राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, October 31, 2023

*स्व.प्रा.डॉ. ज्ञानेश्वर घोटेकर यांचे 'गंगथडी' आत्मचरित्र कृतज्ञतेचे अमृतमंथन =डॉ. राजीव शिंदे*


श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
आत्मचरित्र म्हणजे जीवनानुभावनांचे व्यक्ती व प्रसंगदर्शन असते.स्व.प्रा.डॉ.  ज्ञानेश्वर बाजीराव घोटेकर यांचे ' गंगथडी 'हॆ आत्मचरित्र म्हणजे त्यांना जीवनात भेटलेल्या आदर्श व्यक्ती आणि पुण्यभूमीबद्दलचे कृतज्ञतेचे सकारात्मक,आनंदमय जीवनाचे अमृतमंथन होय,असे मत रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ.राजीव रावसाहेब शिंदे यांनी व्यक्त केले. 
   श्रीरामपूर येथील अग्रवाल मंगलकार्यालयात आयोजित स्व.प्रा.डॉ.ज्ञानेश्वर घोटेकर लिखित ' गंग्थडी' आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्यात अध्यक्ष म्हणून डॉ. राजीव शिंदे बोलत होते. प्रारंभी स्व. डॉ. ज्ञानेश्वर घोटेकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.संदीप ज्ञानेश्वर घोटेकर यांनी स्वागत केले.प्रस्तावनाकार डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला.प्रमुख पाहुणे म्हणून ऍड.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके,मोखाडा येथील प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव भोर, गणेश अशोकराव बनकर पाटील, आनंदराव बाजीराव घोटेकर हे उपस्थित होते.प्रा.डॉ. बबनराव आदिक, प्रा. डॉ. बबनराव सहाणे, महादेव भिलारे, साई संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, कवी सागर, सौ. भाग्यश्री निलेश घोटेकर, दत्तात्रय बोरुडे, येळवंडे अण्णा आदिंनी मनोगत व्यक्त केले.



प्राचार्य शेळके यांनी एक संस्कारशील आणि ज्ञानशील प्राध्यापक म्हणून डॉ. ज्ञानेश्वर घोटेकर विद्यार्थीप्रिय होते.ऍड. रावसाहेब शिंदे यांच्याशी त्यांचा विशेष घनिष्ट संबंध होता.आई, वडील, सासरे आणि ऍड. रावसाहेब शिंदे यांना हे पुस्तक अर्पण केले, यावरून हॆ संबंध कळतात. प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव भोर म्हणाले, डॉ. ज्ञानेश्वर घोटेकर यांना सर्वजण माऊली म्हणत, इतके त्यांचे मन आणि वागणे मृदू, आपुलकीचे होते.डॉ. राजीव शिंदे अध्यक्षीय भाषणात पुढे म्हणाले,स्व.डॉ. ज्ञानेश्वर घोटेकर यांचे आत्मचरित्राचे अपुरे स्वप्न घोटेकर परिवाराने पूर्ण केले.त्यांची पत्नी उषाताई घोटेकर,मुले संदीप व सागर घोटेकर, सुना सौ. प्रतिभा आणि सौ. श्वेताताई यांनी विशेष प्रयत्न केले. आयुष्य भरभरून कसे जगावे,एका शेतकरी पुत्राने प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन रयत शिक्षण संस्थेत वाणिज्य शाखेत वरिष्ठ प्राध्यापक  १९८६ ते २०१९ या काळात रयतनिष्ठ म्हणून प्रभाव निर्माण केला,हे पुस्तक म्हणजे नदीच्या ओलव्यासारखा आहे. गावजिव्हाळा आणि ज्ञानतपस्वी व्यक्तिमत्वाचे हॆ श्रीमंत अंतरंग निर्मळपणे उघड करणारे लेखन असल्याचे सांगितले.डॉ. बाबुराव उपाध्ये, डॉ. बबनराव आदिक, सौ. नीलिमा नितीन आंबरे, आसरा प्रकाशनाच्या सौ. मोहिनी काळे,रचनाकार डॉ. शिवाजी काळे अशा अनेकांच्या सहकार्यातून हा आत्मचरित्राचा शब्दप्रवास गुणवत्तापूर्ण झाला आहे, प्रकाशन सोहळ्यास आलेल्या सर्वांना हॆ पुस्तक मिळाल्यामुळे त्याचे वाचन करून त्यातील कुटुंबप्रेम, शिक्षणप्रेम, माणुसकीचा गहिवर समजून घ्यावा असे आवाहन डॉ. राजीव शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन सौ. श्वेता सागर घोटेकर व सौ.कविताताई घोटेकर यांनी केले तर अरुणदादा घोटेकर यांनी आभार मानले.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

*जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शिर्डीत बसलेल्या सात समाजबांधवाचे आमरण उपोषण सुटणार नाही - सचिन चौगुले*


*राजेंद्र बनकर / शिर्डी*
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंतवली सराटी येथे गेल्या सात दिवसापासून आमरण उपोषण सुरु आहे या आमरण उपोषणाला शिर्डीसह राहाता तालुक्यातील सकल समाज बांधवानी पाठिंबा देत शिर्डी प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले व तीन दिवस साखळी उपोषण चालू असताना चौथ्या दिवसापासून सात जणांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. या आमरण उपोषणात
 सचिन चौगुले,अनिल बोठे,रवी गोंदकर,कानिफ गुंजाळ,नितीन अशोक कोते,प्रकाश गोंदकर,प्रशांत राहणे आमरण उपोषणास बसले आहे.
आज या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस असुन जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे

*सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी यांनी जी भूमिका घेतली आहे.त्या भूमिकेच्या समर्थनार्थ आम्ही सात मराठा बांधव आमरण उपोषणास बसलो आहे.शांततेच्या मार्गाने साखळी उपोषण,आमरण उपोषण करावे तोडफोड,जाळपोळ या सारखे हिंसक आंदोलन करू नये.असं आवाहन जरांगे पाटलांनी महाराष्ट्राला केले आहे.त्याच पद्धतीने राहाता तालुक्याच्या वतीने शिर्डीत सुरू असलेल आमरण उपोषण हे शांततेच्या मार्गाने सुरू आहे.कुणीही तोडफोड जाळपोळ किंवा हिंसा होईल अशा प्रकारचे आंदोलन करू नये - सचिन चौगुले*

*राहता तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने २७ तारखेपासून राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे.तरीदेखील मराठ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे हेतूने जाणीवपूर्वक कोणत्याही राजकीय नेत्याने बळाचा वापर करून राजकीय कार्यक्रम व दौरे केल्यास त्या नेत्यांच्या विरोधात जाहीरपणे निदर्शने व निषेध करण्यात येईल - रविंद्र गोंदकर*

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार अजीजभाई शेख - राहाता*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:*✍️✅🇮🇳..
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================



*शिर्डी बिरोबाबन विरभद्र महाराज**मंदिरातील चांदीच्या पादुकांची चोरी**कुलूप तोडून दानपेटी फोडण्याचा प्रयत्न*


*राजेंद्र बनकर / शिर्डी*
शिर्डी नजीकच्या बिरोबाबन येथील विरभद्र महाराज मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मंदिरा समोरील चांदीच्या पादुका चोरुन नेल्याची घटना घडली आहे. या चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला माञ तो असफल ठरल्याचे दिसून येत आहे.या घटनेमुळे शिर्डीसह पंचक्रोशीतील विरभद्र भाविकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत असुन विरभद्र मंदिर हे पंचक्रोशीतील अराध्य दैवत आहे यामुळे ही घटना कोण्या परंप्रातीय चोरट्यांनी केली असल्याचा संशय विरभद्र भाविकांनी व्यक्त केला आहे.
येथील मंदिराचे हरीभाऊ भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार राञी एक ते दिड च्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी येथील वाचमनला चाकुचा धाक दाखवून मंदिरात प्रवेश केला यानंतर त्यांनी मंदिराचे पुढील प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व विरभद्र मंदिरातील मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून नंतर मधील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला आहे.माञ यावेळी मंदिरातील दानपेटीचे कुलूप न तुटल्याने त्यांनी मंदिरासमोरील साधारणतः दिड किलोच्या चांदीच्या


 पादुका चोरुन नेल्या असल्याचे सांगितले आहे. बिरोबाबन येथील भाविकांनी या घटनेची माहिती देताच शिर्डी पोलीसांनी येऊन पाहणी केली असुन दरम्यान या घटनेमुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. तर अशा विकृत मानसिकतेचा पोलीसांनी तपास करुन कारवाई करावी अशी मागणी नानासाहेब काटकर , संपत जाधव , रमेश बनकर , प्रवीण बनकर , संदिप बनकर , संदिप काटकर , विकास धुळसैंदर , बाळासाहेब काटकर , चेतन बनकर, तसेच विरभद्र भगत हरी बनकर आदीसह शिर्डीसह पंचक्रोशीतील विरभद्र भाविकांनी केली आहे.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार अजीजभाई शेख - राहाता*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

*रात्री दुकाने बंद करण्याची वेळ वाढवून मिळावी* *व्यापारी असोसिएशनचे पोलिसांना निवेदन*


संगमनेर - प्रतिनिधि -/ वार्ता -
सध्या सणासुदीचे दिवस असल्याने त्यावर नुकताच सिझनेबल व्यावसायांची सिझन्स चालु होत असताना मार्केटमध्ये ग्राहकांची लगबग सुरु झाल्याचे बघावयास मिळत असल्याने शहरातील दुकाने बंद करण्याची वेळ ही रात्री १० वाजेऐवजी रात्री ११:३० पर्यंत वाढवून मिळावी अशा अशयाचे निवेदन संगमनेर व्यापारी असोसिएशनच्यावतीने संगमनेर शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्री.मथूरे यांना देण्यात आले.
सदरील निवेदन देतेवेळी संगमनेर व्यापारी असोसिएशन अध्यक्ष योगेश कासट,उपाध्यक्ष सुमेध संत,सहसेक्रेटरी जुगलकिशोर बाहेती,माजी अध्यक्ष शिरिष मुळे, ओमप्रकाश आसावा, प्रकाश कलंत्री,संचालक मा.नगरसेवक राजेंद्र वाकचौरे, प्रकाश राठी, ज्ञानेश्वर कर्पे,सोमनाथ कानकाटे,ओंकार शहरकर, तारा पान चे आबासाहेब शिंदे, येवले चहा चे मनिष गोरे, विशाल शिंदे, धनंजय फटांगरे,अंबिका स्विटस् चे श्रीपालसिंह राजपूत, भरकादेवी चे छगनसिंह राजपूत, ग्रेप्स रेस्टाॅरंन्ट चे कैलास ढोले, व्यवस्थापक अविनाश पुलाटे आदी व्यापारी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

===================================
---------------------------------------------------
*ज्येष्ठ पत्रकार राजेश जेधे - संगमनेर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================


*हातभट्टी गावठी दारू निर्मिती. विक्री ठिकाणावर राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर विभागाची धडक कारवाई*


श्रीरामपूर/प्रतिनिधी - वार्ता
डॉ.विजय सूर्यवंशी, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी राज्यातील हातभटटी दारु विरुद्ध सुरु केलेली हातभट्टीमुक्त गाव मोहिम अधिक परिणामकारक करण्यांबाबत दिलेल्या सूचनान्वये तसेच सुनिल चव्हाण, संचालक, (अ व द), राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई गोहन वर्दे विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग, पुणे तसेच प्रमोद सु. सोनोने, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर व उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील सर्वच तालुक्यात दिनांक २८/१०/२०२३ ते दि. २९/१०/२०२३ या दोन दिवसांचे कालावधीत हातभटटी गावठी दारू निर्मिती व विक्री विरोधात प्रभावीपणे कारवाई करण्यांबाबत विशेष मोहिम राबविण्यांत आलेली आहे.
       सदर दोन दिवसांचे विशेष मोहिम कालावधीत एकूण २२ गावठी दारू निर्मिती दारुअडडे उध्वस्त करण्यांत आले असून एकूण १३ हातभटटी दारु विक्री करणान्या ठिकाणावर तसेच हॉटेल व ढाबे इतर ५ ठिकाणी सुध्दा प्रभावी कारवाई करण्यांत आलेली आहे. सदरील कारवाईत एकूण ४० गुन्हे नोंद करण्यांत आलेले असून ४१ आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत नियमान्वये कारवाई करण्यांत आलेली आहे. सदरच्या कारवाईत नष्ट केलेल्या मुद्देमालात हातभट्टी गावठी दारु बनविण्याचे तयार रसायन व तयार हातभट्टी दारुचा समावेश आहे.सदर कारवाईत २१३०० लीटर हातभाट्टी निर्मीतीचे तयार रसायन व १३४१ लीटर तयार हातभट्टी गावठी दारु नष्ट करण्यात आली आहे. सदरील कारवाईत एकूण ६,४६,६१३ /- रुपयांचा मुददेमाल नष्ट करण्याची कारवाई विभागाने केलेली आहे.
       तसेच अवैध मद्यविक्री करणारे ढाबे /हॉटेल्स यावर देखील कारवाई करण्यांत आलेली असून सदरील ठिकाणी मद्यसेवन करणा-या व्यक्तिवरही कारवाई करुन महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ कलम ६८ व ८४ अन्वये कारवाई करण्यांत आलेली आहे. सदरील कारवाई मुळे अवैध मद्यविक्री करणा-या ढाबे व हॉटेल्स इ. ठिकाणी मद्यसेवन करणा-या व्यक्तिचे तसेच हातभटटी दारू निर्मिती करणा-यांचे धाबे दणालले आहेत.
      सदरील दोन दिवसांचे विशेष मोहिम कालावधीत जिल्हयातील सर्व कार्यकारी / अकार्यकारी अधिकारी / भरारी पथकांचे अधिकारी तसेच अकार्यकारी घटकाचे प्रशिक्षणार्थी उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क तसेच जवान कर्मचारी कारवाईत सहभागी होते.
      अवैध मद्यविक्री करणारे ढाबे / हॉटेल्स, तसेच हातभटटी दारू निर्मिती / विक्री ठिकाणावर यापुढेही सातत्याने उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती विभागाचे प्रमोद सु. सोनोने, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. 
        सदर कारवाईत अहमदनगरचे उपधीक्षक सुजीत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली प्रशिक्षनार्थी उपअधीक्षक सागर शेलार, जी.व्ही. कसरे यांचे सह अ.विभागाचे निरीक्षक.एम.एम. राख , ब.विभागाचे निरीक्षक जी.टी.खोडे ,संगमनेर विभागाचे निरीक्षक एस.वाय. श्रीवास्तव, कोपरगाव विभागाचे निरीक्षक एस.एस.हांडे, श्रीरामपुर विभागाचे निरीक्षक बी.बी.हुलगे भरारी पथक क्र १ अहमदनगरचे निरीक्षक ए.बी.बनकर भरारी पथक क्र २ श्रीरामपुरचे गोपाल चांदेकर यांचे सह विभागातील दुय्यम निरीक्षक सहाय्यक दुय्यम निरीक्षक व जवान सहभागी झाले होते.

*जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी अवैध दारू विक्री होत असल्यास खालील नंबरवर संपर्क साधा - प्रमोद सोनोने, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर*
       *आपल्या परिसरात तसेच गावात अवैध मद्यविक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास उत्पादन शुल्क विभागाचे नियंत्रण कक्षातील १) टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ २) व्हॉटसअॅप क्रमांक ८४२२००११३३ क्रमांकावर तक्रार करावी. जेणे करुन अवैध मद्यविक्री / निर्मिती व वाहतुक इ. परिणामकारक कारवाई होऊन त्याचे समूळ उच्चाटन होण्यास जनतेद्वारे मदत होईल*

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

*मा.अफजल मेमन**संपादक: मेमन रिपोर्टर*यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या मनःपूर्वक लाख लाख हार्दिक शुभेच्छा 💐✅🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

🎂 *वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* 💐
-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-
---------------------------------------------------
*आप मुस्कुराऐं इसितरह जींदगी मे*
*हर घडी हर लमहा नयी खुशियां पाऐं !*

*अल्लाह करे यह दिन आपके जींदगी मे*
*बार बार और कई हजारबार आऐ !!*
---------------------------------------------------
===================================

आमचे मित्र आणि स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे सहयोगी तथा साप्ताहिक मेमन रिपोर्टर आणी मेमन रिपोर्टर न्यूज पोर्टल चे प्रमुख संपादक *श्री. अफजलभाई मेमन* यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख हार्दिक शुभेच्छा, येणाऱ्या भावी आयुष्यात त्यांना सुख समृद्धी,भरभराटी सोबत उत्तम आरोग्यदायी जीवन लाभो ही सदिच्छा!
*शुभेच्छूक:*
{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-
---------------------------------------------------
===================================
🌹🥀🌺🌷🌸 ❤️ ✅ 🇮🇳
*शौकतभाई मित्र मंडळ, श्रीरामपूर*
समता फाऊंडेशन, परिवार, श्रीरामपूर 
स्वाभिमानी संपादक सेवा संघ (महाराष्ट्र प्रदेश)
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर
महाराष्ट्र साप्ताहिक संपादक संघ (महा.)
सर्व पदाधिकारी आणि सदस्य मंडळ 
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
---------------------------------------------------
===================================
{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-


Monday, October 30, 2023

*प्रत्येकाने आपल्यातला प्रामाणिकपणा व सत्यनिष्ठपणा जिवंत ठेवावा-जीवन बोरसे*

बेलापूर - प्रतिनिधि - / वार्ता -
प्रत्येकाने आपल्यातला प्रामाणिकपणा व सत्यनिष्ठपणा जिवंत ठेवावा आणि आपले काम नि:स्वार्थीपणे व निरपेक्षपणे करीत राहावे असे प्रतिपादन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे एपीआय जीवन बोरसे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र शासन आदेशान्वये "भ्रष्टाचार दक्षता जनजागृती सप्ताह"अंतर्गत बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.ते पुढे असेही म्हणाले की, भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचरण.लाच घेणे, लाच देणे हा गुन्हा आहे.वाहतुकीचे नियम न पाळणे हा गुन्हा आहे.१९८८ मधे हा कायदा अस्तित्वात येऊन त्यात काही नवीन सुधारणा झाल्या. भ्रष्टाचार जर सिद्ध झाला तर दंडासहित सात वर्षांची शिक्षा होऊ शकते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य प्रो.डॉ.गुंफा कोकाटे म्हणाल्या की, भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड आहे. भ्रष्टाचाराचा अंध:कार सगळीकडे पसरलेला असताना आपण छोटीशी पणती व्हावे. त्रास होईल पण सत्य उजळून निघेल. प्रामाणिकपणाने, नि:स्वार्थीपणाने सेवा करणे हेच महत्त्वाचे आहे असे त्या म्हणाल्या.सदर कार्यक्रमात भ्रष्टाचार निर्मूलन सत्यनिष्ठतेची शपथ उपस्थितांना देण्यात आली.यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती म्हणून बेलापूर पोलिस औट पोस्टचे लोखंडे मामा व ढोकणेज्ञमामा उपस्थित होते.
 डॉ.बाबासाहेब पवार यांनी प्रास्ताविक केले व अतिथींचा परिचय करुन दिला.प्रा.रुपाली उंडे यांनी सुत्रसंचालन केले तर प्रा.प्रकाश देशपांडे यांनी आभार मानले.सदर कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रा.चंद्रकांत कोतकर,प्रा.रुपाली उंडे, विद्यार्थी विकास मंडळाचे डॉ.संजय नवाळे,प्रा.प्रकाश देशपांडे,प्रा.किशोर गटकळ , डॉ.बाळासाहेब बाचकर, प्रा. ओंकार मुळे,प्रा.अशोक थोरात यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार अमन सय्यद - बेलापूर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

हल्ली फुशारकी करणाऱ्या लोकांच्या चळवळी वाढल्या

*म्हणूनतर सच्च्या आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या चळवळी मोडल्या !!*
*कोजागिरी निमित्त साहित्य सम्राट चे*
*पुण्यात १७४ वे कवीसंमेलन संपन्न*

*पुणे प्रतिनिधि वार्ता *     
"फुशारकी करणाऱ्या लोकांच्या चळवळी वाढल्या,अन् म्हणूनतर सच्च्या कार्यकर्त्यांच्या चळवळी मोडल्या "अशी चळवळी विषयींची ज्वलंत भावना अध्यक्षीय भाषणात साहित्यिक अनंत कदम यांनी व्यक्त केली.
पुणे येथील हडपसर परिसरातील राममनोहर लोहिया उद्यानात साहित्य सम्राट पुणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ यांच्यावतीने पुण्यात १७४ व्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते अध्यक्षपदावरुन बोलत होते.
श्री.कदम पुढे म्हणाले. साहित्य सम्राट ही संस्था गेली अनेक वर्षे साहित्य चळवळ राबवत आहे. त्यामुळे ग्रामीण,शहरी, नवोदितांना खुले विचारपिठ सहजच मिळत आहे.अशी चळवळ चालवताना कुणासाठी थांबू नये. नाहीतर उशिरा येणारे भाव खाऊन जातात. त्यांचेच फोटो प्रसिद्ध होतात. या कविसंमेलनास दिग्गज कवी कवयित्री यांनी बागेतील काव्य रसिकांची मने जिंकली.सहभागी झालेल्या कविंमध्ये डॉ. पांडुरंग बाणखेले यांच्या कवितेनंतर कविता काळे यांच्या
"करायचाच असेल वार तर छातीत कर, पाठीत नाही.पाठीत वार करणे लढवय्याचा धर्म नाही" या कवितेने दाद मिळवली.पुढे संजय भोरे यांनी प्रेम विषयाची
"उगीचच मी कल्पनातीत राहून जीवाची हूर हूर लावून घेत होतो.
होईल का माझ्या आयुष्याशी तुझी दोरी बळकट याचाच घोर लावून बसलो होतो" ही कविता सादर केली. त्यानंतर देवेंद्र गावंडे यांनी
"छान झोपलो होतो मी डोळे मिटून. आली माझ्यावर ही बला कुठून. उठलो झोपेतून खळबळून. असाच राहील रातभर बसुन, पाठीला माझ्या चावल ढेकूण" ठेकूण ही विनोदी गेय कविता सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. प्रल्हाद शिंदे यांनी तर
 "गोऱ्या तुझ्या रुपाला भाळतात साले, अन् रंग यौवनाचे ते न्ह्याळतात साले"
अशी गझल सादर केली.लगेचच तानाजी शिंदे यांनी खाजगी नोकरीतील वास्तव आपल्या कवितेतून मांडला.
"खाजगी नोकरीत पिळवणूक
चुकत नाही कधी कुणाला,
नोकरी करावीच लागते शेवटी
मारून तुमच्या मनाला"
पुढे चंद्रकांत जोगदंड यांनी
"तुह्या रूपाची चांदणी जशी नभी लकाकते, धुंद करूनिया अवनीला हळूच ग खुणावते" अशी प्रेम कविता सादर केली.
कवी सीताराम नरके यांनी
"खुळ खुळा झाला तुझा ,रोज नवी कहानी, किती गाळशील येड्या,तुझ्या डोळ्यातुन पाणी"
ही प्रियकराला प्रेमात सल्ला देणारी कविता सादर केली. संस्थेचे अध्यक्ष विनोद अष्टुळ यांनी स्त्री जीवनाचा महिमा सांगणारी काव्य रचना सादर केली.
"सागरापरी माया असावी हे वाचले, स्त्री तुझ्या मायेने ते शब्द खचले"
  अशा विविध विषयांच्या काव्य रचनांना काव्य रसिकांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन रानकवी जगदिप वनशिव यांनी, कार्यक्रमाचे प्रास्तविक विनोद अष्टुळ यांनी तर आभार सीताराम नरके यांनी व्यक्त केले.

===================================
---------------------------------------------------
*ज्येष्ठ साहित्यिक विनोद अष्टूळ - पुणे*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

*ग्रामपंचायत निवडणूकीत मतदारांचा कौल**आपल्याच बाजूने लागेल -अविनाश आदिक*💐✅🇮🇳...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*बी.आर.चेडे - शिरसगांव*
येत्या ५ नोव्हेंबरला शिरसगांव ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे,त्यामध्ये मतदारांचा कौल आपल्या समाज सेवा मंडळाला मिळणारच आहे.सत्ताधारी पदाधिकारी यांनी काय केले त्याचा लेखाजोखा आपल्याकडे आहे.गावकऱ्यांनी आपल्याला संधी दिली तर व्यासपीठाकडे पाहीले तर सर्वांच्या लक्षात येईल की येथे महत्वाचे मान्यवर आहेत. आपला पक्ष सरकारमध्ये असल्याने आवश्यक सहकार्य मिळेल.स्थानिक आम्ही सर्व आहोत.नवीन चेहरे दिल्याने ते चांगल्या उमेदीने काम करतील. श्रीरामपूर शहराजवळ हे गाव आहे.श्रीरामपूरच्या बाबत पुढील काळाबाबत आपल्या आशा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करायच्या असतील तर शिरसगावकराना महत्वाची भूमिका बजवावी लागेल.या प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने आग्रह करतो की प्रत्येकाने ही निवडणूक माझी आहे हे समजून काम केल्यास निवडणुकीत यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. असे प्रतिपादन समाज सेवा मंडळाच्या ग्रा.प.निवडणूक प्रचार शुभारंभ प्रसंगी अविनाश आदिक यांनी केले.
याप्रसंगी आपल्या प्रास्तविकात समाज सेवा मंडळ गटप्रमुख किशोर पाटील यांनी सांगितले की, शिरसगांव हे सातत्याने श्रीरामपूर शहराशी संपर्क असलेले शहरालगतचे गाव आहे. त्याचा विकास करणे हे स्थानिक नागरिकांचे काम आहे.या गावात स्व.गोविंदराव आदिक,अविनाश आदिक,अनुराधा आदिक,.डॉ वंदनाताई मुरकुटे,ज्ञानेश्वर (माउली) मुरकुटे हे या गावचे मतदार आहेत.या गावचा विकास होणे गरजेचे आहे, परंतु गेल्या दहावर्षात तसे झाले नाही. साईनाथ गवारे,सोपानराव गवारे यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला पण गावच्या दोन्ही गटांनी ते मान्य केले नाही.गावच्या विकासासाठी बरीच मोठी मंडळी सोबत आहेत.त्यांचे माध्यमातून सर्व सहकार्य विकासासाठी मिळणार आहे.त्यामुळे गावचा कायापालट होऊ शकतो.स्व.जी. के.पाटील यांचे गावासाठी मोठे योगदान आहे.सरपंच पदासाठी सौ.जयश्री प्रदीप अभंग ह्या उमेदवार आहेत.त्या यापूर्वीही सदस्यपदी निवडणून आलेल्या आहेत. त्यासाठी वनिता विजय गायकवाड यांनी मोठ्या मनाने सरपंचपदाची उमेदवारी मागे घेतली.दहा वर्षे त्यांना सत्ता दिली आता आम्हाला द्यावी.यावेळी माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक,माजी सभापती डॉ वंदनाताई मुरकुटे,ज्ञानेश्वर मुरकुटे,राजाभाऊ कापसे, बापूसाहेब पटारे,विधिज्ञ मुकुंद गवारे,सोपानराव गवारे,प्रदीप अभंग, तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, बाळासाहेब गवारे,आदींनी आपले मनोगत मांडले व उमेदवारांना मतदान करा.निश्चित विजय आपलाच होईल परिवर्तन होईल अशी ग्वाही दिली.व सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.सर्व मान्यवर व उमेदवार यांनी नारळ फोडून प्रचार शुभारंभ केला. यावेळी सतीश गवारे,सुभाष यादव,प्रदीप अभंग,इसाक पठाण,मुकुंद गवारे,सोपानराव गवारे,साईनाथ गवारे,आदी सर्व मान्यवर उपस्थित होते.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:* ✍️✅🇮🇳 समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर
*9561174111*
---------------------------------------------------
===================================

गोवा येथे होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी* *बेलापूर येथील अरहम डाकले ची निवड*🌹🥀🌺🥀🌷🌸 🙏 ✅ 🇮🇳...


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^
गोव्यात रंगणार १७ वर्षखालील क्रिकेट स्पर्धा*
===================================

बेलापूर - प्रतिनिधि - वार्ता
गोवा येथे होणाऱ्या सतरा वर्षाखालिल क्रिकेट स्पर्धेसाठी बेलापूर क्रिकेट क्लबचा खेळाडू अरहम डाकलेची निवड झाली आहे. माजी खेळाडू अनिल डाकले यांचा तो मुलगा आहे. त्याचे निवडीबद्दल श्रीरामपूर क्रिकेट असोएशनचे अध्यक्ष भास्कर खंडागळे,बाॕबी बकाल आदिंनी सर्वेशचे अभिनंदन केले आहे.बेलापूरला बाळासाहेब खटोड,अशोक भगत,बाळासाहेब खंडागळे,सखाराम कोळसे,राम साळुंके,शरद सोमाणी,बाबा राजुळे,संपत खटोड,भास्कर खंडागळे,अजय नाईक,शशी नाईक,पोपटराव धुमाळ,अण्णा गार्डे, बाळासाहेब नाईक,संपत बोरा,सुभाष कोठारी,रमेश मिसाळ,राजेन्द्र खटोड,श्रीकांत व्यास,रामप्रसाद व्यास ,विजय मुथा,सुनिल भगत,सुरेश भोसले,ज्ञानेश गव्हले,रमाकांत खटोड,प्रकाश भांड,अनिल नाईक ,गणा कोळपकर,बिजू नावंदर,अभिषेक खंडागळे,योगेश नाईक,यशवंत नाईक,बाबा सय्यद ,प्रसाद खरात,सचिन कडेकर,अनिल डाकले,बंटी शेलार,राजू शेलार अशा नामांकीत खेळाडूंची प्रदिर्घ परंपरा आहे.यात नवोदित खेळाडू भर घालित आहे. अरहमच्या निवडीबद्दल त्याचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार अमन सय्यद - बेलापूर*
*सहयोगी:* स्वा भिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================



*पुंडलिक गवंडी यांचे 'ठिणगी 'आत्मचरित्र म्हणजे नव्या पिढीसाठी ज्ञानज्योत =प्रा.डॉ. शिवाजी काळे*

श्रीरामपूर प्रतिनिधी वार्ता 
आत्मचरित्र हॆ जीवनजाणिवेचे प्रेरणास्तोत्र असते.ते स्वबरोबर कुटुंब,समाज आणि स्थलकाल यांना अमृतमय करते, यादृष्टीने अकोले येथील जेष्ठ साहित्यिक पुंडलिक गवंडी कुमावत यांचे 'ठिणगी 'हॆ आत्मचरित्र म्हणजे आजच्या,उद्याच्या पिढीसाठी ज्ञानज्योतीसारखे आहे, असे मत साहित्य प्रबोधन मंचचे अध्यक्ष व जेष्ठ साहित्यिक डॉ. शिवाजी काळे यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील इंदिरानगर मधील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे अकोले येथील जेष्ठ साहित्यिक पुंडलिक चिमणराव गवंडी कुमावत यांच्या 'ठिणगी 'आत्मचरित्राचे प्रकाशन संपन्न झाले, त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. शिवाजीराव काळे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे होते. प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. लेखक पुंडलिक गवंडी,अध्यक्ष प्राचार्य डॉ. गागरे आणि मान्यवरांचा प्राचार्य शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य टी. ई. शेळके,डॉ. रामकृष्ण जगताप, प्रा. शिवाजीराव बारगळ,श्रीरामपूर सुवर्णकार समाज तालुका अध्यक्ष स्वामीराज कुलथे,पत्रकार बाबासाहेब चेडे, संगीता फासाटे, गणेशानंद उपाध्ये, सौ.आरती उपाध्ये, सुरेश बेलदार, भीमशन्कर परदेशी, गणेश गवंडी,शुभदा दहिमिवाळ आदी उपस्थित होते.डॉ. शिवाजी काळे यांनी पुंडलिक गवंडी यांच्या आत्मचरित्रातील शेवगाव, अकोले येथील हृदयस्पर्शी आठवणी विशद करून पुंडलिक गवंडी अकोले परिसरातील साहित्य कोहिनूर आहेत पण त्यांची म्हणावी तशी दखल घेतली गेली नसल्याची खंत व्यक्त केली. पुंडलिक गवंडी यांनी श्रीरामपुरात वाचन संस्कृती प्रतिष्ठानने दखल घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला.प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे यांनी अध्यक्षीय भाषणातून साहित्य आणि समाज यांचे नाते सांगून 'हातोडा'नंतरची 'ठिणगी'प्रकाशयात्री ठरणारी असल्याचे सांगितले.प्राचार्य टी. ई. शेळके यांनी सांगितले, शिक्षक हा नेहमी पिढी घडवितो, एक आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक आणि लोकप्रबोधक साहित्यिक म्हणून पुंडलिक गवंडी यांचे योगदान प्रेरणादायी आहे, असे सांगून आयोजक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी एका आदर्श साहित्यिकाची दखल घेतली,जे निष्ठावान आणि समर्पित साहित्यिक आहेत,पुंडलिक गवंडी, डॉ. बाबुराव उपाध्ये, डॉ. शिवाजी काळे, सुखदेव सुकळे अशी साहित्यतपस्वी व्यक्तिमत्वे अंधारात असली तरी शब्दप्रकाश देतात त्यांचे कार्य आणि जीवन यांचा अभ्यास झाला पाहिजे असे मत प्राचार्य शेळके यांनी विविध अनुभवातून सांगितले डॉ रामकृष्ण जगताप म्हणाले, खऱ्या साहित्यिकाची आणि त्यांनी लिहिलेल्या साहित्याची दखल समाजात आणि साहित्य वर्तुळात घेतली जात नाही,त्यामुळे साहित्य आणि साहित्यिक यांचा शब्दसुगन्ध नव्या पिढीला मिळत नाही, अशी खंत व्यक्त केली.पुंडलिक गवंडी यांची नात शुभदा दहिमिवाळ यांनी आपल्या मनोगतातून पुंडलिक गवंडी यांचे कुटुंबप्रेम सांगितले,माझे वडील वारल्यानंतर त्यांनीच आम्हाला आधार दिला, आम्हाला मुलासारखा मान देतात, मुलगी, मुलात फरक करीत नाहीत,त्यांच्यामुळे मी श्रीरामपूरच्या बोरावके कॉलेजमध्ये डॉ. बाबा तोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र विषयावर पीएच.डी करीत आहे, असे सांगून आठवणी सांगितल्या. सौ. आरती उपाध्ये, निर्मिक उपाध्ये यांनी नियोजन केले. प्रतिष्ठान उपाध्यक्ष संगीता फासाटे यांनी 'हातोडा' ते 'ठिणगी' साहित्यसूत्र सांगून सूत्रसंचालन केले तर प्रतिष्ठान कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये यांनी आभार मानले.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार बी.आ.चेडे - शिरसगांव*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

Sunday, October 29, 2023

निसर्गोपचाराचे सिद्धांत व आरोग्य' या पुस्तकाचे भव्य प्रकाशन संपन्न*💐✅🇮🇳...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*एडीजीपी कृष्णप्रकाश (आयपीएस) यांच्यासह देशपातळीवरील तज्ञांनी केली प्रशंसा*

प्रतिनिधी आशा रणखांबे पुणे
"जागतिक अभिरुचीसंपन्न निसर्गशक्तीच्या एकत्रिकरणाचा आरोग्यदायी महासंकल्प " या सिद्धांताचा पाया रचून देश - विदेशामध्ये निसर्गोपचाराचा अनन्यसाधारण प्रचार - प्रसार करणारे ' मिशन नॅचरोपॅथी ' चे संचालक व सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ क्रांती कुमार महाजन यांनी लिहिलेल्या " निसर्गोपचाराचे सिद्धांत व आरोग्य " या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच भारतीय वायुसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे समारंभपूर्वक करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे अँडीशनल जनरल ऑफ पोलीस श्री. कृष्णप्रकाश (आयपीएस) यांसह भारतीय सेनेतील महावीरचक्र विजेता नायक दिगेंद्र कुमार, वायुसेनेचे एअर मार्शल भूषण गोखले , एअर मार्शल प्रदीप बापट , एअर वाईस मार्शल नितीन वैद्य , सैनिक कल्याण विभागाचे महासंचालक ब्रिगेडीयर राजेश गायकवाड , भारत सरकारच्या जी-२० सचिवालयाचे संचालक श्री. संजीव जैन्य , भारत सरकारच्या युवक कल्याण क्रीडा मंत्रालयाचे संचालक श्री. अतुल निकम , कृष्णलीला वृत्तसमूहाचे प्रमुख डॉ. कौशिक गायकवाड , सुप्रसिद्ध हृदय शल्य विशारद डॉ. यतीन वाघ , संमेलनाध्यक्ष श्री. संतोषभाऊ बारणे , राजमाता जिजाऊ यांचे वडील लखूजीराजे जाधव यांच्या घराण्याचे वंशज महाराज श्री. शिवाजीराजे जाधव , तंजावार घराण्याचे वंशज महाराज श्री. विजयसिंहराजे भोसले या दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते ' निसर्गोपचाराचे सिद्धांत व आरोग्य ' या पुस्तकाचे समारंभपूर्वक भव्य प्रकाशन घडून आले .
साप्ताहिक कृष्णलीला या वृत्तपत्रामध्ये सातत्याने प्रकाशित लेखांचा समुच्चय करून ' निसर्गोपचाराचे सिद्धांत व आरोग्य ' या पुस्तकाची लेखक क्रांती कुमार महाजन यांनी मांडणी व निर्मिती केली आहे . विश्व कीर्तिमान लेखक व निसर्गोपचार तज्ञ क्रांती कुमार महाजन यांनी आपल्या जीवनामध्ये निसर्गसाधनेलाच राष्ट्रभाव मानून अनुभव , ज्ञान , संशोधन , अभ्यास आणि सिद्धी यांच्या समन्वयातून हे पुस्तक आरोग्याच्या दृष्टीकोनातून बहुआयामी आणि समृद्ध केले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये पोलिसांच्या आरोग्यासाठी निसर्गोपचाराच्या माध्यमातून प्रतिबद्ध राहून कार्य केल्या जाणार असल्याची ग्वाही याप्रसंगी लेखक क्रांती कुमार महाजन यांनी दिली आहे .  लेखक क्रांती कुमार महाजन यांनी विविध विषयांवर अनेक पुस्तके लिहिली असून ' प्राकृतिक चिकित्सा - एक राष्ट्रभाव ' हे त्यांचे पुस्तक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाला ' संदर्भ - ग्रंथ ' म्हणून निवड - पात्र ठरले आहे . निसर्गोपचाराच्या प्रचार - प्रसारासाठी क्रांती कुमार महाजन यांनी संपूर्ण भारत देशात आजवर सतरा हजार किलोमीटर अंतराची ' प्राकृतिक चिकित्सा जागरण यात्रा ' पूर्ण केली असून हजारों लोकांना निसर्गोपचाराच्या उपचार व प्रशिक्षणाकरीता त्यांनी प्रवृत्त केले आहे . एकूणच " मिशन नॅचरोपॅथी " च्या माध्यमातून निसर्गोपचाराच्या प्रचार - प्रसाराकरीता प्रतिबद्ध असणारे क्रांती कुमार महाजन हे देशातील तमाम निसर्गोपचारकांना व निसर्गोपचाराच्या संस्थांना एकसंघ करण्याचे अभिनव व अनन्यसाधारण कार्य करीत आहेत . महाराष्ट्र सरकार द्वारा निसर्गोपचाराची अधिकृत कॉन्सिल निर्माण व्हावी व राज्यातील लाखो निसर्गोपचारकांना त्यासंदर्भात न्याय व अधिकृतता लाभावी यासाठी क्रांती कुमार महाजन यांनी आरंभिलेले " मिशन नॅचरोपॅथी " हा आशावाद आता अत्यंत प्रबळ झाला आहे . निसर्गोपचारावर आधारीत विविध पुस्तके व साहित्य त्यांनी निर्माण केले आहे . 
अशा प्रकारे निसर्गोपचाराकरीता समर्पित असणारे क्रांती कुमार महाजन यांनी आपल्या सिद्धहस्त पत्रकारांनी अनुभवांतून लिहिलेले ' निसर्गोपचाराचे सिद्धांत व आरोग्य ' हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल देशपातळीवर त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
*ज्येष्ठ साहित्यिक नवनाथ रणखांबे*

===================================
---------------------------------------------------
*सहयोगी:*
स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर- - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

*अशांतता दूर करण्यासाठी प्रत्येकाने बोधिवृक्षाचे रोपटे परिसरात लावावे - उत्तम कांबळे* 🌹🥀🌺🌷🌸🙏❤️ ✅ 🇮🇳...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

 *छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये ‘जागतिक शांतता व प्रगतीसाठी भाषा साहित्य व संस्कृतीचे योगदान’ या चर्चासत्राचे उद्घाटन*

सातारा प्रतिनिधि वार्ता
 ‘’महायुद्धानंतर माणसाची जागा कचराकुंडीतल्या कचऱ्यासारखी झालेली आहे,माणसाचे अवमूल्यन झालेले आहे त्यासाठी आता महायुद्धे थांबली पाहिजेत. शांतता निर्माण होण्यासाठी साहित्यिक,तत्वज्ञ कलावंत यांनी भूमिका घेतली पाहिजे. साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब असले तरी ते वास्तव नसते. या प्रतिबिंबाच्या तळाशी काय चिकटून बसले आहे ते शोधले पाहिजे. आरसा बळकट तेंव्हा असतो जेंव्हा त्याचा पारा चांगला असतो.साहित्यिकांनी जगभरात माणसे बदलली आहेत. गॉर्कीच्या मदर कादंबरीने पृथ्वीचा तीन चतुर्थांश राजकीय भाग बदलला. ही साहित्याची ताकद आहे. कचऱ्यातील माणूस वाचवायचा असेल तर महायुद्धे थांबवली पाहिजेत त्यासाठी साहित्यिकांनी भूमिका घेतली पाहिजे शांतता व अशांतता म्हणजे काय हे स्पष्ट करून सांगण्याची गरज आहे. युद्धाचे कारण देखील तृष्णा आहे. वस्तू खपवण्यासाठी आज युद्धे केली जात आहेत. युद्धात आता नियम पाळले जात नाहीत. ही ठोकाठोकी थांबवली पाहिजे. त्यासाठीच आता बोधीवृक्षाचे रोपटे लावले पाहिजे. बोधिवृक्ष दीर्घायुषी असतो.तो प्राणवायू देतो.त्याच्यावर अनेक जीव मुक्कामाला असतात.कोणत्याही वादळात तो तुटून पडत नाही. बोधीवृक्ष दीर्घायुषी आहे. त्याची मुळे खूप खोल गेलेली पृथ्वीच्या प्रदूषित झालेल्या गर्भाशयातील विष त्याच्या मुळ्या ओढून घेतात. अन अन्नातले प्रोटीन पृथ्वीच्या पोटात सोडतात.पृथ्वीचे गर्भाशय स्वच्छ होते.पुन्हा मग माणसे उगवतात ,संस्कृती उगवत राहतात. प्रदुषणाचा. अशांततेचा, युद्धजन्य परिस्थितीचा पट्टा दूर करायचा असेल,तर प्रत्येकाने साहित्यरुपी ,कलारुपी विचाररुपी,संस्कृतीरुपी बोधीवृक्षाचे एकेक तरी रोपटे आपल्या परिसरात लावावे युद्धाचे ढग पळून जातील’’असे मत ज्येष्ठ साहित्यिक ,विचारवंत उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले.

 येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या ‘ जागतिक शांतता व प्रगतीसाठी भाषासाहित्य व संस्कृतीचे योगदान ‘ या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते. कर्मवीर अण्णांच्या संस्थेत या प्रकारची चर्चासत्र आयोजित करावीत. तसेच जागतिक शांततेवर अजून दोन दिवस पुढे चर्चासत्र आयोजित केल्यास सखोल समज येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे होते. महाविद्यालयाच्या मराठी, हिंदी, इंग्रजी ,संस्कृत,अर्धमागधी विभागांनी हे चर्चासत्र आयोजित केले होते. 
           प्रारंभी विषय विवेचन करताना उत्तम कांबळे म्हणाले की,’माणूस निसर्गातून बाहेर पडला तसा तो अशांत होत गेला. सुरवातीला शेतीचा शोध लागला त्या काळात शेती करून घेणारा , आणि शेतीसाठी राबणारा असे दोन वर्ग तयार झाले. पुढे शेती करून घेणारऱ्याची तृष्णा वाढली, त्यातूनच साम्राज्यवाद वाढला. ज्ञान ,सत्ता ,धर्म या क्षेत्रात साम्राज्यवाद वाढला . या सगळ्यात धर्माचा साम्राज्यवाद धोकादायक आहे. माणसाचे मन शांतता आणि अशांतता या दोन्हीनी भरलेले आहे. शांती अंतर्मनात असायला पाहिजे.पण कितीदिवस शांत राहायचे असेही त्याला वाटते. शांतता हे एक मूल्य आहे तर अशांतता ही विकृती आहे. माणसाचा इतिहास पाहता माणसाने दर एक दिवसाला तेरा लढाया केल्याचे आढळते. आतली लढाई जिंकतो तो शांतता मिळवतो .सिद्धार्थ मरतो बुद्ध जन्मतो.माणसाने युद्धे केलीत हेच प्रत्येक प्राचीन धर्म ग्रंथात देखील दिसते. या लढाया सत्य, सत्ता ,न्यायासाठी करतात आणि माणसे मारून ,युद्ध करून शांतता मिळवतात.अणुबॉम्ब शांततेसाठी आहे हे सांगितले. जपान बेचिराख केला.पोखरण करून बुद्ध हसला म्हणून कुचेष्टा करण्यात आली. हिंसेतून शांतता येईल कशी ? अहिंसेतून शांतता येते. जगण्याच्या स्पर्धेत शांतता खलास झाली. त्यामुळेच व्यवस्थेला प्रश्न विचारत साहित्य जन्म घेऊ लागले. प्रश्न विचारले जातात तेंव्हा इथली व्यवस्था प्रश्न चिरडून टाकण्याचे ,माणसे मारण्याचे प्रयत्न करते. विचारी माणूस व्यवस्थेला धोकादायक वाटतो कारण तो प्रश्न विचारतो. हि व्यवस्था त्याच्या विचाराला कोंडून ठेवते,बाजूला टाकते. धर्माच्या आणि जातीच्या नावाने माणसे मारली जातात. माणूस क्रूर होत गेला आहे त्याचे कारण त्याची तृष्णा आहे. म्हणूनच साहित्यिकांनी ,संस्कृतींनी या अशांततेचा विरोध करायला पाहिजे आणि शांततेचे स्वागत करायला पाहिजे शांतता निर्माण करण्यासाठी रोल करावा लागतो. येशूखिस्त शांततेसाठी जगावर प्रेम करा सांगतो. शांती पाहिजे असेल तर बियाणे शोधा. मनातले युद्ध संपवा. शांततेसाठी पोवाडे लिहा .जातिवंत साहित्यिकाच्या काळजात ब्युटी पार्लर असते. त्याच्याकडे दोन गोष्टी असतात त्याची प्रतिभा व्यक्त करण्यासाठी असते तर त्याच्या मनातली वेदना इतरांचे दुःख समजावून घेत असते. माणूस आज संकटात जगतोय.त्याला सुरक्षितता नाही. त्यामुळे त्याला न्यायासाठी संघर्ष करावा लागतो. चुकीच्या गोष्टी दूर करण्यासाठी संघर्ष आवश्यक आहे. सौंदर्य संघर्षातून जन्मते. जगात शांती निर्माण होण्यासाठी भूमिका घेतली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. उद्घाटन सत्राचे प्रास्तविक प्रा.डॉ.केशव पवार यांनी केले. रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी या विषयावर चर्चासत्र आयोजित केल्याबद्दल कॉलेजचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. आभार प्रा.डॉ.रोशनआरा शेख यांनी मानले. यावेळी चीनच्या सुझाऊ विद्यापीठातील प्राध्यापक फरझान हरत्यान यांनी बीजभाषण केले. डॉ,अर्जुन चव्हाण,डॉ.मुग्धा गाडगीळ, डॉ.राजश्री मोहाडीकर,राजू केंद्रे इत्यादी मान्यवर वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केले.अनेक मान्यवर चर्चासत्रास उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांचे मार्गदर्शनानुसार मुख्य समन्वयक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे, समन्वयक डॉ.केशव पवार, डॉ. प्रदीप शिंदे ,प्रा.ऋषिकेश काळे, प्रा.विजया गणमुखी व भाषा विभागातील प्राध्यापक यांनी चर्चासत्राचे यशस्वी आयोजन केले.

===================================
--------------------------------------------------
*वृत्तविशेष सहाय्य*
डॉ.बाबुराव उपाध्ये (सर) श्रीरामपूर
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================


*माऊली वृद्धाश्रमाचा सहावा* *वर्धापनदिन उत्साहात संपन्न*

श्रीरामपूर प्रतिनिधि वार्ता
*सर्वसामान्यांना मोफत वैद्यकीय सेवा मिळावी या हेतूने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन - डॉ. वंदनाताई मुरकुटे*

ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब,गरजवंत लोकांना मोफत वैद्यकीय सेवा मिळाव्या या हेतूने मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन भेर्डापूर वांगी येथील प्राईड अकॅडमी शाळेत केले असल्याचे प्रतिपादन मा.सभापती तथा प्राईड अकॅडमीच्या संस्थापिका डॉ. वंदना मुरकुटे यांनी केले. 
मैड हॉस्पिटल राहाता यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आयोजित मोफत भव्य सर्व रोग निदान शिबिराच्या कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी प्रतिमेचे पूजन व पुष्पगुच्छ अर्पण करून शिबिराचे उद्घाटन झाले व शिबिराचा आरंभ करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी मैड हॉस्पिटलचे प्रथितयश स्री रोग तज्ञ डॉ. संतोष मैड, माऊली चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक ज्ञानेश्वर (माऊली) मुरकुटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजश्री देशमुख, डॉ.चंद्रकांत सानप , कैलास बोऱ्हाडे ,डॉ. धरमवीर सहानी, डॉ. परितोष कांबळे, रमेश उंडे ,राजेंद्र कोकणे, बंडोपंत बोडखे, आबा पवार,अर्जुन राऊत, संजीव उंडे, नयन गांधी, अरुण कवडे,दिलीप अभंग ,सुभाष मोरे , तात्यासाहेब शिंदे ,रणछोडदास जाधव, अनिल दांगट,राहुल बनकर, डॉ. कविता खांदरे, डॉ. कोमल बधे ,डॉ. विजय पटेल, दीपक बडाख, आप्पा पवार,हरिभाऊ पटारे,भरत जाधव आदी यावेळी उपस्थित होते. 
यावेळी पुढे बोलताना डॉ. वंदनाताई मुरकुटे म्हणाले की, सध्या आरोग्याच्या अनेक समस्या वाढत असून ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांना वैद्यकीय खर्च परवडणारा नसतो, त्यामुळे ते उपचार घेत नाहीत परंतु या मोफत सर्व रोग निदान शिबिरामध्ये त्यांच्या आजाराची निदान मोफत होणार असल्यामुळे त्याचा लाभ त्यांना घेता येतो या शिबिरा अंतर्गत ८५० प्रकारच्या आजारावर मोफत रोग तपासणी व निदान होणार असून त्याचा लाभ परिसरातील नागरिकांना होणार आहे. 
यावेळी डॉ.संतोष मैड म्हणाले की, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत या शिबिराचा लाभ ग्रामीण भागातील लोकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल मुरकुटे दांपत्यांचे अभिनंदन व कौतुक केले. डॉ. मैड यावेळी शिबिर प्रसंगी मार्गदर्शन करताना म्हणाले की म्हणाले की आरोग्याच्या समस्या दिवसागणिक वाढत असून सर्वानी व्यायामाबरोबर आहार चांगला घेतला पाहिजे व स्वतः च्या शरीराची काळजी घेतली पाहिजे, तसेच कोणत्या छोट्या आजाराकडे दुर्लक्ष करू नये, त्यातून मोठे आजार उद्भवतात त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले, 
शिबिरामध्ये ३५० रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी उपस्थितांचे आभार ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी मानले.सर्व रोग निदान शिबिरासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते,कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राईड अकॅडमी शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================


महाराष्ट्र 5-S फाउंडेशन (रजिस्टर्ड) की ओर से--* *+ जाहिर आवाहन+* *+विजयादशमी दशहरा की सभी को शुभकामना+*🌹🥀🌺🌷🌸🙏❤️ ✅ 🇮🇳...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

(((- महाराष्ट्र 5-S फाउंडेशन-)))
इस संघटना का
*उद्देश* सिर्फ विद्यार्थियों के प्रगति के लिए संपूर्ण राष्ट्र में कार्य करना यह है। इसके लिए *(1)शिक्षा(2) सुरक्षा(3) सहयोग(4) सेवा (5)संगठन; का विकास वाल्मीकि मेहतर समाज जैसे वंचित समाज में हम करना चाहते हैं। इस पांच तत्वों का विकास यह संघटना करना चाहती है। इस महान कार्य में आपका सहयोग यह संगठन महाराष्ट्र के लिए चाहती है। महाराष्ट्र में राज्य, जिला और तालुका स्तर पर यह संगठन अपनी शाखाएं स्थापित करना चाहती है ।आपका इस महाराष्ट्र संघटना से जुड़ना देश की राज्य की और समाज की स्थिति चंद महिनो में ही बदल सकती है। जो विद्यार्थी, शिक्षण क्षेत्र में पहले से ही व्यक्ति या संगठन के पदाधिकारी के रूप में कार्य कर रहा है उनका भी हमें सहयोग चाहिए। हम सब लोग मिलजुल कर समझदारी के साथ भविष्य में एक अच्छी पीढ़ी का निर्माण करेंगे। जो भी कार्य करनेवाला कार्यकर्ता इस सिर्फ शिक्षण क्षेत्र में कार्य करना चाहता है उसने उसका नाम, पता और मोबाइल नंबर *श्री महेश जाधव(पुणे) महासचिव* मोबाइल नंबर 9834226519 या *श्री कुमार बिड़लन सहसचिव (लोणंद)* मोबाइल नंबर 9922121701इनके पास दे तथा इनसे संपर्क करें यह विनंती है। धन्यवाद!
 विनीत,

===================================
---------------------------------------------------
*नरोत्तम चव्हाण*✍️✅🇮🇳
मो.9850545605
(अध्यक्ष महाराष्ट्र 5-एस फाउंडेशन-रजिस्टर्ड)
---------------------------------------------------
===================================


*कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या प्र.भाषा संचालकपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती; मान्यवरांकडून अभिनंदन*💐✅🇮🇳...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सातारा - प्रतिनिधि - / वार्ता -
येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ.सुभाष वाघमारे यांची कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या प्रभारी भाषा संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. २८ ऑक्टोबर २०२३ रोजी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डी.टी.शिर्के यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलसचिव प्रा.डॉ.विजय कुंभार व विविध विद्याशाखेचे अधिष्ठाता उपस्थित होते. नियुक्तीनंतर महाविद्यालयात प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. जेष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, यशवंत मनोहर, किशोर बेडकिहाळ ,लेखक बाळासाहेब कांबळे ,कुंदा लोखंडे,सतीश मस्के,डॉ.प्रशांत गायकवाड ,निलेश महिगावकर,डॉ.विश्वनाथ शिंदे, डॉ.सुधाकर शेलार,डॉ.बाबुराव उपाध्ये,डॉ. शिवकुमार सोनाळकर,डॉ.दत्ता पाटील,शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अनेक सदस्य ,प्रा.चंद्रकांत जडगे, रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक ,शाहीर शाम रोकडे , समता प्रतिष्ठान मळोलीचे सदस्य , तसेच मराठी विभागातील प्राध्यापक यांनी त्यांचे अभिनंदन केले. 
प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील,माळशिरस तालुक्यातील मळोली हे असून त्यांचे महाविद्यालयीन ११ वी ते एम.ए.पर्यंतचे शिक्षण छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये झालेले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल ,फुंडे ,कर्जत ,माढा ,मंचर ,लोणंद ,पाचवड येथील महाविद्यालयात त्यांनी मराठी विषयाचे ३३ वर्षे अध्यापन केलेले आहे. अलीकडेच त्यांचे ‘संविधानाच्या स्वप्नातलं गाव व मी भारतीय हे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध झाले असून जवळपास २२ पुरस्कार त्यांच्या कवितासंग्रहास मिळालेले आहेत. महाविद्यालयीन वार्षिक नियतकालिकासह रयत शिक्षण संस्थेच्या रयत शिक्षण पत्रिकेच्या संपादनात देखील काम केलेले आहे . विवेक वाहिनी सारख्या विद्यार्थ्यांना स्वयंविकास करणाऱ्या उपक्रमात त्यांनी महत्वाच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत. महाविद्यालयात मराठी विभागात नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करून सतत प्रयोगशील राहणे हे त्यांचे वैशिष्ट्य राहिलेले आहे. आधुनिक सम्यक विचारांचा पुरस्कार करीत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना प्रेरित केलेले आहे. वक्तृत्वावर त्यांचे प्रेम असून त्यांनी वक्तृत्व कला विकास कार्यशाळेसारखे उपक्रम आयोजित करून भाषा विकासासाठी प्रयत्न केले आहेत. भाषा ,साहित्य ,संशोधन ,उपयोजित लेखन ,संपादन यात त्यांना रस असून सतत कार्यमग्न असतात.मराठी भाषा ,संस्कृती व आदिवासी बोलीभाषा यांचा अभ्यास व संशोधन करण्यासाठीचे वातावरण तयार करणे ,त्यांची जोपासना करणे या उद्दिष्टासाठी भाषामंडळ काम करते. भाषा मंडळद्वारे विविध भाषा ,संस्कृती ,आदिवासी बोली संदर्भाने पदविका कोर्सेस सुरु करणे,इत्यादी उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली. अनेक मान्यवरांनी विद्यापीठातील भाषा संस्कृतीचे अभ्यास कार्य गतिमान करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले आहे.

===================================
---------------------------------------------------
*वृत्तविशेष सहयोग*
प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये (सर) श्रीरामपूर 
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================7

Saturday, October 28, 2023

श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय व्हावे या मागणीसाठी पुन्हा श्रीरामपूर कर एकत्रित ?


श्रीरामपूर - प्रतिनिधि - /वार्ता -
श्रीरामपूर शहर व तालुक्यातील सर्वच नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा ‘श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय’ व्हावे, या मागणीसाठी पुन्हा एकदा श्रीरामपूरकर एकत्रित मंगळवारी विजयादशमीच्या दिवशी अनेकांनी श्रीरामपूर जिल्हा व्हावा, असे साकडे श्रीराम प्रभूंच्या चरणी घातले.


क्षेत्रफळाच्यादृष्टीने सर्वात मोठा असणार्‍या अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा व्हावा ही अनेक दिवसांपासूनची येथील नागरिकांची मागणी नव्हे तर.. हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय होत आहे. जिल्हा मुख्यालय होण्यासाठी सर्वच सोय नुसार परिस्थिती श्रीरामपूरमध्ये अनुकूल असल्याने ही मागणी जोर धरत आहे.

जिल्हा मुख्यालयाच्या बाबत आमदार लहू कानडे म्हणाले, श्रीरामपूर जिल्हा व्हावा, हा माझ्याही जिव्हाळ्याचा विषय आहे. मी आमदार झाल्यानंतर हाऊसमध्ये देखील अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा मुख्यालयाचा विषय घेतला होता. श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन विविध आंदोलने करणे गरजेचे आहे. यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी मी तयार असल्याचे आ. लहू कानडे यांनी सांगितले.

माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक म्हणाल्या, माजी मंत्री खा. स्व. गोविंदराव आदिक यांनी श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय व्हावे यासाठी खुप प्रयत्न केले. जिल्हा होण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी त्यांनी श्रीरामपूर याठिकाणी आणल्या होत्या. श्रीरामपूर जिल्हा व्हावा, ही आमचीही प्रामाणिक इच्छा आहे. यासाठी लागेल ते सर्व सहकार्य करण्यासाठी आम्ही तयार आहोत

माजी उपनगराध्यक्ष रवी गुलाटी म्हणाले, प्रभू श्रीरामाला व सीतामातेला सीता हरण होईल याची कल्पना नव्हती. परंतु श्रीरामपूर जिल्ह्याचे हरण होणार आहे. याची कुणकुण श्रीरामपूरकरांना आधीच लागलेली आहे. म्हणून सावध व्हा.. जोपर्यंत श्रीरामपूर जिल्हा होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसू नका, जिल्ह्याचे ठिकाण दुसरीकडे गेल्यास श्रीरामपूरचे वाटोळे निश्चित आहे. सर्वांनी एकत्रित येऊन श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी लढा उभारा, जोपर्यंत श्रीरामपूर जिल्हा होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसू नका त्यामध्ये सातत्य ठेवा, असे ते म्हणाले.

श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी प्रताप नाना भोसले यांनी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीची स्थापना करून जिल्हा मुख्यालय होण्यासाठी शहरात सह्यांची मोहीम राबविली, श्रीरामपूर बंदची हाक देऊन बंदही यशस्वी केला होता. अनेक मंत्र्यांना निवेदनेही दिली होती. परंतु नंतरच्या काळामध्ये जिल्हा कृती समितीचा लढा कमी पडला. त्यानंतर राजेंद्र लांडगे यांनी या लढ्यात सातत्य ठेवले. स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या माध्यमातून अध्यक्ष सुभाष त्रिभुवन, कार्याध्यक्ष बाबा शिंदे व उपाध्यक्ष संदीप मगर यांनी या लढ्यात उडी घेतली.

गेल्या काही दिवसांपासून हा लढा काहीसा थंडावल्याचे वाटत होते परंतु आता श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय व्हावे, या मागणीसाठी श्रीरामपूरकर पुन्हा एकदा सर्व घटक सोबत आल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता श्रीरामपुरातील पुढार्‍यांना तसेच नागरिकांनाही आता रस्त्यावर उतरावे लागणार आहे. विविध मार्गाने आंदोलने करून श्रीरामपूर जिल्ह्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करावा लागणार आहे.

नगर जिल्ह्याचे विभाजन झाले तर श्रीरामपूर हाच नवीन जिल्हा होणार! नाहीतर जिल्हा विभाजन होणार नाही व इतर कोणत्याही ठिकाणी जिल्हा मुख्यालय होऊ देणार नाही, असा श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचा ठाम निर्धार असल्याचे समितीचे अध्यक्ष प्रताप भोसले यांनी सांगितले.

-^--^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^
===================================
श्रीरामपूर जिल्ह्यासाठी लाक्षणिक उपोषण
---------------------------------------------------
===================================

श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व शिवप्रहारच्यावतीने श्रीरामपूर जिल्हा व्हावा या मागणीसाठी शनिवार दि. 28 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 पासून पुढे दोन तास लाक्षणिक उपोषण गांधी पुतळा येथे करण्यात आले आहे. लोकशाही मार्गाने होणार्‍या या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे व प्रशासनाचे श्रीरामपूर जिल्हा व्हावा या श्रीरामपूरकरांच्या मागणीबाबत लक्ष वेधण्यात आले

===================================
---------------------------------------------------
: - सह,संपादक - रंजित बतरा -संकलन...✍️✅🇮🇳...वार्ता...
---------------------------------------------------
===================================





*आली आली आली श्रीरामपूरात सर्कस आली !**अन् सर्कस बघण्यासाठी मोठी गर्दी झाली !!*🌹🥀🌺🌷🌸🙏❤️ ✅ 🇮🇳...


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*श्रीरामपूर शहरात पाच वर्षांनंतर*
*उभारला गेला सर्कशीचा तंबू !*

 *१०७ कलाकारांच्या ताफ्यासह बिंगो सर्कस १३ ऑक्टोबर पासून ५ नोव्हेंबर पर्यंत करणार श्रीरामपूरकरांचे मनोरंजन*

*दिपक कदम - श्रीरामपूर*
श्रीरामपूर शहरात व तालुक्यातील जनतेसाठी येत्या १३ ऑक्टोबर पासून श्रीरामपूर शहराच्या पश्चिमेस संगमनेर रोडवरील बुवा मंगल कार्यालय समोरच्या मोकळ्या व प्रशस्त जागेत बिंगो सर्कस आलेली आहे.या सर्कशीत १०७ कलाकार असून ते केवळ मनोरंजन करणार असल्याचे व्यवस्थापक माणिक खांडेकर यांनी सांगितले. 
सर्कस मालक सुनिल चौहान यांनी कोरोना काळात आमच्या सर्व कलाकारांना दोन ते तीन महिने सांभाळले.कोरोना काळात सर्व कलाकारांवर उपासमारीची वेळ आली होती.ती चौहान यांनी त्यांच्या परीने सांभाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला.त्यांच्यावर सर्कस मधील सर्वच प्राणी विकण्याची वेळ त्यांच्यावर आली.त्यानंतर लाॅकडाऊन कालावधी वाढल्यामुळे प्रत्येक कलाकार आपल्या गावी निघून गेले. महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश याठिकाणी राहणारे कलाकार गावाकडे रवाना झाले. त्यांनी मिळेल ते काम करत आपला उदरनिर्वाह केला.आणि त्यातूनही वेळ मिळेल तेव्हा सर्कशीतील कसरतीचा सराव देखील केला.सुनिल चौहान यांनी सरकारकडे आर्थिक मदतीची याचना न करता फक्त आम्हाला आमचे काम करून आमच्या कष्टाचे पैसे मिळून द्या.अशी विनंती केली.आणि तत्कालीन सरकारने मनोरंजन कार्यक्रमावरील बंदी हटवली. त्यामुळे मनोरंजनाचे सर्व कार्यक्रम सूरु झाले.आणि जवळजवळ पाच वर्षांच्या कालावधीनंतर श्रीरामपूर शहरात सर्कस आली आहे.खुपच आनंदी वातावरणात बिंगो सर्कशीचे आगमन झालेले आहे. ही सर्कस ५ नोव्हेंबर पर्यंत आपल्या श्रीरामपूर शहरात मनोरंजन करून त्यांच्या शुभेच्छा घेऊनच पुढचा मुक्कामाला जाणार असल्याचे व्यवस्थापक माणिक खांडेकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

*१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार या‌द्यांचा विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम जाहीर*


अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा
भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार या‌द्यांचा विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम जाहीर केला असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

*या कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक* 
*खालीलप्रमाणे आहे*

२७ ऑक्टोबर २०२३ एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, २७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबर २०२३ दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी, ४,५ नोव्हेंबर व २५, २६ नोव्हेंबर, २०२३ विशेष मोहिमांचा कालावधी (प्रत्येक मतदान केंद्रावर), २६ डिसेंबर २०२३ दावे व हरकती निकाली काढणे १ जानेवारी २०२४ अंतिम प्रसिद्‌धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी या‌द्याची छपाई, ५जानेवारी, २०२३ मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार दि. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी, सहा मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय संबधित मतदान केंद्रावर प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करावी. दि.१ जानेवारी, २०२४ दि.१ एप्रिल २०२४ दि.१ जुलै २०२४ व दि.१ ऑक्टोबर, २०२४ रोजी १८ वर्ष पूर्ण करणा-या मतदारांनी नमुना ६ अर्ज भरून द्यावेत व त्या त्या अर्हता दिनांकास त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट केले जाईल. दि.२७ ऑक्टोबर २०२३ ते दि. ०९ डिसेंबर २०२३ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. यात नागरिकांनी जास्तीत जास्त मतदार म्हणून नाव नोंदणी करावी व नागरिकांनी नावाची खातरजमा करून नाव समाविष्ट करणे, नाव, पत्ता बदल करणे, नावांची वगळणी करणे इ. बार्बीकरीता नमुना ६,७,८ भरून देण्यासाठी आपले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ) अथवा तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा. तसेच ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये एका विशेष ग्रामसभेचे आयोजन दि. २७ ऑक्टोबर २०२३ ते दि.०४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत करण्यात येणार आहे. या काळात ग्रामसभेमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्या अंतर्गत
नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरुपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल. तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरीत झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावांची मतदार यादीतून वगळणी केली जाईल. या कार्यक्रमामध्ये युवा मतदारांची नौदणी वाढण्यासाठी महाविद्यालयामध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट मतदार मित्र महावि‌द्यालय पुरस्काराचे आयोजन करण्यात येणार आहे. शंभर टक्के मतदार नोंदणी केलेल्या आणि मतदार जागृती उपक्रम राबविणा-या महावि‌द्यालयांना पुरस्कार दिले जाणार असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:* ✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================



*तहसीलदार रविंद्र होळी आणी महेंद्र वाकलकर यांच्या संपत्तीची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी: भा.ऑ.मी.सु.फो.इंडियाची मागणी*


चंद्रपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तहसीलदार रविंद्र होळी आणी कोरपना तहसीलदार महेंद्र वाकलकर आणी खनिजकर्म अधिकारी .श्री नैताम यांच्या संपत्तीची एस आय टी मार्फत चौकशी व्हावी अशा मागणीचे निवेदन भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया चे संस्थापक अध्यक्ष अय्यूबभाई कच्छी आणी पदाधिकाऱ्यांमार्फत मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना देण्यात आले.

या निवेदनात असे म्हटले आहे की,चंद्रपुर जिल्ह्यातील मूल तहसील कार्यालयात कार्यरत तहसीलदार रविंद्र होली आणी कोरपना तहसील कार्यालयात कार्यरत तहसीलदार महेंद्र वाकलकर यांच्या गैरकारभाराबाबत अनेक तक्रारी येत असून काही दिवसांपासून प्रसार माध्यमात यांच्या गैरकारभाराच्या बातम्या देखील सातत्याने प्रकाशित होत आहे, 
मात्र वरिष्ठ अधिकारी आणी संबंधीत महसूल प्रशासन यावर उचित कार्यवाही करणेबाबत का टाळाटाळ करत आहे,त्यांचेही सदरील प्रकरणी हात ओले तर होत नाहीना? असा संशय बळावत आहे.
आपल्या कार्यकाळात या दोन्ही अधिकाऱ्यांनी संबंधित रेती (वाळू) घाट ठेकेदारांशी संगनमत करून अनैतिकतेच्या मार्गाने या कोट्यावधींची आडमाफ बेनामी संपत्ती जमा केल्याचे बोलले जात असुन शासनाच्या गौनखनिज संपंतीची ज्यांना रक्षा करण्यासाठी नेमले तेच भक्षक बनल्याचे चित्र दिसून येत आहे.
अशा प्रकारे जेव्हा रक्षकच भक्षक बनतील तर मग शासनाच्या संपंतीचे रक्षण करणार कोण?
याकरीता सामाजिक संघटनांना पुढाकार घेणे क्रमप्राप्त ठरत आहे.
 चंद्रपूर जिल्ह्याच्या मुल आणी कोपरना या दोन्ही तालुक्यातील विद्यमान तहसीलदार यांनी गैरमार्गाने कमावलेल्या आडमाफ संपत्तीची सखोल चौकशी होणे कामी भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया चे संस्थापक अध्यक्ष अय्यूबभाई कच्छी यांच्या वतीने दि. २७ ऑक्टोंबर २०२३ रोजी मा. जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना निवेदन देण्यात आले.
 या निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की,नलेश्वर मोकासा आणी चकनलेश्वर रेती घाट या दोन्ही घाटांवरील घाटधारक ठेकेदारांशी मूल चे तहसीलदार रविंद्र होली यांची भागीदार तर नव्हेना? असा आरोपही त्यांनी केला आहे.
याकरीता सदरील प्रकरणी निःपक्षपाती चौकशी होणे आवश्यक असल्याचे देखील म्हटले आहे.
सदरील प्रकरणी २०२१ से २०२३ पर्यंत या तीन्ही अधिकाऱ्यांच्या संपत्ती ची चौकशी झाल्याच दुधाचे दुध आणी पाण्याचे पाणी हे सिद्ध होईल असेही शेवटी म्हटले आहे.

*कान्हुर पठार उपसा सिंचन योजनेबाबत* *प्रशासन सकारात्मत - रघुनाथ आंबेडकर*


अहमदनगर -  प्रतिनिधि -/ वार्ता -
जिल्ह्यातील पारनेर निमा पारनेर तालुका आजही दुष्काळी जिवन जगत आहे म्हणुन " कान्हुर पठार उपसा सिंचन योजना "मंजुर व्हावी या करीता राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभाग - पुणे कार्यालयास दी .२१ / ५ /२०२३ रोजी सदर योजना व्हावी म्हणुन लेखी पत्र दिले होते.
परंतु प्रशासनाने त्या विषयाची गांभिर्याने दखल न घेतल्याने भाजपा कामगार मोर्चा , पारनेर तालुकाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी जलसंपदा विभाग पुणे यांना दि. ९ / ९/ २० २३ रोजी दुसरे स्मरणपत्र दिले व सदर योजनाचा प्रशासनाने विचार न केल्यास दि. ३० / १० / २०२३ रोजी पासुन हनुमंत धुमाळ (मुख्य अभियंता - विप्र ) जल संपदा विभाग पुणे यांचे कार्यालयासमोर "बेमुदत आमरण उपोषण " करील असा तिव्र इशारा दिल्याने प्रशासनाचे अधिकारी विलास हंडे यांनी वेळीच दखल घेऊन "प्रकल्प फेर नियोजनात घेतला आहे याकरीता उपोषण करु नये"असे सखोल चर्चेअंती छोटेखानी बैठकीत समजावून सांगितले.तथा
श्री.आंबेडकर यांना लेखी विनंती पत्र दिल्याने त्यामुळे दि.३० / १० / २० २३ रोजीचे त्यांचे उपोषण तात्पुरते स्वरूपात स्थगित करण्यात आले असून दि .१५/ १२ /२०२३ पर्यंत सर्व्हेक्षण पुर्ण न केल्यास दि.१६ /१२ / २०२३ रोजी पासून 'उपोषण' केले जाईल असे देखील या बैठकीत ठरविण्यात आले. 
याप्रसंगी प्रकल्प अधिकारी विलास हंडे , गणेश सिनलकर,, वसंतराव शिंदे , अब्बास मुजावर शेठ , सुधीर तांबे , बबनराव डावखर , चंद्रकान्त कुलकर्णी,डॉ. सुरेश खणकर आदी मान्यवर उपस्थित होते 
 प्रशासनाने दि. १५ / १२ / २०२३ पर्यन्त प्रकल्प अहवाल शासनास सादर केला नाही तर जल संपदा विभाग , पुणे कार्यालया समोर तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही श्री.आंबेडकर यांनी जलसंपदा विभाग , पुणे कार्यालयातील अधिकारी यांना दिला आहे.

===================================
---------------------------------------------------
 पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
====================================