भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेचे आंदोलन स्थगित कांबळे
- पुणे - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्र राज्यातील एकूण २९ महानगरपालिका अ,ब,क,ड वर्ग मधील सर्व कंत्राटी कामगारांना दि. १ जानेवारी २०२१ ते आस्थागायत किमान वेतन कायद्यानुसार पगार न देता अत्यंत तुटपुंजा पगार देऊन त्यांचा ईपीएफ व ईएसआयसी न भरता कामगार कायद्याचे उल्लंघन करून लाखो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्या बाबतची तक्रार भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी राज्याचे कामगार आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे करून चौकशीची मागणी केली होती
तथा सदरील बाबी चौकशी न केल्यास यासंदर्भात दि. १४ ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, मात्र श्री.कांबळे यांच्या पत्राची दखल घेऊन कामगार आयुक्त यांनी चौकशीचे आदेश दिल्याने सदरील आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी पत्रकारांना दिली.
यावेळी बोलताना श्री. कांबळे म्हणाले की, महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका, यामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण केले जाते यासंदर्भात आपण वारंवार पत्रव्यवहार तसेच आंदोलनेही केले परंतु याबाबत कुठलीही दखल घेत नसल्याने आपण १४ ऑक्टोबर २०२४ रोजी आंदोलन, उपोषणाचा मार्ग अवलंबवाणार होतो, परंतु याबाबत आयुक्तांनी योग्य दखल घेतल्याने आंदोलन ताप्तुरते स्थगित केले असल्याचे ते म्हणाले.
आयुक्तांनी राज्यातील कोकण विभाग, मुंबई,पुणे, नागपूर येथील अप्पर कामगार आयुक्त तसेच नाशिक, औरंगाबाद, अमरावती येथील कामगार उपायुक्त यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
अप्पर कामगार आयुक्त व कामगार उपायुक्त यांनी याबाबत दुर्लक्ष केल्यास आपण आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहोत असे भ्रष्टाचार विरोधी
जन आक्रोश संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================