नगर पालिका प्रशासनाने वेळीच पावले उचलावीत अन्यथा आंदोलन - जाफरभाई शहा
श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -:
स्वच्छ आणी सुंदर शहर म्हणून एकेकाळी ओळखले जाणारे श्रीरामपूर शहर आज घाणीच्या साम्राज्यात दिसून येत आहे, शहराच्या अवती-भवती ठिकठिकाणी कचऱ्यांंचे ढिगारे निर्माण होताना दृष्टीपथास येत आहेत,याचे प्रमुख कारण म्हणजे शहरातील घाण -कचरा उचलणारे वाहन काही ठिकाणी तब्बल आठ आठ दिवस येत नसल्याने मोठी दुर्गंधी निर्माण होत आहे त्यावर सदरील कचरा हा वाऱ्याद्वारे नागरीकांच्या घरात आणी दुकानात शिरत आहे, यामुळे भविष्यात भयंकर रोगराईची साथ फैलण्याची शक्यता ही नाकारता येवू शकत नसल्याने श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनाने यावर तातडीने योग्य पावले उचलत सदरील घंडागाडी ठेकेदारास दररोज कचरा उचलण्यास सांगावे अन्यथा या विरूद्ध नगर पालिका प्रशासनाविरुद्ध आंदोलन करावे लागेल असे सामाजिक कार्यकर्ते जाफरभाई शाह यांनी नगर पालिका मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनात त्यांनी पुढे त्यांनी असेही नमूद केले आहे की,सध्या पावसाळ्याचे दिवस आहे, पावसामुळे शहरात ठिकठिकाणी साचलेला कचरा ओला होऊन सडला जात आहे, यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असून रोगराईची साथ फैलण्याची दाट शक्यता आहे,तसे सध्या थंडी,ताप,सर्दी खोकला आदि अशा आजारामुळे बालकांसह वयोवृद्ध झुंज देत आहे करीता पुढे डेंग्यू,मलिरिया येण्याची वाट न बघता नगर पालिका प्रशासनाने वेळीच पावले उचलणे आवश्यक आहे असेही त्यांनी या निवेदनात शेवटी नमूद केले आहे.