसतो .गाढि नावाचा कुंभार होता त्याने प्रचिती
 बघण्यासाठी अमावस्येच्या रात्री काळे कांबळे ओढून बाबांच्या पाठीमागे लपला. रात्री बारा वाजता
 बाबांनी गोदामाई कडून पाणी मागितले पण माईने पाणी दिले नाही.वारंवार प्रार्थना केल्यानंतरही माई बोलली नाही तेव्हा बाबाजी म्हणाले देवी असे पूर्वी कधी घडले नाही . माझ्याकडून काही चूक झाली आहे,पाप झाले आहे का ?, जर तू माझ्याशी बोलली
 नाही मला पाणी दिले नाही तर मला प्रायश्चित करण्यासाठी जलसमाधी घेणे क्षेयस्कर होईल. गोदावरी आई पळभरात बाहेर आली आणि म्हणाली आज तुझी परीक्षा घेण्यासाठी कोणी तुझ्या मागावर आहे.बाबांना वाईट वाटले. ते म्हणाले अशा व्यक्तीचा वंश नाश होवो, जो माझ्या देवीच्या भेटीसाठी अडथळा आणत आहे. तेव्हा तो कुंभार घाबरला आणि गावात जाऊन सर्वांना घडलेली घटना सांगू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व गावकरी बाबांकडे आले आणि शाप मुक्त करण्याची विनंती करू लागले. परंतु ते बाबांच्या हाती नव्हते. ते म्हणाले जर तुला मुलं झालीच नाही तर वंशनाशाचे दुःख तुला भोगावे लागणार नाही .तो निपुत्रिक राहिला.त्याचे घर गुरुद्वाराच्या मागेच होते ती जागा कालांतराने गुरुद्वारा साहेब साठी खरेदी केली गेली.ग्रामपंचायतेने सुद्धा जागा उपलब्ध करून दिली. आज तेथे एक भव्य दिव्य गुरुद्वारा साहेब सुशोभित आहे.
 एकदा गोदावरी नदीला भयंकर पूर आला आणि गाव पूर्णपणे बुडू लागले तेव्हा साधू बाबांनी आपली पोथी डोक्यावर घेतली आणि ते पुराच्या पाण्यात उतरले तसे तसे पाणी ओसरू लागले. अशा प्रकारे जेव्हा जेव्हा नदीला पूर येई तेव्हा बाबाजी पोथी डोक्यावर घेऊन पाण्यात उतरत आणि पाणी उतरू लागे. गावाचे रक्षण होऊ लागले .बारा वर्ष बाबाजी तेथे तपश्चर्या करीत होते. पोथी वाचत होते. त्यानंतर एक दुसरे वृद्ध बाबा तेथे आले त्यांनी पोथीची सेवा केली ती पोथी एका खोलीत ठेवण्यात आली .एकदा पुराचे पाणी गावात शिरले आणि ग्रंथाच्या दर्शनाने पाणी ओसरले. गावाचे रक्षण या पोथीमुळे होते अशी लोकांची श्रद्धा झाली आणि पोथीला रक्षक देवता म्हणून महत्त्व प्राप्त झाले. दरवर्षी स्थानिक लोक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पोथी डोक्यावर घेऊन गावातून कीर्तन करीत फेरी काढू लागले.यात्रा भरू लागली. अशा एका यात्रेत बेडेकर नावाचा एक शिकलकरी व्यक्ती सामान विक्रीसाठी आला होता. त्याने पोथी चे दर्शन घेतले आणि गुरुमुखी भाषेतील गुरु ग्रंथसाहेब जी बघून आश्चर्यचकित झाला .त्याने श्रीरामपूर येथे जाऊन शिख बांधवांना याची माहिती दिली. त्यावेळी सोमय्या शुगर मिलचे मॅनेजर जे.एस. अहुजा साहेब आणि विना साडी सेंटरचे खेमसिंग बत्रा तसेच इतर शीख बांधव डोमेगाव ला जाऊन गुरु ग्रंथ साहेब जी ची पोथी श्रीरामपूरला आणण्यासाठी विनंती करण्यासाठी गेले.परंतु डोमेगाव चे स्थानिक म्हणाले की हे आमचे इष्टदेव आहेत.आम्ही यांना गावाबाहेर जाऊ देणार नाही. नांदेड चे संत बाबाजींनी मध्यस्थी करून डोमेगाव येथेच गुरुद्वारा बांधण्याचा सल्ला दिला. गुरुद्वारा बीरद बाबा (वृद्ध बाबा) चा शुभारंभ श्रीमान संत बाबा हरिनाम सिंग जी यांच्या शुभहस्ते २५ मे १९६८ साली झाला. येथील स्थानिक लोकांचा या ग्रंथावर अतूट विश्वास आहे,त्यांची श्रद्धा आहे की यामुळेच आपले रक्षण होते ६ ऑगस्ट १९६८ देखील
 पुराच्या पाण्यापासून गावाचे रक्षण झाले.
या हस्तलिखित ग्रंथाची उंची इतर गुरु ग्रंथ साहेबांच्या
तुलनेने चौपट आहे. पहिल्याच पानावर ग्रंथांची
संपूर्णतेची माहिती दिली आहे. १८४४ मध्ये (,माघ सुधी ५ संमत १९०१) म्हणजे हा ग्रंथ इंग्रजांच्या युद्धाच्या वेळी लिहिला गेला असेल. अक्षरांच्या
 वळणावरून तीन
वेगवेगळ्या लोकांनी हा ग्रंथ लिहिला असावा, तसेच
शाई कशी बनवली गेली यासंबंधी विधी सुद्धा
लिहिली आहे. १००६ पानांचा हा ग्रंथ आहे
.याशिवाय श्लोक तथा
गोष्ट मल्हार नाल होई, रतनमाला, हकीकत राजे शिवनाभ की, चरित्र ज्योती ज्योत समावने के, अशी जास्तीची प्रकरणे आहेत. यात गुरुतेघबहादूर जी पर्यंत ज्योती ज्योत संबंधी ची माहिती आहे. एक
श्लोक
"सबकुछ तुमरे हाथ में"
महल्ला १०, गुरुगोविंद सिंग असे लिहिले आहे. परंतु गुरू ग्रंथ साहेब जी मध्ये असे अंकित नाही. या पोथीवरून त्या काळाच्या अनेक गोष्टी समजतात. ऐतिहासिक दस्तावेज आहे .फक्त श्रद्धाच नव्हे तर हा एक ऐतिहासिक ठेवा आहे. याचे जतन करणे
 आपली
 जबाबदारी आहे.
 डोमेगाव हे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असून याचा प्रचार होणे गरजेचे आहे. सरदार रणजीत सिंग अहुजा हे सध्या गुरुद्वाराचे अध्यक्ष आहेत. गोरे ताई गावाच्या सरपंच आहेत. दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या रविवारी येथे जोडमेला होतो, म्हणजेच गुरुशी एकरूप होणे असा अर्थ आहे. यासाठी कथा ,कीर्तन, संत समागम होत असतो. यात सर्व धर्मीयांचा सहभाग असतो.
धार्मिक समभाव वृद्धीगत व्हावा, लोककल्याणाची कामे व्हावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना करते.
🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎
🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️💮💮💮💮💮💮💮💮💮💮💮💮💮💮💮
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*संदर्भ:* 
सीसगंज पत्रिका नवंबर २००६
 कर्नल डॉ. दलविंदरसिंघ गरेवाल
*वाहेगुरुजी का खालसा।*
*वाहेगुरुजी की फतेह।*
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷<-><-><-><-><-><-><-><-><-><-><-><-><->
*डॉ.कमलजीतकौर बतरा*
श्रीरामपूर - 9890280267
=======
विशेष सहयोग
*डॉ.बापुराव उपाध्ये*
=================================
*पत्रकार राजु मिर्जा*
(ब्यूरो चिफ - नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================



लोकसेवा विकास आघाडीच्या आंदोलनाला यश; गोदाकाठच्या गावांना मिळणार सुमारे ५ कोटींची नुकसान भरपाई


- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली अशोक कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश गलांडे, युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे व अशोक कारखान्याच्या संचालिका सौ. मंजुश्री मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. त्यास अखेर यश येवून गोदाकाठच्या भामाठाण, पढेगांव, मालुंजा,भेर्डापूर आणि नायगांव येथील आपदग्रस्त शेतकऱ्यांना सुमारे ५ कोटींची मदत जाहिर झाली असून संबधीत शेतकऱ्यांच्या बँक खाती लवकरच सदरची
 रक्कम जमा होणार आहे.
            याबाबत अधिक माहिती अशी की, सन २०२२ मध्ये अतिवृष्टी होवून श्रीरामपूर तालुक्यातील बहुतांशी गावांना त्याचा फटका बसला होता. त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय येथे ऑगस्ट २०२३ मध्ये आंदोलन केले होते. या आंदोलनात पुंजाहरी शिंदे, हिम्मतराव धुमाळ, नाना पाटील, ॲड्.सुभाष चौधरी, किशोर बनसोडे, सोन्याबापू शिंदे, दशरथ पिसे, मयुर पटारे, भाऊसाहेब हळनोर, आबासाहेब गवारे, विरेश गलांडे, आदिनाथ झुराळे, बाबासाहेब आदिक, यशवंत रणनवरे, प्रफुल्ल दांगट,ॲड्. उमेश लटमाळे, ॲड्. पृथ्वीराज चव्हाण, जितेंद्र तोरणे, रोहन डावखर, हरिदास वेताळ, गणेश भाकरे, शिवाजी मुठे, अंबादास आदिक, नारायणराव बडाख, अच्युतराव बडाख, रामनाथ सांगळे, राजेंद्र बनसोडे, संदीप शेरमाळे आदीसह लोकसेवा विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या
 संख्येने सहभागी झाले होते.
या आंदोलनास अखेर यश येवून या आपदग्रस्त शेतकऱ्यांना पाच कोटी मदत शासनाकडून मंजूर झाली आहे. याबद्दल माजी आ.भानुदास मुरकुटे, उपविभागीय अधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ व शासनास संबंधित गावच्या शेतकऱ्यांनी धन्यवाद दिले आहेत.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजू मिर्जा*
(ब्यूरो चिफ - नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात लोकाभिमुख विकासकामामुळे भाजपचीच सत्ता येईल - ना.राधाकृष्ण विखे पाटील💐✅🇮🇳

श्रीरामपूर तालुक्यात झालेले परिवर्तन तालुका भाजपमय होईल - ना. विखे
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

शौकतभाई शेख / श्रीरामपूर
श्रीरामपूर शिरसगांव येथील चुरशीच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या गणेशराव मुदगुले यांच्या पॅनल ने इतिहास घडविला करीता ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिरसगांव ग्रामस्थांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना.विखे म्हणाले की,ज्यांनी समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला व विकासकामासाठी योगदान दिले अशा सर्व विभूतीना अभिवादन करतो.तसेच स्व.खा बाळासाहेब विखे यानाही अभिवादन करतो. गणेशराव मुदगुले यांनी शिरसगाव येथे इतिहास घडविला.हरीबाबाचे दर्शन झाले त्यांनी सर्वाना चारी धाम दर्शन घडविले,गोमाता रक्षणासाठी प्रयत्न केले.तीच परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु ठेवली.श्रीरामपूर तालुक्यात झालेले परिवर्तन पाहून श्रीरामपूर भाजपमय होताना दिसते.तीन राज्यात निवडणुका झाल्या त्यात जनतेने एकच विचार केला तो म्हणजे विश्वनेता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागची ९ वर्षात केलेल्या निर्णयातून जे समाज परिवर्तन काम झाले.गरीब माणसाला आधार देण्याचे काम झाले.नवीन कोविडची परीस्थीती निर्माण झाली आहे.मागे सर्वांना मोफत लसीकरण झाले.देशातील ८० टक्के जनतेला मोफत धान्य मिळते त्यास २०२९ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.रेशनकार्ड कोणतेही असो आयुष्यमान भारत योजना सुरु झाली.मोफत दवाखाना उपचार मिळाले. महिलांसाठी ग्रामपंचायतला ५० टक्के व विधानसभा,लोकसभेला ३३ टक्के आरक्षण निर्णय नुकताच घेतला.एसटी बसेसमध्ये महिलांना भाडे सवलत दिली.या सरकारने तुमचे कुटुंब आमची जबाबदारी कार्य सुरु केले. शेतकऱ्यांना २१ कोटी २२ लाख रु. नुकसान भरपाई,रक्कम खात्यावर जमा केले.हे काम करणारे आपले व मोदींचे सरकार आहे.पाणी पुरवठा योजना साठी निधी दिला.खंडकरी जमीनी वर्ग १ मध्ये घेण्याचा मोठा निर्णय झाला.आकारी पडीत जमिनीचा प्रश्न महिन्या दीड महिन्यात मार्गी लागेल.त्या परत केल्याशिवाय राहणार नाही.शिर्डी एमआयडीसी साठी ५०० एकर शेती महामंडळाची जमीन घेतोय,जे शिर्डीला उद्योग येतील तेच श्रीरामपूर एमआयडीसीला येतील.त्यामुळे श्रीरामपूरकरांच्या मुलांना रोजगार मिळेल.आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी एक कोटी रु. दिले आहेत, त्यात तीन महिन्यात जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्मारक उभे राहतील.असे प्रतिपादन महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांनी शिरसगांव येथे तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रा.प.सदस्य सत्कार प्रसंगी केले.
प्रास्तविकात तालुकाध्यक्ष दिपकअण्णा पटारे यांनी सांगितले की शिरसगांव येथे तिरंगी लढतीत ना.राधाकृष्ण विखे पा.यांच्या गटास मतदारांनी निर्विवाद सत्ता गणेशराव मुदगुले व सहकारी यांच्यामुळे मिळाली तालुक्यात अनेक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आल्या आहेत. ना.विखे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे होतील. त्यांनी केलेली विकासकामे पाहूनच मतदान झाले.या हिकाणी अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. स्व.खा. बाळासाहेब विखे यांच्या पुण्यस्मृतीनिमित्त सत्काराचा कार्यक्रम होत आहे.या तालुक्याला ना.विखे यांनी १५ कोटी रु. दिले.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पा. तालुकाध्यक्ष दीपकअण्णा पटारे, जिल्हा सरचिटणीस नितीन
 दिनकर, ज्येष्ठ कार्यकर्ते इंद्रनाथ पा. थोरात,नानासाहेब पवार, भीमा बागुल,प्रकाशआण्णा चित्ते, नानासाहेब शिंदे,उपसभापती अभिषेक खंडागळे,शरदराव नवले, मंजुषा ढोकचौळे, सरपंच राणी वाघमारे,उपसरपंच संजय यादव,गिरीधर आसने भाऊसाहेब बांद्रे,सुरेश मुद्गुले,ग्रामसेवक पी. डी. दर्शने, बी एल कदम, ग्रामस्थ उपस्थित होते.सूत्र संचालन संतोष मते यांनी व आभार प्रदर्शन गणेशराव मुद्गुले यांनी केले.
=================================
-----------------------------------------------
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
==================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

Saturday, December 30, 2023

डॉ.डी.डी. कुंभार लिखित 'कुंभकार : बलुतेदारी -शिक्षण - आत्मपरीक्षण'प्रबोधक आत्मचरित्र


 कुंभार समाजातील सुशिक्षित माणूस लिहू लागला आहे,ही अभिनंदनीय वाटचाल आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कौलव येथील डॉ.डी.डी.तथा दादासाहेब दत्तात्रय कुंभार ह्यांनी लिहिलेले 'कुंभकार :बलुतेदारी -शिक्षण -आत्मपरीक्षण 'हे आत्मचरित्र समाजप्रबोधक आणि सांस्कृतिकदृष्टया मौलिक स्वरूपाचे आहे. प्रकाशक सौ. मालन दा. कुंभार, कोल्हापूर ह्यांनी हे आत्मचरित्र 24 फेब्रुवारी 2023 रोजी प्रकाशित केले. यशवर्धने खटावणे ह्यांनी अनुरूप मुखपृष्ठ काढले आहे. शाहूनगरी, कोल्हापूर येथील भारती मुद्रणालयमध्ये हे पुस्तक छापले आहे.150 रुपये किंमत असलेल्या ह्या पुस्तकाला 112 पृष्ठे आहेत.अनेक संत, महात्मे कार्य करतात, त्यांचा आदर्श घेतला पाहिजे.आपल्या पुस्तकावर मनोगत व्यक्त करताना ह्या पुस्तकाच्या संदर्भात लेखक लिहितात, 
  "अशा पुस्तकांच्या वाचण्याच्या व्यसनामुळे माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व प्रकारचे अनुभव कथन करण्याचा मनोदय झाला "त्यामुळे हे आत्मचरित्र त्यांनी लिहिले आहे. ते पुढे लिहितात, 
"--कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कार्यतत्पर राहणे,म्हणजे यश आणि अपयश यांची जाणीव होणार नाही तसेच ज्ञान व श्रम घेण्याची प्रबळ इच्छा निःस्वार्थी असेल तर जात -धर्म,गरीब-श्रीमंत, आधार (टेकू )इत्यादी आपल्या कार्याच्या आड येत नाहीत.अपयश आल्यानंतर खचून जायचे नाही,कारण तेच अपयश आपल्याला प्रगतीचा मार्ग दाखविते.मी हे आपणासमोर माझ्या आयुष्यात आलेल्या अनुभवातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.देव अनेक रूपकात्मक पद्धतीने प्रत्येकाला मार्गदर्शन करत असतो', परंतु ती ओळखण्याची पात्रता आपण निर्माण केली पाहिजे "
   डॉ. दादासाहेब कुंभार ह्यांची हीच तत्वस्पर्शी जीवनरेखा त्यांच्या आत्मचरित्रात दिसून येते. ह्या पुस्तकात 17 प्रकरणे अनुक्रमणिकेत दिलेले आहेत, त्यातून आत्मचरित्राचे आशयविश्व त्यात सामावले आहे.
  'जन्मभूमी -योनीभूमी -कर्मभूमी 'ह्या पहिल्या लेखात त्यांनी आपले गाव कौलवचे वेगळेपण सांगितले आहे.अशा सुजलाम सुफलाम गावात, पवित्र भूमीत लेखकाचा जन्म 24 फेब्रुवारी 1945 रोजी झाला. ज्या समाजात आपण जन्म घेतला त्याला लेखकाने योनीभूमी म्हटले आहे. त्याचबरोबर कुंभार समाजाची प्रजापती, राजे ह्या नावाची चर्चा त्यांनी केली आहे. कुंभार समाज प्रजेच्या हितावह कामे करीत असल्यामुळे कुंभार समाजासाठी प्रजापती नाव पडले आणि कार्यकुशल कुंभार प्रजेच्या महत्वाच्या गरजा स्वतः भागवितो, म्हणून त्याला खेडेगावात 'राजे'या टोपण नावाने संबोधतात (पृष्ठ 08) नवीन पिढीने शिक्षण घेऊन उद्योग,नोकरी, व्यवसायाच्या स्पर्धेमध्ये उतरून वेगळ्या कर्मभूमीची आस धरली पाहिजे, ही काळाची गरज आहे. (पृष्ठ 09) असे लेखकाने नमूद केले आहे.कुंभार समाज हा बारा 'बलुतेदारी'मधला घटक असल्याचे सांगून सविस्तर लिहिले आहे.'आनंदी गोपाळ -परिवार वृंद 'लेखात कुटुंब परिचय आहे.आजी, आजोबा, आई, वडील, लेखक व त्यांचे पाच भाऊ,दोन बहिणी अशा मोठ्या परिवारात लेखकाचे शिक्षण झाले.आजी साथीत वारल्यावर लेखकाच्या आई सावित्रीवर संसाराची सर्व जबाबदारी आली. लग्नाची वेळीं त्यांचे वडील दत्तात्रय पंधरा -सोळा वर्षाचे होते तर त्यांची आई तेरा -चौदा वर्षाची होती. घरी कुंभारकाम, शेतीकाम भरपूर होते.शिक्षण आणि घरातील कामे करीत लेखक शिकले. 1968 मध्ये त्यांनी बी.एस्सी.कृषी पदवी घेतली. 1977 मध्ये ते एम.एस्सी. झाले. 1986 मध्ये पीएच. डी. झाले. एम. एस्सी. मृद्शास्त्र पदवीसाठी त्यांना फेलोशिपही मिळाली.तेरा वर्षे या क्षेत्रात त्यांनी संशोधन केले.राहुरी, पुणे, कोल्हापूर या क्षेत्रात कार्य केले.कृषी क्षेत्रात प्राध्यपक म्हणून दर्जेदार संशोधन केले. राष्ट्रीय नियतकालिकात त्यांचे पंचवीस शोधनिबंध प्रसिद्ध झाले. राष्ट्रीय चर्चासत्रात त्यांनी सोळा शोधनिबंध सादर केले. शेतकऱ्यांसाठी त्यांचे आकाशवाणी, दूरदर्शनवर अनेक कार्यक्रम प्रसारित झाले. 2003 मध्ये त्यांनी हनुमान भक्त चॅरिटेबल ट्र्स्टची स्थापना करून मंदिराची उभारणी केली.1989 मध्ये त्यांनी श्री रत्नप्पा कुंभार नगर नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. आजही ते संस्थापक, संचालक म्हणून कार्यरत आहेत. आर. के. नगर सो. नं. 1च्या संचालक मंडळात 10 वर्षे ते कार्यरत आहेत. संस्थेचे कार्यालय इमारत, सांस्कृतिक हॉल, बाग इत्यादी कामात त्यांनी योगदान दिले.आपल्या कुटुंब स्थितीविषयी लिहितात, 
 "सन 1982 मध्ये सर्व भाऊ स्वतंत्र झाले. आई संभाजीकडे राहत होती. वडील आनंदरावाकडे. वडील दत्तात्रय कुंभार 2001 मध्ये वारले. आई सावित्रीमाई 2013 मध्ये वारली. आईचे औषधपाणी व खर्च मी महिन्यास करीत होतो. आता भावाच्या मुलांनी त्यांच्या आवडीप्रमाणे व्यवसाय चालू केले आहेत. परंतु चांगले शिक्षण कोणीच घेतले नाही, याची खंत वाटते "(पृष्ठ 23)
   डॉ. दादासाहेब कुंभार आणि त्यांची पत्नी सौ. मालन कुंभार ह्यांनी आपल्या संसाराला आदर्श बनविले. "माझ्या जीवन परिक्रमातील गृहिणी, सहचारिणी व अर्धांगिनी "मध्ये त्यांनी लिहिले आहे, 
  "माझी सहचारिणी अनेक सद्गुणांचा सागर आहे. महत्वाचे म्हणजे ती सुशिक्षित असून सासरच्या खेडवळ वातावरणाशी जुळवून घेते. सासरच्या संबधित लोकांशी माझ्यापेक्षा तिचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत.तिच्या हातचा स्वयंपाक उत्तम असतो, असे अनेक पै -पाहुणे म्हणतात. घरी येणाऱ्या सर्वांचे सारख्या पद्धतीने आदरतिथ्य करते. कपडे व दागदागिन्यांविषयी इच्छा कधी केली नाही."(पृष्ठ 103)
  डॉ. दादासाहेब कुंभार ह्यांची पत्नी बालवाडीत काम करून संसाराला हातभार लावी. मुलगी संगीता एम. एमस्सी.झाली, मुलगा सचिन इंजिनिअर झाला. 2003 मध्ये डॉ. दादासाहेब कुंभार सेवानिवृत्त झाले.सात्रळ येथील तात्यासाहेब जोर्वेकर ह्यांच्या आठवणी त्यांनी चर्चेत सांगितल्या.राहुरी, नगर, सात्रळ परिसरात त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. समाजकार्य, लेखन, वाचन ह्यांची त्यांना आवड आहे. एक सुंदर आणि प्रबोधक असे हे आत्मचरित्र कुंभार समाजातील उच्च शिक्षित आणि सद्गुणी व्यक्तिमत्वाचा आदर्श सांगणारे आत्मचरित्र प्रत्येकाने वाचावे असे उद्बोधक आहे.

=================================
-----------------------------------------------
*परीक्षण :डॉ. बाबुराव उपाध्ये*
श्रीरामपूर जि. अहमदनगर 
भ्रमणसंवाद :9270087640
===================
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================




पाट पाण्याच्या व्यवस्थित नियोजनामुळे गोंडेगाव ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण - सागर बढे


- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
पाट पाण्याच्या व्यवस्थित नियोजनामुळे गोंडेगाव मधील शेतकऱ्यामध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे प्रतिपादन सरपंच सागर बढे यांनी केले  आहे. 
गोदावरी उजवा कालव्यावरील चारी नंबर १९ व २० चे सिंचन शंभर टक्के पूर्ण केल्याबद्दल अधीक्षक आमले साहेब व कार्यकारी अभियंता सोनल शहाणे मॅडम यांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गोंडेगाव मधील समस्त शेतकऱ्यांनी अभिनंदन केले आहे. कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी पुढाकार घेऊन कॅनॉलच्या खोलीकरणाचे काम पूर्ण केले. तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना खरिपाच्या पिकासाठी वेळेवर पाणी देऊन गावतळी भरून दिली . त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली. पाट पाण्याच्या व्यवस्थित नियोजनामुळे सोनल शहाणे यांचे गोंडेगाव मधील शेतकरी व ग्रामस्थांनी  विशेष आभार मानले आहे. यानिमित्ताने उर्वरित चारी दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर*
================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

प्रमोद भोसले व प्रकाश थोरात यांची जिल्हा बँकेच्या कर्ज प्रमाण धोरण कमिटीवर निवड- ससाणे


श्रीरामपूर प्रतिनिधि वार्ता
श्रीरामपूर तालुक्यातील प्रमोद भोसले (रा. वळदगाव) व
 प्रकाश थोरात (रा. उक्कलगाव) यांची अहमदनगर
 जिल्हा बँकेच्या कर्ज प्रमाण धोरण कमिटीवर तज्ञ
सल्लागार पदी निवड झाली.
श्री भोसले व श्री थोरात यांच्या निवडीने शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबतच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी निश्चितच मदत होणार असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी म्हटले आहे. श्री.भोसले व थोरात यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी
 ससाणे बोलत होते. 
यानंतर जिल्हा बँकेच्या कर्ज प्रमाण धोरण कमिटीचे नवनिर्वाचित तज्ञ सल्लागार प्रमोद भोसले म्हणाले की, ज्याप्रमाणे शेळीपालन, मत्स्य पालन, कुकुटपालन या जोडधंद्याप्रमाणे कृषी पर्यटन या व्यवसायांसाठी दहा लाखापर्यंत जिल्हा बँकेने मदत करावी जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. 
यानंतर प्रकाश थोरात म्हणाले की, ऊस सोयाबीन व इतर अल्प मुदत पीक कर्जात जिल्हा बँकेने वाढ करावी. 
याप्रसंगी जि.प.चे माजी सभापती बाबासाहेब दिघे, श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस हेमंत ओगले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, खंडेराव सदाफळ, विलास दाभाडे, राजू चक्रनारायण, कैलास कणसे, बाळासाहेब थोरात, भारत बढे, अरुण खंडागळे, निलेश नागले, अमोल शेटे,अशोक जगधने, सनी मंडलिक, मोहन रणवरे, आबासाहेब माळी, सुनील साबळे, गणेश काते, संजय गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजु मिर्जा*
(ब्यूरो चिफ: नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


नवीन वर्ष 2024 सर्वाना हार्दिक शुभेच्छा भेच्छा...


*दिवस जेव्हा पंख लावतात ...*

*नवीन वर्षाच्या स्वागतासाठी*

*प्रत्येक मन आता सज्ज होतंय*

 *झालं गेलं विसरून जाऊन,*

*पुन्हा नव्याने प्रवाहात येतंय* 

आयुष्य नावाची नदी सतत पुढे पुढे वाहणारी आणि भला बुरा प्रत्येक क्षण आपल्या सोबत पुढे घेऊन जाणारी.
जन्मापासून मृत्यू पर्यंत माणूस वर्ष नावाचे गणितीय आकडे मोजत असतो.या आकड्यातून आपल्या जीवनाचं समीकरणही सोडवत असतो.खरं तर माणसाला आपल्या वयाचे वर्ष दाखवणारे अंक म्हणजे जीवन प्रवासात उभे असलेले मैलाचे दगड भासत असतात.वर्ष बदलतात, महिने बदलतात, दिवस बदलतात पण आज गेलेला दिवस मात्र परत कधीच येत नसतो. खरं तर कालमर्यादा ही प्रत्येक सजीवाला असते.तरी सुद्धा लाभलेल्या या मर्यादेत आलेले नवे वर्ष आपण नव्या जोमाने आणि उत्साहाने साजरे करत असतो.

*दिवस जर पाखरू असते तर त्यांना सोन्याच्या पिंजऱ्यात बंदी करून सोन्याचं धान्य खायला दिलं असतं आणि उडूच दिलं नसतं*

गेलेले दिवस परत येत नसतात आणि येणारे दिवस कसे असतील याविषयी मनात अनिश्चितता असते.मग माणूस यातूनच भूतकाळात रमतो. आयुष्यातलं एक वर्ष कमी होतंय ही खंत ही कुठेतरी मनात लपलेली असते.गेलेले दिवस आठवत असतात.काही चांगल्या आठवणी, काही कटू आठवणी मनात सतत रुंजी घालत असतात.भविष्याविषयीची स्वप्नं,आशा - आकांक्षा आणि उत्सुकता मनात असते. म्हणूनच तर जीवनात येणाऱ्या प्रत्येक नव्या दिवसाकडून आपल्याला काही तरी हवं असतं. सरलेलं हे वर्ष आता आपला भूतकाळ होणार आहे आणि असंख्य अशा आठवणी काळाच्या पटलावर कोरून हे वर्ष कायमचं लुप्त होणार आहे.पण माणूस भूतकाळाच्या साखळदंडाने कर्कचून बांधण्यासाठी जन्माला आलेला नाही तर त्या साखळ्या तोडून तो नव्या भविष्य काळातही तितक्याच आतुरतेने प्रवेशासाठी सज्ज होतो. म्हणूनच तर तो येणाऱ्या प्रत्येक नववर्षाचे स्वागत मनापासून करतो. आयुष्याचं
 सिंहावलोकन करताना काय कमावलं काय गमावलं आणि ओंजळीत काय शिल्लक राहिलं याचा हिशोबही माणूस एकांतात करत असतो. रिकाम्या ओंजळी त्याला त्याच्या अपयशाची जाणीव करून देत असतात तर भरलेल्या ओंजळी आकाश ठेंगणे झाले आहे या भावनेने बांधलेल्या असतात. सगळेच दिवस काही आपले नसतात. काही संघर्षाला दान ही करायचे असतात. म्हणूनच या काळात नव्याने उगवण्यासाठी शांतपणे आतल्याआत कोंडून घ्यावं लागणार असतं,तो धीर तो संयम आपल्या प्रत्येकात यायला लागला कि समजून जावं आता आपण परिपक्वतेच्या उंबरठ्यावर आहोत. यशाचा उन्माद आणि जल्लोष व्यक्त करताना जेव्हा *हे दिवस ही जाणार आहेत* याचे भान माणसाला येते, तेव्हाच तो दुःखाच्या कातरवेळीही संयमित अवस्थेत राहतो. या जगात चिरकाल टिकणारे असे काहीच नाही.सारे काही काळाच्या ओघात नष्ट होणारे आहे ही जाणीव माणसाला माणूस बनायला पुरेशी आहे. जुन्या वाटा बंद झाल्या तरी माणसानं चालणं थांबवायचं नसतं तर जुन्या वाटांना फुटलेल्या पाऊलवाटांवरून नवा प्रवास सुरू करायचा असतो.त्याचप्रमाणे जुने वर्ष जरी संपलं तरी मागचे अनुभव गाठीशी ठेवून या वर्षात येणाऱ्या नव्या अनुभवांना मनात जागा रिकामी करून द्यायची आणि आनंदाला आपलेसे करायचं. ज्याचा त्याचा आयुष्य नावाचा ग्रंथ वेगवेगळ्या संघर्षांनी आणि अनुभवांनी समृद्ध झालेला असतो.जुन्या वर्षात साथीला असणारे आणि आपल्या सुखदुःखात सहभागी असणारे आपले अनेक प्रियजन कदाचित आपल्यात नसतील,
त्यांचा विरह सहन करत सर्वांना पुढं जावचं लागेल.आयुष्य म्हणजे काही फक्त फुलांच्या पाकळ्या अंथरलेला रस्ता नाही तर त्याच रस्त्यावर खाच खळगे आणि काटे ही असणारच.ही तयारी ठेऊन जीवन प्रवासात उतरलेली माणसं पराभवाला घाबरत नाहीत आणि विजयाच्या यशाने हुरळूनही जात नाहीत. 
नव्या वर्षाचा हा आपला प्रवास आपल्याला माणूस म्हणून अधिक समृद्ध करून जावा हीच एक अभिलाषा मनात ठेवून नवीन वर्षाच्या अनंत शुभेच्छा देऊ या.
या वर्षाचा आज शेवटचा दिवस.मावळत्या दिनकराला साक्षी ठेऊन आपण ही जीवनात घडलेले कटू अनुभव विसरून जाऊयात.
उद्या येणारा सूर्योदय सर्वांच्याच आयुष्यात आशेची नविन किरणे घेऊन येवो.
=================================
-----------------------------------------------
*सुजाता नवनाथ पुरी*
      अहमदनगर
     *8421426337*
==================
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================



अहमदनगर - मखदुम सोसायटी व रहमत सुलतान फाऊंडेशनच्यावतीने मोहंमद रफी यांच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘रफी के रंग... गीत गजल के संग..’


*अहमदनगर - मखदुम सोसायटी व रहमत सुलतान
फाऊंडेशनच्यावतीने मोहंमद रफी यांच्या शताब्दी
वर्षानिमित्त ‘रफी के रंग... गीत गजल के संग..’ या
 मैफिलचे दिपप्रज्वलन एड.ललित गुंदेचा यांच्या
 हस्ते झाले. याप्रसंगी सुहास मुळे, धनेष बोगावत,
 अमृत मुथा,इंजि.अभिजित वाघ, युनूसभाई
 तांबटकर, डॉ.कमर सुरुर, एड.अमिन धाराणी,
 संध्याताई मेढे, इरशाद अंजुम, आरिफ सय्यद,
शफकत सय्यद आदि मान्यवर दिसत आहे.*
*नैराश्यावर मात करण्यासाठी गीत-संगीत
 मनोरंजनासोबतच औषधासारखे आहे -

 ॲड.ललित गुंदेचा*
*मोहंमद रफी जन्म शताब्दी वर्षानिमित्त*
*नगरमध्ये गजल-गीतांची मौफिल संपन्न*


अहमदनगर प्रतिनिधि वार्ता
जीवन जगताना जसा श्वास आवश्यक असतो, त्याप्रमाणेच संगीत हा देखील आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक भाग आहे ‘संगीत’हे सुरांचे व सुसंवादाचे मिलन आहे. यामध्ये एखाद्याला खूपच समाधान मिळते तर कोणाला आनंद होतो. जीवनातील नैराश्यावर मात करण्यासाठी गीत-संगीत हे मनोरंजनासोबत औषधासारखे देखील असल्याचे प्रतिपादन अहमदनगर येथील प्रसिद्ध विधितज्ञ ॲड.ललित गुंदेचा यांनी केले.
 मखदुम एज्युकेशन अ‍ॅण्ड वेलफेअर सोसायटी व रहमत सुलतान फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महान गायक मोहंमद रफी यांच्या १०० व्या जयंती शताब्दी वर्षानिमित्त ‘रफी के रंग... गीत गजल के संग..’ या रफींच्या गीतांची मैफिल आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन ॲड.ललित गुंदेचा यांच्या हस्ते करण्यात आले
 याप्रसंगी ते बोलत होते.
 याप्रसंगी जागरुक नागरीक मंच चे अध्यक्ष सुहास मुळे, उद्योगपती धनेष बोगावत, उद्योगपती अमृत मुथा, मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष इंजि.अभिजित वाघ, रहेमत सुलतान फौंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर, मखदूम सोसायटीच्या सचिव डॉ.कमर सुरुर, गाता रहे मेरा दिल ग्रुपचे अध्यक्ष ॲड.अमिन धाराणी, संध्याताई मेढे, मालेगांवचे इरशाद अंजुम, जीवन फौंडेशनचे आरिफ सय्यद आदि मान्यवर उपस्थित होते.
 या मैफिलमध्ये मोहंमद रफी यांची सदाबहार गीते ॲड.अमिन धाराणी, सुनिल भंडारी, दिनेश मंजरतकर, इकबाल बागवान, ॲड.गुलशन धाराणी, प्रशांत छजलानी,अन्वर शेख, डॉ. विवेकानंद कंगे, डॉ.अविनाश मंचरकर, राजेंद्र शहाणे, महेश घावटे, जावेद मास्टर, डॉ.रेश्मा चेडे, विद्या तन्वर, सईद खान यांनी सादर केली.
तर मोहंमद रफी यांच्यावर कवयत्री डॉ.कमर सुरुर यांनी कविता सादर करुन रसिकांची वाह वाही मिळवली. हास्य कवी बिलाल अहमदनगरी यांनी रसिकांना आपल्या हास्य रचनांनी लोळपोळ केले.
ॲड.गुंदेचा पुढे म्हणाले, संगीतामध्ये चिंता,नैराश्य, निद्रानाश आदि रोग बरे करण्याचे सामर्थ्य आहे. संगीतामुळे एकाग्रता सुधारण्यासाठी मोठी मदत होते. संगीत जीवनात आवश्यक आहे. प्रवासात असल्यास एक वेगळाच आनंद संगीत देऊन जाते. लहान मुले सोशल मिडियामुळे संवाद विसरत चालली आहेत, मोबाईलमुळे बालपण हरवून मुले
 मानसिक रुग्ण होत आहे. गीत-संगीताच्या माध्यमातून आयोजकांनी वेगळे व्यासपीठ मुलांना निर्माण करावे. गीत-संगीताची गोडी मुलांना लागेल आणि ताणतणावा मधून मुले बाहेर पडतील, असे ते
 म्हणाले.
प्रास्तविकात आबीद दुलेखान यांनी मोहंमद रफी यांच्या शताब्दी वर्षानिमित्त वर्षभर गीत-संगीताचे विविध मैफिल व उपक्रमांचे आयोजनाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमास के.के.खान, युनूस तांबटकर, आरिफ सय्यद, इंजि.इकबाल सय्यद, दिनेश मंजरतकर,अमिन धाराणी, शफकत सय्यद यांचे
 विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इरशाद अंजुम यांनी केले तर आभार मुस्कान फौंडेशनचे शफकत सय्यद यांनी मानले.

=================================-----------------------------------------------
*पत्रकार आबीद दुलेखान - अहमदनगर*
=========================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================









Friday, December 29, 2023

मुख्य मंत्री एकनाथ शिंदे मनसे प्रमुख राज ठाकरे भेट यांच्यात रंगली चर्चा...


- मुंबई - प्रतिनिधी - / वार्ता -
 मुंबई  वर्षभरापासून प्रलंबित मागण्या मराठी पाट्या, टोलचा मुद्दा आदी कागदावर राहिल्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरुवारी 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी सहाव्यांदा भेट घेतली. दरम्यान, यावेळी प्रलंबित टोल प्रश्नासहित येत्या निवडणुका, धारावी पुनर्विकास प्रकल्प, अयोध्येतील राम मंदिर दौऱ्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. माजी आमदार बाळा नांदगावकर यावेळी उपस्थित होते.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज आणि शिंदे यांच्यात गाठीभेटी वाढल्या आहेत. येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटी होत असल्याने राजकीय
या मुद्द्यांवर चर्चा झाली मुंबईतील विविध विकासकामे,
कल्याण-डोंबिवलीचे प्रश्न, धारावी पुनर्विकास प्रकल्प, राम मंदिर निमंत्रण, टोलचा मुद्दा आणि सरसकट दुकानांवर मराठी पाट्या लावण्याबाबत राज मुख्यमंत्र्यांना भेटल्याचे यावेळी सांगण्यात आले.
वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. राज ठाकरे यांनी डिसेंबर महिन्यात दोनदा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, तर आतापर्यंत सहावी भेट झाली आहे. लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे समजते.

=================================
-----------------------------------------------
: - सह संपादक - रणजित बतरा - संकलन...✍️✅🇮🇳
-----------------------------------------------
=================================




समता स्पोर्टस क्लब आयोजित विविध स्पर्धा उत्साहात यशस्वीपणे संपन्न


- बेलापूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
बेलापूर येथील समता स्पोर्टस क्लबने नाताळ व नववर्षानीमित्त आयोजित रनिंग (मुले),रनिंग (मुली) तसेच सायकलिंग आदी स्पर्धा मोठ्या उत्साहात व यशस्वीपणे संपन्न झाल्या. मुलींच्या रनिंग स्पर्धेत प्राजक्ता गाणार (प्रथम),आरती कोलते (व्दितिय), राजनंदिनी सुखिये (तृतिय) वैष्णवी दरेकर (चतुर्थ) शितल देवढे व माही साळुंके (उत्तेजनार्थ) याप्रमाणे
 बक्षिसे मिळविली.
मुलांच्या रनिंग स्पर्धेत किशोर मरकड (प्रथम), दिनेश पाटील (व्दितिय) प्रविण राऊत (तृतिय), राहुल देशमुख (चतुर्थ) व ओंकार मते (उत्तेजनार्थ) यांनी बक्षिसे पटकाविली. सायकल स्पर्धेत राहुल देशमुख (प्रथम), तुकाराम मरकड (व्दितीय), चैतन्य कोल्हे (तृतिय), अभिषेक अग्रवाल (चतुर्थ ओम सुळे (उत्तेजनार्थ अशी बक्षिसे मिळविली.
स्पर्धा यशस्वीतेसाठी समता स्पोर्टसचे पदाधिकारी,सदस्य तसेच हितचिंककानी प्रयत्न केले.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार अमन सय्यद - बेलापूर*
======================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शनिवारी शिरसगांव नवनिर्वाचित ग्रा.प.सदस्यांचा सत्कार


- श्रीरामपूर - प्रतिनिधि - /वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगांव येथे नवनिर्वाचित शिरसगांव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,सदस्य यांचा व तालुक्यातील ना.विखे पा.यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित ग्रा.प.सदस्य यांचा सत्कार आज शनिवार दिनांक ३० डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ४.३० वाजता शिरसगांव येथील श्री विठ्ठल मंदिर या महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती गणेशराव मुद्गुले यांनी दिली. ना.राधाकृष्ण विखे पा.मंत्री झाल्यानंतर ऐतिहासिक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, त्यात खंडाची जमीन १ वर्गात करणे,दुधाला प्रतिलिटर रु.५ प्रमाणे अनुदान देणे,रु ६००/- मध्ये प्रति ब्रास वाळू उपलब्ध करणे,शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई,त्याचप्रमाणे श्रीरामपूर शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी एक कोटी रु. निधी देण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे त्यांचा श्रीरामपूरकरांच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे.
या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन गणेशराव मुद्गुले,दीपकअण्णा पटारे, नितीन दिनकर,नानासाहेब पवार,शरद नवले, नानासाहेब शिंदे,प्रकाश चित्ते,सुरेश मुद्गुले, अभिषेक खंडागळे,गिरीधर आसने,मारुती बिंगले,सरपंच राणी वाघमारे,उपसरपंच संजय यादव,व सर्व ग्रा.पं.सदस्य ग्रामसेवक पी.डी.दर्शने शिरसगांव यांनी केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी अर्थार्जन करून स्वावलंबी बनावे; माजी आ.मुरकुटे


- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
महिला बचत गटांना विविध स्तरावरुन अर्थसहाय्य मिळते. याचा लाभ घेवून महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून गृहोद्योग, व्यवसाय सुरु करावेत. यातून आर्थिक सक्षम बनून स्वावलंबी व्हावे असे आवाहन अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक माजी
 आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
शहरातील महिला बचत गटांना विविध व्यवसायासाठी अ.नगर जिल्हा बँकेचे संचालक माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे सहकार्यातून १३ महिला बचत गटांना सुमारे १७ लाखाचे कर्ज वितरण श्री.मुरकुटे यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी लोकसेवा विकास आघाडीचे शहर अध्यक्ष नाना पाटील म्हणाले की, अशोक उद्योग समूहाचे सूत्रधार व जिल्हा बँकेचे संचालक माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच अशोक सह.साखर कारखान्याच्या संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांच्या प्रयत्नाने श्रीरामपूर शहरात यापुर्वी ४६ महिला बचत गटांची स्थापना करण्यात आलेली असून सुमारे ५१ लाख रुपयाचे कर्ज वितरण करण्यात आलेले आहे. महिलांनी बचत गटाचे माध्यमातून विविध व्यवसाय सुरु करून आपले कुटूंबाचा विकास करावा. भविष्यातही अशा प्रकारच्या योजना राबविण्यात येणार असून स्थापन झालेल्या बचत गटाच्या महिलांना यात प्राधान्य देण्यात येणार आहे असे ते
 म्हणाले.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे कार्यालय अधिक्षक बाबासाहेब खर्डे यांनी महिला बचत गटाविषयी सविस्तर माहिती दिली व बचत गटाचे आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने करावे, आर्थिक व्यवहार करतांना काय काळजी घ्यावी, यावर उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब मुळे, सामाजिक कार्यकर्ते गणेश छल्लारे, जिल्हा बँकेचे शाखाधिकारी राजेंद्र जगधने, शाखाधिकारी अशोक पटारे, प्रमोद करंडे, बाळासाहेब शिंदे, शंकरराव डहाळे, बाबासाहेब थोरात, सौ.शालिनी कोलते, सौ.संगीता शिंदे, सौ. अनिता सुर्यवंशी यांचेसह महिला बचत गटाच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या. शेवटी नाना पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार इम्रान एस.शेख - श्रीरामपूर*
================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

जळगाव (जामोद) येथे आयोजन राज्यभरातील..... पत्रकार होणार सहभागीअनेक मान्यवरांची राहणार उपस्थिती💐✅🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
माश्री.यदुजी जोशी
 (सहयोगी संपादक दैनिक लोकमत मुंबई) तथा अध्यक्ष पत्रकार अधिस्कृती समीती महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
मा.श्री.खा.प्रतापराव जाधव
अध्यक्ष: केंद्रीय संवाद व माहिती
 तंत्रज्ञान समिती भारत सरकार
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
मा.श्री.आ.डॉ.संजयजी कुटे
(माजी मंत्री महाराष्ट्र राज्य)

जळगाव (जामोद) येथे आयोजन
 राज्यभरातील पत्रकार होणार सहभागी
अनेक मान्यवरांची राहणार उपस्थिती

जळगांव - जामोद - / प्रतिनिधी -
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे एकदिवसीय खुले राज्यस्तरीय अधिवेशन गुरुवार दि. ४ जानेवारी २०२४ रोजी जळगाव (जामोद) येथील बऱ्हाणपूर रोडवर असलेल्या देवाशिष लॉन्स याठिकाणी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली. 
या अधिवेशनाचे आयोजक अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ (भारत) असुन संयोजक आम्ही
जळगांवकर पत्रकार आहे.
या अधिवेशनाच्या प्रथम सत्रात सकाळी १० ते दुपारी १ वाजतापर्यंत उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी मंत्री, आमदार डॉ. संजय कुटे हे असणार आहे,
 तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय संवाद व माहिती तंत्रज्ञ समिती भारत सरकार चे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव,तसेच
प्रमुख उपस्थिती म्हणून खामगांंव विधानसभा मतदार संघाचे आमदार आकाश फुंडकर, राज्य पत्रकार अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष तथा दै. लोकमत मुंबई चे सहयोगी संपादक यदु जोशी, विशेष उपस्थिती म्हणून आय.एन.एस. समितीचे कार्यकारी सदस्य तथा दै. हिन्दुस्थानचे प्रबंध संपादक विलास मराठे, अमरावती विभागीय अधिस्विकृती समितीचे सदस्य तथा दै. वृत्तकेसरी अमरावतीचे संपादक जयराम आहुजा आदींची उपस्थिती राहणार आहे. 
तर व्दितीय सत्र दुपारी २.३० वाजता ते ४ वाजतापर्यंत होणार आहे. या सत्राला प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉ. स्वाती संदिप वाकेकर, कृ.उ.बा.स. जळगावचे सभापती प्रसेनजीत पाटील, राजर्षी शाहु परिवार तथा संकल्पक वन बुलढाणा मिशनचे अध्यक्ष संदिप शेळके, दै. महासागरचे संपादक श्रीकृष्ण चांडक, अमरावती विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष रवींद्र लाखोडे, नागपूर विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष रमेश कुळकर्णी, अमरावती विभागीय अधिस्विकृती समिती सदस्य राजेंद्र काळे बुलढाणा, सुरेंद्रकुमार आकोडे, गोपाल हरणे यांची उपस्थिती राहणार आहे.
 तर समारोपीय सत्र हे दुपारी ४ ते दु. ५ वाजतापर्यंत राहणार आहे. या सत्राच्या अध्यक्षस्थानी अ.भा. ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने राहणार असुन प्रमुख उपस्थिती म्हणून अ. भा. ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष युसूफ खान यांची उपस्थिती राहणार आहे. यादरम्यान अधिस्विकृती बाबत मार्गदर्शन व आजची पत्रकारीता या विषयावर राज्य पत्रकार अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी हे मार्गदर्शन करणार आहे.
तरी या अधिवेशनाला राज्यातील सर्व पत्रकार बंधुनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने, केंद्रीय कार्याध्यक्ष युसूफ खान, केंद्रीय महासचिव सुरेश सवळे, केंद्रीय सचिव अशोक पवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख, महिला मंच प्रदेश अध्यक्षा जयश्री पंडागडे, केंद्रीय उपध्यक्ष राजेंद्र भुरे , केंद्रीय कोषाध्यक्ष अशोक यावूल, केंद्रीय सदस्य माणिक ठाकरे, प्रदीप जोशी, केंद्रीय विधी सल्लागार ॲड. किरण भुते, केंद्रीय संपर्क प्रमुख प्रा. रवींद्र मेंढे, केंद्रीय सदस्य बाळासाहेब सोरगीवकर, संजय कदम , मीना राहिज, जोशीला पगारीया, वर्षा घाडगे, कांचन मुरके , भावना सरनाईक , अनुप गवळी , प्रताप मोरे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष व अ. भा. ग्रा. पत्रकार संघ, जळगाव (जामोद) तालुका कार्यकारीणी , जळगांवकर पत्रकार यांनी केले आहे. 
सदर अधिवेशनामध्ये राज्यभरातील पत्रकार बांधव सहभागी होणार असल्याची माहिती अ. भा. ग्रा. पत्रकार संघाचे प्रसिध्दी प्रमुख शहजाद खान व सागर सवळे
 यांनी दिली.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

Thursday, December 28, 2023

फेथ गॉस्पेल सेंटर ए जी चर्च मध्ये नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा💐✅🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता
येथील फेथ गॉस्पेल सेंटर ए जी चर्च आदर्शनगर,श्रीरामपूर ह्या चर्च मध्ये ख्रिस्तजयंती ख्रिसमस नाताळ सण चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह विजय केदारी यांचे प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी शहरातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, नाताळ सणानिमित्त शहरातील अनेक मान्यवरांनी चर्चला भेट देऊन उपस्थित सर्व ख्रिस्ती बांधवाना नाताळच्या शुभेच्छा दिल्या,त्यात प्रामुख्याने श्रीरामपूर चे आमदार लहुजी कानडे, माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व माजी उपनगराध्यक्ष करणदादा ससाणे,
माजी उपनगराध्यक्ष दिलीप नागरे,राष्ट्रवादीचे लकी सेठी, सामाजिक कार्यकर्ते विजय शेलार,श्री. भांड, डॉ.जमदाडे,
डॉ.विवेक मकासरे आदिनी सर्वाना शुभेच्छा दिल्या. 
यावेळी सर्व मान्यवरांचा चर्चेचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह विजय मार्टिन केदारी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्का
केला.नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये विविध
 कार्यक्रमांच नियोजन करण्यात आले होते.
यावेळी महिला,पुरुषांसाठी व लहान मुलांसाठी ख्रिस्तजयंती निमित्त गीतगायन स्पर्धा, नृत्यस्पर्धा,चमचालिंबू स्पर्धा, संगीतखुर्ची स्पर्धा तसेच बायबल सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सर्व स्पर्धकांना चर्चच्यावतीने बक्षिसे देण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभीजीत केदारी, सुयश मकासरे,आशुतोष केदारी, निलेश वेव्हारे,अभिषेक पडघलमल,विकास मकासरे, छाया घोरपडे,संगीता मकासरे,श्री. तांबे, ग्याब्रिएल केदारी,सुनील शिंगाडे,स्वप्नील वाघमारे,सनी वाघमारे,सिस्टर ठोंबरे,मंगल औटी,मीना लबडे, प्रीती कांबळे, तृप्ती मकासरे, श्रद्धा केदारी,वैशाली केदारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एस. कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन विश्वरंजन मकासरे यांनी मानले.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार दीपक कदम - श्रीरामपूर*
=============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

अन्याय अत्याचार निर्मुलन समितीतर्फे विविध नागरी समस्यांप्रश्नी कळवण तहसीलदारांना निवेदन


वजीर - शेख - / पाथर्डी -
अन्याय अत्याचार निर्मुलन समिती तर्फे महागाई व बेरोजगारीच्या विरोधात तसेच गायरान जमीनी आदिवासींना मिळावीत व निराधार वृध्दापकाळ योजनेची प्रलंबित अर्ज मंजूर व्हावेत या मागणीकरीता कळवण तहसील कार्यालया समोर निदर्शने आंदोलन करुन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
भारत सरकार अंतर्गत नोंदणीकृत असलेली अन्याय अत्याचार निर्मुलन समितीतर्फे विविध सामाजाभिमुख उपक्रम सातत्याने राबविले जातात, तथा अन्याय अत्याचार निर्मूलनाप्रश्नी सातत्याने आवाज उठविला जातो.
करीता या सामाजिक संघटनेमार्फत कळवण तहसील कार्यालया समोर महागाई व बेरोजगारीच्या विरोधात तसेच भेंडी येथील गायरान जमीनी साठ वर्षापासून ताब्यात व करणाऱ्या मागासवर्गीय आदीवासींच्या नावावर करण्यात यावीत तसेच शिधापत्रिका आणि वृध्दापकाळ व संजयगांधी निराधार योजनेंतर्गत प्रलंबित अर्ज त्वरित मंजूर करण्यात यावेत आदी मागण्यांबाबत समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष व रिपब्लिकन पार्टी आँफ इंडीया चे राज्य उपाध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे नेतृत्वाखाली तर जिल्हाध्यक्ष संजयबाबा गायकवाड यांचे उपस्थितीत निदर्शने आंदोलन करण्यात येवुन तहसीलदार रोहीदास वारुळे यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येवून घोषणाबाजी करण्यात आली तर लक्ष वेधण्यासाठी रॅलीने जावून तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले. या निदर्शनात समितीचे पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष दिनेशभाऊ आहीरे, जिल्हा संघटक संतोषभाऊ शेजवळ, तालुकाध्यक्षा शर्मिलाताई गांगुर्डे, भेंडी सरपंच व शाखाध्यक्ष कुसुमताई वाघ, हौसाबाई पवार, शिला वाघ, वामन बागुल, चिंधा वाघ,गोरख पवार, इंदुबाई बागुल, बायटाबाई माळी, लताबाई कांबळे, लक्ष्मीबाई बर्डे, चंद्राबाई कुवर, फुलाबाई जगताप आदींसह असंख्य महीला,पुरुष कार्यकर्ते आदि उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजू मिर्जा*
(ब्यूरो चिफ - नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================



Wednesday, December 27, 2023

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन


अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:

शैक्षणिक वर्ष सन २०२३- २४  साठी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती  योजनेचा लाभ घेण्यासाठी  विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज  करण्याचे आवाहन सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. 
जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग तसेच अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठयक्रमांशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणे व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेशित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आदी योजनांचे नवीन अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवरील https://mahadbt.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ ११ ऑक्टोबर २०२३ पासून सुरु करण्यात आलेले आहे.
 इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यानी ऑनलाईन अर्ज भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावेत.ऑनलाईन अर्ज भरल्याची प्रत महाविद्यालयामध्ये सादर करावी असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

=================================
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
------------------
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------

दिव्यांगांनी योजनेच्या लाभासाठी ४ जानेवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत

अहमदनगर जिमाका वृत्तसेवा

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याच्या योजनेस शासनाने मान्यता दिली असुन जिल्ह्यातील अधिकाधिक दिव्यांगानी योजनेच्या लाभासाठी ४ जानेवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि‍ विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक संतोष शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
 दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगानी https://evehicleform.mshfdc.co.in या लिंकद्वारे ४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०,०० वाजेपर्यंत अर्ज करावा, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
=============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

अहमदनगर-पुणे महामार्गावरील वाहतुकीच्या मार्गात बदल




अहमदनगर जिमाका वृत्तसेवा
पुणे येथे १ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामुळे अहमदनगर-पुणे महामार्गावर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता असल्याने ही वाहतुक सुरळीत रहावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१चे कलम ३३ (१) (ब) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करत ३१ डिसेंबर २०२३ ते २ जानेवारी, २०२४ रोजी सकाळी ६.०० वाजेपर्यंत अहमदनगर-पुणे बेलवंडी फाटा येथुन पुण्याकडे जाणारी तसेच अहमदनगरकडून सरळ पुणेकडे जाणाऱ्या सर्व प्रकारची वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जारी केले आहेत.
अहमदनगर-पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथून पुणेकडे जाणारी वाहने बेलवंडी फाटा- देवदैठण - धावलगांव, पिंपरी कोळंडर-उक्कडगांव-बेलवंडी-
अहमदनगर दौंड महामार्गावरुन -लोणी व्यंकनाथ - मढे वडगांव- काष्टी-दौंड-सोलापुर पुणे मार्गे पुणेकडे जातील. अहमदनगरकड़ून सरळ पुणेकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक कायनेटीक चौक-केडगांव बायपास-अरणगांव बायपास- कोळगांव -लोणी व्यंकनाथ- मढे वडगांव-काष्टी-दौंड सोलापुर- पुणे मार्गे पुणेकडे जातील.
अहमदनगरकडून पुणेमार्गे मुंबई, नवी मुंबई,ठाणेकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक कल्याण बायपास- आळेफाटा-ओतुर- माळशेज घाट मार्गे जातील. बेलवंडी फाटा येथून पुणेकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
हा आदेश शासकीय वाहने, पेरणे ता. हवेली येथे जय स्तंभास मानवंदाना व अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या नागरीकांची वाहने,ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड व आवश्यक कारणास्तव स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नसल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
=============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================