राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, June 15, 2023

महसुल सहाय्यकला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगे हात पकडले ?

शेवगाव - प्रतिनिधि - वार्ता -

तहसिल कार्यालयात चॅप्टर केसमध्ये मदत करण्यासाठी तसेच दोन मुलांना सबजेलमधून सोडण्यासाठी मदत करण्याचे सांगत चार हजार रूपयांची लाच स्विकारताना शेवगाव तहसिल कार्यालयातील महसुल सहाय्यकास नाशिक लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली.संतोष महादेव गर्जे (38) असे पकडण्यात आलेल्या महसुल सहायकाचे नाव आहे. बुधवारी दुपारी शेवगाव तहसिल कार्याल्यात हा सापळा रचनण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या दोन मुले व एक भाचा यांना सबजेलमधून सोडवण्यासाठी मदत करण्याचे अश्वासन तसेच तहसिल कार्यालयात चॅप्टर केस दाखल झाल्यानंतर त्यामध्ये मदत करण्याच्या बदल्यात प्रत्येकी 2 हजार रूपये या प्रमाणे गर्जे याने तक्रारदाराकडे मागणी केली होती. तडजोडी अंती ही रक्कम 4 हजार रूपये ठरली होती.तक्रारदार यांनी याबाबात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील विभागीय कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार नाशिक येथील पथकाने शेवगावच्या तहसिल कार्यालयात आज सापळा रचला होता. पैसे स्विकारताना पथकाने गर्जे यास ताब्यात घेतले. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------------------------------------------===================================::- कार्य.संपादक.भगवंत.सिंग प्रितम सिंग बतरा...शब्द ✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
===================================----------------------------------------------------

*येणारा काळ शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षासाठी उज्वल, शिवसैनिकांनी तन मन धनाने संघटना वाढीसाठी प्रयत्न करावेत; जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे ?

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
येणारा काळ हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षासाठी अतिशय उज्वल असून शिवसैनिकांनी तन मन धनाने संघटना वाढीसाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी केले.
नगर जिल्हयातील शिवसेनेच्या प्रथम शाखेचा ४० वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने भव्य कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ४० वर्ष हा काळ खूप मोठा आहे तरी आजही शिवसैनिकांचा उत्साह तसाच आहे याचे मोठे कौतुक वाटले.
या प्रसंगी दक्षिण शिवसेना जिल्हा प्रमुख श्री राजेंद्र दळवी, 
प्रथम शाखेचे शाखा प्रमुख सदा कराड,संघटक सुधा तावडे, विजयभाऊ तिवारी, ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा प्रमुख अशोक थोरे, माजी उप जिल्हा प्रमु जिल्हा प्रमुख शेखर दुब्बैया, शिवसेना नेते अशोक नांगर नोबल हॉस्पिटलचे ॲडमिन डॉ.टेंगे, सिव्हील सर्जन डॉ.वसंतराव जमधडे,उप तालुका प्रमुख विजय बडाख,विजय नगर कर, गोर्डे महाराज, हरीश कुलकर्णी,अझीम पठाण आदीसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची पूजा करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
  या प्रसंगी बोलताना दक्षिण जिल्हा प्रमुख राजेन्द्र दळवी यांनी शाखेस शुभेच्छा देवून आम्ही नगर ला राहतो तरी आम्हाला कधी ही आवाज दिल्यास आम्ही हजर राहू असे आश्वासन देऊन त्यांनी कार्या बद्दल समाधान व्यक्त केले. शेवटी गणेश कराड यांनी आभार मानले.

(((संकलन : समता न्यूज नेटवर्क)))



उम्मती सोशल वेल फेअर सोसायटी तर्फे गुणवंत विधार्थी सत्कार सोहळा ?

सालाबादप्रमाणे यंदाही *'उम्मती फाउंडेशन'* श्रीरामपुर तर्फे इयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडावी आणि त्यांना भावी वाटचालीकरिता प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने..

*गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे*
* करिअर मार्गदर्शक *
डॉ. योगेश अरूण पुंड
M.Sc., M.Ed., Ph.D., SET, DSM, CTEDT, TAIT
मा. असिया मॅडम (न्यायाधीश)
(न्यायालय, श्रीरामपूर)
प्रोफ. जलाल पटेल.
(Senior Lecturer Borawake College)

तरी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी, पालकांनी तसेच शिक्षकवृदांनी उपस्थित रहावे, तज्ञ व्यक्तींकडून करियर मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे सदर सोहळ्यात विद्यार्थ्यांना
आयोजन करण्यात आलेले आहे, तरी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी, पालकांनी तसेच शिक्षकवृंदानी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन *उम्मती फौंडेशनतर्फे* करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सदर सोहळ्यात विद्यार्थ्यांना तज्ञ व्यक्तींकडून करियर मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे
*दिनांक*-रविवार दि.18 जुन 2023 रोजी सायंकाळी 6 वा.
*स्थळ*- यशवंतराव चव्हाण नगरपालिका सभागृह, नगरपरिषद शिवाजी रोड, श्रीरामपूर.
पारितोषिकाचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक
*संपर्क*
सोहेल बारूदवाला 8698989894
डॉ. तौफिक शेख
फिरोज पठाण सर 9273831398
9130006785
असलम सय्यद (कोहिनूर) अॅड. अरिफ शेख डॉ. सुर्दशन रानावडे

इरफान शेख वसिम जहागिरदार ईसाक शेख आरसोहेल शेख अलिम बागवान युसूफ लखाणी फारूक मेमन समिर दोस्ती
शफिकभाई शेख
माजिद मिर्झा डॉ. एथेशाम
शहनवाज जनाब
*स्थळ*
यशवंतराव चव्हाण सभागृह, श्रीरामपूर नगर पालिका, शिवाजी रोड, श्रीरामपूर
टिप : सदर सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांबरोबर विद्यालयाच्या प्राचार्याचाही सन्मानचिन्ह देऊन यथोचित देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांनी गुणपत्रकची झेरॉक्स कॉपीसोबत घेऊन येणे..

-------------------------------------
==========================
टीप : -✍️✅️🇮🇳.प्रभावशैली...अक्षर,चित्र.स्पष्ट, पाहण्यासाठी...(वेब )...झूम 🔎🔍 चा प्रयोग करा
=======================
----------------------------------






Tuesday, June 13, 2023

बॅटरी व मोटारसायकल चोरांचा सुळसुळाट नाऊर परिसरात ?

नाऊर - वार्ताहर - वार्ता -

श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील शेतकऱ्यांच्या बॅटऱ्या चोरीच्या घटनेनंतर आता मोटारसायकल चोऱ्या वाढल्या आहेत. या परिसरातून दोन मोटारसायकलींची चोरी झाली आहे.नाऊर येथून राहत्या घरापासुन परवा दि. 11 रोजी पहाटे 3 ते 5 च्या सुमारास नवाज पटेल यांचे स्नेही समिर पठाण (रा.माणिक दौंडी ता पाथर्डी) यांची होंडा कंपनीची शाईन (क्र. एमएच 20 इएक्स 8751) ही गाडी तर काल दि. 12 रोजी पहाटेच्या सुमारास शिक्षक अरुण शिंदे यांची बजाज डिस्कव्हर (नं. एमएच 17 एयु 4060) ही गाडी चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.मागील आठवड्यातच खैरीचे अॅड. दिनेश पुंड व पत्रकार संदीप जगताप यांची नव्या ट्रॅक्टरच्या बॅटरीची चोरी झाली होती. या चोरांचा थैमान वाढला असून त्वरीत बंदोबस्त करावा,अशी मागणी ग्रामस्थांतून
करण्यात येत आहे.श्रीरामपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून जुगार सोरट, दारू, रात्रीची बिनधास्तपणे चालणारी अवैध वाळू वाहतूक यांना तालुका पोलिसांचा समरी पावर धाक उरला नसल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी पोलिस उपाधिक्षक संदीप मिटके यांचेसह तत्कालिन सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांनी गुन्हेगारीवर पूर्ण पणे थरकाप वचक ठेवला  होता. मात्र सध्या तालुका पोलिस ठाणे बघ्याची भूमिका घेत आहे. अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांनीच यात स्वःत लक्ष घालण्याची गरज आहे.




पुष्पगुच्छ वा मिठाईऐवजी झाडाचे रोप किंवा शैक्षणिक साहित्य आणा वाढदिवसाच्या निमित्त - राज ठाकरे...

(मुंबई) - प्रतिनिधि - उत्तसेवा -
मुंबई : - वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येताना कोणीही पुष्पगुच्छ किंवा मिठाई न आणता येताना एखाद्या झाडाचे रोप किंवा शैक्षणिक साहित्य घेऊन यावे, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिक तसेच हितचिंतकांना केले आहे. वाढदिवसानिमित्त जमणारे साहित्य हे गरजू विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.राज ठाकरे यांचा १४ जूनला वाढदिवस आहे. या दिवशी भेटायला येताना काय
करावे, याबाबत त्यांनीच पदाधिकाऱ्यांना पत्र लिहिले असून त्यांनी हे आवाहन केले आहे. राज यांना वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून मनसैनिक मुंबईत 'शिवतीर्थ' बंगल्यावर दाखल होत असतात. अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते हे पुष्पगुच्छ आणि मिठाई घेऊन येतात. यंदा मात्र हे नको असे आवाहन करणाऱ्या पत्रात राज यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून
महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात. पण यावर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की, कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका.
तुम्हाला अगदीच काही आणावेसे वाटत असेल तर येताना झाडाचे रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसेच एखादे छोटेसे शैक्षणिक साहित्य आणा. तुम्ही दिलेली झाडांची रोपे आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ. आणि जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणाल ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या या विनंतीचा नक्की मान ठेवाल, याची मला खात्री आहे.
----------------------------------------------------===================================
: - राजु मिर्जा शब्द...🖊️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता ...+919730595775
===================================
----------------------------------------------------

Monday, June 12, 2023

*भोकरची कु.अश्वीनी काळे सीईटी*परीक्षेत* ९९.६७ टक्के *गुण मिळवत उत्तीर्ण***

भोकर - प्रतिनिधि - वार्ता -

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील शेतकरी  कु.अश्वीनी पोपट काळे हिने बारावी नंतर नुकत्याच संपन्न झालेल्या सीईटी (एम एच टी) परीक्षेत ९९.६७ टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाली आहे. तीचे या सुयशाबद्दल सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.
भोकर येथील प्रगतशिल शेतकरी पोपट बबनराव काळे यांची कन्या कु.अश्वीनी पोपट काळे हिने बारावीचे परीक्षेत श्रीरामपूर येथील रावबहादुर नारायणराव बोरावके महाविद्यालयात विज्ञान शाखेत ८९.६७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला होता. तसेच येथील दिव्य दयाचंद इंग्लीश स्कुलमध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला होता.
त्यानंतर नुकत्याच संपन्न झालेल्या एमएचटी सिईटी परीक्षेत पी सी बी ग्रुप मध्ये ९९.६७ टक्के गुण मिळविले आहेत. तीचे या यशाबद्दल सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे. तीच या यशाबद्दल अशोक कारखाण्याचे उपाध्यक्ष पुंजाहरी शिंदे, सोसायटीचे अध्यक्ष किशोर छल्लारे, उपाध्यक्षा सुमन मते, ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक महेश पटारे, संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश माळवदे, उपाध्यक्ष भाऊराव आबुज, पोलीस पाटील बाबासाहेब साळवे आदिंनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))

हसविणारे ग्रामीण विनोदी लेखक ! नामदेवराव देसाई दुःखात लोटून गेल !!

 जिल्ह्यातील एक लोकप्रिय ग्रामीण विनोदी लेखक नामदेवराव देसाई म्हणजे आपल्या लेखनाद्वारे,भाषणाद्वारे  सर्वांना खळखळून हसविणारे व्यक्तिमत्व होते.

 (अहमदनगर) - प्रतिनिधि - उत्तसेवा ---
04 डिसेंबर 1939 रोजी जन्म झालेले नामदेवराव दामोदर देसाई यांचे 12 जून 2023 रोजी निधन झाले.84 वर्ष आयुष्य लाभलेले नामदेवराव देसाई यांचे गाव नाऊर ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर असून ते सध्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कोळगांव वास्तव्य करीत होते. 12 जून 2023 रोजी नामदेवराव देसाई यांचे निधन झाले नि ही वार्ता समजताच जनसमुदाय गोळा झाला.त्यांच्या जाण्याने जणू एकाकीपण उरले आहे.कोळगाव येथे त्यांचा मुलगा नितीन नामदेवराव देसाई शेती व्यवसाय करतात.शेतशिवारी श्रमसाधना करीत नामदेवरावांनी बी.एस्सी.केले. बेलापूर येथील जे. टी.एस. हायस्कुलमध्ये शिक्षकाची नोकरी केली.1978-79 पासून  'साहित्यशिल्प'च्या माध्यमातून साहित्यिक उपक्रमातून श्रीरामपूरला साहित्य वलय लाभले. खासदार गोविंदराव आदिक साहेब हॆ साहित्यिकप्रेमी असल्यामुळे 'साहित्यशिल्प' ला गती आली.प्रा.विजयराव कसबेकर,सुमतीताई लांडे, मेघाताई किराणे,रामचंद्र राऊत, शिवाजी काळे, म. कृ. आगाशे, स. कृ. गायकवाड आदिंनी अनेक साहित्यिक उपक्रम घेतले.27 जानेवारी 1983 रोजी श्रीरामपूरला महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा सुरु झाली. नामदेवराव देसाई यांनी 'श्रीरामपूर टाइम्स'मधून लेखनाला सुरुवात केली. त्यांचे 'पंचनामा ', ' भ्रष्ट्राचार कसा करावा 'हॆ त्यांचे  ग्रामीण विनोदी कथासंग्रह प्रभावी ठरले. 'लगीन जन्क्शन झालंच पाहिजे ', 'नाथा घरची उलटी खूण 'असे नाट्यलेखन केले.'आस्था'   चित्रपटातील त्यांची सरपंचाची भूमिका ठसठसीत झाली. 1997 ला अहमदनगर येथील 70 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्यांच्या सहकार्यवाह नेतृत्वाखाली संपन्न झाले. श्रीरामपूर मसाप शाखा स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला.शब्दालय प्रकाशन, साहित्य प्रबोधन मंच, वाचन संस्कृती प्रतिष्ठान, प्रवाशी संघटना, ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा, स्नेहप्रकाश प्रकाशन अशा अनेक साहित्यिक व्यासपीठावर त्यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले. शब्दगन्ध साहित्यिक परिषद आणि सामाजिक चळवळीत ते  सहभागीं होत असत.शब्दगन्धच्या हिवरे बाजार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी 2020 ला 'नामनिराळा 'गौरवग्रन्थ पत्रकार प्रकाश कुलथे यांच्या स्नेहप्रकाश प्रकाशनतर्फे प्रकाशित केला. ते महत्वाचे पुस्तक आहे.त्यात अनेकांचे लेख म्हणजे आठवणींचा दस्तऐवज आहे. नामदेवराव देसाई हॆ 
'साहित्यातील एक देवमाणूस 'हरवल्याची दुःखवेदना मनाशी आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे.

(((डॉ. बाबुराव उपाध्ये,श्रीरामपूर))) 9270087640